ATRANGIRE EK PREM KATHA - 43 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 43

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 43

रात्री जेवणाची वेळ झाली असते.. शौर्य आणि विराजची डायनींग टेबलवर नेहमीप्रमाणे मस्ती चालु असते.. शौर्यला लांबुनच अनिता येताना दिसते.. तसा त्याचा आत्तापर्यंत हसणारा चेहरा गंभीर झाला..

विराज : "ए शौर्य आता रडु नकोस.. तुझी मस्ती केली तर तु लगेच तोंड पाडुन बसतोस.."

नेहमी विराज सोबत आरग्युमेन्ट करणारा शौर्य आता मात्र शांतच बसतो..

विराज : "काय झालं??"

अनिता : "तुम्ही लोक जेवुन घ्यायच ना.. कोणाची वाट बघत थांबलात..??"

पाठुन अनिताचा आवाज ऐकताच विराज मागे बघतो..

विराज : "मम्मा तु आलीस??... आम्ही दोघे तुझीच वाट बघत होतो..."

अनिता : "का?? काय झालं??"

विराज : "खुप दिवसांनी आपण तिघ एकत्र आहोत.. म्हणुन विचार केला की एकत्रच जेवुयात.."

अनिताने इशारा देताच डायनींग टेबलजवळ असलेला त्यांचा नोकर तिघांना जेवण वाढु लागला..

अनिता : "तुझी झाली पेकिंग.. अनिता विराजकडे बघतच विचारते.."

विराज : "माझी कसली पेकिंग..?? दिल्लीला तर शौर्य चाललंय ना.."

अनिता : "तु पण बेंगलोरला चाललायस ना??"

विराज : "हो पण ट्युसडेला रात्री निघेल.. "

अनिता : "बर.."

शौर्य फक्त दोघांच बोलणं ऐकत होता..

विराज : "मम्मा ते उद्या शौर्य दिल्लीला जातोय.."

"डाळ",विराजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतच अनिता उभ्या असलेल्या नोकराला ऑर्डर देतच बोलते

डायनींग टेबलवर एक वेगळीच शांतता असते..

शौर्य हातात चमचा घेऊन ताटातील डाळ-भातासोबत खेळत एका वेगळ्याच तंद्रीत हरवलेला असतो..

विराज : "काय झालं ?? तु जेवत का नाहीस??"

शौर्यच विराजच्या बोलण्याकडे लक्षच नसत... तो वेगळ्याच तंद्रीत हरवुन गेलेला असतो..

विराज त्याच्या हाताला हात लावतच त्याला लागलेली तंद्री दूर करतो..

विराज : "काय झालं?? जेव."

शौर्य : "नाही नको.. भुक नाही.."

विराज : "आत्ता तर बोलत होतास खुप भुक लागलीय... मम्माला लवकर बोलावं.."

शौर्य : "ते मी असच बोलत होतो... तुम्ही जेवा...मी भुक लागेल तेव्हा माझं मी घेऊन जेवेल."

विराज : "नक्की??"

शौर्य : "हम्मम."

ताटाच्या पाया पडतच ते ताट थोडं दूर लोटतो.. बाजुलाच असलेल्या ग्लासातील पाणी संपवतच शौर्य तिथुन निघुन आपल्या रूमच्या दिशेने जाऊ लागतो..

अनिताच्या जवळ जाताच तो थांबतो...खिश्यातुन क्रेडिट कार्ड काढत तिच्या समोर ठेवतो..

"विर.. क्रेडिट कार्ड ठेवलय इथे..", अस बोलत शौर्य सरळ आपल्या रूममध्ये येऊन झोपतो..


खर तर त्याला झोप लागत नसते.. त्याला अस वाटत असत की त्याची मम्मा त्याला भेटायला येईल.. पण तस काही होत नाही.. विराजला सुद्धा काम खुप असल्यामुळे तो त्यात गुंतून जातो.. रात्रभर शौर्य एकटक दरवाज्याकडेच बघत रहातो. रात्र उलटुन जाते पण त्याची मम्मा काही येत नाही..

सकाळ सकाळी ज्यो त्याच्या खिडकी खालुन त्याला आवाज देत असते..

शौर्य खिडकीजवळ जातो.. तस ज्यो त्याला हात दाखवत खाली ये बोलते..

शौर्य : "पाच मिनिटांत आलो.."

शौर्य फ्रेश होतो.. सोबत ब्रूनोला घेत खाली ज्यो सोबत मॉर्निंग वॉकला जायला निघतो..

विराज : "कुठे चाललायस??"

शौर्य काहीही न बोलता विरचा हात पकडत त्याला सोबत नेतो..

विराज : "अरे कुठे नेतोस.."

शौर्य : "मॉर्निंग वॉकला.."

ज्योसलीन तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर लपुनच बसली असते..

दोघेही बाहेर येताच ज्योसलीन अचानक दोघांच्या समोर जात मोठ्या आवाजातच त्यांना गुडमॉर्निंग बोलते..

शौर्य आणि विराजला तिची अशी गुडमॉर्निंग करण्याची पद्धत माहिती होती.. पण ती बाहेर आहे हे फक्त शौर्यलाच माहीत होत.. त्यामुळे अस अचानक ज्योसलीन समोर आल्याने विराज घाबरतच मागे जात मागे असलेल्या पायरीला पाय अडकुन खाली पडतो..

तसे शौर्य आणि ज्योसलीन एकमेकांना टाळी देतच त्याच्यावर हसु लागतात.

विराज : "ज्यो कधी मोठी होणार ग तु... ?? किती घाबरलो मी.. "

शौर्य : "जेव्हा तु हिला अस घाबरायचं बंद झालास तर समजुन जा ज्यो मोठी झाली.. काय ज्यो बरोबर ना??"

ज्योसलीन : "एकदम बरोबर.."

"आणि काय विर तु हिला एवढं घाबरतोस मग अनघाला केवढं घाबरत असशील..?? विचार करून तुझं टेन्शन आलंय बघ आत्ता मला..",शौर्य हसतच विराजला चिडवतो


विराज : "तु मुद्दामुन केलंस ना शौर्य..?? तुला माहीत होतं ही बाहेर आहे ते.. तु थांब आणि ज्यो तु पण.. "

"ज्यो पळ इथुन", शौर्यने अस बोलताच शौर्यसोबत ज्यो आणि ब्रुनो दोघेही पळु लागले..

विराज दोघांच्या मागे पळु लागला..

तिघेही पार्कमध्ये येऊन पकडा पकडी खेळु लागले आणि सोबत ब्रुनो पण..

"विर मला पकडणं मुश्कील आहेरे.. उगाच दमशील तु.", अस बोलत शौर्य विरला अजुन चिडवत होता..

शौर्य काही हाताला लागणार नाही हे विराज जाणुन होता..

विर पोट धरतच पार्क मध्ये असलेल्या बेंचवर बसतो..

"आ.. मम्मा पोट दुखतंय..",विर कळवळू लागतो..


"विरsss.. काय झालं??", शौर्य पळतच विर जवळ येतो..


"अरे शौर्य तो एक्टर आहे.. विसरलास काय??", ज्योसलीन अस बोलेपर्यंत विराजने शौर्यला पकडलं..


शौर्य : "विर यार अजुन पण तु लहानमुलासारखं रडतोस.. शेम ऑन यु.."

"हो का...? आणि तु आपल्या मोठ्या भावाला त्रास देतोस.. शेम ऑन यु टु.."आपला एक हात शौर्यच्या गळ्या भोवती धरत.. शौर्यचा उजवा हात नेहमीप्रमाणे पाठी मुरगळच बोलला..


शौर्य : "विर हात दुखतोयना यार.. तुला उजवाच हात का भेटतो माझा.."

विराज : "अजुन बरा नाही झाला.."

शौर्य : "नाही.. तु हात सोड बघु.."

विराज लगेच शौर्यचा हात सोडतो..

ज्योसलीन : "ए विर सॉरी.. तुला माहिती मी नेहमीच अशी येते.. पण मज्जा आली तुला घाबरवायला.. हो ना शौर्य.."

ज्यो हसतच शौर्यला टाळी देत बोलते..

विराज : "कसली मज्जा ग.. एखादं हार्ट पेशंट असतना तर ते तुझ्या अश्या गुड मॉर्निंगने तिथल्या तिथेच तुला गुड बाय करून वर जाईल.. "

विर अस बोलताच शौर्य ज्यो ला हसु लागतो..

शौर्य : "ए ज्यो मी तुला एक सजेशन देऊ.. एकदा तुझ्या त्या रॉबिनला तु अस गुडमॉर्निंग कर ना.. त्याची काय रिएक्शन मिळते ते बघुयात.."

ज्योसलीन : "त्याला करायला आवडल असत पण कस आहे ना तो तुझ्या ह्या विर सारखा घाबरा अजिबात नाही.. माणुस अस घाबरल की मज्जा येते रे.. "

शौर्य : "Excuse me.!! माझ्यासमोर माझ्या भावाचा असा अपमान मी सहन नाही करू शकत.. "

विराज : "ए ओव्हर एक्टर.. बस हां.. मघाशी तु पण हिच्यासोबत होतास हे विसरतोयस तु.."

शौर्य : "हो पण ते मगाशी.. बट आत्ता तुझ्यासोबत आहे मी.. विर तु फक्त बोल काय करू तुझ्यासाठी ते. एक काम करतो हिच्या स्कुटीची हवाच काढुन टाकतो.. म्हणजे ही त्या रॉबिनला भेटायला जाऊच नाही शकत.. रॉबिन माझा रॉबिन करत ही रडत घरीच बसेल.. ही रडली की मग आपला बदला पुर्ण.. काय बोलतोस... नाही तर एक काम करतो हिचा मोबाईलच लपवुन ठेवतो.. "

ज्योसलीन : "शौर्यsss तुsss तु माझ्या स्कुटीलाच काय माझ्या मोबाईलला सुद्धा हात नाही लावायचा हा.."

शौर्य : "मी स्कुटीला हात थोडी लावणार आहे.. एक पिन टोचनार आहे फक्त.."

ज्योसलीन : "इडियट मला तेच बोलायच होत.."

विराज : "शौर्य ही तुला इडियट बोलली यार.. आत्ता तर तु काढच हिच्या स्कुटीची हवा आणि हिचा मोबाईल पण घे खेचून हिच्या हातातुन.."

शौर्य : "ज्यो हुकूम मेरे आका."

ज्योसलीन : "तुम्ही दोघे मिळुन मला त्रास देतायत ना.. शौर्य तु तर थांबच... माझ्या स्कुटीची हवा काढतोस ना.. आंटीलाच तुझं नाव सांगते मी... मग बघ तुझी हवा कशी निघेल ती.."

शौर्य : "माझंच का?? सोबत विर पण होता.. सांगतेस तर दोघांच नाव सांग.."

"विर तर आंटीचा लाडका आहे.. त्याला थोडीना आंटी कधी ओरडणार.. ओरडले तर तुलाच ओरडतील.. तस पण तु रडलास तर विर पण रडेल.. माझा शौर्य.. माझा शौर्य करत..", ज्योसलीन पण शौर्यला चिडवत बोलली.


विराज : "ए ज्यो.. तो मस्ती करतोयना..? काढली का त्याने स्कुटीची हवा.. लगेच काय तुझं मम्माला नाव सांगते.. लहान आहे का आत्ता तु??"

ज्योसलीन : "मग मी पण मस्ती करतेय... मी तरी कुठे गेली कम्प्लेन्ट करायला.. "

शौर्य : "तुझा काय भरोसा नाही ग.. तु कधी काय बोलशील नि काय करशील कोणी सांगु नाही शकत.."

तिघांचीही मस्ती, मज्जा चालू असत..

जवळपास एक दीड तासाने शौर्य आणि विराज घरी येतात..

शौर्य फ्रेश होऊन नाश्ता वैगरे करून आपल्या रूममध्य येऊन झोपतो..

विराज : "ए शौर्य उठ."

शौर्य : "विर झोपु दे.. प्लिज.."

विराज : "मला काय आहे झोप.. अर्ध्या तासाने फ्लाईट आहे तुझी.."

शौर्य डोळे उघडुन मोबाईल हातात घेऊन त्यात टाईम बघतो तर दिडच वाजला असतो..

शौर्य : "विर काय यार.. खोटं बोलतोस.."

विराज : "आत्ता उठलाच आहेस तर फ्रेश हो आणि चल खाली जेवायला..."

शौर्य : "मी रूममध्येच जेवणार माझ्या..मी नाही येणार खाली.. "


शौर्य उठुन तोंडावर पाणी मारतच बोलला..

विराज : "ठिक आहे मग दोघांच जेवण इथेच मागवतो.."

शौर्य : "हम्मम."

विराज आणि शौर्य दोघेही रूमवरच गप्पा मारत जेवतात..

विराज : "उद्या पासुन ह्या घरात माझं लक्ष नाही लागणार.. दोन दिवस सवय झाली तुझी.."

शौर्य : "लॅपटॉप आहे ना तुझा.. त्यात होशील बिजी.."

विराज : "आत्ता एकटाच असल्यावर तेच करावं लागेल.. तुझी झाली का पेकिंग??"

शौर्य : "पेकिंग काय करायचीय.. सगळं सामान तर हॉस्टेलवरच आहे माझं.."

"मी येतो तोपर्यंत तु तैयार होऊन बस.", अस बोलत विराज आपल्या रूममध्ये जातो..


थोड्या वेळाने तैयार होऊन तो शौर्यच्या रूममध्ये येतो..

"हे काय आहे विर??",विराजच्या हातात असलेली हॅन्डबेग बघतच शौर्य त्याला विचारतो


विराज : "ते USA वरुन येताना तुझ्यासाठी मी काही शर्ट आणि टीशर्ट घेऊन आलोय आणि जॅकेट पण आहे त्यात.. दिल्लीत खुप थंडी असते.. रात्रीच कुठे बाहेर निघालास तर घाल. चॉकलेट्स आणि खाऊ पण आहे. तुला आणि तुझ्या फ्रँड्सना.. सगळ्यांनी मिळुन खाव.."

शौर्य : "कपडे इथेच राहू दे.. जॅकेट आणि खाऊ घेऊन जातो.. तिथे हॉस्टेलमध्ये ठेवायला जागा नाही यार.."

विराज : "मी एवढं प्रेमाने घेऊन आलोय.. मला नाही माहीत तु घेऊन जातोयस ही बेग.."

शौर्य : "अरे यार.. बर ठिक आहे.."

विराज : "आणि हे माझं डेबिटकार्ड आहे.. पिन मी तुला व्हाट्सएप करतो.. तसे पैसे आहेत ह्यात. पण जर गरज लागली तर सांग मी ट्रान्सफर करेल.. आणि ही तुझी फ्लाईट तिकीट.."

शौर्य : "थेंक्स.. निघुयात??"

विराज : "हम्मम.. मम्माला सांगुन ये निघतोयस ते.. मी खाली आहे तुझी वाट बघत.."

शौर्य : "नको ना..विर.. आत्ता नको प्लिज.. मम्मा मला अजुन काही तरी बोलेल... नाही तर मीच तिला काही तरी बोलेल.. मग तेच विचार सारखे सारखे डोक्यात येत रहातील माझ्या.."

विराज : "शौर्य मम्मा आहे ती.. तिला अधिकार आहे तुझ्यावर रागवायचा आणि तुला ओरडायचा. पण तु तिला उलट सुलट बोलु नकोस काही.. तिला त्रास होतो नंतर.."

शौर्य : "आणि मला.??"

विराज : "हे बघsss.."

"राहू दे.. येतो भेटुन मी तिला..",विराजला मध्येच तोडत बोलला शौर्य)).

विराज : "मी तुझी ही बेग घेऊन जातोय.. मम्माशी बोलुन झाल्यावर ये खाली.."

शौर्य : "हम्मम.."

शौर्य अनिताच्या रूममध्ये जातो.

अनिता लॅपटॉपमध्ये काही तरी करत होती..

"मम्माsss मी निघतोय..", शौर्य अनिताच्या पायात पडतच तिला बोलतो.


अनिता लॅपटॉपमध्येच आपली नजर स्थिर ठेवत आपलं काम करत रहाते..

शौर्य : "मम्मा तुला नाही बोलावसं वाटत का ग माझ्याशी..₹₹ एवढ कठोर का वागतेस तु माझ्यासोबत. "

तरीही अनिता काहीच बोलत नाही..

शौर्य : "खुप त्रास होतोय ग मला.. यु नॉ मला अस वाटत होतं की मी काल उपाशी झोपु नये म्हणुन तु रूममध्ये येशील माझ्या.. बेडरूमच्या डॉरला मी डोळा लावुन तुझी वाट बघत जागाच होतो.. ज्योसलीनने आवाज दिला ना बेडरूमच्या खिडकी खालुन तेव्हा कळलं की सकाळ झाली सुद्धा.. पण आपली मम्मा आपल्याला भेटायलाच आली नाही.. बट यु डोन्ट केअर.. हेच जर विर अस उपाशी झोपला असता तर?? तेव्हा पण तु असच केलं असतस...??"

अनिता लॅपटॉपवरची नजर हरवुन आता शौर्यकडे बघु लागली.

अनिता : "तुला बोलायच काय आहे??"

"जे तुला कळतंय तेच.. बाबा गेल्यानंतर मला माझी मम्मा कधी कळलीच नाही ग.. बाबाच प्रेम नाही पण तुझं प्रेम तरी कुठे मिळतय मला.. कधी समजुनच घेतच नाहीस तु मला.. माझ्या प्रत्येक गोष्टीचा तुला त्रास होतो.. तसही मी नाही इथे आत्ता तुला त्रास द्यायला.. तुझी आणि विरची काळजी घे.. येतो..", शौर्य तिथुन निघून जातो पण त्याच बोलणं मात्र अनिताच्या हृदयावर करून गेलेलं असत...


ती शेखर गेल्यानंतरचा सगळा काळ आठवुन एकटीच एका खोल विचारात हरवुन जाते.. शौर्यपेक्षा आपण खरच विराजच्याच आत्तापर्यंतच्या प्रत्येक शब्दाला महत्व दिल अस तिलाही कुठे तरी वाटु लागलं.. डोळ्यांतुन येणार पाणी पुसतच ती गेलरीत जाते..

शौर्य गाडीत बसणार तोच त्याने एक नजर अनिताच्या खिडकीवर फिरवली..

अनिता खिडकीतुन त्याला हात दाखवत बाय करत असते

शौर्य आपले डोळे पुसतच तिला बाय न करताच गाडीत जाऊन बसतो..

विराज : "सिट बेल्ट."

शौर्य : "हं"

विराज : "शौर्य सिट बेल्ट लाव तो"

शौर्य सिट बेल्ट लावणार पण त्याचे हात तिथेच थांबतात..

"आलोच", अस बोलत तो गाडी बाहेर पडत पळतच अनिताच्या रूममध्ये जातो..

अनिता दोन्ही हाताने त्याला जवळ बोलवते... तस शौर्य जाऊन तिला बिलगतो..

अनिता : "आय एम सॉरी.. मी थोड जास्तच रुडली वागले तुझ्यासोबत.. "

"तु मम्मा आहेसना माझी.. तुला अधिकार आहे माझ्यावर रागवायचा. मला ओरडायचा.. माझ्या बोलण्याचा नको एवढा विचार करुस.. त्रास होईल तुला.. माझं काय.. मला नाही काही वाटत..", येणार रडु आवरतच शौर्य तिला बोलतो

" काळजी घे तुझी.. तुझ्या विरची.", अनिता शौर्यच्या बोलण्याचा जास्त विचार नाही करत


अनिता : "सांभाळुन जा.."

शौर्य : "हम्मम.."

फायनली शौर्य निघाला घरातुन दिल्लीला येण्यासाठी..

विराज शौर्यला सोडायला एअरपोर्टपर्यंत आला..

शौर्यला आता विराजचा निरोप घेताना जड जात होत आणि विराजला शौर्यचा..

दोघेही मिठी मारून एकमेकांवरच असणार प्रेम व्यक्त करत होते..

"काळजी घे आणि ह्यापुढे मारामारी अजिबात नाही..",शौर्यचे डोळे पुसतच विराज बोलला..


शौर्य : "विर एक रिक्वेस्ट होती.. "

विराज : "बोलणं.."

शौर्य : "तेss नेक्स्ट टाईम दिल्लीत येताना जरा सांगुन ये म्हणजे मी थोडा प्रिपेर राहिल.."

विराज : "शौर्य.. तु सुधारणार नाहीस.. तु थांबच.."

विराज काही करेपर्यंत शौर्य तिथुन हसतच पळाला..

"ए विर... आय लव्ह यु... माय जान..",आत जाताच पाठी वळुन शौर्य मोठ्याने ओरडतच विराजला बोलतो.. एअरपोर्टवरील सगळी मंडळी विराजकडे आणि त्याच्याकडे बघु लागतात..

"लव्ह यु टु.", विराज पण हसतच त्याला बाय करतो..

आणि आपल्या गाडीत येऊन बसतो..

दोन मिनिटं हात गाडीच्या स्टेरींगवर ठेवतच तो रडतो.. एक खोल श्वास घेऊन तो आपल्या घरी येतो..

जवळपास दोन तासांच्या प्रवासाने शौर्य दिल्लीला पोहचतो..

विमानातुन बाहेर येताच तो फोन स्विच ऑन करत तो विराजला फोन करून कळवतो..

त्याच्याशी बोलतच तो बाहेर पडत असतो..

त्याची मित्रमंडळी त्याला सरप्राईज द्यायला एअरपोर्टवर त्याची वाट बघत उभी असतात.. पण एवढ्या माणसात शौर्य दिसणं कठीण वाटत असत..

तोच समीराला लांबुनच शौर्य येताना दिसतो.. आणि त्याच्या त्या लुककडे बघतच राहते..

कानात घातलेलं हेडफोन.. वर हसतच तो फोनवर बोलताना त्याच्या गालावर आलेली खळी.. त्यात त्याने घातलेला तो स्कायब्लु कलरचा शर्ट त्याला अगदी उठुन दिसत होता.. समीराची नजर खर तर त्याच्यावरून आज हटतच नव्हती..

राज : "गाईज शौर्य. काय भारी लुक ठेवतो रे.. कॉलेजमध्ये अगदी सिम्पल रहातो.."

वृषभ : "हो ना."

समीरासारखच सगळेच त्याच्या त्या न पाहिलेल्या लुककडे बघतच रहातात..

तोच एक मुलगी शौर्यच्या मागुन येते.. शौर्य आपली बेग तशीच हातात पकडत खुप वेळ त्या मुलीकडे बघु लागतो.. जशी तिची ओळख पटते तस हातातील बेग तशीच खाली ठेवत तो तिला मिठी मारून भेटतो.. जवळपास पंधरा वीस मिनिट दोघेही एकमेकांसोबत बोलत असतात.. शौर्य खिश्यातून मोबाईल काढत तिला काही तरी दाखवत असतो.. जणु मोबाईल नंबर एक्सचेंज होत असतात दोघांचे.. पुन्हा एकदा ती मुलगी त्याला मिठी मारत बाय करत तिथुन निघुन जाते..

टॉनी : "कोण असेल रे ती??"

रोहन : "आल्यावर विचारुयात.."

"दिसायला एकदम हॉट आहे ना यार ती", राज वृषभच्या गळ्यात हात टाकतच बोलतो..

वृषभ : "तुला सगळ्याच तश्याच दिसतात रे",

टॉनी : "तुला पण सगळ्या तश्याच दिसतात.. उगाच सभ्यपणा नको दाखवुस"

वृषभ : "कोणत्याही मुलीला बघुन मी हॉट हा शब्द वापरला असेल हे मला आठवत नाही",

राज : "पहिल्याच दिवशी समीराला बघुन काय बोललेलास"

राज अस बोलताच वृषभ समीराकडे बघतो..

समीरा आपल्या भुवया उडवतच वृषभला काय बोललास म्हणुन नजरेनेच विचारत असते..

वृषभ : "तुला खरच अस वाटत मी अस काही बोलेल का??".

राज : "वृषभ ओव्हर एकटिंग होतेय मित्रा".

"राज नको ती मस्ती नको ना यार.. समीरा मी काहीच कमेंट पास केली नाही.. हि लोक उगाच काहीही बोलतायत", वृषभ थोडं भडकतच बोलतो..

"तु एवढं भडकतोयस का त्यांच्यावर??", सीमा

"सॉरी", वृषभ राज आणि टॉनीकडे बघतच बोलतो..

"सॉरी बोलायच असेल तर तु समीराला बोल.. तिच्याबद्दल तु बोलत होतास", राज पुन्हा वृषभला भडकवतच बोलतो..

"का त्रास देतोयस त्याला??", रोहन आपल्या शर्टाच्या बाह्या फोल्ड करत आपला एंग्री लुक राजला दाखवतच बोलतो.. तस राजच्या चेहऱ्यावरच हसुच गायब होत..

सगळे शांत बसुन शौर्य कधी येतोय ह्याचीवाट बघत बसतात..


शौर्य कानात गाणी ऐकतच एअरपोर्टच्या बाहेर पडणार तोच त्याच लक्ष समोर उभ्या असलेल्या त्याच्या मित्र मंडळींनकडे जात.. सगळ्यांना अस एकत्र बघुन शौर्य खुश होतच त्यांच्या जवळ जातो..


"काय मग बर्थडे बॉय.. विष यु हॅप्पी बर्थडे मित्रा", टॉनीला हात मिळवतच त्याला गळे मिळतो..

टॉनी : "थेंक्स यार.."

एक एक करत तो सगळ्यांना भेटत असतो पण त्याची नजर मात्र समीराकडे असते.. फक्त मनवीला सोडुन तो बाकी सगळ्यांना हाय हॅलो करतो आणि समीराजवळ येतो..

"कशी आहेस..?? मिस केलंस मला..", फक्त समीराला ऐकु जाईल इतक्या हळु आवाजात तो बोलतो.

समीरा मानेनेच हो बोलते..

रोहन : "ए शौर्य सरप्राईज कसं वाटलं तुला??"

शौर्य : "खुप मस्त.. बाय दि वे आयडिया कुणाची..??"

रोहन : "एकच्युली हे मनवीने सुचवलं म्हणजे तु पुन्हा एअरपोर्टवरून एक तास ट्रॅव्हल करून येणार.. त्यापेक्षा तुला इथुनच पिकअप करूयात म्हणजे टाईम वाचेल.."

शौर्य रोहनच्या बोलण्यावर काहीच रिएक्शन देत नाही..

आपलं हेडफोन काढत तो आपल्या बेगेत ठेवत असतो..

रोहनच्या गाडीत बसुन सगळे बिचवर जायला निघतात..

रोहन : "शौर्य तुझ्या भावाचा राग बघता मला म्हणजे आम्हां सगळ्यांना अस वाटत नव्हतं की तु परत येशील इथे.."

शौर्य : "मला पण नव्हत वाटत पण आत्ता आलोय ना मी.. मग तो टॉपिक नको.. तस पण आज टॉनीचा बर्थडे आहे.. बर्थडे थोडा हटके झाला पाहिजे.. "

राज : "हो ना.."

शौर्य : "गाईज राज आता त्याच्या खास मित्रासाठी एक सुंदर अस गाणं गाणार आहे.. सो त्याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे"

राज : "कश्याला उगाच मला गाणं गायला सांगतोय?? पळून जातील ही लोक"

(राज शौर्य आणि वृषभला ऐकु जाईल अस बोलतो)

शौर्य : "गाईज राज ला टॉनीसाठी एक नाही तर दोन गाणी गायचीत.. अस तो आत्ता माझ्या कानात बोलला"

वृषभ : "हो आणि हे मी पण ऐकलं"

राज : "एक मिनिट मी अस काही बोललो नाही.. शौर्य तुझं ना आल्या आल्या मला त्रास द्यायला सुरू झालं.."

गाडीत आत्ता मज्जा मस्ती चालू झाली..

(पार्टीची धम्माल अजुन बाकी आहे..भेटूया पुढील भागात..हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल