सल्लू आणि सचिन घरी येतात........
सल्लू : "यारू.... मुझे बात करनी हैं तुझसे.....😓"
सचिन : "हा बोल ना सल्लू.....🙂"
गाडी पार्क करत सचिन बोलत असतो......
सल्लू : "यारू....... मुझे लगता हैं तुझे अभी जॉली को कॉल करना चाहिए..... पहले तू ऊसे कॉल कर.... पूछ ठीक से पोहच तो गयी ना?"
सचिन : "हा मेरे भाई अभी उसी से बात करने वाला था..."
सचिन, जॉलीला कॉल करतो......
रिंगटोन.....
आँख सुरमे से भरके तैयार की
खींच-खींच के निशाने हूँ मैं मारती
आँख सुरमे से भरके तैयार की
खींच-खींच के निशाने हूँ मैं मारती
खुद ज्यादा तू उम्मीद मत रख सोनेया
ज्यादा तू उम्मीद मत रख सोनेया
तेरा लेवल नहीं मेरे यार वर्गा
मुंडेया नु सूली उत्ते तंगी रखदा वे
मेरा नखरा ए तीखी तलवार वर्गा
मुंडेया नु सूली उत्ते तंगी रखदा वे
मेरा नखरा ए तीखी तलवार वर्गा
तिची रिंगटोन ऐकून सचिनच्या कपाळावर आठ्या पडतात......😂😂 जॉली फोन रिसिव्ह करते......
जॉली : "हॅलो.....🙂"
सचिन : "पोहचलीस का...??"
जॉली : "हो.....🙂"
सचिन : "ओके..... अजुन?"
जॉली : "नथिंग....."
सचिन : "साऊंड लो..... व्हॉट हॅप्पंड......."
जॉली : "नथिंग..... फिलिंग टायर्ड...... स्लीपिंग......"
सचिन : "ओके..... टेक केअर.....🙂"
जॉली : "या..... बाय......."
सचिन : "फाइन बाय......😒"
फोन कट करून, जॉली तिच्या विचारात हरवते.......
सचिनला तिच्या कॉल नंतर, परत एक कॉल येतो......
सचिन : "हा मते बोला......"
मते : ".... सर अर्जंट हॉस्पिटलसाठी रवाना व्हा...... ती मुलगी शुध्दीवर येण्याचा प्रयत्न करत आहे......"
सचिन : "पोहोचतोय....... तिथे कोणालाच एन्ट्री देऊ नका..... मी लगेच निघतोय.....🥺"
फोन ठेऊन, सचिन पळतच सल्लू कडे येतो....
सल्लू : "क्या हुआ यारू??...🙄"
सचिन : "सल्लू मुझे निकलना पडेगा...... अर्जंट हैं थोडा....."
सल्लू : "ओके..... ध्यान रखना....."
सचिन निघून जातो....... सल्लू येऊन झोपी जातो.....
इकडे जॉली तिच्या विचारात गुंतते...... कॉफी घ्यायला किचनमध्ये जाते आणि येऊन काऊचवर रिलॅक्स होत पडते...... आपल्याच विचारात असता, डोळे मिटते आणि लगेच गोंधळून उठते.......
जॉली : "नो जॉली...... इट्स इम्पॉसिबल..... हाऊ यू......😭😭😭😭"
आणि ओक्षिबोक्षी रडू लागते..... काही वेळाने उठून कॉफी मग घेते आणि विंडो जवळ जाऊन कॉफी घेता - घेता आठवतो तिला तिचा मॅक......❣️ मॅक जो तिला जीवापाड जपायचा.....💝 पण,......😒
जॉली : "मॅक..... धिस इज नॉट एंड ऑफ आवर स्टोरी..... यू आर स्टिल इन् माय हार्ट.....💟 लव्ह यू मॅक...... लव्ह यू फॉर एव्हर् अँड एव्हर......💞"
रडतच ती बेडवर आडवी होते..... आठवतात तिला ते क्षण जे ती मॅक सोबत जगली होती......
मॅक आणि ती तीन वर्ष सोबत होते..... त्याच्या सोबत जे बॉंडिंग होतं तसं आजवर तिला कोणी भेटलं नव्हतं..... ती त्याच्या आठवणीत हरवते....🥰
तिला आठवतो तो मॅक ज्याने, तिच्यासाठी फॉरेन ट्रिप कॅन्सल केलेली आणि तिच्या बर्थ डेला तो रात्री बारा वाजता गिफ्ट हातात घेऊन तिच्या गॅलरी मधून आत शिरला होता..... ही इज सच ए स्वीट हार्ट......❣️ जॉली आणि तो एक परफेक्ट कपल होते.... पण,..... बहुतेक त्यांचं सोबत असणं हे नशिबाला मान्य नव्हतं...... म्हणून, मॅक तिच्यापासून दूर गेला होता..... तिला तो क्षण आठवला जेव्हा मॅक समोर विव्हळत होता आणि ती काहीच करू शकत नव्हती..... गोवा ते मुंबई प्रवास ते स्वतःच्या कारने करत असता...... समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला त्यांची कार धडकून, जॉली कार बाहेर जाऊन अशा ठिकाणी पडली जिथं झुडूप असल्याने तिला मार लागला नाही.... पण, जेव्हा ती उठून मॅक जवळ आली तेव्हा सगळं बघून, तिची शुद्धच हरपली..... मॅकचे पाय गाडीत फसले होते आणि त्याच्यात तो शेवटचे काही मिनिटंच जिवंत राहील इतका जीव राहिला होता.... तिथल्या लोकांनी त्याला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करून देखील त्याला कोणी वाचवू शकला नव्हता.....
जॉली जेव्हा शुध्दीवर आली ती हॉस्पिटल बेडवर होती..... तिने विचारले तेव्हा तिला कळले की, मॅक तिला सोडून कधीचाच गेलाय.... हे ऐकल्यावर मात्र ती तिच्या पप्पांच्या गळ्यात पडून रडली होती..... तिच्या पप्पांना सुद्धा मॅक तिच्यासाठी परफेक्ट वाटायचा..... त्यांना दोघांच्या रिलेशनशिपवर फुल कॉन्फिडन्स होता..... पण, दुर्दैव होतं जे तो आता या दुनियेतून निघून गेला होता....
सगळ आठवून ती खूप रडली होती....... बेडवर पडल्या - पडल्या तिला कधी झोप लागली समजलं नाही.....
तिकडे सचिन हॉस्पिटल मध्ये त्या मुलीच्या समोर जाऊन बसला होता.... ती त्याच्याचकडे बघत होती.....
सचिन : "कशी आहेस ताई....."
ती : "....😭😭😭😭"
सचिन : "रडू नकोस मी आहे ना......"
तो तिला कवटाळत, शांत करत होता......
ती : "का वाचवलं मला.....😭😭😭"
सचिन : "तुझं जगणं खुप महत्वाचं आहे ताई..... तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची नोंद या महाराष्ट्राने घेतलीच पाहिजे....🤬🤬 मी मिळवून देईल न्याय ताई तुला...."
ती : "माझी अभ्रु गेली आता काय न्याय देणार मला कोणी.....😭😭😭😭😭"
सचिन : "नाही ताई.... तू असा विचार नको करुस.... हा विचार त्या गुन्हेगारांनी केला पाहिजे ज्यांनी तुझ्या शरीराचे लचके तोडले.....😡"
ती : "चूक माझीच झाली..... मीच विश्वास केला.....😭😭"
सचिन : "मला तुझ्या बाबतीत घडलेला प्रकार सांग मी तुला न्याय मिळवून देईल....🤝 वचन देतो...."
ती : "माझ्या मामाचा मुलगा होता तो..... तीन वर्षांआधी मला लग्नाची मागणी घातली..... माझ्या मनात आधी त्याच्या विषयी भावना नव्हत्या पण, हळू - हळू तो माझी काळजी घ्यायला लागला आणि माझ्या मनात त्याच्याविषयी आकर्षण वाढत गेलं.... त्या आकर्षणाचं रूपांतर कधी प्रेमात झालं मलाच कळलं नाही..... मग आमचं फिरणं - एन्जॉय करणं सुरू झालं..... काल तो मला स्वतःसोबत डिनरडेट साठी घेऊन गेला..... हॉटेलमध्ये न नेता मला एका पबमध्ये घेऊन गेला... तिथं त्याचे दारूडे मित्र ही होते...... सगळ्यांनी ड्रिंक केलं आणि याच्यासोबत यायचं म्हणून खूप आग्रह केला..... त्यानेही नकार दिला नाही...... दोन मित्र आणि हा.... मी त्यांच्या सोबत एकटीच जाणार या भीतीने कॅब बुक करायचा विचार केला पण, हे काहीच दूर पर्यंत असणार नंतर आपण दोघेच असू असा विश्वास त्याने मला दाखवला मी सुद्धा निश्चिंत होऊन बसले..... काही अंतरावर गाडी थांबली..... मला वाटलं, ती दोघं उतरत असतील..... पण, त्याने मला मागे बसायला सांगितले.... मी नकार दिला तर त्याने माझा हात ओढत मागच्या बाजूला टाकले...... त्या दोघांनी माझे लचके तोडले......😭😭😭😭 त्यांचं आटोपल्यावर त्याने सुद्धा.....😭😭😭😭😭"
सचिन : "..... ताई..🥺🥺🥺 खरच अग स्त्रियांना वस्तू समजणारे लोकं...... त्यांना कधी कठोर कायद्यांतर्गत शिक्षा होते आणि कधी ही मानसिकता संपते याचीच वाट आहे..... निर्भया नंतर हैदराबाद, उन्नाव, हाथरस सारखे प्रकार घडूनही आपली शासन व्यवस्था अशी शांत आहे..... बघून खरच चीड येते..... पण, कितीही कायदे करून हे प्रकार थांबताना दिसतच नाहीत.....🤬😡"
ती : "दादा तुझे ही हात कायद्याच्या मर्यादेत आहेत..... तू कुठवर झटणार......??"
सचिन : "शेवट पर्यंत मी माझ्या ताई साठी झटेन.....🥺"
ती : "...... दादा......🥺🥺🥺"
दोघेही एकमेकांजवळ अश्रूंना वाट मोकळी करून देतात.......
भेटू पुढील भागात......
@खुशी ढोके..🌹