#तू_ही_रे_माझा_मितवा 💖💖💖
#भाग_१८
"आणि तूला काय आवडतं आयुष्यात?” तिचाच प्रश्न त्याने तिला परत केला.
“मी माझ्या कामात अगदी परफेक्ट असते,शेंडेफळ असल्याने आईबाबा आणि ताईच्या लाडाने बिघडलेली,मनाला येईल तसं वागते. लोकं म्हणतात बालिश आहे..असेलही,who cares,सतत experimental रहायला ,movie, party असं मस्त एन्जॉय करायला आवडतं,fashion ,मेकअप अजून सांगू गुलबक्षीचे फुलं,कवेत मावणार नाही एवढी स्वप्न आणि चंद्र,चांदण्या बघत केलेली एखादी dream नाईट आउट,चंद्राच्या प्रेमात वेडी आहे आणि आता वेद भेटल्यापासून दिवस रात्र वेद आणि वेद...That’s me !!” बोलतांना वेद्चा विषय आल्यावर ती एकदम थांबली.
“Interesting yaar आणि वेद कसायं?” त्याने तोच धागा पकडला.
“वेदबद्दल काय सांगू? तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर chapter आहे,काळजाचा बुकमार्क करून ठेवावा असा chapter.हसला की त्याच्या गालावर सुंदर खळ्या पडतात,खरं सांगायचं तर मंतरल्यासारखी त्याच्या प्रेमात पडले.बोलायला लागला की कादंबरीच लिहतोय असं वाटतं,प्रेम करायला लागला की कविताच लिहतोय असं वाटतं.तसा थोडा वेडा ही आहे लिहायला बसला की दिवस रात्र काही सुचत नाही त्याला..मलाही विसरून जातो आणि नंतर मग क्युटसं सॉरी बोलून मनवून पण घेतो..आणि .."
“एक मिनिट... सॉरी पण क्युट असतं?” तो निरागसपणे म्हणाला.
“ये यार नॉट फेयर...असतं ‘सॉरी’ क्युट पण तुला नाही कळणार ते. त्यासाठी प्रेमात असावं लागतं..जा मला नाही बोलायचं तू चिडवतोय मला सारखं..” ती गाल फुगवून म्हणाली आणि त्या चिडलेल्या रुपात खरच क्युट दिसत होती.
“अरे ओके बाबा...सॉरी,खरंच सॉरी...हा म्हणजे माझं सॉरी काही क्युट नाहीये पण तरी सॉरी..”
“You know something you are really and literally infinity khadus…” ती नाटकी घुश्यात म्हणाली, तशी त्यालाही गंमत वाटली..”इन्फिनिटी खडूस” कितीतरी वेळ तो शब्द तो घोळवत राहिला.
जेवण झालं आणि ते निघाले.
“इथेच थांब,१/२ extra water bottle घेऊन येतो.” तिला थांबवून तो पुन्हा रिसेप्शनला गेला.
तिला तिथे पाहून कॉलेजच्या चारपाच मुलांचा घोळका तिथेच रेंगाळत होता.जरावेळाने त्यांच्यातल्या एकाने मुद्दाम तिला स्पर्श होईल असा धक्का दिला आणि पुढे गेला.
“नॉनसेन्स..” ती संतापून म्हणाली.
समोरून कबीर येत होता त्याने ते पाहिलं,तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं, त्याने इशाऱ्याने Thumbs down दाखवलं,त्याचा इशारा समजून ती जरा पुढे गेली आणि ज्या मुलाने धक्का मारला त्याच्या पायावर पूर्ण वजन देत पाय ठेवला.
“सॉरी..” त्या मुलाकडे बघून ती नाटकीपणे हसून म्हणाली.
“What sorry B***” तो कळवळला आणि तिला काही बोलणार तसं समोर कबीर उभा राहीला.
“Any problem? You were saying something ha?” त्याची कॉलर उलगडत कबीर म्हणाला.कबीरचा तो दमदार आवाज,black Tshirt grey कार्गोमधला dashing लूक,पिळदार मसल्स पाहून तो मुलगा चपापला.
“Kabir leave them…lets go.” तिने कबीरचा नकळतपणे हात पकडला, त्याला खेचायचा प्रयत्न केला,तो जरा देखील हलला नाही.
“धक्का मारला ना? Say sorry” कबीरने त्याचे केस विस्कटले.
“चुकून लागला” तो ही जरा चाचरत म्हणाला.
“काय” कबीरने त्याचा हात जरा ट्वीस्ट केला.
“Sorry mam, Extremely sorry” तो मुलगा सरळ ऋतू समोर उभा राहिला.
“हम्म आता ठीक आहे.” त्याची कॉलर आणि केस व्यवस्थित करत कबीर म्हणाला.
ते बाहेर यायला निघाले.
“दरवेळी काय,leave them..त्रास झाला ना आपल्याला की बिनधास्त react व्हायचं.... “just leave” ही कॉन्सेप्ट नाहीये माझ्याकडे.” तो जरा चिडून पुढे गेला.
“मी दिला होता ना पाय त्याच्या पायावर,ते ही अगदी करकचून मग त्याचा हात इतका twist का केला.” त्याच्या स्पीड match करत ती म्हणाली.
“ओके जाऊ दे,पण एक गोष्ट छान झाली..” तो मध्येच थांबला.
‘कुठली?” ती आश्चर्याने म्हणाली.
“त्या मुलाच्या तोंडून “क्युटसं” सॉरी ऐकायला मिळालं” क्युट म्हणतांना तिला चिडवण्यासाठी तिच्यासारखं ओठांची मोहक हालचाल करायचा प्रयत्न करत तो म्हणाला.
“यार कबीर...तू मार खाणार आता.”
तिने त्याला मारायला सुरुवात केली.त्याने मुठ गच्च आवळून त्याचा हात पुढे केला.
“अरे ऋतुजा अजिबात लागत नाहीये.” तिला चिडवत तो म्हणाला.
“अच्छा लागत नाहीये का? वेट..” तिने handbag ने त्याला मारायला सुरुवात केली.
“अरे ती पर्स लागतेय ऋतुजा...नाही चिडवणार यार.”
“पर्स लागतेय,क्युट लागतेय असं समज”
“सॉरी,सॉरी! अग क्युट नाही जोरात लागतेय.ऐक, नको ” तो पर्सचे वार चुकवायचा प्रयत्न करत गाडीकडे गेला.
“जोरात लागतंय,घे अजून” ती देखील त्याच्या मागे धावली.
“Statue” धापा टाकत,पर्ससकट तिचे दोन्ही हात त्याच्या एका हाताने तिच्याच मागे घट्ट धरून त्याने तिला गाडीला टेकवलं.
झटापटीमुळे तिचाही श्वासोच्छवास जलद झाला होता.त्याचा चेहरा तिच्या अगदी समोर होता.अगदी क्षणभरच तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं,वरून झाडाची बारीक बारीक पानं तिच्या केसांमध्ये येऊन अडकली, त्याने ती हळूच काढली..
“move” हृदयाचे वाढलेले ठोके जाणवून तो घाबरला आणि बाजूला झाला, केस झटकले,पर्स लागलेला हात जरा गोल फिरवत काही झालं नाही ह्या नजरेने तिच्याकडे पहिलं.
“ऋतुजा मला खूप जोरात लागलीय तुझी पर्स,काय काय भरलेलं आहे यार”
ती जरा अवघडली होती पण तो नॉर्मल आहे हे पाहून ती ही नॉर्मल दाखवायचा प्रयत्न करू लागली. चुकूनही कुठला विचार जवळपास देखील फिरकायला नको म्हणून ती सावरली.
“आता तू जेव्हा पण चिडवणार तेव्हा ही पर्स मी मारून फेकणार,बघच.” जरा उसनं अवसान आणून ती हसायचा प्रयत्न करत होती.
“ओके चला..”
गाडी रस्त्याला लागली,ऋतुजा नाही म्हणायला थोडी बैचेन जरूर झाली होती पण कबीरच्या ते गावी ही नव्हतं जणू. इतका तो सहज गुणगुणत गाडी चालवत होता.तिलाच ही शांतता असह्य झाली आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
“एरवी तुला एकट्याने एवढा ९/१० तासांचा प्रवास कसा शक्य होतो? तुला बोर नाही होत का?” तिने सहज विचारलं.
पुढच्या आरशाजवळ टांगलेल्या पक्ष्याच्या सुंदर चार्मला हलवून तो म्हणाला -
“Tell me what is this ?”
“Kingfisher”
“What do you know about kingfisher?”
“नितांत सुंदर पक्षी आहे, तुझ्या संदर्भात म्हणत असशील तर तुला मे बी किंगफिशर बियर आवडत असेल म्हणून लावला असेल..” ती हसू दाबत म्हणाली.
“Good joke…पण तसं नाहीये, किंगफिशर किंवा होल्सियनची ग्रीक मायथॉलॉजीमध्ये भारी लव्हस्टोरी आहे. सिक्स आणि अल्सियोने म्हणजे अगदी मेड फॉर इचअदर कपल. त्यांच्यात इतकं प्रेम आणि विश्वास होता की झेउस आणि हेरा ह्या देवांच्या राजाराणीला त्याचं प्रेम म्हणजे आव्हान वाटलं ते त्यांना दूर करायचं ठरवतात.एकदा सिक्स समुद्रप्रवास करत असतांना झेउस त्याची बोट उलटवून त्याला जलसमाधी देतो,इकडे सिक्सची वाट बघत असलेली अल्सियोने देवाची राणी हेराला त्याच्या परतीसाठी प्रार्थना करते,हेराच्या पॉवरने तिला कळत की तो आता ह्या जगातच नाहीये,तिला ते दुःख सहन होत नाही.
ती समुद्रकिनाऱ्यावर येते त्याचं तरंगणारं प्रेत पाहून अल्सियोनेसुद्धा समुद्रात उडी घेते,त्याचं खरं प्रेम पाहून झेउस त्यांचं दोन सुंदर पक्षांत रुपांतर करतो ते पक्षी म्हणजे किंगफिशर किंवा होल्सियन.असं म्हणतात हे किंगफिशर समुद्राच्या लाटांवर घरटं बांधतात आणि त्यांच्यासाठी म्हणून वारा मंद होतो,समुद्र शांत होतो.त्याच्या प्रेमाला निसर्गाने दिलेली सलामी असते ती.
ते शांततेचे,आनंदाचे दिवस म्हणजे होल्सियन डे. एकट्याने लांबचा प्रवास,भटकंती म्हणजे माझ्यासाठी halcyon days... सगळ्यात आनंदी दिवस,म्हणून मला कधी हा प्रवास बोर होत नाही. by the way तुझ्यासाठी halcyon days कुठले?
हा नवीन, वेगळीच होल्सियन वाट दाखवणारा गाईड..वाटाड्या हा कबीरचं आहे?पक्षांच्या प्रेमाबद्दल भरभरून बोलतो आणि आपलं प्रेम निब्बानिब्बी.तिला हसू आलं.
“तुझ्यात दोन कबीर राहतात असं का वाटतंय मला, आता बोलणारा कुणी वेगळाच होता आणि चिडलेला असतांना,भांडखोर कबीर वेगळाच असतो ......आणि माझं सांगायचं तर ‘वेदसोबत असलेला प्रत्येक दिवस,क्षण halcyon आहे माझ्यासाठी”
“That’s great…!”
“सॉरी,मी सोबत येऊन तुझा me time तुझा halcyon day डिस्टर्ब केला ना?”
“डिस्टर्ब नाही केला different केला” तो फक्त गालात हसला.ती ही मोजकं हसली.एका विचित्र परिस्थितीत असल्यासारखं झालं होतं तिला.ही वेदसोबत नसल्याने येणारी बेचैनी होती की कबीरची सोबत आवडतेय की काय याची भीती होती, तिला अस्वस्थ वाटायला लागलं.
तिने music सिस्टीमचा आवाज वाढवला.
“हे सुरांनो चंद्र व्हा....” अभिषेकीबुवांच्या आवाजातील सुरेख पद चालू होतं.
“तुला हे क्लासिकल बोर नाही होत का,त्याच चार-पाच ओळी पुन्हा पुन्हा ?” तिने उत्सुकतेने विचारलं.
“ ऋतुजा चंद्रासाठी वेडी आहेस ना? चंद्राचं इतकं रोमांटिक रूप तुला माहित ही नसेल,इथे सुरांना चंद्र व्हायला सांगितलं आहे कारण तिचा प्रियकर चिडला आहे,रागावला आहे.तुला माहितीये ह्या चार ओळींच्या बंदिशमध्ये किती समर्पकता आहे? शर्मिष्ठाने ययातीसाठी म्हटलं आहे ते.तो चिडला आहे, त्याचं चित्त भरकटलंय, अस्थिर झालंय त्याला शांत करण्यासाठी हे सुरांनो तुम्ही चंद्र व्हा आणि तुमच्या शीतल चांदण्यांनी त्याला शांत करा,भरकटलेल्या मार्गावरून त्याला परत आणा,चुकला असेल तो,पण माझा आहे,त्याच्यापर्यंत हा निरोप पोहचवा..असं म्हणतेय ती.ओळी चारच आहे पण त्या बंदिशमधला अर्थ ह्या प्रत्येक सुरात आहे,just feel it ऋतूजा.”
नजर रस्त्यावरून अजिबात ढळू न देता तो म्हणाला.ती त्याच्याकडे बघतच राहिली.
“कालपर्यंत अनोळखी असलेल्या व्यक्तीसोबत इतकं सेफ,अश्वस्थ वाटतंय,हा प्रवास तर संपणार आहे, रस्ते वेगळे आहे,आयुष्य वेगळं आहे तरी ही कुठली अनामिक ओढ,अदृश्य धागा बांधला जातोय..का होतंय असं? असं घडायला नकोय...खरंच?” गाडीला जोरदार ब्रेक लावल्याने बसलेल्या धक्क्याने ती भानावर आली.
“प्रेम करतांना माफ करायला शिकणं पण गरजेचं असतं ऋतुजा” त्याचा आवाज तिला विनाकारण जडावलेला वाटला.
“गाडी का थांबवली?” त्याच्या चेहऱ्यावरून तिला काहीच अंदाज येत नव्हता.त्याने डोळ्यांनीच खुणावलं,तिने बाजूला बघितलं जरा अंतरावर सुंदर मंदिर होतं.
“तू जेवतांना म्हटली होतीस ना वाढदिवसाची सुरुवात मंदिरात दर्शन घेऊन करावी,सुरुवात दर्शनाने झाली नाही पण शेवट तर होऊ शकतो ना,जा दर्शन घेऊन ये”.
“तू नाही येणार?” त्याने मानेनेच नकार दिला.
ती एकटीच निघाली.तो बाहेर आला,गाडीला टेकून उभा राहिला, त्याने पुन्हा एक सिगरेट पेटवली.दर्शन घेतांना डोक्यावरून काहीतरी घ्यावं म्हणून ती स्कार्फ घेण्यासाठी पुन्हा गाडीजवळ आली. स्कार्फ घेतला आणि जायला निघाली,तसं पुन्हा वळून तिने त्याच्या हातातली सिगरेट काढून घेतली आणि पायाखाली चिरडली आणि न बघता निघूनही गेली.त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल आलं.
मंदिर छोटसं होतं पण समोर प्रशस्त प्रांगण होतं,सुंदर सभामंडप होता. तिथे बसलेल्या एका आजीबाईशिवाय आणि एक दोन छोट्या मुलांशिवाय कुणीही नव्हतं.ती दर्शन घ्यायला आत जाणार तसं आजीबाईंनी तिला हाक मारली.
“पोरी सती देवीचं ठिकाण आहे इथं,खाली हाताने नको जाऊ त्यो वेल दिसतोय ना समोर त्याची थोडी फुलं घे, देठांची वेणी वळ आणि आईला वहा,सती देवीने दक्ष राजाच्या यद्न कुंडात उडी घेतली तेव्हा तिच्या केसांची राख इथे पडली म्हणतात,मोठं जागृत ठिकाण आहे, आईच्या केसांसाठी वेणी अर्पण करायची. नक्षत्रावाणी सुंदर हायेस सोभेल असा राजबिंडा नवरा भेटेल बघ ,जा पोरी.”
ती त्या वेलाजवळ आली फुलं फार वर होती,तिने उडी मारून हाताला लागतील ती फुलं काढायचा प्रयत्न केला,एक दोनच हाताला लागली,ती नाराज झाली पुन्हा उडी मारून बघितली पण हात पोहचत नव्हता.पुन्हा उडी मारणार तोच ओळखीच्या सुगंधाची जाणीव झाली.कबीर मागे येऊन उभा होता,तिची फुलं तोडायची धडपड पाहून तो आला होता.त्याने जरा पाय उंचावून दोन तीन फुलं तोडली.तोच आजीबाई जागेवरून ओरडली.
“बापे नाही काढत रे फुलं,पोरीचाच हात लागाया पाहिजे तेव्हा मनाजोगता नवरा भेटेल न तिला”
“आजी मला नको का मनासारखी बायको भेटायला?” त्याने आजीची गंमत करत म्हटलं.
“बाप्यांना नेहमी मिळतं की सगळं मनासारखं” आजीपण मागे हटणार नव्हती.
“सगळ्यांना नाही ना मिळत आजी..” ऋतूची आणि त्याची नजरानजर झाली.त्याने नजर फिरवली.
उंचावरची फुलं पाहून ती नाराज झाली. काहीही विचार न करता त्याने तिला उचलून वर धरलं,ती त्याच्याकडे बघत राहिली.
“अरे तोड ना फुलं..” तो सहजपणे म्हणाला.तिने थोडी फुलं तोडली.त्याने तिला खाली उतरवलं,तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू तरळलं.तो तेवढ्यानेच खुश झाला.
तिने आजीसोबत बसून छोटी वेणी वळली.
“राजबिंडा पोरगा तर अगुदरच शोधलाय की देवीने तुझ्यासाठी, आता पिरेम असंच राहूदे म्हण देवीआईला.”
“आजी हा तो नाहीये..” ती गाभाऱ्यात जातांना म्हणाली. तिची वाट बघत तो पाहिरी वरच बसून होता.
ती दर्शन घेऊन बाहेर आली,नकळत आजीच्या ही पाया पडली आणि जायला निघाणार तसं आजी मागून म्हणाली.
“पोरी खरचं हा तो नाहीये का?”
तिने जातांना उसनं हसून मानेनेच नकार दिला.तिला बाहेर आलेलं बघून तो ही निघाला.गाडीत बसल्यावर त्याचा हात पकडून तिने तळहातावर एक फुल ठेवलं.
“दर्शन तर घेतलं नाहीस, प्रसाद म्हणून हे फुल तर घेऊ शकतोस ना.तुझाही वाढदिवस आहे आज विसरलास का?”
“ओके बाबा” त्याने ते फुल समोरच्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलं.
#क्रमशः
©हर्षदा
🔍🔍🔍🔍🔍🔍काही नाही भिंग लावून कमेंट्स शोधत होते.
😜😜😜