#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३२
{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}
रीमाने मोबाईल बाजूला ठेवला.
तिला अगदी गहिवरून आलं.मोनाच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी वेळ ती रडत राहिली.
जरावेळाने स्वतःला सावरत ती शांत झाली.
“ताई,प्लीज आपण कबीरला contact करूया का? एका दिवसात त्याचा सगळा ठावठिकाणा काढते बघ.शेवटचे दोन विक राहिलेय त्यात लास्ट विक पूर्ण प्रोजेक्ट साईटवर जाणार आहे आणि मॅडमने तो इंटर्नशिपचा फॉर्म देखील भरलाय”
मोनाची बेचैनी आवाजात कळून येत होती.
“प्रोजेक्ट साईट कुठेय?” मनाशी काहीतरी ठरवत ती म्हणाली.
“महाबळेश्वरपासून ३० किमी आहे,तापोळाजवळ. मोठा रिसोर्ट आणि रिसर्च सेंटर आहे कोयना बॅकवॉटरला. शेवटचा आठवडा पूर्ण टीम तिथे असणार आहे.ताई आपण कबीरला फोन करून सगळं सांगू या का?”
“ वेडीय का? कबीरला फक्त ऋतू भेटली आहे.बाकी तो कसा आहे,त्यालाही नक्की ह्याच फिलिंग होत्या का ऋतूसाठी हे बघायला नको?आणि आता सहा महिने होतील तो मूव्ह ऑन झाला असेल तर? कुठल्या रिलेशनशिपमध्ये असेल तर ?त्याचा स्वभाव,त्याची फॅमिली काय विचार करेल आपल्याला काहीच आयडिया नाही आणि मी आता ह्या वेड्या मुलीच्या बाबतीत काहीच रिस्क घेणार नाहीये.”
“हो ते ही आहे,कुठल्याच सोशल मिडीयावर नाहीये तो,लिंकडीनवर अगदी जुजबी माहिती आहे ती पण अपडेटेड नाहीये.”
तोंड वेंगाडत मोना म्हणाली.
“एक काम करते,मी पुण्याला जाते.तू ऋतू आल्यावर कसंही करून तिच्या मोबाईलमधून मला वैदेहीचा नंबर शोधून दे.कबीर तिचा बॉस होता तिला त्याच्याबद्दल बरीच माहिती असेल,बघू काही हाती लागतंय का”
“ओके..डन.”
ऋतूला आयुष्यात काय हवं आहे याची कल्पना दोघींनाही आली होती.
मनाचे खेळ ही विचित्र असतात असं म्हणतात मनाला त्याला सावरायला तोच हवा असतो जो सगळ विस्कटून गेलेला असतो.
****************
“कबीर दादा हे कुणाचे फोटो लावलेय ,मागच्या वेळी तर नव्हते?”
सतीश सगळ्या फोटोंवर नजर फिरवत म्हणाला.
कबीरची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी काहीतरी कारणं काढून आई त्यांच्या हाउस अटेंडंटला -सतीशला बंगलोरला अधूनमधून पाठवत असायची.
“सतीश काय बोलतोस, तुला माहित नाही? फेमस साउथ इंडियन हिरोईन आहे.”
कबीर त्याची गंमत करत म्हणाला.
“नाही, कधी ऐकलं नाही.तुमच्या त्या लॅपटॉपवर पण हाच फोटोय न? मघाशी बघितला मी तुम्ही काम करत होते तेव्हा. काहीही म्हणा एकदम टकाटक आहे ओ दादा ही हिरॉईन.”
एकटक त्या फोटोकडे पहात तो म्हणाला,कबीरकडे लक्ष गेल्यावर व रागाने बघतोय हे पाहून त्याने जीभ चावली.
“सतीश,तू माझ्यावर लक्ष ठेवायला येत असतोस का?
तुला निघायचंय,विसरलास? वेळ होतोय चल आवर पटापट.
जे टाइमपास कागद आईने सही करायला पाठवले होते ना ते आठवणीने घेऊन जा आणि तिला सांग सगळं ठीक आहे, दादा एकदम खुश आहे, हिरोईनचे फोटो वैगरे लाऊन ठेवलेय.”
त्याच्यावर जरासं ओरडून तो म्हणाला.
आईची काळजी त्याला कळत होती पण कितीही ठरवलं तरीही ऋतूच्या विचारातून बाहेर येणं त्याला जमतच नव्हतं.
आयुष्य इतकं अस्थिर का झालंय ह्या विचाराने त्याला अस्वस्थ वाटत होतं.आई वडिलांची काळजी साहजिक होती पण मनाला कोण समजावणार?
तिच्या आठवणीपासून,विचारांपासून दूर गेलं की जरा शांतता वाटेल म्हणून तो इथे आला होता पण हे एकटेपण तर तिला आठवायला जास्तच मजबूर करत होतं ,मग वैदेहीकडून घेतलेले तिचे काही फोटोच त्याने समोर लाऊन ठेवले होते.
सतीश निघून गेल्यावर, समोर दिसणाऱ्या एका फोटोकडे बघत तो शांततेत सोफ्यावर बसला.
समोर खळखळून हसणाऱ्या ऋतूचा एक कॅंडिड फोटो होता.
’साउथइंडियन हिरोईन’ तो पुटपुटला आणि एक छानसं हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं.
त्याने ती फोटोफ्रेम हातात घेतली-
"तूला हसू येतंय का? एका नर्ड,खडूस व्यक्तीला प्रेमात पडल्याचं बघून आनंद होत असेल नाही?
तुला विसरायला आलेला हा खडूस आजकाल तुझ्या प्रेमात जरा जास्तच वहावत जातोय.
हो मला माहितीय,माहितीये तू माझी नाहीयेस,आताही जिथे असशील तुझ्या प्रेमासोबत खुश असशील,अशीच खुश रहावी.पण त्या प्रवासात माझ्यासोबत असलेली ऋतुजा माझी होती,असेल!
ऋतुजा?..... ना..! ऋजू ! ओरिजनल अगदी प्युअर असलेली,फक्त माझी असलेली,ऋजू!
हे समोर तुझे फोटो लाऊन ठेवलेत,वाटलं होतं समोर असलीस तर थोडी हुरहूर कमी होईल पण जरा जास्तच आठवायला लागलीस यार.
हे तुझे डोळे जीव घेतात आणि हे असं क्युटसं खळखळून हसलं म्हणजे माझं कामात लक्ष लागेल का? म्हणजे आता सतत तुझ्या ह्या नॉटी आईजचा पहारा ते काम करू देणार नाहीत.
तुला माहितीये मागच्या विकेंडला मित्रांसोबत दोडाबेट्टा पिक ला गेलेलो.एक मित्र आहे,प्रसन्ना ,त्याने एक खूप भन्नाट पॉईंट दाखवला.त्याच्या मते ती विशिंगव्हॅली आहे.त्या पॉइंटवरून त्या व्हॅलीचा नजराच इतका सुंदर आहे की बाकी माहित नाही पण पृथ्वीवर स्वर्ग बघण्याची इच्छा आपोआप पूर्ण होते.तो म्हटला इथे डोळे बंद करून बसा,जे काही पहिल्या क्षणाला बंद डोळ्यांआड दिसेल आणि जर त्यावेळची तुमची फिलिंग अगदी सच्ची असेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल.आम्ही त्याला खूप हसलो,खूप चिडवलं.कुणाला टाटा अंबानी बनायचं होतं तर कुणाला अजून काही. सर्वांना माहित होतं हे मनाचे खेळ असतात.त्या समोरच्या व्हॅलीमध्ये नजर जाईल तिथपर्यंत धुकं आणि त्यात चंदेरी रंगाचे ढग उतरलेले होते.डोळ्यांनी स्पर्श केला तरी त्यांचा मऊपणा ,थंड स्पर्श जाणवेल इतके जवळ होते ते.अधांतरी,आभासी!
आता माझंच घे,माझ्या बंद डोळ्यांआड काय आलं असेल-
मला त्यात दिसलं तू माझ्या मिठीत आहेस, तुझे मोकळे केस वाऱ्याने उडून डोळ्यांवर येताय,तू सावरत नाहीये मग मी ते हलकेच बाजूला करतोय, रडून डोळे शिणल्यासारखे वाटताय पण अगदी शांत दिसतेय,चेहऱ्यावर जरासं हसू.तुझ्या श्वासांची लय मला जाणवतेय इतक्या जवळ आहेस.ओठांना ओठांशी खूप काही बोलायचंय,तुझे गाल हलके हलके ब्लश झालेले आणि तू लाजून नजर चोरलेली....!
ऋजू,हे स्वप्न खरं करण्याची ताकद कुठल्याच विशिंग व्हॅलीकडे नाहीये.
तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे,तुझ्या खऱ्या प्रेमासोबतच असावं शेवटी एवढंच मागितलं.
सगळी स्वप्न पूर्ण व्हायला हवी हे गरजेचं नाही,अपूर्ण,अर्धवट स्वप्न पूर्ण होण्याच्या अपेक्षेने नेहमी जवळ राहतात,ती हुरहूर जिवंत राहते.ती कशिश धगधगत राहते.
ऋजा कुणी सांगावं कुठल्यातरी समांतर जगात तू माझी असशील? फक्त माझी! तिथे ना,तुझं हे निखळ हसू मी असंच जपेन. बाबू-शोना टाइप कदाचित नाही जमणार मला पण तुझे खोटे खोटे क्युटसे नखरे त्यांवर जीव ओवाळून टाकेन.
ऋजू,तुझ्या वाऱ्याशी बोलणाऱ्या केसांनां त्यादिवशीसारखा सैल बन बांधून गप्प करायचंय, तुझ्या बोलक्या डोळ्यांना गर्द काजळ लावून गप्प करायचंय.फुलपाखरासारखी बागडत असतेस तुला आवडणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांशी बोलत असशील कदाचित,तुला मिठीत घेऊन गप्प करायचंय.
तुला खूप प्रश्न पडतात,तुझ्या ओठांना गप्प करायचंय.
पर ऐसा ना तो अच्छा है,इन बातों मै क्या रखा है.मुझको ऐसी उम्मीद न दो...!"
तो फोटो तसाच जवळ होता तरीही समोर असणाऱ्या अजून एका फोटोकडे बघत पुटपुटला-
जादू भरी आंखोवाली सुनो तुम ऐसे मुझे देखा ना करो.!
डोळे भरून आले होते,आवाज जड झाला होता.
झोपेशी तर बिनसलं होतं पण एकच एक स्वप्न उघडया डोळ्यातं उतरलं होतं ते म्हणजे विशिंग व्हॅली जवळचं ,रेशमी धुक्याने आणि ढगांनी वेढलेलं.
काहीसं तिच्याची बरचसं स्वतःशी बोलत त्याचा डोळा केव्हा लागला त्याला कळलं नाही , अजूनही फोटो तसाच होता त्याच्या मिठीत.
*********************
वैदेहीशी बोलून सकाळी भेटायचं ठरलं होतं.अभय आणि रीमा ठरलेल्या वेळेच्या आधीच येऊन कॅफेमध्ये तिची वाट बघत थांबले होते.तिच्याकडून थोडीशी का होईना पण कबीरबद्दल माहिती मिळावी ही आशा त्यांना होती.
रीमा बैचेन होती,अभयला तिची अवस्था कळत होती- तिचा हात हातात घेऊन “सर्व काही ठीक होईल” म्हणून त्याने धीर दिला.
रीमाने पुन्हा तिला फोन करून कुठे बसलोय वैगरे सांगितलं,ती येतेय ना हे कन्फर्म करून घेतलं. जरावेळाने वैदेही आली.
“रीमाताई?” वैदेहीने जरा साशंकतेने विचारलं.
“हो” रिमाला तिला वेळेत आलेलं बघून हायसं वाटलं.
रीमाने अभयशी ओळख करून दिली,कॉफी,ब्रेकफास्ट आणि जरा कॅजुअल गप्पांनी अभयने बोलण्यातला अवघडलेपणा दूर करायचा प्रयत्न केला,मग रीमाने बोलायला सुरुवात केली.
“सॉरी वैदेही,आजचा तुझा काही प्लान असेल, आम्ही डिस्टर्ब करतोय तुला.”
“अरे,नाही ग ताई बोल ना.”
“वैदेही काल तुला म्हटलं ऋतुजाला सरप्राईज द्यायचंय त्याविषयी बोलायचंय पण actually मला तुला कबीरबद्दल विचारायचं होतं. मला वाटलं की तू तिला फोन वैगरे करून ह्या भेटीचं सांगितलं तर ती चिडेल आमच्यावर म्हणून हा childish try केला,sorry for that.”
“कबीर सर? का काय झालंय.”
वैदेहीला खरं तर कालच्या फोनवरून काहीच समजलं नव्हतं की ऋतूच्या दीदीचं अचानकपणे तिच्याशी काय काम निघालं,पण ताई सरप्राईजचं काही म्हटली म्हणून ती भेटायला आली होती.
“Actually आम्हाला कबीरबद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे how is he? त्याचा स्वभाव,फॅमिली,इथे असतांना कुणी GF,any information एनिथिंग यु नो ...”
“ताई स्वभाव म्हणशील तर जरा रिझर्व्ह आहे ते. खडूस वर्ड जरा जास्त सूट होईल.इतक्या मुली मागे फिरतात पण एकीकडे ढुंकून बघितलं नाही कधी त्यांनी.काम म्हणजे काम बस्स. वेलसेटल फॅमिली आहे पण काय झालंय ताई मला जरा सविस्तर सांग.त्यांच्याबद्दल एवढं का विचारतेय ?”
वैदेही हे सगळं सांगतांना हातचं राखून साशंकतेने बोलत होती,तिला अजूनही भेटीचं कारण नीट कळलं नव्हतं.अभयने ते बरोबर ओळखलं.
“रीमा लेट्स कम टू द पॉईंट. वैदेही आम्हाला वाटतंय की ऋतूजा कबीरच्या प्रेमात आहे आणि may be Kabir too liked her ”
“Not liked her, he actually loves her madly.”
आता जरा वैदेहीला खरं कारण कळल्यावर ती अगदी आनंदाने, मनमोकळेपणाने बोलली.
“Are you sure?” एवढ्या वेळापासून बेचैन असलेल्या रीमाच्या चेहऱ्यावर तिच्या ह्या एका वाक्याने जरा आनंद पसरला.
“ताई,सर गोव्यावरून आले ना तेव्हापासून इतके शांत झाले होते की सगळ्यांना ते जाणवलं होतं. त्या विकमधलीच गोष्ट आहे,त्यांची वस्तू मिसप्लेस झाली म्हणून ते इतके बैचेन झालेले,सकाळपासून जिथं जिथं गेले होते सगळ्या जागा शोधत होते.कुठेच लक्ष नव्हतं त्याचं.आम्ही सगळे म्हणत होतो की सर नेमकं काय हरवलंय सांगा तरी पण कुणालाच काही सांगत नव्हते.एकटेच शोधत होते. दिवसभर चिडचिड करून सगळ्यांना बोर केलं होतं. ऑफिसटाईमच्या अर्धा तास अगोदर ते माझ्याकडे एक एरर चेक करायला आले आणि डेस्कवर फोन विसरले. त्यांचा फोन मी परत करायला केबिनमध्ये गेले, मी इंटर करायची आणि त्यांना एका फाईलमध्ये एक अंक्लेट सापडलं त्याला त्यांनी किस करायची एकच वेळ झाली.मी ब्लॅंक झाले आणि ते जबरदस्त ओकवर्ड झाले.सावरासावर करायला लागले.मी ही काही बघितलं नाही असं प्रिटेंड केलं पण मला कळून चुकलं होतं की काहीतरी लव्ह मॅटर नक्की असावं.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक प्रेझेंटेशन देतांना क्ल्यायंटच्या लिस्टमध्ये ऋतुजा नाव होतं. ते नाव घेतलं आणि ते ब्लॅंक झाले त्यांना पुढंच काही प्रेझेंट करताच आलं नाही.चक्क पहिल्यांदा मिटिंग अर्धवट सोडून निघून गेले.माझं ऋतूशी बर्थडेच्या रात्री बोलणं झालं होतं, ती सरांबद्दल विचारत होती,म्हणजे ते दोघे भेटले होते हे मला माहित होतं म्हणून मला त्याचं ब्लॅंक होणं 'ऋतुजा' ह्या नावामुळे असेल याची पक्की खात्री होती.मी नंतर काही फाईल चेक करायला घेऊन गेले त्यांच्या केबिनमध्ये तर शून्यात नजर लावून बसलेले. मी तर आहेच आगाऊ,मी पटकन विचारलं त्यांना की ‘ऋतुजा नावामुळे ब्लॅंक झाले ना तुम्ही?’ तर आढेवेढे न घेता ‘हो’ म्हटले. नंतर इतके दिवस टाळत असलेला बंगलोरचा प्रोजेक्ट accept करून तिकडे शिफ्ट व्हायचा निर्णय घेऊन मोकळेही झाले. जातांना माझ्याकडून फक्त ऋतूचे काही फोटो घेतले आणि एक प्रॉमिस की मी ऋतूला याबद्दल कधीच काही सांगणार नाही ते.”
तिने उत्साहात सगळी माहिती सांगितली.काय सांगू,किती सांगू असं तिला झालेलं.
“काय वेडी लोकं आहेत यार ही.” अभय न राहवून म्हणाला.
“पण ताई,सर तर म्हटले होते की ती एंगेज आहे मग?”
“लॉंग स्टोरी....जाऊदे.” डोक्याला हात मारत ती म्हणाली.
“अग जाऊदे काय,ती एंगेज आहे हा विचार करूनच तर ते निघून गेले ना.तसं नसेल तर किती भारी होईल हे आणि ताई तू त्यांच्या मॉमला पण भेट त्यांचेही सरांना खूप वेळा फोन यायचे की एकदा तिला सांगून बघ वैगरे.मी तर जासुसीच करत होते त्यांची.तुला माहितीये मीच नाही तर आमचा अख्खा फिमेल स्टाफ वेडा आहे कबीर सरांसाठी.मुली वेड्या आहेत त्यांच्यासाठी.what a personality man, young angry dashing handsome. आणि आपली फुलराणी तोडीस तोड आहे सरांच्या.काय अमेझिंग जोडी दिसेल यार .birthdate सुद्धा एक आहे दोघांची.लवकर आयुष्यसुद्धा एक व्हावे बाबा. ”
वैदेहीचा चेहरा आता आनंदाने खुलला होता.
“होप सो,अजूनही कबीरचं प्रेम असेल तिच्यावर.” रीमा जरा साशंक होती.
“होप सो नाही १०० % खात्री आहे मला.खरतर मला सरांसाठी खूप वाईट वाटलेलं की ह्या माणसाला प्रेम व्हावं ते ही कधीच न मिळण्यासाठी पण मला खात्री आहे ते ऋतूवर अजूनही तेवढंच प्रेम करत असतील.”
“मला त्याच्या घरचा नंबर मिळेल?”
“मी तुला त्यांचा रेसिडेन्स आणि पर्सनल नंबर देते,अड्रेसही मिळून जाईल ऑफिसमधून. सगळे डीटेल्स उद्या ऑफिसला गेल्यावर whataspp करते.”
“हो चालेल,काल फोन केलेला त्याच नंबरवर कर आणि खूप खूप मोठ्ठ् थँक्स तुला.”
“काय ग ताई,मला माहित असतं ना की ऋतू एंगेज नाहीये मीच तिला अप्रोच केलं असतं. प्रॉमिस गेलं खड्ड्यात.पण तिने नंतर कधी मला त्यांच्याबद्दल विचारलं नाही की विषय काढला नाही. मुंबईला जातेय एवढं ग्रुपवर बोलणं झालेलं, त्यानंतर काहीच contact नाही म्हणून एवढे दिवस वेस्ट झाले.काहीही मदत लागली तर सांग,मी आहे.”
“ Thank dear, thanks a lot”
वैदेहीला भेटून एक रीमाच्या बऱ्याच शंका दूर झाल्या होत्या आणि आता पुढे काय करायचं हे अभय आणि रीमाने पक्क केलं.
†*********************
त्यादिवशी रीमा आणि अभय कबीरच्या घरी पोहचले तेव्हा बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती.
“या बसा,दुपारी तुझा फोन येऊन गेल्यापासून सारखी चलबिचल चालू होती,कधी एकदाची भेटतेय तुला असं झालेलं.मी आसावरी सरदेसाई आणि हे कबीरचे बाबा सत्यजित सरदेसाई.”
“मलाही तुम्हाला भेटायची उत्सुकता होती आंटी.बाय द वे हा माझा मित्र अभय.”
“नमस्ते आंटी,नमस्ते अंकल.”
अभयला त्यांच्या वागण्या बोलण्यात प्रचंड आपुलकी जाणवत होती.भेटीचं जे दडपण आलं होतं ते जरा विरल्यासारखं झालं.
“बसा..खूप बरं केलं तुम्ही आलात, आता काही गोष्टींचा गुंता तरी सुटेल.” एक दीर्घ सुस्कारा टाकत कबीरचे बाबा म्हणाले.
“आंटी,actually मला ही काही गोष्टी क्लियर नाहीये म्हणून मी माझ्या घरी अजून काही सांगितलेलं नाहीये.”
कबीरच्या आई बाबांना भेटायला रीमा आणि अभय दोघेच आले होते ,अजूनही त्यांनी घरी काही सांगितलेलं नव्हतं.
“its absolutely ok, no problem.आता नेमकं चालू काय आहे दोघांच्या आयुष्यात ते अगोदर जाणून घेणं महत्वाचं.मला सांग ऋतुजाची तर एंगेजमेंट होणार होती ना?कबीरने तसं सांगितलं होतं मला.”
तिला ह्या प्रश्नाने जरा अवघडल्यासारख झालं पण त्याची आई अगदी मैत्रीण असल्यासारखी विचारत होती त्यामुळे तिला जरा धीर वाटला.तिने त्यांना समजेल असं थोडक्यात त्यांच्या फॅमिली पासून,तिच्या डिवोर्सबद्दल आणि अभयशी होणाऱ्या एंगेजमेंटबद्दल अगोदर सगळं सांगितल मग वेदच्या आणि तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं.त्याही विचारात पडल्या.
“आंटी,ऋतुजा जरा अल्लड आहे.तिला आयुष्यात नेमकं काय हवंय हे कबीर आल्यावर समजलं.ती अश्या परिस्थितीत होती की काय करावं तिलाही कळत नव्हतं.त्यात कबीर तिला ‘जे तू फील करतेय ते निव्वळ तुझ्या मनस्थितीमुळे आहे’ वैगरे सांगून निघून गेला. ती मात्र त्या प्रवासातच स्वतःला त्याच्याकडे विसरून आलेली,आता तर पूर्ण कबीरमय झालीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,पण मान्य नाही करायचंय तिला.कबीर तिला म्हटला होता की ‘त्याचा लव्ह,अफेयर ह्या गोष्टींवर विश्वास नाहीये,मला प्रेम कधी होणार नाही वैगरे’ म्हणून की काय त्याला कन्फेस करत नसावी. त्याच्याविषयी काही बोलत नाही फक्त त्याच्यासाठी रोज डायरी लिहिते.तिथेच रडते,हसते प्रेम ही करते.तुम्ही सांगा मी काय करू? मला माहितीय कबीरचा यात काही दोष नाही किंवा आता तो कुठल्या रिलेशनमध्ये असेल तरी its ok . फक्त मी जराही ट्राय केला नाही त्यांची एकदा पुन्हा भेट घडवून आणण्याचा हा गिल्ट नकोय म्हणून हा प्रयत्न.”
ऋतुजापण कबीरवर तेवढच प्रेम करते हे ऐकून त्याच्या आई बाबांचा चेहरा खुलला.एकुलत्या एक मुलाला आयुष्यात पहिल्यांदा कुणी इतकं आवडलं,त्याचं मनापासून प्रेम असतांना ते पूर्णत्वाला जाऊ शकत नाही याचं त्यांनाही वाईट वाटत होतं.तो बंगलोरला किती एकटा आणि उदास असेल याचीही त्यांना कल्पना होती पण ते ठरवून देखील काहीच करू शकत नव्हते आणि आता एकदम सगळे निराशेचे ढग हळूहळू हटणार ह्या जाणीवेने ते खुश झाले होते.
“शेवटी काय तर दोघेही वेडे आहेत,हा आमचा हिरो कबीर वेडाय तिच्यासाठी.पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हाचं प्रेमात पडला होता म्हणतो.इतका तुसडा होता मुलींच्या बाबतीत,ते कपल,gf,bf फार तिटकारा यायचा त्याला.काम सोडून लोकं फालतूपणा करतात असं म्हणायचा आणि गोव्यावरून आला,ऋतुजाला काय भेटला पूर्ण बदललाच.बंगलोरला जाण्यापूर्वी अगदी कुशीत शिरून रडला होता तिच्यासाठी.मी म्हटलं होतं त्याला इतकं प्रेम नको करू की ती आहे त्याची राहू शकणार नाही,बघ तेच झालं.”
“पण आंटी ह्या पाच,सहा महिन्यात काही बदललं असेल तर आय मीन तो तिकडे कुणाच्या प्रेमात वैगरे..”
“कबीर त्याच्या इमोशन्स बाबतीत खूप सोर्टेड आहे. आता ऋतुजाशिवाय कुणालाही जागा नसेल त्याच्या हृदयात.आमचा फॅमिली अटेंडन्ट आहे सतीश म्हणून त्याला मी ‘NGO च्या कामासाठी पाठवलंय’ असं म्हणून कबीरची चौकशी करायला पाठवत असते अधून मधून.आत्ताच सतीश बंगलोरला त्याच्याकडे जाऊन आलेला, म्हणत होता की ‘पूर्ण फ्ल्याटमध्ये कुण्या साउथइंडियन हिरोईनचे फोटो लावलेय दादांनी.’
ते नक्की ऋतुजाचे असावे ,कबीरने त्याला वेड्यात काढलं होतं हे पाहून हसू आलं पण तेवढच टेन्शन ही आलं होतं की ह्याच्या ह्या प्रेमाचं पुढे काय भविष्य? मी स्वतः तिचा नंबर शोधून तिच्याशी बोलणार होते की ‘ह्याला एकदा समजावून सांग’ इतकं मला आता असह्य झालं होतं म्हणून तुझा फोन आल्यावर, तू ऋतुजाची बहिण बोलतेय हे ऐकूनच मला इतकं रील्याक्स आणि शांत वाटलं की चला काहीतरी मार्ग निघेल.”
“हे खरंच खूप विचित्र झालंय, आता त्यांना फोन करून बोलावून घेऊ आणि सोक्षमोक्ष लावूया.”
त्याचे बाबा अगदी उत्साहात म्हणाले पण त्यांना थांबवत आसावरी पुढे म्हणाल्या -
“नाही,आपल्याकडून त्यांना असा एकमेकांच्या प्रेमाचा अर्धवट मेसेज गेला तर ते त्यांच्या इमोशन मान्युप्लेट करतील. दोघेही काहीतरी ठरवून, मनात कुठलातरी ब्लॉक,दडपण ठेवून वागताय,काहीतरी असेल त्यांच्या मनात. आपण त्यांना जाणीव नाही करून द्यायची,आपण त्यांना फक्त भेटवायचं.मग पुढची परीक्षा त्यांची, त्यांच्या प्रेमाची.”
“ओके पण आता ऋतूचा प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यात आहे. ती एवढाच आठवडा मुंबईमध्ये असेल,मग एक आठवडा ऑनसाईट नंतर इंटर्नशिप जाण्यासाठीच्या तयारीला लागणार आहे. काय करायचं?” अभयने नेमका मुद्दा उपस्थित केला.
“मी काहीही करून कबीरला पुढचा आठवडा सुट्टी घ्यायला सांगते,आजच सांगायला हवं त्याला तर तो प्लानिंग करू शकेल यायची.पण कुठे भेटणार ते? ती तर ऑनसाइट जातेय ना?”
त्यांनी शंका उपस्थित केली.
“हो,महाबळेश्वरजवळ तापोळाकडे साईट आहे.” अभय म्हणाला.
“No problem सातारा ब्रांचच्या NGO चं digital expansion चं काम आहे असं सांगून बोलावता येईल त्याला आणि तिकडेच पाठवता येईल. ती राहणार आहे तिथला पत्ता दे,मी बघतो काय सुचतं ते.”
त्याच्या बाबांचा उत्साह दुणावला होता.
“आंटी,अंकल मला कळत नाहीये तुमचे आभार कसे मानू ते.देवाला हीच प्रार्थना करते की लवकर मी माझ्या आई वडिलांना घेऊन तुम्हाला भेटायला येण्याचा शुभ प्रसंग येवो.” ती त्यांच्या पाया पडत म्हणाली.
“नक्की येईल,माझा विश्वास आहे,पण मला तिचा फोटो तरी दाखव आमचा हिरो थकत नव्हता तारीफ करतांना.”
रीमाने ऋतूचा फोटो त्यांना दाखवला, ’नक्षत्रासारखी सुंदर आहे पोरगी.’ आपसूकच त्याच्या तोंडून निघालं.
“आणि हा आमचा हिरो” जिन्याच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर त्याचे खूप फोटो होते.
रीमा आणि अभय बघतच राहिले.
“अगदी मेड फॉर इच अदर आहेत” रीमा भरून आलेले डोळे पुसत म्हणाली.
“आपण एवढं ठरवतोय पण देव त्यांना प्रेम व्यक्त करायची सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा.”
आईचं मन मुलाच्या आनंदासाठी झटत होतं,एकदम आलेल्या आनंदाला गालबोट लागायला नको एवढंच त्यांना वाटत होतं.
*********
#क्रमशः
Copyright©2019 हर्षदा
All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.