रोहनला कळत नसत की त्याच नाव सरांनी सांगितलेल्या लिस्टमध्ये का नाही ते..
टॉनी : शौर्यने बुक कम्प्लिट केलेली ना..
टॉनी मागे वळुन वृषभ आणि राज ला विचारू लागला..
वृषभ : "आम्ही पण तेच बोलत होतो.. पर्वा तर मी त्याच्या रूममधून बारा नंतर बाहेर पडलो.. तरी तो कम्प्लिट करत बसलेला.."
(रोहन त्यांच बोलणं फक्त ऐकण्याच काम करत होता)
"शहहह... Keep Silent..." सर असे बोलताच सगळे शांत बसतात..
इथे समीराच पण लक्ष लागत नसत..
शौर्य क्लासरूम मधुन निघुन सरळ ग्राउंडवर जाऊन बसतो.. खांद्यावरची बेग बाजुला ठेवत दोन्ही हात डोक्याला लावत तो शांत बसुन रहातो..
ग्राउंडवर रोहनचे सुरवातीचे मित्र मंडळी तिथेच सकाळच्या चहाची सुरुवात ड्रिंक आणि सिगारेटने धूर उडवत करत तिथेच उभे होते.. तोच त्यांच्यातील एकाने शौर्यकडे बोट दाखवतच बाकीच्यांना इशारा केला..
फैयाज देख तेरी शिकार आज खुद चलके तेरे पास आया हे!
तसा तो घोळका त्याच्याजवळ जाऊ लागला.. शौर्यच मात्र त्यांच्याकडे लक्षच नव्हतं..
"
दुसरे की गर्लफ्रेंड पे लाईन मारने का नतिजा देखो.. ऐसे अकेले जिंदगी बितानी पडती हे!", फैयाज शौर्यकडे बघत बोलला तसे बाकीचे त्याला साथ देतच हसु लागले..
शौर्यने आपली रागभरी नजर त्यांच्यावर फिरवली..
फैयाज : "बापरे इसको गुस्सा भी आता हे..!"
"Hey Faiyaz, what is your problem??",शौर्य रागातच त्याला विचारतो
फैयाज : "इन लोगों का तो पता नही पर मेरा प्रॉब्लेम तो तु हे.. तेरे वजह से रोहन अब हम लोगों के साथ नही रेहता.. उपरसे तुझे वो पसंद करती हे जीसको मे पसंद करता हु.. इससे और कोई बडा प्रॉब्लेम कुछ हो सकता हे क्या?? अब तुही बता।"
शौर्यला तो काय बोलत होता तेच समजत नव्हतं..
फैयाज : "अभी भी तुझको समझमे नही आया क्या??.. इसकी भाषा मे इस्को समझा तो जरा...।"
(तोच त्याच्यातला एक शौर्यला सांगु लागला)
"समीरा... जिच्यावर हा वेड्यासारखं प्रेम करत होता.. जिचा ड्युएल पार्टनर म्हणुन टेबल टेनिस सुद्धा खेळायला जायला तैयार झालेला पण तुझ्यामुळे ती त्याच्यापासुन दूर गेली.. तु आलास आणि सगळा गेमच संपवलास तो ही सुरू होण्याआधी.."
शौर्य डोक्यावर जरा जोर देत आठवतो.. त्याने समीराला विचारल होत की ती टेबल टेनिस का नाही खेळणार पण समीराने उत्तराची टाळा टाळ केली..
शौर्यच लक्ष नाही हे बघुन एकाने त्याची बेग घेत फैयाज कडे फेकली..
शौर्य : "फैयाज मेरा बेग मुझे वापस कर... "
फैयाज : "बॅग मंगता हे तो.. आsss और लेकरं जा.. इट्स सिम्पल.. लाईक युअर डिंपल..."
फैयाज अस बोलताच सगळेच शौर्यवर हसतात.. सगळ्यांनी शौर्य भोवती घोळका करत त्याला त्रास देणं सुरू केलं..
शौर्य : "देख फैयाज में शांती से बोल रहा हुं मेरा बेग मुझे वापस दे.. मुझे अकाउंट का क्लास अटेंड करणे जाना हे।"
पण फैयाज मात्र शौर्यला त्रास देण्याच्याच मुड मध्ये होता..
"तेरे को शांती मे बोली हुई बात समज मे नाही आती क्या?? क्यू फालतु मे मेरा दिमाग और टाईम दोन्हो भी खराब कर रहा हे??", शौर्यने फैयाजची कॉलर धरतच त्याला खाली ढकलुन दिल.. तस तो जोरात खाली पडला..
तसे बाकीचे शौर्यला पकडु लागले..
तोच फैयाज ने सगळ्यांना हात दाखवत थांबायला सांगितलं.. आपले कपडे झाडतच तो शौर्यजवळ आला..
फैयाज : "मुझे हात लगाने की तेरी हिंमत कैसे हुई..??"
फैयाज आपल्या हाताची मूठ करत शौर्यला मारणार पण शौर्यने त्याचा हात पकडत आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्याच गालावर जोरात एक बुक्का मारला तस त्याच्या ओठांतून रक्त आलं.. फैयाज आपल्या ओठाला हात लावत आपल्या हातावर लागलेलं आपलं रक्त बघत रागाने अजुन वेडा पिसा होत होता..
तेवढ्यात शौर्यच्या बाजुला उभ्या असलेल्या एकाने शौर्यच्या खांद्यावर हात टाकत त्याला आपल्याकडे खेचलं तस शौर्यने एक बुक्का त्याच्या पोटावर मारला.. हळुहळु एक एक जण मिळुन शौर्यला मारायला बघत होते पण शौर्य एकेकाला पुरून उरत होता..
शौर्यच लक्ष खाली पडलेल्या त्याच्या बेगेकडे गेलं तस तो ती बेग उचलायला गेला.. तोच फैयाजने बाजुलाच असलेली बिअरची रिकामी बॉटल उचलत शौर्यला मारायला जाऊ लागला... पाठून येणाऱ्या फायजची सावली शौर्यला बेगेच्या बाजूला दिसली तस त्याने आपलं डोकं बाजूला काढलं पण बॉटल शौर्यच्या हातावर फुटली.. हातातून होणाऱ्या वेदनेने तो हात धरतच खाली बसला.. हातातुन रक्त येऊ लागलं.. सोबत डोळ्यांतुन पाणीसुद्धा..
फैयाज : "क्योsss मजा आया.."
शौर्य तसाच हात धरून त्याच्याकडे रागात बघतच उभा रहातो..
तोच एक जण खाली पडलेलं लाकुड फैयाजच्या हातात देतो.. फैयाज ते लाकुड शौर्यकडे फेकतो.. शौर्य आपल्या हातात ते कॅच करतो
फैयाज : "Sir please save us from this person.. See him he has gone Mad and he beating us like mad men so please save us from him"
शौर्य मागे वळुन बघतो तर प्रिंसिपल सर असतात.. फैयाजने दिलेलं लाकूड तो घाबरतच खाली फेकुन देतो..
शौर्य : "Sir all are lying to you they were beating me"
सर : "I don’t want to listen to anyone any thing .I need everyone in my cabin right now"
(सर तिथे असलेल्या सगळ्यांनाच त्यांच्या केबिनमध्ये यायला सांगतात.. आणि तिथुन निघुन जातात.. )
शौर्यचा रडलेला चेहरा बघत फैयाज आणि त्याचे मित्र मंडळी शौर्यला चिडवतच सरांच्या मागुन जातात.. शौर्य खाली पडलेली बेग उचलतो.. डोळ्यांतुन आलेलं पाणी पुसतच तो सरांच्या मागोमाग त्यांच्या केबिनमध्ये जातो..
★★★★★
लेक्चर संपताच मनवी खुश होतच रोहनजवळ येते..
सरांच्या लिस्टमध्ये बघितलस तुझं नाव नव्हतं.. आणि उगाच तु घाबरत होतास..
रोहन : "पण कस शक्य आहे.. मी बुक सबमिट केलीच नाही.."
मनवी : "सरांकडुन मिस्टेक झाली असेल.. कोणी दुसऱ्याने बुक दिली असेल.. आणि तुझ्या रॉलनंबर समोर टिक झालं असेल.."
रोहन : "मे बी..."
दोघेही बाहेर येतच बोलत असतात..
वृषभ शौर्यला फोन लावतो.. पण शौर्य प्रिंसिपल सरांसमोर उभा असल्याने खिश्यात वायब्रेट होणाऱ्या फोनकडे त्याच लक्ष नसत..
वृषभ : "कुठे गेला असेल हा..??"
समीरा : "मे बी केंटींगमध्ये असेल.."
सगळे केंटिंगमध्ये जाऊन बघतात तर शौर्य तिथे नसतो..
टॉनी : "रूमवर गेला असेल.."
समीरा : "वृषभ त्याची बुक तर कम्प्लिट होती ना?? मग त्याच नाव कस आलं सरांच्या लिस्टमध्ये.."
वृषभ : "मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय... त्याच्याशी बोलल्यावर कळेल काय ते.."
सीमा : "त्याच त्यादिवशी थोडं बाकी पण होत. मे बी त्याने बुक सबमिट केली नसेल."
मनवी : "आपण फक्त बोलणारच आहोत का काही तरी खाणार पण आहोत.. मला तर जाम भूक लागलीय.. "
राज : "मी घेऊन येतो सगळ्यांसाठी.."
समीरा : "मला नकोय आज.. तुमच्यासाठीच मागवा.."
सीमा : "आता तुला काय झालं??"
समीरा : "भूक नाहीय.."
समीरा शौर्यला फोन लावत असते पण शौर्य फोन उचलत नसतो..
समीरा थोडं नाराज होतच मोबाईल टेबलवर ठेवत डोक्याला हात लावुन बसते..
रोहनने आज काही बोलायच नाही असेच ठरवल असत.. त्यामुळे तो देखील आज शांत शांत असतो..
राज आणि टॉनी मिळुन सगळ्यांसाठी सॅंडवीच घेऊन येतात.. सगळे सॅंडवीच खातात व तिथुन बाहेर पडतात..
तिथुन बाहेर पडुन सगळे कॉलेज गेटजवळ जमतात आणि तेवढ्यातच शौर्य कॉलेजमधुन बाहेर पडतो.. त्याच्यासोबत सोबत पिंसिपल सरांचा पिओन असतो..
"इसको दोन दिन कॉलेज में लेने का नही ऐसा प्रिंसिपल सर का ऑर्डर हे.."गेटजवळ असलेल्या वॉचमनला सांगुन तो पिओन पुन्हा आत निघुन जातो..
राज : "हा कॉलेजमध्येच होता???"
राजने अस बोलताच सगळे शौर्यकडे बघु लागतात..
रोहन मात्र शौर्य दिसताच मनवीला घेऊन बाईकवर बसुन तिथुन निघून गेला..
डोळे आणि नाक अगदी लालबुंद झालं असत..
शौर्य आपला हात पकडतच कॉलेजमधून बाहेर पडु लागला.. समोर आपली मित्र मंडळी दिसताच हात सोडुन तो त्यांच्यासमोर नॉर्मल रहाण्याचा प्रयत्न करत होता.
समीरा : "ए शौर्य काय झालं..???"
शौर्य : "काही नाही.. "
वृषभ : "मग तुझे डोळे असे रडलेले का दिसतायत??"
"डोळ्यांत काही तरी गेल असेलत्यामुळे.. मला फोन येतोय घरून मी मग बोलतो तुमच्याशी.",आपला मोबाईल वृषभ समोर धरतच त्याला त्याच्या मम्माचा येणारा फोन दाखवत तो तिथुन निघतो..
समीरा : "हा काही तरी लपवतोय.."
टॉनी : "मला पण तेच वाटत... "
राज : "तस पण आम्ही रूम वरच जातोय.. बघतो काय झालं ते.."
समीरा : "मला फोन करून कळवा काय झालं ते.."
तिघेही तिथुन निघत शौर्यच्या रूमवर येतात..
फोन तसाच बाजुला ठेवुन दोन्ही हात डोक्याला लावुन तो बसला असतो..
वृषभ : "शौर्य तु फोनवर बोलायसाठी तिथुन निघालास ना.. मग फोन तर रिंग होतोय तु उचलत का नाहीस.."
टॉनी : "काय झालं सांगशील??"
"अरे शौर्य यार तुझ्याशी बोलतोय आम्ही काय झालं..?", वृषभ शौर्यचा हात पकडत त्याला आपल्या जवळ ओढतच बोलला...
शौर्य : "आहहह वृषभ.. माझा हात यार.."
"काय झालं हाताला ते.", वृषभ शौर्यच्या हातावरील शर्ट वर करतच त्याचा हात बघु लागला...
हातावर झालेली जखम बघुन तिघेही एकमेकांकडे बघु लागले..
वृषभ : "ए शौर्य काय झालंय हाताला.. चल आपण डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करून घेऊयात.. तिघेही त्याला जबरदस्ती डॉक्टरकडे घेऊन जातात.. डॉक्टरांकडुन ड्रेसिंग होताच ते लोक पुन्हा होस्टेलवर येतात.."
टॉनी : "आता सांगशील काय झालं ते?"
टॉनी पाण्याची बाटली शौर्य पुढे धरतच बोलला.. शौर्य बाटली हातात घेत त्यातलं पाणी पिऊ लागतो.. पाणी पिऊन त्याला थोडं बर वाटत..
वृषभ : "आता काय झालं आता सांग बघु.."
शौर्य : "ते रोहनच्या मित्रांमुळे प्रिंसिपल सरांनी मला दोन दिवसासाठी कॉलेजमधून सस्पेंड केलंय.. वर माझ्या घरी फोन करून माझ्या मम्मा कडे माझी कम्प्लेन्ट केलीय..मी कॉलेजमध्ये लेक्चरला बासायच सोडुन मारामारी करतो.."
वृषभ : "पण झालं काय??"
शौर्य झालेला सगळा प्रकार तिघांना सांगतो..
राज : "म्हणुन सुरुवातीपासुन तुला रोहन आणि त्या ग्रुपपासुन लांब रहायला सांगत होतो.."
शौर्य : "मी काही त्यांना भेटायला नाही गेलेलो.. ते मेथ्सच्या सरांनी लेक्चरमध्ये बसु नाही दिल म्हणुन मी तिथे जाऊन बसलेलो.. ती लोकच त्रास देत होती मला.. बहुतेक त्यांनाच माझ्या हातचा मार खायचा होता.. "
राज : "आणि मार तु खाल्लास.."
शौर्य : "ए राज मी तुझ्यासारखा नाही हा.. जेवढं लागलय ना मला त्याच्या डब्बल त्यांना मी धुतलय आणि ते माझं लक्ष नव्हतं तो बाटली हातावर फोडेपर्यंत.. सर नसते ना तर आज त्या फैयाजच काही खर नव्हतं.."
टॉनी : "ए शौर्य बाबा.. तु शांत का नाही रहात.. उगाच हिरो बनायला जातो.."
वृषभ : "एक मिनिट!!! हे सगळं जाऊ दे.. तु बुक सबमिट केलेलीस ना??"
शौर्य : "तेssते माझी बुक.. म्हणजे थोडं लिहायच बाकी होत.. मग मी नाही दिली बुक.."
राज : "काय तु पण?? जेवढी झाली तेवढी तरी द्यायची ना.."
टॉनी : "हो ना.. जीथे हिरोगिरी दाखवायची तिथे नाही दाखवत.. फुकटचे वीस मार्क्स मिळत होते ते गेले..."
शौर्य : "आत्ता नाही ना झाली कम्प्लिट.. त्यात तुम्ही लोक पण त्रास देत होते मला मग कशी करणार बुक कम्प्लिट मी.."
वृषभला मात्र शौर्यच बोलणं काही पटत नव्हतं.. पण तो त्यावेळेला शांत रहाणं पसंत करतो..
वृषभ : "समीराचा फोन आहे धर बोल तिच्याशी..."
शौर्यच्या हातात फोन देतच वृषभ बोलला..
शौर्य : "बोल समीरा..."
समीरा : "काय झालं तुला?? सांगशील???"
शौर्य : "तस पण मी तुला फोन करणारच होतो.. तु टेबल टेनिस मधुन का एक्झिट घेतलीस??"
समीरा : "तु आता का विचारतोयस.."
शौर्य : "माझ्या प्रश्नाच उत्तर दे मला फक्त.."
समीरा : "शौर्य तो फैयाज इरिटेट करायचा तिथे येऊन.. खेळ कमी आणि नुसतं एकटक बघत रहाणं आणि गाणी बोलणं चालु असायच त्याच.. दुसर कोणी इंटरेस्ट दाखवत नव्हतं टेबल टेनिस मध्ये.. तुला पण सुरुवातीला मी एकदा दोनदा विचारलेल पण तुझ फुटबॉल प्रेम बघितल्यावर मी तुला पण जास्त फोर्स नाही केला.. आणि रोज रोज त्या फैयाजच्या तोंडुन गाणी ऐकुन इरिटेट होण्यापेक्षा मी तो गेमच खेळायचा नाही असा विचार केला.."
शौर्य : "तु हे सगळं मला आधी सांगितलं असतस तर मी माझं फुटबॉल स्कीप केलं असत.. तुझ्यासाठी.."
समीरा : "तेच तर नको होतं ना मला.. तुला माहिती तु कॉलेजमध्ये आल्यानंतर मी हार्डली एकदा दोनदा प्रॅक्टिसला गेली असेल.. कारण तुला फुटबॉल खेळताना बघायची ना तेव्हा रोज नव्याने प्रेमात पडत होते मी तुझ्या.. पण तु आज हे सगळं का विचारतोयस.."
शौर्य : "समीरा ते" (शौर्य समीराला झालेला सगळा प्रकार सांगतो)
समीरा : "मग तु सरांना का नाही सांगितलंस.."
शौर्य : "सांगत होतो ग पण त्यांना त्या लोकांच म्हणणं पटत होत..."
समीरा : "अस कस ते तुला सस्पेंड करू शकतात.. तुझी चुक नसताना.."
शौर्य : "आता सगळे पुरावे माझ्या विरोधात होते तर ते पण काय करतील आणि ऐकना मी तुला थोड्या वेळाने माझ्या मोबाईल वरून कॉल करतो... चालेल??"
समीरा : "हम्मम.. काळजी घे.."
शौर्य : "हम्म बाय.."
शौर्य फोन ठेवून वृषभकडे देतो आणि तिघेही लंच करायला जातात..
लंच करून होताच राज आणि टॉनी आपापल्या रूममध्ये जातात.. वृषभ मात्र शौर्यच्या रूममध्ये जातो..
वृषभ : "शौर्य तुझी प्रॅक्टिकल बुक बघून ना.. किती राहील ते कळेल मला.."
शौर्य : "आता काय बघायच त्या बुक मध्ये.. "
वृषभ : "किती राहिल ते बघायचंय रे मला.. दाखव बघु लवकर"
शौर्य : "माझ्याकडे नाही ती.."
वृषभ : "आता तु सबमिट नाही केलीस म्हटलं तर तुझ्याकडेच असेल ना ती.."
शौर्य शांत रहातो..
वृषभ : "का केलंस अस..?? एवढं रात्रभर जागुन बुक कम्प्लिट केलीस आणि काही विचार न करता त्या रोहनच्या नावाने सबमिट केलीस.?? त्याने मैत्री तोडली तुझ्याशी.. तरी तु त्याच्यासाठी.."
शौर्य : "मी नाही ना तोडली पण.. मला आवडेल शेवटपर्यंत त्याचा मित्र बनून रहायला आणि प्लिज त्याला ही गोष्ट कळु नको देऊस.. तु मला प्रॉमिज कर.. कारण पुन्हा तो इस्यु क्रिएट करेल.."
वृषभ : "मी असलं काही प्रॉमिज नाही करणार.."
शौर्य : "वृषभ प्लिज... "
वृषभ : "ठिक आहे नाही सांगत.. पण कोण एवढ करत रे ते ही मित्रासाठी.."
शौर्य : "कोण करो ना करो पण मी करेल.. आणि तस पण 20 मार्क्स त्याला मिळले काय नि मला मिळाले काय एकच आहे.."
पुन्हा शौर्यला त्याच्या मम्माचा फोन येऊ लागला.. फोन बघुन शौर्यने कट केला आणि आपला लॅपटॉप घेऊन बसला..
वृषभ : "तु आंटीचा फोन का नाही उचलत आहेस.."
शौर्य : "खुप भडकलीय यार ती माझ्यावर म्हणुन नाही उचलत मी फोन.. रात्री विर घरी गेला की त्याला बोलेल तिला समजव मग बोलेल तिच्याशी..."
वृषभ : "ओहहह आणि एक ऐक प्लिज त्या फैयाज पासून लांब रहा.."
शौर्य : "सुरुवात त्याने केली एन्ड तर मीच करणार.. tick for tat"
वृषभ : "काय करणार आहेस तू??"
शौर्य : "ते कळेलच तुला.."
★★★★★
दुसऱ्या दिवशी सगळे नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये जातात.. रोहन नेहमीप्रमाणे शौर्यला इग्नोर करायच असा ठरवून वृषभच्या बाजूला जाऊन बसतो. पण जागेवर बसल्यावर त्याच लक्ष पुढे जात.. तस त्याच्या लक्षात येत की आज शौर्य आलाच नाही आहे..
"का आला नसेल?? तब्येत तर ठिक असेल ना??", रोहन स्वतःच्याच मनाला प्रश्न करू लागतो..
सर सुद्धा वर्गात येतात आणि प्रेसेंटी घ्यायला लागतात..
वृषभला तरी कस विचारायचं शौर्य बद्दल हेच रोहनला कळत नसत..
रोहन : "आज वर्ग खाली खाली वाटतोय ना.."
वृषभ : "मला तर रोजच्या सारखाच वाटतोय.. "
(वृषभला रोहनला काय विचारायचं ते कळत होत)
रोहन : "तु नीट बघ ना जरा.."
वृषभ : "नीट काय बघायच त्यात.. मला तर नेहमीप्रमाणेच वाटतोय.. तु नीट बघ.."
रोहनला कळत नसत की आता शौर्य बद्दल कस विचारावं..
"नंतर केंटिंगमध्ये गेल्यावर कळेल शौर्य का नाही आला ते.", रोहन मनातच विचार करतो..
अश्यातच लेक्चर सुद्धा संपतात.. सगळे केंटिंगमध्ये जायला निघतात..
रोहन मनवी दोघेही एकमेकांशी बोलत एकत्रच पुढे केंटींगमध्ये जायला निघतात..
वृषभ : "गाईज आपला प्लॅन काम करतोय.. फक्त कोणी शौर्यच नाव काढायच नाही.. बघु रोहन स्वतःहून विचारतो का?? आणि मग काय करायचं ते माहिती ना??"
राज : "येस..."
रोहन पाठी वळुन बघतो तर सगळे घोळका करून आपापसात काही तरी बोलत असतात..
रोहन : "काय झालं?? तुम्ही असे मध्येच का थांबलेत?? चला पटकन मग जागा नाही मिळणार.."
टॉनी : "येतो तर आहे.. तुम्ही दोघ व्हा पुढे.."
(सगळे जाऊन केंटिंगमध्ये बसतात.. )
समीरा : "आज काही तरी वेगळं खाऊयात. नुसत सॅंडविच खाऊन बॉर झालंय.. "
राज : "आपण बाहेर जाऊयात का खायला म्हणजे भेळपुरी वैगेरे.. तसही चाट कॉर्नर जवळच आहे इथून.."
रोहन : "उद्या नाही तर पर्वा जाऊयात ना म्हणजे आज केंटींगपण किती खाली खाली आहेना.."
मनवी : "केंटींग खाली आहे मग आपण इथेच बसून खायच का.?? काय वेड्यासारखं बोलतोयस??",
वृषभ : "बघ ना.. आज ह्याला सगळंच खाली खाली वाटतंय.. मगाशी क्लासरूम पण खाली खाली वाटत होता.."
राज : "तु एक काम करतोस का??तु माझ्या बरोबर चल.."
रोहन : "कुठे??"
राज : "अरे मित्रा डोळे चेकअप करायला.. तुला कोणत्या अँगलने आज केंटींग खाली दिसतेय ते डॉक्टर बघुन सांगतील.."
राजने अस बोलताच सगळे हसु लागतात..
रोहन : "ए राज माझे डोळे ना एकदम परफेक्ट आहेत.. तो शौर्य..."
रोहन पुढे काही बोलणार पण तो मनवीकडे बघत शांत रहातो आणि तिथुन उठुन निघुन जातो..
वृषभ : "अरे रोहन थांब तर.."
रोहन : "मला आज घरी लवकर जायचय.. काम आहे माझं.. मनवी तु येतेस..??"
मनवी : "एवढ्या लवकर घरी नको तु जा.."
रोहन : "मी निघतो मग बाय गाईज.."
राज : "मला पण एक काम आहे आलोच.. अस बोलत राज तिथुन उठुन गेला.."
वृषभ : "अरे रोहन ऐक ना..तुझ्याकडे एक काम होत.. "
रोहन : "हा बोलणं.. "
वृषभ : "ते.. तु बाईक घेऊन सरळच बाहेर पडशील ना??"
रोहन : "हो.. का??"
वृषभ : "ते मलाsss.. हांsss.. मॉलमध्ये सोडशील??"
रोहन : "हा चल.."
वृषभ : "गाईज मी पण येतो.."
अस बोलत वृषभ टॉनीला रोहनच्या नकळत काही तरी इशारे करून रोहन सोबत गेट बाहेर पडला..
( काय प्लॅन असेल आता ह्या अतरंगी टोळीचा?? त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा आणि हा भाग कसा वाटला तेही कळवा)
क्रमशः
©भावना विनेश भुतल