#तू_ही_रे_माझा_मितवा 💖💖💖
#भाग_१७
"सॅम वेदला कुठे बघितलं का,फोन उचलत नाहीये तो ?” ती तिच्या bags घेऊन रिसेप्शनला आली.
“अरे त्या रेवाला घेऊन आम्ही माझ्या फमिली डॉक्टरकडे गेलो होतो.वेद ही तिथेच आहे.डॉक म्हणाले की एकदम ओके आहे पण तीच म्हणतेय ठीक वाटत नाहीये,विकनेस वाटतोय.मग ते दोघे थांबलेय.मे बी ड्रीप लावणार असतील.I don’t know. पण ह्या bag घेऊन तू कुठे निघालीस.?”
“ मी पुण्याला परत जातेय,मला आता काही formality कराव्या लागतील का?”
“नाही,जय आणि वेद बघतील काय ते जातांना, पण तू का जातेय,आवडलं नाही का रिसोर्ट?”
“रिसोर्ट खूप भारी आहे,in-fact मी सोशल मिडीयावर रेकमेंडसुद्धा करेन, मला आता फक्त without any reason घरी जावसं वाटतंय.”
“ओके पण जाणार कशी?”
“एका फ्रेंडची गाडी आहे. no issue. sam एक मदत करशील मला?”
“बोल ना”
“सौम्याला सांगितलंय मी की जाण्याची अरेंजमेंट तू केलीय आणि सोबतीला अजून दोन मुली आहेत,वेद्ने विचारलं तर तसच सांग.मी तुला डीटेल्स पाठवून ठेवते गाडीचे. त्याचं काय आहे तो उगाच चिडेल,काळजी करेल.सांगशील ना?”
“Yes,got it…मी सांगेन डोंट वरी”
तिने पुन्हा एकदा वेदला फोन लावला,त्याने उचलला नाही. तिने मेसेज केला.
“वेद मी पुण्याला परत जातेय,don’t want to spoil remaining trip..काळजी करू नको sam ने व्यवस्था केलीय गाडीची,सोबत दोन मुली अजून आहेत.मेसेज मिळाला की कॉल कर.”
कबीरने सांगितलेल्या पार्किंगला ती आली. व्हाईट tank top वर सिंपल कार्डीगन आणि काफ लेंग्थ स्वेटपॅन्ट,पायात सुंदर अँकलेट, वर बांधलेले केस आणि त्यामुळे खांद्यावर रुळणारे कर्ल्स. त्याने तिच्याकडे बघितलं,क्षणभरच.
“ओके, नक्की निघायचं?” तिचं समान आत ठेवतांनाही तो जरा साशंक होता.
“कबीर,प्लीज!!”
“of-course..चलो ऑल सेट..निघूया” तो ड्रायव्हिंग सीटवर बसला.ती बाहेरच उभी होती.
“काय ग काय झालं? पुढे बस. तुझं गर्लफ्रेंडत्व काही धोक्यात येणार नाही त्याने...यार तुम्ही कमिटेड मुली ना...Impossible.” तो हसून म्हणाला.
“असं काही नाहीये,उगाच थोडं ऑकवर्ड झालं म्हणून..”
एक अनएक्सपेक्तेड प्रवास सुरु झाला. तिला कम्फर्टेबल करण्यासाठी त्याने तिच्या जॉबरोल बद्दल,करियर अम्बिशन्सबद्दल बोलतं केलं.करियर,गोल्स हे तर त्याचे आवडते विषय.
त्याचं कामाप्रती कमिटमेंट,बोलण्यातून व्यक्त होणारे त्याचे लीडरशिपथॉट, आयुष्याबद्दल क्रिस्टल क्लियर विचार तो एक उत्तम बॉस आणि व्यक्ती असल्याची जाणीव करून देत होते. प्रत्येक विचार एखादं उदाहरण देऊन समजावून सांगण्याची लकब त्याचा अभ्यास,जगात काय चाललंय याचं चौफेर वाचन याची साक्षच देत होतं.
मधून मधून हटकून येणारे- दात तोडले,एका फाईटमध्ये लोळवलं,मुस्काट फोडलं त्याच्या “love मारामारी”ला जास्त शोभत होतं, अश्यावेळी हा IT प्रो असेल यावर कुणाचा विश्वास बसला नसता.
ब्रेकफास्टसाठी घेतलेल्या ब्रेकमध्येही कार्पोरेट management सेशन्समधलं अभ्यासू लेक्चर असावं अश्या थाटात त्याने तिला बऱ्याच कन्सेप्ट सांगितल्या. त्याचाही वाढदिवस होता पण त्याला येणाऱ्या फोनला अगदी कोरडेपणाने आणि जुजबी उत्तरं तो देत होता.घरच्यांशी बोलतांना जरा ओलावा जाणवला पण तेवढंच. त्याला खडूस का म्हणतात तिला कळून चुकलं होतं. गाडी पुन्हा रस्त्याला लागली.
“तू ऑफीसमध्ये फ्री का रहात नाहीस, खडूसगिरी का करत असतोस.” तिने हसून विचारलं.
“खडूसगिरी कधी केली मी?”
“मग इतक्या मुली मागे फिरत असतांना,भाव का देत नाहीस ते?”
नेहमीप्रमाणे पटकन बोलून गेल्यावर तिने जीभ चावली.तो ही नेहमीप्रमाणे खदखदून हसला.
“You mean मी पण “मेले बाबूने खाना खाया क्या?” टाईप निब्बा व्हावं?” तो पुन्हा हसला ह्यावेळी मात्र तिचा चेहरा पडला.
“ओह्ह्ह,ऋतुजा सॉरी सॉरी,बघ हे असंय मला मुलींशी सेन्सिबली interact होता येत नाही आणि मी म्हटलं ना क्लिशे लव्ह गेम नाही आवडत मला.”
“इट्स ओके.म्हणजे तू लग्नच करणार नाहीये तर.” ती ही शांतपणे म्हणाली.
“मी कधी असं म्हटलो.”
“अरे तूच म्हणतोस ना हे love गेम आवडत नाही म्हणून?”
“त्याचा अर्थ मी लग्नच करणार नाही असा नाही होत.मला ते निब्बा-निब्बी love आवडत नाही.”
“ओह्ह म्हणजे परफेक्ट अरेंजमॅरेज करणार तर...”शादी के बादवाला कन्फर्म प्यार” अशी बोर रिस्कफ्री कॅटेगरी. I know this category माझी फ्रेंड प्रिया अशीच आहे.”
ती excitement मध्ये बोलून गेली. तिच्या ह्या वाक्यावर कितीतरी वेळ तो हसत राहिला.ती ओशाळली,स्वतःला एक टपली मारून ती खिडकी बाहेर बघत राहिली.
“ सॉरी कालपासून मी तुला प्रेमावरून बरंच काहीबाही बोललो. प्रेमवैगरे माझा प्रांत नाही पण हो प्रेमाबद्दल माझी स्वतःची एक विचित्र जापनीज फिलॉसॉफी आहे. ”Koi no yokan” फिलोसॉफी...असा एक्स्ट्रॉऑडीनरी सेन्स की जिच्याविषयी पहिल्या भेटीतच rather पहिल्यांदा तिला पाहिल्यावर हे कळून जावं की बॉस हिच्या प्रेमात आपण पडणार आहोत No matter how …! It is that simple आणि विचित्रसुद्धा. सो तोपर्यंत इट स्लीप,वर्क,रिपीट ”
त्याचं बोलणं शांत झुळूक असल्यासारखं सुखावणारं वाटलं,
तिचे डोळे मिटले गेले.त्या सुंदर फिलोसॉफीचा ती विचार करत राहिली-
“वेदला ही असंच काहीसं वाटलं होतं पहिल्यांदा मला पाहिल्यावर”
ती स्वतःशीच हसली,गाल गुलाबी झाले. त्याची आठवण येताच एक हुरहूर तिच्या मनाला लागली,आता उतरून परत फिरावं आणि त्याला डोळे भरून बघावं असं तिला उगाच वाटलं. ती डोळे मिटून विचारात हरवून गेली. “आणि आपल्याला असं वाटलं होतं वेदला पहिल्यांदा पाहिल्यावर?” तिने आठवायचा प्रयत्न केला...नाही आपण तर ओढलो गेलो त्याच्या प्रेमात,लिफ्टमध्ये नजरानजर झाल्यावर काहीतरी वाटायला सुरुवात झाली खरी...म्हणजे ही फिलोसॉफी वैश्विक थोडीच आहे सगळ्यांनाच लागू पडेल असं काही नाही. वेद म्हणतो ना प्रेमाची कुठे लिखित संहिता नाहीये की प्रेम असंच असावं,तसचं असावं,प्रत्येकाची आपआपली फिलोसॉफी असते.पण तरीही...., मला पहिल्यांदा कुणाला बघून काहीतरी वेगळं कधी फील झालंय का?” तिने आठवून बघितलं डोळ्यांसमोरून एक पडदा फक्त हेलकावे खात होता तो जरा बाजूला झाला आणि...” तिने खाडकन डोळे उघडले.
रुमालाने घाम टिपला,दीर्घ श्वास घेत ती शांत होण्याचा प्रयत्न करू लागली. तिने बॉटल हातात घेताच त्याने गाडी स्लो करत बाजूला घेतली.
“दोन मिनिटांत शांत झोप लागली होती वाटतं तुला,काय झालं स्वप्न पाहिलं का?”
“नाही असंच...” त्याच्याकडे न बघता ती उदासपणे हसत म्हणाली.
“ओके...रिलॅक्स.”
गाडी पुन्हा रस्त्याला लागली.जरावेळाने आईबाबा,ताई, मित्रमैत्रिणी,कलीग सगळ्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फोन येऊन गेले.तनु आणि प्रिया अगदी पहाटेपासून वेद आणि तिची डेट कशी झाली याची चौकशी फोनवर,whatsappवर वारंवार करत होत्या ‘आल्यावर सविस्तर सांगते.’ एवढं बोलून ती टाळत होती.
जर वेळ गेल्यावर पुन्हा तिचा फोन वाजला.वेदचा फोन आल्याने तिला आनंद झाला पण भीती ही वाटली,तो किती चिडला असेल याची कल्पना तिला होती.तिने २ वेळा फोन उचलला नाही. तिची अस्वस्थता वाढली,चुळबुळ वाढली.कबीरला तिची अस्वस्थता जाणवली.
“वेदचा फोन आहे?”
“हम्म”
व्यवस्थित जागा पाहून त्याने गाडी बाजूला घेतली.
“बोलणं टाळून प्रॉब्लेम solve होत नाहीत उलट वाढतात...पिक अप द फोन..” तिला बोलायला एकांत मिळावा म्हणून तो बाहेर गेला.
समोर असलेल्या झाडाला टेकून त्याने एक सिगरेट पेटवली.
“Are you out of your mind rutu,इतकं चिडायचं? एकटी निघालीस पुण्याला? कोण आहेत त्या दोन मुली सोबत? तुझं डोकं फिरलंय का? तुला माहितीय का रेवाला ड्रीप लावावी लागली, ह्या गडबडीत मी कसा फोन उचलणार होतो आणि तुला तिला भेटायला यायची साधी कर्टसीसुद्धा दाखवता आली नाही ऋतू? इथे सगळे काय काय चर्चा करताय, तू अशी का वागतेय यार काय झालंय तुला ? कुठपर्यंत पोहचली आहेस?जिथं असेल तिथे थांब मी येतोय घ्यायला.” त्याच्या आवाजावरून तो भयंकर चिडला आहे याची जाणीव तिला झाली.
“वेद...ऐक ! शांत हो. I am absolutely safe आणि मी चिडले नाहीये.आपल्यामध्ये सगळं व्यवस्थित होईपर्यंत जरा शांत राहू या. मला नव्हतं तिथे थांबायचं, try to understand यार आणि मी अजूनही हेच म्हणेन की ते दोघेही डांबिस आहेत. माझ्यासाठी त्यांचा विषय संपलाय कायमचा. तूला दोन ऑप्शन दिले होते मी एकतर एंगेजमेंट किंवा त्यादोघांना गुडबाय यातून तू काही निवडलंस की आपण पुढे बोलू.”
“तू ऐकणार नाहीस तर.मला ह्या गोष्टीचा किती त्रास होईल याचा जरा तरी विचार केलास का? असं तडकाफडकी ‘काहीतरी एक निवड’ हे इतकं सोप्प नाहीये कळतंय का तुला? प्लीज यार ऋतू मला सगळं पुन्हा पहिल्यासारखं हवंय. ”
“वेद...मी अजूनही तिथेच आहे. तुला माझ्यापर्यंत येणारा रस्ता पुन्हा सापडला की ये. मी वाट बघतेय.”
“You messed it rutu..”
त्याने चिडून फोन ठेवला.तिला रडू आवरलं नाही.
ऋतू रडतेय हे पाहून कबीर आत आला.तिने चटकन डोळे पुसले.
“ऋतुजा आर यु ओके?”
“ह्म्म्म” डोळे पुसत ती म्हणाली.
“प्लीज डोंट टेल मी की तू आता रडणार आहे..प्लीज मला अजिबात अनुभव नाहीये की एखादी मुलगी असं रडत असेल तर काय stand घ्यायचा....सो मला टेन्शन येतंय” त्याने गाडी पुन्हा चालू केली.
“कबीर तुला काहीच करायचं नाहीये फक्त शांततेत गाडी चालवायची आहे...आणि गाण्याचा आवाज वाढवायचा आहे” सीट मागे घेऊन तिने डोळे मिटले.पापण्याच्या कडा ओलावल्या होत्या.
बराचवेळ त्याने शांततेत गाडी चालवली पण तिची ही बेचैनी त्याला बघवत नव्हती.
“चल चेहऱ्यावर पाणी मार ,फ्रेश हो,लंच ब्रेक घेऊया.” त्याने एका शांत,निसर्गरम्य अश्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेलला गाडी थांबवली.
बाहेरचं वातावरण बघून तिचा जरा मूड बदलला.चेहऱ्यावर थंड पाणी मारल्यावर तिला हुरूप आला.जरा केस आणि माफक तयारी करून तिला शांत,निवांत वाटायला लागलं.
ती येते तोपर्यंत कबीरने पेस्ट्री मागवून त्यांना जरा केक शेपमध्ये ठेवायचा प्रयत्न केला होता.
“ ये हे काय?” समोर मिनी केक पाहून ती आश्चर्याने म्हणाली.
“केक!. आज माझा वाढदिवस आहे तू विसरलीस का?” तो मिश्किलपणे हसत म्हणाला.
“तुला तर सेलीब्रेट करायला आवडत नाही ना?” मघाशी आलेली मरगळ जाऊन आता तिचा चेहरा प्रसन्न झाला होता.
“तुला आवडतं ना..” त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिलं.
“...” तिला बोलायला सुचलं नाही.
“आय मीन केक कापायला हवा ना, शास्त्र असतं ते.” तो त्याच्या स्टाईलने खळखळून हसला.
“असं नाही काही, वाढदिवसाला मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणं शास्त्र असतं,माझ्यासाठी तरी.”ती देखील हसली. पण जेवतांना ती जरा शांतच होती.
“ ऋतुजा का असं त्याला एकटं सोडून निघून आलीस? तू एक क्षणही त्याच्यापासून,त्याच्या विचारांपासून दूर जाऊ शकत नाही तर हा वेडेपणा का? सॉरी पण आता विचारल्याशिवाय राहवलं नाही.”
“ हे त्याला समजत नाहीये ना,कुणाला किती महत्व द्यावं आणि समजत नसेल तर त्याला ते समजावून द्यावं लागेल.”
“अच्छा म्हणजे स्टोरीमध्ये अजून काही पात्र add आहेत तर आणि हिरोने हिरोईनला त्यांच्यापेक्षा कमी महत्व दिलेलं दिसतंय म्हणून हिरोईन भांडून परिस्थितीला सामोरं जाण्यापेक्षा पळून जाण्याचा सोयीस्कर मार्ग निवडत आहे...ok now its clear..”
“असं नाहीये कबीर, जाऊदे,मी म्हटलं होतं ना मला प्रश्न विचारू नको म्हणून..”
“ओके relax फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नको...dont get trapped in fish love”
“fish love हे काय नवीन?”
“नवीन नाही जुनंच आहे.आपण सहज म्हणतो ना की I just love fish म्हणजे काय? तर माश्यावर प्रेम नाहीये कारण प्रेम माश्यावर असतं तर असं पकडून,मारून,फ्राय करून त्यावर आपण ताव मारला नसता. I love fish म्हणजे आपलं आपल्यावरच प्रेम आहे, आपल्याला तो खायला छान लागणार आहे,आपलं समोरच्यापेक्षा जास्त स्वतःवर प्रेम असतं, तू वेदला I love you म्हटल्यावर आपसूकच काय expect करशील तर in return I love you too बरोबर ना?”
“हम्म”
“हे selfishlove नेहमी फोर्स करत असतं त्या स्पेशल व्यक्तीसोबत रहायला कारण ती तुम्हाला आनंद देते,स्पेशल फील करवते याउलट selfless love हे तुम्ही समोरच्याला किती प्रेम देताय,विश्वास ठेवताय. काहीही झालं तरी त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताय हे बघतं,it always wanting the loved one should be happy मग त्याच्या फिलिंग्स तुमच्याविषयी काय आहे हे तेवढं matter करत नाही,सेल्फलेस लव्ह काहीच डिमांड करत नाही baby. ”
जेवताना असं सहजपणे फिलोसॉफी समजावून देणारा झेन गुरु किंवा तत्त्वज्ञ असावा असा तो बोलत होता.
“म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझं वेदवर असणारं प्रेम हे सेल्फिश लव्ह कॅटेगरी आहे.” ती लहान मुलीसारखे गाल फुगवत म्हणाली.
“मला काहीही म्हणायचं नाहीये. मी फक्त वाचलेले,मला माहीत असलेले हे दोन concept सांगितले बाकी तुझं तू ठरवं.प्रत्येकाला आयुष्यात थोडं फिशलव्ह गरजेचं आहेच पण एकाचं सेल्फलेस लव्ह रिलेशनशिप टिकवून ठेवायला मदत करू शकतं.ऋतुजा सर्वांच्या नशिबात प्रेम नसतं.तुला मिळालंय ते सांभाळ तुझा आनंद वेदसोबत आहे.”
“कबीर मी आज तरी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे आणि माझी काही कारणं आहे त्यामागे,जरा त्यानेही सेल्फलेस लव्ह दाखवावं ना? मीच का?”
“अरे नाराज होऊ नको मी गंमत करतोय..आणि कुणाची तरी आठवण येत असेल तर फोन करावा असं दुसऱ्यावर त्याचा राग काढू नये गं.”
“अजिबात नाही..मला नाही करायचाय त्याला फोन.”
“उनसे बात नही करनी है मगर बात उन्ही की करनी है| भाई कमाल है.” पुन्हा तिला चिडवत तो म्हणाला.
ह्या अश्या लाईट मूडमध्ये तिला तो पहिल्यांदा तिच्याच वयाचा कुणी मित्र असल्यासारखा वाटला.
“अच्छा? शेरोशायरी आणि तू एकदम वाईट कॉम्बिनेशन.” डोळे बारीक करून त्याला चिडवत ती म्हणाली आणि स्वतःच खदखदून हसली.
“अरे ह्याला काय अर्थ आहे? शेरोशायरी,सिनेमा,गाणी काय तुम्हा प्रेमीलोकांची मक्तेदारी आहे का, आम्ही ह्यातलं काहीच वाचायचं,गायचं,बोलायचं नाही?”
“अरे हो..रिलॅक्स मी देखील गंमत केली.”
“मग ठीक ये”
“बरं नॉनआशिक,नॉनप्रेमीजी काम,प्रोजेक्ट बॉसगिरी सोडून तुम्हाला अजून काय काय आवडतं आयुष्यात?”
“जरा आडवाटेच्या आवडी आहेत माझ्या ऐकून काय करशील..?”
“तरी..सांग ना”
“सगळ्यात महत्वाचं-एक्सरसाईज. मग वेळ मिळेल तेव्हा क्लासिकल music ऐकतो rather जगतो,बाकी काही नको आयुष्यात, संध्याकाळचा किंवा रात्रीचा चहा आणि सिगरेट, कधीतरी बियर-सिगरेट आणि क्लासिकल गाण्यांची माझी सिलेक्टिव्ह प्ले-लिस्ट आणि हो शांतता. बस्स् this is life. समाधी लागते माझी.पूर्णपणे विचारशून्य ...!! फक्त आणि फक्त त्याचवेळी प्रोजेक्ट आठवत नाही की कुठली डेडलाईन आठवत नाही. बाकी आयुष्यात कुणी नसल्याने कुणी आठवायचा तर प्रश्नच नाही. आई सोशल activist आहे, आणि बाबा आता रिटायर् झाल्यावर त्यांची आवड म्हणून क्लासिकल म्युझिकवर रिसर्च करताय. म्हणून हे दोन टोकाचं व्यक्तिमत्व असेल माझं, माहित नाही. पण ..what more I can expect from life आणि हो वाचायला ही आवडतं ते ही असंच इंडियन,फॉरेन ओल्ड क्लासिक. बस्स that’s me. जास्त काही वाईड स्पेक्ट्रम नाहीये माझ्या आयुष्याचा. अगदी सुरु होताच संपतो”
तो भरभरून बोलत होता.
“स्ट्रेंज... ” त्याच्या ह्या आवडी ऐकून तिला अगोदर विश्वासच बसला नाही.
#क्रमशः
©हर्षदा
आवडीच्या प्रश्नाचं आवडतं उत्तर...आज रात्री 9 वाजता.
Keep reading Keep commenting.....