Tu Hi re majha Mitwa - 20 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू ही रे माझा मितवा - 20

Featured Books
Categories
Share

तू ही रे माझा मितवा - 20

#तू_ही_रे_माझा_मितवा

#भाग_२०

औंधच्या एका टुमदार बंगल्यासमोर गाडी थांबली.
कबीरच्या गाडीचा आवाज ऐकून वॉचमनने गेट उघडलं.त्याने गाडी आत लावली.डीक्कीतून bag काढली आणि ऋतुजाने मागे केलेलं सीट व्यवस्थित लावत असतांना त्याचं लक्ष खाली legmatवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं.
ऋतुजाचं अँकलेट होतं.त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल पसरलं त्याने ते खिशात टाकलं आणि तो पुढे जाणार तोच वॉचमन म्हणाला –
“कबीर भाऊ ही bag खाली पडली होती.”

त्याच्या हातात एक हार्टशेप छोटी गुलाबी bag होती.

“ माझीच आहे.” त्याने ती ओढून घेतली.

त्या गुलाबी bagकडे पाहून वॉचमनने पुन्हा कबीरकडे पाहिलं.

अपेक्षेप्रमाणे आई बाबा झोपले होते,कबीर तडक रुममध्ये गेला. शॉवर घेऊन बेडवर पडेपर्यंत त्या क्षणाची हजारवर आवर्तनं त्याच्या मनात चालू होती आणि स्वतःचा रागही येत होता.टेबलवर ठेवलेलं तिचं अंक्लेट त्याने हातात घेतलं.

“तु तिच्याकडे परत तेव्हाच जाशील जेव्हा मी स्वतः तिच्या पायात ते घालणार,जे शक्य नाहीये हो ना? म्हणून ड्यूड तू आता कायम माझ्याकडे रहायचं विसर तिला” त्या अंक्लेटकडे पाहून तो हसला.
सकाळी जाग आली तेव्हाही ते अंक्लेट त्याने घट्ट पकडलेलं होतं.

*******

“अभय,रूमवर आहेस तू?” ऋतुजाने अगदी सकाळी सकाळी त्याला कॉल केला.

“आहे , का?” त्याने आश्चर्याने विचारलं.

“अरे मी पुण्यात आलेय काल आणि वेद आज येतोय.”

“एक मिनिट , पण काल सकाळी मी फोन केला तेव्हा तू गोव्यात होतीस मग?आणि वेगवेगळे कसे काय परतलात तुम्ही?”

“बिग स्टोरी.भेटल्यावर सांगते. तू वेदला काही विचारू नको तो उगाच चिडेल माझ्यावर, साधारण ४.३०-५पर्यंत पोहचतोय, मी येऊ तिथे ४ वाजेपर्यंत?”

“ये ,काहीच हरकत नाही.मी लोकेशन पाठवतो ”

तिच्या आयुष्यात आलेल्या ह्या दोन सलग रात्रींनी एक वेगळच काहूर माजवून दिलं होतं,कालची रात्र तर तिने अक्षरशः सलग चारपाच तास विचार करत घालवली होती.
तनु,प्रिया नसल्याने एकटेपण जास्तच जड जात होतं.अशांत अस्थिर मनाचा राग येत होता.तिला आता वेदला लवकरात लवकर भेटून परिणामांची चिंता न करता हे सगळं सांगावसं वाटत होतं. सगळ्या गोष्टीतून बाहेर यायला म्हणून छान तयार होऊन तिने मूड फ्रेश केला.तिच्या प्रोजेक्टचं पुढचं काम करायला घेतलं,काम करतांना ती जरावेळ सगळं विसरली.
चारपाच तास कसे निघून गेले कळलचं नाही,नाही म्हणायला ३/४ वेळा फोनकरून वेद कुठपर्यंत पोहचला याची चौकशी करून झाली होती. कबीरचा विचार मनात आला तसं तिचं चित्त पुन्हा सैरभैर झालं.
कबीर भेटायच्या अगोदर आपण जगलोय की नाही याचा विसर पडावा इतका तो आणि तोच आठवत होता.

“काय कारण असेल कबीरं असं माझ्या आयुष्यात यायचं? इतकं का बैचेन वाटतंय? काहीतरी कुठेतरी चुकतंय,नक्कीच?.नाही,नाही करायचा मला त्याचा विचार.”

बेसिनसमोर उभं राहून तिने रागात चेहरयावर थंड पाण्याचे शिपके मारले,त्याच्यासोबतचा क्षण आणि क्षण धुवून काढत असल्यासारखं ती पाणी मारतच रहिली. जरा शांत वाटलं.

वेद यायच्या अगोदर पोहचायला हवं म्हणून ती तयार झाली. कॅब करून दिलेल्या लोकेशनला पोहचली.अभय रूमवरच होता.
तिने विचार केला होता तसं ते २bhk घर boys room असूनही अस्ताव्यस्त नव्हतं, तर छान नीटनेटकं होतं.
ऋतू आणि वेद वेगवेगळे का आले ह्या प्रश्नाने त्याला सकाळपासून भंडावून सोडलं होतं.

“बोलं काय झालंय? तू एकटी का आलीस परत? रायटरने कसं एकटं सोडलं तुला?”

तिने गोव्याला काय काय झालं ते थोडक्यात त्याला सांगितलं.

“म्हणजे त्याने जय आणि रेवासोबत फ्रेन्डशिप तोडावी किंवा एंगेजमेंट करावी नाहीतर तुमचं ब्रेकअप असा सरळ अर्थ घेऊ का?” अभयने नाराजीने विचारलं.

“अभय तसं नाही रे...”

“ I know, तुला रीमासोबत जसं झालं तसं तुझ्या आयुष्यात काही झालेलं नकोय असंच ना?” तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

“ताईने तुला सांगितलय सगळं?” तिने आश्चर्याने विचारलं.त्याने होकारार्थी मान हलवली.

“तू वेद्ला बोललाय ह्याबाबतीत?”

“छे,वेदला का सांगू? पण तू जसा विचार करतेय वेद तसा नाहीये.
त्या दोन मुर्खांमुळे तुमची रिलेशनशिप का खराब करताय? त्यांना हेच तर हवंय ना?.”

“जय आणि रेवा मूर्ख आहेत हे समोर समोर दिसत असून, in-fact जयने आमच्या डेटला त्याला ड्रिंक करायला फोर्स करणं,ड्रग्ज देणं,योगायोगाने तो रेवाच्याच रूममध्ये असणं हे फुलीश आणि स्टुपिड योगायोग वेदला खरे वाटतात याचं मला आश्चर्य वाटतं. मी शंका नाही घेत त्याच्यावर पण हे मला खूप वेळा खटकतं.”
ती उदासपणे म्हणाली.

“ऋतुजा त्याच्या प्रेमावर खरच शंका घेऊ नको यार.मी बघितलंय त्याला तुझ्या प्रेमात वेडं झालेलं. इतकं प्रेम करतो तो की दिवसभर तू त्याच्यासोबत असतेस तरी, रात्री काहीबाही स्क्रिप्ट्स वैगरे काय लिहित असतो ना तेव्हा जसं तुझ्याशीच बोलतोय असे वाक्य बोलत असतो. मी काही मुद्दाम ऐकत नाही पण कधीकधी महाशय दरवाजा लावायचा विसरतात आणि मग शांततेत ऐकू येत “सोनाली तुझे कॉफी रंगाचे कॅफिन भरलेले डोळे बोलतात माझ्याशी वैगरे सोनाली म्हणतो ना तो तुला,I know ”

तो तिला चिडवत म्हणाला.

“सोनाली नाही सोना” ती जरा ब्लश होत म्हणाली.

“सोनाली I think ” तो आश्चर्याने म्हणाला.

‘नाही रे सोना म्हणतो तो. वेडाय तो थोडा म्हणून काळजी वाटते.”

“हा मे बी , सोना काय सोनाली काय एकच,तो लिहतांना काय बडबड करतो त्याचं त्यालाच माहिती.ऋतुजा रीमासोबत झालं ती परिस्थिती वेगळी होती,तिचं अरेंजमरेज होतं .इथं तुम्ही दोघं प्रेमात आहात,जीवापाड प्रेम करतात.तुमच्यात तिसरं येणं शक्य होईल का?”

“अं...हो” ती तुटकपणे बोलली,”तिसरं” ह्या शब्दाने तिची धडधड पुन्हा वाढली.

“बरं,madam मी आता निघतो,तुम्ही आरामात बसा आणि रायटरची वाट बघा,मला जरा काम आहे.काही लागलं तर kitchen is yours.”

ती फक्त हसली.तो दरवाज्यापर्यंत गेला आणि मागे फिरला.

“तू रीमाला भेटणार आहे का आज किंवा उद्या?”

“हो रात्री भेटणार आहोत,का?”

“एक मिनिट तिचं हे जॅकेट राहिलंय त्यादिवशी गाडीत तेवढं दे”
त्याने एक अगदी व्यवस्थित घडी केलेलं जॅकेट तिच्या हातात ठेवलं.

“एक मिनिट” तिच्या हातातल्या जॅकेटकडे एकवेळ बघून तो आत गेला, दोन तीन रफपेजेस घेऊन आला आणि ते जॅकेटच्या आत ,खाली वर असे व्यवस्थित ठेवले आणि एका छान बॅगेत ठेऊन तिच्या हातात दिलं.

“ओह हो,इतकं व्यवस्थित? ताईला असंच व्यवस्थित ठेवलेलं आवडतं..” ती उत्साहाने म्हणाली.

“हो त्यासाठीच trying to impress. स्वच्छ धुऊन घेतलय मावशीकडून. तिला आठवणीने दे,फार फेवरेट आहे तिचं.” तो जरा ब्लश होत म्हणाला तिने ते हेरलं.

“ओ हो...फेवरेट अंड ऑल” ती जरा चिडवत म्हणाली.

“बोलू आपण ह्या विषयावर सविस्तर.आता मला जायचंय.शांततेत सगळं सॉल्व्ह करा” थोडंस तो ही मिश्कीलपणे हसत म्हणाला आणि निघून गेला.
खरतरं दोघांना जरा एकट्यात बोलता यावं म्हणून तो निघाला होता. तिने ती bag तिच्या पर्सवर ठेवली.तिला ताईच्या आयुष्यात अभयचं येणं फार सुखावणारं वाटलं.वेद्ला फोन केला तो १०/१५ मिनिटांत पोहचणारच होता.ती आलीये हे त्याला माहित नव्हतं.

ती वेद्च्या रुममध्ये गेली. दोन अगदी लांब रुंद अशी लायब्ररी कपाटं होती जी पुस्तकांनी गच्च भरली होती,तिने पुस्तकं चाळली,हॉरर,मिस्ट्री,त्यांचे ते भयानक कव्हर...नकोच ते म्हणत तिने ते बंद केलं.मग दुसऱ्या शेल्फमध्ये असलेली लव्हस्टोरीजची पुस्तकं बघितली. थोडावेळ पुस्तकं चाळल्यावर तिला कंटाळा आला.
ती त्याच्या टेबलजवळ येऊन बसली. रुंद टेबलावर त्याचं रायटिंग स्टेशन,प्रिंटर,बराचश पेजेस आणि वह्यां व्यवस्थितपणे ठेवल्या होत्या. खाली एका प्लास्टिक कार्टनमध्ये बरेच चुरगळलेल्या,खराब झालेल्या,रद्दी पेपरचा ढीग होता, समोरच्या सॉंफ्ट नोटीसबोर्डवर त्याच्या कामाचे खुप सारे कटिंगज होते,पेन पेन्सिलांनी एक tray पूर्ण भरला होता.
तिने एक दीर्घ श्वास घेत त्याच्या रूमवर एक नजर फिरवली. पुस्तकं,कागदं,पेन,पेंसिलांचे ढीग यांनीच ती रूम खुलून दिसत होती.

समोर बोर्डवर त्याचा एक मस्त फोटो होता. तिने तो जवळ जाऊन पहिला.तो पाहून तिच्या चेहरा उजळला.जागेवर बसणार तसं बोर्डच्या खालच्या कोपऱ्यात असलेल्या एका रंगीत कटिंगवर तिचं लक्ष खिळलं.
तिने जवळ जाऊन पाहिलं-“love story prompt” रंगीत लेटर्समध्ये लिहिलं होतं. त्या पेजवर कलरफुल ट्रीडायग्राम होती ज्यावर त्याने त्याच्या अक्षरात फक्त S,N,I,Y,T अशी काही अक्षर वारंवार लिहिली होती.अगदी कलरफुल आणि गोंधळात टाकणारा तो पेपर बघून तिला हसू आलं.

“हे क्रियेटीव्ह रायटर ना...too much confusing” ती स्वतःशी बोलली आणि पुन्हा जागेवर येऊन बसली.

तेवढ्यात दरवाज्याला कुलूप नाहीये हे पाहून वेदने बेल वाजवली. तो कसा react होणार ह्या धाकधुकीने तिने दरवाजा उघडला. तिला समोर पाहून तो गोंधळला.आनंदात त्याला काय बोलावं हे सुचेना.आत येऊन समान वैगरे ठेऊन बंद दरवाजाला टेकून तसाच उभा होता,थकलेले डोळे,विस्कटलेले केस.तो पहिल्यांदा बघत असल्यासारखं तिला बघत होता.ती सुद्धा समोर अवघडून उभी होती.विचित्र परकेपण दोघांमध्ये भरून राहिलं होतं.

“ऋतू तू इथे?अभय नाहीये?” त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं,खरतरं त्याला तिचं तिथे असणं अगदी अनपेक्षित होतं.

“का? तू माझ्या रूमवर रात्री येऊ शकतोस मी दिवसाही येऊ नको? अभय नाहीये, तू फ्रेश हो मी कॉफी करते.”
ती शांतपणे,प्रेमाने बोलतेय हे पाहून तो जरा नॉर्मल झाला.

“एक मिनिट” ती किचनमध्ये जाणार तसा तिचा हात धरून मागे त्याच्याकडे खेचलं.

“वेद तू फ्रेश हो,आपण बोलू नंतर” ती त्याच्या ह्या अनपेक्षित वागण्याने गोंधळली.

“नाही मला आत्ता बोलायचंय. तू माझं उत्तर ऐकल्याशिवाय माझ्याशी बोलणार नव्हतीस ना,एकटी निघून आलीस,मग आता अगोदर ऐकायचं.” तिचा हात घट्ट पकडून तिला अगदी जवळ घेत तो म्हणाला.

“वेद,its hurting yaar, जा तू फ्रेश हो” तिने हात सोडवून घेतला आणि ती किचनमध्ये गेली,तो ही त्याच्या रुममध्ये गेला.जरावेळाने कॉफीचे मग घेऊन ती त्याची वाट बघत हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. तो आला, नुकताच शोवर घेऊन आल्याने ओले झालेले केस पुसत तो शेजारी येऊन बसला.

“कॉफी..” तिने त्याला एक मग दिला. त्याने तो समोर ठेऊन दिला.तिच्या खांद्यावर दोन्ही बाजूंनी हात ठेऊन,डोक्याला डोकं लावत तो म्हणाला-

“अगोदर तुझ्या प्रश्नाचं उत्तर- तू निघून गेलीस पण माझी हालत खराब झाली. मी विचार केल्यावर मला एकच गोष्ट समजली की आता काहीही झालं तरी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही.I just want you ऋतू,मी तुझ्याशिवाय कालचा आणि ह्याक्षणापर्यंतचा दिवस कसा काढला माझं मला माहित.माझे सगळे प्लान्स विस्कटल्याने माझी चिडचिड झाली,एकदम एंगेजमेंटबाबतीत घरी सांगणं म्हणजे impossible वाटलं,आई जरा पारंपारिक विचारांची आहे,तिला सांगायचं म्हणजे मला बरेच कष्ट घ्यावे लागतील या भीतीने अजून चिडचिड झाली पण शांततेत विचार केला आणि म्हटलं काय हरकत आहे विचारून तर बघूया..म्हणून पुन्हा कॉन्फिडन्स आला.जय आणि रेवाला मी इनफ समजवायचा प्रयत्न केलाय ऑलरेडी. आता ते काय ठरवतात याचं मला काही नाही. मला तू हवीयं that’s final,no confusion. चल नव्याने प्रेमाला सुरुवात करूया.अगदी फ्रेश. अगोदर आपण ओळखतच नव्हतो, आपल्यात कुणी नव्हतच असं समज. मी खूप हार्श वागलो तुझ्याशी ते ही तुझ्या स्पेशल दिवशी,खूप वाईट वाटतंय,गिल्टी फील होतंय. पुन्हा नव्याने प्रेमात पडूया यार.I love you Rutu…I really do.”

त्याने तिच्या कपाळवर ओठ टेकवले.पुन्हा तीच अस्वस्थता,तिची घालमेल वाढली.त्याच्यापासून ती जरा दूर झाली,तिचे डोळे भरून आले होते.

“वेद हाच विचार तू काल का नाही केलास? इतकी त्यांची बाजू डोक्यावर उचलून घेतली होतीस आणि आज अचानक ते काय ठरवतात ते ठरवू दे,इतकं सहज मान्य केलंस? काल हाच विचार तू एंगेजमेंटसाठी का नाही केलास? तुझ्या ह्या एका चुकीमुळे खूप काही चुकीचं होऊन बसलं रे.वेद,मला आता कुठल्याच अटीशर्ती ठेवायच्या नाहीये,मी खूप विचार केलाय ,आता तू जसं म्हणशील तसं” तिने डोळे पुसले.

“सगळं विसरून जाऊया...मागचा एकही दिवस आठवायचा नाही,एकही नाही. एंगेजमेंटबद्दल विचारू ना मग घरी ?” त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं.
त्याच्या ह्या अनपेक्षित प्रतिक्रियेने ती जरा गोंधळली पण ‘हेच तर हवं होतं ना आपल्याला?मग कालच्या प्रवासाबद्दल सांगू का आत्ताच? की हा विसरूया म्हणतोय तर सगळं विसरूया नव्याने सुरुवात करूया’ विचारांचा गुंता खूप वाढत होता.
हरप्रकारे ती मनाला समजवायचा प्रयत्न करत होती.मग काहीसं मनाला समजावत ,दीर्घ श्वास घेत म्हणाली-

“लेट्स गेट एंगेज वेद,हेच ठीक होईल आणि असंच तर व्हायला हवंय ना? आपण ४/५ महिन्यांपासून ह्याच दिवसाची वाट बघत होतो,हेच खरं प्रेम आहे....! सगळं विसरूया,काहीच आठवायला नको,कुठलाच क्षण,कुठलाच स्पर्श,नकोच आठवायला.अनामिक जाणीव,हुरहूर, एका क्षणात झालेला आयुष्यभराचा संवाद....सगळं विसरूया.स्वप्न कितीही सुंदर असली तरी डोळे मिटले आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व,स्वप्नांच्या जगात कायम नाही ना राहू शकत....लेट्स गेट एंगेज may be next week. ”
ती काय बडबड करतेय त्याला कळत ही नव्हतं.
तो तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे बघत तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता.मनात उठलेलं प्रचंड कोलाहल दाबायचा तिचा निष्फळ प्रयत्न शेवटी डोळ्यात उतरला.तिचे डोळे भरून आले. का ते माहित असूनही ती सगळं नाकारत होती.

“दुखावली गेलीय तू कळतंय मला. पण खूप शांततेत सांगावं लागेल आईला,मी करतो काहीतरी,you don’t worry ” तिचे डोळे पुसत त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं.

“वेद..तुझी कॉफी थंड होतेय” डोळे पुसत ,तिने अनपेक्षितपणे त्याला पुन्हा दूर केलं.

“होऊ दे,I just wanna sweet coffee now, आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर ही दिलयं,प्रपोज करून झालंय हक्क आहे यार माझा.. ” त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्याकडे केला.

तिने त्याच्याकडे पाहिलं तोच नॉटी चेहरा,गालांवर तिचा कॉपीराईट मिरवणाऱ्या खळ्या.-“हो हा तर माझाच वेद,मग हा अवघडलेपणा का?” यंत्रवत त्याचे हात बाजूला करून ती उभी राहिली,तिने कॉफीचे मग उचलले.

“थंड झालीये,गरम करून आणते.”

ती किचनमध्ये गेली आणि पुन्हा कॉफी गरम करायला ठेवली.त्याने मागून येऊन तिच्या कमरेभोवती हळूच हातांचा विळखा घातला,त्याच्या परफ्युमचा एरवी हवाहवासा सुंगंध तिच्याभोवती दरवळला.

“मला माहितीय तू चिडली आहेस आपली गोवा ट्रीप माझ्यामुळे खराब झाली म्हणून,हो ना,एक काम करूया एंगेजमेंटनंतर पुन्हा जाऊया दोघंच, मिनी हनिमून! साखरपुडा झाल्यावर ..शुगरमूनसाठी ?”

तो स्वतःशीच हसला त्याने तिच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले.

“वेद प्लीज ” तिने त्याला दूर केलं आणि mugs भरायला घेतले.ती बाहेर सोफ्यावर येऊन बसली.

“ऋतू कालच्या एका दिवसात काही झालंय का?” कॉफीचा सिप घेत,तिच्या चेहरा वाचायचा प्रयत्न करत तो म्हणाला.

“म्हणजे? ” बोलतांना ती जरा अडखळली.

“हरवल्यासारखी वाटतेय,तुझ्यात कहीतरी मिसिंग वाटतंय मला,काहीतरी बदललंय हे नक्की.एरवी मी जवळ आल्यावर भान विसरून जायचीस” तिच्याकडे रोखून बघत तो म्हणाला.

तिने नजर चोरली. ‘काय करावं ? सांगावं का वेद्ला,की काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या?’ तिचं मन आणि बुद्धी दोन्हीही टोकाचे सल्ले देत होतं.तिने स्वतःला कसबसं सावरलं.

“वेद लवकर घरी सांग,मी देखील सांगते.त्यांना आपापसात बोलू दे मग लगेच चांगली सोयीस्कर डेट बघून एंगेजमेंट करून घेऊया.बस्स,मला जास्त काही माहित नाही.” ती विषय बदलवत म्हणाली.

“माझ्यावर विश्वास राहिला नाही,हो ना?”

“स्वतःवर नाहीये वेद” ती पटकन बोलून गेली,त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

“चल निघू मी?”

“just a minute.”तो आत गेला,येतांना त्याच्या हातात सुंदर रिंग होती.

“एंगेजमेंट करणार आहोतच पण त्या अगोदर हे बर्थडे गिफ्ट.” तिच्या बोटात फुलपाखराच्या मोटीफची नाजूक रिंग त्याने घातली.

“Once again Happy Birthday” त्याच्या चेहऱ्यावरचं गोड स्माईल आणि खळ्याकडे ती पहातच राहिली.त्याने तिला मिठीत घेतलं.

“I love you ” तो हलकेच तिच्या कानात म्हणाला.तिचा काहीच प्रतिसाद नाही हे बघून तो पुन्हा तिच्या कानात म्हणाला-“I said I love you”

“तुला माहितीय ना वेद मग का विचारतोयस? चल उशीर होईल,ताई येणार आहे रात्री भेटायला तिच्याशी बोलते आणि घरी सांगते,तू पण ठरव केव्हा सांगणार ते” त्याच्यापासून बाजूला होत ती म्हणाली.

“ओके”
“mondayला ऑफिसमध्ये भेटू,तू आराम कर” तिने पर्स आणि जॅकेट bag उचलली.

“चल कॅब आलीये” ती निघाली.

“नेमकं काय बदललंय?” तो स्वतःला प्रश्न विचारात कितीतरी वेळ तसाच उभा होता.

********

संध्याकाळपर्यंत तनुप्रियादेखील रूमवर परत आल्या होत्या. ऋतूने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला.रात्री रीमाताई आणि तनु-प्रियासोबत जोवतांना तिने गोव्याचा सगळा प्रसंग आणि आजची भेट, वेद्सोबत एंगेजमेंटचा प्रस्ताव हे सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं. कबीरचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला.घरी आई बाबांना काय आणि कसं सांगायचं हे तिने रीमाताईवर सोडलं.
सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं,ऋतुजाही त्यांच्या आनंदात सामील होण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती.
खाली रीमाची कॅब आली, तसं काहीतरी आठवून तिने टेबलवर ठेवलेली एक bag तिच्या हातात दिली.

“ताई एक मिनिट, हे तुझं जॅकेट अभयने दिलं.” रीमा आणि अभयला एकत्र इमॅजिन करून तिला खूप हायसं वाटलं.
“अरे हो बरं झालं आणि इतकं व्यवस्थित? गुड ” तिने त्या बॅगेतून जॅकेट काढलं तस त्यातली पानं उडाली.प्रियाने ती उचलून टेबलवर ठेवली.तिने जॅकेट घातलं,तिला सोडायला त्या खाली गेल्या.
रूमवर परत येईपर्यंत तनुप्रियाने तिला चिडवून अगदी हैराण केलं होतं.

“ओह्ह माय गॉंड मला अजूनही विश्वास होत नाहीये,कसं का असेना त्याने तिला प्रोपोज केलं एकदाचं आणि आता आपल्या वेड्या कोकराची एंगेजमेंट होणार,फायनली.” तनू आनंदाने जवळपास ओरडत बेडवर लोळत म्हणाली.

ऋतू जरासं हसली.प्रियाने तिच्याकडे पाहिलं

“काय झालंय ऋतू थोडी ऑफ वाटतेय,दमलीयेस का?”

“मघाशी मी ह्या चारपाच दिवसात जे झालं ते सगळं सांगितलं,गोवा ते पुणे हा प्रवास सोडून.” ती एक उसासा टाकत म्हणाली.तिचा चेहरा अगदी शांत होता.

“का?असं काय विशेष होतं त्यात.” आता हे काय नवीन म्हणून त्या दोघी उठून बसल्या.

तिने वाढदिवसाच्या आदल्या दिवशी कबीर भेटल्यापासून तर त्याने तिला रूमवर ड्रॉप करेपर्यंत आणि आज वेद्ला भेटल्यावर आलेल्या अवघडलेपणाबद्दल सगळे प्रसंग तपशीलवार सांगितलं.

सांगून झाल्यावर ती शांत बसली.तिच्या लाडक्या मैत्रिणींसोबत ह्या साचलेल्या भावना शेयर केल्यावर ओझं उतरल्यासारखं झालं, डोळे मात्र भरून आले होते. तनुप्रियाचे तर शब्दच खुंटले होते काही बोलायला.ऋतूला वेदशिवाय कुण्या परक्या व्यक्तीसोबत इमाजीन करणं त्यांना फारच जड जात होतं.
“म्हणजे तुला आता वेद्ला फेस करायला गिल्ट वाटतोय तर..”
प्रिया जरा चिडून बोलली.

“ऋतू,एक मिनिट, माझ्या डोळ्यात बघ,काय झालयं तुला नेमकं?”
तिचा चेहरा दोन्ही हातात धरून थेट तिच्या डोळ्यात बघत तनु म्हणाली.

तिचे हात बाजूला करत ऋतूने नजर चोरली.

“म्हणजे त्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तुझा फायदा घेतला,चान्स मारला, असं म्हणूया का सरळ?” प्रिया पुन्हा चिडून बोलली.

“नाही प्रिया,चूक एकट्या कबीरची नाहीये,मी देखील तेवढीच जबाबदार आहे आणि चान्स मारणाऱ्यातला नाहीये,खूप डीसेंट आहे तो. ” ती डोळे पुसत म्हणाली.

“हो का एका दिवसात कळलं देखील?”

ऋतूच्या बोलण्याचा राग,सोबत तिची काळजी हे सगळं एकत्र होऊन त्यांना काय आणि कसं reactव्हावं हेच समजत नव्हतं.

“ओके ठीक आहे,विसरून जाऊया हे मधले चोवीस तास,काही झालंच नाही,जे झालं त्यात दोघांची चूक होती मान्य,तुम्ही ती except केली हे ही मान्य. That’s it. संपलं प्रकरण.तू काहीच बोलायचं नाही.वेदला सांगून हे वाढवायचं नाही बास्स,एक चूक झालीय,गुन्हा नाहीये.वेद म्हटला ना नव्याने सुरू करूया,मग सगळं विसरायला काय प्रॉब्लेम आहे?”
तनु तिच्या केसांतून हात फिरवत तिला शांत करत म्हणाली.

“ते मधले चोवीस तास माझ्या आयुष्यात का आले? सगळं किती व्यवस्थित चालू होतं,आज ना उद्या वेद्ला जय-रेवाचं खरं रूप दिसणारच होतं,वेळ गेला असता पण मग सगळं सुरळीत झालं असतं,कबीर माझ्या आयुष्यात का आला असेल,तनु तो पहिल्यांदा सोबत असल्यापासून काहीतरी वेगळंच फील करतेय आणि कालचा दिवस,एक एक क्षण विसरणं अवघड झालंय....मी .. ?”

ती बोलता बोलता थांबली आणि हुंदके देऊन रडायला लागली.
तनुने तिला कुशीत घेतलं-

“ये वेडाबाई,झालीय ना चूक,विसरून जा,time is the best solution,आज तू त्याच्या सोबतीच्या ट्रान्समध्ये आहे,होणार नॉर्मल हळूहळू .एका दिवसाची सोबत ती कितीशी असते? वेदसोबतचे ते दिवस आठव,ते क्षण आठव,त्याच्याकडून एकदा love you ऐकायला किती डेस्पिरेट झाली होतीस ते आठव, बेन्देवाडीचे romantic क्षण आणि फक्त तू जेवली नाहीस म्हणून अर्ध्या रात्री भेटायला येणारा वेद,तुझाच आहे आणि तू त्याच्यासाठी. काही लोकं येतात आयुष्यात, काही काळ त्यांची सोबत हवीहवीशी वाटते पण तो भास असतो,क्षणिक असतं,वेद तुझी reality आहे.”

ती रडायचं थांबत नव्हती.

“यार माझं तर डोकं चक्रावलंय,वेदला एगेज्मेंटचं सागितलय न आता मग शांत हो.विसरून जा कुणी कबीर होता आणि तुम्ही एकत्र प्रवास केला होता.शेवटी वेदवर तू मनापासून प्रेम करते आणि तो देखील.इतकं सरळ आहे,उगाच कॉम्प्लेक्स करू नको प्रकरण.” प्रिया तिला शांत करायचा प्रयत्न करत होती.

“ऋतू एकदा माझ्याकडे बघ,तुला त्या किसचा गिल्ट आहे ना?” तिच्या रडून लाल झालेल्या डोळ्यांमध्ये काहीतरी शोधत असल्यासारखी तनु म्हणाली.

“ नाही माहित, खूप झोप लागतेय,थकलेय खूप.उद्या बोलूया?” तिने प्रश्न टाळला.

“ऋत्या तुझं हे ‘माहित नाही’ म्हणणं खूप बेकार असतं यार..हे असं जेव्हा तू म्हणतेस तेव्हा पक्क माहित असतं तुला .” तनु वैतागली.

“ओके,जाऊदे ,जास्त गिल्ट वाटत असेल तर सरळ वेदजवळ कन्फेस कर तुला बरं वाटेल.” प्रिया तिची समजूत घालायचा प्रयत्न करत होती.

मध्यरात्र उलटून गेली होती.सारं सारं शांत होतं,बाहेर गुलबक्षी वाऱ्याच्या झुळूकेसरशी हळुवार डोलत होती,कुंडीत उगवलेली नवीन रोप देखील वाऱ्यासोबत हेलकावे खात होते. वेद,ऋतू आणि कबीर तिघांच्याही मनाचा तळ ढवळून निघाला होता
...बाकी सारं अलबेल होतं.

*********

आज सकाळपासून तिघींचं शांततेत रूम आवरायचं काम चालू होतं.वलॉंग सुट्टीनंतरच्या आठवडयाचं प्लानिंग,साफसफाई सगळं ओघाने होतं.आजचा ब्रेकफास्ट देखील शांततेत झाला होता,नेहमी खळखळून हसणारी,कधी वेद्च्या वागण्याने अस्वस्थ असलेली,वकधी रिपीट मोडमध्ये वेद्च्या गप्पा सांगून वैताग आणणारी ऋतू जणू हरवलेली होती.
यापूर्वी देखील ती बऱ्याच वेळा दुखावली गेली होती तेव्हा चिडचिड करायची,रडायची,जेवणावर राग काढायची पण इतकी धीरगंभीर आणि विचित्र प्रकारे शांत ती कधीही राहिली नव्हती.

तिचं नेहमीचं रूम आवरायचं काम तिने चालू केलं.सर्वांचे बेड लावून झाल्यावर ऋतूने टेबल आवरायला घेतलं.नाश्ता करतांना प्लेट खाली घेतलेले कागद खराब झाले होते.ती ते डस्टबिनमध्ये टाकण्यापूर्वी चुरगळणार तसं त्यावर मागच्या बाजूला असणाऱ्या कलरफुल प्रिंटकडे तिचं लक्ष गेलं,त्यावर एका मुलीला प्रपोज करतानाचा सुंदर क्षण टिपलेला होता आणि खाली सुंदर फोन्टमध्ये प्रिंट केलेलं होतं-

“#मितवा”

जरावेळ त्या प्रिंट ऑउटकडे बघून तिने ते झटकून बाजूला ठेवलं. दुसरा पेपर ही उत्सुकतेने बघितला पुढच्या बाजूवर तीनचार वेळा प्रिंट घेतल्याने काहीही वाचता येण्यासारखं नव्हतं,तिने तो पेपर उलटून बघितला,प्रिंटरची शाई संपत आल्यासारखी खराब,जरा फेड प्रिंट होती,तिने उत्सुकतेने वाचायचा प्रयत्न केला-

{ इतकं प्रेम करतोस समुद्रावर?”
“नाही! सध्या कमीच करतोय,कुणावर तरी त्याच्यापेक्षा जास्त करतोय” तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत हळुवारपणे मी म्हटलं..

“कुणावर?” सोनालीचे डोळे नकळत भरून आले होते.

“आहे कुणीतरी जिच्या डोळ्यांचा, कितीही खोल उतरलं तरी मनाचा थांग लागत नाही,जिच्या केस भरतीला आलेल्या लाटांसारखे उगाच हेलकावे खातात, जिच्या ओठांवर,गालांवर सुर्यास्ताची लाली उमटली की मला काही सुचेनासं होतं, जिच्या हसण्यात ती मजा नाही जी तिच्या रुसण्यात आहे. जिचं हसणं त्या समुद्रासारखं खारट आणि रुसणं गोड आहे,जिला समोरच्याचे डोळे वाचताच येत नाही,अश्या एका मुर्खावर प्रेम आहे माझं”
मी एक मिनिट सुद्धा तिच्यावरून नजर हटवली नाही.
ती स्तब्ध झाली,ह्यावर काय बोलावं,कसा प्रतिसाद द्यावा? तिचे शब्द हरवले होते.
तिच्या डोळ्यात फक्त मी होतो, त्या क्षणांची नजाकत,गरज दोघांनी ओळखली.मी अलगद तिला उचललं,ती लाजली. रुममध्ये आलो ...ती रात्र आमची होती,आमच्यासाठी होती}.

पुढे सगळी प्रिंट खराब होती,वाचता येत नव्हतं.तिचे डोळे विस्फारले गेले.ती गोंधळली तिने दुसरा पेपर बघितला ती देखील खराब प्रिंट होती ८/१० ओळींची -

{ मला गोंधळात टाकून तो निघून गेला. ‘यश आपल्याशी असं खोटं बोलणं शक्य नाही’ मी विचारात पडलो ..इतक्या मोठ्या बिजनेस सेंटरमध्ये तिला शोधणं ही शक्य नव्हतं. समोरच्या टपरीजवळ गाडीवर बसून राहींलो .वेळ अगदी धीम्या गतीने सरकत आहे असं वाटत होतं, फोन करावा का? मेसेज करावा का सोनाला आत्ता?...मनात आलेले कितीतरी विचार मी उडवून लावले. आठ वाजले तरी तिचा पत्ता नव्हता. ’सारंगच्या केबिनमध्ये असेल का ती? मी प्रचंड चिडलो. जरावेळाने मात्र ती दिसली.तिने स्कार्फ गुंडाळला,हेल्मेट घातलं आणि निघूनही गेली.मी फोरव्हीलर पार्किंगमध्ये बघितलं सारंगसरांची गाडी अजूनही होती. रात्रीपर्यंत काय काम सोनालीचं त्याच्याकडे? यशने डोक्यात सोडलेला संशयाचा किडा मिनटागणिक वाढत होता. रागातच गाडी सुरु केली आणि मी निघालो.}

ती ब्लॅंक होऊन खुर्चीवर बसली. तिला आठवलं हे पेपर अभयने जॅकेटला wrap करून दिले होते आणि त्यांच्या रुममध्ये एका प्लास्टिक कार्टनमध्ये असेच बऱ्यापैकी खराब झालेले पेपर्स होते

"..काय आहे हे “मितवा?”
हे आमच्यातले बेन्देवाडीतले संवाद अश्या प्रकारे? हे त्याच्या डायरीचे पेजेस असतील तर हे रात्रीचं काय असं लिहलंय याने?
आणि त्या दुसऱ्या पेजवर काय लिहिलं होतं..सोनाली कोण?” तिची चलबिचल वाढली.तिने कपाळावर जमलेला घाम टिपला.

#क्रमशः

©हर्षदा