तिने वळून पाहिले तर ती गाडी सरळ तिच्या दिशेने येत होती. अजून जवळ जवळ आता अगदी तिला धडक बसेल इतकी जवळ आणि आपल्या डोळ्यावर हात घेऊन ती जोरात किंचाळली…..."आ…...ई….."
ती गाडी अगदी तिच्या जवळ येऊन थांबली. तिची ती अवस्था पाहून तो जोरात ओरडला… "जाई…"
त्याचा आवाज ऐकून तिने डोळ्यावरचा हात बाजूला कडून समोर पाहिलं तर यश धावत तिच्या जवळ आला होता. तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले तिच्या तोंडून फक्त ......"यश " इतकेच बाहेर पडले. त्याला पाहून तिचा हुंदका वाढला होता. तो तिच्या जवळ आला, त्याला तिची अवस्था पाहून तिची खूप काळजी आणि काहीशी भीती पण वाटत होती. त्याला काय बोलावे कळत नव्हते तिच्या दोन्ही हाताला खरचटले होते. पायाला लागले होते. त्याने तसेच तिला रस्त्याच्या बाजूला घेतले.
यश… "काय झाले जाई? तू इथे कशी?"
ती खूप रडत होती. रडता रडता फक्त ..."यश".... हेच दोन शब्द बाहेर पडत होते. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण तीच रडणं काही थांबत नव्हतं.
यश… "जाई शांत हो प्लिज, सांग मला काय झालं तुला?"
ती खूप घाबरली होती.त्याला तिची अवस्था कळत होती. म्हणून त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतले. तरीही तिचे रडणे थांबत नव्हते. तिला कसे शांत करावे त्याला सुचत नव्हते. ती अश्या निर्जन ठिकाणी कशी आली? तिची अशी अवस्था कशी झाली? नेमकं तिच्या सोबत काय घडलं? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात वादळ निर्माण करत होते आणि वादळ फक्त जाईच शांत करू शकत होती मात्र तिची अवस्था पाहून तो खूप अस्वस्थ झाला होता. मनात विचित्र विचार येत होते. तिला शांत करण्याचे हर एक प्रयत्न फेल झाल्यावर त्याने तिचा चेहरा त्याच्या हातात घेतला आणि अनपेक्षित पणे त्याने तिच्या ओठावर त्याचे ओठ टेकले.
क्षण भर सार जग जणू स्थिर झाले होते. वाहणारा वारा जणू थांबून त्या दोघांना निहाळत होता. तिचा हुंदका त्याच्या ओठावर विरून गेला होता. अचानक घडलेल्या ह्या जवलीकते मुले तिचे भान हरपले होते. क्षण भर साठी ती तिच्या वेदना विसरून गेली होती. तिने डोळे मिटले होते आणि तिच्या दोन्ही हातांची पकड त्याच्या शर्ट वर अजून घट्ट झाली होती. ती शांत झाली होती हे पाहून त्याने तिला विचारले परंतु ती तशीच डोळे मिटून निपचित पडली होती. तिचे हात खाली सरकून गेले त्याने तिला पकडले होते म्हणून ती खाली पडली नाही. अचानक ती बेशुद्ध झाल्यामुळे यश खूप घाबरला तसेच तिला उचलून त्याने त्याच्या बाईकवर ठेवले कसतरी ऍडजस्ट करून तो बाईकवर बसला मागून तिला स्वतःच्या पाठीवर रेलून बसवले आणि तिच्या ओढणीने तिला आणि स्वतःला बांधून घेतले. बाईक चालू केली आणि सरळ हॉस्पिटल गाठले.
मायनर ओटी चा दरवाजा बंद होता. बाहेर नितीन, यश आणि तिचे बाबा दारावर डोळे खिळवून बसले होते. अर्ध्या तासाच्या प्रतिक्षे नंतर तो दरवाजा उघडला गेला आणि तिघांनी एकत्र तिकडेच धाव घेतली. जाई बद्दलची काळजी त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती.
डॉक्टर बाहेर आले आणि कोणी काही विचारायच्या आतच म्हणाले, "काळजी करण्या सारखं काही नाही. जाई ठीक आहे आणि शुद्धीवर पण आली आहे. जास्त घाबरल्या मुले ती बेशुद्ध पडली असेल. फक्त तिच्या गुढग्याला थोडा मार लागला आहे. आठवड्या भरात होईल बरी."
बाबा...." आम्ही भेटू शकतो का?"
डॉक्टर ...."हो का नाही फक्त तिला वॊर्ड मध्ये शिफ्ट करू द्या."
जाईला शिफ्ट केल्यावर नितीन आणि बाबा दोघेही तिला भेटायला गेले. नेमका त्या वेळेस यशच्या आईचा फोन आला म्हणून तो बाहेर गेला. इकडे नितीन आणि बाबांना पाहून जाईला पुन्हा भरून आले. बाबांनी तिला जवळ घेऊन समजावले. मग तिने जे घडले ते सगळ्यांना सांगितलं. त्याच वेळेत यश पण तिथे आला आणि जाईच्या मुर्खपणावर तो तिला ओरडला.
"अक्कल आहे का तुला? किती घाबरलो होतो आम्ही. काकांनी सांगितलं होतं ना थांबायला का नाही थांबलीस? काही झालं असतं तर? इथे काकू सिरीयस त्याच टेंशन आणि दुसरीकडे तुला काय झालं असतं म्हणजे. काय गरज होती तुला एकटीने यायची? निदान आशूच्या घरी तरी सांगायचे ना ती आली असती सोबत पण नाही स्वतःच शहाणपणा करायचा ना?"
ती रडत आहे हे पाहून त्याने थोडं नमतं घेतलं,
"मी किती शोधलं तुला? वेड लागायचं बाकी होत."
स्वतःच्या डोक्यावर हात ठेऊन तो स्वतःलाच शांत करत होता. तर त्याचे खडे आणि रागाने बोललेलं बोल ऐकून जाईच्या डोळ्यांना पुन्हा एकदा धार लागली होती. त्याच्या ओरडण्यात लपलेली काळजी तिला दिसत होती. ती स्वतःला अपराधी समजत होती.
नितीन आणि बाबा फक्त त्याच्याकडे पहात होते. यश ने कधी त्यांच्या समोर एव्हढ्या मोठया आवाजात बोललेलं त्याना आठवत नव्हते. आणि आज त्यांच्या समोर तो त्यांच्याच मुलीला ओरडत होता. पण काय चुकीचं बोलत होता.त्याच वाक्य न वाक्य खरं होतं. त्यामुळे ते दोघेही शांतच होते.
आई आयसीयु मध्ये असताना नितीन चा यशला कॉल आला होता. नितीन ने त्याला आशूच्या घरून जाई ला सरळ हॉस्पिटल मध्ये आणायला सांगितले होते. यश त्या वेळी घराबाहेरच होता तसाच तो आशूच्या घरी गेला. आशूच्या आईने त्याला जाई मगाशीच निघून गेली असल्याचे सांगितले. त्याने तिचा फोन लावला पण तो लागत नव्हता. ती घरी पोहीचली असेल म्हणून त्याने घरच्या फोन वर प्रयत्न केला तिथेही कोणी उचलत नाही म्हणून तो पुन्हा तिच्या घरापर्यंत आला. आता त्याचेच डोके चालत नव्हतं जाई जर घरी जायला निघाली तर अजून पर्यंत घरी का नाही पोहोचली? आणि जर घरी नाही तर ती कुठे गेली? अचानक त्याला वाटलं की हॉस्पिटलमध्ये तर नाही ना गेली? तिथे जाऊनच समजेल म्हणून तो हॉस्पिटल कडे निघाला आणि जवळचा रस्ता सोडून मुद्धाम हुन त्याने तोच रस्ता पकडला जिथून जाई गेली होती. आता हा योगायोग की नशीब ते देव जाणो. पण जे होतं त्याने जाईच्या जीवावरच संकट दूर झालं होतं.
जाईला सगळा भूत काळ जसाच्या तसा आठवला. तिचे डोळे पुन्हा भरून आले. पुन्हा तिने त्या छताकडे पाहून ओरडून विचारले, "का यश का? ते काय होतं? तू का वागलास तेंव्हा तसा? मी काय समजू त्याला? माझ्या आयुष्यातील पहिला वहिला किस तू अजाणतेपणी चोरून घेतलास. जर तुझ्या मनात काही नव्हते तर का असा वागलास? मी वाहत गेले रे तुझ्यात. तुझं ते हक्काने ओरडणं, प्रेमाने जवळ घेणं काय होतं? सांग ना मला का नाही समजलं?"
एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घेर धरून नाचत होते. तिचे डोके जड झाले होते. उशी भिजून गेली होती. जाई चे डोळे रडून रडून थकले होते. ते तसेच कधीतरी निद्रेच्या आधीन झाले.
सकाळी 11 वाजत आले तरीही रोज लवकर उठणारी जाई काही उठली नव्हती. आई एक दोन वेळा पाहून गेली पण तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला उठवण्याचे धाडस काही झाले नाही त्यांचे.
तिचा फोन खणखणला आणि जाईच्या जड झालेल्या पापण्या थोडं त्रासून उघडल्या. स्क्रीन वर न पहाताच तिने तो कॉल रिसिव्ह केला. अजूनही थकलेल्या डोळ्यांच्या काठावर आसवे सुकलेली होती आणि पापण्या बंद करून ती बोलली… हॅलो
पलीकडून प्रतिसाद म्हणून आलेल्या आवाजाने तिचे डोळे खाडकण उघडले, एक झटक्याने ती उठून बसली आणि कानात प्राण आणून तो आवाज ऐकण्यात गुंग झाली
क्रमशः.......