Premacha chaha naslela cup aani ti - 53 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५३.

Featured Books
Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५३.


आता पर्यंत आपण बघीतले....

ते लोकं त्याला शोधायला निघून जातात.... मात्र, सुकन्याला प्रश्न पडतो..... ती तशीच गोंधळलेल्या मनःस्थितीत उभी असता, तिला खांद्यावर कोणी तरी थोपटल्याचं जाणवतं पण, हा तिचा भास असेल म्हणून, ती इग्नोर करते...... तोच तिला पकडून झटक्याने कोणी तरी स्वतःकडे फिरवून घेतो.... ती किंचाळणार तर तिचं तोंड दाबण्यात येतं.....

आता पुढे......

@@@ : "हे.... शू...."

तो तिला शांत करतो.... मात्र, स्वतः आता तोच सुकन्या मध्ये हरवतो....

सुकन्या : "ummmmmm ummmmmm....."

तो तिला सोडायचं नावच घेत नाही.... ती जोरात त्याच्या पायावर स्वतःच्या शू चा हील ठेऊन देते.... बिचारा तो....

@@@ : "आई ग....."

सुकन्या : "जास्त अंगात किडे ना तुझ्या घे मग...."

@@@ : "अंगात किडे..... व्हॉट...."

सुकन्या : "हो जे जास्तच वळवळ करतात...."

@@@ : "बाय द वे.... मी शौर्य...."

सुकन्या : "ओ.... हॅलो..... तू शौर्य म्हणून काय तुला जग जिंकल्याची फिलिंग यायला लागली की काय?"

शौर्य : "कुठून सुचतात तुला हे डायलॉग्ज...??"

सुकन्या : "तुला काय त्याचं.... साईडला हो..... जाऊ दे मला...."

ती जायला निघणार तोच शौर्य तिचा हात पकडतो.....

सुकन्या : "अरे ये.... लिव्ह.... काय पांचट पणा झाला हा.....?"

शौर्य : "काय...?? पांचट पणा? म्हणजे?"

सुकन्या : "तू पृथ्वी सारख्या या बलाढ्य ग्रहावरच राहतोस ना?"

ती पूर्ण एक्स्प्रेशन सोबत त्याला हे विचारते......

शौर्य : "म्हणजे?"

सुकन्या : "तुला साधे माणसांच्या कम्यूनिटी मधले डायलॉग्ज समजत नाहीत म्हटल्यावर...!!! मला विचार करावा लागतोय...."

शौर्य : "अरे पण हे कसले डायलॉग्ज यार....."

सुकन्या : "सोड, मी तरी कुठं तुझ्या माग डोकं खराब करतेय....."

ती जायला वळते..... हा ही तिच्या साईड ने चालायला लागतो.... सुकन्या वैतागून....

सुकन्या : "काय आहे तुझं.... उधारी आहे का माझ्यावर तुझी....."

शौर्य : "अरे मी कुठं काय केलं आता.... फक्त माझ्या रस्त्याने जातोय....."

सुकन्या : "फाईन..."

ती पाय आपटतच रागात पुढे निघून जाते..... हा मात्र खिश्यात दोन्ही हात टाकून खांदे उडवत..... चेहऱ्यावर एक हसू आणत.....

शौर्य : "क्या है ये लडकी...."

तो निघून जातो..... तिकडे कलिका तिला शोधत असते..... तिला समोरून सुकन्या येताना दिसते.....

कलिका : "यार तु होतीस कुठे....?? किती शोधलं तुला अग.... पूर्ण मॉल.....!"

सुकन्या : "काही नाही चल...."

त्या दोघी मग सगळे ज्या कॅफे मध्ये बसून सुकन्याचा वेट करत असतात तिथे पोहचताच....

सल्लू : "सलमा कीधर थी बच्चा.... पता हैं ना सब कितना टेन्शन.... यार ऐसे बिना बताए... मत जाते जा रे...."

ऊर्वी : "सल्लू....? आपणच सर्वांना, त्यांना जे हवं ते घ्यायला सांगितलं होतं ना..... तू का इतका पॅनिक होतोय??"

आजी : "बेटा ऊर्वी त्याला तिचा बालपणीचा तो इन्सीडंस आठवला असेल बहुतेक...."

ऊर्वी : "सल्लू, तू ठीक आहेस ना.... मी सहज बोलले अरे.... सुकन्या आता मोठी झालीय तर तिला कळतं चूक, बरोबर तिचं..... तुझं पजेसीव्ह होणं मी समजू शकते.... बट, आता ते तू बिनधास्त कमी करू शकतोस कारण, ती आता मोठी झालीय.... अँड बेस्ट थिंग इज..... शी इज मॅच्युअर् इनफ.... मला नाही वाटत तिला काहीही सांगायची गरज असते..... खूप समजूतदार आहे रे ती...."

सल्लू : "आय थिंग यू आर राईट ऊर्वू..... माझी सलमा मोठी झाली हे माझं मन ॲक्सेप्टच करत नाहीये ग..... मला आज ही ती तशीच माझी लहान सलमा वाटते जी कधी तरी म्हणायची, पकन मना....."

सुकन्या : "काय तू पण यार सल्लू दादू..... अजूनही तुझी आणि निंनीची सवय नाही गेली बघ..... कोणी कितीही सिरीयस मोड मध्ये असू देत.... तुम्ही दोघं त्या मोमेंटला १००% फनी मोमेंट मध्ये कन्व्हर्ट करणार...... काय बरोबर ना कली मासी...."

कलिका : "यू आर राईट माय लिट्ल प्रिन्सेस सुकू..... ह्या फॅमिली सोबत इतके वर्ष झाले मी आहे.... बट, कधी असं नसेल झालं मी बोर झाले....."

जया : "बोर होणं शक्य तरी आहे का तुमच्या सर्वांच्या लाडक्या आजीच्या काळात....."

आजोबा : "मग विषय हार्ड आहे आपल्या राणी सरकारांचा....."

आजी : "विषय हार्डच असला पाहिजे..... सोपा कोणालाही झेपतो.... आपण कोणाला झेपण अशक्यच...."

सचिन : "आई खरं सांगू का... तुम्ही डिपार्टमेंट मध्ये ऑफिसर हव्या होत्या.... एका - एकाची वाट लावली असती...."

आजी : "विना कारणच वाट नसती लावली..... पण, जो नडला त्याला फोडला असा ॲटिट्युड आहे आपला....."

आजोबा : "माशाल्लाह तारीफ-ए-माशाल्लाह..... बड़ी कमबख्त है तू हबीबी मस्त है तू......"

सगळे : "ओ ओ ओ......"

आजी : "अरे ये इतकं ओरडावं लागतं का अरे.... सगळे बघतायत अरे....."

सल्लू : "देखने दे ना आम्मिजी..... उन्हें भी तो पता चले..... हमारे सबसे रोमँटिक कपल्स आज भी उतने ही रोमँटिक हैं जितने शादी के टाईम थे.... ओल्ड इज गोल्ड...."

आजी : "लोकांना दाखवून प्रेम करण्यात काय मजा रे बेट्यांनो..... करायचं तर असं ऑफलाईन प्रेम करा..... ऑनलाईन स्टेटस अपडेट केल्याने लोकं फक्त तमाशा बनवतात बाकी काही नाही.... तरी, एक बरं आहे आपल्या फॅमिली बाबतीत.... कोणीच असले स्टेटस ठेवत नाहीत...."

जया : "हो कारण, कोणाला दाखवून अजुन फ्रस्ट्रेशन येतं.... कोणी म्हटलं की, अरे हा तुझा नवरा.... कसला गावंढळ दिसतोय.... मग तर, त्यांच्या त्या कॉमेंटला दिवसभर डोक्यात ठेवून आपल्याला वेड लागायचं.... माझी एक फ्रेंड आहे किरण.... तिचं असंच काहीसं झालंय बघा..... रोज स्टेटस ठेवत असते ती..... अरे ठेवायचं ठेवा.... एटलिस्ट बॅक ग्राउंड बघून तर सेल्फी क्लिक करा...."

संजय : "जाऊदे ग...... कोणाला असं क्रीटीसाईस करून काय ना..... आपण नाही ना करत... झालं ना मग... त्यांना चांगलं वाटतं मग आपण कोण असं म्हणणारे? एखादी गोष्ट आपण नाही करत तेव्हा दुसरे तिच गोष्ट करत असले की, ते कसे वेडे आपण हेच बघत असतो.... आणि मग नको ते बोलतो.... याला काही अर्थ आहे का?"

जया : "सॉरी...."

संजय : "मी सांगितलं ग...... माझं ओपिनियन.... लगेच काय सॉरी....? हस बरं...."

जया : "काय तू संजू घाबरवलंस मला....."

आजी : "जया तुझा बॉय फ्रेंड आहे तो, तुला घाबरवेल का ग खरंच?"

जया : "आई...."

सगळ्यांची मज्जा, मस्ती सुरू असते..... पण, आपली सुकन्या वेगळ्याच दुनियेत..... हे सल्लूला जाणवतं म्हणून तो तिच्या जवळ जातो.....

सल्लू : "हे, सलमा..... बच्चा क्या हुआ??"

सुकन्या : "काही नाही दादू.... अरे मघाशी ते....."

ती पुढे काही सांगणार तोच सल्लू.....

सल्लू : "मैने देखा..... डोन्ट वरी..... कूछ कहां क्या उसने....?"

सुकन्या : ".... क्या??"

सल्लू : "टेन्शन नक्को रे..... चल...... घर चल कर इस टॉपिक पर बात करते हैं.... चले...."

सुकन्या : "तू ना सबसे अच्छा वाला भाई हैं इस संसार का.... मुझे क्या बोलना हैं सब समझ जाता हैं....."

सल्लू : "संसार का अच्छा भाई होने के लिए बहन का संसार की सबसे अच्छी होना बोहत जरुरी..... तू तो मेरी छोटीसी सलमा हैं रे..... मेरे लिए तू सबसे इंपॉर्टन्ट हैं..... तेरे जो कुछ डाऊट्स हैं मैं पहले ही समझ जाता हू.... इसिलीए तुझें कूछ भी कहने की जरुरत नहीं रहती.... चल अब.... घर जा कर बाकी की बाते.... आज पक्का तीन कॉफी मग खाली करने वाली हैं लगता मेरी सलमा..... मैं आऊट ऑफ स्टेट था तो कीतना कुछ बताना होगा ना बच्चा..... चल आज सल्लू जागेगा बस अपनी सलमा के लिए....."

सुकन्या : "थँक्यू सो मच..... सल्लू दादू...."

सल्लू : "चलो चले...."

आजी : "अरे हा चला..... उशीर झालाय....."

सगळे घरी निघून येतात.....
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️