Julun Yeti Reshmgathi in Marathi Love Stories by Sheetal Raghav books and stories PDF | जुळून येती रेशीमगाठी

Featured Books
  • सर्द हवाएं

    लेख-सर्द हवाएं*******""       यूं तो सर्दियों के मौसम में जब...

  • इश्क दा मारा - 45

    यूवी गीतिका का हाथ पकड़ कर ले जा रहा होता है तभी गीतिका बोलत...

  • लल्लन जी की अद्भुत नौकरी

    गाँव के एक छोटे से कस्बे में रहते थे लल्लन जी। उनका नाम ही उ...

  • चुप्पी - भाग - 2

    क्रांति की हॉकी खेलने की चाह को महसूस करके और उसकी ज़िद को हद...

  • छिनार

    बसंत बाबू, ये ही बोलते थे लोग, 23 साल का खूबसूरत युवक, 6 फिट...

Categories
Share

जुळून येती रेशीमगाठी

अंग कुठे आहेस तू ? पाच मिनिटात नाही आलीस ना तर तुला सोडून जाईल मी . मग तू ये एकटी . (फोन उचल्या उचल्या ती बोलायला लागली.)

"आली आली ", हि बग आणि फोन कट झाला . तीने एकदा फोन कडे पाहिलं आणि उसास सोडला . जस काय नेहमीचच आहे.

तर हि आपल्या कथेची नाईका ओवी . जराशी सावळी , काळे लांबसडक कंबरेपर्यंत केस . फरफेट फिगर . मनाने शांत तितकीच समजूतर . नदी सारखी निर्मळ आणि शांत दिसणारी कोणाला कळणार नाही तिच्या आत रुद्र रूप पण आहे .

किती उशीर ..... ओवी बोलली , तशी ती बोलली सॉरी मेरी जान . तर हि सावी, ओवी ची फक्त बेस्टी नाही तर सर्व काही होती. एकमेकींन वर खूप जीव आहे दोघींचं . सर्व शेअर करत असत दोघि . सावी जे आहे ते बोलून मोकळी होणारी. बिनदास्त , बडबडी ,तितकीच समजूतदार .

जशी बस आली तश्या त्या दोघी बस मध्ये चढल्या .ऑफिस वेगवेगळं असल तरी जवळच होत म्हणून सोबतच ऑफिसला जात असत .

हूश... .. आलं बाबा एकदाच स्टॉप . बस मधून उतरल्या बरोबर ओवी बोलली . नायतर काय या बस च्या गर्दी पेक्षा तो मच्झी मार्केट परवडला , चल बाय ऑफिस सूडल्यावर भेटू .

हो , चल बाय .ओवीसुद्धा सावीला बाय करत ऑफिस कडे वळली .

ऑफिस मध्ये येऊन ती आपल्या डेस्क जवळ बसली , एक दिर्घ श्वास घेतला आणि आपलं काम करायला लागली . ऑफिस मध्ये जास्त कोणाशी बोलत नव्हती ती . बाकी सुद्धा कोणी जास्त जवळ येत नव्हतं तिच्या कारणच तसं होत बाकी ऑफिस मधल्या मुली हाय मेकअप आणि स्टयलिश आणि हि मेकअप काय हे पण नाही माहित असलेली , केस नेहमी वेणी नाही तर झुडा असायचा . डोळ्यावर चष्मा .तिला काही त्याचं वाटायचं नाही , आपलं काम बर आणि आपण बर .

ओवी मॅडम ... तुम्हला सरानी बोलावलं आहे . पिऊन बोलला

"ओके " अस बोलून तिने पिऊन कडे पाहिलं नंतर मान दुसऱ्या बाजूला वळवली .

"जा, जा" लवकर तुझ्या लाडक्या सरानी बोलवलं आहे , अस बोलून ती हसायला लागली .

"मनवा " ओवी तीला बारीख डोळे करून तिला पाहत होती .

मला नंतर पाहत बस हवंतर आधी त्या टकल्याला बघ नाहीतर इथे यायचा तुझ्या नावाने ओरडत . मानवाच डेस्क तिच्याच बाजूला होता. ऑफिस मध्ये त्या दोघींनच चागलं जमायचं . मानवा मनाने खूप साधी होती .

तुला नंतर बघून घेईल , आलीच मी .असं बोलून ओवी बॉसच्या केबिन कडे निघाली .

"May I Comeing Sir " , दार लॉक करत तिने विचारल .

"Yes " .. Cameing .

"मिस ओवी " तावडे ने तिच्या कडे पाहिलं , आणि एक फाईल तिच्या कडे देत बोलायला लागले .

हि फाईल चेक कर , जिथे मार्क आहे तिथे कॅरेक्शन कर आणि आजच झालं पाहिजे . जाऊ शकतेच तू आता .

"ओके" सर .. बोलून केबिनच्या बाहेर निघाली .

ओवी बस कर आता उद्या कर उरलेलं , ऑफिस टाईम संपला . सर्व गेले चल आता . मनवा तिला बोलत होती .

अग हो की , "काम करता करता वेळ केव्हा गेली कळलंच नाही ग ", तू हो पुढे मी हि फाईल सरांना देऊन मग निघते .

बर , लवकर निघ , चल बाय .

ओवीने सरांना फाईल दिली . ती ऑफिस च्या बाहेर निघाली .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"मावशी " ती कॉफेत आली आणि तिच्या मावशी ला आवाज देत मागून येऊन मिठी मारली .

"आली का ग माझी बाय " मावशी सुद्धा तिला समोर घेत बोलल्या .

हो . ति हसतं बोलली . मावशी मी आली फ्रेश होऊन , तू जा घरी मी थांबते कॉफेत .

अंग कशाला तू थांबते , आताच आलीस ना ऑफिस मधून घरी जायचं तर इथे आलीस . किती करतेस काम थकायला होत ना ग तुला पण ,

मावशी तुपन दिवसबर काम करतेस ना ग ,मग तू सुद्धा थकत असशील ना. अन माझ काय मी ऑफिस मध्ये मस्त बसून काम करते कुठे थकायला होत मला. जा आता तू मी येते कॉफे बंद करून.

तू कधी ऐकतेस का माझं . बर मी निघते तू लवकर ये . असं बोलत मावशी घरी जायला निघाली .

(ओवी तिच्या मावशीकडे राहत होती . सकाळी क्लासेस घेत होती नंतर जॉब संध्याकाळी ती कॉफेत येत होती . कॉफे तिच्या मावशीचाच होता . मावशीला वयामुळे एकटीला नाही जमत एवढी थावपळ म्हणून ओवी जॉब वरून कॉफेत यायची . कॉफे पण तस घराजवळच होता.)

कॉफेत सर्व आवरून ती छोटू ला बोलली , छोटू मी निघते तू पण कॉफे बंद कर .

हो , दीदी . तू तिघ मी वेवस्तीत कॉफे बंद करतो. मग निघतो .

=============

ओवी घरी आली आणि दारातच उभी राहून समोर पाहत होती . एक तरुण मुलगा रागात चिडून बसला होता आणि त्याची आजी त्याला समजावत होती.

"ए राजा असं काय करतो थोडं खा ना " आजी एखादया लहान मुलाला समजावतात तश्या समजावत होत्या .

मी संगीतल ना मला नाही खायचं आहे , तो तरुण मुलगा म्हणाला .

"विन्या " ओवी ने जशी हाक मारली . तसं त्याने दाराकडे पाहिलं .

"ओवु " त्याने हाक मारत ओवी कडे आला त्याने तिला मिठी मारली . तिने सुद्धा त्याला मिठी मारली . त्याला आपल्या पासून वेगळं करत. त्याला सोप्यावर बसवलं.

बॅगेतून बॉक्स काढत तीने त्याच्या समोर धरला ," चॉकलेट केक कोणालातरी खूप आवडतो ना,हो ना .

मला ...मला .... आवडतो , मला दे ना.

"देईल पण जेवण करून औषध घेतलं तर . आणि आजी ला त्रास नाही दिला तरच मिळेल ."

'मी नाही त्रास देणार आजीला" आणि जेवण पण करेन ."

"अरे हे बरं आहे , मी एवढ्या वेळ सांगत होती ते नाही ऐकल , तीच बरोबर ऐकलं " आजी बोलल्या .

तसं दोघही हसायला लागले . विन्या चल जेवून हे , तिने चमचा त्याच्या तोंडाजवळ घेत बोलली . त्याने हि खायला सुरुवात केली .

ओवि त्याला लहान मुलाला गोष्टी सांगतात तस सांगत भरवत होती .

"गीता" हा आई , ( ओवीची मावशी )

अशी काय उभी राहून पाहत आहेस ?,

आई , रक्ताची नातं सुद्धा कोणी इतकं निभावत नाही.....तितकं हि एका धाग्याने जोडलेल्या नातं निभावते . "माझ्या ओवीसारखं

निस्वार्थी मानाचं कोण असेल का ग आई ? " त्या ओवीकडे पाहत बोलल्या .

=====

एका खोलीत एक काळा सूट घातलेला माणूस कोणालातरी मरेपर्यंत मारत होता . तेवढ्यात कोणाच्या तरी पाऊलाच आवाज ऐकू आला . तो पाऊलाचा आवाज ऐकूनच त्याच्या चेहऱ्या वरचे भाव बदलले .आत्तापर्यत समोरच्या माणसाला मारत असताना असलेल्या रागाच्या जागी आता त्याच्या साठी दया ने घेतली होती .

"stop this" अब्राम , तस त्याने त्या वक्ती कडे पाहिलं ,

सोड त्याला ', त्याने शांत आवाजात ऑर्डरच दिली ,

but, boss ...

त्याने फक्त एक लूक दिला . अब्राम ने आपली मन खाली घातली .

मारखाणारा माणूस त्याच्या कडेच पाहत होता . उंच गोरापान .... फिट बॉडी ... एखादया हिरो सारखा .मुली तर जीव ओवाळून टाकत होत्या पण त्याच्या जवळ जायच कोण एवढ धाडस करणार . त्त्याचा राग . रुद्राक्ष सरनाईक .

"मी काही नाही केलं आहे ", मला सोडा ,मला जाऊद्या . तो रुद्राक्षच्या समोर हात जोडून बोलत होता .

"अब्राम " याला अशा ठिकाणी सोड कि याची हाड सुद्धा नाही अली पाहिजे रिटर्न .

मला जाऊद्या ,हात जोडून आपल्या प्राणाची भीक मागत होता तो, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते . जणू हार्डलेस .