Abhagi - 12 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | अभागी...भाग 12

Featured Books
Categories
Share

अभागी...भाग 12

मधू व सायली आई च जेवण घेऊन हॉस्पिटल मध्ये येतात..थोडा वेळ थांबून ..आई ला जेवायला सांगून हॉस्पिटल बाहेर येतात ..बाहेर बराच अंधार पडला होता..दोघी असून ही त्यांना भीती वाटू लागली होती..तितक्यात हॉस्पिटल बाहेर त्यांना मधुर दिसतो..सायली मधू ला मधुर ला बघ म्हणून सांगते ..दोघींना ही प्रश्न पडतो.. हा इतक्या रात्री इथे काय करतो आहे ? मधुर ही त्या दोघींना पाहून त्यांच्या कडे येतो.

मधू :तू इथे काय करतोस ?

मधुर तिच्या प्रश्नाने गों धळतो..पणं नंतर तो सांगतो..

मधुर : ते माझे शेजारी या हॉस्पिटल मध्ये होते ..त्यांना पाहायला आलो होतो..पणं तुम्ही दोघी इथे काय करताय ?

सायली: मधूचे बाबा आहेत हॉस्पिटल मध्ये त्यांचा अपघात झाला होता..

मधुर एकदम काळजीने विचारतो..

मधुर : कशी आहे आता तब्येत त्यांची ? ठीक आहेत ना ?

मधू : हो आता ठीक आहेत ..आई थांबली आहे बाबा जवळ आम्ही जेवण घेऊन आलो होतो ..आता घरी निघालो आहोत.

मधुर : बरीच रात्र झाली आहे ..दोघीच जाणार का ?तुमची काही हरकत नसेल तर मी येऊ का सोडायला ?

मधू नको म्हणत असते पणं सायली तिला गप्प करते व मधुर ला सोबत चालायला सांगते..तो ही त्या दोघींना मधू च्या घरा जवळ सोडतो..काही मदत लागली तर सांगा म्हणून निघून जातो..त्या दोघी ही त्याला थँक्यु बोलून घरी जातात..जेवण करून थोडा वेळ बोलत बसतात..

सायली : ये मधू ,तो मधुर स्वभावाने खरंच चांगला आहे यार..आपण उगाच बिचाऱ्याला नेहमी चिडवत होतो.

मधू : हो ..मला ही आता पटलं आहे ..माणसाचं रूप नाही तर गुण पहावेत..तो विराज इतका हॅण्डसम आहे पणं त्याच्या हरकती बघ..आणि मधुर इतका साधा सरळ आहे पणं मनाने किती चांगला आहे..

सायली : हो तू बरोबर बोलतेस ..

मधू: सायली तुला माहीत आहे का बाबा ना रक्त कोणी दिलं?

सायली : कोणी ग ?

मधू : साया नी..मला त्याला एकदा भेटून थँक्यु बोलायचं होत पणं तो भेटायला नाही बोलला..

सायली : काय ? पणं तो नाही का बोलला?

मधू: त्याला वाटत त्याने माझ्या बाबा ना रक्त दिलं त्या मदतीमुळे मला त्याला भेटायचं आहे .. तर मदत केली म्हणून भेटायची इच्छा असेल तर तो भेटायला नकार देत आहे...पणं खर तर मला त्याने मदत केली म्हणूनच भेटायचं होतं.

सायली मधू च बोलणं ऐकत ऐकत च झोपी जाते..मधू बराच वेळ साया चा विचार करत असते नंतर तिला ही झोप लागते.
दोन दिवसांनी मधू च्या बाबांना घरी आणलं जातं..शेजारचे,बाबांच्या ऑफिस मधले सर्वजण सारखे बाबा ना पाहण्या साठी घरी येत असत त्या मुळे मधू ४ दिवस कॉलेज ला जातच नाही.बाबा न ची तब्येत आता सुधारली होती..त्यांनी मधू ला कॉलेज ला जायला सांगितलं..आता मला बर वाटत आहे.
मधू ला साया सोबत बोलणं आता आवडू लागलं होत..कधी त्याचा मॅसेज येईल आणि कधी आपण बोलू अस तिला होवू लागलं होतं..साया तर आधीच मधू च्या प्रेमात वेडा होता.

कॉलेज मध्ये ट्रॅडिशनल डे होता..मधू ,सायली आणि अनु नी साडी घालायचं ठरवल होत..पणं सायली व अनु ला माहित होत..ही मधू काही जास्त आवरत बसणार नाही..घातली साडी की येईल कॉलेज ला..म्हणून सायली व अनु ने आम्ही तयार होवून तुझ्या घरी येतो मग आपण कॉलेज ला जावू अस बजावलं होत..त्यामुळे मधू .त्यांची वाट पाहत होती..


मधू सायली व अनु ची वाट पाहत होती.. मधुने आज निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती ..गळ्यात एक छोटीसी चैन घातली होती ..एका हातात निळ्या बांगड्या.. आणि आज विशेष म्हणजे मधू ने साया ने दिलेलं घड्याळ घातलं होत..फार सुंदर दिसत होत ते तिच्या हातात..घड्याळ घालताना तिला साया ची खूप आठवण आली होती..त्याच्या शी बोलण्याची खूप इच्छा मधू ला झाली होती..पणं नंतर बोलू अस ठरवून ती पुन्हा तयार होवु लागली.. मुळात सुंदर असलेली मधू अजून च सुंदर दिसत होती..ती तयार होवून बसली होती..सायली व अनु आल्या ..पणं त्यांना काही मधू तयार झालेलं आवडल नाही ..सायली आणि अनु मधू ला पुन्हा रूम मध्ये घेऊन गेल्या ..मधू नको मी आहे तशी छान वाटत आहे काही नको मके अप मला नाही आवडत म्हणून ओरडाय ला सुरू केलं पणं सायली ती ..ऐकणार कशी ?..सायली ने मधू च्या केसाचा अंबाडा बांधला..गळ्यातील चैन काढून एक कोल्हापुरी ठुशी तिच्या गळ्यात घातली ..कानात तसेच मॅच करणारे झुमके..ओठाला हलकीशी लिपस्टिक..आणि डोळ्याला थोडंसं काजल..केसात गजरा माळ ला..सायली ने हिरव्या रंगाची तर अनु ने गुलाबी रंगाची साडी घातली होती..दोघी ही खूप छान दिसत होत्या..जेव्हा त्यांनी मधू ला तयार केलं ..

सायली : हाय मैं मर जावा ..मधू डार्लींग...काय सुंदर दिसत आहेस यार ...आज पहिल्यांदा वाईट वाटत आहे मी मुलगी आहे याचं...मुलगा असतो तर आजच तुला पळवून नेल असत ..

अनु : ये तू काय नेशील ..मधू माझी आहे.. वाव मधू किती भारी दिसत आहेस ?

सायली : अने गप्प ग तू..ती माझी आहे ..
मधू तर त्यांचं बोलणं ऐकून हसत ही होती आणि लाजत ही होती..

मधू : ये गप्प बसा दोघी पणं ..काय उगाच भांडता? आणि माझी च तारीफ करु नका तुम्ही दोघी ही काय दिसताय ?मस्त..चला एक सेल्फी तर काढू ?

मग तिघी ही आप आपल्या फोन मध्ये वेगवेगळ्या पोज देत सेल्फी काढतात..तो पर्यंत मधू ची आई येते..

आई : अरे देवा ? ही माझी मधू च आहे ना ? ये सायली अनु ..काय केलं ग तुम्ही माझ्या मधू च ? किती गोड दिसतेय माझी लाडू बाई..

मधू : आई आता तू पणं अस नको बोलू ..नाही तर मी काढते आता साडी..
मग सगळे शांत होतात..तिघी ही कॉलेज साठी निघतात..सायली आणि अनु घरातून निघताना तर शांत बसल्या होत्या पण रस्त्यात पुन्हा त्या मधू ला चिडवू लागल्या

अनु : आज कॉलेज मधल्या मुलांचं काही खर नाही..सगळे बहुतेक मधू ला पाहून फ्लॅट होणार..

सायली : ये आने...एक मिनिट ही मधू ला एकटं सोडायचं नाही बाई आज नाही तर ..कोणी खरंच नेल पळवून तर ..

मधू जाम वैतागली होती सायली आणि अनु ला..पणं तिच्या डोक्यात साया चा विचार चालू होता..त्याला काय वाटेल ..त्याला आवडेल का ? मी जरी त्याला पाहिलं नाही पणं तो तर नेहमी असतो ना आपल्या आजू बाजूला..तो तर पाहणार च मला..पणं मला ही माहित असत तो कोण आहे तर..मी ही त्याची रिअँक्शन पाहीली असती ना..साया शी बोलायचं होत पणं शीट ..या गोंधळात राहिलाच..

अनु : ये आपण इतकं बडबड करतोय ..आणि ही कुठे हरवली आहे ?

सायली: कुठे काय ? हरवली असेल त्या साया च्या विचारात ..आज काल तिच्या तोंडी नुसता एकच तर नाव असत ..साया साया..

मधू ला ते ऐकुन आश्चर्य वाटत ..हिला कसं कळलं..मी साया चा विचार करतेय ते ? खरच मी खूप बोलते की काय साया बद्दल ?

सायली : मधू ..तो साया ही आज स्वतः हून समोर येऊन सांगेल ..मधू मी तुझा साया ..म्हणून.

मधू : खरंच काय सायली ?

सायली ने तर असच अंधारात तीर सोडला होता..पणं हे मात्र दोघींच्या ही लक्षात आलं की मधू साया चाच विचार करत होती...मधू ची चोरी पकडली गेली होती..आणि मधू ला ही आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर ती ओशाळ ली होती..अनु आणि सायली पुन्हा .. गाणं म्हणू लागल्या होत्या..

साया साया साया हुं
दौडा दौडा आया हुं
तूने क त रा मांगा था
मे दरिया ला या हुं..

पणं आज मधू त्याचं गाणं ऐकून चिडली नव्हती .. लाजली होती..आणि सायली व अनु ला ही समजलं होत की मधू ला साया आवडू लागला आहे.

तिघी ही कॉलेज मध्ये पोहचल्या..सर्व जण वेग वेगळी वेशभूषा करून आले होते..कॉलेज मध्ये जणू जत्रा भरली आहे अस वातावरण निर्माण झालं होत..सर्वजण आज खूप छान दिसत होते..पणं बरेच जण मधू ला पाहून घायाळ होत होते..वळून वळून पाहत होते..विराज ने आज ब्लॅक जॅकेट .. ब्ल्यू जीन्स..आणि व्हाईट शर्ट घातला होता..तो ही आज खूप हॅण्डसम दिसत होता..मुली त्याला पाहून त्याच्या वर अजून फिदा होत होत्या आणि त्याला ही आज स्वतः वर थोडा गर्व वाटत होता..पणं जशी मधू समोर आली त्याच्या गर्वाच घर केव्हाच खाली कोसळल होत..मधू ला पाहून ..आज त्याला स्वतः वरच ताबा राहिला नव्हता..तो एक टक तिला पाहत होता..विराज ग्रुप ही मधू ला पाहून . यार किती सुंदर दिसत आहे ही म्हणून ..कमेंट करत होता ..पणं आज आपल्याच मित्रांनी मधू ची केलेली तारीफ ..विराज ला आवडली नव्हती..आणि त्याने सर्वांना रागात बजावलं ..की कोणी सुद्धा मधू कडे पाहायचं नाही.

मधू मात्र आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा त रमली होती आज सर्वजण च तिची तारीफ करत होते ..मधुर ही तिला दुरून पाहून खूप खुश होता...आज तो ही फक्त तिलाच पाहण्यात मग्न होता.मधू ने मधुर ला पाहून हलकीशी एक smile दिली..त्याने ही ..छान दिसत आहेस म्हणून हाताने ई शा रा केला..मधू ची नजर मात्र साया कोण असेल हे शोधत होती..तो पाहत असेल का आपल्याला.. असा विचार करून स्वतः शिच हसत होती..

पुढे काय होईल ? पाहू next part मध्ये...