शेवटी साहिल व सई दोघांनी आपली करियर निवडली. आणि त्या दिशेने वाटचाल सुरु झाली.दोघे ही जोमाने तयारी लागले होते. सई चे आई व वडिल तर साहिल चे मावशी व काका मदत करत होते. आपल्याला आपल्या आई वडिलांच स्वप्न साकार करायचे हे एक ध्यय त्याच्या समोर होते.दोघे ही खुप मेहनत करू लागले.कुढ्ले ही स्वप्न प्रुण करणे सोपे नाही. याची कल्पना त्यांना चांगली येतं होती .त्या साठी ते जीव तोड मेहनत करत होते. सई डॉक्टर होण्याची एक एक पायरी चढत होती. त्या मध्ये तीला किती तरी अडचणी आल्या तिच्या वडिलांची साथ व आई ची मदत या वर सगळ निभावल एकदा सई वर खूपच वाईट प्रसंग आला. तिची डॉक्टरी पूर्ण करण्या साठी एक वर्ष राहिले होते पण आधल्या वर्षी फ ई न ल परीक्षा होती. दोन पेपर राहिले होते. ती पेपर देण्यास केली. परीक्षा सुरु झाली प्रश्न पत्रिका दिली. तिने सगळी प्रश्न पत्रिका वाचली व मन ही मन खुप खुश झाली. खुप सोपा होता. साईने पेपर लिहायला सुरुवात केली .नीम्या पेक्षा जस्त पेपर लिहून झाला.अचानक सई च्या पाया वर काही तरी पडले. साईने खाली पहिले तर कागदाचे बोळे होते. तिने एकटे तिकडे पहिले. तर तिच्या शेजारी असलेल्या पाठीमागून मुलगा पुढे दे असे खुणावत होता. खरंतर तिला खुप राग आला. पण भीती ही वाटत होती. सरांनी पहिले तर आणि खरंच सरांनी पहिले. ते सई जवळ आले. ते कागदाचे बोळे घेतले आणि सईला बोलू लागले. ती म्हणत होती. पण तिने विचार केला .आपण त्या मुलाचे नाव सांगून काही उपयोग नाही. कोणी विश्वास ठेवणार नाही. मनोमन विचार केला व दोनी हात जोडून सर माझ चुकल. तरी सर बोलत होते. ती खाली मान घालून सरांची माफी मागत होती. शेवटी ती खुप हुशार आहे. हे सर्व शिक्षकांना माहीत होत. पुन्हा अस करू नको असे म्हणुन सरांनी तिला माप केले. त्या मुलाला ही बरे वाटले.साईने शांत मनाने पेपर लिहिला. पेपर संपल्या वर त्या मुलाची माफी मागितली. इतर मुलांनी सई चे कैतु क केले. घरी आल्या वर तिने आई व बाबा यांना संगितले तेव्हा त्यांना कैतुक ही वाटले. आणि काळजी ही वाटली. आई म्हणली, सरांनी माफ नसते केले तर.अग आई आपण नेहमी चांगले काम करायचे. चांगलच होत. बरं पेपर छान गेला. आत्ता एक पेपर राहिला आहे. आणि ती तिच्या रूम मध्ये गेली. सई च्या आई बाबांना सईच्या वागण्याच खुप कैतुक वाटत. मधुकर ला सई एक चांगली व प्रामाणिक डॉक्टर व्हावी असे मनापासून वाटते. फ़क़्त अजून एक वर्ष वाट पहावी लागेल. मग तिची प्र्यकटिस चालू होईल. इतक्यात सुमन कॉफी घेऊन येते. मधुकर व सुमन सई विषई गप्पा मारत बसतात.
त्या बरोबर साहिल ही खुप धडपड करत होता. तो आत्ता मावशी कड़े न रहता. मुलाच्या ग्रुप मध्ये राहतो. तरी मावशी व काकांचे सगळे लक्ष त्याच्या कड़े असते. त्याच्या ग्रुप मध्ये ते पाच जण होते. सगळे हुशार होते. सगळे एकमेकांना मदत करायचे. त्याच्यात जस्त श्रीमंत असे कोणी नव्हते . त्याच्यात। राज नावाचा एक मुलगा होता खुप हुशार स्वभाव पण छान पण अचानक त्याच्या त्याच्या आयुष्यात एक वादळ आल .घरची सगळी जबाबदारी त्याच्या वर पटली. पुढचं शिक्षण कस प्रुण कराव हे त्याला कळत नव्हते. अजून दोन वर्ष तरी तरी लागतील. त्यासाठी लागणारा पैसा कुटून आणायचे. बहिणीच लग्न ठरलं होत. तिच्या लग्नासाठी थोडे पैसं ठेवले होते. पण पुढे............. राज खुप विचारत असायचा. त्याने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला हे जेव्हा त्याच्या मित्रांना समजले तेव्हा ते खुप रागवले तु एवढा मोठा निर्णय कसा घेतला. राज..... म्हणला मग काय करू?-???? साहिल-,,,,अरे दोन वर्ष फक्त..... सगळ्यांची इच्छा होती राज च शिक्षण प्रुण व्हावे. पण त्याच्या खुप पैसे वाले कोणी नव्हते. त्यांनी ही अडचण त्याच्या मुख्य सरांना सांगितली. तु शिक्षणा बरोबर काही तरी काम कर. तुला आपल्या कॉलेज च्या लॉब्रित काम कर तुला पेमेंट मिळेल. आणि लेक्चर पण करता येतील. उरलेल्या वेळेत तु तिथे बसून अभ्यास पण करशील. राजला खुप आनंद झाला. पण बहिणी च्या लग्नाचा प्रश्न साहिल व त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या बहिणी च्या सासर कडील लोकांना विनंती केली. लग्न पुढे करू. पण दोन वर्ष म्हणजे....... मग सासर कडील लोकांनी लग्न रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. राज तु तुझे शिक्षण प्रुण कर. सर्वांना खुप आनंद झाला. सगळे मित्र राजला जमेल तेवढी मदत करत असे. साहिल त्याच्या प्रतेक कामात मदत करत असे. तो नेहमी सर्वाना सांगायच स्वता साठी कोणी करत. आपला उपयोग दुसऱ्या साठी पण करावा. माझे मावशी-काका म्हणताता मदत केल्याने आपल्या समाधान मिळते तिच खरी देव पूजा आणि त्या बरोबर आपल्या ला चांगल्या मार्क पडायचे आहे. अभ्यास पहिल्या पेक्षा आदिक करायला हवा .सगळे साहिल शी संमत झाले. आता परीक्षा दोन महिने राहिली होती. शेवटी सगळे जोमाने अभ्यासाला लागले. हा---हा म्हणता परीक्षा चा दिवस आला. सर्वानी एकमेकांना best of लक,,,, खुप शुभेच्छा अस म्हणत आपपल्या वर्गात
गेले. परीक्षा संपली सगळ्याना सुट्या लागल्या प्रत्येकाची घरी जाण्याची तयारी झाली होती. राज मात्र नंतर जाणार होता. साहिल पण खुप आनंदात होता. पहिला मावशी-काका यांची भेट घेऊन मग त्याच्या गावी जाणा र होता. खुप दिवसांनी आई बाबांना भेटणार याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि का नाही, आई वडिल आपल सगळ आयुष्य मुलांना देतात. वाटेल ते कष्ट करतात. स्वतचे कपडे फाटले तरी चालतात पण मुलाला कॉलेजला चांगले कपडे आणतात. मुले खुप शिकावी,मोठी व्हावी. चांगली नोकरी करवी. अस तर त्यांना वाटत. मुलानं साठी च ते जगतात आपल पूर्ण आयुष्य ते मुलानं साठी खर्च करतात. आणि साहिल वर तर चांगले संस्कार झालेले असतात.
साहिल ची मधुकर व सुमन वाट पाहत असतात. एत्क्यत साहिल येतो. मग काय रमाला तर आभाळाच ठेंगणे वाटले . साहिल ने आई वडीलांचा आशीर्वाद घेतला. तोसाहिल येणार म्हणुन सुमाने मस्त जेवणाचा बेत केला होता. बोलता ----बोलता जेवण ही छान झाले. दुसऱ्या दिवशी साहिल मधुकर च्या मदतीसाठी शेतात जातो. दुपारी रमा जेवण गेऊन शेतात येते. सगळे आंबा च्या झाडाखाली जेवण करता साहिल एकटे तिकडे पाहत होता त्याला सईच्या सगळ्या .. जुन्या आठवणी दिसत होत्या ..झाडाला बांधलेले झोका, त्याच झाडाखाली मंडलेला भातुकली चा खेळ, चिचेसठि केलेला हट्ट, मित्रान बरोबर खालेली बोरे, आवळे, कैऱ्या, शेजारच्या झाडावरून काढलेली कैरी सईला खुप आवडायची, भाजलेल्या भुईमूगाच्या शेंगांची तर गोष्टच निराळी त्या तिला खुप आवडायच्या, या सगळ्या गोष्टीत तो इतका रमला कि रमा व मधुकर आलेले समजले नाही .तो आई मुळे भानावर आला. समोर पहिले तर सूर्य मवलतीला लागला होता. समोरच्या डोंगरावर सूर्याने आपल्या सोनेरी किरणांने सोन उधळत होता. ते रम्य वातावरण तो डोळ्यात साठवत होता .साहिल अरे तुझ झाल असल तर चल घरी.साहिल हो म्हणत मनात बालपणीच्या आठवणी घेऊन आई बाबा बरोबर चालू लागला. खरंच बालपण खुप सुंदर असत त्या आठवणी विसरणे शक्य नसते