#तू_ही_रे_माझा_मितवा...
. (#वेद)
“ऋतू फक्त पाचच मिनिट, शॉवर घेतो & कॉफी मी बनवतो आज.तू बस जरा” त्याने bag ठेवली आणि बाथरूमकडे गेला.
ती हॉलमध्येच बसून होती. आतून कडी सरकवल्याचा आवाज आला.पाठोपाठ त्याने आवाज दिला.-
“ऋतू...तेवढा laptop चार्गिंगला लाव ना.”
“ओके..”
त्याची bag समोरच टेबलावर होती. तिने चार्जर, laptop काढला, तो काढतांना अनावधानाने त्याची डायरी खाली पडली. तिने ती उचलली. ज्या पानावर ती डायरी उघडली होती तिथे सुंदर चारोळी होती ...तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरलं.
उत्सुकता म्हणून तिला ज्यादिवशी त्याने पहिल्यांदा पाहिलं तो जॉबचा पहिला दिवस, त्याने गोव्याला सांगितल्याप्रमाणे “cafune” शब्द, त्याच्या फिलिंग्ज वाचावं असं तिला उगाचच वाटलं ....हे चुकीचं आहे, मेंदू बजावत असतांनाही ‘फक्त तो दिवस’..म्हणून तिने धडधडत्या मनाने पानं झरझर पलटवली.
त्या तारखेवर आली तिचे डोळे त्या पानावरून फिरले आणि....
आणि तिने डायरी बंद केली.bagमध्ये टाकली. laptop चार्जिंगला लावला दीर्घ श्वास घेत ती स्वतःला शांत करू पहात होती.
तो तयार झाला.ओले झालेले केस टॉवेलने पुसत तो किचनमध्ये गेला. ती सोफ्याला मागे डोकं टेकून डोळे मिटून बसली होती. जरावेळाने कॉफी घेऊन तो आला.हळूच शेजारी बसला. तिचे डोळे बंद होते. पापण्यांच्या कडा किंचित ओलावल्या होत्या.
पापण्यांवरची लायनरची रेष तुटक झाली होती.तिचे केस त्याने हलकेच सावरले,तिने डोळे उघडले.त्याने हळुवार हसत तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटांवर ओठ टेकवले.
ओले केस, गालांवरचे खोल डिंपल..आणि ..आणि डायरीच्या पेजवर असणारं प्रश्नचिन्ह..कुठला वेद खरा? ती प्रश्न डोळ्यात घेऊन त्याच्याकडे बघत होती. एका हाताने तिला हळुवारपणे जवळ ओढत तिच्या मानेवर ओठ टेकवले.
“वेद behave…” तिने त्याला बाजूला केलं.
तिचं असं झिडकारणं त्याला अपेक्षितच नव्हतं,त्याच्या फक्त जवळ असल्याने येणारी तिच्या गालांवरची लाली कुठेही दिसत नव्हती,तो गोंधळला.
“ऋतुजा काय विषय आहे राव ...काय झालंय?”
“वेद...शांत हो प्लीज. मला बोलायचंय म्हणून आपण भेटलोय. आठवतंय ना? ती सुद्धा वैतागत म्हणाली.
“मी बघतोय ऋतू तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हाच तू uncomfortable होतेय,याआधी तुला माझ्याजवळ यावसं वाटायचं. ओके ठीक आहे, तुला बोलायचंय ना? बोल ऐकतोय मी.”
तो चिडला होता.कॉफीचा मग हातात घेत तो जरा बाजूला सरकत मागे टेकून बसला. तिने पर्स मधून कागद काढले आणि त्याच्यासमोर ठेवले.
“वेद मितवा काय आहे?”आणि अजून एक - मला पहिल्यांदा पाहिल्यावर ‘cafune’ शब्द तुझ्या मनात आला आणि तू ते डायरीत लिहिलं असं म्हटला होतास पण तसं तर काहीच नव्हतं उलट त्यात लिहिलं होतं-“माझ्या कथेची हिरोईन..निशांतची सोनाली होऊ शकेल का ही over smart ऋतुजा मोहिते?.... is she perfect for “मितवा” खाली एक मोठं प्रश्नचिन्ह! वेद मला माहितीय मी चुकीचं वागलीय,सॉरी. पण आत्ता laptop काढतांना चुकून तुझी डायरी खाली पडली.मला तुझ्या मला पाहिल्यावरच्या फिलिंग्ज तुझ्या शब्दात वाचायचा मोह आवरला नाही.” तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं.
खरतरं तिच्या तोंडून ‘मितवा’ नाव ऐकताच तो चमकला,तिने हे विचारावं हे त्याला अगदीच अनपेक्षित होतं.
तो जरा बिथरला पण एक दीर्घ श्वास घेत शांत होत त्याने हातातला मग खाली ठेवला.तिने ठेवलेले रफपेजेस बघितले थोडंस उदासवाण हसून तो म्हणाला-
“बस्स एवढच विचारायचं होतं? हे महत्वाचं बोलायचं होतं तुला? यासाठी मला दूर करत होतीस आणि डायरी वाचून सीन क्रियेट करू नकोस ऋतू.तू समजतेय तसं नाहीये.Not a big deal.
I can explain .please try to understand.
नीट ऐक -
Meraki हे रायटिंगसाठी एक International platform आहे,कितीतरी भाषांमध्ये लिखाण प्रसिद्ध होतं तिथे. Meraki चा अर्थच आहे स्वतःला वाहून देणं. आपल्यातलं काहीतर काढून देणं.
अश्या जबरदस्त platformवर मी लिहितो.मी एक मेथड रायटर म्हणून establish केलंय स्वतःला. मेराकीची tagline आहे ‘लीवीन ला विदा लोका...’ खरचं ही रायटिंगची दुनियाच क्रेझी आहे. अर्थात क्ल्यायंट सेक्शनसारख्या बोर सेक्शनला काम करणाऱ्या तुला हे माहित असणं अजिबात शक्य नाहीये.
तुला माहितीये किती तरी लेखकांचं स्वप्न असतं फक्त meraki मेंबर होण्याचं अश्या भन्नाट platformवर मी लिहितो आणि प्रचंड fanbase सुद्धा कमावलाय.इथल्या माझ्या कितीतरी मित्रांना शॉर्टफिल्म, वेबसिरीजमध्ये लिखाण ऑफर झालंय.माझं ही तेच aim आहे.हॉरर,थ्रील्लर बरंच लिहून झालं तसा कंटाळा यायला लागला. रोमांटिक काहीतरी लिहावं असं वाटू लागलं.मग स्टोरी सुरु केली “मितवा” त्याचे हे दोन कॅरेक्टर निशांत आणि सोनाली.म्हणजे माझी सोना.
हंड्सम तर मी आहेच पण पहिल्यापासून अबोल होतो जरा आणि जास्त वेळ लिहण्यात जात असल्याने कॉलेजात प्रेमाच्या भानगडीत नव्हतो पडलो.जॉब लागला आणि स्टोरी लिहायला सुरुवात केली पण जिवंतपणा येत नव्हता.
तुला माहितीय ना मी माझ्या लिखाणाच्या बाबतीत प्रचंड पॅशनेट आहे,नव्हे ती माझी प्रायोरिटी आहे.मला सोनाली अनुभवायची होती.तिचं हसणं,दिसणं,लाजणं,जवळ येणं,तिचा राग,तिची काळजी,तिच्यासोबतचा एकांत,तिची जवळीक.. सगळं सगळं अनुभवायचं होतं आणि मगच लिहायचं होतं.Meraki standard you know! पण ते काही केल्या शब्दांत उतरतच नव्हतं.सगळे संवाद कोरडे,निष्प्रभ.शब्दांचे व्यर्थ बुडबुडे वाटत होते.हॉरर,थ्रिलर सगळं हाय लेव्हलला इमाजीन करून परफेक्ट लिहित होतो पण इथे हरलो यार... स्वतः प्रेमात पडल्याशिवाय त्याला अर्थ येणार नाही हे समजून चुकलं. मग पहिल्या दिवशी तुला बघितलं आणि सोनाली रियल असती तर तूच असतीस असं वाटून गेलं पण तेव्हा तू जरा ओव्हरस्मार्ट वाटली म्हणून ते प्रश्नचिन्ह.
Eventually आपण प्रेमात पडलो,तुझं दिसणं हसणं,हे कॉफीकलरचे डोळे, हे रेशमी केस,कमाल फिगर,चुणचुणीत हुशार,Prompt आणि विशेष म्हणजे नादान,बालिश सहज influenceमध्ये येणारी अशीच हवी होती मला सोनाली.
खोटं बोलणार नाही रेवाचासुद्धा ऑप्शन होता पण जो X-factor तुझ्यात होता.जी कशिश तुला मिळवण्यात होती त्याची सर कुठल्याच गोष्टीला नाही.तू आरुषकडे आकर्षित तर होत नाहीये?ह्या विचाराने जरा भीती वाटली पण माझं प्रेम तुला समजायला लागलं आणि आपली लव्हस्टोरी सुरु झाली प्रत्यक्षात ही आणि लिखणात ही पण ऋतू लक्षात घे त्या प्रेमातला सगळ्या इमोशन खऱ्या होत्या.बेन्देवाडीला झालेली आपली जवळीक प्रमाणिक होती फक्त लिहतांना मी ते फिजिकल लिहिलं कारण तिथला वाचक वर्ग broadminded आहे.
आपली स्टोरी मी माझ्या पद्धतीने लिहून काढायला लागलो कारण आता मला त्या इमोशन,ती तरलता,ते आठवणीत वेडं होणं सगळं सगळं एकदम जिवंत रसरशीतपणे लिहिता येत होतं. मनासारखं जमत होतं.आपली स्टोरी “मितवा” बनून कागदावर प्रत्यक्ष उतरायला लागली. बऱ्याचवेळा मी वहावत जायचो, गोष्टीत आहे की सत्यात हेच विसरून जायचो ,अगदी figurative बोलायचो पण ते तूला छान वाटायचं,ते निशांतचे डायलॉग तुला आवडायचे, तुझा प्रतिसाद टिपून घ्यायला माझ्यातला लेखक किती पझेसिव्ह होता तुला सांगू शकत नाही आणि आपली कथा अजून सुंदर आकार घ्यायची.
माझ्याकडून I love you ऐकण्यासाठी तू किती आतुर होती कळत होतं मला पण तुझ्याकडून पहिल्यांदा I love you ऐकायचं हा एवढाच माझा अट्टहास होता पण तिथे तू टिपिकल प्रेयसी झाली खाणंपिणं सोडलं,तुला त्या रात्री भेटायची अनिवार ओढ लागली,राहावलं गेलं नाही.मनात पहिला विचार आला की तुझी मला पाहिल्यावर किती गोड reaction असेल. ह्या भेटीने कथा सुंदर वळणावर जाईल,मी तुझ्या त्या भेटीसाठी तसाच निघून आलो. मग मात्र मला तुला प्रपोज करण्याशिवाय मार्ग उरला नाही कारण तू खूप दुखावली जात होतीस,तुझे पेशंस संपले तर वेद आणि निशांत दोघांची गोष्ट विस्कटेल म्हणून मी माझ्या ह्या प्रिन्सेसला वाढदिवसाला प्रपोज करायचा सुंदर प्लान बनवला.
तुला रेवा आणि जयचा राग यायचा,त्यांना तुझा राग यायचा कळत होतं पण मला एकाच वेळी जयची आणि माझी मैत्री,जयची आणि रेवाची मैत्री,रेवाचं माझ्यावर एकतर्फी प्रेम,तुम्हा दोघींचं माझ्यासाठी पझेसिव्ह होणं सगळं अनुभवायला मिळत होतं, लिहता येत होतं म्हणून त्यानांही अंतर दिलं नाही.
रीमाताईच्या प्रकरणानंतर तू जरा जास्त सेंटी झाली,जास्तच पझेसिव्ह झाली,अग्रेसिव्ह वाटली जे माझ्यासाठी नवीन होतं. आता तुला प्रपोजकरून ही स्टोरी मला वेगळ्या टर्नवर न्यायची होती पण जयच्या एका चुकीमुळे भलतंच झालं.मग वाटलं तू चिडणार,प्रपोजच्या अगोदरच ब्रेकअपची भाषा करणार पण तू अनपेक्षितपणे समजूतदारपणा दाखवला,ब्रेकअपची मला इतकी चिंता नव्हती,its was ok for me . मी तुला लगेच मनवून घेतलं असतं,इतके आपण एकमेकांचे झाले होतो. पण तू वेगळाच stand घेतला.एंगेजमेंट किंवा त्या दोघांना गुडबाय.
मी दोघं गोष्टीसाठी तेव्हा तयार नव्हतो,विचारही केला नव्हता आणि मुख्य म्हणजे आपली स्टोरी भरकटली असती जे मला मान्य नव्हतं.पण आपल्या भांडणात त्या जयरेवा प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आणि तू एकटी निघून गेलीस. तू निघून गेल्यावर मात्र मला जाणीव झाली की इतक्या लोकांमध्ये पण मी एकटा आहे, पूर्ण स्टोरी वाचून काढली आणि जाणवलं की आपलं जरा चुकतंय तुझ्यापेक्षा मितवावर जास्त प्रेम करतोय आणि त्यामुळे सगळं कन्फ्युजन वाढतंय.मग जाणवलं की मी निशांत नाहीये मी वेद आहे. निशांत माझं आयुष्य नाही ठरवू शकत.
त्यादिवशी अगोदरची एक स्टोरी मिराकीने चार भाषांमध्ये ट्रान्सलेट केल्याचा congratulations चा मेल आला पण त्यानेही मला विशेष आनंद झाला नाही.आपल्या दोघांमधले क्षण न क्षण डोळ्यासमोर येत राहिले.तुला फोन केल्यानंतर मी सहन होत नाही तरी विडच्या नशेत राहिलो.राग येत होता स्वतःचा.
तुझं ते watarfall जवळ माझ्याजवळ असणं,तुझ्या डोळ्यांवर पहिल्यांदा टेकवलेले ओठ, त्यावर तुझं निरागस लाजणं,तुझ्या रूमवर आलो तेव्हा रडून माझ्या मिठीत येणं हे लिहण्याच्या पार पलीकडे होतं हे कळून चुकलं मला. शेवटी विचार केला बास यार,एक स्टोरी प्रेमापेक्षा मोठी नाही होऊ शकत.आपला तो हॉरर जॉनरच बरायं.मला फक्त माझी ऋतू हवी आहे.एंगेजमेंट तर एंगेजमेंट,यांना गुडबाय तर गुडबाय काहीही चालेल पण ऋतू पाहिजे.
खूप काही शिकवलं त्या कथेने मला, एक जाणवलं की स्टोरी आणि रियललाईफ खूप वेगळं प्रकरण आहे.आपण नाही कुणाच्या प्रेमाची, आयुष्याची पटकथा आपल्या पेनाच्या ताकदीने बदलवू शकत. तुझ्या प्रेमापुढे माझं लिखाणाचं ओब्सेशन हरलं.
मी तुला म्हटलं होतं ना ’प्रेम आपलं प्रतिरूप शोधतं, जोपर्यंत आपलं कुणी मिळत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास चालू राहतो.’ माझा प्रवास तू सोडून गेली त्यादिवशी सुरु होऊन परत तुझ्याचजवळ येऊन खऱ्या अर्थाने संपला आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो,प्रेम समजायला लागलो.मला लवकरात लवकर तुझ्याकडे परत यायचं होतं.
जे काही झालं ते फक्त मला माहित होतं. तू तर ऑलरेडी माझ्या प्रेमात होती. फक्त मी नव्याने सुरुवात करायचं ठरवलं..आणि हा मी नवा वेद आहे,तुझा वेद. बस्स आता पुन्हा असं प्रायोगिक लिहायचा अट्टहास करणार नाही,वचन देतो तुला.आपल्यात काहीच बदलेलं नाहीये ऋतू. माझं तेव्हाही तुझ्यावर प्रेम होतं आणि आत्ताही आहे आणि कायम राहील...आपल्या प्रेमातला क्षण आणि क्षण खरा होता,त्यात खोट नव्हती,नाटक नव्हतं चूक फक्त तो लिहून काढायचा,त्यानुसार तुझ्या भावना टिपायचा अट्टाहास करण्यात होती. ऋतू I will just forget everything आपण नव्याने सुरुवात करूया. निशांतचं प्रेम वेदला पूर्णपणे खऱ्याखुऱ्या अर्थाने समजलं त्यामध्ये फक्त ती रात्र आणि तुझ्या वाढदिवसाचा दिवस एवढाच वेळ गेलाय.
मितवा माझ्यासाठी तिथेच संपली ऋतू.....आता पुढे फक्त आपली,आपल्या प्रेमाची गोष्ट”
तो बोलायचं थांबला.मनावरचं ओझं उतरल्याने सुटल्यासारखं झालं.त्याने तिच्याकडे बघितलं,ती स्थितप्रज्ञ बसून होती.वेद जे बोलत होता ते अगदी मनापासून बोलतोय,खरं बोलतोय हे तिला पक्क ठावूक होतं पण त्यावर काय बोलावं,काय प्रतिक्रिया द्यावी?
तिच्या मनातल्या विचारांच्या अस्ताव्यस्त तुकड्यांना एक चेहरा तर मिळाला होता पण अगदी अनोळखी आणि अजूनही तिच्यासाठी गुंता सुटला कुठे होता,एका गाठीची उकल फक्त झाली होती.
“वेद मितवा तिथे संपली नाही, सुरु झाली...” ती उदासपणे म्हणाली.
“म्हणजे?” तो आश्चर्याने म्हणाला.
#क्रमशः
©हर्षदा
पार्ट 24--11.30pm today