butterfly woman - 4 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | बटरफ्लाय वूमन - भाग ४

Featured Books
Categories
Share

बटरफ्लाय वूमन - भाग ४

हे बघा तुमच्या घरी चकरा मारायला पोलिसांना जास्त वेळ नाही. तरीपण तू म्हणतेस म्हणून तुझ्या भरोशावर मी तुम्हाला एक संधी देते तुम्ही तुमची माहिती गोळा करून ठेवा नीट पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तिकडे तेव्हा जर तुम्ही मला माहिती दिली नाहीत तर तुम्हाला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात डांबून ठेवेल हे पक्के ध्यानात ठेवा.
तसं काहीच होणार नाही मॅडम. लैला म्हणाली.
बरोबर ठीक आहे सारखे सारखे हेलपाटे मारायला पोलीस मोकळे नाहीत. समजलं
समजले मॅडम समजले आम्हाला .वैंजंता बोलली.
बर ठीक आहे आता तुम्ही मला काहीच माहिती दिली नाही मी हात हलवत जाते आहे याचा अर्थ असा नाही की पुढच्या वेळी तुम्हाला हात जोडून माहिती विचारेन.

मॅडम तुम्ही टीव्हीवर तर छान बोलता आणि प्रत्यक्षात तर तुम्ही एकदम क्रूर वागता. लैला हसत हसत बोलली.
टीव्हीवर नेहमी चांगलंच बोलायचं असतं चांगलंच दाखवायचं असतं.
मॅडम तुमच्या बद्दल माझ्या मनात खूपच आदर होता. पण तुमचं खर रूप पाहून प्रत्यक्षात मी खूपच हादरले आहे .लैला बोलली.

म्हणजे तू मला ओळखतेस तर इन्स्पेक्टर चैतन्या बोलली.
मी तुमची फॅन आहे मॅडम लैला खोचकपणे बोलली.
ठीक आहे मग निघतो आम्ही आता.
इन्स्पेक्टर चैतन्या जायला वळते न वळते तोच अचानक एक फुलपाखरांचा जत्था वैजंताच्या दिशेने आला. आणि तिच्या सर्वांगावरून स्पर्श करून निघून पुढे गेला. महिला पोलीस आणि इंस्पेक्टर चैतन्या अवाक होऊन बघतच राहिली.
महिला पोलीस आणि चैतन्या इन्स्पेक्टरने मनोमन ताडले .वैंजंता एक साधारण स्त्री नसून वरीष्ठ म्हणतात त्यानुसार ती एक वेगळी शक्तीधारी स्त्री असावी... इन्स्पेक्टर चैतन्या पवार आणि महिला पोलीसाचे डोके चक्रावून गेले होते. त्या दोघी तिथून निघून गेल्या.इन्स्पेक्टर चैतन्या आणि तिची सहकारी महिला पोलीस निघून गेल्यानंतर लैलाने झटकन वैंजंताच्या घराचा दरवाजा लावून घेतला.

एक दीर्घ श्वास घेतल्यावर लैला वजन त्याला म्हणाली आता पोलिसांना सुद्धा आपला संशय यायला लागला आहे की आपण इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया आहोत. याबद्दल...
पण त्यांना कसं समजू शकतात. आपल्या गोष्टी...
आपल्याविरुद्ध असणाऱ्या शक्तींनी कदाचित ती गोष्ट पोलिसांपर्यंत पोचवली असावी. आणि या पोलिसांचे नेटवर्क सुद्धा खूप मोठं असतं. त्यांच्याकडे सगळी माहिती असते. कोण कुठून आलं ,कोण कुठे गेलं...
ते जाऊदे पण मलाच सांगा लैला... वैंजंता प्रश्नार्थक चेहर्‍याने बोलली.
तू फुलपाखरू जन्मांमध्ये पुरुष होतीस आणि मग तू आता स्त्री कशी काय जन्मलीस. तुझं लिंग बदल कसं काय झाले.

कसं आहे ना वैजंता. कोणत्याही जीवाचा नवीन जन्म होतो .त्या वेळी त्याचं लिंग बदल हे नैसर्गिक स्थितीवर अवलंबून राहते.
म्हणजे काय... वैजंता बोलली
कसं आहे ... बाळ जन्मावेळी जी स्त्री गरोदर असते. त्यावेळी तिच्या गर्भाशयातील बाळाचे किंवा गर्भाचे लिंग आधीपासून ठरत नाही तर ते सातव्या महीन्यात ठरतं.
म्हणजे...
म्हणजे गर्भाशयातील बाळाचे लिंग पुरुष किंवा स्त्री हे सातव्या महिन्यात तयार होते आणि ते कदाचित आठव्या महिन्यापर्यंत सुद्धा निश्चित होत नाही. बाळ जन्माच्या आधी ते लिंग त्याच्या जागेवर जाऊन बसते एखाद्या बाईच्या गरोदर पणा मध्ये आणि मग त्या बाळाचे लिंग ठरते. ते बाळ पुरुष आहे कां स्त्री आहे..ते हे एक्स आणि वाय या गुणसूत्रांमुळे होते. आणि स्त्री बाळाचे लिंग हे एक्स एक्स. किंवा वाय वाय. अशा समान गुणसूत्रांमुळे ठरते.

हे तर माहितीच आहे. हे सर्व शाळेत शिकवतात.
मग त्याच आधारावर पूर्वजन्मातील लिंग बदल होतं आणि नवीन जन्माचं लिंग मनुष्य जन्माला प्राप्त होते.
मग मला सांग तृतीय पंथी लिंग हे कसं काय तयार होते.
तृतीय पंथी लिंग असं काहीच नसतं. बाळ जेव्हा जन्मते तेव्हा एक तर स्त्रीलिंगी असते किंवा पुरुष लिंगी असते.मात्र त्या बाळाच्या सवयी किंवा स्वभाव किंवा शारीरिक बदल हे वयानुसार घडत जातात आणि मग ते जे बाळ आहे, ते सर्वसाधारणपणे पुरुष लिंगी अथवा स्त्रीलिंगी स्वभाव यांच्यावर पुढचे घडते.
हे बघ मला अजूनही समजलं नाही नीट समजावून सांग.
समज एखादी स्त्रीलिंगी बाळ आहे .

परंतु त्याच्या शरीरामध्ये जर पुरुष लिंगी हार्मोन्स तयार होत असतील तर ते बाळ स्त्रीलिंगी असतं पण ते त्याच्या स्वभावाने जर ते पुरुष लिंगी गोष्टीकडे आकर्षित झाले आणि ते पुरुषांसारखी वेषभूषा करत असेल किंवा ते पुरुषां सारखे रहात असेल तर ती स्त्रीलिंगी व्यक्ती पुरुष लिंगी स्वभावाची बनते. त्यालाच तृतीयपंथी समजतात
याच्या उलट एखाद्ये बाळ जर पुरुष लिंगी असेल आणि जर त्याला स्त्रीलिंगी सारखे राहायला आवडत असेल किंवा तशा गोष्टी कराव्या लागत असतील किंवा त्याचा जो गुणधर्म जर तसा असेल तर ते बाळ पुरुष न रहता स्त्री बनते.ती व्यक्ती स्त्रियांची वेशभूषा करते. त्याला पुरुषांमध्ये आकर्षण निर्माण होते. स्त्रियांमध्ये नाही. थोडक्‍यात ते समलिंगी आवड असणार असतं.

हे बघ ही प्रक्रिया आहे ना ती खूपच जटील आहे. थोडीशी अवघड अशी आहे. परंतु तितकीशी सोपी सुद्धा आहे समजायला. नीट समजून घेतलं तर ते कळतं. याच्या खोलात न जाता आपण असं समजू या की तू पूर्वजन्मी पुरुष होतीस .
मात्र तूझा आता स्त्री म्हणून जन्म झालेला आहे. हे घडत असतं .जेव्हा जन्मांतर होते. तेव्हा ते आपोआप होतं. वैजंता आणि लैला ह्या इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया होत्या.त्यांना हव्या त्या वेळी त्या फुलपाखरासारखी पंख पसरून उडत शकत होत्या. त्यांना फुलपाखराची अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती.

हा प्रश्न जरा वादाचा होऊ शकतो. कारण यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विश्वास अंधविश्वास याचं मिश्रण आहे.ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही तो या गोष्टी खोट्या आहेत म्हणून सरळ सरळ सांगेल. लैलाने तिला समजावून सांगितले.

पोलीस इन्स्पेक्टर येणार म्हणून लैला आणि वैजंतानेज्ञ तयारी करून ठेवली होती परंतु तसे काही घडलेच नाही ते आलेच नाहीत. राहून राहून तर हेच आश्चर्य वाटते की त्या का आल्या नाहीत.
जाऊदे आपण आपली कागदपत्रे तयार केलीत ना राहू दे चल येतील तेव्हा दाखवू त्यांना. लैला निष्काळजीने म्हणाली.

त्याच रात्री अघटित घडलं. त्या दोघींना शोधत विरोधी गटातील काही फुलपाखरे आणि भुंगे त्यांचा माग काढत दोघींच्या घराजवळ आले होते. ते बघून लैला वैजंताला म्हणाली.
वैजंते तुझा तो सुट तू परीधान कर आणि आपण दोघी त्यांचा सामना करू. विलास सुद्धा येईल आपल्या मदतीला.

आता हेच करावे लागणार आहे वैजंता बोलली. बोलता बोलता तिने तो सूट परिधान केला आणि हात वर करून ती उडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यात तिला यश आले.तिने चार-पाचदा वर खाली हात हलवल्यावर ती चक्क फुलपाखरू बनली. तिच्या कपाळाला मध्ये अडकलेला खिळा खळकन बाहेर पडला. तेव्हा एकदम हायसे वाटून राहिला लैला तिला म्हणाली सुटलीस तू यातनांमधून.. तुला आता मोक्ष मिळेल.

क्षणांमध्ये लैलाने सुद्धा फुलपाखरू स्त्रीचे रूप घेतले. आणि त्या दोघी घराच्या बाहेर पडल्या. प्रथमतः काळोखा मध्ये त्यांना नीट दिसत नव्हते. परंतु नंतर नंतर त्यांना स्पष्ट दिसू लागले.
त्या दोघी वरून खाली पाहत होत्या. इतक्यात त्यांना इन्स्पेक्टर चैतन्य पवार आणि महिला पोलीस दिसल्या. या दोघी इतक्या रात्री इथे काय करतात. असे वाटून त्या दोघी खाली उतरल्या.त्या दोघी चैतन्या आणि महिला पोलीसां जवळ जाणार इतक्यात त्यांना त्यांचे बोलणे ऐकू आले.