Skemer - 3 in Marathi Thriller by Govinda S V Takekar books and stories PDF | स्कॅमर - 3 - कप

Featured Books
  • ઈર્ષા

      ईर्ष्यी घृणी न संतुष्टः क्रोधनो त्याशङ्कितः।  परभाग्योपजीव...

  • ફરે તે ફરફરે - 61

    ફરે તે ફરફરે - ૬૧   જુના જમાનાના લેખકો સવારનુ વર્ણન કરત...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 10

    ૧૦ મહારાણીની પ્રેરણા   કાંધલે જે કહ્યું તે સાંભળીને કરણ...

  • ઇડરિયો ગઢ

    ઇડરિયો ગઢવર્ષોથી મનમાં તમન્ના હતી અને એક ગૂજરાતી ફિલ્મ પણ વા...

  • આકર્ષણ બન્યુ જીવનસાથી - 1

    મહિનાનો પહેલો દિવસ અને ઍ પણ સોમવાર. અમારી ઓફિસ મા કોઇ જોબ મા...

Categories
Share

स्कॅमर - 3 - कप

भाग ५: कप

१७ जून २०१९
सकाळी ८:०० वाजता,

(निशांत हॉल मधे त्याच्या व्हीलचेअर वर बसून आज आलेला पेपर वाचत होता, काल झालेली घटना पहिल्याच पेज वर आली होती .... ते सर्व बघून निशांत , अनिश ला मोठ्याने आवाज देतो )

निशांत : अनिश....अरे अनिश ....

अनिश : (मधे असलेल्या स्वैपाक घरातून च ) काय रे....काय झालं

निशांत (मोठ्याने) : अरे तू आधी बाहेर ये ... लवकर

अनिश : हो... आलो

( अनिश हाता मधे कॉफी चे दोन कप घेऊन बाहेर येतो , एक कप निशांत ला देतो आणि समोर असलेल्या खुर्ची वर जाऊन बसतो)

अनिश : बोल आता ...काय झालं ?
.
निशांत : 'एका साध्या चहा विक्रेत्याची राहत्या घरी आत्महत्या ... अकाऊंट मधून ५०० कोटीची फसवणूक '
....
हा तर तोच आहे ना ...ज्याच्या बद्दल तू काल बोलू लागला होतास

( अनिश स्मिथ हास्य करत स्वतः चे पाय समोरच्या टेबल वर ठेवतो)
..

निशांत : आणि तुला कसं कळलं होत की तो जिवंत राहणार नाही ?

अनिश : (कॉफी चा घोट घेत) कॉफी छान झाली...नाही का?

निशांत (थोड चिडून) : हो .... तुला कसं माहीत होत ते सांगशील का आता ...

अनिश : किती प्रश्न विचारतो ... पहिले पूर्ण बातमी तर वाच .. पूर्ण वाच आणि मग बोलू आपण

(निशांत पुढे पूर्ण बातमी वाचतो आणि त्याचे आश्चर्याने डोळे मोठे होतात)

निशांत : हे काय.. तो मोस्ट वॉन्टेड होता ...

अनिश : correct

निशांत : पण ... तो मरणार हे तुला कसं कळलं ... तुला त्याने काही सांगितलं होतं ? तू त्याला ओळखत होतास का ?

अनिश : अरे....हो ...हो...किती प्रश्न विचारतो, तुझ्या प्रश्नाची गाडी जरा थांबावं आता

निशांत(चिडून) : पण तू एका पण प्रश्नाच उत्तर देत नाहीयेस

(अनिश आपल्या हातात ला कप समोरच्या टेबल वर ठेवत )

अनिश :मी जर म्हणालो, त्याने आत्महत्या नाही तर त्याचा खून झाला आहे ...

निशांत (अचंबित होऊन) :
काय ? खून ....

अनिश : हो खून च ,बरोबर ऐकल आहेस तू
.
निशांत : जर खून असेल तर मग त्याच्या रूम मध्ये सापडलेली ती suicide नोट च काय ?

अनिश (चेहऱ्यावर स्मित हास्य करत) :well .... ती नोट मीच त्याच्या रूम मध्ये ठेऊन आलो होतो
..
निशांत : तू ..... म्हणजे तू त्याला मारलस

(अनिश ने हळू नकारार्थी मान हलवली)

अनिश : मी नाही मारल ,त्याला तर कुंभा ठाकूर ने मारल ... मी तर फक्त त्या नंतर जाऊन तिथे ही note ठेऊन आलो ... that's it. !

निशांत : कुंभा ठाकूर ... तो गुंडा ?

अनिश : हो तोच

निशांत: पण तो का मारेल त्याला ? आणि त्याचा काय संबंध ?

अनिश : कारण त्याच्या अकाउंट मधून फक्त ५०० कोटी नाही तर त्या सोबत त्याने एक महत्त्वाचा कोड सुद्धा त्याने दुसऱ्याला देऊन टाकला...त्यामुळे कुंभा ने त्याचा पत्ता कट केला जेणेकरून प्रकरण अजून बाहेर येऊ नये म्हणून .. म्हणजे त्याला तश्या ऑर्डर्स आल्या होत्या .. ..

निशांत : मग त्यात तुझा काय संबंध ? तू का तिथे नोट ठेऊन आलास ?

अनिश : तुला आठवतंय का ...जेव्हा तुझा accident झाला होता तेव्हा मी तुला म्हणालो होती की मी सर्वांसाठी खूप महत्त्वाचं मिशन करायला जात आहे ... आणि तुला यात माझी साथ द्यावी लागेल ... ते मिशन हेच आहे

निशांत : म्हणजे .... हे सगळ तुझ्या मिशन चा भाग आहे .... आणि अस दुसऱ्याचा जीव घेणं हे कुठला मिशन आहे रे तुझ....

अनिश : जेव्हा सैनिक एखाद्या terrorists ला मारून टाकतात तर ते विनाकारण जीव घेत नाहीत,त्या मागे बरेच कारण असतात , ते दुसऱ्यांना वाचवण्यासाठी , वातावरण सुरक्षित राहण्यासाठी करतात ... आणि मी जे करत आहे हे पण असच काही आहे maybe या पेक्षा पण जास्त अवघड आणि महत्त्वाचं ...

निशांत (विचार करत) : म्हणजे.... दातार च काही terrorist connection ......

अनिश : हो पण तू त्याला एक सायबर terrorist म्हणू शकतोस .

निशांत : त्याने असं नेमकं काय केलं होत की तू त्याला मारण्यास प्रवृत्त केलस ?

अनिश : तो चहा विकत होता

निशांत(हसत) : काय.... चहा विकत होता म्हणून ....काय थट्टा करतोस

अनिश (हसत) : हो बरोबर ऐकलस तू ....निशांत तू एक काम कर

निशांत : काय.... बोल

अनिश :त्याच चहा च शॉप कुठे होत ते एकदा वाचून सांग मला

निशांत (पेपर मधे बघत ) : ३०६ ट्रेड सेंटर , एन मेन रोड ,कोरेगाव आयटी पार्क.

अनिश (हातामध्ये एक पेन घेऊन) :
आता एक काम कर ' सायबर आर्क '
या आयटी कंपनी च पुण्यात लोकेशन कुठे आहे ते गूगल वर सर्च करुन मला सांग

निशांत(मोबाईल मध्ये सर्च करुन ) : ३०६ ट्रेड सेंटर , एन मेन रोड ,कोरेगाव आयटी पार्क.

अनिश : exactly

निशांत : याचा त्या कंपनी शी काय संबंध ? दुकान तर कुठे पण असू शकतं ना

अनिश : बरोबर आहे ,कुठे पण असू शकत पण हे दुकान जाणीवपूर्वक तिथे होत आणि या दुकानाच त्या कंपनीशी खूप मोठा संबंध आहे

निशांत :(विचार करत) कसा संबंध ?

अनिश : मी तुला नीट explain करतो ,चल माझ्या सोबत

(अनिश ,निशांत ला त्याच्या तळघरात घेऊन जातो.)

(तळघरातले सगळे लाईट्स ऑन केल्यावर ,तळघर पूर्णपणे एक ऑफिस केबिन च ,,, वेगवेगळ्या न्यूज पेपर आणि काही महत्त्वाच्या फोटोंनी भरलेले लाल कलर चा पिनबोर्ड , त्याच्या समोर एक मोठा टेबल, टेबल वर एक मोठं कॉम्प्युटर स्क्रीन,त्याच्या बाजूला एक लहान स्क्रीन आणि एक मोठं प्रोजेक्टर .
बाजूच्या भिंती वर continuous सूरू असलेल्या सीसीटीव्ही स्क्रीन फुटेजेस.
एक सेल्फ मेड, मॉडर्न टेक्नॉलॉजी असेलेल सायबर ऑफिस च अनिश ने तयार केलेले होते )

निशांत(आश्चर्य व्यक्त करीत) : हे....हे....सगळ तू केव्हा तयार केलस ? आणि मागच्या २ महिन्यांपासून मी इथे आहे आणि तू मला हे कधीच का दाखवल नाहीस ?

अनिश (गालातल्या गालात हसत) : प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते मित्रा. .... अस समज की ती वेळ आता आली आहे

(अनिश प्रोजेक्टर चालू करून, आपल्या मेन कॉम्प्युटर च्या कीबोर्ड वर काही बटन दाबून एक सीसीटीव्ही फुटेज चालू करतो)

अनिश : तिकडे आता नीट बघ

(फूटेज : रजनीश दातार , एका ट्रे मध्ये चहाचे कप ठेवून त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला तो ट्रे नेण्यासाठी सांगतो)

अनिश : काही वेगळं वाटल ?

निशांत(विचार करत) : वेगळं तर अस काही वाटलं नाही, एखाद्या नॉर्मल चहावाला असाच चहा देतो

अनिश : तू नोटीस केलस का ,दातार ने आणि त्याच्या असिस्टंट ने ,दोघांनी पण हातामध्ये ग्लोव्हज घातले आहेत

निशांत : पण आजकाल स्वच्छता राखण्यासाठी कुणी पण ग्लोव्हज घालत ,ही तर खूप साधी गोष्ट आहे,यात काय मोठं?

अनिश : निशांत आता जरा नीट बघ,
(ते फुटेज झूम करत) त्या दोघांनी त्याच्या हातामध्ये कुठल्या प्रकारचे ग्लोव्हज घातले आहेत ?

निशांत(नीट निरीक्षण करत) : अरे...हे तर nitrile exam ग्लोव्हज आहेत

अनिश : आता मला तूच सांग हे ग्लोव्हज सहसा कोण वापरत , तुला तर चांगलं माहीत असेल ना फॉरेन्सिक डॉक्टर ....

निशांत : एक तर हे ग्लोव्हज डॉक्टर , केमिकल लॅबोरेटरी मध्ये काम करणारे किंवा क्रिमिनल वापरतात

अनिश : exactly,,, हा ग्लोव्हज महाग असतो, आणि नॉर्मल माणूस वापरण जरा विचित्र नाही वाटत तुला ?,,,आणि दातार समजा वापरत असेल ते तर ठीक आहे पण त्याच्या असिस्टंट ने पण तेच ग्लोव्हज वापरले आहेत,ही गोष्ट मात्र खटकणारी आहे.

निशांत : पण त्याने नेमके काय साध्य होते ? वापरलं तर ते काही गुन्हा थोडी आहे.

अनिश : चल ठीक आहे ,तू म्हणतोस तसं आपण समजून चालू की याने काहीच साध्य होत नाही , आता पुढे बघ

(अनिश फुटेज मध्ये असलेले कप आणखी झूम करून निशांत ला दाखवतो )

अनिश : हे बघ ,तू जर नीट निरीक्षण करशील तर तुला दिसेल की प्रत्येक कपावर एक वेगळी खून केलेली आहे ,जसे की पहिल्या कपावर ३ लाल कलर चे डॉट आहेत तर दुसऱ्या कपावर २लाल आणि १ निळा डॉट आहे... अशे प्रत्येक कपावार वेगवेगळं कलरचे डॉट आहेत ....या डॉट वरून त्या असिस्टंट ला बरोबर माहीत आहे की कुणाला कुठला कप द्यायचा आहे ते ....
(अनिश पुढचं फुटेज दाखवत)
यात नीट बघ ,त्या असिस्टंट ने ते कप आणून दिल्यावर कुणी दुसरा चहावाला असता तर ते कप त्याने परत धुवून वापरले असते पण दातार ने तसं केल नाही.....त्याने ते कप एका बॉक्स मधे भरून ठेवलें ....

निशांत : हे मात्र बरच weird आहे , अशे कप कोण पॅक करून ठेवेल ?
का केलं असेल त्याने अस ?

अनिश : कारण ते कप साधे कप नाहीयेत , प्रत्येक कपामध्ये वायरलेस नेटवर्क ,magnetic चीप आहेत,,,प्रत्येक चीप इतकी व्यवस्थित प्रोग्राम केलेल्या आहेत की त्यावर उमटलेल्या फिंगर प्रिंट्स अगदी व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या जातात,म्हणजे चुकून त्या बाहेरून मोडल्या जरी गेल्या तरी पण actual
फिंगर प्रिंट्स सेव्ह राहतील ..... आणि हे वापरून व्हॉईस रेकॉर्ड सुध्धा करता येत .....

(अनिश कप झूम करून दाखवत)

हे बघ या आहेत त्या चीप .. या दिसायला इतक्या लहान आहेत की लवकर कळत पण नाही की डाग आहे का अजून काही ...

निशांत : हे खरं आहे ? का ....

अनिश : ऐकायला किती जरी काल्पनिक वाटत असेल तरी पण हे सत्य आहे,अस करणं आजच्या जगात शक्य आहे .... आणि रजनीश तर याच गोष्टीत माहीर आहे .... ओव्हर ऑल तो एक इंजिनिअर होता

निशांत : पण याने त्याला काय फायदा होणार होता .... म्हणजे काय मिळालं त्याला हे करून ...

अनिश : तुला आठवतंय का , काही महिन्या आधी आयलिट या कंपनी चे चीफ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आदिनाथ कुलकर्णी यांना एका घोटाळा प्रकरणा मुळे कंपनी तून काढून टाकला होत ...

निशांत:(निशांत ,अनिश च वाक्य पूर्ण करत) ... आणि त्यांना २५ वर्षाची जन्मठेप झाली ....

अनिश : करेक्ट, तो घोटाळा किती कोटीचा होता ... काही आठवतंय का तुला ....

निशांत( डोक्याला थोडा ताण देत) : म्म.......I...think.....५०० कोटी का ५५० कोटी. ....

अनिश : आणि रजनीश च्या अकाउंट मधून किती कोटी गेले

निशांत : ५०० कोटी.....

(अनिश मिश्किल पणे हसत) :काही कळतंय का?

निशांत(विचार करत) : म्हणजे दातार आणि मिस्टर कुलकर्णी हे दोघांनी मिळून हा scam केला होता.....

अनिश : नाही....नाही ..मिस्टर कुलकर्णी ना तर फक्त या प्रकरणात अडकवल .... खरा स्कॅम तर दातार नेच केला होता ....

निशांत (गंभीर चेहऱ्याने) : म्हणजे त्या माणसाची चूक नसताना पण तो आज जेल मध्ये आहे आणि खरं गुन्हेगार तर बाहेर च ....ओह माय गॉड ....हे तर खूप होरीबल आहे ....

अनिश : हमम

निशांत(विचार करत) :जर तो हे सगळ पैशासाठी करत होता तर आता तो अजून कुठला पैशाचाच स्कॅम करणार होता का .....

अनिश : नाही ,पैसे साठी नाही

निशांत : मग तो कप पॅक का करून ठेवत आहे ?...

अनिश : (आपल्या पिनबोर्ड कडे बघत ) : इथेच तर खरा scam चालू झाला आहे......

to be continued .........

...... ..... ...... ...... ...... ...... ...... . By the way, मी एक वेब साईट डेव्हलपर आहे ... जर तुम्हाला तुमची पर्सनल साईट तयार करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ...😊🙏🏻

तुम्हाला जर या स्टोरी मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा ,कारण तुमची एक कमेंट माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे 😊

thank you 😊
©️