Tu Hi re majha Mitwa - 16 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू ही रे माझा मितवा - 16

Featured Books
Categories
Share

तू ही रे माझा मितवा - 16



“आत्ता?..आत्ताच बोलायचंय..? ओके चल बोल..मी चुकलोय मला शिक्षा हवीच...बोल.”

“ वेद मला तुला हर्ट नाही करायचंय पण काही गोष्टींवर बोलणं फार गरजेचं आहे.”

“ऐकतोय...” त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

“वेद मला पूर्ण कल्पना आहे की रेवा आणि जय तुझे खास फ्रेंड्स आहेत पण त्यांना मी नकोय तुझ्या आयुष्यात.रेवाला वाटतंय की तुझं माझ्याप्रती प्रेम निव्वळ आकर्षण आहे आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे ते मिळवण्यासाठी जय काहीही मूर्खपणा करत असतो.
I am just fed up by all this.त्यांना आपल्या नात्याची intensity कळत नाहीये रे. वेद हा माझा हट्ट समज,अट समज, बालीशपणा समज की अजून काही..आता तुझ्या आयुष्यात एकतर त्या दोघांशी तुझी मैत्री कायम असेल किंवा मी असेल,निवड तू करायचीय,आत्ता ह्या क्षणाला की तुला काय हवंय ते”

“ ठीक आहेस ना? असं लोकांना आयुष्यातून काढून फेकता येत नाही ऋतू. बऱ्याच वेळा जुळवून घ्यावं लागतं. समजतंय ना तुला? बाबांनो ऋतूला तुम्ही आवडत नाही तर तुम्ही उद्यापासून माझे मित्र नाही,गुड बाय...असं सांगू त्यांना?” अत्यंत त्रासिक चेहऱ्याने तो म्हणाला.

“वेद ते तुझ्या मैत्रीचा फायदा घेताय तुला कसं कळत नाहीये रे,ती रेवा ऑब्सेस्ड आहे तुझ्यासाठी ती तुझ्यासोबत असतांना मला कम्फर्टेबल नाही वाटणार रे आता.” ती अगदी रडकुंडीला आली.

“कसं समजावू तुला तिच्या मनात असं काही नाहीये,बरं आज रेवा आहे उद्या माझ्या टीम मध्ये माझ्यासोबत एखादी फिमेल कलीग असेल किंवा दुसरी एखादी मैत्रीण असेल तर? मी असचं तुला कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून कुणाशीच बोलायचं नाही?” त्याचीही चिडचिड प्रचंड वाढली.

“वेद तू चुकीचं समजतोय. तसं नाही म्हणायचंय रे मला. रेवाचा प्रोब्लेम वेगळा आहे ती प्रेम करते तुझ्यावर.” ती त्याला परोपरीने समजावत होती.

“ व्हॉट रबिश यार ऋतू..बरं एक वेळ मी हे खरं पण मानलं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे त्यापेक्षा महत्वाचं नाहीये का? नाही तू असं ऐकणार नाही,आपण आता हे सगळं समोरासमोर सॉल्व्ह करूया ओके?” त्याने जयला फोन लावला आणि बीचवर बोलावलं.

“चल कॅफे ओपन आहे तिथे बसुया,निवांत बोलता येईल ते दोघं ही येताय.” तो उठून पुढे निघाला देखील.ती हताशपणे मागून निघाली. वेदला समजावण् खूप कठीण झालं होतं तिच्यासाठी.बीचवरच्या कॅफेत निवांत जागा पाहून ते बसले.हळुवार उजाडत प्रकाशाचा सुंदर मेळ आकाशात दिसत होता.दोघेही शांत बसून होते.

रेवा आणि जयला जरा कल्पना होतीच की विषय कालचाच असणार आहे. ते साळसूदपणे येऊन बसले,बसल्यावर दोघांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.वेदने तिच्याकडे पाहून एक उपहास दर्शक स्माईल दिलं आणि सर्वांसाठी कॉफी मागवली.

“जय तुला ऋतू आवडत नाही पण माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे तुला काही प्रॉब्लेम आहे? किंवा यापुढे तू आमच्यात काही प्रॉब्लेम क्रियेट करण्याची शक्यता आहे का?” त्याने सरळ मुद्द्याला हात घालत जयला प्रश्न केला.ह्या सरळ प्रश्नाने तो चांगलाच घाबरला,गोंधळला पण लगेच सावरून म्हणाला-

“ यार वेद समज ना. मी काल २/३ पेग डाऊन होतो त्याच्या भरात तुला ती विडची सिगरेट दिली यार.माझा साक्षात काही हेतू नव्हता रे मलाच इतकं गिल्टी वाटतंय तुला काय सांगू.” तो साळसूदपणे नाटकी चेहऱ्याने म्हणाला.ऋतूने त्रासिक चेहऱ्याने तोंड फिरवलं.

“जय प्लीज प्रश्न वेगळा आहे त्याचंच उत्तर दे” वेद चिडून म्हणाला.

“मला काय प्रॉब्लेम असेल साक्षात? मला कंपनी कामाचा पगार देते तुझ्या आयुष्यात काड्या करायचं एवढंच काम नाहीये मला समजलं का वेद आणि हे असं कुणीही सांगितलं म्हणून माझी उलटतपासणी घेऊ नको. च्यायला घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायच्या कुणी सांगितलं,एका शब्दावर गोव्याचा भारी प्लान ठरवला त्याचं हे फळ,कालसाठी माझ्या एवढा तू ही जबाबदार आहेस. चल मी नव्हतो शुद्धीवर पण तू होतास न...? मग ही साक्षात मलाच का दोष देते.च्यायला लई माज आहे ना तुला तुझ्या सुंदरतेचा ? तुला माहित आहे वेद आम्हाला दूर करेल पण तुला करणार नाही.“ तो संतापात तोंडाला येईल ते बोलत होता.

रेवा डोक्याला हात लावून शांतपणे बसून गंमत बघत होती.ऋतू काहीच ऐकू न आल्यासारखं त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती,त्याने तो अजूनच संतापला,

“जय जरा तोंड सांभाळून बोल.” वेद रागावून म्हणाला.

“वेद भावा खूप ट्राय केला फक्त तुझ्यासाठी हिच्याशी जमवून घ्यायचा पण मला माफ कर...तू माझा मित्र आहे आणि राहशील तू हिला विचारून ठरव तुझं काय मत आहे ते ओके? गुडबाय.” तो संतापात निघून गेला. वेद त्याला आवाज देत राहिला पण तो थांबला नाही.

“हम्म चला आता माझ्यावर काय आरोप आहे मॅडमचे ?” रेवा वेद्कडे बघत म्हणाली.

“रेवा प्लीज यार तू तरी समजून घे असं बोलू नको.” काकुळतीने वेद म्हणाला.

“रेवा का नाटकं करतीये काल रात्री जे बोललीस ते फक्त सांग त्याला That’s enough”

“ऋतुजा आज तुझा बर्थडे आहे, तू इतक्या चांगल्या दिवशी हा सगळा तमाशा का करतेय Idon’t know पण ग्रो अप यार. वेद तू माझ्या रूममध्ये,माझ्या बेडवर झोपला होतास तुला आठवतंय ना? मी स्वतः सौम्याला सांगितलं हिला बोलावून घ्यायला आणि ह्यासाठी मला thank you म्हणायचं सोडून रात्री ही माझ्यावरच आरोप करायला लागली.काय काय बोलत होती तिचं तिलाच माहिती. मी तेव्हाही हेच म्हटले होते हिला की तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि प्रेम आहे माझं वेद्वर पण ते मैत्रीमधलं प्रेम तुला कसं समजावून सांगू ते मला जमत नाहीये. जेवढं प्रेम वेदवर आहे तेवढंच जयवर पण आहे,फक्त प्रेम नाही तर दोघांची काळजी पण आहे.”

“ये रेवा का नाटक करतेय. आता वेद आहे समोर तर सरळ विचार ना त्याला की इन फ्युचर तरी तुझा काही चान्स आहे का? माझ्यावर असणारं त्याचं प्रेम आकर्षण आहे का? काल तर उपदेश देत होतीस मला.” ऋतू तिच्यावर उखडलीच.

“ऋतुजा यार इनफ,प्लीज” वेद वैतागून म्हणाला.

“वेद आज प्रेमासाठी ही मैत्री तोडायला लावतेय, उद्या लग्न झाल्यावर पझेसिव्ह होऊन तुझ्या पेरेंट्सला सोडायला लावलं नाही म्हणजे मिळवलं..ही नेहमी तुझ्यावर असाच अविश्वास दाखवेल आणि जसा मोठ्या बहिणीने घेतला तसा ही सुद्धा डिवोर्स घेईल,mark my words..and …”

तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत तिच्या गालावर जोरदार झापड बसली.रेवा गालावर हात ठेवून संतापाने थरथर कापत होती.वेद ही उठून उभा राहिला,काय झालं त्याला कळलंसुद्धा नाही.

“Don’t dare to say a single word about my sis you dumbo. लाज तर तुला अजिबात नाहीये, वेद एवढं डोकं फोडून तुला सांगतोय की तो माझा आहे तरी निलाजरेपणाने त्याला मिळवायचे फालतू stunts करत असतेस,एवढं डोकं जर कामात लावलं तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये तरी घेतील तुला, किती दिवस डेटाएन्ट्री करशील..MAD.” ऋतूचं हे इतकं चिडलेलं रूप वेदने कधी पाहिलं नव्हतं. त्याने तिला हाताला धरून बाजूला ओढलं.

रेवाच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं.

“रेवू ,प्लीज,मी सॉरी बोलतो..प्लीज,try to understand .”

“वेद This is not done …….she will pay for this….!!” रेवा रडत निघून गेली.

वेद तिच्या मागून जाणार तसा ऋतूने त्याचा हात पकडला.

“वेद माझं बोलणं संपलं नाहीये अजून, रीमाताईचं डिवोर्स प्रकरण तिच्याशी डिस्कस करायचा हक्क तुला कुणी दिला?” आजूबाजूला बघत दबक्या आवाजात ती म्हणाली.तुरळक लोकं आजूबाजूला होते आणि मधून मधून त्यांच्या ह्या ड्रामाकडे बघत ही होते.

“Are you mad ? असं कोण वागतं ऋतू? मी ताईचं प्रकरण डिस्कस नव्हतं केलं, मी त्यांना मागे समजावून सांगितलं होतं की ऋतूसोबत जरा व्यवस्थित बोला ती सध्या family crises मधून जातेय त्या संदर्भात मी हे सांगितलं होतं,you slapped her rutu कळतंय का तुला?”

तो तावातावाने बोलला.

“वेद मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाहीये आणि त्यांना जे आपल्यात भांडण हवंय ते ही होऊ द्यायचं नाहीये,तुला नाही ना त्यांची मैत्री सोडायची फाईन,ठीक आहे मग माझी पण एक रिक्वेस्ट आहे.वेद आपण एंगेजमेंट तरी करूया.”

“Have you gone mad rutu ?”

“वेद काय प्रॉब्लेम आहे, लग्न करूया असं नाही म्हटले मी. फक्त एंगेजमेंट करूया. लग्न ३/४ वर्षांनी किंवा जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा. काहीच हरकत नाही.” ती काकुळतीने म्हणाली.

“ऋतू फक्त २४ चे आहोत आपण, माझी काय सेटलमेंट आहे अजून? आणि रीमाताईचा डिवोर्स ? ते मी घरी कसं सांगू? माझी आई....” तो बोलता बोलता एकदम थांबला आपण चुकून ऋतूला हर्ट होईल असं बोलून गेलो त्याच्या लक्षात आलं.तिचे डोळे डबडबले.

“ऋतू सॉरी यार मला तसं म्हणायचं नव्हतं,प्लीज लक्षात घे दोन वर्षात ताईचं हे प्रकरण सॉल्व्ह होईल,आपण सेटल होऊ मग घरी सांगता येईल ना,जरा प्रक्टिकल विचार कर.”

“वेद तुझं हे अगदीच मान्य की आपण सेटल होऊ पण ताईच्या बाबतीत तू घरी सांगू शकत नाही म्हणजे? तुला माझ्याशी एंगेजमेंट करायचीय त्यात तिचा डिवोर्स कसा matter करतो?”

“ऋतू मला काहीच प्रॉब्लेम नाही तू समज ना पण माझ्या घरी स्पेसिफिकली आई, तिला जरा व्यवस्थित सांगावं लागेल, तुला कळतंय का मला काय म्हणायचंय,दोन तीन वर्ष डेट करू, एकमेकांना समजून घेऊ मग पुढे जाऊया.”

“वेद मग प्रेम कुठल्या बेसिसवर केलं आपण? काल मला प्रपोज करणार होता ते कश्यासाठी ? हा तू नाहीये ज्याला मी ओळखते....” ती डोळे पुसत म्हणाली.

“ऋतू हाच तुझा बालीशपणा,चंचलपणा,इम्पेशंट बिहेवीयर मॅच्युरिटीमध्ये बदलायला ही तुला वेळ नकोय का?”

“वेद माझ्या ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रेमात तर तू होतास ना? आणि हे सगळं बदललं तर माझं काय राहील माझ्यात?” तिचा आवाज जड झाला होता.तो काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला. फोन ऐकून तो जरा घाबरला.

“बघ तुझ्या मूर्खपणामुळे काय झालंय,रेवा बेशुद्ध झाली होती. तिला जयने सॅमच्या फॅमिली डॉककडे नेलंय..झालं मनासारखं? तिला जास्त त्रास झालं तर कोण जबाबदार असणार ऋतू?
You spoiled everything, आपलीच नाही तर सगळ्यांची व्हेकेशन खराब केलीस तू.”

“I spoiled it ved? Really? १००% रेवा आणि तो जोकर नाटक करताय,तुलाच समजत नाहीये.तू रागात आहेस वेद म्हणून तुला खरं काय आहे ते दिसत नाहीये,चूक तुझी नाहीये,तू शांत हो मग आपण बोलू.”

“इनफ यार ऋतू........तुझा बर्थडे आहे म्हणून शांत बसलोय, please do some introspection ” म्हणून तो संतापात उठला,काउंटरवर पैसे आपटून निघाला.
वेदचं हे असं चिडणं तिने कधी बघितलंच नव्हतं,ती दुखावली गेली,खूप काहीतरी हातातून दूर जातंय,निसटू पहातंय ह्या भावनेने तिला गलबलून आलं.-
“हा तोच वेद आहे ज्याला माझं चिडणं,हट्ट करण गोड वाटायचं? ह्याचं वागणं अचानक इतकं तुटक आणि परकं का वाटतंय? अचानक कुणीतरी चेहऱ्यावरचा मुखवटा बाजूला करावा आणि एक अनोळखी चेहरा समोर यावा ज्याला आपण कधीच पाहिलं नव्हतं,प्रेम केलं नव्हतं अशी टोकाची फिलिंग का येतेय? की मी आता चिडलेय,दुखावले गेलेय म्हणून असे विचार माझ्या मनात येताय? साखरझोपेत असतांना एक गुलाबी स्वप्न सलग चालू असावं आणि कर्णकर्कश आवाजाने ते विरून जावं, आता डोळे उघडून पाहिलं तर ज्याच्यासोबत मी होते ती तर फक्त एक आभासी प्रतिमा होती असं तर नाहीये?’आता इथे अजिबात थांबायचं नाही,थांबले तर रागात काहीही निर्णय घेतला जाईल जे मला करायचं नाहीये....मी ओळखते ना वेदला,तो शांत झाला की सगळं व्यवस्थित होईल....नक्की?’
तिच्या मनात विचारांची असंख्य वादळं घोंगावू लागली. तिने शांतपणे गारढोण झालेली कॉफी पिऊन घेतली आणि तशीच बसून राहिली.तिची नजर दूरवर रोखली होती, डोळ्यातला समुद्र शांतपणे हिंदकळत होता.

“हेय birthday girl ” कॅफेच्या बाहेरून तोच आश्वासक आणि दमदार आवाज आला.
तिने पटकन डोळे टिपले.चेहऱ्यावर थोडंस हसू तरळल.ती तशीच बसून राहिली.तो फिरून आत आला तिच्या समोर बसला.

“मॅडम घाईघाईत डोळे पुसले वाटतं,अश्रू म्हणजे ९९% फिलिंग्ज आणि फक्त १% पाणी असतं त्यातल्या दोन छोट्याश्या फिलिंग्स गालावर तश्याच राहिल्याय ” तो हसत म्हणाला.

तिने गालावरून हात फिरवला.

“कबीर...तुम्ही?” शक्य तेवढं नॉर्मल दाखवायचा तिचा प्रयत्न चालू होता.

“ह्म्म्म बीचवर एक मस्त लॉंगवॉक घेतला...” घामाने केसांचे मेसी फ्रिंजेस अजूनच विस्कटले होते,काल रात्री डोळ्यात जी हलकी नशा होती ती जाऊन आता त्याचा डोळ्यांचा हेझल कलर अजूनच गहिरा वाटत होता. तिने त्याला न्याहाळलं पण अगदी क्षणभरच.

“तुम्ही आज जाणार होता ना पुण्याला?”

“तुम्ही? लाईफटाईम अचिव्हमेंट कालच मिळाला असेल असं वाटतंय ऐकून.” तुम्ही ह्या शब्दावर जोर देत तो म्हणाला.

“तसं नाही...ओके I mean ..तू, तू गेला नाहीस अजून?”

“निघणार आहे थोड्यावेळात. आपली गाडी आपले रूल!....आणि तू आताही एकटी? हिरो कुठेय? कालसाठी जरा झापतो त्याला.कुठेय तो?”

“आता just गेला,नाहीतर ओळख करून दिली असती..”

“काही झालंय का? हिरोशी भांडण वैगरे? कालचा इश्यू ?”

“नाही काही नाही its too personal..”

“ओके...काळजी घे,कालचे ते थोडेसे घाबरलेले पण नॉटीआईज ते जास्त सूट करतात तुला, अगदी टकाटक. पण हे असे रडके डोळे बिग नो नो फॉर यु, सॉरी मला तारीफ कशी करावी ते कळत नाही आणि कुणी असं उदास बसलं असेल तर कन्सोल तर त्याहून करता येत नाही....”

“कबीर त्याची गरज ही नाहीये,don’t worry I am ok.. पण “एक रिक्वेस्ट करू?”

“बोल ना ”

“मला पुण्याला जायचंय आत्ता! मी येऊ सोबत?”

“हे बघ काही भांडण झालं असेल तर बोलून गोष्टी सॉर्ट होतात असं सिच्युएशनला घाबरून पळून जाण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा दोघांनी शांततेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. असं तडकाफडकी निघणं म्हणजे?” त्याने आश्चर्याने विचारलं.

“कबीर मी anyways पुण्याला जाणार आहे फक्त तुझ्यासोबत येऊ शकते का याचं डिजिटलमध्ये उत्तर दे. हो किंवा नाही म्हणजे मला लवकर दुसरे ऑप्शन्स शोधता येतील.”

तिला भरून आलं,आवाज जड झाला होता.त्याला तिची तगमग समजली.ती रागात खरंच कुठलाही ऑप्शन शोधून निघून जाईल याची त्याला भीती वाटली.

“रिलॅक्स फक्त माझी बोरिंग कंपनी सहन करायची तुझी तयारी असेल तर नक्कीच येऊ शकते. आणि उद्या तुझ्या हिरोने मला मारायला यायला नको,GF पळवली म्हणून..तुला तर सांगितलंय मी की आय just लव्ह मारामारी. हिरो फ्राक्चरवैगरे झाला तर उगाच तुझ्या डोळ्यात पाणी बघायचं नाहीये मला.” तो खळखळून हसला.

“कबीर,काहीतरीच काय..” ती देखील मनसोक्त हसली,तिच्या चेहऱ्यावरची मरगळ जरा पुसट झाली,तिचा हा असा उजळलेला चेहरा पाहून त्याला जरा बरं वाटलं.

“Are you sure?”

“Yes Kabir”

“बऱ अर्ध्या तासात तुझ्या रिसोर्टच्या साईडगेटने सरळ पुढे चालत ये. पर्किंगचा बोर्ड आहे तिथे थांब, मी आलोच आणि मॅडम पुन्हा विचार करा,रागात कुठलाच निर्णय घेऊ नको ९-१० तासांचा प्रवास आहे..कळतंय ना?”

“कबीर मी समर्थ आहे माझे निर्णय घ्यायला आणि इथे थांबून रागात काही निर्णय घ्यायला नको म्हणून घरी जातेय.”

“ओके,As you wish..”

#क्रमशः

©हर्षदा

तुमचा आपुलकीचा प्रश्न मंडळी- पुढचा पार्ट केव्हा?🤔

आपुलकीचं उत्तर-तुमचा हा पार्ट वाचून कमेंट करून झाल्यावर लगेच ...😘😘😘

माझ्या कठीण काळात पर्सनल मेसेज ,कमेंट्समध्ये सांत्वना दिलेल्या सगळ्या मैत्रिणींचे मनापासून आभार....
Keep reading,keep commenting