ATRANGIRE EK PREM KATHA - 29 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 29

Featured Books
Categories
Share

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 29

पार्टी वरून शौर्य रूमवर निघुन आला. रोहनच्या वागण्याने त्याला खुप वाईट वाटलं होतं.. एवढा घाणेरडा आरोप रोहन माझ्यावर करूच कसा शकतो?? असा प्रश्न तो सारखा सारखा त्याच्या मनाला विचारत होता..

रोहन एवढं वाईट वागला शौर्यशी म्हणुन बाकीची मंडळी ही तिथुन निघाली.. समीराला सुद्धा रोहनचा खुप राग आला पण रोहनचा बर्थडे म्हणुन ती ही त्याला काहीही न बोलता सरळ पार्टी मधुन निघाली..

रोहन त्यांना थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत होता पण कोणीच थांबायला तैयार नव्हतं शिवाय मनवी.. तिला ह्या सगळ्या गोष्टीने फारसा काही फरक पडत नव्हता.. पण रोहनला त्याची चुक कळली होती. त्याच आता पार्टीत लक्षच लागत नव्हत.. शौर्यला भेटुन कधी त्याला सॉरी बोलतो अस त्याला झालं होतं.. तो शौर्यला फोन लावत होता पण शौर्य रोहनच नाव आपल्या मोबाईल स्क्रिनवर बघुन फोन उचलत नव्हता..

त्याने फोन तसाच टेबलवर ठेवला.. बेडवर आडवं पडणार तोच त्याची मित्र मंडळी त्याच्या रूममध्ये घुसली..

वृषभ : "शौर्य तु झोपतोयस..??'

शौर्य : 'हम्मम.. जाग राहुन काय करू???'

टॉनी : "जेवायला चल खाली..जेवून झोप.."

शौर्य : "भुक नाही.."

वृषभ : "ए शौर्य चलना.. रोहनच नको एवढं मनाला लावून घेऊ.."

शौर्य : "कस नको घेऊ यार.. त्याने मुंबईवरून आल्यावर माझ्याशी एकदातरी ह्या विषयावर बोलायला हवं होतं ना.. एवढे दिवस सगळं त्याने मनात ठेवलं आणि आज तर कमालच केली यार. सरळ कॉलर पकडली त्याने.. एवढा पजेसीव.. मी तिला कॉल केला म्हणुन त्याला राग आणि तिने कॉल केलेला ते.. तिला पण तो बोलु शकतो ना.. मलाच का बोलतोय तो??"

राज : "त्याला आम्ही समजवल रे.. त्याला त्याची चुक कळली असेल.."

शौर्य : "तिसऱ्या व्यक्तीला जेव्हा दोघांत मध्यस्थी करायची वेळ येते म्हणजे त्या नात्यात एक दरी निर्माण होते रे.. मला नाही वाटत मी रोहन सोबत पाहिल्यासारखं वागेल.. "

वृषभ : "शौर्य.. तो चुकला.. आम्ही मान्य करतोय यार आणि तो पण करेल पण आत्ता रागाच्या भरात तु एवढा टोकाचा निर्णय नको घेऊस.. प्लिज.."

टॉनी : "हो ना.. प्लिज.."

राज : "मला भूक लागलीय.."

शौर्य : "तुम्ही लोक जेवून नाही आलात..?"

राज : "तु असा निघुन आल्यावर आम्ही कस काय थांबु तिथे.."

शौर्य : "अरे पण रोहनला वाईट वाटलं असेल यार.. तुम्ही तरी जेवुन यायच होत.."

वृषभ : "त्याला वाईट वाटु दे ना.. मग तुला काय फरक पडतो.."

शौर्य वृषभकडे बघतो.. वृषभ भुवया उडवत त्याच्याकडे हसतच बघतो.. शौर्यलाही हसु येत..सगळे मिळुन जेवायला निघुन जातात.. जेवुन आल्यावर शौर्य रूममध्ये येतो.. फोन अजूनही वाजत असतो.. पण शौर्यला रोहनशी बोलायच नसत.. निदान त्याच स्वतःच डोकं शांत होईपर्यंत तरी.. शौर्य फोन सायलेंट मोड वर टाकायला मोबाईल हातात घेतो.. तर समीराच नाव स्क्रिनवर दिसत असत.. शौर्य दुसऱ्याच क्षणाला फोन उचलतो..

शौर्य : "अग समीरा सॉरी.. मला वाटलं की ते.. रोहन फोन करतोय.."

समीरा : "इट्स ओके.. तु ठिक आहेस ना??"

शौर्य : "हम्मम.. तुला पण कळलं.."

समीरा : "हो.. मला पण रोहनच वागणं नाही पटलं म्हणुन आम्ही सगळेच निघुन आलो.."

शौर्य : "तुम्ही लोकांनी तरी थांबायला हवं होतं ग त्याला वाईट वाटल असेल.."

समीरा : "आणि तुला??"

शौर्य : "खर सांगु मला वाईट सुरुवातीला नाही वाटलं म्हणजे मला अस वाटलं की मी त्याला तिथेच समजवेल आणि त्याचा गैरसमज दूर होईल.. पण जेव्हा त्याने माझी कॉलर पकडली ना तेव्हा खूप हर्ट झालो मी.. मला अस कोणी माझी कॉलर पकडलेली नाही आवडत आणि मुळात रोहन एवढा काही पजेसीव पणा दाखवत होता की जणु काही मी मनवीला प्रपोजच केलय.."

समीरा : "नक्की तस नाही केलंस ना??"

शौर्य : "आता तु पण..?"

समीरा : "मस्ती करतेयरे.. बर मी काय बोलते.. तु झोप.. आपण उद्या कॉलेजमध्ये भेटल्यावर बोलुयात.."

शौर्य : "का काय झालं?? बोल ना.."

समीरा : "जागरण करून आजारी पडलास की माझं कस व्हायच.."

शौर्य : "एक दिवसाच्या जागरणाने कोणी आजारी थोडी ना पडत.."

समीरा : "ते मला नाही माहीत पण तु आजारी पडलेलं मला नाही आवडणार.. सो गुड नाईट.. स्वीट ड्रीम.. टेक केर.. आणि.."

शौर्य : "आणि काय??"

समीरा : "काही नाही बाय.."

शौर्य : "बोलणं समीरा.. प्लिज.."

समीरा : "आणिss"

शौर्य एकदम एक्साईट होऊन समीराच बोलणं ऐकत असतो..

"आय... लव्ह... यु.. उम्माहहह...", अस बोलत समीरा मोबाईल मधुनच शौर्यला किस करते..

शौर्य : "लव्ह यु टु माय स्वीट हार्ट...उमम्माह.."

शौर्य त्याच्या मोबाईल मधुनच समीराला किस करतो आणि फोन ठेवतो..

समीराशी बोलुन त्याला थोडं बर वाटत होतं.. घडून गेलेला सर्व प्रकार तो त्या क्षणाला विसरतोही आणि झोपतो.. आधल्या दिवशीच्या अपुऱ्या झोपेमुळे त्याला लगेच झोपही लागते..

★★★★★

इथे सुरजची तब्येत बिघडत चालली होती.. डोळे उघडुन तो एक टक विराजकडे बघत होता.. विराज त्याचा हात आपल्या हातात पकडतच त्याला सॉरी बोलत होता. सुरज थरथरता हात त्याच्या केसांवर फिरवत होता जेणे करून त्याला सांगत होता की माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही.. अनिता ही सुरजच्या बाजुलाच बसुन होती.. त्याच्या शरीरातुन प्राण काही जात नव्हता.. कसली तरी वेडी आस त्याला लागलेली.. विराजला वडिलांना होणारा त्रास बघवत नव्हता..

विराज : "तुला काही सांगायच का??"

सुरज डोळे मिटुनच होकार दर्शवतो.. पण तोंडातुन शब्द त्याच्या बाहेर पडत नव्हते..

विराज : "काही हवंय का तुला?? "

सुरज थरथरते हात डोळ्यांसमोर धरत काही तरी सांगु लागला..

"मम्मा बघ ना तु तरी त्याला काय सांगायच..", विराज अनिताला बोलला..

अनिता : "तुला काही तरी बघायचंय ?? अस म्हणायच का तुला??"

सुरज डोळे बंद करून होकार दर्शवतो..

अनिता : "काय बघायचं सुरज??"

विराज : "डॅड काय बघायचंय तुला??"

सुरजला आता पुढे काही सांगता येत नव्हत..

डोळे मिटुन तो जोर जोरात श्वास घेऊ लागला.

दोघेही त्याला एक एक गोष्ट विचारून त्याला काय सांगायच ते जाणून घेत होते.. पण त्याला काय सांगायच हे दोघांनाही कळत नव्हतं..

विराज रडतच बाहेर आला आणि त्याच्या मागुन अनिता पण.

"मम्मा डॅडला खुप त्रास होतोय ग... मला नाही ग बघवत...", विराज अनिताला रडतच मिठी मारू लागला..

अनिता त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करते.

अनिता : "कदाचित तो कोणाची तरी वाट बघतोय.. पण कोणाची.. ??"

विराज : "मम्मा शौर्य... डॅडला शौर्यला तर बघायच नसेल ना??"

अनिता : "शौर्य.. ?? कस शक्य आहे..??? त्याला शौर्य कधी आवडलेलाच नव्हता.. कदाचित तु चुकीच विचार करतोयस.."

विराज : "नाही मम्मा त्याला शौर्यलाच बघायच असेल.. मी शौर्यला फोन करून इथे बोलवुन घेतो.. प्लिज मम्मा त्याला येऊ दे इथे.. प्लिज"

अनिताला विराजच मन मोडायच नव्हतं ती मानेनेच हो बोलते..

रोहन गेटजवळच शौर्यची वाट बघत असतो.. राज, वृषभ आणि टॉनी नेहमीप्रमाणे येतात.. पण शौर्य काही त्यांच्या बरोबर येत नाही..

रोहन : "शौर्य कुठेय??"

वृषभ : "येतोय मागुन.."

रोहन : "नेहमी तर तो तुमच्या सोबतच येतो ना.. मग आज काय झालं??"

टॉनी : "ते तोच सांगु शकेल.. तो बघ आला.."

शौर्य फोनवर बोलतच कॉलेजमध्ये येत होता.. रोहनला तो कधी जवळ येतो आणि त्याला तो कधी सॉरी बोलतो अस झालेलं.. शौर्यचा चेहरा फोन वर बोलताना गंभीर झालेला.. कारण शौर्यला विराजचा फोन आलेला.. शौर्य फोन ठेवुन पळतच पुन्हा हॉस्टेलवर जायला निघतो..

वृषभ : "शौर्यsss... कुठे चाललास??"

"घरी.. सांगतो मग..", अस बोलत शौर्य बाहेरूनच पळत हॉस्टेलवर जायला निघतो..

तोच समोरून समीरा येते..

समीरा : "तु अस पळत कुठे चाललायस??"

शौर्य : "समीरा मी मुंबईला चाललोय.. डॅडची तब्येत बिघडलीय.. तु तुझी काळजी घे. बाय..मुंबईला गेल्यावर फोन करतो..एका तासाने फ्लाईट आहे माझी.. बाय.. बाय... "

समीरा पुढे काही बोलणार पण शौर्य तिथे थांबला नाही.. तो पळतच हॉस्टेलवर आला आपली बेग भरु लागला..

बेग भरून तो खाली आला.. रोहन हॉस्टेलच्या गेट जवळच बाईक घेऊन उभा होता.. शौर्यने त्याच्याकडे बघुन न बघितल्या सारख केलं आणि तो त्याच्या मोबाईलमध्ये स्वतःसाठी एयरपोर्टवर जाण्यासाठी गाडी बुक करू लागला..

रोहन : "शौर्य सॉरी ना.. मी खुप चुकीच समजलो तुला.. शौर्य प्लिज.."

बाकीची सगळी मंडळी शौर्य आता काय रिएक्शन देतो ते बघत होती ..पण शौर्य रोहनकडे बघत नाही..तो त्याने बुक केलेल्या कारची वाट बघत होता..रोहन बाईक तशीच स्टॅंडवर लावत शौर्य जवळ जातो.. त्याच्या खांद्यावर असलेली बेग घेतो.. पण शौर्य आपली बेग एकदम घट्ट पकडतो..

शौर्य : "I will manage.."

रोहन : "शौर्य प्लिजsss.."

तोच शौर्यने बुक केलेली कार ही तिथे आली.. शौर्य रोहनला बाजूला करतच कारच्या दिशेने जाऊ लागला.

रोहन दोन्ही हात कानाला लावत घुडग्यावर बसूनच गाणं गाऊ लागला..

¶¶मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए
तेरे बिना हो जीना, वो दिन कभी न आए

तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना
याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफ़साना¶¶

शौर्यचे पाय तिथेच थांबले.. त्याने मागे वळुन रोहनकडे बघितलं आणि रडतच रोहनकडे जात त्याला मिठी मारत बिलगला..

"आय एम सॉरी शौर्य.. पुन्हा नाही माझ्याकडुन अस होणार.. प्लिज माझ्यावर रागवु नकोस.",रोहन रडतच शौर्यला बोलतो

"मला उशीर होतोय चल लवकर.", शौर्य रोहनचे डोळे पुसतच त्याला बोलला..

"सेल्फी तो बनता हे बॉस..", अस बोलत वृषभने आपल्या मोबाईल मध्ये दोघांचा फोटो काढला..

शौर्य केलेली कार केन्सल करत रोहनच्या बाईकवर बसुन आपल्या मित्र मंडळीला बाय करतच एअरपोर्टसाठी रवाना झाला..

इथे विराज त्याची वाट बघतच एअरपोर्टवर बसला होता..

शौर्यला बाहेर येताना बघुन त्याने पटकन त्याला गाडीत बसायला सांगितले... गाडी थेट हॉस्पिटल बाहेर येऊन थांबवली..

विराज शौर्यचा हात पकडतच त्याला सुरजच्या रूममध्ये घेऊन गेला.. अनिता तिथेच सुरजच्या शेजारी बसलेली..

"मम्मा", अस बोलत शौर्यने अनिताला मिठी मारली..

"डॅड हे बघ तुला कोणीतरी भेटायला आलंय..", विराज सुरजचा हात पकडतच बोलला..

सुरज हळु हळु त्याचे डोळे उघडुन पाहु लागला.. विराजने शौर्यला त्याच्या शेजारी बसायला सांगितलं..

सुरज त्याचा थरथरता हात शौर्यच्या गालावर फिरवु लागला..

"डॅड काय होतंय तुला", शौर्यने घाबरतच त्याचा हात आपल्या हातात पकडतच त्याला आवाज दिला..

सुरजच्या डोळ्यांतुन पाणी येऊन लागले.. तो खुप वेळ शौर्य बघु लागतो..

"तु रडतोयस का?? काय होतंय तुला??", शौर्य त्याचे डोळे पुसतच बोलतो..

सूरज शौर्यचा हात आपल्या हातात घट्ट पकडतो.. तस शौर्य त्याला घाबरतो... ती घाबरतच विराजकडे बघतो..

"डॅड काय झालं??", विराज दोघांच्या जवळ येतच बोलतो..

सुरज आपला दुसरा हात आपल्या कानाला लावत शौर्यकडे बघत असतो आणि त्याला काही तरी सांगायचाप्रयत्न करत असतो..

ECG मशीनवर सुरजचे हार्ट बिट्स आता कमी कमी होत जाऊ लागले...

तरीही त्यातल्या त्यात सुरज शौर्यचा हात घट्ट पकडतच त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होता..

शौर्य : "डॅड तु शांत हो तुला काय होतंय.."

"डॅड.. काय होतंय.. डॉक्टरsss..", विराज सुद्धा रडतच डॉक्टरांना आवाज देऊ लागला.. डॉक्टर शौर्यला बाजुला व्हायला सांगतात.. पण सुरजने शौर्यचा हात घट्ट पकडुन ठेवलेला असतो आणि तो एकटक त्याच्याकडेबघत असतो..

इथे ECG मशीन वर सुद्धा उतरत्या क्रमाची आकडेवारी सुरू होती आणि फायनली आकडेवारी शुन्यवर येऊन थांबली..

"डॅडsss", विराज त्याच्या डॅडला आवाज देतच बोलला.

विराज : "डॉक्टर डॅड...??",

विराज डॉक्टरकडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहिला..

"आय एम सॉरी..", अस बोलत डॉक्टर तिथुन निघुन गेले..

विराजला आता रडु आवरत नव्हतं...

शौर्य विराजला सावरण्यासाठी त्याच्याजवळ जाणार पण सुरजच्या हातातील त्याची पकड एकदम घट्ट झाली होती.. त्याने दुसऱ्या हाताने आपला हात सुरजच्या हातातुन कसा बसा सोडवलाआणि तो विराज जवळ गेला त्याला बाजूला घेतच त्याने शांत केलं..

सुरज गेल्यानंतर विराज एकटा एकटाच राहू लागला.. शौर्य सुद्धा विराजची समजुत काढत त्याच्या रूममध्येच बसलेला.. अनिता जेवणाच ताट घेऊन विराजच्या रूम मध्ये आली.. ताट तिने तिथेच बाजुला ठेवलं.. विराजचा हात आपल्या हातात घेतला..

"विर.. इथे येणाऱ्या प्रत्येकाचा शेवट असतोच रे.. एक दिवस प्रत्येकाला इथे गुड बाय बोलुन जावंच लागणार आहे.. उद्या मला..",अनिता पुढे काही बोलणार तोच विराजने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला थांबवल.

"मम्मा प्लिज पुढे काही बोलु नकोस.. तु पण मला सोडून गेलीस तर मी नाही सहन करू शकणार ग..", विराज

अनिता : "नाही जात पण तु आधी खाऊन घे.."

विराज : "भूक नाही ग.."

शौर्य : "विर तु जेवला नाहीस म्हणुन मम्मा पण नाहीरे जेवली आणि तुम्ही दोघ नाही जेवलात म्हणुन मी.. आता तूच ठरव तुला जेवायच की उपाशी रहायच.."

विराज : "तु का नाही जेवलीस..??"

अनिता : "आपलं मुलं उपाशी असेल तर कोणत्या आईला भूक लागेल विर.."

"आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्ही दोघ उपाशी राहिलात..", विराज

अनिता चपातीचा घास विर च्या पुढ्यात धरतच त्याला भरवते.. विर अनिताचा हात शौर्य पुढे करतो..

"आधी ह्याला भरव.. भुक ह्याला कंट्रोल होत नाही..."

"मम्माच पोट भरलं की मला बर वाटेल..", अस बोलत शौर्य तो घास अनिताच्या समोर धरतो..

तिघांचं एकमेकांवरच प्रेम अगदी बहरत होत..
★★★★

जवळपास पंधरा दिवस अगदी सहज उलटून गेलेले..

विर सुद्धा आता बऱ्यापैकी बाहेर आलेला ह्यातून.. सुरज नंतर ऑफिसची जिम्मेदारी त्याने स्वतःवर घेतली होती..

शौर्य पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी आपली बेग पॅक करत होता..अचानक विर त्याच्या रूममध्ये आला..

विराज : "कुठे चाललास तु??",

शौर्य : "दिल्लीला..."

विराज : "तुला तर दिल्ली आवडत नव्हती.. इथे तुझा ब्रुनो पण आहे मग आता.."

शौर्य : "दोन महिन्यांनी फायनल एक्साम आहे आणि अश्या वेळेला मुंबईच्या कोणत्या कॉलेजमध्ये मला एडमिशन मिळेल??"

विराज : "ते मी करून देतो तुला कस पण करून.. don't worry.."

कपड्याची बेग भरत असणारा शौर्यचा हात तसाच थांबतो..

शौर्य : "ते.. अरे विर माझे बुक्स वैगेरे.."

विराज : "इथून घेऊयात की नवीन."

तेवढ्यात अनिता पण आली..

अनिता : "शरु झाली का तुझी पेकिंग.. पण शरु तुला आता दिल्लीला जायची काहीही गरज नाहीरे.. तु राहू शकतो इथे.. दिल्लीला होतास तेव्हा इथे येण्यासाठी रडत बसायचास.. माझा ब्रुनो माझे मुंबईचे फ्रेंड आणि आता काय तुझं तिथे दिल्लीला.. इथेच रहा ना आमच्यासोबत.."

विराज : "हो ना.. मी ही तेच सांगतोय त्याला.. शौर्य राहू दे ते पेकिंग. आण इथे मी लावतो तुझं सामान.."

अस बोलत विराज शौर्यच्या बेगेतल सामान काढु लागला..

शौर्य : "विर नको ना..माझे फ्रँड्स वाट बघातायत माझी.. आणि मला ही त्यांच्या शिवाय इथे नाही रहायला होणार.."

विराज : "ओहहह त्यांच्या शिवाय.. आणि आमच्या शिवाय??"

शौर्य : "विर नको ना इमोशनल ब्लेक मेल करुस.. तु तर माझी जान आहे ब्रो.. तु बोलतोस तर नाही जात.."

शौर्य हाताची घडी घालुन तसाच बेडवर बसला...

विराज : "ए नोटंकी.. जा... अस नाराज होऊन माझ्यासमोर बसलास तर मला नाही आवडणार.."

शौर्य : "बघ नक्कीना...???"

विराज : "हम्म नक्की."

अनिता: "आणि फक्त हे दोनच महिने.."

शौर्य : "का???"

मम्मा : "मग तु US ला जायच शिकण्यासाठी.."

शौर्य : "नाही हा मम्मा मी दिल्लीच जाणार.. मी US ला वैगेरे नाही जाणार.."

अनिता : "शौर्य मी तुला विचारत नाही.. मी माझा निर्णय सांगतेय.."

शौर्य : "विर तु तरी सांगना मम्माला.. काय एक नवीन नवीन काढतेय ही??"

विराज : "अग पण मम्मा त्याला जे करायच ते करू देना... US सारख्या शिक्षण पद्धती इथे पण आहेत ना.."

अनिता : "माझा निर्णय झालाय विर... शौर्य तुझा व्हिसा पण येईल पुढच्या विक मध्ये.."

शौर्य : "नेहमी तु तुला वाटत तेच कर मम्मा म्हणुन मला नाही रहावस वाटत इथे.. माझ्या शब्दाला काहीच किंमत नसते ह्या घरी.. आतापर्यंत तुम्हा दोघांचंच ऐकत आलोय मी.."

शौर्य जोरातच स्वतःच्या रूमचा दरवाजा आपटत बाहेर गेला..

विराज : "मम्मा तु हे सगळं नंतर पण बोलू शकली असतीस ना.. म्हणजे वेगळ्या पद्धतीने.. "

अनिता : "दिल्लीला जाताना ही तो तसाच वागला माझ्याशी.. नंतर झाला नॉर्मल.. "

विराज : "तेव्हा गोष्ट वेगळी होती ग मम्मा आणि आत्ता थोडी वेगळी.. तु ह्या क्षणाला त्याला कितीही बोललीस की तू दिल्लीला जाऊ नकोस तरी तो जाणार आणि तु US च बोलतेस तर ते मला तरी इम्पोसीबल वाटत.."

अनिता : "एवढ काय आहे आता दिल्लीत त्याच.. प्रेमात वैगेरे पडला की काय??"

विराज : "येस मम्मा.. असच काहीस.. पण प्लिज US च काही बोलू नकोस.. निदान इतक्यात तरी.. त्याला हसत खेळत दिल्लीला जाऊ दे..मग बघु.. मी आलोच त्याला घेऊन.."

अस बोलत विराज शौर्यला समजवायला त्याच्या मागे आला..

शौर्य घराबाहेर पडणार तोच ज्योसलीन त्याच्या घरी येते..

ज्योसलीन : "ह्ये शौर्य तु आल्यापासुन मला साधं भेटायला सुद्धा आला नाहीस.. एवढा बिजी आहेस तु.."

शौर्य रागात असल्याने ज्योसलीनशी न बोलताच जाऊ लागला..

ज्योसलीन : "मी तुझ्याशी बोलतेय..तु माझ्याशी न बोलता कुठे चाललायस... कुठे बाहेर चाललायस का?? चल मी पण येते.. मला तुला काही तरी सांगायच आहे आणि ते खुप महत्वाच आहे.."

शौर्य : "मी थोड बिजी आहे आपण मग बोलु.."

ज्योसलीन : "मला आत्ताच बोलायचय शौर्य प्लिज... प्लिज.."

शौर्य : "नेहमी काय ग तुला नुसतं माझ्या मागे मागे यायच असत.. जरा पण कळत नाही का तुला समोरच माणुस आपल्याला टाळतोय म्हणजे काही तरी कारण असेल आणि पुन्हा माझ्या मागे मागे येत नको बसुस मला अजिबात नाही आवडत तु अस माझ्या मागे आलेलीस.."

शौर्य रागातच ज्योसलीनला बोलुन तिथुन निघाला..

त्याच्या मागेच विराज होता.. विराज ज्योसलीनलची समजूत काढत बोलणार पण ती रडतच सरळ घरी निघुन आली.. आतापर्यंत शौर्य कधीच तिच्यावर असा ओरडला नव्हता त्यामूळे ज्योसलीनला खुप वाईट वाटलं.. ती तिच्या रूममध्ये जाताच धाडकन दरवाजा आपटते.. आणि रुम आतुन लावून घेते..

घरात लाडवलेली एकुलती एक अशी ती ज्योसलीन.. त्यामुळे तिच्या मम्मा आणि डॅडा ला कळुन चुकत की नक्कीच हीच काही तरी बिनसलं आहे.. ते तिच्या रूम बाहेर उभं रहातच समजुत काढत होते पण ज्योसलीन काही दरवाजा उघडत नव्हते.. शेवटी ते कंटाळुन हॉल मध्ये येऊन बसतात..

इथे शौर्य नाराज होतच त्याच्या नेहमीच्या जागेवर येऊन बसला.. थोड्या वेळाने त्याच्या बाजुला विराज येऊन बसला..

विराज : "एवढं रागवायची खरच गरज आहे का शौर्य..? मम्माला किती वाईट वाटलं असेल तु अस निघुन आलास ते... आणि त्या ज्योसलीन वर पण एवढं ओरडायची काही गरज नव्हती.. बिचारी रडत घरी गेली.."

शौर्य :" मग मम्माला का कळत नाही..मी माझ्या फ्रेंड्स शिवाय नाही राहु शकतरे आणि समीराला न बघता दोन आठवडे मी कसा राहिलोय माझं मला माहिती.. तुला माहिती दिल्लीला मी एकटा होतो तेव्हा मला तुमची खुप आठवण यायची.. एक दिवस बिना रडता जायचा नाही..तस माझं आता आता झालय रे.. सवय झालीय रे त्यांची.."

विराज : "आणि तुझ्या पुढच शिक्षणाच काय?? का तुला फक्त मित्रच हवे."

शौर्य : "विर शिकुन मी बिजीनेसच करणार आहे ना आणि इथे शिकेल ना मी.. US नको मला.. मी नाही जाणार.."

विराज : "आपण समजवु मम्माला.. अजुन दोन महिने तरी आहेत ना आपल्याकडे.. "

शौर्य : "मम्मा ऐकेल..??"

विराज : "अरे में हु ना.. बस काय??"

शौर्य हसतच विराजला मिठी मारतो..

विराज : "आधी त्या ज्यो ला बघ.. ती रडतच घरी गेली.. आता तु रागवलास तिच्यावर म्हटलं तर घरी तिने काय हंगामा घातला असेल ते तुला माझ्या पेक्षा चांगलं माहीत असेल.."

(पुढे काय?? ज्योसलीन आता खरच काय धिंगाणा घालेल ते पाहुयात पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते ही नक्की कळवा.. तुमच्या प्रतिक्रिया वाचुन पुढील स्टोरी लिहायला मज्जा वाटते.)

क्रमशः

©भावना विनेश भुतल