Reshmi Nate - 33 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 33

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

रेशमी नाते - 33




आई मी जाऊ ना तुमची इच्छा .... पिहू बोलतच होती की सुमन अडवत बोलतात...पिहू आम्हाला कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही.....विराट ने डिसीजन घेतला आहे तो बरोबरच असणार आहे....पन तुझी इच्छा असेल तर कर विराट ने विचारल नसेल तुला म्हणून विचारते...पिहू ब्लँक होत बघते.....

अशी बघू नको मला माहीत आहे विराट कसा आहे...सुमन हसत बोलतात.....तुला ऑफिस मधे काम करायच आहे ना सुमन तिच्या हनुवटी ला धरून विचारतात....

पिहू मानेनेच हो म्हणते....आई मी या आधी कधीच स्वतः तिचे डिसीजन घेतले नाही....आणि अस बाहेर जाऊन काम करायचा विचार अजून पर्यंत केला नाही....म्हणून ह्यांनी विचारले नसेल....पण मला आवडले माझ्या पेक्षा हे माझा विचार करत आहेत ..मला ही त्यांना थोडी हेल्प करायची आहे.....

तुला जे योग्य वाटेल ते कर.....हा...पन काही चुका झाल्या की त्याचा राग पन सहन करावा लागेल...सुमन हसत बोलतात...

आई, तुम्ही मला घाबरवत आहात...पिहू गाल फुगवून बोलते.

.
.

पिहू रूम मध्ये आली.....दोन दिवस विराट ने केलेले लाड आठवून तिच्या चेहरा गुलाबी झाला....तिने वार्डरोब उघडून त्याने आणलेले सगळे ड्रेस एक एक करून बघू लागली.....
त्यातला एक ड्रेस घालून मिरर समोर उभी राहिली....स्वतः ला बघू लागली....विराटचे शब्द डोक्यात घुमत होते....पन मन अजुन धडधड करत होते.....तिने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला आणि डोळे उघडले आणि मिरर मध्ये बघू लागली...तीच प्रतिबिंब तिला बघून हसत होते.......
पिहू तुझ्या सारखी लाइफ दुसर्यांना हवी होती....त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला असता....त्यांच्या स्वप्नांची त्यांनी उंच भरारी घेतली असते.....पन पंख कापणारे भरपूर जण असतात.....म्हणून आज ते फक्त डोळे बंद करून स्वप्नच बघत राहतात.....आणि तुला..स्वतः तुझा लाइफ पार्टनर तुझ्या मागे आहे अजून काय हवे...घे तुझी उंच भरारी.....मोका एकदाच मिळतो.....त्याच सोन करायच तुझ्या हातात आहे......तू करू शकते पिहू ......नाही हा शब्द स्वतः च्या लाइफ मधून काढून टाक. पिहूच्या ओठांवर स्माइल येते .....तीच हृदय जे धडधड करत होते ते आता नॉर्मल होत असल्याचे तिला जाणवत होते.....तिने तिच आवरले......व्हाइट फॉर्मल शर्ट क्रीम कलर ची ट्राऊझर त्यावर क्रीम कलर चा ब्लेझर घातला....केसांची हाय पोनी, हलका मेकअप एका हातात वॉच आणि एका हातात विराट ने दिलेले ब्रेसलेट .ती हसत मिरर मध्ये बघत हाताने स्वतः ला परफेक्ट 👌म्हणून लाजून हसते.....तिने स्वतःचे फोटो,सेल्फी काढले आणि विराट ला सेंड केले....विराट ने बघितले नाही म्हणून तिने लगेच गाल फुगवले....

नमन ने बाहेरून आवाज देत डोर नॉक करतो.
वहिनी...वहिनी....दादा नसला तरी आपल्याला सुट नाहीये...सगळे रेकॉर्ड जातात त्याच्या कडे लेट झाला ना...तू ही त्या लिस्ट मध्ये आहे...पिहू ने दार उघडले..नमन चा आवाज च बंद झाला तो शॉक लागल्या सारखं पिहू ला वरुन खालून बघतो वहिनी,तूच आहे ना........

पिहू ब्लँक होत बघते....नमन चांगल वाटत आहे ना...

अग वहिनी चांगल काय म्हणतेस ....यू लुकिंग ब्यूटीफुल umhhmmm 😘😘 तो फ्लँक किस देत बोलतो...

पिहू हसुन त्याचे गाल ओढते...चला mr. नमन लेट होतोय...

ह्म्म चल तो हात कोपऱ्यातून फोल्ड करतो...पिहू त्याचा हात हातात अडकवते ...

सुमन रोहिणी अवाक होत पिहूला बघत एकमेकींकडे बघतात....

पिहू नजर खाली घेत पाऊल हळू हळू घेत चालते....पहिल्यांदा ती अशी घरा बाहेर जात होती....कपाळाला टिकली नाही हातात बांगड्या , कडे ,कंगन काहीच नव्हते....गळ्यात नाजूक मंगळसुत्र होत त्यात ही नावाला मोजून चारच काळ्या मणी होत्या...पायात नाजूक प्लेन बारीक रिंग सारखी जोडवी होती........सुमन गालात हसत जवळ येतात....
पिहू सुमन च्या पाया पडते....सुमन तिच्या पाठीवरून हात फिरवतात....पिहू रोहिणी च्या पाया पडते...नमन समोर असल्याने त्या हसून तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला उभ करतात.

नमन काळजी घे...विराट नाहिये. आणि स्वतः ही जबाबदारी ने काम कर.....रोहिणी रुक्ष आवाजातच बोलतात...याचा नमन वर काहीच परिणाम होत नसतो. वहिनी मी बाहेर आहे. नमन तडक निघून जातो.

तुला काही काम करायची गरज़ नाहिये....पन जा तेवढच टाइम पास होईल....

पिहू सुमन कडे बघते सुमन डोळ्याने लक्ष नको देऊ म्हणत जा म्हणते.... पिहू ही लक्ष न देता बाहेर येते.

नमन,ड्राइवर घेऊन जाऊ ना.....नमन बरोबर ती कधी बसलीच नव्हती...त्याची ड्राइविंग खूप फास्ट होती..म्हणून पिहूला त्याच्या बरोबर जायची भीती वाटत होती.

रिलॅक्स वहिनी ,स्लो घेतो तो हसत आतून दार उघडतो....

पिहू गाडीत जाऊन बसते........ वॉव छान आहे .गाडी पूर्ण निहाळत त्याला स्माइल करते....ती विराट च्या गाडीत बसत होती... कॉलेज पण विराटचीच कार होती....म्हणून कोणाच्या गाडीत बसायचा संबध आलाच नव्हता.

पुर्ण रस्त्यात नमन ची बडबड चालू च होती. तिचा आज फस्ट
डे होता. सगळ्यांनी तिच वेलकम केल. थोड तिला ऑकवर्ड फील होत होते . विराट जरी नसला तरी मानव ,नमन , रिषभ चा खुप छान आधार होता. नंतर पिहू ऑफिस मधल्या मंदिरात दिवा अगरबत्ती करून हार घालते.
मानव पिहूला नमन च्या केबिन मधे घेऊन जातो. पिहू नमन बरोबर काम करणार आहे मग त्याच्याच केबिन मधे तुला काम करावे लागेल. विराट आल्यावर आपण बघू. मी त्याची केबिन दिवस भर तो नसताना ओपन ठेवू शकत नाही.

तस काही नाही दादा मी कुठे ही एडजस्ट करेल. नमन ला प्रॉब्लेम नाही ना.

वहिनी तुझी केबिन होई पर्यंत तुला ईथेच काम करावे लागेल.

नमन कोकण च्या रिसॉर्टचे फाईल तिला दे....पिहू पाहिले सगळ रीड करून घे. काही कळल नाही तर मी आहे माझ्या केबिन मधे तो तिला कामा बदल सांगत होता.

मानव वहिनी आत्ताच आली. थोड ऑफिस फिरू दे. लगेच तू चालू झाला .

मानव शांत होतो. ठीक ये पिहू तू ऑफिस बघ....थोड्या वेळा ने मीटिंग आहे. ती अटेंड कर नमन सगळ्यांशी ओळख करून देईल. नमन काम करायचे मस्ती नाही मानव त्याच्या कडे सिरियस होत बोलतो.

मानव आज काल खुप सिरियस झाला. जा जरा तुझ्या बेबी ला फिरवून आण. नमन रिषभ ला टाळी देत चिडवत बोलतो.

पिहू हसू कंट्रोल करत दुसरीकडे बघते. तुम्हा दोघांच काही होणार नाहीये तो बोलून चिडून निघून जातो.

नमन रिषभ पिहू ला ऑफिस दाखवतात. तीला ही आता घरच्या सारख फील येऊ लागल. सगळेजण बोलताना शांत भाषेत बोलत होते. त्यात विराट नसताना ही मानव त्याच्या सारख ऑफिस सांभाळत होता त्याच तिला कुतूहल वाटत होते. त्याच ही विराट सारख बारीक लक्ष होते. नमन रिषभ ला ही तो ओरडून बोलत होता. पण दोघेही त्याला विराट सारखाच रिस्पेक्ट देत होते.

आजचा दिवस सगळा पिहू चा काम शिकण्यातच गेला. विराट ने साधा पोहोचल्याचा मेसेज सुद्धा केला नव्हता. नमनाला काम होते म्हणून पिहू रिषभ बरोबर घरी आली. आज पिहू ला थकल्या सारख झाल होते. कॉलेज मधे थोडा टाइम पास तर होयचा पण इथे पेपर रीड करून करून च बोर झाले होते. आठ दिवस तर तेच करायचे होते. 😂😂
खालच् सगळ आवरून ती लवकरच रूम मधे आली .विराट ला कॉल केला पण त्याने रिसीव केला नाही म्हणून मेसेज केला त्याने अजून सकाळचे फोटो पण बघितले नव्हते . ती त्याच्या dp वरुन हात फिरवून स्वतःशीच हसली. तिने च चेंज केला होता. बाली चा दोघांचा लावला होता. त्याच्या कधी लक्षात पन नसते. Dp वैगेरे चेंज करायच. पिहूच ते काम करायची. तिने परत त्याला विडिओ कॉल लावला. दोन तीन रिंग मधे त्याने फोन उचलला.

पिहू किती घाई फ्रेश सुद्धा होऊ देत नाही. तो चिडून फोन समोर ठेवून केस पुसत मिरर मध्ये बघतो.

तुम्ही सांगितल नाही कधी पोहोचला. ती रुसून बोलते.

विराट टॉवेल ठेवत मोबाइल हातात घेतो. मी मानव ला मेसेज केला होता ना. .

मला का नाही केला. 😵

नेक्स्ट टाईम तुला करेल. तो हसत मोबाइल ओठांना लावत किस करतो. 😚

तुम्ही मी पाठवलेले फोटोज पण बघितले नाही. 😏

वन मिनिट सकाळपासून इथे आल्यापासून बिझी आहे बेबी तो चेक करत बोलतो..

,😍😍 you are a ....

बस. बस कळले ती लगेच त्याला थांबवत लाजून बोलते.

थँक गॉड, सकाळी बघितले नाही तो छातीवर हात ठेवत बोलतो.

🙈 आ....अहो.

तू मला अस छळायचं विचार केला का ...🤨

ती हसू दाबत मान वर खाली करत बोलते. 😉

अम्म , आता तुझी टर्न आहे. एन्जॉय कर नेक्स्ट माझी टर्न आली तेव्हा मी सांगेन तो तिच्या डोळ्यात आरपार बघत खट्याळ हसत बोलतो. पिहू लाजून चेहरा फिरवून हसते.

कसा गेला फर्स्ट डे,

खूप छान पण, तिचा चेहरा उतरतो

तो नजरेनेच काय बोलत त्याचा लॅपटॉप ओपन करतो.

तुम्ही नाही ना,

मी नसलो तरी सगळ लक्ष असते . रिलॅक्स होत काम कर, काम म्हणून करु नकोस. काही तरी नवीन शिकायला मिळते हाच,विचार कर. डोक्याला जास्त ताण देऊ नकोस.

ह्म्म,😒

काय झाल, त्याने तिचा चेहरा बघत विचारल

तुम्ही ऑफिस च बोलत बसणार आहे का समोर लॅपटॉप ठेवून काय करत बसला, ती चिडून बोलते 😖😖

😄😄 अग ते मी

माझ्या कडे बघा , ती बेडवर आडवी होत बोलते.

तो मोबाईल जवळ घेतो .बोल शोना 😘😘

झोप आली.ती डोळे झाकून गालात गोड हसत बोलते.

तिची रिएक्शन बघून विराट हसतो. म्हणून इतके कॉल चालू होते का....किस करत बोलतो.

ह..ह... मग तुम्हाला बघितल्या शिवाय मला झोपायच नव्हत...तिने मोबाइल समोर ठेवला आणि ब्लँकेट ओढली .थोड्या वेळात तिला झोप लागली
.
.
.

.
दिवसा मागून दिवस जात होते. पिहू ही आता ऑफिस मध्ये रुळू लागली. तिची केबिन तयार झाली होती. पण विराट ने आतच नको म्हणून सांगितले होते. म्हणून मानव त्यावर काहीच बोलला नाही.

पिहू तिच काम करत असताना लक्ष काचेच्या बाहेर गेल सोनिया आणि मानव न बघून निघून गेले. पिहू विचारात पडली.आल्या पासून दोघ नीट बोलत च नाही.कामा पुरते बोलताना दिसतात. 🤔 नमन तिच्या समोर ची फाईल घेत बघत असतो...वहिनी,....तू हे तो तिच्या कडे बघतो पिहू कुठे बघते .सोनिया बाहेर तीच काम करत होती.

वहिनी,

ह ....हा बोल पिहू दचकून बघते.

काय कुठला विचार करते.

काही नाही असच...पिहू फाइल घेत त्याला विचारते. नमन सोनिया आणि मानव दादा असेच राहतात का ऑफिस मध्ये म्हणजे फक्त ऑफिस

वहिनी, ते आता असे म्हणजे कधी कधी बिहेव करतात अस .सगळ्या ऑफिस मध्ये माहीत आहे त्यांच रिलेशन....आता काही तरी बिनसल असेल.I don't no नमन नॉर्मली बोलत लॅपटॉप कडे बघतो.

ह्म्म, पिहू सोनिया कडे नजर फिरवून बघते.

वहिनी, दोघ हॅन्डल करतील. जास्त दिवस नाही चालत त्यांच धर हे नमन फ़ाइल देत बोलतो. अस बोलत बसलो ना दादा कॉल करेल. तिकडे बघ नमन cctv कडे बघत हसत बोलतो.

पिहू एक नजर बघून स्माइल करते.

संध्याकाळ झाली तरी पिहू बसली होती. सोनिया आत येत सगळ्या फाइल नीट चेक करत पिहू कडे बघून स्माइल करते.
मॅम,आज लेट झाला तुम्हाला,

लेट नाही, मीच बसले होते. घरी कोणी नाहिये सगळे बाहेर गेलेत मग लवकर जाऊन काय करू.

ओके मॅम मी निघते.

तू निघाली. आय मीन सॉरी...तस ना...नाही..पिहू गोंधळते सोनिया हसते.

पिहू चल अजून किती वेळ बसणार मानव आत येत बोलतो सोनियाला बघून शांत होतो. सोनिया ही नजर फिरवून दुसरीकडे बघते.

हा निघणारच होते. पिहू तीच सामान ठेवत बोलते.

राहु द्या मॅम मी करते. सोनिया तिच्या समोरच्या फ़ाइल घेत बोलते.

पिहू चल मी ड्रॉप करतो. ये बाहेर तो एक नजर सोनिया कडे बघत बाहेर येतो.

चल सोनिया आमच्या बरोबर तुला ..

थँक्स मॅम , मी जाईन कॅब बूक केली.....बाय अस म्हणून सोनिया बाहेर जाते. पिहू ही तिच्या मागे येते. तो पर्यंत सोनिया टॅक्सीत बसुन निघून जाते.

मानव हॉर्न वाजवतो,पिहू गाडीत येऊन बसते. दादा सोनियाला का चल बोलला नाही. तिला वाईट वाटले असेल तू मला बोलला.

पिहू , ती बोलू शकली असते ना सोड म्हणून मी सोडले नसते का.तिला यायच नव्हते म्हणून नाही आली सोड तिचा विषय मानव गाडी स्टार्ट करत बोलतो.

पिहू पन शांत बसते. दादा,

हम,

तुमच्या दोघां मधे जे काही असेल लाव कर सॉर्टआउट कर.

हम, बघू तो पुढे बघतच बोलतो. पिहू पण शांत बसते.

मानव तिला ड्रॉप करून निघून जातो. पिहू रूम मध्ये येऊन फ्रेश होते. घरात कोणी नव्ह्ते. सगळे उशिरा येणार होते. पिहू पण थोड फार जेवण करून रूम येऊन विराट ला कॉल लाव ते.

अहो,

बोर होतेय हेच बोलणार विराट हलक हसत बोलतो.

पिहू बारीक डोळे करत रागाने बघते.

तू का गेली नाही...सगळया बरोबर

मला अस अनोळखी ठिकाणी जाऊ वाटत नाही.

बाहेर फिरल्याने ओळख होते.

मला नाही आवडत अणि माहीत आहे ते काय बोलत असतात. ही साडी कुठल्या डिजाइनरची,ही पर्स कुठल्या ब्रैंडची... हे काय बोलण झाल .

पिहू ,... विराट हसत बोलतो. .

अहो खरच,इतक्या पार्टीज मध्ये गेले तिथे सगळे असच बोलतात. फक्त शो ऑफ, नाही तर कोणा बद्दल गॉसिप करत असतात. मला बोर होत.

पिहू नंतर कॉल करतो. मानवचा कॉल येतोय....

दादा चा, अहो...ऐका ना

हम

तुम्ही विचारा ना दादाला काय झाल. तो सोनिया शी बोलत नाहिये. आज बिचारी कॅब ने गेली कस वाटते मी दादा बरोबर आणि ती..

वेट वेट, मी का विचारू.आय मीन माझ काय घेण देन ...तो ओरडूनच बोलतो.

अहो, अस कस बोलू शकता तुम्ही विचारा .मला नीट बोलता येत नाही काही सुचतच नाही काय बोलू ....विचारा...पिहू चिडून बोलते.

ओके बघू .आता हेच काम राहिल होत. तो रागाने फोन कट करतो.

खरच किती सेल्फिश आहे एक शब्द विचारलं तर काय होणार आहे. जस काय करोड़ों च नुकसान होईल असे रिएक्ट झाले. हूहूहूह

विराट मानवला कॉल करतो. दोघ खूप वेळ कामच बोलतात.

विराट , मी दोन तीन दिवसाने पुण्याला जाणार आहे.

पिहूला ही घेऊन जा तिला मागच्या वेळेस जायचे होते. मी नको बोललो आणि माझ्या लक्षातच राहिले नाही नंतर तिने विषयच नाही काढला. मॅड विराट हसत बोलला.

ह्म्म...मानव हसतो. चल ठेवतो. पिहूला तू सांग खुश होईल.

हो सांगतो, ऐकूनच चेहरा खुलेल विराट हसून बोलतो. विराटला पिहूच आठवते . मानव

हा बोल.

तुझ अणि सोनियाच काही प्रॉब्लेम झाला आहे का....

तीच नाव घेऊ नको, तीच बोलण खूप बदलले माझी ईच्छा नाहिये तिच्याशी बोलायची.....

का, काय बोलली.

तिला मी घरी घेऊन गेलो नाही .आई बाबा आले तेव्हा.,मी तिला बोललो थोडा वेळ जाऊ दे मग बघू.....आणि काय म्हणून ओळख करून देऊ माझी गर्ल फ्रेंड म्हणून..

जी ओळख आहे तीच ओळख करून देणार ना विराट हलक हसत बोलतो.

विराट,

हा मग,

तीच बोलण माहीत नाही का, आधी माझ्या शिवाय कोण होते लबालब वैगेरे आता मला तू इम्पोर्ट देत नाही फक्त पिहू प्रांजळ, आई बाबा च करत बसतो....

ती चुकीच काय बोलली ,आहे ते आहे.....त्यात राग येण्या सारख काय आहे.

विराट तू काय बोलतो....

हे बघ मानव हे होणारच आधी तुझ्या साठी ती एकटीच होती....आणि आता प्रेम तुझ वाटल्यावर साहजिक आहे ....तीच बोलण आणि तू कधी पासून इनम्यूचर बिहेव करायला लागला. थोड तिला समजून घे. सोनियाला पन सोबत घेऊन जा.....तेवढच तुम्हाला ही वेळ मिळेल.

काही गरज़ नाही मानव चिडून च बोलतो .

विराट डोक्यावर अंगठा घासत (पॉज घेतो. )मानव...

ह्म्म,

, गरज संपली का आता ....

विराट, sss

ओह्ह, विराट उपहासाने हसत बोलतो.

मानव पुढे काहीच बोलत नाही.

हे बघ मानव. तुझी लाइफ आहे मी तुला काही लेक्चर देत बसणार नाहिये .आणि मला इंट्रेस्ट पन नाहिये. तुझी चूक आहे ह्या आधी कोण नव्हते तेव्हा घरी घेऊन जात होता...आणि आता ओळख काय करून द्यायची म्हणून घरी घेऊन गेला नाही.....ठीक ये ना लग्न नाही करायच अट लिस्ट गर्ल फ्रेंड म्हणून ओळख दाखव ना....त्यात काही वेगळ नाही ये....
लिव इन मध्ये राहणार होता...तेव्हा काय तिला तू बाहेर काढल असते का आई बाबा येणार आहे तू तुझ बघ...

मी तस काही बोललो नाही, तिला फक्त वेळ मागितला अजून हे नात नवीन आहे. काही गैर समज नकोय येत म्हणून आई बाबाना माझ्या बद्दल वेगळ काही वाटू नये .पण तिला समजून घ्यायच नाहिये. एकच डोक्यात आहे. आधी माझ्या शिवाय तुला कोण महत्त्वच नव्हते. आणि आता तुझ्या घरी यायच तर तुला विचारायचे कोण आहे का. तूच सांग मी काय करू.ती ही मला तेवढीच महत्वाची आहे. पन तिला पटत नाही. मी ही किती तिला समजवणार लग्न करू म्हटले तर नको म्हणते. लिव इन मध्ये राहू बोलते.

आधी तुझ्या साठी ती सगळ होती. आणि आता फॅमिली मिळाली तर तू तिला इग्नोर करतोय. तिची लाइफ आहे .ती कशी ही राहू शकते . आणि तू आधी तयार झालाच होता ना मग आता तू पलटतोय. आणि अस एकमेकाशी न बोलून प्रश्न सुटत नसतात, बोल एकदा आणि विश्वासात घेऊन सांग तुझी फॅमिली आणि तिची जागा तुझ्या लाइफ मध्ये काय आहे. नाती जोड़ने खूप सोपे असते. पण त्याला एकत्र घेऊन पुढे चालणे खूप अवघड असते . तू माझ इतक सगळ जवळून बघतोय .तरी असा मूर्खपणा करतोय. मला वाटले नव्हते तुझ्या कडून अस काही होईल. आता तर खरी सुरवात आहे अणि तू लगेच वैतागला.पुढे कस हॅन्डल करणार. चल बाय तुझी लाइफ तू कशी ही हॅन्डल कर. तुला काही ही सांगितले तर तुला पटणार नाहिये. विराट फोन ठेऊन देतो. मानव विचारात पडतो. विराट बोलत होता ते ही खर आहे. सोनिया आल्याने त्याच्या जीवन बदलून गेले होते.
.
.
.
.
विराट ने पिहूला कालच सांगितले होते. मानव बरोबर पुण्याला जाणार आहे. तिचा चेहराच खुलला होता.

पिहू थोडे दिवस राहून ये सुमन बोलतात. पिहू चमकूनच बघते.

अशी काय बघते. विराट ला बोलली तस मला बोलली असते तर मी नाही बोलले असते का.

आई, ते मी हे नको बोलले म्हणून मी काहीच बोलले नाही.

अग हो, तेव्हा तू आधीच इतके दिवस परत पुण्याला म्हणून विराट बोलला असेल. आणि मला ही पटले नसते. पण आता चालली आहेस. तर थोडे दिवस राहून ये. पिहू खुश होऊन सुमनला मिठी मारते.

पिहू रूम येऊन विराट ला कॉल लावते. विराट कॉल उचलतो.....

अहो, ssss मी थोडे दिवस पुण्याला चालले आई स्वतः बोलले ती एक्साइटेड होत सांगू लागली.

विराट गालात हसतो. आय नो बेबी .

तुम्ही काल का नाही सांगितले रहायला चालली म्हणून मी बॅग कालच पॅक केली असते ना.

मॉम सांगणार होती म्हणून मी काही बोललो नाही. एन्जॉय कर तो हसत बोलला.

हो, umhhmmm 😘

विराट डोळे ताठ करत हसतो.

अहो,

ह्म्म,

आय लव यू sss 😘😘😘 ती मोबाइल ला किस करत बोलते.

आय लव यू टू 😘 शोना तो मोबाइल किस करत बोलतो.

अहो, कुठे आहात तुम्ही

मी साईट वर आहे....

अहो sss अस कोणा समोर कस वाटते ती फुगून च बोलते.

इट्स माय फोन माय वाइफ माय लिप्स एंड यू थिंक आय शुड
थिंक अबॉट अदरस? तो भुवया उंचावत बोलतो.

तुम्ही ना, पिहू लाजून फोन ठेवते. विराट मोबाइल कडे बघत हसतो.

पिहू बॅग पॅक करते. चेहरा तर इतका खुलला होता माहेरी जायच होत ना 😍😍
(दिवाळीत भरपूर जनांचे खुलतील चेहरे 😜😜)

मानव केबिन मधून सोनियाला कॉल करुन आत बोलवतो.

सोनिया आत येते. आणि फ़ाइल समोर ठेवते. सर, चेक केले एकदा तुम्ही चेक करून बघा सोनिया फ़ाइल मधे बघूनच बोलत होती.
मानव उठून डोर लॉक करतो. सोनिया मागे फिरून त्याच्या कडे रागाने बघते.

सोनिया, तो बोलत तिच्या समोर जातो.

मानव, डोर का क्लोज केला किती चिप वाटते..

वेट, मला तुझ्या शी बोलायच.

काय राहील आहे बोलायला. तुझी ईच्छा होती नाही बोलायची सोनिया चिडून बोलते
.
मी रागात बोललो होतो. 😞 सॉरी, तो तिचा हात पकडून जवळ ओढत मिठीत घेतो.

लिव मी, मानव सोनिया त्याचा मिठीत तून सुटण्याचा प्रयत्न करत बोलते.

आय अम सॉरी बेबी तो तिला घट्ट मिठीत धरतो. तुला ही माहीत आहे मी तुझ्या शिवाय नाहीं राहू शकत यू आर माय लाइफ बेबी,

ओह्ह, आज आठवली नाही तर मला वाटले फॅमिली मिळाली माझी गरज लागत नाही. (तो तिच्या कडे नजर फिरवतो.)

मानव, तुला कोणाबरोबर नात जोडायच जोडू शकतो. मला काहीच प्रॉब्लेम नाहिये. पन मला तू अंतर देतोय सोनिया कंठ दाटून त्याच्या डोळ्यात बघत बोलली.

सोनिया अस नाहिये. माझ्या साठी तूच माझ सर्व काही होतीस. आणि शेवट पर्यन्त तुझी जागा कोणी घेणार नाहिये. ट्रस्ट मी तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन बोलतो.सोनियाचे डोळे भरून आले ती त्याच्या कुशीत शिरून मुसमुसत रडू लागली.
बेबी शांत हो , मला फक्त वेळ हवा आहे. मला नाही माहित नाती वैगेरे कस हॅन्डल करायच. माझ हेतु एवढाच आहे कोणी माझ्या बद्दल गैरसमज करू नये. मला फॅमिली काय असते त्यांच प्रेम काय असते ते मला कळले आहे ते माझ्या पासून लांब होऊ नये अस वाटते माझी इमेज थोडी तरी वेगळी वाटली की काय विचार करतील . ते खूप साधी लोक आहे...त्यांना हे लिव इन वैगेरे कळत नाही. पिहू,प्रांजल बेधडक घरी येतात .अस काही आई बाबांना कळले तर दोघींना येऊ देतील का...ते परत घरी येताना विचार करतील.

सोनिया बाजूला होते. ह्म्म तुला किती वेळ घ्यायचा तेवढा घे. नेक्स्ट टाइम मला इग्नोर केल तर ती त्याची कॉलर पकड़त बोलते. मानव गालात हसत तिला दोन्ही हातानी कवटाळून घेतो. मी उद्या पुण्याला निघालो तू ही येतेय ...तो तिच्या नाकाला टच करत बोलतो..

मी सरांची सेक्रेटरी आहे तुझी नाही Mr. मानव

विराट ने सांगितले माझ्या सेक्रटरी ची तू काळजी घे.

सोनिया हसत त्याच्या कुशीत शिरते.
.
.
दुसर्‍या दिवशी मानव पिहू सोनिया पुण्याला जातात.
मानव, सोनिया पुढे अणि पिहू मागे बसली होती. पिहू सोनिया च्या कडे नजर वळवते तिचा चेहरा खुलला होता. दोघे ही नॉर्मल बोलत होते. पिहू ही आतून सुखावली.

मॅम,प्रांजल ला ही घेतल असते.

बोलले मी,पण तिच स्टडी मिस झाले असते.परत हॉलिडे लागले की येईल .
तिघे एन्जॉय करत पुण्याला येतात. मानव सोनिया पिहू ला सोडून थोड्या वेळ बसून हॉटेल मध्ये येतात. एक दिवस थांबून दोघ रिटर्न मुंबई ला येतात...पिहू मस्त 15 -20 दिवस राहून मुंबई ला येते. दिवस भरभर जात होते. विराटला जाऊन 2 महिन्याच्या वर झाले होते. पिहू ऑफिस मध्ये रमली होती. दिवस असा निघून जायचा. कामा मुळे विराटला जास्त वेळ मिळतच नव्हता फोन वर बोलायला. त्यामुळे पिहू ची चिडचिड होत होती. मग भांडण रुसवा फुगवी असच चालु होते.

विराट अणि मानव फोन वर बोलत होते. पिहू समोरच बसून तीच काम करत होती. तेव्हा तिला कळले मानव केरळ ला जाणार आहे .

दादा,

ह्म्म मानव फ़ाइल चेक करत बोलतो .

तू केरळला जाणार आहे.

हो, विराटचे सिग्नेचर हवेत .

कधी जाणार आहे.

अजून बुकिंग केल नाही.

मी पण येऊ तुझ्या बरोबर पिहू थोड चाचरतच बोलते.

मानव तिच्या कडे बघत विचारात पडतो.

दादा, मी परत येते तुझ्या बरोबर प्लीज़ दादा..

विराट चिडेल नको....तो मान हलवत बोलतो.
दादा, किती दिवस झाले ते आले नाही...आता तीन महिने होतील....मला बघायच त्यांना पिहू चा बोलताना कंठ दाटून येतो.

मानव उठून तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला जवळ घेतो.

दादा प्लीज़ ना.

बघू मी विराटला बोलतो...

नको सांगू त्यांना ते नाहीच बोलणार माहीत आहे

मग त्याला न सांगताच ...नो...नो.... मानव परत त्याच्या चेयर वर बसत बोलतो.

दादा, त्यांना कळल ना ते नाहीच म्हणणार माहीत आहे..

पिहू ,तुला त्याचा राग माहिती आहे ना. त्याला मी बोलतो तो काय बोलेल त्यावर मी तुला घेऊन जाईल.

पिहू चा चेहरा च पडतो तिला माहीत होते. विराट नाहीच बोलणार...दादा मी विचारते तू काही बोलू नको.

ह्म्म ठीक ये तू विचारून सांग. मी दोघांच बुकिंग करतो .

पिहू रात्री विराट ला कॉल लावते. पण तो उचलतच नाही.

विराट घरी येऊन कॉल्स चेक करतो. नेहमी सारखे पिहूचे चार पाच मिस कॉल होते त्याने टाइम बघितला बरीच रात्र झाली होती. त्याने व्हॉटअॅप चेक केल तिने काहीतरी रेकॉर्डिंग पाठवले होते. विराट ने गालात हसत चालू करून फ्रेश होऊ लागला. पिहू ने गाण रिकॉर्ड करून पाठवले होते.

थोड़े बदमाश हो तुम
थोड़े नादान हो तुम

विराट चमकून मोबाइल कडे बघत हसतो . कुठुन सोंग शोधून काढते काय माहीत तो बरबड़ करत त्याच आवरू लागतो.

थोड़े बदमाश हो तुम
थोड़े नादान हो तुम,
हाँ मगर ये सच है
हमारी जान हो तुम
थोड़े बदमाश हो तुम...
मेरी साँसों की झनकार हो तुम
मेरा सोलह श्रृंगार हो तुम
मेरी आँखों का इंतज़ार हो तुम

(विराटच्या चेहरा समोर पिहू चा निरागस चेहरा आला. ती किती शांततेत समजून घेते. तीन महिन्याचा वर झाले तिला
बघून विराट आराम चेयर बसुन तिला आठवत डोळे बंद करतो. )
मेरा ईमान मेरी शान
मेरा मान हो तुम
थोड़े बेईमान हो तुम
थोड़े शैतान हो तुम
थोड़े बेईमान हो तुम
थोड़े शैतान हो तुम
हाँ मगर ये सच है
मेरे भगवान हो तुम
थोड़े हम्म..नादान हो तुम
हा हा बदमाश.
.

विराट सकाळी पिहूला वीडियो कॉल करतो. पिहू झोपेतून जागी होत कॉल रिसीव कारते .

गुड मॉर्निंग शोना. पिहू अजून डोळे चोळत मोबाईलचा कॅमेरा ऑफ करते.

विराट गालात हसत केसांमधून बोट फिरवतो. मला बघायच कॅमेरा ऑन कर ना चिऊ तो हसू कंट्रोल करत बोलतो .

तुम्ही चिऊ नाही म्हणायचे .मला फक्त पप्पाच बोलू शकता. पिहू चिडून म्हणते.

का , नाही बोलायच मी पन बाबा एवढच प्रेम करतो ना.

नाही, पप्पा जास्त करतात. ते दररोज न चुकता फोन करतात
आणि तुम्ही मला आधी करत होता पन आता दोन तीन दिवसातून कॉल करता. आनि सॉरी वैगेरे बोलूच नका.

ह्म्म, आज सॉरी ने काम चालणार नाही का तो नाराज होत विचार करत बोलतो.

नाही... नाही...नाही.

माझ्या प्रिन्सेसला मनवायला काय करावं लागेल .

माहित नाही , तुम्ही ठरवा.

अम्म....कॅमेरा ऑन कर सांगतो.

मी नाही करणार हूहूहू.

सॉरी ना बेबी umhhmmm 😘😘

नको तुमची किस, पिहू हसू कंट्रोल करत बोलते.

पिहू कॅमेरा ऑन कर, तो ओरडून बोलतो.

नाही,

ओके फाइन,त्याने रागातच फोन कट केला. पिहू शॉक होतच फोन कडे बघते. राग तर नाकावर आहे सगळ मनासारखे हव हूहूह. पिहू मोबाइल ठेवून आवरायला जाते .

विराट ही चिडून त्याच आवरतो. त्याची ही चीड चीड होत होती. पण त्याच्या कडे वेळ नव्हता. आणि गेल् की पाय निघत नव्हता.

पिहू तीच आवरून ऑफिसला येते सारख लक्ष फोन कडेच असते. तिने एक उसासा सोडून मोबाइल ड्रॉवर मध्ये टाकला आणि कामाकडे वळली. संध्याकाळी तिला यायला उशीर झाला .विराट ने दोन तीन वेळा कॉल केला पन तिला घरी आल्यावर फोन करताच आल नाही.

पिहू फोन करणार तर सकाळच आठवून तिने फोनच केला नाही.

पिहू मानवला कॉल करते.

बोल पिहू,

दादा मीपण येणार आहे .

विराट काय बोलला.

ते ये म्हणाले पिहू चाचरत हसत बोलते.

आर यू शूअर मानव थोड शंकेने विचारतो.

दादा 😫 प्लीज ना.

ठीक चल विराटला नाही सांगत बस खुश का...काय होईल ते होईल मानव हसत बोलतो.

ह्म्म ,पिहू हसते.

पिहू सुमन ल सांगते. सुमन पण जा बोलतात.

मानव आणि पिहू दुसर्‍या दिवसी केरळला येतात.

संध्याकाळी चार ते पाच वाजता पोहोचतात. आता मात्र पिहूला त्याला बघायची ओढ, अनामिक हुरहुर लागली होती .आणि भीती सुद्धा वाटायला लागली त्याला न सांगता आली म्हणजे वाघाच्या तोंडात हात घतल्यासारख काम होते.

दादा, हे ओरडले तर...😢😢

ते तर होणारच आहे ...तुझा चेहरा बघून तुझ्या वरचा राग कंट्रोल करेल पण माझ काय करेल कोणास ठाऊक हुश्श तो कारच्या बाहेर बघत बोलतो.

पिहू पन नाराज होत बाहेर बघते.....ती ग्लासखाली घेऊनबाहेर बघते......संध्याकाळ असल्याने बाहेरच वातावरण छान दिसत होते.... रस्त्याच्या साइड ने मोठ मोठी नारळाची झाडे झुकली होती.सूर्य लालसर पिवळा होत गाडी बरोबर च पळत होता......हिरवागार भाताची शेती वाऱ्याबरोबर डुलत होती.....मंदिरांचा घंटेचा नाद घुमत होता. मधेच खळखळून वाहणारा ओढा लागून गेला. शेतातील मजदूर काम करून घराकडे चालत जात होती....खूप प्रसन्न वाटत होते.मनाला एक प्रकारची शांतता वाटत होती....

गाडी एका विलाच्या बाहेर थांबते. पिहू बाहेर उतरून नजर घरावर नजर टाकते. रूफ डिजाइन लेटेस्ट पद्धतीने विला बांधला होता. शांत रमणीय वातावरण होते. थोड शहरा बाहेर होते.

दादा हे घर पिहू मानव चा हात पकडून विचारू लागली.

विराट ने रिसॉर्टच काम चालू होण्याआधीच विला आधीच घेऊन ठेवला होता.

आपल आहे पिहू त्याच्या कडे बघत बोलते.

हो आपलच आहे.

आतून एक नोकर येऊन मानव च्या हातातली बॅग घेऊन आत जातो.

किती नोकर आहेत.

दोन सर्वंट आणि एक वॉचमन आहे...आणि बस आता..आत जायच नाही का इथेच सगळ विचारणार का....

दादा हे ..

विराट अजुन आला नाहिये चल ...मानव पिहू आत येतात....
पिहू सगळीकडे नजर फिरवून बघते.खूप छान इंटेरियर होत. विराट ची चॉईस थोडी हटकेच होती . एका सर्वंट ने पानी आणून दिल. पिहू एक नजर बघत ग्लास घेतला.

पिहू फ्रेश हो......मी पन आलो फ्रेश होऊन.....चल तुला रूम दाखवतो. मानव पिहूला रूम दाखवून तो ही दुसर्‍या रूम जाऊन फ्रेश होतो....मानव ने विराट ला कॉल केला.

पिहू ला आता खूपच टेन्शनआल होते..इथल सगळ अनोळखी वातावरण बघूनच तिला घाम फुटला होता. ती तीच आवरून घेते. बेडच्या साइडला दोघांचा रिसेप्शन मधला फोटो ठेवला होता. पिहू फ्रेम उचलून त्यावरुन हात फिरवत गालात हसते. पिहू त्याच वार्डरोब उघडते..त्याच्या कपड्यावरून हात फिरवत हसते. सगळ जस च्या तस शिस्तीत होते. एका side ला पिहू च्या बांगड्या चा बॉक्स होता ती डोळे ताठ करतच बॉक्स हातात घेते. हा कधी घेतला मला कळले पणनाही......मागितल असते तर दिले नसते का ... हूहूहूह...पिहू बॉक्स परत ठेवून देते. विराटचा आवाज आल्यावर पिहूची धडकीच भरते. ती वार्डरोब पटकन बंद करून बाहेर येते.
.
.
.

मानव अक्कल नावाची चीज आहे की नाही विराट जोरात खवळून ओरडतो.

विराट तू मला बोलला नाही .

व्हॉट, आता तुला विचारून मी करायचे....उद्या पासून दररोज तुला मी अपडेट देत जाईन....ओके

पिहू तर घाबरून ब्लँक होत दोघां कडे बघत होती. काय चालले तिच्या तर डोक्यावरुन चालले होते.

एका शब्दाने बोलला असता पिहू येणार आहे तर मी बोललो असतो ना यू इडियट .... मला वाटल चला तू येतोय तर चार पाच दिवस मी दिल्लीला जाऊन येईल....किती दिवस झाले काम अडकून आहे.....मानव ला काय बोलाव सुचतच नव्हते. चूक त्याची होती.

मी उद्या सकाळी.. ...पिहू ला पाहताच तो बोलायच थांबतो .

पिहू कावरीबावरी होत त्याच्या कडे बघत होती. तिने घाबरून लगेच नजर फिरवली. विराट शांत होत दोन्ही हात चेहर्‍यावरून फिरवत ब्लेझर काढत सोफ्यावर टाकतो.... तो तिच्या जवळ जातो तर पिहू दचकून मागे सरकते. पिहू,तो शांत होत तिला प्रेमाने बोलत तिचा हात पकडून घट्ट मिठी मारत तिच्या डोक्यावरुन पाठीवर हात फिरवतो. तेव्हा कुठे पिहूला थोड बर वाटते.तिला बघून त्याच मन शांत झाल होते. खूप दिवसाने तिला बघितले होते. त्यात ती घाबरलेली बघून त्याचा राग कमी झाला. मानव ही दोघांना वेळ मिळावा म्हणून बाहेर येतो.

तो तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या चेहर्‍यावर किस करत परत कुशीत घेतो....आय मिस यू सो मच....

पिहू वरवर हसत त्याला बिलगते आतून उगाच आले अस तिला वाटू लागले.

कम, तो तिचा हात पकडून सोफ्यावर बसवतो. जस्ट रीलॅक्स तो तिचा चेहरा बघूनच समजून जातो तिने ऐकल आहे.

पिहू , मला बघून खुश झाली नाही का, तो नाटकी चेहरा करत बोलतो.

पिहू गालात हसत त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवत गालावर ओठ टेकवते.कसे आहात ?

कसा वाटतोय तो कपाळ तिच्या कपाळाला टेकवत हसतो. पिहू नजर खाली घेते. डोळ्यातून थेंब थेंब गळत पाणी त्याच्या हातावर पडत होते. त्याने तिचे डोळे पुसून कुशीत घेतले.पिहू ने ही मुसमुसू करत त्याला घट्ट मिठी मारली.

खूप मिस केल ....

मी... पण, पिहू मुसमुसू करतच बोलली.

मी तुला नाही तुझ्या डोळ्यातलं पाणी ला मिस केल विराट हसत बोलतो.

पिहू खुदकन हसत परत रडू लागली.

विराट तिला बाजूला करतो. बस आता रडू नको. चल फ्रेश हो.

मी फ्रेश झाले ती उलट्या हाताने डोळे पुसत बोलते .

थोडा आराम कर रूम मध्ये जाऊ तो उठत बोलतो. दोघेही रूम मध्ये येतात. आलोच फ्रेश होऊन तो तिचा ओठांवर हलके ओठ ठेवत बोलतो. पिहू हसून मान हलवते.

विराट फ्रेश होण्यासाठी जातो. पिहू शांत बेडवर जाऊन बसते.

विराट फ्रेश होऊन येतो. दोघ ही एकमेकांना कडे बघून हसतात ....तो गलत हसत तिच्या मांडीवर डोक ठेवून कंबरेला हाताचा विळखा घालत डोळे झाकतो.
पिहू त्याच्या केसांमधून हात फिरवत माथ्यावर किस करते.
दोघ न बोलून एकमेकांचा सहवास अनुभवत होते.

अहो,

हहह, तो डोळे झाकून बोलतो.

झोपू नका......जेवण करून झोपा त्याला तर तिला सोडून हलूच वाटत नव्हते.

तुझ्या कुशीत झोप येतेय...खूप मिस केल I love you बेबी
पिहू गालात हसत त्याच्या केसांवर ओठ टेकवते .
त्याच्या डोळ्यात खूप झोप होती. तो पाच एक मिनिटातच झोपी गेला. पिहूने ही त्याला उठवल नाही. खूप दमल्या सारखा त्याचा चेहरा झाला होता. तिला त्याच्या साठी वाईट वाटत होते. त्यात अजून आपण त्याला त्रास द्यायला आलोय उगाच आल्यासारख वाटले. डोळे भरून आले होते. त्याचा हात सैल झाल्यावर पिहू अलगद त्याच डोक उशीवर ठेवते. आणि बाहेर आली.

मानव हॉल मध्ये बसुन फोन वर कामच बोलत होता. पिहू त्याच्या जवळ जाऊन बसली. मानव ने फोन ठेवला. विराट कुठे

झोपलेत,

ह्म्म, थकला असेल सकाळी लवकरच कोची ला गेला होता .पिहू विराटच काही मनावर घेऊ नकोस. त्याला ही वाटत तुझ्या बरोबर राहावे .पण जबाबदारी च ओझ पाठीवर असल्याने तो तर काय करणार. त्यात त्याची चूक ही नाही. तो ही सगळ्यासाठी धडपडत बसतो. स्वतःच्या इच्छा काय आहे ते कधी त्याने बघितल नाही. फक्त दुसर्‍याचा विचार डोक्यात घुमत होता.

माहित आहे दादा, पिहू गालात हसत बोलते.

पिहू, अ‍ॅक्च्युअली विराटला दिल्ली ला जायच आहे. उद्या अर्जेंट काम आहे. आधीच Mr. मेहता चिडले होते नमन वर तेव्हा विराट ने कस बस डील कॅन्सल होऊ दिली नाही. आणि आता Mr. मेहता ने बोलावल आहे दिल्ली ला सो विराट ला जावेच लागेल. मी थांबणार आहे

पिहू मानव ला थांबवत विचारते कधी निघायचे .

तो पॉज घेत उद्या दुपार ची फ्लाईट आहे. मानव थोड हळूच बोलतो.

पिहू कंठ दाटून मान हलवते . मानव चा कॉल येतो तो बोलत बाहेर जातो. पिहू इकडे तिकडे बघत बाहेर एक चक्कर मारून परत आत येते .

विराटला अर्धा तासाने जाग येते, तो दचकूनच उठतो दोन सेकंद त्याला पिहू चा भास असल्यासारखे वाटले. दुसर्‍या क्षणी तो मिरर मध्ये केस नीट करत तिला हाक मारत च बाहेर जातो.

पिहू किचन मध्ये जाते. तिथे कूक काम करत होता .त्याने तामिळ मध्ये तिला काहीतरी विचारले. पण तिला कळलेच नाही, ती घाबरून बाहेर आली .हे कसे बोलत असतिल ह्यांना येते का तामिळ ती स्वतः शीच बड़बड़ करत आली.

पिहू कुठे होतीस? विराट बोलतच तिला मिठीत घेतो.

मी इथेच होती. झाली झोप पिहू पाठीवरून हात फिरवत बोलते.

ह्म्म, थोडा डोळा लागला

थोडा आराम करायचा ना. पिहू मान वर करून गालावर हात ठेवत बोलते .

तू आहेस ना जवळ आता फ्रेश फिल होतेय. विराट दोन्ही हातानी तिचा चेहरा धरत कपाळावर किस करतो.

अहो ,तुम्हाला ग्रीन टी करू का

तू मला विचारुन देणार आहेस. ऑफ कोर्स हवी आहे .

हा पण किचन मध्ये, कुठे काय आहे माहीत नाही ना

चल मी दाखवतो .तो तिच्या भोवती हात टाकत किचन मध्ये घेऊन जातो. विराट कुकला बाहेर जायला सांगतो.

अहो, तुम्हाला तामिळ येते पिहू ब्लँक होत विचारते.

थोडी थोडी येते.

त्या रॅक मध्ये आहे.

पिहू पाणी उकळायला ठेवते. त्यात पुदिना घालून उकळते. गॅस बंद करून ग्रीन टी टाकते.

विराट किचन टॉप ला टेकून तिलाच निहाळत उभा होता. दररोज त्याच्या समोर हसणारी, लाजणारी पिहू नव्हतीच कोमेजून गेली होती. त्याला खूप गिल्टी वाटू लागले. किती विचार करून आली असेल आणि सगळ विस्कळीत झाले.पण एका शब्दाने कुठला राग नाही हट्ट नाही. प्रत्येक वेळा समजून घेते. तीच वय मस्ती मज्जा एन्जॉय करण्याच आहे आणि असच तिचे दिवस वाया जात आहे. पण कधी कुठल्या गोष्टी साठी भांडली नाही. माझ पण वय असच वाया गेलं आता पिहूचे तेच हाल होत आहेत.

काॅफीमगमध्ये लेमनचा रस टाकून गाळून त्याचा समोर धरते.
तो तिच्या डोळ्यात बघत मग घेते. वन मिनिट धर तो मग परत तिला देतो. आणि पिहू साठी मस्त आल घालून चहा ठेवतो. पिहू हसत त्याला बिलगते .मी केल असत ना घ्या हे पिहू मग परत देते . तो तिला किचन टॉप वर बसवतो .आणि तिला चहा हातात देतो. छान आहे का विराट एक स्वीप विचारतो .ती हाताने छान म्हणत पिते. विराट तिचे केस मागे घेत गालावर किस करतो .पिहू लाजून नजर चोरते .

मानव हॉल मधुन त्या दोघांना बघून गालात हसत रूम मध्ये जातो.
विराट पिहूला घर दाखवतो त्यात पिहूला काडीमात्र इंट्रेस्ट नव्हता.

अहो ,

ह्म्म

मला झोप आली . तिला त्याच्या शी बोलू पण वाटत नव्हते...ती कितीवेळ खोट हसू आणून बोलून थकली होती. कुठल्या क्षणी रडू येईल अशी अवस्था झाली होती. पण विराट समोर तिला रडून त्याला त्रास द्यायचा नव्हता. .त्याला ही तिची अवस्था कळत होती.... डिनर करून झोप चल ...

मला भूक नाहिये....तुम्ही दादा जेवण करा...

पिहू थोड खा .....चल तो हात धरून तिला डायनिंग टेबल वर आणतो....मानव ही येतो......

पिहू फिनिश कर. ती विचार करतच खात होती तर तो चिडून बोलतो. पिहू काही न बोलता जेवू लागते.

मानव चा फोन रिंग करतो. विराट Mr. मेहता चा कॉल आहे.

ह्म्म, विराट हातातून मोबाईल घेऊन बाहेर जातो. .

पिहू जेवण जात नाही का काहीच खाल्ली नाही.

दादा टेस्ट नाही चांगली ती तोंड कस तरी करून बोलते.

मानव जोरात हसतो. मग खाऊ नको दूसर काही तरी करायला लाव ना. तुला तिखट चटपटीत लागते. हो ना

हो.,

तुला ऑर्डर करू का वेगळ काही तरी..

नको मला जास्त भूक नाहिये , मी फ्रीज मध्ये फ्रूट सॅलड बघितले आहे तेच खाईल. पिहू उठून किचन मध्ये जाते. आणि बाउल मध्ये फ्रूट सॅलड घेते आणि त्यावर आईस्क्रीम घेते आणि बाहेर येऊन बसते. दादा तुला हव

नको तू घे.आलो मी मानव उठून विराट कडे जातो.

मानव Mr. मेहता ला डिटेल्स पाठवले आहे ते चेक करून सांगतील.

ह्म्म, नमन ला घेऊन जाणार आहे का. ?

नाही, त्या प्रोजेक्ट मध्ये मी रिषभ ला घ्यायचा विचार करतोय .तो छान आता रुळयतोय .

ह्म्म ,

पिहू कुठे, डिनर केल का तिने

आवडल नाही तिला.

विराट हलक हसतो. तिला तिखट हव असते. त्या कूक ने दररोज सारख जेवण केल . तिला बाहेरून काही तरी मागाव चल आत

नको बोली ती फ्रूट सॅलड खाते बोलली.

व्हॉट,? तो जोरातच ओरडून आत येतो. . मानव ही दचकतो.
ओरडायला काय झाल. तो बोलत त्याच्या मागे येतो.

विराट पिहू जवळ येतो. पिहू तू ...

पिहू तोंडाला हात लावून मोठ मोठे श्वास घेत होती. विराट ने पटकन तिला जवळ घेत छातीशी लावल...पिहू रीलॅक्स ssतो डोक्यावरुन हात फिरवत बोलू लागला.

काय झाल विराट मानव पिहू अस बघून घाबरून विचारतो.

कॉल डॉ. पिहू हॅज ॲलेर्जी ऑफ स्ट्रॉबेरी

मानव पटकन तिथल्या सेक्रेट्रीला कॉल लावून चांगल्या Dr. ला पाठव म्हणतो.

पिहूला काहीच सुचत नव्हते. बोलायला ही जमत नव्हते.
विराट ने तिला उचलून रूम मध्ये आणून बेडवर झोपवले.
पिहू काही नाही, शांत हो, तो तिच्या कपाळावर वरुन हात फिरवत होता. पिहूचा श्वास काही केला नॉर्मलच होत नव्हता. विराट पूर्ण पणे घाबरून गेला होता.त्याला माहित होते पण कधी तिला त्रास होताना त्याने बघितले नव्हते. आज पहिल्यांदा तिला अस बघत होता. तिचे डोळे बंद होत होते..

पिहू ss,डोळे बंद करू नको तो गालावर टॅप करत तिला जाग ठेवत होता. मानव ss डॉ. ला कॉल केला का विराट आतून ओरडून बोलतो.

हो.... हो केला, (मानव आत येतो.)

पिहू बेशुद्ध झाली होती. विराटला धीरच धरवत नव्हता. जीव कासावीस झाला होता. स्वतःचाच राग येऊ लागला.

मानव बाहेर जाऊन बघतो. डॉ. आलेच होते...मानव डॉ. ला आत घेऊन येतो.

Dr. चेक हर फास्ट विराट खूप पॅनिक झाला होता.

डॉ चेक करतात. नो नीड़ टू वरी शी विल बी फाइन इन सम टाइम. शी ॲलेर्जीक टू समथींग
हातावर ,चेहर्‍यावर पण लाल रॅशेश दिसत होते . तिला इंजेक्शन देतात.

Some symptoms of throat infection or fever can occur dr. मेडिसिन आणि क्रीम लिहून देतात.
.

मानव description घेत डॉ .ला बाहेर घेऊन जातो.

विराट ने ग्लास घेऊन पाणी पिल.... इतक्या वेळ पिहू ला तड़फड़ताना बघून त्याची घालमेल झाली होती. काय करू नी काय झाल होते. तिच्या अंगावर नीट ब्लँकेट ओढतो.

विराट हे मेडिसिन , क्रीम मानव त्याला देत बोलतो.
टेंशन नको घेऊ कमी होईल ....मानव विराट चा चेहरा बघत बोलला. त्याचा चेहरा टेन्शन ने पडला होता. विराट....मानव त्याच्या खांद्याला टॅप करत बोलतो.

विराट विचारातून बाहेर येत त्याच्या कडे नजर वळवतो. मानव, जा रेस्ट कर. काही लागल की मी सांगतो. विराट तिच्या हाताला क्रीम लावत बोलतो.

मानवला जाऊ वाटत नव्हते. पिहू च्या डोक्यावरुन हात फिरवून बाहेर येतो

विराट तिला कुशीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो.
एक दीड तासाने पिहू ला जाग येते. तिच्या हालचालींमुळे विराट डोळे उघडून बघतो....
पिहू ,काय हव तो तिच्या गालावर हात ठेवत प्रेमाने विचारतो.

पा....प .पाणी

विराट पटकन उठून तिला पाणी पिऊ घालतो. घसा कोरडा पडला होता.

शांत झोप, तो तिला कुशीत घेऊन थोपटून बोलतो. पिहू पन त्याच्या उबदार कुशीत लगेच झोपून गेली.
पहाटे पिहूच्या अंगात चांगलाच ताप भरला होता. विराट जाणवले तसा तो जागा झाला. पिहू थरथर कापत त्याला बिलगली.

पिहू,उठ धर मेडिसिन घे .उठ तो तिला उठवून बसवतो .पिहू कशी बशी उठून मेडिसिन घेते. विराट ने तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्टया ठेवल्या. त्याला तर टेन्शनच आल .अर्धा पाऊण तासाने तिचा ताप उतरला.

.
.
सकाळी विराट आणि मानव ब्रेक फास्ट साठी आले.

विराट पिहू ला बर वाटते ना.

Fever होता पहाटे आता थोडी कणाकण आहे.

दुसर्‍या डॉ. ला दाखवायचे का,

नको, मी फोन करुन विचारले डॉ. अंकल दोन दिवस असेल म्हटले. मेडिसिन पण चेंज करून घेतल्या.

पिहू ट्रॅव्हल कस करणार,

मी नाही जाणार mr. मेहता ला फोन करून सांग.....

विराट, mr. मेहता ह्यावेळे....तो बोलत होता की विराट मध्ये तोडत बोलला. Mr. मेहता तयार झाले तर ठीक नाही तर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायला लाव.

विराट आपण पिहू ला मुंबई ला घेऊन जाऊ. तू जा दिल्ली सगळे आहेत तिची केयर ...

मानव मला प्रॉब्लेम नाही माझ्या लॉस चा नाही ते अडव्हाईज देऊ नको. तुझ आवरून झाल की साइट वर जा .पिहू ला बरे वाटेल तेव्हा तू मुंबईला जा. आणि लेडीज सर्वेंट अरेंज कर. पिहू ला कम्फर्ट फील होईल .

ह्म्म,

विराट उठून रूम मध्ये गेला. मानव विराट मधला चेंज बघत हसला. पिहू साठी त्याने इतक्या मोठ्या प्रोजेक्ट च काम बाजूला ठेवल होते.

विराट ने ताप आहे की नाही चेक केल .पिहू ... तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवून उठवू लागला. तिचे डोळे जड झाले होते. तिने कूस बदलली. परत तिच्या लक्षात आले दुपारी जायचे आहे.

थोड काहीतरी खाऊन घे. उठ शोना

पिहू उठून बसली. अंगात तर त्राणच नव्हते. ती समोरचा ग्लास घ्यायला झुकली. विराट ने तिला ग्लास हातात दिला. तिने नजर मिळवलीच नाही.

विराट ही न चिडता शांततेत घेत होता. चल फ्रेश हो, मग काही तरी खाऊन घे. तो तिला उठवत होता तर ती उठून आत निघून गेली. त्याने एक उसासा सोडला.

पिहू फ्रेश होऊन आली विराट ने रूम मध्येच तिचा ब्रेक फास्ट आणला.

धर थोड खा आणि मेडिसिन घे.

मला फक्त ज्यूस हव बाकी काही जाणार नाही.ती प्लेट सरकून फक्त ज्यूस पीली. विराट ने ही फोर्स केला नाही. मेडिसिन घे धर तिने तोंड वाकडं करतच औषध घेतली.

त्याने तिचा हात घेतला आणि क्रीम लावू लागला.

अहो ,किती वाजता निघायचे ती थोड रागातच बोलली.

त्याने तिच्या कडे नजर वळवली. आपण कुठे ही जात नाहिये .मला इतका कठोर समझते मला तुझी काळजी नाही का,

अस कधी मी बोलले. पिहू चिडून बोलली. डोळे भरून आले होते.बोलताना तिचा श्वास फुलला ....पिहू शांत हो....जास्त बोलू नको.....सॉरी त्याने तिला मिठीत घेऊन पाठीवरून हात फिरवला...तिच्या माने वर ही लाल रॅशेश दिसत होते.

पिहू तुला मानेला ही इचिंग होतय का .

हो, पहाटे पासूनच होते. पिहू डोळे पुसत बोलते. त्याने टॉप थोडा खाली घेतला तर पाठीवर ही रॅशेश होते.

पिहू सांगायच ना. त्याने दार लावून तिच्या पाठीवर मलम लावले. तिला ही आता गार वाटू लागले. सकाळपासून अंग गरम वाटत होते. तिला औषध च्या गुंगी ने कधी झोप लागली कळलच नाही. दुपारच्या वेळेस तिला उठवले पण ती उठलीच नाही. त्याने ही तिला झोपू दिले. संध्याकाळ झाली तरी पिहू उठायचे नाव घेत नव्हती.

पिहू उठ, त्याने तिला झोपेतच बेड ला टेकवून बसवले.
वातावरण थंड वाटत होते. पिहू ने ब्लँकेट ने स्वतःला कव्हर केले.
पिहू सूप पिऊन घे. सकाळ पासुन काहीच खाल्ले नाही

ईच्छा नाहिये माझी ,

ओके मग आपण डॉ. कडे जाऊ. अ‍ॅडमिट करून घेतील जायच का, तो नजर रोखून बघत बोलतो.पिहू त्याच्या कडे रागाने बघितले .

ते फिनिश कर .त्याने चमचा तिच्या समोर धरला तिने ही थोड पिल.

दादा कुठे आला नाही का.

येईल थोड्या वेळात ....पिहू परत आडवी झाली.
त्याने तिच्या केसांमधून हात फिरवला. चेहरा पूर्ण सुकून गेला होता. तिला परत झोप लागली. ताप ही दोन दिवस होता. तिसर्‍या दिवशी तिला बरं वाटू लागले. पण वीकनेस पणा भरपूर वाटत होता. विराट ही तिला सोडून गेलाच नाही. विराट जेवढे विचारेल तेवढच पिहू बोलत होती. विराट ला तिच माहीत च होते. एकदा का तिच्या मनाला कुठली गोष्ट लागली की शांत शांतच राहते.
.
.
.

विराट दुपारी हॉल मध्ये लॅपटॉप घेऊन बसला होता.
पिहू किचन मध्ये गेली.

पिहू काय करतेस विराट ने तिच्यावर नजर टाकत विचारले.

पाणी संपल रूम मधल..... ती त्याच्या कडे बघत बोलते.

तो परत लॅपटॉप कडे बघू लागला. ती पाणी पिऊन विराट च्या समोरच्या चेयर वर बसली. विराट ने तिच्या कडे बघितले ती स्वतः हून तर त्याच्या जवळ जाणार नाही हे ही माहित होत .
त्याने हाताने तिला जवळ बोलावलं तेव्हा कुठे उठून ती त्याच्या जवळ गेली.

झोप येत नाहिये का त्याने एका हाताने तिला जवळ घेतले
ती मानेनेच नाही म्हणते. ती पाय वर घेऊन त्याच्या मांडीवर डोके ठेवून आडवी झाली. त्याने तिच्या केसांमधून बोट फिरवल.थोड्या वेळात तिला झोप लागली. विराट ही लॅपटॉप बंद करून तिला रूम मध्ये घेऊन जातो.

पाच सहा दिवसानंतर पूर्णपणे बरी झाली. मानव ला सांगून
विराट एका तासासाठी बाहेर गेला होता.

दादा , कधी जायच.

तस मानव ने तिच्या कडे एकटक बघितले. मी उद्या जायचा विचार करतोय. विराट काय बोलेन त्यावर तुला राहायच का ?

ती मानेनेच नाही म्हणते. इथे येऊन तर काय केल फक्त ह्यांना त्रास दिला

पिहू तू मुद्दाम केल नाहिये.

मी पण येते दोन तीन दिवस राहणार होते सहा सात दिवस राहिले पिहू हलक हसून बोलते.

ठीक ये जाऊ उद्या.

विराट आल्यावर मानव सांगतो. विराट विचारात पडतो.
पिहू बॅग पॅक करत होती. विराट ने तिच्या हातातला समान बेडवर टाकल. तिला स्वतः कडे वळवले. त्याने तिच्या कपाळाला कपाळ टेकवले. आणि दीर्घ श्वास घेतला.

पिहू....

पिहू नजर वर करून त्याच्या डोळ्यात आरपार बघू लागली.

तुला घरी जायच.

पिहू मान वर खाली करत हो म्हणते. डोळ्यातल पाणी गालावर आल होत.

त्याने तिचे डोळे पुसले आणि डोळ्यावर किस केल अणि मिठीत घेतले. पिहूचा हुंदका फुटला. इतक्या दिवसाच रडू बाहेर पडत होते. त्याने ही रडू दिल.

सॉरी मला त्रास द्यायचा नव्हता.

वेडी आहेस का, तुझा कसला त्रास होईल का मला काही बोलत राहतेस .त्याने तिचे डोळे पुसले. रडू नकोस आता कुठे बर वाटतय .तू कुठे ही जात नाहिये मी जाऊ देणार नाहिये तो तिला घट्ट मिठीत घेत बोलतो.

अहो, मी राहून काय करू. माझ्यामुळे ती बोलत होती. तर त्याने तिच्या ओठावर चापट मारली. पिहू बारीक डोळे करून बघू लागली. परत बोली ना, आता गालात देईल .तुझ्या मुळे कधीच मला कसला त्रास होणार नाहिये.

आणि इथे राहून काय करायच ते मी सांगेल काळजी करू भरपूर काम आहे तो खट्याळ हसत बोलतो. तशी पिहू रागाने त्याला कोपर मारून बाजूला सरकते.

विराट परत तिला स्वतःकडे ओढतो. राग तर नाकावर आहे .

मला नाही राहायच , तुम्हाला बिलकुल माझी काळजी नाही...I hate you to ती रडत त्याच्या छातीवर मारत बोलू लागते.

I love you .😘 तो पटकन तिच्या ओठावर ओठ ठेवतो. ती त्याच्या छातीवर पुश करत होती. तो थोडा ही हलला नाही... त्याने तिचे हात धरले आणि जवळ ओढले....ती ही हळू हळू त्याला साथ देऊ लागली... विराटने तिला कुशीत घेतल....

राग आहे का अजून .

हो, ती मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत चिडून बोलली.

Okay, मी हाउसबोटच 2 डेज बुकिंग केल तिकडे काय करायच जाऊन कॅन्सल करतो.

पिहू त्याच्या कडे बघते.

नाही यायच.

ती चक करत मान हलवते.

पण मला जायच आहे ना.

जावा तुम्ही मला का सांगता. ती पाठ फिरवून बोलते.

तिथे कपल जातात,....तो मागून तिला मिठीत घेत बोलतो.

मला मुंबई ला जायच तुम्हीच एकटे जावा हूहूहूह.

येताना तुझ्या मर्जी ने आलीस ना जाताना माझ्या मर्जी ने जाव लागेल. तो तिला टक्कर देत हसत बोलला.

हूहूहूह. मी बोलले दादा ला आम्ही उद्या जाणार आहे ....

त्याची हिम्मत होईल माझ्या विरोधात जायची....अस होणार नाही शोना ...ती बोलणार की तो ओठांवर बोट ठेवतो.

बस आता, एकच लावल ....आता अजून काही बोलली ना,ओठ अजून रेड होतील तो ओठांवर नजर टाकत बोलला.

पिहू नजर खाली घेत लाजते. परत सावरत रागाने त्याच्या कडे बघते. मी चिडले आहे आणि मलाच धमकी देताय....

काय करणार आदत से मजबूर तो तिच्या कपाळाला कपाळ लावत हसतो.

पिहू चिडून त्याला ढ़कलूंन पाय आपटून आत निघून जाते.

विराट केसांमधून हात फिरवत हसतो.