A cup without love tea and that - 14. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १४.

Featured Books
Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १४.







सकाळी.....

जया : "सल्लू झाला का फ्रेश बाळा.... ये ब्रेक फास्ट तयार आहे......☺️ संजू.....😌😌 आई या सगळे..... दादा ये की, नंतर त्या तुझ्या रोपांना पाणी दे.....😅"

मामा : "अग ताई ही रोपं मला अशी बघून होत नाही ना म्हणून, या पिल्लांना पाणी द्यावं लागतं......☺️"

आजी : "साहेब आले की, त्या रोपांमध्ये वेगळीच फुर्ताई बघायला मिळते..... नाही का जया!...😁"

जया : "हो ना त्यांनाही वाटत असेल मामा आला रे आला....😅"

सल्लू : "हा हा जैसे मामा के आने से मुझमे अलग सी फूर्ताई आ जाती हैं......😅😅"

संजय : "काय चाललंय जाम गोंधळ दिसतोय......😁"

आजी : "संजू..... आलास बाळा..... ये बस.....☺️"

संजय : "हो आई..... जयू बस ना तू..... आता सोबत बसायचं तू..... ओके..... नेहमी आम्हाला वाढून नंतर स्वतः खातेस.... अस नको ना ग करत जाऊस.....😒"

आजी : "जया बाळा...... आता तर तुझ्या बॉय फ्रेंड संजूची ऑर्डर आहे मग ऐकावं लागतंय बघ...... ये बस..... जुन्या प्रथा मोडलेल्या बऱ्या..... बस सोबत...."

जया : "हो आई....☺️"

सल्लू : "माँई... अरे सलमा....🙄🙄 किधर हैं रे......?"

जया : "उसे मैने दूध पिलाकर सुला दिया हैं...... तू खां तबतक जाग जाएगी वो.....☺️"

सल्लू : "वो क्या हैं ना..... आम्मिजी, माँई सलमा का चेहरा देखो नहीं तो दीन ही नहीं बनता मेरा.....☺️"

आजी : "माझा तरी कुठ दिवस चांगला होतो..... तिला बघितल्याशिवाय.....😘"

संजय : "माझाही.... ना...☺️😘"

मामा : "मग आमचे गुण आहेत आमच्या भाचीत..... कुणालाही गमत नाही आम्हा दोघांशिवाय.....😂"

सगळे : "सही पकडे हैं...... पिल्लू के मामाजी....😅😅"

सगळे ब्रेक फास्ट करतात.....🌮🥙🌯🥤🍴🍽️ जया आतून पिल्लुला घेऊन बाहेर येते..... आणि तिला टेबल वर बसवते.....❣️❣️


सल्लू जाऊन तिला स्वतःच्या कुशीत घेतो......😘😘❣️ द परफेक्ट सिब्लिंग्स.......❣️

जया : "बघा ना आई त्याच्या कुशीत जाऊन कशी गप बसते.....😘"

आजी : "ये सलमा - सल्लू की जोडी हैं जनाब युंही नहीं टुटेगी.....😅"

संजय येऊन परीला जवळ घेतो...... तिच्या कपाळावर एक छोटू किस्सी करतो तेव्हा ती त्याला एक क्यूट स्माईल देते.....☺️ जयाला साईड हग करतो......❣️ आणि पिल्लुला सल्लुकडे देतो..... नंतर जाऊन आईच्या पाया पडत.......☺️

संजय : "आई येतो ग...... सल्लू आज जाना हैं ना कॉलेज..... ड्रॉप करू या बाईक से निकल जाएगा बेटा..?.....🙄"

सल्लू : "अरे बाबा चला जाऊगा मैं..... डोन्ट बी वरी......रे❣️"

संजय : "ध्यान से जाना..... और हा..... ऊर्वी बेटी का भी ख्याल रखना..... मला सांगितलंय तुझ्या मामाने..... खूपच गोंडस बाळ आहे ती......😘"

सल्लू : "हा बाबा... रखुगा ना....☺️"

संजय : "चला मी निघतो..... येतो दादा.....☺️"

मामा : "हो जावई बापू....☺️☺️"

संजय निघून जातो......❣️

सल्लू : "चल आम्मिजी, माँई मैं भी निकलता..... ऊर्वी आई तो उसे पीक करना पडेगा...... जाने में आधा घंटा लग जाएगा..... मामा आता मैं ओके.....☺️"

मामा : "हा, सल्लू भाई आराम से जाना.....☺️"

सल्लू : "हा..... आता हुं.....😘"

सल्लुही निघून जातो.........🙂🙂

मामा : "सल्लू किती मनमिळावू आहे ना ताई.....☺️"

जया : "जेव्हा मला तो माँई म्हणतो..... वाटतं की, किती लवकर जवळ केलं त्याने मला आणि सर्वांनाच.....☺️"

आजी : "माझा तर बेस्ट बडीच आहे तो......😁😁"

मामा : "खरंय कधी - कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा...... मनाची नाती जवळची होऊन जातात...... आणि ती नाती टिकतात ही.....☺️"

आजी : "खरंय तुमचं......☺️"

तिकडे आपला सल्लू पोहचला........ ऊर्वी'स टर्निंग पॉईंट......😁 वाट बघत उभा असतो...... तो अर्धा तास आधी तिथं येऊन उभा राहतो...... @ ०७:४५ झाले........ तरी अजुन ती आलेली नसते...... त्याची हृदयाची धडधड वाढते......💓😥

सल्लू : "यार ही मला बोलली होती...... लवकर ये.... गेली तर नसेल ना...... कॉन्टॅक्ट ही करू शकत नाही.....😕"

@ ०८:१९ ........ तिचा अजूनही पत्ता नसतो....... तो अजूनच घाबरतो......😥

सल्लू : "यार ही गेली तर नसेल ना.....!!"

तो त्याच्या बाईक ने तिच्या रस्त्याकडे जाऊन बघतो...... दूरपर्यंत तिचा काहीच पत्ता नसतो....... त्याचे काळजाचे ठोके वाढतात....... माघारी येऊन परत तो तिची वाट बघत उभा राहतो...... @ ०८:४५........ आता त्याची सहनशक्ती संपते...... तो बाईकवर बसून निघणार तोच......... लांबून त्याच्या कानावर हाक पडते.......

@@@ : "सल्लू...... सल्लू......थांब......🙋🙋"

तो मागे वळून बघतो..... ती ऊर्वी असते..... धावत - पळत येताना बघून तो तिच्या दिशेने बाईक घेऊन निघतो.....🏍️ तिच्याजवळ पोहचतो...... ती अक्षरशः धापा टाकत असते..... येऊन थांबते......

ऊर्वी : "सॉरी......😥 ते मी लेट......😕"

ती पुढे काही बोलणार..... तोच.......

सल्लू : "शांत उभी रहा..... घे पाणी पी..... नंतर आरामात कॉलेज एडमिशन नंतर बोलूया...... आता निघालं पाहिजे...... एडमिशन काउंटर वर जाम गर्दी होईल नंतर....... बस मागे......🙂"

ती बसते मात्र..... तिच्या मनात सल्लू विषयी एक आदर निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते...... कारण, इतका वेळ वाट बघून सुद्धा तो तिच्यावर न चिडता आधी तिला पाणी पी अस सांगतो.....☺️

ऊर्वी : "यार काय माणूस ना..... इतका वेळ वाट बघून सुद्धा त्याच्या मनात राग नव्हता..... सच ए ब्यूटीफूल पर्सन यू आर सल्लू.....🙂"

सल्लू : "तू काही बोललीस का??"

ऊर्वी : "नाही रे..... कुठ काय..... तू बाईक वर लक्ष दे......😁"

सल्लू : "हो......😛"

ते कॉलेज मध्ये पोहचतात....... डायरेक्ट एडमिशन लिस्ट लागलेल्या रूमकडे वळतात...... तिकडे साधारण गर्दी असल्याने त्या दोघांना नाव शोधण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही....... दोघांची नावे लांब असतात..... त्यामुळे सल्लुच नाव मिळतं पण, ऊर्वीच न मिळाल्याने ती हायपर होते.....

सल्लू : "हे...... व्हॉट हॅपन्ड....?? रिलॅक्स..... मी बघतोय....."

ती गोंधळून जाते हे बघून सल्लू तिची मदत करायची ठरवून जातो..... तिला एका बेंचवर बसवून शांत करतो..... नंतर तो तिचं नाव शोधतो...... त्याला ते सापडतं..... पण, दोघांनाही वेगळं सेक्शन अलॉट झालेलं बघून त्याला खूप वाईट वाटतं...... पण, काय करणार ना...... तो तिच्या जवळ जातो.......

ऊर्वी : "काय झालं रे.....?? सापडली का मी त्या लिस्ट मध्ये....??😕😟"

सल्लू : ".........🙁 ह्म्म...."

ऊर्वी : "तुला काय झालं?"

सल्लू : "तुला दुसरं सेक्शन मिळालं..... आणि मला दुसरं....😕"

ऊर्वी : "तर त्यात काय नाव तर आहे ना...... थॅन्क गॉड...... मला वाटलं नाव येणार नाही.....🥴"

सल्लू : "म्हणजे तुला दुसरं सेक्शन मिळालं याचा आनंद आहे का..🙄"

ऊर्वी : "सेक्शन मिळणं गरजेचं..... तसही ह्या कॉलेजमध्ये खूप मेहनत घेऊन एडमिशन मिळतं..... आणि आपल्याला ते मिळालंय.... सो कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडी ओन्ली..... इकडचं - तिकडचं बोलायला नंतर आहे भरपूर वेळ..... आणि मला मुळात करीयरवर फोकस करून स्टडी करायचा आहे..... सो काय फरक पडतो ना सेक्शन वेगळं असू देत किंवा तेच.....🤷 आणि तसही आपण येताना सोबत येऊच की......🙂"

सल्लुला थोडं वाईट वाटतं पण, तो तसं दाखवून देत नाही..... आता हे इथे स्वाभाविक आहे.... कितीही मोठं व्यक्तिमत्व असलं तरीही हृदयात मात्र एखाद्या व्यक्तीविषयी असणाऱ्या "प्रेम, काळजी, आपुलकी" ह्या वा अशा भावना असतातच.....

तर सल्लूला जरी वाईट वाटलं असलं तरीही तो तिचा आदर मनात कायम ठेवून तिला नेहमी मदत करणार ह्या निर्मळ भावाने चेहऱ्यावर एक हसू आणतो......☺️

सल्लू : "खरं तर..... हा विचार मी केलाच नव्हता...... तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं, मी माझं नशीब समजतो...... नाहीतर इतकं समजावून सांगायला आज कुणाही कडे वेळ नाही.... तू ते केलंस त्यासाठी थँक्यू......☺️"

ऊर्वी : "थँक्यू तर मलाच, तुला म्हणायला हवं...... तुझ्या इतका विश्वास मी आजवर कुणावर ठेवला नव्हता..... तू मला खूप लॉयल वाटतोस...... असच रहा नेहमी.... आणि ह्या वयात आपण करीयर ओरिएंटेडच असावं असं मला तरी वाटतं.....🙂"

सल्लू : "नक्कीच... खूप चांगले विचार आहेत तुझे..... मला नेहमी आदर असेल.....☺️"

ऊर्वी : "कॅन्टीन.....??🙂"

सल्लू : "श्युअर......☺️"

दोघेही कॅन्टीन जातात....... मस्तपैकी मिळून दोघेही फूड एन्जॉय करतात.....☺️ (निव्वळ मैत्री....❣️)

सल्लू तिला तिच्या पॉईंट पर्यंत ड्रॉप करतो..... आणि घरी निघून जातो..... इकडे तो आज जे काही कॉलेजमध्ये झालं.... जे काही ती बोलली सर्व घरी सांगतो...... (कौटुंबिक विश्वास...❣️) अशीच फॅमिली सर्वांना मिळाली ना तर, कुटुंबात असणारी अविश्वासाची अदृश्य रेषा नाहीसी व्हायला वेळ लागणार नाही.......🙂

आजी : "सल्लू मानलं हा तुझ्या मैत्रिणीला.... अगदीच लाख - मोलाचं बोलली बघ....☺️ हेच वय असतं करीयरचं..... प्रेम झालं ना तरीही आपलं फोकस आधी करीयर असावं...... कारण, करीयर हा फॅक्टर खूप इंपॉर्टन्ट असतो बघ..... आणि साथ देणारी कुणी मिळालीच तर मग त्या करीयरच सार्थकही होतं....☺️"

सल्लू : "हा आम्मिजी मैं ध्यान रखूगा इन सब बातो का....☺️☺️"

जया : "अच्छा सल्लू ऊर्वीको इन्व्हाइट किया ना बच्चा....🙄"

सल्लू : "माँई अरे उसदिन मामाने सब डिटेल्स दिये उसको.... आयेगी एसा बोली वो.....☺️ आजायेगी रे डोन्ट वरी......😁"

आजी : "उसकी आने - जाने की जिम्मेदारी वैसे भी तेरी हैं सल्लू.... तो अब तू देख....🤭🤭"

सल्लू : "ओके ना आम्मिजी......😁😁"

पुढील आठवड्यात सल्लूच्या - सलमाचं, आम्मिजीच्या - पिल्लूचं, संजयच्या - परीच, जयाच्या - पिल्लीच, मामाच्या - भाचीचं, आणि माझ्या - सुकुचं वाढदिवस आहे बरं का..... सगळ्यांनी यायचं हा.....😁😁

येते मी पुढील भागात.......☺️

@खुशी ढोके..🌹