मी त्या दिवशी आमच्या घरी मुंबईला गेलो होतो त्यावेळी मी घरात असताना दहा वीस मिनटांनी आमच्या घराच्या समोर एक माणूस सारख्या चकरा मारत होता हे पाहून मला विचीत्रच वाटल तरी मी काही बोललो नाही मी नुसती त्याची गंमत पाहत राहिलो चकरा काय मारायचा घरात काय झाकून पाहयचा बघून बघून घेतल आणि मला राहवल नाही म्हणुन मी त्या माणसाला सरळ विचारण्याच ठरवल व त्याला विचारल काय हो तुम्ही आमच्या घरासमोर चकरा का मारता घरात झाकून का पाहता त्यावेळी तो माणूस माझ्याकडे बघतच राहीला कारण मला वाटते तो गोंधळलेला असावा त्या माणसाने उत्तर दिले अहो मी पाहत होतो की घरात नवीन पाहुण कोण आलय बघतो तर तु स्वता आलास मी म्हणालो असो ठीक आहे पण त्या माणसाचे झाकून पाहण जरा मला खटकत होत घरासमोर चकरा मारणे हे ही मला काही पटत नव्हत मला या गोष्टी एकदम विचित्र वाटत होत्या मी मनात बोललो काय विचित्र स्वभाव आहे या माणसाचा तस म्हटलं तर हा माणूस माझा ओळखीचाच पण तो असा असेल हे ठाऊक नव्हतं त्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी तो माणूस पहिल्या सारखाच वागायला लागला मला संशय आला मी विचारणारच तितकाच तो ताडकन आमच्या घरात येऊन बसला कारण समोर टीव्ही चालू होता मी मनात म्हणालो काय माणूस आहे स्वताच्या घरात टीव्ही असून आपल्या घरात बसून टीव्ही पाहायचा सोडून दुसऱ्याच्या घरात बसून टीव्ही पाहतो मी आश्चर्यचकित झालो व थोडा वेळाने विचार केला हा माणूस असा कसा त्यावेळी मी विचार करत त्या माणसाकडे पाहिले त्यावेळी त्याचा चेहरा वाचूनच मला कळले की यां माणसाला स्वताचा घरचा टीव्ही पाहण्यात काहीही रहस वाटत नाही दुसऱ्याचा घरातला टीव्ही पाहण्यात रहस वाटतो आनंद उत्साह वाटतो.आणि दुसऱ्याच्या घरात टीव्ही पहिला तर वेळ चुटकीसा निघतो असा त्याचा गैरसमज होता तो ज्या तन्मयाने आत्मतहने पाहत होता.त्यावरून कळते कुठे टीव्ही चालू असेल त्यावेळी हा माणूस त्या घरात हजर त्यामुळे जेवताना ही टीव्ही चालू असेल तर पुढच्या माणसाच्या जेवणाची झाली पंचाईत तुम्हाला दुपारचे जेवण काय संध्याकाळचे ही जेवण करता येणार नाही कारण की जो पर्यंत टीव्ही बंद होत नाही तो पर्यंत तो माणूस जागेवरून उठत नाही असा त्याचा स्वभाव त्यादिवशी असेच झाले आम्ही घरातले सगळे जण जेवण्यासाठी बसलो होतो मात्र त्यावेळी दरवाजा लावायला विसरलो होतो दरवाजा लावायला उठणार इतक्यातच झालच की हा माणूस हजर कारण जेवताना आम्हाला टिव्ही लावण्याची सवय होती आणि समोर टीव्ही चालू होता. मी म्हटलं झाली जेवणाची आता पंचाईत मी मनात विचार करत म्हणालो आता काय करायच तितकात मी घाबरलो कारण हा माणूस जोरात ओरडला मी म्हणालो काय झाल तो माणूस म्हणाला मी तुला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुझ मात्र लक्ष नाही मी म्हणालो काय सांगायचे होते. तो माणूस म्हणाला की टीव्हीतला हिरो माझा नातेवाईक आहेत गाववाले आहेत असच काही बरगळत होता. सांगत होता मी म्हणालो हाथ तिच्या मारी ऐवढ्या लहान गोष्टीसाठी ओरडायच असत नाही. त्यावेळी तो माणूस म्हणाला मी ज्यावेळी हळू आवाजात तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तुझ लक्ष नव्हत अन माझा आवाज ऐकु येत नव्हता. म्हणुन मी तुझ लक्ष केंद्रित करण्यासाठी ओरडलो मि म्हणालो काय विचित्र माणूस आहे. नंतर मला हे सहन झाल नाही व मी काही ना काही कारण काढून घरातल्याना टीव्ही बंद करायला लावला बंद केला ना केला तितक्यातच चला टीव्ही बंद झाला आता दुसरीकडे जाऊ मी मनात हसत म्हणालो काय ही माणसं आणि यांचा हा विचित्र स्वभाव