Savar Re - 6 in Marathi Love Stories by Amita Mangesh books and stories PDF | सावर रे.... - 6

Featured Books
Categories
Share

सावर रे.... - 6

एलेना दिसतच होती इतकी सुंदर की तिच्या कडे नुसतं पहात रहावस वाटत होतं. एक तर तिचं सौंदर्य कातील होते. कमनिय बांधा त्यात तिचा पेहराव इंडोवेस्टर्न मग काय सोने पे सुहाना. यश तर यश पण जाईला पण तिचा हेवा वाटला. कदाचित यश साठी हीच योग्य आहे. असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. मग नकळत तिने बाजूच्या आरश्यात स्वतःला पाहिले आणि एलेना सोबत तुलना करू लागली. जाईला मॉडर्न कपडे आणि डिझाईन चा खूप सुंदर सेन्स होता पण तिची आवड नेहमी साधी असायची, उलट एलेना होती. ती होतीच एखाद्या मॉडेल सारखी, मेंटेन आणि सुंदर.
एक दीर्घ श्वास घेत जाईने मनातील निराशा मनातच दाबून चेहऱ्यावर हलके हसू आणले. यश मात्र एलेना कडे एकटक बघत स्वतःच्या नशिबावर हेवा करत होता. त्याचं असं एकटक पहात बसणं एलेनाला विचलित करत होते. जेंव्हा यश ने त्याच्या हृदयावर हात ठेवून मार डाला ची ऍक्शन केली तेंव्हा तर तिच्या गालावर हलकेच लाजेची लाली चढली.
त्या दोघांकडे पाहून जाईने मात्र चेहऱ्यावरचे हसू कायम ठेवत एक आवंढा गिळला. डोळ्यातील अश्रूंना दटावून दाबून ठेवले आणि मनातील भावनांना आवर घालत त्या दोघांच्या आनंदात शामिल झाली.

क्या करे जब दिल किसींको चाहता है तो सबसे पहले उसकी खुशी के बारे मे ज्यादा सोचता है।
यश आणि एलेना ने आणखी बरीच शॉपिंग केली. आता पोटात भुकेने क्लासिकल डान्स सुरू केला होता म्हणून त्यानी जवळच्या कॅफे कडे आपला मोर्चा वळवला. ते दोघे पुढे होते आणि जाई मागून येत होती. अचानक तिला गरगरल्या सारखे झाले आणि तिने जवळच्या रेलिंगचा आधार घेण्यासाठी हात पुढे केला पण रेलिंग दूर होते. तिचा अंदाज चुकला आता ती पडणार तोच यश धावत पुढे आला आणि त्याने तिला अलगद पकडले. त्याचा स्पर्श होताच जाईने डोळे उघडले परंतु तिच्या डोळ्यावर अंधार आल्यामुळे ती पुन्हा डोळे बंद करून तशीच त्याच्या बहुत पडुन राहिली.
यश तर तिची हालत बघून पुरता घाबरला. तो सारखा तिला उठवत होता. तिच्या बद्दलची काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याने तिला उचलून कॅफेत नेले मागून एलेना पण आली त्याने पाणी घेऊन जाईला पाजले. पाणी प्यायल्याने तिला थोडी तरतरी आली होती. ती सावरून बसली.
मग यश ने तिला विचारले, काय झालं जाई? तू ठीक आहेस ना?
ती काहीच बोलत नव्हती फक्त मानेने होकार देऊन तिने त्याला चिंता मुक्त केले होते. पण यशची काळजी अजूनही तशीच होती. तो खुप घाबरला होता.

जाईला असे का झाले याचे कारण तर माहीत होते ती काल यशच्या घरी पण धड जेवली नव्हती आणि सकाळी तर यशने तिला ओढतच बाहेर नेले होते. रात्रभर रडून घालवली होती त्यात मानसिक आघात पण ते यश ला कसे सांगणार म्हणून ती शांत झाली. परंतु पुन्हा त्याच्या त्याच प्रश्नामुळे तिने त्याला ती सकाळ पासून उपाशी असल्याचे सांगितले. यशाला खूप वाईट वाटले त्याला माहित होतं की कितीही झालं तरी जाई कधीच स्वतःच्या तोंडून काही बोलणार नाही. ह्या आधीही ती अशीच होती.तिला काय हवं नको ते सगळं नितीन आणि यश दोघे मिळून ठरवायचे.

मग आजच मी कसा विसरलो याचं त्याला वाईट वाटलं.

तो लगेच जाऊन तिच्या साठी खायला घेऊन आला. एक व्हेज चीज सँडवेज आणि कोल्ड कॉफी तिची फेवरेट होती. जाईने चीज सँडवेज पाहून आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं त्यानेही मंद हसत म्हटलं, तुला काय वाटलं मी विसरलो तुझी चॉईस?

जाईच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमलले. यश ने स्वतःच्या हाताने तिला खाऊ घातले. तिला भरवताना तो क्षणभरासाठी हे विसरून गेला होता की त्याच्या सोबत एलेना पण होती.
एलेना त्या दोघांना पहात होती. ती दोघांच्याही चेहऱ्याचे निरीक्षण करत होती. जणू ती त्या दोघांना वाचण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती.
दिल मे तेरी फिक्रसी है, दर्द को तेरे महसुस करता हुं।
देख नहीं सकता तेरे आंसू, हर आंह से तेरे मै डरता हुं।

यशच्या मनातील भावना नेमक्या काय आहेत ह्याच कोडं जणू तिघांनाही उलगडत नव्हतं.कधी मैत्री, कधी थोडं मैत्रीच्या पलीकडे वाटत होतं.

एक जाई जी अंदाज लावून हरली होती. तर दुसरी एलेना जिला दोघांच्या मध्ये मैत्री आहे की आणखी काही हेच कळत नव्हते आणि यश जो स्वतःच अनभिज्ञ होता. जे त्याच्या कडून घडत होते ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न ही केला नव्हता. किंवा त्याला जाई आणि एलेना काय विचार करत असतील ते ही त्याला माहीत नव्हते.

यश एकेक लहानात लहान गोष्टीचा विचार करत होता पण त्याच्या विचारात एलेना कमी आणि जाईच जास्त दिसत होती. तीच रहाणं, तिचं वागणं, तिचा स्वभाव, तिची आवड, तीच इमोशनल होणं, तीच काळजी करणं, तीच हसणं, लहान सहान गोष्टीं वरून खुश होणं. तिचा आवडता रंग आणि तिचे छंद सगळ्या बाबत तो भरभरून बोलत होता. तो एलेना ला सांगत होता खरं पण अस वाटतं होतं की तो हे सगळं इतके दिवस मिस करत होता. एलेना शांत राहून त्याच निरीक्षण करत होती.
दुपार पालटू लागली तरीही जाई घरी आली नाही म्हणून तिचे आई बाबा चिंतेत होते. तेव्हढ्यात बेल वाजली जाईची आईने लगेच जाऊन दार उघडले. दारात जाई आणि यश उभे होते. जाईच्या आईने दोघाना आत यायला सांगितले सोबत किती उशीर केलात हे बोलतच होत्या तर एलेना तिथे आली. त्यानी तिलाही आत बोलावले. एलेना पहिल्यांदा घरी आली म्हणून जाईच्या आईने तिचे आनंदाने स्वागत केलं. त्या दोघांना जेवून जाण्यासाठी खूप आग्रह करत होत्या पण आताच बाहेर सँडवेज खाल्ल्याने यश आणि एलेना काही वेळातच निघून गेले.

जाई फ्रेश होऊन बाबांच्या बाजूला बसली. कधी पासून तिचे बाबा तिचा चेहरा निहाळत होते. मात्र ना ती खुश दिसत होती ना दुःखी. ती त्याना बिलगुन बसली, त्यानाही प्रेमाने तिला विचारले , जाई तू ठीक आहेस ना बेटा.

जाईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि थोडा विचार करत ती म्हणाली,
बाबा मी ठीक आहे तुम्ही का एव्हढी काळजी करताय? जे झालं ते मी एक्सेप्ट केलंय आता.

बाबा तिच्या काळजीने म्हणाले, कळतंय बाळा पण असं त्यांच्या समोर राहून तुलाच जास्त त्रास होईल ना.

जाई त्याना समजावत म्हणाली, बाबा जे झालं त्यात त्यांचा काय दोष होता? मग त्याची शिक्षा त्याना का द्यायची? जे झालं ते मी विसरू शकत नाही पण त्या कारणाने मी माझी मैत्री कशी विसरून चालेल? मी हे जे काही केलं ते फक्त माझ्या मैत्रीच्या कारणाने. बरं अजून आता आपण ना ह्याच विषयावर नको बोलूया मला खूप भूक लागलीय. चला जेवायला.

तिला अस बोलताना पाहून तिच्या आई बाबांना गहिवरून आले आणि सोबत जाईचा अभिमान पण वाटला.
यश च तस रोजच जाईच्या घरी येणे जाने होत होते. काहींना काही निमित्ताने ते दोघे समोर येत असत. जाईने स्वतःच्या मनाला जरी किती समजावले असले तरीही ती एकांतात तिच्या भावनांना अश्रूंच्या वाटे मोकळं करत होती. तो दिवस उजाडला दुपारी सागरच लग्न होत. नितीन जाई पण जाणार होते लग्नाला. सारिका पण जाई सोबत जाणार होती. एलेना आणि यश त्याच्या बाईक ने जाणार होते. सकाळीच सारिका जाई कडे आली होती तिने जाईला एक बॅग दिली जाईने खोलून पाहिले तर त्यात तोच ड्रेस होता जो तिला मॉल मध्ये आवडला होता.

जाई मोठे डोळे करून आश्चर्याने तिच्याकडे पहात म्हणाली,
हे काय हा ड्रेस तर त्या दिवशी मी मॉल मध्ये पहिला होता. तू कधी घेतलास?

सारिका तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली हा माझ्या साठी नाही मॅडम तुझ्या साठी आहे.

तिचे हात खाली करत जाई तिला म्हणाली काय? माझ्या साठी? पण कशाला? अग माझा बिर्थडे पण नाही मग हे गिफ्ट किस खुशी मे?

सारिका तिला अगदी प्रेमाने म्हणते तू आम खा ना गुठलिया क्यूँ गिन रही है?

अग पण…

अग पण वाली जा आणि पटकन तयार हो नाहीतर तिकडे सागर दादा च लग्न होऊन जाईल आपण इथेच राहू.

जाई पण तिला तू नाही सुधारणार अश्या अविर्भावात डोक्यावर हात मारून तयार व्हायला निघून गेली आणि

सारिका मनातच म्हणाली तुला कस सांगू हा ड्रेस दादानेच तुझ्यासाठी आणलाय. नेमकं काय चाललंय माझ्या डोक्यावरून जातंय.
दुपारी 12 वाजून 45 मिनिटाच्या मुहूर्तावर लग्न होते पण त्याआधीच्या सगळ्या विधी एलेना ला पहायला मिळावा म्हणून यश तिला घेऊन लवकरच तिकडे गेला होता. नितीन जाई आणि सारिकाला घेऊन हॉल वर पोहोचला. जाईने तोच ड्रेस घातला होता त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. स्टेज वरूनही यश ची नजर तिच्यावर पडली आणि तो खुश झाला. कारण तो ड्रेस त्यानेच जाई साठी घेतला होता आणि सारिकाने तो जाई पर्यंत पोहोचवावा हा प्लॅन पण त्याचाच होता.

नितीन जाई आणि सारिका सोबत आला पण मधेच अचानक त्याची पाऊले अडखळली. तो तिथेच उभा राहून म्हणाला आज मेलो मी. त्याच तोंडातल्या तोंडात पुतपुटने जाईने ऐकले आणि त्याला विचारले दादू काय झालं. कसं तरी त्याने तिला सांगितलं की तो मित्रांना भेटून येतो तुम्ही एन्जॉय करा आणि तो तिथून सटकला.
सारिका आणि जाई ला सोडून नितीन इतर मित्रांच्या घोळक्यात मिक्स झाला होता. पण एक नजर त्याच्यावर खिळली होती. आणि त्याचा पाठलाग करत होती. न राहून त्याने एका कोपऱ्यात कोणीही पहाणार नाही अश्या ठिकाणी त्या नजरेला स्वतःकडे ओढून घेतले. आडोस्याला कुणीही पहाणार नाही अशा ठिकाणी त्या व्यक्ती सोबत नितीन चे काही तरी सिरीयस डिस्कशन चालू होते. थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथून निघून गेली मात्र नितीन च्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेले होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि निराश दोन्हीही दिसत होते. त्याच्या एका मित्राने त्याला बोलवलं तेंव्हा तो चेहऱ्यावर हलकं हसू तेवत तो मित्रां मध्ये मिक्स झाला.

यश एलेना ला सगळं दाखवत आणि समजावत होता. ती पण त्याच उत्साहात सगळं पहात होती. ते दोघेही सागरच्या आसपास होते. जाईची नजर सारखी फिरून फिरून यश आणि एलेना वर पडत होती. ती कीतीही स्वतःला सावरत होती तरीही तिच्या मनात राहून राहून तो लग्न सोहळा पहात असताना यश आणि तिच्या भावी आयुष्याची जी स्वप्ने तिच्या मनाने सजवली होती ती एका मागून एक सरकत होती. आणि त्याचाच त्रास लपवण्याचा ती अतोनात प्रयत्न करत होती.
जाई आणि सारिका त्यांच्या आणखी काही मैत्रिणी सोबत मिक्स होऊन गप्पा एन्जॉय करत होत्या. सागराचे लग्न खूप छान अगदी निर्विघ्नपणे पार पडले.
सारिका आणि जाई दोघीही मैत्रिणी सोबत जेवून आल्या आणि त्यांची निरंतर मस्ती चालू होती तोच जाईला एक मुलाचा धक्का लागला ती पडणार तर त्यानेच तिला सावरले.तो जाईच्या खूप जवळ आला होता. तिला थोडं अवघडल्या सारखं झालं पण तो लगेच तिला सॉरी म्हणाला आणि बाजूला झाला. जाईने पण त्याला इट्स ओके म्हणून माफ केले. परंतु नेमकं हेच जवळच असणाऱ्या यश ने पाहिले. धक्का लागला तेंव्हाच यश तिच्याकडे जायला निघाला होता पण एलेना ने त्याचा हात पकडून त्याला थांबवले. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसत होता. इलेनाचा कळत होते पण तिने त्याच लक्ष दुसरीकडे वळवले. त्यात जाई आणि सारिका अजूनही त्याच्याशी बोलत होत्या हे पाहून यश आतून धगधगत होता नेमका कशाचा राग आला होता तेच माहीत नव्हतं. पण जे होत त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवून गेला होता. तो सारखं सारखं जाई कडे पहात होता आणि स्वतःला कसतरी नॉर्मल असल्याच दाखवत होता पण मनात नाराजी होतीच ना मग काय धड जेवणही गेले नाही.
कार्यक्रमाची सांगता झाली आणि सारे त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचले. यश थोडा तनतन करतच त्याच्या रूम मध्ये गेला.
एलेना थोडा वेळ तशीच फक्त त्याला पहात उभी राहिली आणि मग ती ही सारिकाच्या रूम मध्ये गेली.

यश त्याच्या रूम मध्ये आला आणि रागाने त्याने त्याच जॅकेट कडून खाली फेकलं तसाच जाऊन फ्रेश झाला बाथ घेत असताना पण त्याला लग्नात घडलेला प्रकार आठवला आणि त्याला त्याचा राग आवरता आला नाही मग त्याने जोरात त्याचा हात टाईल्स वर मारला. नाही टाईल्स तुटले नाही त्याच्या हाताला जोरात लागले, मग काय कळवळला तेंव्हा कुठं त्याचा राग शांत झाला. दुखलं तेंव्हा समजलं की उगाच मारलं भिंतीला. मग स्वतःचे आवरून बाहेर आला आणि विचार करू लागला की नेमका कसला राग आला त्याला? त्याला उत्तर तर नाहीच मिळाले पण पुन्हा एकदा तो त्याच दृश्यात कैद झाला आणि त्याच्या डोळ्यात तोच राग पुन्हा एकदा डोकावून पाहू लागला.

इकडे एलेना बेडवर आडवी पडली तिच्याही डोक्यात यश आणि जाईच होते. ती खूप विचार करत होती. यश एकही शब्द बोलला नव्हता. नेमकं काय चाललंय त्याच्या मनात त्याचा अंदाज लावणे तिला कठीण होत होते आणि त्याचा तिलाही खूप त्रास होत होता. तिनेही तिच्या आणि यशच्या भविष्याची काही स्वप्ने पहिलीच होती. आता ती पूर्ण होतील का? असे प्रश्न तिच्या समोर उभे राहिले होते.सारिका कधीच झोपली पण एलेना ला काही केल्या झोप येत नव्हती. ती फक्त कुस बदलत होती.

जाईची पण अवस्था काही वेगळी नव्हती. ती पण निरंतर यशचा विचार करत होती. पूर्ण लग्न सोहळ्यात तिने यश सोबत स्वतःला इम्याजीन केले होते. त्याच गोड स्वप्नांचा ती विचार करत होती. तिला कळत होते ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही परंतु तरीही तिला त्या स्वप्नांच्या आधाराने जगायचे होते. म्हणून एकांतात वेड्या सारख ती ते स्वप्न जगत होती.
तर दुसरी कडे आणखिएक जण रात्रीत झोपण्याचा निश्फळ प्रयत्न करत होता. त्याचा मनाची अवस्था पण तशीच होती. लग्नात जे काही घडलं त्याचा विचार त्याच्याही डोक्यातून जात नव्हता. झोप तर दूर होती क्षणा क्षणा ला त्याचा जीव जळत होता.

चार जणांची रात्र जगूनच निघणार होती. त्या जीवांची घालमेल होत होती गुंता वाढत जात होता. कोणालाही त्याच उत्तर मिळत नव्हतं. जो तो आपापली उत्तरे शोधत जगत होता. तळमळत होता.

क्रमशः.......