Duryodhana in Marathi Mythological Stories by Sheetal Jadhav books and stories PDF | दुर्योधन

Featured Books
Categories
Share

दुर्योधन

राजा शंतनू हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवीवर प्रेम होते. गंगादेवीने प्रेमास होकार दिला पण एका अटीवर, की आपण कधीच अपत्यसुख उपभोगायचे नाही. गंगा राजाला सर्व सुख देते पण तिला मूल झाल्यावर मात्र ते ती नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की, "मला अपत्य नको आहे." राजा शंतनु तिला समजावतो तेव्हा ती त्या सातव्या पुत्राला सांभाळते. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्म.
भीष्म दहा वर्षाचे होते तेव्हा गंगादेवीची गंगा नदीत पाय घसरून मृत्यु होतो. राजा खुप दुःखी होतो. तो आपली पत्नी आपल्याला भेटायला येईल या आशेने गंगा नदीवर रोज फेरफटका मारायचा. असे सहा-सात महिने झाले. एके दिवशी नदीकिनारी एक कन्या राजाचा दृष्टीस पडली. पाठमागुन ती त्याना त्याचा पत्नीप्रमाणे भासली. तो लगेच तिच्यापाशी ती गंगादेवी आहे अस समजुन गेला. तर त्याचा लक्षात आल की ती आपली पत्नी नाही आहे. त्यानी तीची क्षमा मागीतली आणि तो निघाला. तितक्यात ती कन्या त्याना म्हणाल, "किती सुंदर अस तुमच रूप आहे! तुम्ही एखादया राजासारखे वाटता." तिच्या या बोलण्याने राजा हसला. खुप दिवसाने राजा असा हसत होता. लगेचच राजाने आपले हसु दाबले व तो निघाला. राजाला अडवत ती कन्या म्हणाली, " मि सत्यवती, मी माझ्या वडींलासोबत इथे अधुनमधुन येत असते. प्रथमच मी तुम्हाला पाहतेय म्हणुन विचारते. तुम्ही कोण आहात?" राजा म्हणाला, "मी राजा शंतनु. पत्नीचा निधनानंतर ती मला पुन्हा या नदीकिनारी भेटायला येइल या अपेक्षेने मी रोज इथे येतो." सत्यवती राजा शंतनुचा प्रेमात पडली हि गोष्ट तिने आपले वडील दशराज यांना सांगीतली.
सत्यवतीचा वडीलानी राजा शंतनुला लग्नासाठी विचारायचे ठरवले. ते नदीकिनारी राजाची वाट पहात बोटीवर बसले. तितक्यात त्याना राजा त्यांचा मुलांसोबत येताना दिसले. दशराज राजाकडे गेले. दशराजाने राजाला आपली ओळख करत देत म्हणाले, "मी दशराज सत्यवतीचे वडील." राजाने त्याना नमस्कार केला. दशराजाने भीष्माना बोट दाखवण्यासाठी बोटीवर नेले.आणि त्याला तिथेच बसवुन ते राजाशी बोलायला आले. सत्यवती तिथेच त्या बोटीवर होती. तिने भीष्माला मासे पकडण्याचा जाळयाने मासे कसे पकडायचे हे दाखवले. राजाला दशराजानी त्यांची मुलगी सत्यवतीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. राजाने तो झिडकारला आणि तडक ते भीष्माला नेण्यासाठी बोटीवर गेले. भीष्मानां मासे पकडण्यात मजा वाटत होती.
भीष्माना असे आंनदी पाहुन आणि सत्यवतीचे सौंदर्य पाहुन राजाने सत्यवतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. त्याना दोन मुले झाली. चित्रागंद विचित्रवीर्य अशी दोन मुलांची नावे ठेवण्यात आली. भीष्म त्या दोघांची खुप काळजी घेत असे. त्यांचे प्रेम पाहुन राणी सत्यवतीला खुप आंनद होत असे. तरीही तिला तीचा मुलंविषयी काळजी ही वाटे. भीष्म या भावंडात मोठे असल्याने तेच राजा बनतील ह्या भीतीने ती अस्वस्थ होत असे. तिने नंतर भिष्माकडून वचन घेतलेकी तु किवा तुझा पुत्र राजा या पदाचा त्याग करतील. भीष्माने ते मानले. आपण कधीच लग्न करणार नाही हि प्रतिज्ञा घेतली. अशातच राजा शंतनूचे निधन होते. मृत्यूनंतर सत्यवती काही काळ हस्तिनापूरचा राजकारभार पाहते. त्यानंतर चित्रांगद राजा बनतो. त्याचा मृत्यु होतो. त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो.
सत्यवती त्याचे लग्न अंबिका व अंबालीका या काशीराजाच्या मुलींसोबत करून देते. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश इथेच संपेल की काय अस सत्यवतीला भीती वाटु लागते. तस होऊ नये यासाठी सत्यवती तिचा पुत्रवधु अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्तीसाठी व्यासांकडे पाठवते.