Abhagi - 15 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | अभागी...भाग 15

Featured Books
Categories
Share

अभागी...भाग 15

वेरूळ लेणी पाहान्यासाठी पुढील प्रवास सुरू झाला..सर्व जण ओळीने लेणी पाहण्यासाठी गेले..आत जाताना तर सर्व जण ओळीने गेले पणं नंतर मात्र सर्व जण विखुरले .. जो तो ..त्याला जी मूर्ती आवडेल तिकडे जाऊन त्या मूर्ती सोबत सेल्फी घेऊ लागला..मधू तिकडी..म्हणजेच मधू ,सायली आणि अनु एक भव्य शिल्प पाहत उभ्या होत्या.त्यात रावण कैलास पर्वत हलवताना दिसत होता.आणि भगवान शिव उजव्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबत होते..पार्वती माता निर्भय दिसत होती तर रावण महाशय मात्र हतबल झालेले दिसत होते..आणि नंदी व इतर भक्तगण आनंदाने भजन करताना दिसत होते..आजू बाजूला दोन भव्य खांब होते त्यावर सुंदर नक्षी काम केलेलं होत...खूप सुंदर अस ते शिल्प होत...वेरूळ लेणी पाहून झाल्यावर त्या दिवशी सर्वांनी जवळच एक आश्रय ग्रह पाहून तिथेच मुक्काम केला..आज सर्वजण खूप थकले होते ..त्यामुळे सर्वजण जेवण करून झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर साठीच प्रवास सुरू झाला..
महाबळेश्वर हे सातारा जिल्यातील थंड हवेचे ठिकाण .. येथे वर्षभर हवामान थंड असते...बस च्या खोडकीतूने चहूबाजूला हिरवगार ,हिरवळ पाहून सर्व जण थक्क झाले होते ..खूपच आकष्रक होत ..महाबळेश्वर...महाबळेश्वर मध्ये एक ठिकाण अस होत जिथे एकदा आवाज की त्याचे सात वेळा प्रतिध्वनी ऐकू येत असे..सायली ने मधू ला खूप फोर्स करून साया च नाव घे म्हणून सांगितलं...मधू ही जोरात साया म्हणून ओरडली सर्व जण तिला पाहू लागले .. त स..तिने पुढे ली ..म्हटलं...तिचा आवाज साया...ली... असा सात वेळा प्रतिध्वनी त ऐकू आला..मग सर्वांना वाटलं ती सायली म्हणाली...सर्व जण आप आपले नाव घेऊन ओरडू लागले व प्रतिध्वनी ची गम्मत अनभवू लागले ..तिथून पुढे सर्व जण महाबळेश्वर मध्ये फिरण्या साठी गेले..महाबळेश्वर च्या पेठा गच्च भरलेल्या होत्या..सर्वत्र वेगवेगळ्या वस्तू ची दुकान गर्दीत आप आपल अस्तित्व टिकवन्याच प्रयत्न करत होते...सर्वांनी भरपूर शॉपिंग केली..पणं वस्तू इतक्या महाग होत्या की साध्या साध्या वस्तू ची किंमत ही तिपटीने जास्त होती तिथे..मधू ने ही स्ट्रोबे री .. चॉकलेट ..चिक्की बरच खरेदी केलं..मधू ला एक शॉप मध्ये एक कॅप खूपच आवडली होती ती घेणार च होती की सायली ने तिला ओढून तिथून नेल...तिथे त्यांनी नाश्ता केला..सर्वजण पुन्हा बस कडे आले मधू ने तिच्या सिट वर जावून पाहिलं तर तिथे तिचं कॅप होती जी तिला आवडली होती.. व खाली एक चिट होती.. फ्रॉम साया...मधू ला थोड नवल वाटलं पणं आनंद ही झाला..तिने ती कॅप डोक्यावर घालून पाहिली..नंतर काढून ..जवळ घेऊन बसली .. जेवण करून सर्वजण पाचगणी ला सन सेट पॉईंट पाहायला गेले...किती सुंदर दिसत होता सूर्य...आज वर इतकं सुंदर सूर्याचं रू प कोणीच पाहिलं नव्हत....पिवळा तांबूस..रंग चहू कडे पसरला होता..हळू हळू सूर्य मावळला ..सर्वजण तिथेच असणाऱ्या मैदानं कडे वळले पणं मधू च लक्ष ..टोकाला असलेल्या एका चाफ्याच्या झा डा कडे गेलं..त्यावर एक च फुल होत..मधू ला वाटू लागलं जसं ते फुल तिला बोलावत आहे..फुल फार आवडायची मधू ला ..ती त्या झाडाकडे गेली .. टाच उचं करून ते फुल घेण्याचा प्रयत्न करू लागली पणं ते थोड उंचावर होत ..ते काही तिच्या हाताला लागेना..ती तोल जाऊन पडणार इतक्यात कोणी तरी तिला स्वतः कडे खेचलं तशी ती त्याच्या छातीवर जावून आदळली ..मधुर होता तो..त्याने तिला घट्ट धरल होत म्हणून दोघे ही पडता पडता वाचले..मधुर तिला पाहून हरवून गेला..मधू च मग स्वतः ला सावरत दूर झाली.

मधुर : वेडी आहेस का मधू ? अग खाली तर बघ कसली दरी आहे ..पडली असतीस ना ? एका फुला साठी काय जीव द्यायला निघाली होतीस का?

मधू ने तेव्हा लक्ष देऊन पाहिलं की झाड होत तिथून खाली खूप मोठी दरी होती ..पणं फुलाच्या नादात तिचं लक्ष च नव्हत गेलं तिकडे..

मधू: सॉरी ..अरे मी पाहिलच ना..मला फक्त फुल दिसलं..

मधुर : बर इट्स ओके .पणं जरा सांभाळून या पुढे तर ..थांब मी काढून देतो म्हणून मधुर ने ते फुल तोडून मधू ला दिलं..मधू खुश झाली..मग दोघे ही मैदाना कडे निघाले.

तिथेच मैदानावर ग्रुप ग्रुप करून सर्वजण बसले ..कोणी गाण्याच्या भेंड्या खेळत होते..कोणी अक्टिंग करून दाखवत होते तर कोणी गिटार वाजवत होते..मधू ,सायली ,अनु मधुर ..विराज गॅंग .. व अजून थोडे जण यांचा ही ग्रुप रुमाल पासिंग चा गेम खेळत होते..मोबाईल वर गाणं सुरू करायचा व रुमाल एक मेका कडे देत जायचं गाणं स्टॉप झालं की ज्याच्या हातात रुमाल असेल त्याने त्याचं आवडत गाणं सर्वांना म्हणून दाखवायचं.. गेम स्टार्ट झाला आणि पहिलं मधू वरच नंबर आला ..सर्व जण मधू मधू म्हणून ओरडू लागले..मधू ने मग गाणं म्हणायला सू रू केलं...

अनदेखा अनजाना सा ..
पागलासा दिवाना सा..
जाणे वो कैसा होगा रे...
अनदेखा अनजाना सा..
पगलासा दिवाना सा..
जाणे वो कैसा होगा रे..
चोरी से चुपके चूपके ..
बैठा है दिल में छुपके..
जाणे वो कैसा होगा रे..

मेरे खयालो मे ना जाणे कीतनी..
तस्वीरें बनणे लगी...

मधू गाणं म्हणता म्हणता साया च्या विचारात हरवून गेली..मग सायली ने येऊन तिला हलवल.. व सायली पुढे गाऊ लागली..

बिन देखे हैं ऐसी बेचैनी .. तौबा..
ओये रब्बा..देखा तो जाणे क्या होगा?

मधू साठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या ...

क्रमशः