Shivaji Maharaj ek uttam shikshak aani pratikshak hote - - Part 4 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ४

Featured Books
Categories
Share

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ४

छत्रपती शिवाजी महाराज शिक्षकांप्रमाणे एक उत्तम प्रशिक्षक होते. यात जराही संदेह नव्हता.त्यांनी असंख्य मावळे आपल्या हाताखाली तयार केले होते. स्वराज्याची शिस्त सैन्यामध्ये वापरून त्यांनी गनिमी कावा हा अद्भुत प्रकार आणून स्वतःच्या मावळ्यांचे मानसिक बळ वाढवले होते. गनिमीकावा हा एक अद्भुत प्रकार होता . गनिमी काव्याच्या सहाय्याने कोणत्याही लढाईला गेल्यास आपणच जिंकणार अशी भावना त्या मावळ्यांमध्ये तयार होत होती . दिवसेंदिवस हीच भावना अधिकाधिक दृढ होत होती. त्यामुळेच स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यास गनिमी कावा एक प्रचंड महाशक्ती बनली होती.

स्वतः शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये उत्तम शिस्त निर्माण केली होती. ती शिस्त होती स्वराज्याची... स्वतःच्या मावळ्यां साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी शिस्त निर्माण केली होती .ती सर्वांनाच लागू होती .
मग तो कुणी असो.
कोणत्याही जाती जमातीचा असो .
हिंदू असेल अथवा
मुसलमान असेल ...
सर्वांना शपथ एकच .... फक्त स्वराज्याची आण...

छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता शब्द उच्चारला की आपण जे करतोय ते कशासाठी..?
तर त्यांचे मावळे त्यांना उत्तर देत होते .
स्वराज्यासाठी...स्वराज्यासाठी...स्वराज्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम शिक्षक होते. स्वराज्याच्या शाळेमध्ये ते सर्वांना महाराज्याचे धडे देत होते. त्यांचे मावळे स्वराज्याच्या वर्गात विद्यार्थी बनून त्यांचे धडे गिरवत गिरवत स्वराज्याची प्रगती करत होते. त्यांचा अभ्यास उत्तम झालेला होता. त्यामुळे सर्व नेहमी पास म्हणजे उत्तीर्ण होत होते. अधून मधून लढायांमध्ये त्यांची परीक्षा होती. त्यांच्या सरावाला अजिबात खीळ बसली नव्हती...

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उत्तम मावळे होते . ते स्वतः स्वराज्याचे पूर्णपणे भरलेले जोशपूर्ण आवाहन आपल्या मावळ्यांना करीत. एका मावळ्याने दुसऱ्या मावळ्याला केलेले आवाहन लगेच समजत होते.

छत्रपती शिवाजी महाराज... एक उत्तम शिक्षक प्रशिक्षक ... वक्ते.... आणि समुपदेशक.... होते. स्वराज्य संस्थापक होते. हिंदूंचे जागतिक मार्गदर्शक होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ते विश्वहिंदुह्यदय सम्राट होते....

शिवाजी महाराजांचे उदगार म्हणजे ...स्वराज्याचे
टणत्कार होते.
शिवाजी महाराजांचे पाऊल पुढेच पडत होते.
ते स्वराज्याच्या दिशेने पळत होते.
त्याच्यामागून पडणारी सावली स्वराज्याची माऊली होती.
त्यामागून चालणारे मावळे स्वराज्याचे बाहुबली होते.
स्वराज्याचा एक मावळा म्हणजे हत्तीच्या बळाचा. बाहुबलीच्या शक्तीचा...
शिवाजीराजांच्या भक्तीचा...
महाराष्ट्राच्या लाल, काळ्या ,तांबड्या मातीचा...
खरोखर ...खरोखर त्या वेळचे दिवस. हे स्वराज्याने मंतरलेले दिवस होते.

शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.....

शिवाजीराजे शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या मावळ्यामध्ये लोकप्रिय होते .तसेच ते एक वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांची भाषणावर मजबूत पकड होती आपल्या मावळ्यांना उस्फूर्तपणे लढण्यास त्यांचे बोलणे बळ देते. उत्तमपणे बोलून इतरांच्या मनावर स्वराज्य प्रेम सहजपणे बिंबवले जात होते. मावळे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचे उत्तमपणे राजे समुपदेशन करीत . जनतेच्या मनाला उभारी देत. त्यांच्या मनावर स्वराज्याचं चिन्ह उमटवून त्यांना स्वराज्यासाठी लढण्यास इच्छाशक्ती निर्माण करण्यास मदत करत. स्वतः शिवाजी महाराजांनी नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या रयतेला अनेक वेळा बाहेर काढले होते. त्यांच्या जीवनावर स्वराज्याची मोहोर उमटवली होती. नाडलेल्या, पिचलेल्या लोकांच्या जीवनावर स्वराज्याची मुद्रा बसवली होती. जे स्वराज्यात यायला तयार नव्हते. त्यांच्या बाबत कठोर पावले उचलून त्यांच्यावर स्वराज्याच्या ठसा उमटवला होता..

पन्हाळगडावर सिद्धी जोहर ने महाराजांना बंदी बनवले होते त्यावेळी पन्हाळगडावरून शिवाजी महाराज निसटले. नेताजी पालकरला त्यांनी सांगितले होते की तू तिकडे तुझ्या सैन्यानिशी ये. मात्र नेताजी पालकर तिकडे कुमक घेऊन उशिरा आले. त्यामुळे शिवाजी महाराज रागावले त्यांनी नेताजी पालकरला स्पष्टपणे.

नेताजी तुला आम्ही स्वराज्यातून बडतर्फ करीत आहोत. तुझा मावळे सन्मान आम्ही काढून घेत आहोत. , त्याचे कारणही तेवढेच होते. त्या लढाईत एक हजार माणसांचा बळी गेला होता. दुखावली ला नेताजी पालकर विजापूरकरांशी जाऊन मिळाला .त्यानंतर जयसिंग राजे यांनी नेताजी पालकरला मोगलांकडे वळवले. तो मुघलांचा सेवक झाला. नेताजी पाललकरचे नाव मोहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले. मात्र पश्चात्ताप झालेला नेताजी पालकर स्वराज्य मध्ये मध्ये पुन्हा येण्याचे साठी प्रयत्न करीत होता.

नेताजी पालकर यांचे मुसलमान धर्मातून हिंदू धर्मात शुद्धीकरण करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शिक्षण वृत्ती दिसून येते. शिवाजी महाराज जात-पात मानत नव्हते . सर्व माणसे समान आहेत. या त्यांच्या स्वभावामुळे किंवा विचारांनी शिवाजी छत्रपती महाराज त्यावेळी सर्व लोकांत लोकप्रिय होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या मातोश्रीने दिलेले शिक्षण. श्रीकृष्ण, श्रीराम आणि इतर वाचलेली पुस्तके यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण विचार प्रगल्भ होते.
शिकता शिकता ते स्वतः शिक्षक बनले.
शिकवता शिकवता स्वतः प्रशिक्षक बनले .
बोलता-बोलता स्वतः वक्ता बनले
समजूत घालता घालता स्वतः उत्तम समुपदेशक बनले.

नेताजी पालकरला उचित समुपदेशन करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे याबाबत त्यांनी इतर लोकांशी चर्चा केली. स्वतः नेताजी पालकर यांच्याशी राजांचे बोलणे झाले.त्यांचे विचार खुले होते. बहुजनांसाठी प्रेरक होते.

राजाच्या विचारांची आदानप्रदान निश्चितच उच्च कोटीची होती. त्यामुळेच धर्मांतरित झालेले नेताजी पालकर पुन्हा हिंदू धर्मात येण्यास तयार झाले. छत्रपति महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर औरंगजेबाने अतिशय कडक पावले उचललेली होती. दुसरा शिवाजी म्हणजेच ' प्रतिशिवाजी ' नेताजी पालकर आपल्या तावडीतून सुटू नये म्हणून औरंगजेबाने नेताजी पालकरचे धर्मांतर केले. त्यानंतर नऊ वर्ष नेताजी पालकर औरंगजेबाच्या सोबत होते. विविध मोहिमेवर जात होते. दहाव्या वर्षी त्यांना औरंगजेबाने महाराष्ट्रात मोहिमेसाठी पाठवले .त्यावेळी नेताजी पालकर त्याच्या तावडीतून निसटून रायगडावर शिवाजी महाराजांकडे जाऊन पोहोचला. मग शिवाजी महाराजांनी ठरवले की नेताजी पालकरचे शुद्धीकरण करायचे. त्याला पुन्हा हिंदू धर्मात आणायचे .
त्यानुसार नेताजी पालकरला पुन्हा हिंदू बनवण्यात आले. तो कार्यक्रम म्हणजे एक मोठा अद्भुत कार्यक्रम होता . हिंदू धर्मात पुनहा एक नवीन विचार पुढे आला होता.त्यामुळे मुसलमानांनी धर्मांतरित केलेली अनेक लोकं हिंदू धर्मात आली. सहाजिकच हिंदूंच्या धर्मांतराला थोडीफार खीळ बसली.इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधे अनेक मुसलमान सरदार होते. त्यांच्या तोफखान्याचा सरदार इब्राहिम लोदी होता. त्यामुळे शिवाजी महाराज धर्म व जातीची भेदाभेद करीत नव्हते हे दिसून येत होते.
नेताजी पालकरचे शुद्धीकरण केल्यानंतर शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला पूर्वीची कामगिरी दिली नाही .त्याला पूर्वीचे पद दिले नाही. नेताजी पालकरला त्याची अपेक्षाही नव्हती .

शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदू धर्मात घेतले. हेच मोठे पद दिले.
असे त्यांना वाटले. शिवाजी महाराजांचे विचार तो ओळखून होता. त्यामुळे दुसऱ्या पदावर काम करण्यात त्यांना काहीच कमीपणा वाटला नाही. शिवाजी महाराज सुद्धा नेताजी पालकरला जाणून होते. शुद्धीकरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नेताजी पालकरला थांबवित शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला घट्ट मिठी मारली. तेव्हा नेताजी पालकरला खूपच गहिवरुन आले. मात्र शिवाजी महाराज त्याला काही बोलले नाहीत. ते डोळ्यातले पाणी पुसत त्यांच्या महालात गेले. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरच्या खांद्यावर प्रेम भरल्या हाताने दोन-तीनदा थोपटले.तोच आशिर्वाद समजून नेताजी पालकर पुन्हा जोमाने स्वराज्याच्या कामाला लागले.
राजांनी स्वराज्यात राष्ट्रीयता निर्माण केली होती

त्यावेळी वातावरणात घोषणा विरल्या..
जय शिवाजी.... जय नेताजी... जय महाराष्ट्र...

शैक्षणिक बुद्धीचे महाकल्प असलेले छत्रपती शिवाजी महाराज उत्तम समुपदेशक होते हे निर्विवाद सत्य आहे.

राजे उत्तम वक्ते असल्यामुळे ते अनेकांशी उत्तम सुसंवाद साधत असत आणि शिक्षक आणि प्रशिक्षक असल्यामुळे हाती घेतलेले कार्य ते पूर्णपणे तडीस नेत

अनेक योजना आखून संकटातून सहीसलामत कसे बाहेर पडायचे यांचे आराखडे ते स्वतः तयार करीत. अतिशय गुप्तता बाळगुण शत्रूवर चाल करून जात. त्यात त्यांचा प्रशिक्षकपणा दिसत होता.

छत्रपती राजे स्वतः उत्तम शिक्षक प्रशिक्षक असल्यामुळे त्यांचे अनेक शिष्य तयार झाले होते. तेच त्यांचे मावळे होते. महाराजांनी स्वतःच्या बुद्धीने अनेक माणसे जोडली होती. नेताजी पालकर हे शिवाजी राजांचे नातलग होते. शिवाजी राजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे काका नेताजी पालकर लागत होते.

स्वतःच्या तल्लख बुद्धीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी तोरणागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. यातच सगळी प्रगती सामावलेली दिसते. स्वराज्याची स्थापना त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी केली.

योग्य वेळी आणि योग्य दिवशी शत्रूवर आक्रमण करणे. गरज पडेल तेव्हा शत्रूशी नमते घेऊन तह करणे .
ही गोष्ट शिवाजी महाराज परिस्थितीतून शिकले होते. शत्रूला नामोहरम करणे
फितुरी आणि दगा बाजी करणे.
शत्रूचा बीमोड करणे
या गोष्टी ते अनुभवाने शिकले होते.
कोणताही अनुभव हा माणसाचा मोठा गुरु असतो. मोठा शिक्षक असतो. ते स्वयंशिक्षण असते.ही गोष्ट अनेकांना माहीत आहे. जेव्हा अशा अनुभवातून, गोष्टीतून मनुष्य अनेक गोष्टी शिकतो .तेव्हा असा मनुष्य खूपच मोठ्या पदाला पोहोचलेला असतो. त्यावेळी त्यामध्ये दोन रुपे दिसून येतात .
असा मनुष्य किंवा व्यक्तिमत्व हे स्वतःच स्वतःचे शिक्षक झालेले असते.ते स्वतःच स्वतः मध्ये विद्यार्थी शोधत असतात.
म्हणजे ते स्वतः स्वतःला शिकवतात असतात.
स्वतःच स्वतःला घडवतात .
थोडक्यात अशी लोकं स्वतःमध्येच एक महाविद्यापीठ असतात. दुसऱ्या एका शब्दात अशा लोकांना ' स्वयंभू ' म्हणतात...

शिवाजी राजे साहित्यकार ,नाटककार, कलाकार, चित्रपटकार, शाहिर, शिल्पकार, चित्रकार, इतिहासकार, यांचे प्रेरणास्रोत आहेत. राजांचे राजब्रीद वाक्य राजमुद्रेवर कोरलेले आहे....

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते. पण त्यांना खूप अडचणी येत होत्या. त्यावेळी शिवाजी राजे हे नावाला राजे होते. त्यांच्याकडे तसे राजपत्र नव्हते. त्यांच्याकडे तशा राजमुद्रा नव्हत्या. त्यांच्याकडे तशी प्रशासकीय कागदपत्र नव्हती. आता आपल्याकडे आधार कार्ड आहे ,सातबारा आहे किंवा शालेय सर्टिफिकेट आहे. अशाप्रकारे त्यांचे स्वतःचे असे कोणतेच लेखी कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ते कोणाला आदेश देऊ शकत नव्हते . त्यामुळे त्यांचे कोणी आदेश मानत नव्हते .कारण शिवाजीराजे हे आदिलशहाचे जहागीरदार होते. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचे नोकर होते.

त्यामुळेच राजा म्हणून स्वतःची कागदपत्रे तयार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज कायदेशीररित्या होण्यासाठी स्वतःला राज्यभिषेक करण्याची गरज होती. राजांनी स्वतःला राज्याभिषेक केल्याने शिवाजी महाराजांना खूप अधिकार प्राप्त होणार होते . शिवाजी महाराज हे कुणबी होते .क्षत्रिय नव्हते. त्यावेळी क्षत्रियांना राजाचा अधिकार नव्हता. त्यासाठी शिवाजी महाराज राज्याभिषेकाला तयार झाले. जे लोक त्यांच्या या निर्णयाला तयार नव्हते .त्यांचे राजांनी समुपदेशन केले.
फक्त ' स्वराज्यासाठी ' असं म्हणत.
सर्वजण राज्य भिषेकाच्या तयारीला लागले. महाराष्ट्रातील अनेक सरदार शिवाजी महाराजांच्या विरोधात होते .त्यामुळे ते शिवाजी महाराजांचे सरदार म्हणवून घेण्यात कमीपणा मानीत .त्यामुळे राज्याभिषेक झाल्यामुळे सहाजिकच त्याच्यावर दबाव आणून शिवाजी महाराज अशा सरदारांना स्वराज्याचे सरदार म्हणून घोषित करू शकणार होते.
परंतु सध्या अनेक सरदार स्वतःलाच स्वयंघोषित राजे समजत होते. ते स्वतःला शिवाजी महाराजांचे सेवक बनवून घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे राजाने राज्यभिषेक करणे आवश्यक होते. ही गोष्ट राजानी समुपदेशक प्रशिक्षक आणि शिक्षक या नात्याने सर्वांच्या मनावर बिंबवली होती. त्या गोष्टीला नियोजित राजदरबार तयार झाला होता.

प्रतापगडा जवळ जावळीचा चंद्रराव मोरे यांची 160 वर्षाची सत्ता होती. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितले. तू स्वराज्यात सामील हो .परंतु उद्दाम चंद्रराव मोरे स्वराज्यात सामील होत नव्हता .उलट हळूहळू सर्व महाराष्ट्रात विखुरलेले मोरे होते.ते जावळीला एकत्र होऊ लागले होते. छ
शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी...
चंद्रराव मोरेंचे खरे नाव वेगळे होते. चंद्रराव ही त्यांना मिळालेली उपाधी होती. राजांनी चंद्रराव मोरे चा पाडाव करून त्याला स्वराज्याला जोडले होते.

राज्याभिषेकाचा दुसरा एक मोठा हेतू होता. तो म्हणजे स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणे. शिवाजी महाराजांकडे भरपूर धन होते. सैन्य होते .आरमार होते. मात्र कायदेशीररित्या महाराज किंवा सम्राट नव्हते. त्यांना तसे राज्यपद कोणी दिले नव्हते किंवा कोणी घोषित केलेले नव्हते. त्याच्याकडे तशी राज कागदपत्रे नव्हती. किंवा ते पूर्वापार राजे सुद्धा नव्हते. ती बाब अनेकांना खटकत होती. म्हणून अनेक जण शिवाजी महाराजांचे ऐकत नव्हते... राज्यभिषेकामुळे अशा गोष्टींना आपोआपच चाप बसणार होता . लोकांची तोंडे बंद होणार होती. राज्य विकासासाठी राज्याभिषेक होणे आवश्यक होते. मग उत्तरेकडून आमंत्रित केलेल्या गागाभट्टांनी शिवाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा केला .गागाभट्टांचे खरे नावे विश्वेश्वर पंडित असे होते. महाराष्ट्रामधील ब्राह्मण शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानत नव्हते. पण तो गागाभट्ट शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानत होता. तो राज्याभिषेक करायला तयार होता. त्याला महाराजांनी भरपूर दक्षिणा दिली होती सोने ,चांदी आणि रत्ने सुद्धा दिली. घोडे हत्ती....

सुरुवातीला तो राज्याभिषेक करायला तयार नव्हता. मात्र त्याला मोठी दक्षिणा मिळणार म्हटल्यावर तो तयार झाला. गागाभट्टांनी मग श्रीरामचंद्राच्या वंशावळी तून महाराजांची वंशावळ शोधून काढली. ते क्षत्रिय आहेत हे सिद्ध केले. मग एकच जल्लोष झाला . थोड्याच दिवसात शिवाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. ज्याच्या मस्तकावर छत्र आहे तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .
अशा घोषणा दिल्या गेल्या. सारा महाराष्ट्र आनंदाने बेभान झाला . ढोल-ताशांच्या धुमधडाक्यात राज्यभिषेक सोहळा पार पडला. साऱ्या महाराष्ट्राला एक राजा मिळाला . एक छत्रपती मिळाला होता
तो म्हणजे शिवाजी महाराज.... शिवाजी महाराज स्वराज्याचे खऱ्या अर्थाने आता झाले होते. त्यामुळे मराठी राजाचे आदेश आता इतरांना ऐकावे लागणारच होते. गागाभट्टांनी आणि छत्रपतीना राज्यभिषेक करून उत्तर कडे प्रयाण केले..

मात्र महाराष्ट्रातील लोकांनी सांगितले की गागाभट्टाने केलेला राज्याभिषेक चुकीचा आहे .त्यामुळे राजांनी पुन्हा महाराष्ट्रातील ब्राह्मणांकडून राज्याभिषेक करावे.छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक‌ असा होता की त्यामुळे राज्याभिषेकाचा वादच मिटणार होता. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाला तयार झाले.

कारण समुपदेशन काय होते. हे त्यांना ठाऊक होते .त्यांच्या निमित्ताने अनेकांचे समुपदेशन होणार होते. अनेकांचे समुपदेशन अगोदर सुद्धा झाले होते. शिवाजी महाराज समुपदेशकाच्या नात्याने राज्याभिषेकाला तयार झाले होते. त्यांच्या त्या कृतीने सर्व महाराष्ट्राचे दुहेरी समुपदेशन होणार होते. सर्वजण झोपेतून खाडकन पुन्हा जागे होणार होते. पुन्हा महाराष्ट्रातील लोकांना महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा पाहायला मिळणार होता. समुपदेशनाचे फायदे काय असतात ते लोकांनाही कळायला हवेत... समूपदेशनाचे दीर्घ परिणाम काय होतात . हे दरबार तील अनेकांना माहित पडावेत. त्याबाबत महाराजांनी जाणीवपूर्वक विचार केला होता. ची नाराज आहेत त्यांना राजी करण्याची आवश्यकता होती.

२४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा तांत्रिक आणि वैदिक पद्धतीने केला गेलेला राज्याभिषेक पार पडला. त्यामुळे पहिला राज्याभिषेक जे मानायला तयार नव्हते. ते दुसरा राज्याभिषेक पार पाडायला उपस्थित झाले होते. सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले. आपला जाणता राजा हा एक मोठा राजा आहे.हे पुन्हा लोकांना माहीत झाले. मात्र या दुसऱ्या राज्याभिषेकाला जास्त मंडळी उपस्थित नव्हती. तो एकदम साध्या पद्धतीने पार पडला.

साधी पद्धत म्हणजे वैदिक पद्धत... असे होय... आजही लग्न समारंभ कार्यात एकदम साध्या पद्धतीने लग्नकार्य करायचे झाल्यास .लोकं वैदिक लग्न पद्धतीचा आग्रह धरतात आणि साधी सोपी व स्वस्त खर्च पद्धत म्हणजे वैदिक पद्धत मानली जाते. याचासुद्धा पांयडा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता. त्याचा लोकांनी आपल्या मुला-मुलींची लग्ने लावण्यास फायदा करून घेतला . स्वतःची लग्ने सुद्धा लोकांनी वैदिक पद्धतीने लावून स्वस्त आणि कायदेशीर पद्धतीचा अधिक अवलंब करून त्या पद्धतीचा प्रसार केला . लग्नाच्या खर्च प्रथांना वैदिक लग्न पद्धतीने फाटा देऊन पैसे वाचवण्याचे लोकांना नकळतपणे शिकवले.

जरी शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक साध्या पद्धतीने केला गेला होता. तरी दुसरा राज्याभिषेक करावा लागेल असा आग्रह धरणार्‍या लोकांनी शिवाजी महाराजांकडून भरघोस दक्षिणा मिळवण्यासाठी तो खटाटोपीचा विचार पुढे आणला होता. अशी कुजबूज तेव्हाही ऐकायला मिळाली होती.शिवाजी महाराजांनी त्यामध्ये जास्त आढेवेढे घेतले नाहीत. त्यांनी तो आग्रह मान्य केला आणि सन्माननीय पद्धतीने स्वतःला दुसरा राज्याभिषेक करून घेतला.

खरंच शिवाजी महाराज खूप दयाळू होते आणि दानशूरही होते. त्यामुळे दुसऱ्या राज्यभिषेका निमित्ताने जे महाराजांवर रुसलेले लोकं होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणा व देणग्या, बक्षिसे देऊन त्यांचाही यथोचित मानसन्मान केला त्यांना मानवस्त्रे सुद्धा दिली. स्वराज्याला जे लोक मानायला तयार नव्हते. ते सुद्धा लोकं आता स्वराज्य मानायला तयार झाले . स्वराज्याची गाडी सुरळीतपणे मार्गावर येऊन कायदेशीररित्या धावू लागली. दोन राज्यभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या राजेपदावर व सम्राट पदावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याचा छत्रपतींना एक प्रकारे आपोआप फायदाच झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची पहिली राजगादी निर्माण झाली.
पुढील नेतृत्वासाठी शिवाजींच्या वारसांना ती गोष्ट अधिकच उपयोगी ठरली. भविष्यात होणारी भांडणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाने थोडीफार सोपी केली होती‌. जरी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला नसता तरी पुढेही भांडणे झालीच असती. ती होणारच होती.
त्यामुळे राज्याभिषेक करण्याशिवाय शिवाजी महाराजांना गत्यंतर नव्हते. मात्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात आणखी अधिक राजगाद्या निर्माण झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दुसरा राज्याभिषेक केला होता. तो तांत्रिक प्रकाराचा राज्याभिषेक होता... पहिला राज्याभिषेक सोहळा जो केला होता तो धार्मिक प्रकारचा होता...

छत्रपती राजांनी जो पहिला राज्याभिषेक सोहळा केला होता आणि त्यासाठी जे नाराज लोक होते. त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी हे होते. निश्चलपुरी गोसावी हे गागाभटांच्या विरुद्ध होते. गागाभट हे पंडित होते तर निश्चलपुरी हे गोसावी होते. निश्चलपुरींनी राजांना सांगितले की राजे गागाभट्टांनी जो राज्याभिषेक केला त्यामध्ये खूप उणीवा राहिल्या आहेत. त्यामुळे राजांनी निश्चलपुरी गोसावीसाठी दुसरा राज्याभिषेक सोहळा करण्याचा सन्मान दिला. निश्चल पुरी गोसावींनी जे राहिलेले कार्य होते ते केले. ग्रामदेवता स्थानदेवता या नावाने पानाचे विडे ठेवले. त्या त्या शक्तीप्रमाणे त्यांनी दुसरा राज्याभिषेक सोहळा केला. निश्चलपुरी गोसावी राजावर प्रसन्न झाले.राजांनी त्यांचा सुद्धा व्यवस्थित मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला. त्यांना उंची मानवस्त्रे दिली. त्याच राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी कवी भूषण यांनी राजांसाठी एक काव्य गायलं. ते काव्य संभाजी राजांचा मित्र कवी कलश श्रद्धेने ऐकत होते... कवी कलश शिवाजी राजांबद्दल वर्णन करीत काव्यगायनात म्हणाले की...

चार वर्ण धर्म छोडी कलमा निवाज पढी
शिवाजी न होतो तो सुंता होत सबकी..सुंता होत सबकी

ते काव्य गागाभट सुद्धा ऐकत होते. त्या काव्याने गागा भटांचा ऊर सुद्धा भरून आला . गागाभट्ट उत्तरेत गेले. तेव्हा त्यांनी कवि भूषण यांचं काव्य तिकडे खूप वेळा गाउन दाखवलं . त्यामुळे शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कशासाठी आहे. हे उत्तरेतील लोकांना समजलं. उत्तरेतील मुघलांचे अत्याचार सहन करणाऱ्या लोकांमध्ये त्यामुळे मोगलाईचा द्वेष संचार होऊन गेला... त्यांच्या भावना अत्यंत संतप्त झाल्या होत्या.

उत्तरेमध्ये शिवाजी महाराजांचा आदर आणि योग्यता आता खुपच वाढली होती.... शिवाजीराजांना राज्याभिषेकाचा असाही फायदा मोठा झाला होता. राज्याभिषेकाच्या उत्सवा वेळी अनेक कलागुणांना वाव दिला गेला. नृत्य, गायन ,पोवाडा,लावणी, तमाशा याप्रमाणे अनेक कलांची तिथे उधळण झाली..

राज्याभिषेकाच्या अनेक विधी आणि दानधर्म करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रायचित्त विधी सुद्धा करण्यात आले होते. आठ दिवस अखंड होम हवने झाली.
राजांकडून काही चुका झाल्या असतील...
कोणाचा मान अपमान झाला असेल .
त्याबद्दल प्रायश्चित विधी करण्यात आला होता...
मात्र राजे शांत होते. ते निश्चल होते .
त्यांची धर्मात ढवळाढवळ नव्हती. जे काही चालले आहे ते त्याने निमुटपणे करून घेतले. आपणाकडून प्रायश्चित विधी करून घेतला म्हणून त्यांना अजिबात राग आला नव्हता... राज्याभिषेकाच्या वेळी शस्त्रपूजा करून ढाल-तलवार भाला पूजन. धनुष्यबाण, तोफा, बंदुका यांचे सुद्धा पूजन केले गेले. सर्वत्र मंत्रघोष सुरू होते... त्याच वेळी अनेक घोषणा पैकी एक घोषणेचा ध्वनी अनेकांच्या कानावर पडला....

छत्रिय कुलावंतस गणाधीश गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुपतपादशाही श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...

त्यासोबत शिवाजी महाराजांच्या मुखातून ध्वनी बाहेर पडला.जय भवानी ....
त्याच्यापाठोपाठ मावळ्यांनी एकच जयघोष केला.
जय शिवाजी...
त्यावेळी गागाभट्टांनी. आश्चर्यचकित होऊन मावळ्याकडे पाहिले....
स्वराज्य राष्ट्र भूमीला छत्रपती मिळाल्याची ती ग्वाही होती. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येत होते. अनेकांचे ऊर त्यावेळी भरून आले होते. स्वराज्याचा अंधकार नष्ट झाला होता.
स्वराज्याचा प्रकाश सर्वत्र पडला होता.
तो राज्याभिषेक सोहळा अधिक उत्साहात झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सोहळा ६ जून. १६७४ ... साली झाला होता .

जो आजही महाराष्ट्रामध्ये रायगडावर अधिकृतपणे राज्याभिषेक सोहळा ६.जून रोजी दरवर्षी उत्साहाने व आनंदाने उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. त्यामध्ये हजारो लोकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सामील होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राज्यव्याप्ती कोकण, पश्चिम घाट ,सह्याद्रीच्या रांगा पासून नागपूर पर्यंत पुढे खानदेश पासून कर्नाटक तंजावर पर्यंत होती.