Shevtacha Kshan - 28 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 28

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 28



गार्गीच्या बोलण्यावर गौरवने रात्री झोपताना विचार केला.. त्याने गेल्या काही दिवसांत सोबत घालवलेले क्षण आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काही आठवतच नव्हतं.. "खरच आपल्या लक्षातच आलं नाही की आपण गार्गीपासून लांब होत चाललोय?? पण अस का होतंय?? मी तर आजही फक्त तिच्यावरच प्रेम करतो.. पण माझी परी आली आणि तो वेळ आता माझ्या परीला देतादेता परी च्या आईलाही माझी गरज असेल अस कधी जाणावलंच नाही.. आधी तर तिच्याशिवाय ना सकाळ व्हायची ना रात्र.. कधी तिला सांगितल्याशिवाय ऑफिसला पण जायचो नाही आणि आता ती सात महिने माझ्यापासून लांब राहिली तर माझी सवयच मोडली.. आज ती बोलली म्हणजे नक्कीच तिला कुठेतरी एकटेपणा जाणवत असावा.. मी बदललो असं बोलली ती.. खरच आहे तिचंही आधिसारखं आमच्यात काहीच राहिलं नाही पण आता गौरंगी आली आहे आमच्यात आधीसारखच कसं राहील सगळं?? पण मला तिला थोडा वेळ तरी द्यायला हवा.. ठीक आहे बघूया उद्यापासून.. " मनाशीच विचार करत गौरव झोपून गेला..

आणि पुढच्या दिवसापासून तो गार्गीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला.. पण गार्गी मात्र रुसली असल्यामुळे ती फारसं बोलत नव्हती..

एकेदिवशी अशीच गार्गी गौरांगींला घेऊन खोली बाहेर आली.. तसा गौरव पटकन गौरांगीचा लाड करायला त्यांच्याकडे गेला.. आणि गार्गीच्या हातातून गौरांगीला घेताना त्याचा गार्गीच्या हाताला स्पर्श झाला तेव्हा त्याला गार्गीच्या हाताचा एकदम चटकाच बसला.. गौरांगी खूप रडत होती.. आणि गौरवाने घेतल्यावर शांत झाली कदाचित तिला गार्गीच अंगाचे चटके लागत असावे.. गार्गीला पुन्हा एकदा हात लावून बघितला तर खरच तिला आज खूप ताप भरला होता.. त्याने तिच्याकडे बघितलं तेव्हा गार्गीच चेहरा पार सुकून गेला , डोळे खोलवर गेलवत आणि डोळ्याखाली काळे वर्तुळ आले होते, थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.. तिला अंथरुणातून उठवसही वाटत नव्हतं पण तिची मुलगी रडत होती म्हणून तिला भूक लागली असेल तर तुला दूध करून द्यायला ती कशीबशी उठली होती.. तिची अशी अवस्था बघून गौरवाने तिला विचारलं..

गौरव - काय झालं गार्गी?? तुला खुप ताप भरला आहे.. तुला बरं वाटत नाहीये आणि तू मला सांगितलं पण नाही..

थोडस हसून पण अगदी शांतपणे गार्गी बोलली..

गार्गी - केव्हा सांगु मी तुला गौरव?? तुला वेळ आहे माझ्याकडे बघायला?? असू दे काही काळजी नको करू.. औषध आणि माझा काढा घेतला की लगेच बरी होईल मी..

गौरव - एक मिनिट इकडे बस.. कशाने आला तुला ताप?? काय झालंय?? तू काही ताण घेतलाय का??

गार्गी - ताण.... ते काही नवीन नाही राहिलं माझ्यासाठी.. मी कायमच ताणतणावाखाली जगते आहे.. आणि तापाच म्हणशील तर या वर्षाभरात काही पहिल्यांदा ताप नाही आला मला अधून मधून कितीदा तो मला भेटायला येतो.. तुझं आज लक्ष गेलं एवढंच..

गौरव - अग पण कशाचा ताण घेतलाय?? नोकरीचा का??

गार्गी - नाही नोकरीचाच अस काही नाही, खर तर तुझ्यात झालेला बदल पुरेसा आहे मला तणाव द्यायला.. असू दे.. मला गौरांगीला दूध द्यायचं आहे तिला भूक लागली असेल म्हणून रडत होती ती..

गौरव - एक मिनिट मी आईला सांगतो आई देईल करून तू आराम कर.. मी येतो आईला सांगून..

अस म्हणत तो उठू लागला तोच गार्गीने त्याला थांबवलं आणि..

गार्गी - नाही .. नको.. त्यांना या गोष्टीचा कंटाळा येतो.. मीच करते आणि तसही त्या बरच आवरतात घरातलं.. निदान गौरांगीची काम तरी मी करावी .. असू दे मी ठीक आहे तुला काळजी करायची खरच गरज नाहीय.. तू थोडं लक्ष दे पिल्लुकडे मी आले लगेच तीच दूध घेऊन..

अस सांगून गार्गी दूध बनवायला निघून गेली.. गौरवही गौरांगीशी खेळण्यात रमला.. आणि थोडावेळणी पुन्हा गौरांगीला गार्गीकडे सोपवून तो त्याच्या कामाला लागला.. गार्गीने तिचा काढा घेतला आणि ताप घालवायची गोळी घेतली .. थोडावेळणी तिला बरं वाटू लागलं.. तीला बघून गौरवला वाटलं गार्गी ठिक झाली असेल आणि पुन्हा आज त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं..

बरेच दिवस असेच निघून गेलेत.. गौरव गार्गी आणि गौरांगीकडे झोपत नव्हता पण काम संपल्यावर झोपताना अगदी बेडवर जाईपर्यंत तो त्यांच्या बरोबर वेळ घालवायचा.. आणि आजकाल निदान जेवताना तरी ते सोबत बसायचे.. तेवढा वेळ गौरांगीला तिचे आजी आजोबा सांभाळत असत.. सोबत न झोपण्याच कारण झोपल्यावर त्याच्या घोरण्यामुळे होणाऱ्या आवजाने गौरांगीला झोप लागणार नाही अस त्याने सांगितलं होतं.. आणि गार्गीनेही जशी तुझी इच्छा म्हणून नाईलाजाने ते मान्य केलं होतं..

गौरांगीला आता 2 वर्ष पूर्ण होऊन गेले होते.. गार्गीला मध्ये मध्ये ताप यायचा, डोकं गरगरायचं, कधी कधी डोकं खूप दुखायचं.. पण ती कधीच कुठल्या डॉक्टरकडे तपासायला गेली नाही .. घरगुती उपाय करूनच ती स्वतःला तात्पुरत बरं करून घेत असे.. आजही रात्र झाली की तिची तीच अवस्था होती प्रतिकची आठवण तिच्या मनाला आतून बरेचदा पोखरून काढायची तर अजूनही गौरवच्या सहवासाचा अभाव तिला मनातून आणखी कमकुवत बनवत होता. पण तिची ही मानसिक अवस्था तिने कुणाकडे बोलूनही दाखवली नव्हती तर कुणी समजूनही घेतली नव्हती..

इकडे प्रतिकला एक सरकारी नोकरी मिळाली होती.. गार्गी आणि प्रतीक एकमेकांच्या फारसे संपर्कात नव्हते.. कधीतरी बोलले तरी अगदी जेवढ्याला तेवढच..
गार्गीची एकदा प्रतिकला एकांतात भेटण्याची इच्छा अजूनही मावळली नव्हती.. त्याला भेटून ज्या जुन्या भावनांच ओझं ती मनावर घेऊन फिरतेय ते तिला उतरवायच होतं.. जुन्या भावनांची देवाण घेवाण करून त्यातली बोचणारी सल कमी करायची होती.. पण ते कधीच शक्य झालं नाही..

पुढे काही दिवसांनी प्रतिकचं ही लग्न ठरलं.. त्याने सरळ साखरपुड्याचीच पत्रिका गार्गीला पाठवली.. आधी काहीच माहिती नसल्यामुळे तिला धक्काच बसला.. पण स्वतःला सावरून तिने त्याला अभिनंदनाचा msg केला.. त्याच्या आयुष्याची पुढे वाटचाल होतेय हे बघून गार्गीला आनंद झाला होता पण कुठे काय खुपतय तिलाही कळत नव्हतं... कदाचित लग्न झाल्यावर प्रतीक आपल्याशी बोलणार की नाही हा प्रश्न तिला सतावत होता.

एके दिवशी गौरव घरी आला आणि दारातूनच उतावीळ होऊन गार्गीला हाक मारू लागला.. याआधी तो अस दारातून कधीच ओरडला नव्हता.. गार्गीलाही आश्चर्य वाटलं.. ती लगेच बाहेर आली.. पण तिच्यासोबत त्याचे आई बाबाही आलेत..

गार्गी - अरे गौरव काय झालंय?? एवढ्या जोरात का हाका मारतोय आज..

आई - अरे गौरंगी झोपली आहे घरात .. हळू बोल.. काय झालं??

आईबाबांना बघून मात्र तो शांत झाला पण काहीतरी सांगायचं म्हणून..

गौरव - अग काही नाही ते सहजच बोलावत होतो, माझ्या लक्षातच आलं नाही गौरांगी झोपली असेल ते.. ही बॅग घे ना खूप ओझं झालंय मला..

अस म्हणत त्याने तिच्या हातात त्याची बॅग दिली.. ती खरच जड वाटत होती.. त्यात काय आहे म्हणून गार्गी बघायला गेली तर त्याने लगेच

गौरव - नको आता नाही

अस म्हणून तिला थांबवलं

गौरव - मला पाणी दे ना खूप तहान लागली आहे.. आणि हो फ्रेश होतो लगेच मग आपण जेवायला बसूयात..

ठीक आहे म्हणून गार्गी नि त्याला पाणी दिलं.. आता आईबाबांचं लक्ष नसताना हळूच त्याने गार्गीला विचारलं..

गौरव - आज प्रतीक आला होता का आपल्याकडे??

गार्गी - प्रतीक, नाही तर, तो कसा येईल इथून खूप लांब राहतो तो.. आणि आज अचानक त्याच्या बद्दल कस विचारलं??

गौरव - अग मला आज प्रतीक आपल्या चौकातल्या कॉर्नरच्या बस स्टँडवर दिसला.. म्हणून मला वाटलं की तो घरी आला की काय??

गार्गी - काय?? तो इथे!!! इकडे कशाला आला तो??नक्की तोच होता का?? तू नीट बघितलं?? या भागात तर त्याच कुणी राहत पण नाही..

गौरव - हो ग.. तुला माहिती आहे ना मी एकदा बघितलं की माणसं विसरत नाही.. मला खात्री आहे तोच होता पण जस तू म्हंटलं इकडे त्याच कुणी राहत नाही म्हणूनच मला वाटलं आपल्या घरी आला असावा.. पण आईबाबांसमोर विचारणं बरोबर नसतं वाटलं उगाच त्यांनी 10 प्रश्न केले असते म्हणून तेव्हा शांत राहिलो मी..

गार्गी - हम्म.. अरे तो तिथे दिसला तर मग तु थोडं थांबून त्याच्याशी बोलला का नाही?? घरी आणलं असतं त्याला तुझा मित्र म्हणून..

गौरव - तुला खरच वाटतं का गार्गी तो दिसल्यावर मी न थांबता तसाच निघून येईल? अग मी थांबलो गाडीवरून उतरलो आणि रस्ता पार करणार तेवढ्यातच बस आली आणि तो त्यात चढुन निघून गेला.. मग मी काय करणार होतो.. म्हणून मग सरळ घरी जाऊन तुला विचारावं म्हणून तुला आवाज देत होतो तेव्हा..

गार्गी - अच्छा.. काय माहिती कुठे आणि कुणाकडे आला असेल.. कुणी नवीन मित्र झाला असेल इकडचा कदाचित.. पण मी इकडेच राहते माहिती आहे त्याला.. इतक्या लांब आल्यावर थोडावेळासाठी तरी घरी यायला हवं होतं ना त्याने..

गौरव - हो यायला तर पाहिजेच होतं.. तू त्यालाच का नाही विचारत तो इकडे कुठे आणि कशासाठी आला होता ते..

गार्गी - चालेल आता तर तो निघून गेलाय ना.. उद्या विचारेल.. आता बोलली तर आपल्याला जेवायला उशीर होईल उगाच आणि आई बाबा पण विचारतील कोण आहे वगैरे.. नंतरच बोलेल मी..

गौरव - ठीक आहे..

गार्गी - वाढू का?? जेवायचं आपण??

गौरव - हो चल.. तू वाढ मी आलोच फ्रेश होऊन..

गौरव आला आणि दोघांनी जेवण करुन घेतलं.. नंतर गौरव tv बघण्यात रमला.. आणि गार्गी किचन मधलं सगळं आवरून तिच्या खोलीत जाऊन प्रतिकचा विचार करत बसली..

-------------------------------------------------------

क्रमशः