Julun Yeti Reshimgathi - 2 in Marathi Love Stories by Sheetal Raghav books and stories PDF | जुळून येती रेशीमगाठी - भाग 2

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

जुळून येती रेशीमगाठी - भाग 2

" ए माकडा सावकाश खा ना " नाश्ता कुठे पळुन नाही जात आहे .

" गप ग तू " तू तुझं खा ना आणि माकड कोणाला बोलते ग !"

" तुला " तुझ्या शिवाय कोण आहे इथे .

" मी माकड मग तू भूत "

त्या दोघांचं तूतू म्याम्या चालू होत तेव्हढ्या आवाज आला " स्टॉप थिस नॉन्सेन्सस "

रुद्राक्ष स्टेप वरून खाली येत तो बोलला . डायनींग टेबल जवळ येऊन बसत बोलायला लागला .

"तुम्ही दोघ न भांडता नाश्ता नाही करू शकत का !"

"दादू .... हा बघ ना " मला भूत बोलतोय . ती एकदम चेहरा पडून तक्रार करत होती .

" भुताला भूतच बोलणार ना ." तो तिला दात दाखवत चिडवत बोलला .

" समीर ...." रुद्राक्ष ने त्याच्या कडे नजर टाकली आणि समीर ने मान खाली घालत " ती आधी मला माकड बोलली " म्हणून मी......

" मीरा " से सॉरी . रुद्राक्ष बोलला तसं ती समीरचे गाल ओढत क्युट फेस करत " सॉरी " बोलली . त्याने सुद्धा स्माईल करत तिला ह्ग केलं .


रुद्राक्ष ने दोघांन वर नजर टाकत , काही नाही होऊ शकत अशी मान हलवली .


समीर रुद्राक्षच्या चुलत काकाचा मुलगा . स्टडीसाठी तो इथे आला होता . आता इकडेच रुद्राक्ष बरोबर बिजनेस पाहत होता . आणि मीरा रुद्राक्षची लहान बहीण . घरात सर्वांची लाडकी . रुद्राक्षचा खूप जीव आहे तिच्या वर आणि समीरची पण लाडकी .

रुद्राक्षचा जीव असलातरी व्यक्त करून नाही दाखवायचा . त्याच्या स्वभावातच नव्हतं . त्याउलड समीर मस्तीखोर , बोलका त्यामुळे त्याची आणि मीराची नेहमी मस्ती आणि भांडण चालू असायचं . तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं होत त्या दोघांच .


ब्लॅक कार एका पॉश काचेच्या बिल्डिंग समोर येऊन थांबली. तोच तो कारमधून उतरून चालू लागला . चालताना एक वेगळाच रुबाब.... अंगावर महागडा सूट ... हातात ब्रँडेड वॉच. त्याने एंटर करताच सर्वत्र शांतता पसरली....त्याचा दारारच इतका होता.. राग इतका की समोरच्याला एका नजरेत गार पडेल. जे हवंय.... ते हवंच, मग काही झालं तरी... वर्ल्ड टॉप बिसनेस मध्ये नाव होत त्याच.... बिसनेस मध्ये कोणी त्याचा हात नव्हत पकडू शकत. तो त्याच्या केबिनमध्ये बसून ऑनलाईन मीटिंग अटेंड करत होता .

ओवी आपल्या डेस्क वर काम करत होती . तेवढ्यात तीचा इंटेरकॉम फोन वाजला .

" हॅलो " ओवी फोन रिसिव्ह करत बोलली .

" मिस ओवी " आताच्या आत माझ्या केबिन मध्ये या . तावडे तिकडून बोलले .

"ओके सर " असं बोलून ती केबिन कडे जायला लागली .

" सर " ती दार लॉक करत आत आली .

" मिस ओवी " बस.... . या फाईल आहेत , त्या आपल्या हेड ऑफिस मध्ये घेऊन जायच्या आहेत. या फाईल वर रुद्राक्ष सराची सही घ्यायची आहे आणि हि रिपोर्ट फाईल आहे हि त्याना दयायची आहे . ते दुसरी फाईल तिच्या कडे देत बोलले . आताच निघ तू चारला पोच बरोबर तिथे .त्यांनी चारचा टाइम दिला आहे .रुद्राक्ष सराना लेट केलेलं अजिबात नाही चालत . आणि एक सही खूप इम्पॉरटंट आहे त्यामुळे सही घेऊनच ये .

"ओके सर "

ओवी थोड्या वेळात हेड ऑफिस जवळ आली . ट्राफिकमुळे लेट झाला होता तिला अजून लेट नको म्हणून ती धावत धावतच लिफ्ट जवळ जात होती. लिफ्ट बंद होणार त्याआधी ती " स्टॉप स्टॉप " ओरडत लिफ्टकडे धावली पण धावताना तीचा पायात पाय अडकला त्यामुळे ती सरळ लिफ्टमध्ये खाली पडली .


"आ...आहं .. " ओवी आपला हात चोळत बोलली .


"बाप्पा हे आताच होयच होत का माझ्या बरोबर " ओवी तुला पण आताच पडायचं होत का ! असं स्वतःशीच बोलत ती फाईल उचलायला लागली .


कोणीतरी तिची हि बडबड ऐकत होत. कोण काय आपला हिरो रुद्राक्ष . तो एका क्लाइटला भेटायला गेला होता . एका अर्जंट मीटिंगसाठी तो कॉन्फरन्स रूम कडे जात होता . आता पर्यंत मोबाईल मध्ये खाली घातलेली मान त्याने तिच्याकडे फिरवली . ती काहीशी वैतागत फाईल उचलत होती . आबोली रंगाचा कुर्ता ... वाइट लेंगिन्स..... केसाचा बण ....ङोळ्यावर चष्मा . त्याने काही नाही अशी मान फिरवत पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये घातली .


ओवीला असं वाटत होत कि कोणीतरी तिच्या कडे पाहत आहे . तिने मानवर करून पाहिलं तिची नजर रुद्राक्षवर गेली .


"काय माणूस आहे ? " मदत तर सोड साधं विचारात सुद्धा नाही आहे ." जाऊदे आपल्याला काय करायचं आहे .


लिफ्ट ओपन होताच . ओवी बाहेर येत रिसेप्शन एरिया कडे आली .


"excuse me " ओवी तिथल्या रिसेप्शनिस्टला बोलली.

" yes ma'am "


" hello" ma'am , My name is ओवी & I am come from @@$ branch . can I meet रुद्राक्ष सर .

" ok " ma'am तुम्ही अपॉयमेन्ट घेतली होती का??..

"हो " तुम्ही चेक करू शकतात . @@@ या नावाने असेल .

"एक मिनिट मॅम " तीने पीसी मध्ये काहीतरी चेक केलं आणि कोणाला तरी फोन केला . थोड्या वेळ बोलून तिने फोन ठेवला .

" ma'am तुम्हीला थोड्या वेळ वेट करावा लागेल . सर आता मीटिंगमध्ये आहेत .

" ओके " मी वेट करते . अस बोलत ती बाजूच्या सोप्यावर बसत ती रिसेप्शन एरिया निहारायला लागली .

" excuse me ma'am " अजून किती वेळ लागेल. जवळ जवळ एक तास होत आला होता . ओवी कंटाळली होती बसून .

" ma'am सर अजून मीटिंग मध्ये आहेत . तुम्हाला अजून वेट करावा लागेल ma'am .

हम्म.... ती काहीसा चेहरा पाडत बोलली .


जवळ जवळ दोन ते अडीच तासाची मीटिंग संपवून रुद्राक्ष आपल्या केबिनमध्ये खूर्चीवर डोकं ठेऊन बसला होता . तेव्हड्यात अब्राम केबिन मध्ये लॉक आला .


"बॉस ...."

"तुम्ही सांगितल्या प्रमाणे त्या माणसाचा बंदोवस्त केला आहे आणि त्या कारखानीसचा पण .शेअर्स पूर्ण डाऊन झाले आहेत मार्केट मध्ये. कंपनी पूर्ण लॉसमध्ये आहे . कोणीच उभं करणार नाही त्याला .


" मार्केट मध्ये नाव नाही राहील पाहिजे त्याच.. टॉपचा बिझनेस मॅन म्हटल्यावर दुश्मन सुद्धा असणारच ना ! त्यातला हा एक .

"येस बॉस .. तसेच होईल ." कॅन आय लिव्ह ........बॉस

"ह्म्म्म.... वेट दुसऱ्या क्षणाला तो बोलला .

"रिसेप्शन जवळ काय चालू आहे ते चेक कर ." तो अब्रामची बोलताना केमेरा चेक करत होता . त्याला रिसेप्शन जवळ काही तरी गोधळ चालू आहे असं वाटल.


इकडे ओवी जाम वैतागली होती ." ma'am अजून किती वेळ लागेल . आता दोन तास होऊन गेले आहेत ..

आय नो but ..." ma'am " मी काहीच नाही करू शकत . सर फ्री नाही होत तो पर्यंत ....


मॅडम तुम्ही असं कसं बोलू शकतात ...ss . एक तर मी अपॉयमेन्ट घेतली अजून दोन तासापासून वेट करत थांबली आहे. त्यात तुम्ही असं बोलताय.

ma'am तुम्ही एकदा सराना सांगा ना . फक्त पाच मिनिटाच काम आहे .मला सही घेऊन पुन्हा ऑफिसला जायच आहे . ऑलरेडी ऑफिस टाइम संपत आला आहे . प्लिज.....

तेवढ्या रेसिप्सशनवरचा फोन वाचला . "हॅलो" सर एक्चुली ते असं बोलत .... तिने सर्व सांगितलं .

तिकडून काहीतरी बोलणं झालं .... ओके सर ..


"ma'am तुम्ही सरांना भेटायल जाऊ शकतात . " थिर्ड फ्लॉ राइड साइड ला केबिन आहे .

"ओके थॅक्स "

"ओवी केबिन जवळ येते आणि लॉक करते पण आतून काहीच रिस्पॉन्स नाही येत . ती पुन्हा लॉक करते आताही काहीच रिस्पॉन्स नसतो . दार ओपन करून आत जाते तर तिला कोणीच नाही दिसत . ती तशीच उभी राहून केबिन पाहत असते.

' व्वाव ' काय भारी केबिन आहे . ती केबिन पाहत बोलली.

"केबिन पाहून झाली असेल तर कामाचं बोलायचं का मिस ......

अचानक आवाजाने ती दचकते . मागे फिरते तर तिचा हात चुकून पाण्याच्या ग्लासला लागतो . झालं कल्याण असं बोलतच ती एकदा ग्लास कडे नंतर हळूच मान वर करून रुद्राक्ष कडे पाहते . त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते .


" सॉरी ... सॉरी... माझा चुकून हात लागला , खरंच मला नव्हतं पडायचं..... मी ...मी उचलते . असं बोलत ती ग्लास उचलायला खाली वाकली .


" स्टॉपिट "तुझ काय काम आहे ते बोलशील ???? तो कपाळावर दोन बोटे रप करत बोलला .

ह्ह.. हो...... हि रिपोर्ट फाईल आहे ती रुद्राक्ष सरांना दयायची आहे आणि यावर त्याची सही पाहिजे आहे. सर कुठे आहेत तुम्ही सांगाल का???

" मग मी कोण आहे? "

"मला काय माहित तुम्ही कोण आहात ते . ओवी पटकन नकळत बोलून गेली .

" माझ्या केबिन मध्ये येऊन मलाच विचारत आहेस तू रुद्राक्ष सर कुठे आहेत ते. त्याने तिच्यावर नजर रोखत विचारलं .

तसे तिचे डोळे मोठे झाले .मान खाली घालत ती" सॉरी "बोलत तिने त्याच्याकडे फाईल दिली .

फाईल चेक करून त्यावर सही करून तिच्या कडे दिली .


"थॅक्यू सर" असं बोलत ती दार कडे वळली .


मिस .......व्हटेवर . नेक्स्ट टाईमला काही काम असेल तर दुसऱ्या कोणाला तरी पाटवायला सांगा तुमच्या सराना .नेक्स्ट टाइमला ग्लास फुटलेल नको आहे मला .

"ओके सर " ती मागे न पाहताच बोलली आणि केबिनच्या बाहेर निघाली .


"काय तर म्हणे नेक्स्ट टाईमला ग्लास फुटलेल नको आहे मला" जस काय मला यायचंच आहे . ओवी स्वतःशीच चालता चालता बोलत होती . उशीर तर झाला होता ऑफिस मध्ये फाईल देऊन कॅफेत जायला . कधी वेळ गेला कळलंच नाही रात्र खूप झाली होती तिने अंग टाकून डोळे मिटले . तशी तिला झोप लागली.

पाच सहा दिवस असेच गेले .ओवीसुद्धा आपल्या कामात व्यस्त होती . आज ती ऑफिसमध्ये आली तर ऑफिसच वातावरण काही वेगळाच होत . तिने मनवाला विचारलं आज ऑफिस मध्ये काही आहे का ???


"अग तुला नाही माहित काय आज ऑफिस मध्ये कोण येणार आहे ते ???

"कोण येणार आहे ??

"अग कंपनीचे CEO येणार आहेत . तुला माहित आहे काय हॅंडसम दिसतो यार.... "


"ओ ..ओ मॅडम स्वप्ननातून बाहेर या . काय ग तुझा बॉयफ्रेड आहे ना तरी तू......"

" मग काय झालं , तू पाहशील ना तर तुला कळेल .

मला काहीच एंटररेस नाही आहे तुझ्या त्या ceo ला पाहायला .

"कसली बोर आहेस ग तू ."

मी अशीच आहे . ओवी मनवाला दात दाखवत बोलली .


" ओवी मॅडम तुम्हा सरानी बोलवलं आहे , असं पिऊन बोलून गेला .

"सर तुम्ही बोलवलं होत का ."

"हो " तुला सांगितलेलं प्रेझेनटेंशन रेडी आहे ना सर येतील आता थोड्या वेळात . त्यांच्या समोर कोणताच प्रॉब्लम नको .

" हो सर " सर्व रेडी आहे .

"गुड " सर्वाना कॉन्फरन्स रूममध्ये जमायला सांग .

"ओके सर "

सर्व जण कॉन्फरन्स रूम मध्ये जमले होते . सर्वांची कुजबुज चालू होती. तेवढ्यात कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली . सर्वानी दारकडे पाहिलं . ओवीने जस दार कडे पाहिलं तस ती शॉकच झाली .

" हॅलो " एव्हरीवन, I am रुद्राक्ष सरनाईक .

" हॅलो सर " सर्व बोलले .

पिल्झ,, सीटडॉउन

प्रेझेनटेंशन स्टार्ट करायचं का ? मिस्टर तावडे .

हो .. सर .

" मिस ओवी.... प्रेझेनटेंशन स्टार्ट करा . तावडे ओवी कडे पाहत बोलले .

तस ओवीने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेत प्रेझेनटेंशन दयायला उभी राहिली. प्रेझेनटेंशन छान झालं .सर्वानी कौतुक केल तीच .

मिस ओवी ... कॉग्रेस . रुद्राक्ष तिच्या समोर हात पुढे करत बोलला

"थँक्स सर " ती त्याच्या हातात हात देत बोलली . का कोणाच ठाऊक तिला अंगातून गोड शहारा गेला असं वाटल . तिने लगेज हात कडून घेतला .

so.... फायनल रिझट तुम्हाला लवकरच भेटेल.


"सर हि फायनल लिस्ट आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या . अब्राम लिस्ट देत बोलला .

"ओके " you can go

"ok" बॉस.

रुद्राक्ष ने लिस्ट हातात घेऊन पाहायला लागला . त्याची नजर एका नावावर खिळली "ओवी माने ." त्याला ती प्रेझेनटेंशन देताना आठवली . बोलतात फुल कॉन्फिडन्स... नजरेत एक वेगळीच चमक .. मेकअप नसताना सुद्धा चेहऱ्यावर तेज .


"मी पहिल्याच नजरेत माणसाला ओळखू शकतो पण हिला का नाही ओळखू शकत मी .... प्रत्येक वेळी वेगळी भासते ...

कशी आहे ही ...... तो मनातच बोलत त्याने डोळे मिटले .

त्याला ती दिसली हसताना .....

*********

Hello everyone ,

मी पाहिल्यादाच काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल . काही चुक झाली तर मनापासून सॉरी .