मग मी करू कां ट्राय उडण्याची आता... वैजंता हसत बोलली. हे बघ वैजंता हे हसण्यावर नेऊ नकोस.
हे मी खोटं नाही सांगत. जरा आजमावून बघ .हा वरचा तुझा ड्रेस काढ आणि त्या सूटवर तू रहा.मग दोन्ही हात हवेत पसरून उडण्याचा प्रयत्न कर .मग तुला वेगळा अनुभव येईल.
बरं बरं असं म्हणून वैजंता तिच्या अंगावरचा ड्रेस बाजूला करू लागली. इतक्यात लैलाच्या घराची बेल वाजली.
कोण आला असेल .वैजंता बोलली.
काय माहीत कदाचीत माझ्यावर प्रेम करणारा कुणीतरी असेल.
म्हणजे कळलं नाही मला.
आहे एकजण माझ्यावर एकतर्फी प्रेम करतो. तू ओळखतेस त्याला... ठीक आहे मी घेते त्याला आत बघ तू ओळखतेस कां त्याला..
मी मी ओळखू... ओळखते बरं. प्रयत्न तर करते.
लैला आणि तिच्या घराचा दरवाजा उघडला मात्र तिला थांबवत वैजंता म्हणाली
तो भुंगा... अचानक लैलाकडे बघत ती म्हणाली.
चूक अगदी चूक....
मग कोण गं...
बरं मग उघड दरवाजा. मी ओळखते काय त्याला बघूया.
लैलाने दरवाजा उघडला . दरवाजामध्ये एक रुबाबदार तरुण उभा होता. आत मध्ये वजन त्याला बघून तो तरुण गोंधळला. आणि तो माघारी फिरला जायला. इतक्यात त्याला अडवित लैला म्हणाली
हि माझी मैत्रीण आणि आम्ही दोघी माॅलमध्ये एकत्र काम करतो. बरंबर असं आहे कां. तो तरुण आत आला.
ही माझी मैत्रीण आणि फुलपाखरू... बोलता-बोलता लैलाने जीभ चावली.
म्हणजे ही फुलपाखरू. तो अचंबित झाला.
तुला आता बरोबर क्लू लागला आहे ओळख हिला कोण आहे ही सांग...
ठीक आहे पण मला नंतर ओळख .पण तू आधी कोण आहेस ते मला सांग .वैजंताने मध्येच तोंड घातले.
काय लैला हिला दाखवून देऊ का मी कोण आहे ते. त्याने म्हटले.
होय विलास दाखव तुझे मूळ रूप हिला सुद्धा दाखव मगच विश्वास बसेल तिचा बटरफ्लाय अवतारावर...
बरं असं म्हणून तो तरुण जागच्याजागी गोल-गोल दोनदा फिरला आणि झटक्यात त्याचे रुपांतर एका मोठ्या चतुर किटकात झाले.
त्यासरशी लैलाने वैजंताला म्हटले. चल जाऊया फिरून येऊ. आकाशातून...
अगं अशी काय करतेस. कुठे जाणार आणि कशी फिरणार....
चल दाखवते असे म्हणून लैलाने चतुर कीटकाच्या दिशेने हात केला.
त्यासरशी चतुर कीटकाच्या रूपात असलेल्या विलास च्या अवताराचे एका छोट्याशा हेलिकॉप्टर मध्ये रूपांतर झाले.ते हेलिकॉप्टर आवाज करत नव्हते लैलाने वैजंताला त्या हेलिकॉप्टरमध्ये ओढून घेतले. आणि स्वतःही लैला त्यात बसली. तसे गॅलरीत जाऊन ते हेलिकॉप्टर बाहेर पडले आणि आकाशात घिरट्या घालू लागले. वैजंता आणि लैला त्या मध्ये बसल्या होत्या. तेव्हा लैला वैजंताला बोलली वैजंता तू विसरलीस. हे तुझेच वाहन आहे. फुलपाखरांच्या राणीचे वाहन चतुर कीटक.
त्यासरशी वैजंताने लैलाकडे फक्त एक कटाक्ष टाकला. परंतु ती काही बोलली नाही .थोड्याच वेळात ते हेलिकॉप्टर त्या दोघींना घेऊन पुन्हा लैलाच्या घरात प्रवेशले. आणि तिथेच लँड झाले. त्या दोघी त्यातून बाहेर पडल्या. त्यासरशी त्या हेलिकॉप्टरमधील अवतारातील विलास पुन्हा मनुष्य रूपात आला. त्यांनी त्या दोघांकडे पाहून स्मितहास्य केले. आणि आल्या पावली निघून गेला. जाताना त्याने लैलाकडे प्रेम भरल्या नजरेने पाहिले. लैला नेज्ञत्याला मानेने खुणावले .जा तू आभारी आहे तुझी.
दरवाजा बंद करून विलास घराच्या बाहेर पडला. त्याच्या घरात शिरला. तो लैलाच्या शेजारच्या घरात राहत होता.
लैला हे काय गौडबंगाल आहे.
वैजंताराणी हे गौडबंगाल नाही .मी जिथे राहते ना .तिथेच फुलपाखरांचा एक मोठा कळप आहे.
म्हणजे फुलपाखरांची कॉलनी असं म्हण ना...
अगदी बरोबर फक्त तूच दुसरीकडे रहातेस नाहीतर आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात आहोत दोन वर्षे झाली आम्हाला...
पण तू ही गोष्ट कधी मला सांगितली नाहीस...
कारण मला खरंच माहीत नव्हते की फुलपाखरांची राणी तूच आहेस .आम्ही तिचा शोध घेत होतो पण तू आता आम्हाला सापडलीस. आम्हाला खूपच आनंद झाला.
मग तू आता सर्व फुलपाखरांना सांगणार आहे ही गोष्ट...
सध्या तरी नाही. योग्य वेळ आल्यावर सांगेन सर्वांना...
आणि तुझ्यावर प्रेम करतो विलास त्याचं काय...
तो माझ्या शब्दाबाहेर नाही.
एवढा विश्वास आहे तुला त्याच्याबद्दल...
होय आम्ही नजरेनेच एकमेकांशी बोलतो. त्याला मी नजरेने सांगितले आहे .मला काय म्हणायचे आहे ते. तो ती गोष्ट पूर्णपणे समजला आहे .तो कुणाशीच बोलणार नाही .जोपर्यंत माझी त्याला आज्ञा होत नाही.
म्हणजे तू त्याला खेळवत आहेस. कारण तुझ्यावर एक तर्फी प्रेम करतो म्हणून.
ते तसं नाही . मी फुलपाखरांच्या दुनियेत पूर्वी असताना पासून आम्ही एकत्र आहोत. आता आमचे सूर जुळायला थोडा वेळ लागेल इतकेच....
मग जर आपल्याकडे एवढे दिव्यशक्ती असेल मग आपण मॉलमध्ये कां काम करतो आहोत.
वैजंता ऐॆक ... या मानवाच्या दुनियेत जर कळलं की आपण फुलपाखरू स्त्रीया आहोत आणि तो विलास चतुर कीटक आहे .तर हे लोक आपल्याला जगू देणार नाहीत .आपल्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवतील. आपला बाजार मांडतील. तेव्हा जर इथे जगायचं असेल तर हळूहळू त्यांच्या मनावर राज्य करायला पाहिजे. तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. नाहीतर आपण एका पिंजऱ्यात किंवा प्रयोगशाळेत खितपत पडू...
बरोबर बोलतेस तू हे. या बोलण्यात तुझ्या पॉइंट आहे. वैजंताने तिला म्हटले.
बरं जाते माझ्या घरी. भेटू पुन्हा त्याचा निरोप घेतला.
त्यासरशी लैला तिला म्हणाली घरी जा आणि तो सूट निरखून पहा आणि त्याचा वापर करून बघ .तुला त्याची महाशक्ती कळली आहे.
पण मला एक गोष्ट सांग लैला....
तो तुझा विलास हा खरंच पूर्ण चतुर कीटक आहे....?
तुझा प्रश्न रास्त आहे मला वाटते तू त्याला ओळखलेस तो कोण आणि कसा आहे. तरीपण तुझ्या माहितीसाठी मी सांगते.
तू पूर्ण चतुर कीटक नाही. तो तिहेरी कीटक आहे.
तिहेरी म्हणजे...
तीन पदार्थांनी बनलेला.
कोणत्या तीन पदार्थाने तो बनला आहे.
प्रथम तो एक अर्धफुलपाखरू अवतार आहे. दुसरे म्हणजे तो थोडा रोबोट सुद्धा आहे. आणि तिसरं म्हणजे तो सध्या मानवी अवतार सुद्धा धारण करू शकतो. असा तिहेरी अवतारातला तो एक चतुर नावाचा कीटक आहे....
थोडक्यात डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी गॅस या प्रकारा मध्ये असलेल्या व्हेरीयंट कारसारखी त्याची रचना आहे.
अगदी तशीच नाही परंतु तशा प्रकारची म्हणता येईल.म्हणजे इलेक्ट्रिक कारची चार्जिंग संपली कि ती कार किंवा दुचाकी इंधनावर चालते. थोड्या फार फरकाने असा त्याचा प्रकार म्हणता येईल.
हे खरं आहे. परंतु माणसाला शक्तीसाठी अन्न लागते त्याचं काय...
तो अन्न खाऊ शकतो ,पचवू शकतो. आणि स्वतःच्या तोंडावर हात ठेवत , हसू आवरत म्हणाली. तो त्या गोष्टींचे विसर्गही करू शकतो.
मी काय म्हणते लैला त्याच्यासोबत तो एक भुंगा होता ना त्याचं काय झालं.
हे काय तुला आठवलं मध्येच लैलाने तिला विचारले.
तसं नाही अगं विषय निघाला म्हणून विचारते.
त्याचे खूपच वाईट झालं.. इतके वाईट की सांगायला सुद्धा मला कसेतरी होते.
पण तू सांगायलाच हवं .वैजंता तिला म्हणाली.
तो काळा भुंगा माझ्यासाठी स्वतःहून शहीद झाला.
म्हणजे असं काय घडलं....
मी एकदा बागेत फिरायला गेले होते .तेव्हा तिथे असंख्य रोबोट भुंगे अचानक टोळधाडी सारखे झुंडीने आले. म्हणजे ते हवेतून कुठून तरी प्रकटले. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांची अख्खी वसाहतच माझ्यावर चाल करून आली. असे तेव्हा मला वाटले. मी प्रचंड घाबरले होते.
इतक्यात तो काळा भुंगा माझं रक्षण करायला पुढे आला. मात्र त्या असंख्य रोबोटचे नेतृत्व करणारा लाल भुंगा आणि काळा भुंगा यांचे भयंकर युद्ध जुंपले. त्यामध्ये लाल भुंगा सरस ठरला आणि त्याने त्या काळ्याभोर भुंग्याला सरळ सरळ खाऊन टाकले. फस्त केले. त्या लाल भुंग्याने त्या काळ्या भुंग्या कडील लाळ ग्रंथीचे अस्त्र सुद्धा त्यासोबत नेलेय. ज्याद्वारे तो लालभुंगा अर्धा कोळी आणि अर्धा भुंगा असा दुहेरी अवतार घेऊन कुठेतरी रहात आहे. त्याला आधी आपण शोधलं पाहिजे. त्याला माहित झालं आहे. मी फुलपाखरू स्त्री जन्म सोडून मानव अवतार घेतला आहे तो... आणि यामध्ये त्याला रेशमी किड्यांचे सुरवंट मदत करत आहेत.
पण ते तर सज्जन गुणधर्माचे होते. त्याचे दुर्जन कधीपासून झाले.
लालभुग्याने सुरवंटाच्या जीन्स मध्ये म्हणजे जनुकामध्ये बदल केला आहे. त्यामुळे रेशमी किड्यांचे सुरवंट सुद्धा क्रूर वागत आहेत.सुरवंटांची स्वतःभोवती कोष निर्माण करण्याची शक्ती त्या भुंग्याने त्यांच्यापासून हिरावून घेतली आहे. त्यामुळे ते त्रिशंकू अवस्थेत आहेत. त्यांना त्यांचे जीवन पूर्ण करता येत नाही. म्हणजेच त्यांना सुरवंटाचे फुलपाखरू बनता येत नाही. ते सध्या किडे म्हणून जगत आहेत. रेशीम किडे.
काय सांगतेस हे तू... हे खूपच भयंकर आहे. वैंजंता अंगावर आलेल्या काट्याने शहारत म्हणाली
हो आणि तेव्हापासून मी या विलास नावाच्या चतुर प्रजाती कीटकाच्या सहाय्याने इथे स्वतःला सुरक्षितपणे जपून इतरां प्रमाणे राहत आहे.
इतरांप्रमाणे म्हणजे....
म्हणजे आपले बांधव आणि भगिनी या जवळच्याच ठिकाणी वसाहत करून राहतात . त्यापलीकडच्या डोंगराच्या मागे .त्यामध्ये भुंगे कीटक , चतुर, लहान मोठी फुलपाखरे ,वाळवी. टोळ , अशी फुलपाखरांच्या वंशाच्या जवळपास असणाऱ्या विविध प्रजाती राहतात. मात्र सध्या ते मानव रूपात वावरत आहेत. त्यातले अर्धेअधिक रोबोट सुद्धा झालेत. स्वतःच्या सोयीसाठी.
म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांचे त्यांचे अवतार घेतले आहेत. असेच म्हणावे लागेल..
होय होय असेच म्हणावे लागेल. लैला म्हणाली.
आणि जेव्हा कोणी अवतार घेतो. तेव्हा त्याला त्याच्या शरीराला असलेले आधीचे व्यंग किंवा कमजोरपणा निघून जाऊन तो नवीन शरीराप्रमाणे राहतो. जन्म घेतो. वागतो.
घरी आल्यावर वैंजताने तो सुट निरखून पाहीला.पण तो तीने खुंटीला अडकवून ठेवला. जेवण वगैरे उरकून ती खुर्चीत बसली होती. खुर्चीत बसून एकटक त्या सूटकडे पहात राहिली मात्र तिच्या डोळ्यावर पेंग येऊ लागली होती आणि विचार करता करता हळूहळू ती झोपी गेली.