Sahvas in Marathi Fiction Stories by शब्दांकूर books and stories PDF | सहवास भाग - 1

Featured Books
Categories
Share

सहवास भाग - 1

निराचं ऑफिस संपलं तेंव्हा सायंकाळचे आठ वाजले होते ..ती खूप डिस्टर्ब होती .. कारण बॉस ने खूप रागावलेल होतं .. नीरा एक फॅशन डिझायनर होती .. सध्या विंटर सिझन वर ती काम करत होती .. तिने रात्रंदिवस काही विंटर स्पेसिअल डिझाईन बनवले होते .. त्यात तिचे आणि नयन चे खटके पण उडाले होते .. ती फॅशन डिझाइनर असल्याने बरेचदा रात्री काम करत असे कारण तिचा कनेक्ट फ्रेंच कंपनी सोबत होता .. आज तिने बनवलेले एक पण डिझाईन त्याला आवडले नव्हते .. तिच्या मनात आलं नवीन आलेल्या एका तुकालादि डिझाईन बनवणाऱ्या इंटर्न ने काही तरी बोलली आणि त्यामुळे बॉस ला माझे डिझाईन नाही आवडले .. तसाही बॉस चा आपल्यावर डोळा आहे हे तिच्या स्त्री मनाला समजत होतं . कित्येकदा आडून त्याने आपला इंटरेस्ट दाखवला पण होता .. ती रागारागात मनातच म्हणाली ह्याला त्या नवीन इंटर्न ने आपलंसं केलेल दिसतेय .. कारण नवीन इंटर्न आल्यापासून त्याचे आणि निराचे खटके उडायला लागले होते .. निराला जॉब खूप जरुरी होता कारण नयन आजकाल तिच्यापासून दूर राहू लागला होता आणि त्यांचं लग्न एका कठीण वाटेवर आलेलं होतं. नयन आणि ती आजकाल महिना महिना जवळ येत नव्हते .. कधी कामामुळे कधी ट्रॅव्हल मुळे .. दोघंही चांगल्या पोसिशन वर असल्याने त्यांना आपली जवाबदारी सांभाळावी लागत होती ..

निराच्या मनात त्या ड्रेसचेच विचार चालले होते तिला वाटलं होतं कि हा ड्रेस खूप चांगला वाटेल .. पण बॉस ने तो तिच्या चेहऱ्यावर भिरकावून लावला आणि नवीन इंटर्न ने बनवलेला ड्रेस त्याने समोर पाठवला .. त्यामुळे तिला आपला जॉब तर जाणार नाही ह्याची चिंता लागली होती

विचारताच ती निघाली आणि रस्त्यावर आली ,,तिला लक्षात आलं कि आज कार नाही आणली म्हणून तिने ऍप वरून टॅक्सी बुक केली आणि ड्राइवर ला फोन लावला ..

कहा हो भैय्या?
आया मॅडम . बस ४ मिनिट ..
ती निघनार तेवढ्यात .. सुजय ने तिला हात दाखवला .
कुठे जातेस ?
घोडबंदर रोड ला .. का रे ?
मला सोडतेस का ?
हो का नाही .. चल ..

बोलता बोलता सुजय तिला म्हणाला कशाला काळजी करतेस असं होतच असतं डोन्ट वरी .. ते बोलत बोलत आले सुजय तिच्या सोबत गेले ३ वर्ष काम करत होता
ते दोघेही सुजयच्या घराजवळ आले .. सुजय घरी गेला आणि ती निघणार तेवढ्यात खाली आला ..

निराने कार थांबवली आणि विचारलं काय झालं ..

काही नाही ग .. बायको कुठे गेली कळत नाही .. हिलापण मी यायच्या वेळेसच बाहेर जायचं असतं .. तू जा मी थांबतो ..

नीरा टॅक्सी यामध्ये बसून निघाली आणि तेवढ्यात बॉस चा फोन आला

नीरा .. काय करायचं ठरवलस विंटर कॉलेक्शन च.?
सर मी बनवते दुसरे डिझाईन आणि देते तुम्हाला .. परवा
परवा नाही मला आज हवे उद्या मला फ्रेंच कंपनी ला पाठवायचे आहे नाही तर हा ऑर्डर जाईल .. आणि तुझ्या नौकरी पण ..
निराला मागून नवीन इंटर्न चा आवाज येत होता .. तिला एकदम रडायलाच आले .. रडवेल्या सुरत ती म्हणाली .. सर .. आणि तिला हुंदका आला तो आवारत ती म्हणाली हो सर ..
तिला कळत नव्हते काय करू ? ती रडवेली झाली आणि घरी पोहचली .. घरी आल्या आल्याचं नयन चा मॅसेज आला कि तो आज बंगलोरलाच थांबेल ..

निर्णयाने एक ब्लॅक कॉफी बनवली आणि ती गॅलरीत गेली .. दोन मिनिट तिला जीव द्यावा असा वाटायला लागलं ..

तेवढ्यात तिला नेहमीच आधार वाटत असलेल्या आणि तिच्या बॉस च्या बॉस ची आठवण झाली .. तिने त्याला फोन केला
सर ..
बोल नीरा .. कशी काय आठवण काढली
सर मला .. आणि समोर तिने आपला सर्व प्रॉब्लेम सांगितला .. सर मला उद्या सकाळी डिझाईन बनवायच्या आहेत काय करू कळत नाही ?

एक काम कर .. तू मला सांग काय काय केलेलं आणि .. एक काम कर तुझ्या डिझाईन मला ई-मेल कर .. पर्सनल ई-मेल वरून .. म्हणजे तुझ्या बॉस ला नाही कळणार ..
तिने ई-मेल केला आणि लॅपटॉप बंद करणार तेवढ्यात तिच्या सोसिअल मीडियावर तिला एक मॅसेज आला ..
हाय
ती कधीही उत्तर देत नव्हती .. कुणाही परक्याला .. म्हणून तिने दुर्लक्ष केलं
तेवढ्यात तिला एक फोटो आला .. तिच्या नवीन इंटर्न आणि बॉस च्या शृंगारलीलेचा
ती दचकली आणि तिने विचारलं कोण आपण ?