Ye vada raha sanam - 2 in Marathi Horror Stories by Dhanshri Kaje books and stories PDF | ये... वादा रहा सनम - 2

Featured Books
  • શિવ શક્તિ

    શિવ શક્તિ શિવ શક્તિ. શિવ વગર શક્તિ અધૂરી છે અને શક્તિ વગર શિ...

  • ભાગવત રહસ્ય - 75

    ભાગવત રહસ્ય-૭૫   માયા એવી છે કે-સુખ-સંપત્તિમાં ભક્તિ કરવા દે...

  • એક ષડયંત્ર.... - ભાગ 94

    (કનિકા જજને ફોન કરી ત્યાં બોલાવે છે. જજ પણ ત્યાં આવી અને રેક...

  • હમસફર - 28

    અમન : રાહુલ અંહીયા થી ચાલ્યો જા હું ગુસ્સામાં આવીને કંઈ ખરાબ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 5

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

Categories
Share

ये... वादा रहा सनम - 2

तेवढ्यात ऋषीकेशची आई रूचीका खोलीत येते. रुचीका खूप धार्मिक वृत्तीची असते. तिची महादेवांवर अपार श्रद्धा असते. म्हणूनच की काय पाच वर्षानंतर ऋषीकेश चा जन्म झालेला असतो. ऋषीकेश घरात एकुलता एक मुलगा असतो म्हणून घरात सगळ्यांचा तो अगदी लाडका असतो. त्याला थोडासा जरी त्रास झाला तर सगळ घर एकत्र येत असत.
असच आजही ऋषीकेशला डोक्याला हाथ लावून बसलेलं बघून रुचीका काळजीने विचारते.
रुचीका: "बाळ काय झाल तुला? डोकं दुखतय का तुझ आपण डॉक्टर कडे जायचं का? एसीतही तु इतका घामाघूम कसा झालास बेटा?" रुचीकाची काळजी बघून ऋषीकेश तिचे हात आपल्या हातात घेत तिला समजावतो.
ऋषीकेश: "आई... आई... अग थांब जरा माझी इतकी काळजी करू नकोस. मला काही झालं नाही आहे एक स्वप्न बघितल होत म्हणून घाबरलो बस. तु नको टेन्शन घेऊन इतक"
इतक बोलून दिवाणावरून उठत ऋषीकेश आवरायला निघून जातो.
इकडे रुचीका मनाशीच पुटपुटते.
रुचीका: "याच काही खर नाही. आज याची पत्रिका गुरुजींना दाखवते तेच काही मार्ग सांगू शकतील मला. अजून किती सहन कराव लागणार आहे कोण जाणे."
असा विचार करत रुचीका हॉलमध्ये येते आणि गुरुजींना फोन करते. फोनची घंटी वाजते आणि तिकडून आवाज येतो.
गुरुजी ज्ञानेंद्र: "हॅलो, कोण बोलतय?"
रुचीका: "गुरुजी. मी बोलतीये रुचीका."
गुरुजी ज्ञानेंद्र: "कोण रुचीका? अच्छा अच्छा कुलकर्ण्यांची सून होय. बोला बोला."
रुचीका: "गुरुजी ऋषीकेश संदर्भात जरा तुम्हाला भेटायचं होत. त्याची तुम्हाला पत्रिका दाखवायची होती आपण कधी भेटू शकतो."
गुरुजी ज्ञानेंद्र: "सध्या मी घरीच आहे तुम्ही कधीही या हरकत नाही."
रुचीका: "ठीक आहे गुरुजी. मग मी सगळं आवरलं की निघते. ठेऊ मी फोन."
गुरुजी ज्ञानेंद्र: "हो, ठेवा फोन बाय."
अस म्हणून दोघ फोन ठेवतात आणि आपापली कामे करू लागतात.
रुचीका डायनिंग टेबलावर नाष्ट्याच मांडून ठेवतच असते तेवढ्यात ऋषीकेश घाईघाईत आपलं आवरून हॉलमध्ये येतो.
ऋषीकेश: "चल आई. नाश्ता तयार आहे का? आज कॉलेजला लवकर पळायचं आहे बघ. आज खूप दिवसानंतर परत आम्ही सगळे जुने मित्र भेटुत. खूप दिवस झालेत कॉलेजला सुट्टी मारून चल बर लवकर."
रुचीका नाश्त्याची तयारीच करत असते. तयारी करता करता ऋषीकेश ला खुर्चीवर बसवते आणि बोलते.
रुचीका: "हो बाळा सगळी तयारी झाली आहे. तुझा डबा देखील भरून झालाय हा घे. आणि हे थोडे पैसे पण जवळ ठेव कधी लागतील सांगता येत नसत न. खूप दिवसा नंतर कॉलेजला जतोएस वाटलंच तर कँटीनमध्ये ही चहा स्नॅक्स घे बर.. आणि शांतपणे सांग बर मला तू आता. तु खरच बरा आहेस न? काही त्रास तर होत नाही न तुला."
ऋषीकेश घट्ट मिठी मारून म्हणतो.
ऋषीकेश: "हो आई मला कुठलाही त्रास होत नाही आहे. तु टेन्शन घेऊ नकोस हं."
तो आपला डबा घेतो आणि कॉलेजला निघून जातो. रुचीका ही आपल आवरून ऋषीकेश ची पत्रिका घेते आणि गुरुजींकडे निघून जाते.
गुरुजींच घर...
गुरुजी आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेले असतात. घरात मोलकरीण आपल्या कामात मग्न असते इतक्यात डोरबेल वाजते. आणि मोलकरीण दार उघडते.
मोलकरीण: "आपण कोण? आणि कोण हवंय तुम्हाला?"
रुचीका(बाहेरूनच): "मी रुचीका कुलकर्णी गुरुजींना भेटायला आले. आहेत का ते?"
मोलकरीण: "अच्छा अच्छा आत्ता आलं माझ्या ध्यानात साहेबांनी सांगितलं होतं मला तुम्ही येणार म्हणून. या..या.. बसा साहेब. ते असत न. मेडी(आठवत). काय..हं. मेडिटेशन ला बसलेले आहेत. येतीलच लवकर. काय घेणार तुम्ही?"
रुचीका घरावरून नजर टाकत मानेनेच काही नको असं सांगते आणि सोफ्यावर बसते. मोलकरीण परत आपल्या कामाला निघून जाते.
काही वेळा नंतर...
गुरुजी आपल्या साधनेच्या खोलीतून बाहेर येतात. गुरुजींना आलेलं बघून रुचीका उठून उभी राहते. ते बघून गुरुजी रुचिकाशी बोलू लागतात.
गुरुजी: "बसा.. बसा.. तुम्ही ऋषीकेश ची पत्रिका आणली आहे?"
खाली बसत रुचीका पत्रिका देते आणि त्यांना ऋषीकेश बद्दल सांगू लागते.
रुचीका: "गुरुजी, ऋषीकेश मला पाच वर्षानंतर झालेला एकुलता एक मुलगा आहे. त्याला थोडासा जरी त्रास झाला तर आम्ही घरातले सगळे मेंबर्स खूप घाबरतो. त्याला लहानपणा पासून एकच स्वप्न सारख सारख पडत असत त्यामुळे आम्ही नेहमी काळजीत असतो. त्याची पत्रिका आम्ही बऱ्याच जणांना दाखवली आहे पण व्यर्थ. शेवटी माझ्या मैत्रिणीने तुमच्या बद्दल सांगितलं म्हणून इथे आले."
गुरुजी ऋषीकेश ची पत्रिका बघतात आणि विचारतात.
गुरुजी: "अं, तुमच्याकडे कुणाची महादेवांवर अपार श्रद्धा आहे का?"
रुचीकाला जरा आश्चर्य वाटत ती सांगते.
रुचीका: "का बरं, गुरुजी? माझी महादेवांवर अपार श्रद्धा आहे. मी ऋषीकेशच्या जन्माच्या वेळी सोळा सोमवारच व्रत देखील केल होत. पण झालं काय गुरुजी."
गुरुजी पुन्हा एकदा पत्रिका बघतात आणि सांगतात.
गुरुजी: "म्हणूनच. अहो काळजी करू नका तुमच्या मुलाची पत्रिका अगदी उत्तम आहे. हजारो लाखोंमधून एकाची अशी पत्रिका असते. खूप भाग्यवान आहे तुमचा मुलगा. अस करा उद्या याच वेळी जरा त्याला माझ्याकडे घेऊन या मला जरा त्याच्याशी बोलायचं आहे. आणि काळजी करू नका सगळं ठीक होईल."
रुचीका मानेनेच ठीक आहे म्हणते आणि घरी निघते.
क्रमशः