मधुरा ने तर कविता म्हटली सर्वांना आवडली ही पणं विराज चा मात्र हा ही प्लॅन फेल झाला..उलट जेव्हा विराज ची वेळ आली तेव्हा सर्वांनी त्याला डान्स करायला सांगितलं...बिचारा विराज ..डान्स येत नसल्या मुळे ..सर्वांच्या हसण्याच कारण बनला....मधू आता साया सोबत बोलू लागली होती थोडी थोडी का होईना..आणि तिने मधुर ला ही मधू म्हणायची परवानगी दिली होती.
कॉलेज सुरू असताना आज मधू ला लेक्चर मध्येच आई चे खूप फोन येऊन गेले..आई कॉलेज वेळात का फोन करते हे तिला कळेना..तिने लेक्चर संपला तसा बाहेर जाऊन आई ला फोन लावला तर ..तिच्या बाबांचा अॅक्सीडनट झाला आहे व ते हॉस्पिटल मध्ये आहेत अस तिला आईने सांगितलं ..तशी तिने क्लास रूम मध्ये जावून आपली ब्याग उचलली व रडतच बाहेर पळत सुटली ..सायली आणि अनु ला तर काही समजेना ..त्या तिच्या मागे धावल्या व तर बाबां हॉस्पिटल मध्ये आहेत ..इतकंच ती सांगून तिथून वेगात निघून गेली..सायली आणि अनु ही थांब आम्ही येतो म्हणून तिला थांबवत होत्या पण त्यांचं ऐकायला ती होतीच कुठे ?
मधू आईने सांगितलं त्या हॉस्पिटल मध्ये पोहचली .. आई बाहेर बसून रडत होती..मधू आई ला बिलगली ..आई ही तिला पाहून रडू लागली पणं मधूने आई ला शांत केलं ..आणि ती डॉक्टर ना भेटावयास गेली..
मधू : डॉक्टर माझे बाबा कसे आहेत ?
डॉक्टर : कोण ?
मधू: थोड्या वेळा पूर्वी अड्डमि ट केलं आहे त्यांना..संजय सानप..
डॉक्टर : तुम्ही कोण ?
मधू : मी त्यांची मुलगी मधुरा सानप.
डॉक्टर: मधुरा relax तसं घाबरायच काहीच कारण नाही ..त्यांना जास्त काही लागलं नाही..फक्त थोड रक्त गेल्या मुळे त्यांना रक्त चढवाव लागेल .. व डोक्याला ५.६ टाके पडले आहेत ..ते लवकर बरे होतील..गंभीर अस काही नाही.
मधू : थँक्यु डॉक्टर ..तुम्ही अस बोलून ..आम्हाला खरंच खूप आधार दिला आहात ..
डॉक्टर : ते तर आमचं काम च आहे ..पणं एक प्रॉब्लेम आहे..तुमच्या बाबा चा blood group A आहे .. व आमच्या जवळील ..त्या ग्रुप चे रक्त संपले आहे..तुमच्या ओळखीत कोणाचं असेल तर पहा ..
मधू : हो डॉक्टर मी पहाते...माझं B आहे आणि आई च ही..
मधू डॉक्टर ना भेटून बाहेर जाते व आई ला भेटून काळजीच काही कारण नाही टेन्शन नको घेऊ म्हणून बजावते..मग आई ला ही थोडा धीर येतो..मधू आता आपल्या ओळखीच्या शेजाऱ्या ना , फ्रेण्ड्स ना बाहेर जाऊन फोन करते ..पणं कोणीच बाबा ना मॅच करेल अशा ग्रुप च भेटत नाही..सायली व अनु ही तो पर्यंत मधू जवळ येतात ..पणं त्यांचा ही blood group वेगळा असतो..आता मधू ला खूपच रडू कोसळत होत की शी या जगात इतकी माणसं आहेत एकाचा ही ब्ल ड..बाबा ना मॅच करणारा कसा नाही? सायली व अनु तिला शांत करत असतात..त्यांना ही मधू ची हालत पाहवत नसते..तो पर्यंत एक नर्स मधू ला डॉक्टर्स नी बोलावलं आहे म्हणून सांगतात..ती पळत केबिन मध्ये जाते ..
डॉक्टर : मिस मधुरा डोन्ट वरी ..blood शोधायची गरज नाही..आम्हाला blood मिळाला आहे..आणि तो तुझ्या बाबा ना चढवायला ही सुरू आहे..
मधू : पणं डॉक्टर तुम्ही तर बोलला होता ना रक्त संपले आहे म्हणून..
डॉक्टर : हो संपले च आहे ..एका मुलाने blood donate केला आहे ..
मधू: डॉक्टर मला त्या मुलाचं नाव कळेल का ? मला त्याला थँक्यु बोलायचं आहे..
डॉक्टर : मला तर माहीत नाही पणं तुम्ही नर्स ला विचारू शकता..
मधू नर्स ला विचारते पणं त्या मुलाने नाव न सांगण्याच्या अटीवर blood donate केला आहे त्यामुळे मी नाव नाही सांगू शकत अस नर्स मधू ला सांगते..मधू ला थोड वाईट वाटत..ती आई जवळ येऊन बसते ..सायली व अनु ही थोडा वेळ बसून निघतात.. व सायली मी घरी जाऊन थोड्या वेळाने येईन असं सांगून जाते..तो पर्यंत ..मधुरा चे शेजारी ही हॉस्पिटल मध्ये सानप काका ना भेटण्या साठी येतात..काकू आई ला धीर देतात..थोड्या वेळाने सर्व जण निघून जातात..बाबा नचि तब्येत आता एकदम ठीक आहे अस डॉक्टर मधू ला सांगतात..आणि रात्र होई पर्यंत त्यांना शुद्द ही येते आई व मधू त्यांना भेटतात..बाबा मला काही झालं नाही मी ठीक आहे म्हणून त्यांना समजावतात...मधू आपल्या बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्या शेजारी बसलेली असते व तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळ त असतात..
बाबा : अग ये माझी लाडू बाई ..रडतेस का ? बघ तुझे बाबा एकदम ठीक आहेत ..काहीच झालं नाही मला.
मधू: हो बाबा तुम्हाला काहीच झाल नाही..तुम्ही तर माझे ब्रैव बाबा आहात ना.
बाबा : होय मी तर आहे ब्रेव पणं आमची लाडू बाई अशी रडली तर कसं चालेल ? आमची लाडू बाई पणं ब्य्रेव हवी ना..
मधू लगेच दिले पुसत मी कुठे रडते य बाबा ..मी आहे ना माझ्या बाबांची ब्रे व .. गर्ल अस म्हणून ती तशात ही हसते..
आई : बाप लेकीच प्रेम पुराण झालं असेल तर आमच्या कडे ही लक्ष द्या थोडे..
बाबा : अहो,तुम्हाला कोण विसरेल ? होय की नाही लाडू बाई
मधू : हो ग आई ..बर तू घरी जाऊन ये मी बाबां न जवळ थांबते ..
बाबा : नको मधू बाळा तू घरी जा आई थांबू दे इथे ..तू कुठे रात्रीच इथे थांबणार ..?
मधू : पणं बाबा मी थांबते ..मला थांबायचं आहे तुमच्या जवळ ..
आई : नको मधू ..तू घरी जा मी थांबते ..आणि अजून तू लहान आहेस ..तू सायली ला बोलावं सोबतीला .
मधू : अग काय आई तू ? मी लहान ? मी कॉलेज ला आहे आता बालवाडी मध्ये नाही ग.
आई आणि बाबा ही मग तिला घरी पाठवतात..मधू आई साठी जेवण घेऊन परत येते म्हणून सांगते ..सायली ला ही ती घरी बोलावून घेते..
घरी येऊन ती आई साठी व सायली व स्वतः साठी जेवण बनवते ..बाबा ना तर हॉस्पिटल मधीलच जेवण खायला सांगितलेलं असत..ती सायली ची वाट पहात बसते..तो पर्यंत तिला साया चा मॅसेज येतो..
साया : मधुरा ..कशी आहे बाबांची तब्येत ?
मधू : ठीक आहे आता ..पणं तुला कोणी सांगितलं ?कॉलेज मध्ये तर मी फक्त अनु व सायली ला सांगितलं होत.
साया : कळलं मला..
मधू : कसं ? खर सांगशील का ?
साया : तू कॉलेज मधून रडत बाहेर पडलीस तेव्हा मी ही तुझ्या मागे आलो होतो..हॉस्पिटल मध्ये ही होतो त्यामुळे मला समजलं..
मधू : म्हणजे बाबा ना रक्त तू दिलास ?
साया : हो ..
मधू : साया थँक्यु थँक्यु सो मच....तू आज खरंच खूप मोठी मदत केली आहेस माझी..खरच..मी तुझी खूप आभारी आहे ..मला तर खूप टेन्शन आलं होत रे..plz मला तुला भेटायचं आहे ..
साया: माहित आहे मला तु काळजीत होतीस ते ..पणं सॉरी मधू मी तुला नाही भेटू शकत..मी तुझ्या बाबा ना रक्त दिलं म्हणून तुला तो उपकार वाटत आहे म्हणून तुला मला भेटू वाटत आहे पणं ..तुझ्या बाबांच्या जागी दुसरं कोणी ही असत तर मी मदत केलीच असती..त्यामुळे या मदतीच्या बदल्यात तुला मला भेटू वाटत असेल तर सॉरी मी नाही भेटणार तुला.
मधू : मला फक्त तुला थँक्यु बोलायचं आहे रे भेटून
साया : खरंच जर तुला माझ्या साठी काही करायचं असेल तर मी सांगतो ते करशील का ?
मधू : हो बोल..
साया : plz तू रडत जावू नकोस..मला तुला रडताना नाही पाहू वाटत..खूप वाईट वाटत..तू हसत राहत जा .इतकं करू शकतेस ना ? माझ्या साठी ?
मधू तर मॅसेज वाचूनच आश्चर्य चकित होते..
मधू : हो ..मी प्रयत्न करेन.
साया : काही मदत लागली तर नक्की सांग ..मी नेहमी सारखं नंबर बंद ठेवत नाही आज .. तुला गरज लागली की तू मला मॅसेज करू शकतेस ..
मधू : हो थँक्यु..
तेवढयात सायली येते व मधू व सायली आई ला जेवण देण्या साठी ..हॉस्पिटल मध्ये जातात..
काय होईल पुढे ? कोण असेल साया ? पाहू next part मध्ये..