Abhagi - 20 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | अभागी...भाग 20

Featured Books
Categories
Share

अभागी...भाग 20

मधू गार्डन बाहेर निघून गेली मधुर ही तिच्या मागे पळतच गेला...गार्डन रस्त्याच्या कडेला च होत ..रस्त्यावर तशी जास्त वाहने नव्हती..मधू थोडी पुढे गेलीच होती की मधुर तिच्या मागे पळतच जाऊन बोलत होता..

मधुर : मधू ऐक ना ऐकुन तर घे..

पण मधू थांबली नाही..तेव्हा मधुर ही एका ठिकाणी थांबला व त्याने तिथूनच ओरडून तिला सांगितलं..

मधुर: मधू ,मीच तुझा साया आहे.

मधू ने ते ऐकलं .. मधुर ला आपल्या मुळे त्रास होणार असा विचार ती करत होती ..पणं मधुर च साया आहे ऐकुन तिला खूप आनंद झाला होता..मधुर चांगला आहे आपला चांगला मित्र होता..आपली मैत्री तुटेल अस वाटत असतानाच मधुर च बोलणं ऐकून मधुरा पुढे न जाता तिथेच थांबली...चेहरा आनंदाने उजळ ला होता तिचा..ती मागे वळून मधुर कडे पाहू लागली..मधुर ही तिथेच थांबून ती च एक्स्प्रेशन काय आहे साया तो आहे हे समजल्यावर हे आतुरतेने व डोळ्यात प्राण आणून पाहत होता... आजू बाजूच काहीच त्याला दिसत नव्हत..रस्त्यावर फक्त तो आणि मधू च आहेत असा भास त्याला होऊन तो एका ठिकाणी स्तब्ध झाला होता..त्याच्या मागून येणाऱ्या संकटाची चाहूल ही नव्हती त्याला..मधू वळली तशी तिला मधुर मागून येणारा ट्रक दिसला..बहुतेक त्या ट्रक ड्रायव्हर चा ट्रक वरचा ताबा सुटला होता...मधू घाबरून जोरात ओरडली म....... धू..... र...

पण मधुर ला काही कळण्या आधीच ट्रक ने त्याला उडवलं होत..मधू उभी होती अगदी तिच्या समोर च मधुर उडून पडला होता...रक्ताने भरलेला...मधू तर सुन्न झाली होती..ते सर्व पाहून मधू तर केव्हाच जमिनी वर कोसळली होती..सायली आणि अनु ही मधू व मधुर बोलत असताना गार्डन बाहेर येऊन थांबल्या होत्या ..जे झालं ते पाहून त्या ही घाबरून गार झाल्या होत्या ..भीतीने थरथरत होत्या ..मधू पडलेली पाहून त्या दोघी ही तिच्या कडे धावल्या..दोघी ही मोठ्याने रडत होत्या मधू ला उठवत होत्या..मधुर ला पाहण्याचा धाडस दोघित ही नव्हत..तो ट्रक ही पुढे जावून एक झाडा वर आदळून तिथेच बंद पडला होता..पूर्ण रस्ता भरून गर्दी जमली होती ... जो तो मधुर ला पाहून हळ हळ त होता.. अम्युबुलन्स येऊन मधुर ला घेऊन गेली...सायली ने मधू च्या चेहर्या वर पाणी मारून तिला जाग केलं ..मधू शुद्धी वर आली पणं ..मधुर ..मधुर ..इतकंच ती अडखलत बोलत होती..तो तिला समोर दिसला नाही तेव्हा तिने सायली ला विचारल त्याला हॉस्पिटल मध्ये नेल आहे सांगितल्या बरोबर तिघी ही हॉस्पिटल मध्ये गेल्या...मधुर ला icu मध्ये नेण्यात आल होत..पोलिस ही आले होते हॉस्पिटल मध्ये त्यांची चौकशी चालू होती..सायली ने मधू ला एका साईड ला बसवलं होतं..मधू अजुंन ही भीतीने थरथरत होती..

मधू: सायली ..मधुर ला काही होणार तर नाही ना ग? तुला माहितीये साया ..साया..मधुर च आहे ग..मी का त्याचं ऐकुन घेतलं नाही सगळं माझ्या मुळेच झालं ..माझी माझीच चुकी आहे..म्हणत म्हणत मधू ने आपल डोकं भिंतीवर आदळ ल ...खूप लागलं तिला पणं तिला त्याची शुद्ध च नव्हती..ती फक्त बड बड करत होती रडत होती..स्वतः ला दोष देत होती..सायली व अनु ला मधू ला सांभाळणं अवघड झालं होत सायली तरी ही तिला समजावत होती ..

सायली : मधू ,तू वेडी आहेस का ? अग काही नाही होणार मधुर ला तो ठीक होईल ..आणि यात तुझी काही चुकी नाही ग .. एक्सिडेन्ट होता तो...तू काय केलंस त्याच्या मध्ये ? मधू प्लीज अस नको स्वतः ला त्रास करून घेऊ..बघ काही नाही होणार मधुर ला ..
सायली मधू ला धीर देत होती पणं ती स्वतः ही रडत होती..अनु च्या तर तोंडातून शब्द ही फुटत नव्हता..साया ला भेटण्यासाठी आतुर असलेली ...आज च तर मधू आपल्या प्रेमाची कबुली देणारी होती ती ..किती खुश होती मधू सकाळी ..अनु ला मधू चा तोच चेहरा आठवत होता..आणि क्षणात सार उद्वस्त झालं होत...अनु अजून ही विश्वास बसत नव्हता..ती तर मधू ला समजावत ही नव्हती..

मधू मात्र अखंड ब ड ब ड करत होती..सायली मधुर ..मधुर ला काही होणार नाही ना ग...मला त्याला सांगायचं आहे ग..माझं प्रेम आहे त्याच्यावर..ऐकेल ना ग तो ..मला बोलायचं आहे त्याच्या सोबत..पाहायचं आहे त्याला..अस म्हणत मधू उठून जाऊ लागली..तशी सायली व अनु नी तिला अडवल ..मधू..सायली सोड जाऊ दे ना मला .. प्लीज ग एकदा बोलू दे मधुर सोबत.. प्लीज ग....म्हणत मधू दोघींना विणावत होती ..सायली ला मधू ची हालत पाहवत नव्हती..
हॉस्पिटल मधले डॉक्टर मधुर ला ओळखत होते त्यांनी मधुर च्या घरी फोन करून त्यांना बोलावलं होत..मधुर ची आई हॉस्पिटल मध्ये जोरात ओरडत आली..मधुर .. कुठाय माझा मधुर..काय झालं त्याला...म्हणून मोठ्याने आकांत करत होती..हे सर्व पाहून तर मधू पूर्णच सुन्न झाली..मधुर च्या आई चा आकांत पाहून मधू च्या कान ठील्या बसल्या गत झाल होत..मधुर चे बाबा त्याच्या आई ला समजावत होते..शांत हो ..काही होणार नाही .. डॉक्टर्स ना जेव्हा त्यांनी विचारल मधुर कसा आहे तेव्हा त्यांनी आता च काही सांगता येणार नाही..आम्ही प्रयत्न करू ..तुम्ही धीर धरा इतकंच सांगितलं..डॉक्टर चे शब्द ऐकुन मधू पुन्हा बेशुद्ध झाली..सायली व अनु ने पोलिस ना माहिती दिली ..मधू च मात्र त्यांनी नाव घेतलं नाही..तिच्या या हालत मध्ये तिच्या कडे चौकशी करू नये इतकंच त्यांना वाटलं होत..सायली , अनु मधू रात्र होत आली तरी अजून हॉस्पिटल मध्ये च होत्या ..मधू च्या आई चे फोन येत होते..खर तर सायली ला ही अस हॉस्पिटल मधून जायला नको वाटतं होत ..पणं मधू इथे राहिली तर तिची जास्त च हालत खराब होईल व घरी काय सांगणार याचा विचार करून सायली व अनु जबरदस्ती मधू ला घरी घेऊन आल्या..दरात मधूची आई मधू ला पाहून घाबरली..सायली व अनु ने तिला धरून आणले होते..मधू ची आई काय झालं म्हणून विचारू लागल्या..सायली ने आधी मधू ला रूम मध्ये सोडलं व नंतर त्यांना आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा रस्त्यात एका मुलाचा अपघात झाला व तो आमचा क्लास में ट होता ..मधू ने जवळून तो अपघात पाहिलं म्हणून घाबरली आहे अस मधू च्या आई ला समजावून सांगितलं..मधू च्या आई ला ही अपघाता विषयी ऐकुन खूप वाईट वाटलं त्यांनी मधुर कसा आहे विचारल ..अजून काही सांगता येणार नाही अस डॉक्टर्स बोलले आहेत म्हंटल्यावर त्यांनी ही देवाला हात जोडले .. व मधुर ला बर कर म्हणून प्रार्थना केली...मधू जवळ येऊन त्यांनी मधू ला जवळ घेऊन काही होणार नाही मधुर ठीक होईल म्हणून समजावलं...मधू मात्र सतत रडत होती...सायली मधू जवळ च राहिली व अनु ला घरी पाठवून दिल..रात्री मधू चे बाबा आले त्यांना ही आपल्या लाडू बाई चे हाल पाहून वाई ट वाटलं...त्यांनी ही उद्या हॉस्पिटल मध्ये जाऊन मधुर ला पाहून येऊ अस मधू च्या आई ला सांगितलं..रात्री सर्वांनी विनंती करून ही मधू जेवली नाही...मधू व सायली जवळ जवळ झोपल्या होत्या..मधू रडून रडून थकली होती ..सायली तिला समजावत होती..रात्री मधू ला रडता रडता झोप लागली पणं थोड्याच वेळात मधू जोरात ओरडत उठली ..तिला अपघाताचा प्रसंग जसाच्या तसा पुन्हा आठवला होता.. अंग पूर्ण घामाने भिजल होत..सायली ने तिला पाणी दिल.. व आपल्या मांडीवर तिचं डोकं ठेऊन पुन्हा तिला झोपवलं..झोपेत ही मधू मधुर ..मधुर म्हणून रडत होती...शेवटी मधू झोपली ..सायली ने तिला सरळ झोपवलं...सकाळी बराच वेळ झाला मधू उठलीच नाही..रात्री झोपली नाही म्हणून अजून थोडा वेळ झोप घेऊ दे अस म्हणून सायली ने तिला उठवलं नाही..पणं नंतर दहा वाजत आले ..तिने रात्री ही काही खाल्ल नाही म्हणून सायली तिला उठवायला गेली ..मधू च अंग तापाने फणफणत होत..सायली च्या अंगावर सर् कन काटा आला..तिने मधू ला उठवा य ला..आवाज दिले पणं तापात मधू ला शुद्ध नव्हती...सायली खूपच घाबरून गेली..

क्रमशः