Nayan-Tara - 1 in Marathi Love Stories by Vishal Chaudhari books and stories PDF | नयन-तारा... एक अधुरी प्रेमकहाणी.... - 1

Featured Books
Categories
Share

नयन-तारा... एक अधुरी प्रेमकहाणी.... - 1

प्रेम म्हणजे काय? माझ्या शब्दात प्रेम म्हणजे एक विश्वास एक भावना, ....आता प्रेमाचा बाबतीत प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे. पण प्रेमाचा बाबतीत एक गोष्ट सर्वांसाठी सारखीच, प्रेम हे सर्वांनाच मिळते असे नाही, प्रेम मिळवण्यासाठी पूर्वजन्मा ची पण साथ हवी.. कधी कोणाला प्रेम मिळाले तर समजावं, ते प्रेम मिळवण्यासाठी त्याने या जन्मातच नाही तर मागच्या जन्मा पासून प्रयत्न केले असेल आणि त्या प्रयत्नाचे फळ त्याला या जन्मात भेटले असावे, जर कधी कोणाला त्याचे खर प्रेम मिळाले नसेल तर त्याने समजावं, की या जन्मात नाही भेटले तर पुढच्या जन्मात ते नक्की भेटेल. खर प्रेम असेल तर ते कोणत्याना कोणत्या जन्मात आपली वाट बघत असते , नियती पण आपल्या प्रेमाची परीक्षा घेत असते,आपले प्रेम ते सहजा सहजी मिळू नाही देत .आणि हो आपले प्रेम पण खरं आसायला हवं.मी तुम्हाला आश्याच एका खरं प्रेमाची गोष्ट सांगतो .

गोष्ट आहे १८ व्या शतकातील एक असे गाव त्या गावात एक क्रूर असा सरपंच राहत होता त्याची त्या गावात खूप दहशत होती त्याचा सांगण्यावरून त्या गावात सर्व्या गोष्टी घडत असे त्याच्या सांगण्याप्रमाणे नेहमी लोक एकमेकांच्या जीवाला बेतलेले असायचं. ते गाव जातीवाद चा नावाखाली दाबले गेलेले होते त्या गावात जातीवरून खूप भांडण होत असे,आणि अश्या जातीवादच्या गावात प्रेम करणे म्हणजे भयंकर असे पाप व गुन्हा मानले जात होते, या दोन ओळीतून तुम्हाला तर समजून गेले असेल की आता ते गाव आणि तिथले लोक कसे असतील, आणि अश्या गावात प्रेम म्हणजे एक प्रकारचं भयंकर पाप मानले जात असेल तर तिथे कोणी प्रेम करत नसेल का बरं , प्रेम ही एक अशी भावना आहे जी कोणाला पण कुठे पण कसे पण होऊ शकते हो की नहीं, तर चला मग आता पुढे जाऊया.अश्या या प्रेम विरोधी गावाचा काळा इतिहास असा की काही वर्षा पाहिले इथे एका प्रेमी जोडप्यांनी प्रेम करण्याचं पाप केले होते आणि ते गावातला लोकांना माहीत पडताच त्यांनी त्या दोघांना मारण्याचा कट रचला. त्या दोघांना माहीत पडताच त्यांनी पळून जाण्याचा विचार केला, पळत असताना काही गावातील लोकांनी त्यांना पकडले व त्या क्रूर सरपंच व सर्व गावा समोर उभे केले, त्या क्रूर सरपंच ने थोडीशी पण दया माया न दाखवता त्या दोघं प्रेमींचा डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली व त्यांच्या प्रेमाचं तिथेच अंत केला.पण सांगतात ना प्रेम हे अमर आहे, ही अशी गोष्टय त्याचा अंत होणे असंभव आहे, या घटनेनंतर कोणी प्रेम करण्याचं विचार पण केला नसेल असे आपल्याला वाटत असेल.पण प्रेम हे प्रेमच,कधीही कुठेही आणि कसही होऊ शकते.

एक दिवस या गावात दोन मुलं जन्माला आली एका कुटुंबात मुलगा जन्माला आला,तर दुसऱ्या कुटुंबात एक सुंदर अशी कन्या जन्माला आली. त्यांचे दुर्भाग्य असे की त्यांनी या गावात जन्म घेतला.नियती ने विचार केला की या दोघांची भेट झाली पाहिजे त्या मुलांचे नामकरण झाली मुलाचे नाव नयन ठेवण्यात आले व मुलीचे नाव तारा.दोघं लहान असताना एकमेकान साठी अनोळखी, त्यांची खेळण्या-खेळण्यातत भेट झाली हळू हळू त्यांच्यात मित्रता होण्यास सुरवात झाली. एकमेकांन सोबत खेळू लागले राहू लागले. त्यांचे दिवस असेच खेळण्यात बागळण्यात जात राहिले . त्या गावात जातीवाद असल्यामुळे काही लोकांना ते खटकू लागले व त्यांच्या आई वडिलांना सांगून त्यांना एकमेकान पासून दूर राहिला लावले.मग काय, झाले ते वेगळे, काही दिवस असेच पुढे सरकत गेले थोड्या दिवसा नंतर ते लपून छपून भेटत असे व खेळत असे, असेच दिवस पुढे सरकत गेले व ते दोघं मोठे होत गेले व त्यांची मित्रता दिवसां दिवस घट्ट होत गेली, आणि त्या गावात ज्या गोष्टी होयचा नको होत्या ते झाल्या. आणि गावाचा काळा इतिहास परत जन्माला आला.मैत्रीच रूपांतर हळू हळू प्रेमात होत गेले त्याचं प्रेम खूप घट्ट होत गेले, ते एकमेकानशिवाय राहू शकत नव्हते.लहान असताना जसे लपून छपून भेटत असे, तसे मोठे झाल्यावर भेटू लागले.एकदा नयन-तारा सोबत बसलेले असताना तारा ने नयन ला सांगितले की आपल्या प्रेमाचं पुढे काय होईल. नयन ने तर तेव्हा सांगून दिले की काही नाही सर्व ठीक होईल, त्या नंतर दोघे पण आपापल्या घरी गेले,नयन ने तर तारा ला सांगून दिले की सर्व ठीक होईल, पण त्याला नंतर चिंता वाटायला लागली. त्या गावात प्रेम करणे म्हणजे एक गुन्हा आहे त्यांना या गोष्टीचा विसर पडला होता. दिवस पुढे पुढे सरकत होते, आणि तो काळा दिवस समोर येताना दिसत होता, त्यांचा प्रेमाची गोष्ट हळू हळू गावात पसरत होती,नयन-ताराला आता वाटू लागले की गाववाले आपल्या प्रेमाला विरोध करतील, आणि आपले इथे राहणे आता योग्य नाही, त्यांनी गाव सोडण्याचा विचार केला. त्या क्रूर सरपंच ला माहीत होते की नयन-तारा आता कधी ही गाव सोडून पळू शकता, त्यामुळे तो सर्व गाववाल्यांना घेऊन नयन-तारा चा घरी गेला व त्या दोघांचा आई वडिलांना जाऊन भेटला आणि नयनतारा यांचा प्रेमा बद्दल सांगितले. दोघांचा आई वडिलांना माहीत पडताच ते घाबरले व त्यांना गावाचा काळा इतिहास आठवला आणि त्यांना वाटायला लागले की आपल्या मुलांना आता हे मारुन टाकतील की काय, पण झाले असे की अचानक त्या क्रूर सरपंचने व गाववाल्यांनी नयन-तारा यांच्या प्रेमाला होकार दिला, आता आपल्या डोक्यात विचार आलाच असेल की आता हे कसे शक्य. ज्या गावात प्रेम म्हणजे पाप, आणि त्या गावातील क्रूर सरपंच आणि लोक प्रेमाला होकार देताय. हो असेच काही चमत्कार होतांना दिसत होते. नयनतारा चे आई वडील त्यावेळी खूप खुश झाले कारण त्यांना आता वाटू लागले की सरपंच आणि गाववाले आपल्या मुलांना आता मारणार नाही, नयन-तारा ला जेव्हा माहीत पडले की सर्व लोकांनी आपल्या प्रेमाला होकार दिलाय ते पण खूप खुश झाले.असे वाटायला लागले होते की गावाचा काळा इतिहास आता पुसला जाणार होता. लवखरच नयन-तारा यांच्या लग्नाच मुहर्त काढण्यात आला , लग्नाच्या दिवस उजळला. सर्व गावकरी लग्नात आले, नयन-तारा मंडपात आले,नयन-तारा व त्यांचे आई वडील खूप खुश, अचानक काय झाले सर्व गावकरी मंडपात आले व नयन-तारा यांना ओढू लागले, नयन-तारा यांना माहीत नव्हते की हे काय चाललंय, त्यांना ओढून ताणून गावाचा मधोमध घेऊन आले, आता असे वाटायला लागले की काळा इतिहास परत लिहला जाणार, आणि हो असे झालेही, नयन-तारा यांना गावाचा मधोमध उभे केले गेले, त्यानंतर तिथे तो क्रूर सरपंच आला, नयन-तारा यांचे आई वडील त्या क्रूर सरपंच समोर नयन-तारा यांच्या जीवाची भिक मागू लागले पण त्या क्रूर सरपंच ने त्यांचे काहीही ऐकले नाही, सर्व गाववाले आणि त्या क्रूर सरपंच ने मिळून आपल्याला धोखा दिला आहे हे नयन-तारा यांना कळू लागले.त्या क्रूर सरपंचला माहीत होते की नयन आणि तारा गाव सोडून पळून जाऊ शकता त्यामुळे त्याने गाववाल्यान सोबत मिळून क्रूर अशी योजना बनवली व हे कारस्थान केले. अखेर परत त्या गावात आजून एक प्रेमाचा अंत दिसत होता. नयन-तारा यांना आता समजून गेले की आता आपण एक नाही होऊ शकत आता हे सर्व गाववाले मिळून आपल्याला मारून टाकतील.दोघेही खूप रडत होते, त्या क्रूर सरपंच समोर आपल्या प्रेमाची भीक मागत होते, पण त्या क्रूर सरपंच ने काही ऐकले नाही,त्या क्रूर सरपंच च्या सांगण्यावरून गाववाल्यांनी नयन-तारा यांचा गळ्यात फाशीचा फंदा टाकला, नयन-तारा चे आई वडील हे सर्व पाहत होते रडत होते विरोध करत होते पण गाववाल्यांनी त्यांना पकडून ठेवले होते. आणि शेवटी तो काळ आलाच नयन-तारा यांना गावाचा मधोमध उभे करून एका झाडखाली फाशी देण्यात आली, आणि तरफडत तरफडत त्यांच्या प्रेमाचा अंत झाला. परत एकदा एक प्रेमकहाणी अपूर्ण राहिली परत एकदा त्या क्रूर प्रेमविरोधांच्या आत्म्याला शांती भेटली.पण सांगतात ना प्रेम हे अमर आहे, तिथे त्यांचं शरीर मेले होते पण त्यांचा आत्मा नाही, मला तर वाटते त्यांची आत्मा त्या नियतीला रोज सांगत असेल की आमचे प्रेम मिळू दे खूप विनंत्या केल्या असतील नियती समोर, नियतीला पण त्यांचा प्रेमाची दया आली असेल आणि नियतीला पण कळले असेल की त्यांचं प्रेम हे एका जन्माचे नहीं तर जन्मोजन्मी चे नाते आहे, नयन-तारा यांचे प्रेम येवढं निस्वार्थ व पवित्र होते की शेवटी नियतीला त्यांचं प्रेम परत एकदा मिळून देण्यासाठी या पृथ्वी वर परत एकदा पाठवावे लागले. खर प्रेम असेल तर ते या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नक्की भेटते म्हणूनच तर.........

नयन-तारा यांच्या परत २० व्या शतकात दोन वेगवेगळ्या गावात जन्म झाला. आता या जन्मात त्यांचं गाव ही वेगळ आणि नाव ही पण त्यांना आपण नयन-ताराच म्हणू, आता २० व शतक म्हणजे शिक्षण नावाची गोष्ट तर आलीच, त्यामुळे ते जसे जसे मोठे होत गेले तसे शाळेत जाऊ लागले त्यांचं बालपण तर एकदम मजेत आनंदात सुखात गेले, दिवस पुढे पुढे सरकत गेले नयन-तारा मोठे होत गेले,आता नियतीला पण प्रश्न पडला की यांची भेट कशी घडवावी.....मग नियतीने जो विचार केला होता तसे झाले आणि परत एकदा या जन्मात त्यांची प्रेम कहाणी लिहायला सुरुवात झाली.त्या दोघांनी एका कॉलेज मधे प्रवेश घेतला, आता कॉलेज म्हटले म्हणजे प्रेम आलेच की, नियतीने पण त्यांचा प्रेमाची सुरुवात छान प्रकारे केली होती ती म्हणजे एका कॉलेज मधून, ते दोघं तर एकमेकांन पासून अनोळखी. मैत्री पासून त्यांचं नातं सुरु झालं .अनोळखी एकमेकांशी बोलू लागले हळूहळु मैत्रीच नातं कधी घट्ट झालं हे त्यांना ही कळल नाही. आता त्यांची मैत्री अशी होती कि,सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागले. हळुहळु काय माहीत काय होऊ लागले आणि त्या दोघांना असे वाटायला लागले की आपण एकमेकानशिवाय राहु शकत नाही.ते फक्त मैत्रिचं नातं पुर्ण करत होते पणत्यांना हे माहीत नव्हते की त्यांचं नाते हे फक्त मैत्रीच नाहीय. त्यांचं नातं हे पूर्वजन्मीच एक प्रेम आहे.आता त्यांचं नातं मैत्रीचा पलीकडे जाण्यास सुरवात होत होती, असा एक दिवस नाही जायचा की ते बोलणार नाहीं किंवा भेटणार नाही, असेच दिवस पुढे जात होते.आणि आता त्यांच्या प्रेमाचा दिवस जवळ येताना दिसत होता, त्यांची २ शतका पासूनची प्रतीक्षा पूर्ण होतांना दिसत होती. अखेर तो दिवस आला आणि त्यांच्यात प्रेम झालं...........


आता त्यांच्यात प्रेम झालंय पण पुढे त्यांच्या आयुष्यात काय काय घडत ते पुढच्या भागात बघूया.....