benefits of oblivion in Marathi Motivational Stories by पूर्णा गंधर्व books and stories PDF | विस्मरणाचे फायदे

Featured Books
Categories
Share

विस्मरणाचे फायदे

एका स्व रचित रूपक कथेवरून एक व्यापक मानस शास्त्रीय संकल्पना स्पष्ट होईल .

तिन्ही सांजेची वेळ. एका मोठया खडकाआड एक 20/25वर्षांचा तरुण लपला होता .कधी एकदा रात्र होईल आणि जंगलातून वाट काढत पलीकडच्या गावात शिरेन, असा विचार करत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र भावाने त्याच्या वाटणीची जमीन हडप करून उलट ,त्या तरुणावर खोटा आरोप घेऊन गावाबाहेर हाकलून दिलेले होते. त्याचा बदला घ्यावा म्हणून तो दबा धरून बसलेला होता. त्या खडकापलीकडे दूर एक वाडा होता. त्या वाड्याबाहेर उन्हात एक छोटा मुलगा ,9/10 वर्षांचा , त्याच्या छोटया हाताने लाकडांच्या मोळया बांधण्याचे काम करत होता .थकला होता . कदाचित दुपारपासून हे काम करत असावा. सांजेला त्याच्या कामाचे पैसे तो वाड्याच्या मालकाकडे मागतो. मालक रागावून काम नीट केले नाहीस ,असे ओरडतो. मुलगा खूप गयावया करू लागल्यावर मालक आणखी चिडतो आणि रागाने त्याच्या दिशेने एक छोटी सळई फेकून मारतो. मुलगा ती सळई उचलून रडत रडत बाजूच्या नदीकडे निघून जातो. खडका आड लपून तो तरुण त्याला जाताना पाहतो .आणि मनोमन विचार करतो, तो लहान मुलगा खूप दुखावला होता .तो आपल्या जीवाचे काही बरे वाईट तर .....किंवा रात्री येऊन तो वाड्याच्या मालकाला ठार ...असे अनेक वाईट विचार मनात येऊन ,तो तरुण चिंतेने कासावीस होत जातो. हातपाय संकोचून सुन्न होऊन बसतो .

काही अवधी नंतर तोच छोटा मुलगा मित्रांसोबत हसत खेळत येताना दिसतो. सळईच्या साहाय्याने गळ बनवून त्यांनी नदीवर मासे आणि खेकडे पकडलेले असतात .ते घेऊन सारी मुले आनंदात निघालेली असताना, तो लहानगा त्या खडकाआड लपलेल्या तरुणाला विचारतो , "दादा , मी तुला संध्याकाळी पाहिले होते इथे ,तू अजूनही इथेच ?"

तो तरुण मान खाली घालतो आणि उत्तर न देता निघतो पण यावेळी जंगलाच्या दिशेने नाही तर दुसऱ्या गावाच्या दिशेने .

या बोध कथेवरून स्पष्ट होणारा मानसशास्त्रीय पैलू म्हणजे विस्मरण forgetting . लहान मुलाने आणि तरुणाने जीवनाचा वाईट अनुभव घेतला होता .परंतु लहानग्याने ते समरणात ना ठेवता जीवनात पुढे मार्गक्रमण केले . कुशाग्र बुद्धिमत्ता असणे ,माहिती लक्षात ठेवणे हे जितके आवश्यक आहे; तितकेच विस्मरण सुद्धा आवश्यक आहे.

According to Munn , forgetting is the loss permanent or temperory of the ability to recall or recognize something learnt earlier .

लहान मुलांमध्ये विस्मरण ही सहज क्रिया आहे .पण प्रौढ आणि परिपक्व व्यक्तीनी जाणीवपूर्वक वाईट घटना ,आठवणी ,अपमान, तोटा ,नकार यांचे दमन करून त्यांना विस्मरणात ढकलणे आवश्यक आहे. विस्मरणात गेलेल्या या अनावश्यक माहितीमुळे त्यांची साठवण आणि प्रक्रियाकरण यासाठी मेंदूला जे अनावश्यक श्रम पडतात ,त्यात घट होऊन मेंदूचे कार्य सुधारेल. त्याऐवजी सकारात्मक ,उपयुक्त माहिती भावना स्टोर होतील .असे केल्याने चिंता, तणाव, भय आदी दूर होतील .जीवन सुखकर होऊन पुढील दिशा पर्याय मिळतील .या बोधकथेत वाईट अनुभव विस्मृतीत टाकून दुसऱ्या मार्गाने छोट्या मुलाने लाभ करून घेतला .याउलट तरुण मात्र त्याच जागी राहून त्याचा वेळ वाया गेला .म्हणून विस्मृतीत टाकण्याचे स्मरणात ठेवा.

वाईट अनुभावाचा ही सकारात्मक वापर त्या लहान मुलाने करून घेतला .अंगावर भिरकवलेल्या सळईचा त्याने मासे ,खेकडे पकडण्यासाठी उपयोग करून नवीन उपलब्धता मिळवली .तरुण मात्र मनातील हीन भावनेने ग्रस्त होऊन ;तो लहान मुलगा सुध्दा वाईट कृत्य करेल असा विचार करू लागला .कलुषित दृष्टिकोनामुळे अनावश्यक चिंता anxiety ,भय ,मनोविकृती ,निद्रानाश असे विकार जडतात.

याशिवाय "बालदापी सुभाषित ग्राहय" लहान मुलांकडूनसुद्धा बरेच शिकण्यासारखे असते .त्यांची ऊर्जा, खेळकर वृत्ती ,क्षमा, सारे काही विसरून पुन्हा नॉर्मल होणे असे अनेक . लहान मुले इगो वर घेऊन व्यर्थ चिंता वाहत नाहीत .आपल्या मनातील निरागस ,निष्पाप लहान मूल हरवू देऊ नका .

निर्मळ मनाचा मार्ग हा नेहमी सुकर आणि यशदायी असतो बदला ,रागाचा मार्ग हा क्लेशदायक असतो. म्हणून जंगलाचा मार्ग सोडून तरुण सुगम रस्त्याकडे निघतो.

आणखी बरेच पैलू वाचकांच्या व्यक्तीगत अनुभवावानुसार त्यांना स्पष्ट होतील. हे संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एक बुद्धी मंथन brainstormingआहे . थोडी विचारांची कसरत होऊन ,बौद्धीक व्यायाम घडेल. शेवटी उत्तमचा स्वीकार करून अशुभाचा त्याग करावा हाच सुफळ संपूर्ण हेतू.

#पूर्णा गंधर्व