आज सकाळी सकाळीच गार्गीला प्रतिकचा फोन आला..
प्रतीक - हॅलो, गार्गी..
गार्गी - हॅलो, बोल प्रतीक.. आज अचानक कसं काय कॉल केला??
प्रतीक - तू घरीच आहे ना आज? मी येत होतो पत्रिका घेऊन तुझ्या घरी..
गार्गी - नाही प्रतीक तू अस कर ना मला पत्रिका व्हाट्सअप्प करून दे, मी बघते ते ... मी जरा गावी आलीय.. थोडं काम होत तर.. आणि इकडेच थांबणार आहे काही दिवस.. तर तू नको येऊ..
प्रतीक - ओहह, ठीक आहे मी पाठवतो तुला व्हाट्सअप्प वर पत्रिका.. खरंतर मला तुला एकदा भेटायचं होतं.. पत्रिका तर फक्त बहाणा होता.. आणि तू साखरपुड्याला पण नाही आली..
गार्गी - ठीक आहे नंतर भेटू, मी कुठे पळून जाणार आहे.. कधी आहे लग्न??
प्रतीक - 15 दिवसांनी.. तू येशील ना?? तुला यावंच लागेल.. मी काहीच ऐकणार नाही..
गार्गी - हो मी नक्कीच प्रयत्न करेल..
गार्गीच्या बोलण्यावरून त्याला वाटलं की काही तरी गडबड आहे, कारण नेहमी एकदम उत्साहित होऊन आणि मस्ती करत बोलणारी गार्गी आज अगदी रुक्ष आणि कामपूरतच बोलत आहे..
प्रतीक - गार्गी काय झालं?? सगळं ठीक आहे ना??
त्याच्या या प्रश्नावर गार्गी थोडी गोंधळली, पण थोडं अडखळतच तिने नॉर्मल होऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला...
गार्गी -हो तर .. का ..काय झालं? स.. स.. सगळं सगळं ठीक आहे प्रतीक..
प्रतीक - नक्की, मला का अस वाटत आहे की तू कुठल्या तरी अडचणीत आहेस..
गार्गी - नाही रे, मी कशाला कुठल्या अडचणीत असणार.. ते सोड तू सांग तू बोलेतो की नाही श्रुतीशी?? ( प्रतिकची होणारी बायको) कशी आहे ती??
प्रतीक - बोलतो आता, बोलव लागणारच ना.. चांगली आहे ती.. खूप समजूतदार आणि मोकळी पण आहे, तुझं आणि तीच छान जमेल..
गार्गी - अरे वाह.. खूप छान वाटलं तुझ्याकडून तीच कौतुक ऐकून.. तुम्ही दोघं सुखाणी संसार करा.. I wish happiness for u..
प्रतीक - थँक यु..
गार्गी - बरं प्रतीक नंतर बोलते थोडं काम आलंय..
घाईघाईतच गार्गीने फोन ठेवला, आणखी बोलली असती तर स्वतःला सावरण तिला अवघड झालं असतं आणि प्रतिकला आणखी शंका आली असती.. आणि तिला त्याच्या या आनंदाच्या दिवसांत कसलच दुःख द्यायचं नव्हतं.. त्याला एकदा भेटायची इच्छा होती तिची पण आता जर भेटली तर तिच्याकडे बघून प्रतिकला तिची अवस्था लगेच लक्षात आली असती.. तिच्या चेहऱ्यावरचं उडालेला तेज आणि खोल गेलेले डोळे त्याला लगेच गार्गीच्या ठिक नसण्याचा अंदाज आला असता.. हे सगळं तिला लपवायच होत म्हणून तिने त्याला टाळलं होतं.. थोडावेळ मनाशी नेहमीसारखं झुंजून मग तिने स्वतःला कस तरी सांभाळलं.. आणि पुढचं बघायला हवं 2 दिवसांनंतर ओपेरेशन येत आहे पैशाची जुळवाजुळव करायला हवी.. म्हणून तिने तिच्या अकाउंटच्या सगळ्या fds तोडल्यात, तेव्हा साधारण दीड लाख झालेत.. तिच्या सासूबाईंच्या अकाउंटला बघितलं तर 80 हजार पडले होते.. ओपेशनचा खर्चच सव्वा तीन लाख सांगितलं होता.. आणि हे 2, 40,000 च झालेत.. वरच्यासाठी, औषधी गोळ्या यासाठी पण काही पैसे ठेवायला पाहिजे होते म्हणून आता गौरवशी बोलल्याशिवाय पर्याय नव्हता.. त्याला पैसे मागवेच लावणार.. म्हणून मग तिने तसं तिच्या सासाऱ्यांकडे बोलून दाखवलं..
गार्गी - बाबा, गौरवला पैसे मागायचे आहेत, दीड लाख कमी पडत आहेत, त्याच्याकडे असतील बहुतेक.. बोलून बघू का?
बाबा - बोल, पण एवढे पैसे कशाला हवेत विचारल्यावर तू काय सांगणार आहेस??
गार्गी - मलाही तोच प्रश्न पडलाय बाबा..
बाबा - माझं एक ऐकशील का बाळा..
गार्गी - बोला ना बाबा.
बाबा - नवरा बायको एकमेकांचा आधार असतात, त्यांच्यात असं काही लपवणे योग्य नाही.. आज ना उद्या त्याला कळणारच आहे, तेव्हा तू नाही सांगितलं याच त्याला जास्त वाईट वाटेल, लहान सहान गोष्ट असती तर नाही सांगितलं तरी ठीक होत पण एवढा मोठा आणि बळावलेला आजार आहे तुझा, तुझ्या जन्म मरणाचा प्रश्न आहे हा.. एवढी मोठी गोष्ट आपल्या नावऱ्यापासून लपवणे मला तरी योग्य वाटत नाहीय.. जर तू गौरवच्या जागी असली असती तर तूच सांग तुला पटलं असत का ??
गार्गी - हो बाबा पण आता मी तरी काय करू, तो मनाने खूप हळवा आहे.. त्याला तिकडे कोणी आधार पण नाहीये.. अशावेळी त्याला काही सांगून त्याला संकटात टाकू का मी??
बाबा - तुला शांततेने त्याला समजून सांगावाच लागेल बेटा, नाहीतर कदाचित तो तुझ्यावर रुसून बसेल..
गार्गी - ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता तर मी प्रयत्न करून बघते..
बाबा - ठीक आहे, तुझे आईवडील कधी येणार आहेत??
गार्गी - आजच निघणार आहेत ते रात्री.. उद्या सकाळी पोचतील.. ते आले की मी त्यांना थोडं फार आपला एरियाची आणि हॉस्पिटलची माहिती देऊन ठेवेल.. म्हणजे त्यांना यायला जायला अडचण होणार नाही..
बाबा - ठीक आहे.. चालेल.. बोलून घे गौरवशी एकदा..
गार्गीने हो म्हणत गौरवला कॉल केला पण तो ऑफिस मध्ये होता.. त्यामुळे त्याने फोन उचलला नाही.. नंतर फ्री झाल्यावर फोन कर असा एक msg टाकून ती वाट पाहत बसली..
तेवढ्यात त्याचा फोन आला..
गौरव - हॅलो, sweetheart.. बोलो कशी आठवण आली माझी??
गार्गी - गौरव तुझं काम संपायला आणखी किती दिवस लागतील??
गौरव - ओहो.. माझी खूप आठवण येतेय वाटतं.. म्हणून म्हणत होतो की माझ्या सोबत चल.. बघ आता नाही राहवत आहे ना माझ्याशिवाय?? मला पण खूप आठवण येतेय ग तुम्हा सगळ्यांची, पण हे काम सोडून येऊ शकत नाही, तरी मी रोज प्रयत्न करतो माझं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा.. बरं तरी मला आणखी कमीत कमी जर सगळं अगदी सुरळीत आणि पटापट पार पडलं तर 15 दिवस लागतील.. बस फक्त 15 दिवस मेरी जान मग मी आलोच बघ उडत उडत..
गार्गी मनात विचार करत होती, किती मस्त वाटतंय ना गौरवच अस बोलणं , पण त्याला काहीच माहिती नाहीय इकडचं, 15 दिवस वेळ नाही रे माझ्याकडे.. मला तर तू आता हवा आहेस..पण नियती नेहमी माझ्यापासून माझ्या जवळच्या लोकांना अगदी मला गरज असते तेव्हाच दूर करते..
गौरव - गार्गी!!! ए गार्गी.. झोपलीस का फोनवर??
गौरवच्या आवाजाने ती भानावर आली..
गार्गी - गौरव मला काही पैसे हवे होते, तू पाठवू शकशील का??
गौरव - अरे हे काय विचारणं झालं जो है सब तेरा ही तो है ना.. बोल किती हवे आहेत??
गार्गी - दीड लाख..
दीड लाख म्हणता बरोबर गौरव उडालाच, ती एवढे पैसे मागेल अस त्याला वाटलंच नव्हतं.. म्हणून त्याने लगेच प्रतिप्रश्न केला..
गौरव - एवढे पैसे?? एवढे पैसे कशाला हवे आहेत तुला??
गार्गी - तूच बोलला ना आता जो है सब तेरा ही तो है.. मग?? तुझ्याकडे असतील तर दे ना.. मला खूप गरज आहे..
गौरव - अग हो तुझच आहे सगळं पण तुला एवढ्या पैश्यांची अचानक काय गरज पडली?? कुणाला द्यायला हवे आहेत का??
गार्गी - नाही मला माझ्याच साठी हवे आहेत गौरव..
गौरव - तुझ्यासाठी?? तू काय करणार आहे एवढ्या पैशाचं??
गार्गी - गौरव तुझ्याकडे पाणी आहे का?
गौरव - हो आहे, त्याच काय??
गार्गी - आता जवळ आहे ना??
गौरव - हो हातातच आहे बॉटल, त्याच काय?? विषय नको बदलवू..
गार्गी - बर आजूबाजूला काही बसायला असेल ना??
गौरव - तू मला नीट सांगणार आहे का?? हे काय लावलाय पाणी बेंच.. काय आहे ते लवकर सांग..
गार्गी - हो सांगतच आहे पण तू खाली बस रे आधी आणि पाणी जवळ ठेव..
गौरव - ठीक आहे बसलो आणि पाणी पण जवळ आहे बोल पटकन..
गार्गी - गौरव मी सांगते आहे पण प्लीज तू पॅनिक होऊ नको आणि अजिबात काळजी करू नको किंवा कसलच टेन्शन घेऊ नको..
गौरव - गार्गी तू मला घाबरवते आहेस?? कोणाला काही झालाय का?? आई बाबा पिल्लू सगळे ठीक आहेत ना??
गार्गी - हो सगळे ठीक आहे गौरव, फक्त ....
गौरव - फक्त काय मग ??
गार्गी - मी ठीक नाहीय, माझं ओपेरेशन करायचं आहे 2 दिवसांनी अस डॉक्टर बोलले..
गौरव - काय?? काय झालं तुला?? कशाचं ओपेरेशन??
गार्गी - गौरव फक्त शांत होऊन ऐक, मी सांगते पण तू पॅनिक नको होऊ... मला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालाय, आणि त्याचच ओपेरेशन करायचं आहे..
गौरव - काssय?? आणि हे कधी कळलं तुला?? मागे तुझी तब्येत खराब झाली होती तू हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा का??
गार्गी - हो तेव्हाच कळलं.. तू पाणी पी ना एक घोट..
गौरव - शट अप गार्गी, इतके दिवस झाले आणि तू मला आत्ता सांगतेय?? इतकी मोठी गोष्ट तू इतके दिवसापासून माझ्यापासून लपवतेय.. आणि आता हे पाणी पी आणि बेंचवर बस.. काय लावलंय?? अग आधी सांगितलं असत तर मी आज तुझ्या जवळ असतो ना.. आज तू एवढ्या मोठ्या संकटात आहे आणि मी साधं तुझ्या सोबत देखील नाहीे.. का नाही सांगितलं गार्गी??
गार्गी - अरे शांत हो ना गौरव, मी आजारी आहे ना माझ्यावर चिढशील का असं?? अरे तू उगाच ताण घेतला असता म्हणून नाही सांगितलं..
गौरव - मूर्ख आहे का तू?? ताण घेतला असता म्हणे अग तुझ्या पेक्षा मोठं आहे का काही?? मी कुणासाठी करतोय ग हे सगळं??
थोडं स्वतःला शांत करत..
आता हॉस्पिटलमध्ये कोण असणार आहे?? मी निघतोय इथून लगेच पण तरी मला माहिती नाही मी वेळेत पोहोचेल की नाही..
गार्गी - गौरव जस्ट रिलॅक्स, मी आईपप्पांना बोलावलेेलं आहे.. ते आजच बसनार आहेत आणि उद्या सकाळी इथे पोचतील.. सो तू नको काळजी करू.. तू तुझं काम आटपून लगेच निघ.. पण अस धडपडत नको येऊ.. उगाच तुला काही झालं तर आई बाबा आणखी खचून जातील..
गौरव - आई 'पपा येतात आहे मग ठिक आहे मी लगेच तिकीट बघतो आणि मॅनेजरला कल्पना देऊन तिकडे येतो..
गार्गी - हो ठीक आहे.. पण जास्त टेन्शन नको घेऊ, मी ठीक होणार आहे, आणि स्वतःला सांभाळ.. तू एकटा आहेस तिकडे माझी काळजी नको वाढवू प्लीज.. मला ताण घातक आहे..
गौरव - ओके ओके.. मी मी एकदम ठीक आहे, तू पण लवकरच ठीक होशील आहे.. मला धक्का बसला ना ऐकून म्हणून मी रेऍक्ट झालो सॉरी सॉरी.. मी घेतो काळजी माझी.. तू फक्त तुझं बघ आता.. ठीक आहे काळजी घे.. आणि हो मी पाठवतो तुला पैसे..
गार्गी - ठीक आहे.. थँक यु गौरव.. I love you..😊
आणि फोन ठेवला.. पुढच्या अगदी 3 मिनिटात तिच्या अकाउंटला त्याने दीड लाख रुपये टाकलेत.. त्याला जायलाही पैसे लागणार होते. emergency flight च महाग तिकीट असते.. त्याने बघितलं जर उद्या किंवा परवा निघायचं असेल तर तिकिटांची किंमतच आता एक लाख 20 हजार रुपये आहे.. त्याच्याकडे सद्धे तेवढी सेविंग्स नव्हती कारण त्यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी एका रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवले होते.. त्याने एक दोन कलीगला फोन केला पण कुणी पैसे द्यायला तयार नव्हतं, शेवटी त्याने त्याच्या ताईला विचारलं आणि तिने काही पैसे पाठवलेत.. मॅनेजर नि जायची परमिशन दिली पण हा प्रोजेक्ट कंपनी ला थांबवता येणार नव्हता त्यामुळे गौरवच्या जागी आणखी नवीन व्यक्तीला तो प्रोजेक्ट देण्यात आला आणि मॅनेजरने सांगितलं की त्या नवीन व्यक्तीला पूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊन kt देऊन मग जा.. या सगळ्या प्रकणात निदान आणखी 4 दिवस तरी मोडणार होते पण गौरवचा नाईलाज होता.. त्याने कॉन्ट्रॅक्ट sign केलेला होता.. आणि कुठल्याच लीगल प्रोसेस मध्ये आता यावेळी तो अडकून पडू शकत नव्हता.. आईपप्पांना बोलावलं आहे म्हणून तो थोडा रिलॅक्स फील करत होता.. त्याने लगेच 5 व्या दिवसाच तिकीट काढून घेतलं..
ती व्यक्ती सुद्धा भारतातून येणार होती त्यामुळे एक दिवस त्याच्या येण्यामध्ये जाणार होता.. आणि वरून या प्रोजेक्ट मुळे त्याला जो फायदा मिळणार होता तोही आता मिळणार नाही सोबतच कंपनी च नुकसान झालं त्याचा उगाच खर्च करावा लागला म्हणून इंक्रेमेंट पण मिळणार नव्हतं, साहजिकच याची त्याला पर्वा नव्हती कारण त्याला आता कुठल्याही स्थितीत लवकरात लवकर गार्गीजवळ जायचं होतं..
----------------------------------–-------------------------