Abhagi - 21 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | अभागी...भाग 21

Featured Books
Categories
Share

अभागी...भाग 21

सायली मधू चा ताप पाहून घाबरली तिने मधू च्या आई ला बोलावलं ..मधू च्या बाबांनी डॉक्टर्स ना घरी बोलावून घेतलं त्यांनी घरीच तिची ट्रीटमेन्ट सुरू केली..सायली ने अनु ला फोन करून हॉस्पिटल मध्ये जाऊन मधुर ला पाहून ये म्हणून सांगितलं..मधुची तब्येत खराब आहे त्यामुळे तूच जाऊन ये अस तिने अनु ला सांगितलं.. व ती पुन्हा मधू जवळ येऊन बसली..अनु हॉस्पिटल मध्ये जाऊन पुन्हा मधूच्य्या घरी आली.

अनु : सायली मला तर खूप भीती वाटतं आहे ग..

सायली: काय झालं अनु ? मधुर कसा आहे ?

अनु : काही ठीक नाही ग..तो कोमात आहे.. होश नाही आला तर काही पणं होवू शकत बोलत होते डॉक्टर्स..

सायली : बापरे ..हे सर्व काय झालं ग अनु ..बघ ना नेहमी हसणारी सर्वांना खुश ठेवणारी आपली मधू आज कशी एकदम शांत झालीय ..मला तर काहीच सुचत नाहीये काय करायचं ..मधुर लवकर ठीक होवू दे.

अनु : मला ही मधू ला अस पाहू वाटत नाही..मधुर ला काही झालं तर ..तर कसं सांगणार आपण तिला..?

सायली : ये अनु काही पणं नको बोलू काही नाही होणार त्याला..सर्व ठीक होईल.

अनु थोडा वेळ थांबली मधू जवळ व सायली तिच्या घरी जाऊन आली...सायली परत आली तेव्हा अनु तिच्या घरी निघून गेली.

दोन दिवस झाले होते ...मधू ला थोड बर वाटत होत..ती झोपली होती म्हणून ..सायली घरी जाऊन येते अस मधू च्या आई ला सांगून घरी निघून गेली..

मधू ला जाग आली होती..टेबलावर मधुर ची बॅग ठेवली होती..जी मधुर ने गार्डन मध्ये सायली जवळ दिली होती ..ती सायली कडेच होती अजून आणि सायली मधू जवळ असल्या मुळे बॅग ही तिथेच ठेवली ..मधू ने ती बॅग उघडली..त्यात तिला ..एक छोटा की पॅड चा फोन दिसला..तिने ओपन करून पाहिलं तर तो तोच फोन होता ज्या वरून मधुर मधू ला साया म्हणून मॅसेज करत होता..त्या फोन मध्ये फक्त मधू चा च नंबर सेव्ह होता..नंतर त्या बॅग मध्ये मधू ला एक डायरी सापडली ..तिने हळूच ती उघडली..

पहिल्या पानावर मधू चा फोटो होता..त्याच्या खाली एक ओळ लिहिली होती..

मधू my life..

मधूने हळूच आपला हात त्या ओळी वरून फिरवला..तिच्या डोळ्यात आसवे दाटून आली होती..पुढचं पान उघडून ती वाचू लागली..

मी मधुर..कधी मुलींच्या कडे नजर वर करून न पाहणारा..पणं आज आज मी तिला पाहिलं आणि कधी तिच्यात हरवलो कळालच नाही..किती छान आहे ती ..कॉलेज मध्ये तशा तर खूप मुली आहेत पणं पणं ती थोडी वेगळीच आहे .. साधी सरळ ना मे क अप..ना गर्व ..एकदम नैसर्गिक सौंदर्य ..जस आहे तस च राहते ती...खूप आवडली ती मला ..आणि माझ्या ही न कळत मी फक्त तिलाच पाहू लागलो..

मधू ने ते पान वाचलं हलकस हसू आल तिच्या ओठी ..नंतर पुढचं पान उघडून वाचू लागली..

आज मला तिचं नाव समजलं... व्हॉट अ को इन्सिडेन्ट ..तिचं नाव मधुरा आहे..आणि माझं मधुर...आमची नाव इतकी जुळतात...आता तर मला विश्वास च झाला..की ती माझ्या साठीच बनलीय पणं खर तर ती खूप सुंदर आहे आणि मी असा वेंधळा...पणं माझं मन नाही ऐकत आता माझं ..जिथे ती तिथे मी माझ्या ही न कळत जातो..तिला नाही पहिलं की बेचैन होत माझं मन काय करू ..हेच प्रेम आहे का?

मधू डायरी वाचत होती आणि तिचं मन भरून येत होत ..डोळ्यातून अश्रू ओघळ त होते... मधुर ची खूप आठवण येत होती तिला..नेहमी तो आपल्या आस पास असायचा पण आपण कधीच त्याचा विचार केला नाही ...कधी त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही ..त्याचा तिरस्कार केला ..हे आठवून मधू ला स्वतः वरच खूप राग येत होता...

एक एक पान उघडून ती वाचत होती आणि तिचं दुःख अनावर होऊ लागलं होत..
मधू वर माझं खूप प्रेम आहे पणं पणं तिला मी अजिबात आवडत नाही ..तिला बहुतेक राग येतो माझा..पणं मला खूप बोलू वाटत काय करू सुचत नव्हते म्हणून मी आज साया बनून बोललो तिच्या सोबत ..खर तर हिम्मत च होत नाही तिच्या समोर जाऊन तिच्या सोबत बोलायची..तिला मी साध आवडत नाही मग मी माझं प्रेम आहे तिच्या वर हे कसं सांगू तिला ? म्हणून विचार केला साया बनून तर बोलावं ..

मधू ने पुढचं पान उघडलं..

आज गम्मत झाली सायली ने माझ्या कडे फोन नंबर मागितले कॉलेज मधल्या मुलांचे ...माझ्या कडेच मागितले म्हणून बर झालं...कारण मी सर्वांचे नंबर दिले पणं माझाच दिला नाही...नाही तर आज च मधू ला काळल असत मीच साया आहे ..कारण माझा नंबर आणि मी साया म्हणून वापरतो ते दोन्ही नंबर मध्ये फक्त शेवटचे नंबर वेगळे आहेत नाही तर सर्व नंबर सेम च आहेत .वाच लो आज.. पणं..मधू ला कधी ना कधी सांगावं लागेल ..तिला काय वाटेल ..राग येईल का माझा ?

तेव्हा मधू ला आठवल हो त्यात मधुर चा नंबर च नव्हता..

क्रमशः