#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_२९
{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}
रिशीला पहिला ड्राफ्ट सबमिट करतांना,ऋतूला प्रचंड टेन्शन आलं होतं.तिने ऑफिसला आल्यावर सगळ्यात अगोदर,भीतभीतच त्याच्या हातात तो रिपोर्ट दिला.
त्याने तो ठेवून घेतला आणि लंचब्रेकनंतर डिस्कस करायला बोलावलं. लंचब्रेकपर्यंत तिच्या मनाची घालमेल चालू होती.
ब्रेकनंतर दोन तास झाले तरी त्याने तिला डिस्कशनसाठी बोलवलं नाही म्हणून ती स्वतः त्याच्याकडे गेली.
सर,मॅडम बोलायचा इथे प्रघात नसल्याने तिला सिनियरला सरळ नावाने बोलणं बऱ्याचदा अडचणीचं वाटायचं. हिम्मत करून तिने रीशीला स्वतःहून रिपोर्ट बद्दल विचारलं-
“सर, आय मिन रिशी…आपण रिपोर्ट डिस्कस करणार होतो.”
“I don’t discuss garbage, I don’t have time for that.” त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने त्याचं काम चालू ठेवलं.
“What happened rishi .”
तिने भीतभीत विचारलं,गार्बेज म्हटल्याने झालेला अपमान तिला चांगलाच जिव्हारी लागला.त्याने जरावेळ तिच्याकडे बघितलं,एका फोल्डर मधून तिचा रिपोर्ट बाहेर काढला आणि तिच्याकडे भिरकावला.
“ऋतुजा हा कसला रिसर्च केलाय तू? इतकी predictable,रटाळ आणि रुटीन माहिती? तुला थीमच समजली नाहीये ऋतुजा, कळतंय का तुला? पूर्ण १५ दिवस वेस्ट केलेत तू ह्या फालतू कामात.”
“रिशी जवळपास 100 सोर्सेसवरून ही सगळी माहिती प्रवासाच्या अँगलने कलेक्ट करून कंपाईल केलीय..I mean"
“ऋतुजा आहे ती माहिती कंपाईल करणं याला रिसर्च म्हणतात? WTF यार ? व्हॉट इज युनिक हियर? ट्रॅव्हल बुकसाठी स्क्रिप्ट बनवायचीय,हा असा डेटा टाकणार त्यात? कुणाला इंटरेस्ट येईल तो वाचण्यात? तुला ट्रॅव्हल क्वेस्ट समजते का? त्यातली डेप्थ समजतेय? कुठला प्रवास युनिक असतो काही विचार केला नाही ,फिफ्टीन डेज जस्ट कचरा वेचला. ”
तो अजूनच चिडत म्हणाला,त्याचा आवाज टिपेला गेला होता.ती भेदरून तिथेच उभी होती. तिचे डोळे डबडबले.
त्यादरम्यान रीशीकडे कामासाठी म्हणून आलेली मिका मागे उभी आहे हे तिच्या लक्षात आलं नाही.रीशीला असं चिडलेलं पाहून ती पुढे आली.
“What happened guys? Rishi why are u shouting ?”
“Mika I told you, she worked in client section, she is not having research experience but you guaranteed me about her work, she has spark and all that…look at this, she wasted 15 days in this shit, damn it.” तिच्या हातात तो रिपोर्ट ठेवत रिशी म्हणाला.
“Ok, rishi relax! She will definitely do it the way you wanted. Chill .”
ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती.
“mam, …mika..I will..”
ऋतू इतकी भेदरली होती की तिला शब्दच सुचत नव्हते.खराब कामावरून अपमानित होण्याची ही पहिलीच वेळ होती.तिचा आवाज कापरा झाला.ती कुठल्याही क्षणी रडू शकते हे पाहून मिकाने तिला लागलीच खांद्याला धरून चालतं केलं-
“Come with me ,let’s have a cup of coffee.”
कॅफेटेरियात छानसी निवांत जागा बघून,कॉफी घेत त्या बसल्या. ऋतूची मिकाच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत होत नव्हती. कामावरून इतकं टाकून तिला आतापर्यंत कुणीही बोललं नव्हतं.
हा अपमान पचवणं खूप जड जातं होतं,मिकानेच मग बोलायला सुरुवात केली-
“ऋतुजा we got lots of proposal from all of our branches but yours was something else कारण शेवटच्या क़्वेशनला जी “होल्सियन डेज”ची फिलोसॉफी तू लिहिली होती,ज्या पद्धतीने रिलेट केली होती that was amazing.
तू ज्या पद्धतीचे उत्तरं लिहिली होतीस ती पद्धत,ते विचार खूप वेगळे,क्लिशे तोडणारे होते,अगदी क्रंची,rishi wants that Rutuja, he expected the same crunchiness in your thoughts, your work. पण तू नेहमीच्या पठडीतला डेटा त्याला दाखवला.Think about the out of the box travelers.
go through quality books, twitter handles, analyze insta photos, captions, blogs एका ट्रॅव्हलरची क़्वेस्ट कुठल्या कुठल्या माध्यमातून व्यक्त होऊ शकते ते शोध.आपली ह्यूज लायब्ररी आहे, कीप ऑन रीडिंग,कीप ऑन सर्चिंग. अजून कुठल्या प्रकारचे प्रवासी असू शकतात ज्याचा कुणी विचार केला नसेल,काहीतरी वेगळं शोध. In advertising it is must to keep the child within you always awake.
माणसं वाच,व्यक्त हो,स्पार्क झालेल्या आयडियाज ,कॉन्सेप्ट लिहून काढ ,डिस्कस कर कुणीतरी मेंटोर असतोच ना आपल्या आयुष्यात जो ह्या रॉ, वियर्ड,चाईल्डलाइक , तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या विचारांचा कोलाज बनवायला मदत करतो,talk with that person, take help of such person in your life मला खात्री आहे तू नक्की छान काम करशील.चीर अप स्वीटहार्ट.”
मिकाच्या ह्या बोलण्याने तिला खूप रील्याक्स वाटलं.
तिने भीतभीतच फोल्डर मधून पेपर काढला आणि तिच्या हातात दिला.
“मिका,ह्या पेजवरून एकदा नजर फिरवतेस? रिपोर्ट करतांना सहज काही notes काढल्या होत्या. म्हणजे “प्रवास” “यात्रिक” travel quest ला अनुसरून जरा वेगळा धागा निवडला होता आणि त्याला डॉन किहोत्येच्या इम्पोसिबळ ड्रीमसोबत जरा जोडायचा प्रयत्न केला होता,मला ते वियर्ड,childish वाटलं म्हणून मी त्यावर काम केलं नाही ...see this.”
त्यावर फक्त काही नोंदी होत्या-
“१.ट्रॅव्हल क़्वेस्ट..कालीदासाच्या मेघदूतच्या रूपाने !
मेघदूतमध्ये नाही का एका शापित यक्षाचं त्याच्या प्रियेच्या दुराव्याने सैरभैर झालेलं मन इतकं ओढाळ होतं की एका नॉन लिविंग, अचेतन मेघाला दूत बनवून यक्ष त्याला प्रियेकडे निरोप पोहचवण्याची विनंती करतो. तिचा पत्ता देतो आणि त्याने कसा,कुठून प्रवास करायचाय हे सुद्धा अगदी तन्मयतेने सांगतो.
तो त्याने आखून दिलेला प्रवास किती अनोखा आहे.
प्रियेला एक साधा निरोप देण्यासाठी आऊट ऑफ द वर्ड असलेला , लव्ह क़्वेस्ट बाळगणारा प्रवास..मेघदूत!
२.मायग्रेटिंग बर्डस--आज अचानक समोर आलेला रेफेरेन्स खूप विचार करायला लावणारा आहे. हा अजून एक प्रवास मला खूप डीप थॉट्स देऊन गेला. तो प्रवास म्हणजे “मायग्रेटिंग बर्डस”. सयबेरिअन क्रेन,चक्रवाक,चातक पक्षी हे दुसऱ्या देशातून येतात यांची सायंटिफिक ,जिओग्राफिकल ट्रॅव्हल क़्वेस्ट तर आहेच पण काही रेफरन्समध्ये विशेषतः क्रेन्स,सारस क्रौंच पक्षी नेहमी जोडीने प्रवास करतो.याचं हे अमेझिंग प्रेम पुराणकथांमध्ये सुद्धा आलेलं आहे. काय असेल ह्या छोट्याश्या जीवांची एकत्र प्रवासामागची इनरक़्वेस्ट ?
3. ख़ानाबदोश-- सच अ ब्युटीफुल वर्ड ! कुठलंही डेस्टिनेशन नाही ,कुठलंही बंधन नाही, थांब! किंवा परतून ये! म्हणणारं घर नाही...जिप्सी !! भटकत राहणं हेच जीवन ख़ानाबदोश! ख़ानाबदोशी हा aimless प्रवास असला तरी निरर्थक नाही.त्यामुळे हे ख़ानाबदोश पक्षी,लोकं हे खरे ट्रॅव्हलर..त्यांची काहीच ट्रॅव्हल क़्वेस्ट नाही तरीही त्यांच्या प्रत्येक क़्वेस्टसाठी स्वतंत्र प्रवास आहे.माझ्यासाठी ही भटकी ख़ानाबदोश मंडळी म्हणजे प्रवासाचं उगमस्थान!
मिकाच्या चेहऱ्यावर ते पॉईंट्स वाचून वेगळीच चमक जाणवली.
“Ohh my god,baby ह्यावर अजून रिसर्च करू शकशील?असे अजून आपल्या आजूबाजूला, आपल्या जवळचे काय काय हूक पोइंट आहेत त्यावर रिसर्च कर म्हणजे सोशल,प्रिंट,शिल्प,चित्र जे असेल ते सगळं शोध आपल्याला क्लायंटला travel digest, web content, print content n what not provide करायचंय.We want this types of unique and different hook points to work upon. Start working.ही ती ऋतूजा आहे जी त्या प्रपोझलमध्ये होती. This is my girl.ह्या अश्या point वर का काम केलं नाही तू? का ते रुटीन points compile केलेस आणि ऋषीला दाखवलेस?”
“मिका actually माझे विचार कसेही भरकटत असतात.जिप्सी थॉट्स ! माझ्या मनाला कुठे काय सापडेल आणि ते कुठे स्थिरावेल यावर माझा विश्वासच नाहीये. मला वाटलं प्रवास,यात्रिक या थीमला मी असे काही रेफरन्स दिले तर रिशी फाडून फेकून देईल रिपोर्ट,माझं काहीतरी जगावेगळच असतं सो.....”
“कर की जगावेगळ मग कोण अडवतंय तुला,शहण्या,पठडीबाज जगणाऱ्या लोकांच्या कथा नाही होतं. वेड्यालोकांच्या वेडेपणावर लिहलं जातं,वाचलं जातं आणि सेल ही केलं जातं आणि हेच तर क्रिएटिव्हिटीचं, advertising चं गिमिक आहे बेबी.I want this Rutuja बस्स.By the way हे जे काही सुचलंय ह्या मागे कुठली प्रेरणा,कुठला स्पार्क,कुठला रेफरन्स होता?इट्स व्हेरी युनिक ”
ती जरा गोंधळली,काय बोलावं? तिच्या चेहऱ्यावरचे थोडेसे हळवे झालेले भाव मिकाला जाणवले.
“Actually एक मित्र होता.तो छोट्या छोट्या बंदिशमध्ये दडलेला मोठा अर्थ खूप छान समजावून सांगायचा.मग आपल्या ह्या थीमवर बेज्ड काही बंदिश,नाट्यपदं शोधतांना संगीत शाकुंतल सापडलं,मग आपसूक कालिदास आणि मग मेघदूत,मग सायबेरीयन क्रेन..असा काहीसा विस्कटलेला प्रवास झाला.”
“ओह्ह ग्रेट,means this friend is the source of spark..!! good, बोलत जा त्याच्याशी म्हणजे खरी ऋतू अशी दिलखुलासपणे बाहेर येते.”
तिच्या पाठीवर थाप मारत मिका म्हणाली.
ऋतू उपचारादाखल हसली,पुढे काहीच बोलली नाही.तिच्याकडे सांगायला तरी काय होतं.
“ मिका! thanks, मी अजून काही हुक पोइंट शोधते आणि दोन दिवसात पुन्हा रिपोर्ट तयार करते,I got my way now. This time I won’t let u down.”
“माझ्यासाठी नाही स्वतःसाठी काम कर, स्वतःला एक स्टेप पुढे नेण्यासाठी काम कर.”
“मिका स्वतःसाठी काही करणं म्हणजे स्वार्थीपणा होतो ना?”
मनात नसतांना,ती नकळतपणे बोलून गेली.
“मला माहित नाही तू कुठल्या संदर्भात हे विचारतेय पण स्वतःसाठी जो काही करू शकत नाही तो दुसऱ्यासाठी तरी काय करणार? That’s why consider your self-regard first and then you will become more stronger for others.ओके?
ऋतू फक्त हसली आणि तिने होकारार्थी मान डोलावली.
“चलो बाय,मिटिंग आहे,सी यू सून.”
मिका नजरेआड होईपर्यंत ती बघत राहिली,तिला आज मिकाने तिचा स्वतःचा रस्ता शोधायला मदत केली होती,ती ही अगदी सहज,कुठलाही अभिनिवेश न बाळगता हे तिला फार आवडून गेलं. ती बसून होती. ”त्याच्याशी बोलत जा” हे तिचं वाक्य आठवून ती उदासपणे हसली.
‘न बोलण्यासाठीच तर statue करून गेलाय तो पण मनातलं बोलण्यासाठी तो समोर असलाच पाहिजे असं कुठेय? मी डायरीतल्या पानांशी बोलेन,कबीर तू फक्त ऐकून घ्यावं,उत्तर द्यावं ही माझी अपेक्षाच नाही.’
हातातल्या पेपरकडे तिने एकदा बघितलं... जराशी विचारांत हरवली- "जोडीदार शिवाय न जगणारा क्रौंचपक्षी...काय आहे त्यांची इनर क्वेस्ट?”. ...हवीहवीशी,फक्त सोबत असण्यानेही अश्वस्थ करणारी भावना जी प्रेमाच्याही पुढे एक पाउलभर आहे, प्रत्येक छोट्या मोठ्या जीवाला ती हवी आहे. ‘मी आहे सोबत “ मधली स्थिरता....असू शकते इनरक्वेस्ट?"
****************
पंच ऑउट करून बाहेर येईपर्यंत मोना एकटीच बोलत होती, उत्तरादाखल ऋतू फक्त हो नाही एवढंच बोलत होती.तिचं काहीतरी बिनसलंय हे जाणून मोनाने तिला विचारलं-
“मॅडम,मूड का ऑफ आहे?”
“मोना,रिशी जाम ओरडला आज मी तयार केलेले रिपोर्ट्स बघून.”
तिला ते बोलणं फार इन्सलटिंग वाटलं होतं.
“ हो यार रिशी तसा खूप पर्टिक्युलर आहे त्याच्या कामाच्या बाबतीत पण असं कुणाला ओरडलाय वैगरे हे नाही ऐकलय.मग पुन्हा रिपोर्ट्स बनवून मागितले असतील नं?”
“हो यार,तो ओरडत होता तेवढ्यात मिका पण आली,तिने जरा समजावलं,आता जरा डिरेक्शन मिळाल्यासारखं वाटतंय.पुन्हा बनवेन सगळे रिपोर्ट्स.” ती खालच्या स्वरात म्हणाली.
“ऋतूजा आल्यापासून बघतेय तुला तू कायम हरवल्यासारखी,वाट चुकल्यासारखी वाटतेस,अरे आपल्याला इतकी छान अपोर्चुनिटी मिळालीय मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा आहोत आपण sorry to say पण तू मनापासून काम करतेय असं वाटत नाहीये.उगाच कुठूनतरी पळ काढून,कुणापासून लपत छपत आश्रयाला आल्यासारखं तुझं बिहेविअर आहे.कधी फिरायला,हँग आउटला येत नाहीस,सतत, अगदी सतत उदास असतेस.ऋतूजा आपण क्रियेटीव्ह फिल्डमध्ये आहोत यार,तुझी एनर्जी वेस्ट नको करू काही प्रॉब्लेम आहे का घरी? ब्रेकअप वैगरे झालंय का?”
मोनाचं बोलणं अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असायचं, काहीच आढेवेढे न घेता तिने अंफ्रंट विचारलं.
ऋतू काहीच बोलली नाही,शांत होती.तिला मोनाचं बोलणं समजत होतं पण तिच्या वागण्यावर तिचा तरी कुठे ताबा राहिला होता. जे झालं ते योग्य की अयोग्य,कुणाचं चुकलं ती कितीही नाही म्हणत असली तरी ह्याच विचारात ती अडकून पडली होती.
“बास्स मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. असेल त्या टेन्शनच अकॅउंट क्लोज करायचं. यार इतक्या मोठ्या एजेन्सीमध्ये जॉब मिळालाय,इतका मोठा प्रोजेक्ट मिळालाय त्यावर कॉन्संट्रेट कर ना. पाच दिवस मान मोडून काम करायचं आणि वीकेंडला फुल धम्माल करायची,बस्स! हे दिवस पुन्हा परतून येणार नाही यार.कळतंय ना.”
मोनाच हे असं हक्काने दटावण,आज रिशीचं सगळ्यांसमोर ओरडणं, तिने केलेलं काम पहिल्यांदाच इतक्या वाईट पद्धतीचं होतं.तिला हुंदका अनावर झाला.
“किती रडतेस गं,बऱ्याचदा बघितलंय मी, तू रात्रीसुद्धा गपचूप रडत असतेस,इतका काय त्रास आहे तुला लाईफमध्ये? चल, आता हॉस्टेलला नाही जायचं, मरीन ड्राईव्हला जाऊ गप्पा मारू, मस्त डिनर करू ..चल डोळे पूस.आज मला सगळं सांगायचं काय झालंय ते.”
तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत मोना म्हणाली. ऋतूने रुमालाने हलकेच डोळे पुसले.’आपण खरंच स्वतःहून निवडलेलं काम किती हलगर्जीपणाने करतोय’ यासाठी तिला ही वाईट वाटलं.
‘चलं ,फिरून येऊ,थोडं खानाबदोष होऊ’ ऋतू जरासं हसून म्हणाली.
'ओहह हो, खानाबदोष अँड ऑल हा! thats like my girl." मोना तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली.
मनाला बांधून ठेवण्यात काहीच हाशील नाही.तो त्याचा पिंडच नाही .कधीतरी मनाला "वाटेल तिथे जा परतून येऊ नको...!" सांगितलं की आपण मोकळे होतो . बेबंद......ख़ानाबदोश होतो!!
*****
क्रमशः
Copyright©2019 हर्षदा
All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.
**लेकीचा वाढदिवस आहे उद्या, त्यामुळे आपली भेट रविवारी ..!!
खूप वाचकांचे प्रश्न आहेत पर्सनलला की तुम्ही कुठली पुस्तकं वाचत आहेत ते सांगा, कुठली पुस्तकं वाचायची ते सुचवा तेव्हा लवकरच इन्स्टाग्रामवर हे सगळे अपडेट्स देणार आहे.नक्की फॉलो करा.
@soniways
https://www.instagram.com/p/B_VW8y1Jirg/?igshid=5re5jrutuog8