The real solution ... in Marathi Biography by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | खरं समाधान...

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

खरं समाधान...








खूप दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींना आज भेटणार याची एक वेगळीच उत्सुकता मनाला लागली असतानाच, दुसरीकडे मात्र मी फक्त एक गृहिणी असल्याचं सत्य समोर आलं आणि काही वेळ सोफ्यावर तसेच पडून, विचार करत बसले..... काहीच वेळात मनातल्या त्या विचारांना ब्रेक लावणारा एक आवाज कानावर पडला आणि बघितला तर, कॉल होता माझ्या मैत्रिणीचा.....

मी : "हो बोल ना....☺️"

ती : "निघालीस का.... पीक करू तुला मी?"

मी : "अग कशाला.... येते मीच.... हे काय निघते आहे लगेच"

ती : "अग थांब ग.... कुठे तू ऑटो ने येणार.... मीच येते तुला पीक करायला माझी कारररर घेऊन...😎"

तिच्या कार चे कारररर ऐकून मनात भीती वाटली.... आपण कसं या सगळ्यांना फेस करणार?? पण, मनात एक निश्चय केला आणि रेडी झाले.... वाट बघता - बघता पंधरा मिनिटे झालीत आणि कानावर आवाज आला.... बघितलं तर, समोर तिची कारररर उभी दिसली....😂 तिच्या त्या वाक्याचं मला हसू या साठी आलं कारण, काहीच दिवसांपूर्वी व्हायरल होतं असलेली ती पावरी गर्ल मला आठवली..... ये मैं हुं, ये मेरी कारररर हैं, और यहा पें हमारी पावरी हो रही हैं.....😂 चला निदान हसण्याच्या कामाची तर आहे तिची कारररर.... कारण, मी ऐकलं होतं हिने लग्न फक्त नवऱ्याच्या प्रॉपर्टी साठीच केलं होतं... असो...

मी : "हॅलो निशा..... हाऊ आर यू...☺️"

निशा : "आय एम फाइन बेब्स.... लूक अॅट यू.... हाऊ ओल्ड फॅशन...... नवरा असा शोधला म्हटल्यावर हेच होणार नाही का....😏 चल बस..... खूप डर्टी एरिया आहे तुझा.....😵"

मी काहीच उत्तर न देता बसले.... गाडी सॉरी तिची कारररर एका कॅफे समोर थांबली..... मला उतरायला सांगून ती तिची कारररर पार्क करायला गेली.... मी जाऊन एका बाजूला उभी होते.... मागून एक ओळखीचा आवाज कानावर पडला...

तो : "स्वर्णा..... कशी आहेस...??"

मागे वळून मी काही बोलणार तर, माझं लक्ष गेलं ते त्याच्या त्या नजरेवर.... जी नजर, आज सुद्धा मला तेच सांगत होती जे त्याने मला कधीच सांगण्याचं धाडस केलं नव्हतं....

मी : "मी मस्त तू कसा आहेस?"

तो : "हे काय मी एकदम परफेक्ट....🙂"

तोवर ती तिची कारररर पार्क करून, आमच्यापर्यंत येऊन धडकली आणि आम्हा दोघांच्या मनात धाकधूक होतीच.... ती म्हणजे, आता ही काहीतरी विचित्र बोलणारच.... म्हणून, दोघेही तिच्याकडे घाबरट नजरेने बघू लागलो.... नको होतं पण, ज्यावर पूर्ण विश्वास होता तेच झालं.... ती बोललीच....😏

निशा : "हे लैला - मजनू काय मग....."

तो : "ये तोंड सांभाळ हा.... काहीही काय बोलतेस.... लग्न झालंय तिचं... आणि एक मैत्रीण म्हणून मी तिचा नेहमी आदर करतो... कळतय ना....😠"

निशा : "हो का.... म्हणूनच तू लग्न केलं नाही आता पर्यंत....😏 सो कॉल्ड मजनू...😏"

तो : "तो माझा पर्सनल मॅटर मी बघून घेईल.... निघ आता तू....😠"

मी : "ये जरा गप बसा अरे.... इथे आपण सगळे भेटायला आलोय आणि तुमचं काय चाललंय...😞 निशा तू जा आत..... मी आलेच....."

निशा : "..😏 ब्लडी मिडेल क्लास...."

तो : "निघ आता नाहीतर.....😠"

तो तिच्यावर हात उगारणार की, मी मधात गेले आणि त्याचा हात पकडला....

मी : "रेहान शांत हो... अरे काय करतोय..... कळतय का तुला.... रेहान.....😥"

मी : "निशा गो इन्साईड.... मी येते...."

ती पाय आपटत निघून गेली....

मी : "रेहान हे काय ऐकतेय मी..... तू अजुन लग्न केलं नाहीस...🙄"

रेहान : "तुला त्याच काय.... माझी पर्सनल लाईफ मी बघून घेईल ना..... जेव्हा साथ द्यायची तेव्हा निघून गेलीस आता कशाला विचारते आहेस..... चल मला सिन नाही क्रिएट करायचा इथे.... सगळे वाट बघत असणार..."

तो रागातच तिथून आत निघून गेला.... मी कस सांगणार याला मुलींना प्रेम करणं किती कठीण होऊन बसतं..... जेव्हा तिच्याच घरचे तिला प्रेम करण्याची परवानगी देत नाहीत आणि एका अनोळखी व्यक्तीसोबत तिला आयुष्य घालवण्याचा सल्ला सहज देऊन, स्वतः मोकळे होऊन बसतात... खूप प्रेम करत होते रे रेहान... पण, मी हरले या समाजापुढे....🥺 तू तरी बोलला असतास......😟

जास्त इमोशनल न होता मी सुद्धा आत निघून गेले... सगळे ऑल्मोस्ट आलेच होते..... जाऊन बसले..... सगळ्यांनी एकमेकांना विचारपूस करायला सुरुवात केली.... सगळे काही ना काही सांगत होते मात्र माझ्याच जवळ काही इंटरेस्टिंग नसल्याने मी गप्प होते.....

सगळे त्यांच्या सक्सेस स्टोरी विषयी जितके कॉन्फीडेंट वाटले तितकेच असमाधानी सुद्धा वाटत होते.... कोणी बिझनेसच्या टेन्शन सांगायचं तर कोणी त्यांच्या फॅमिली विषयी..... त्यात कोणीच मला समाधानी दिसत नव्हतं..... माझ्या चेहऱ्यावर मात्र त्यांना वेगळच समाधान झळकत असल्याचं जाणवलं असावं म्हणून, स्वतःच्या फुशारक्या बाजूला ठेऊन, त्यांनी मला महत्व देणं गरजेचं समजलं....

श्रेया : "हे.... स्वर्णा.... बेब्स..... व्हॉट अबाऊट यू....."

मी : "नथिंग....🙂"

श्रेया : "म्हणजे तू कुठल्याच प्रोफेशन मध्ये इन्व्होल्व्ह नाहीस.....🙄"

मी : "नाही....🙂"

निशा : "छोड रे श्रेया..... तू भी किस से पूछ रही हैं...😂"

सगळे तिच्या अशा बोलण्यावर हसू लागले..... मात्र एक व्यक्ती होती जी माझ्या बाजूने नेहमीच असायची.... ती व्यक्ती म्हणजे रेहान....

रेहान : "प्लीज यार... डोन्ट डू धिस..... ती काही उत्तर देत नाही म्हणून तुम्ही तिला अशी वागणूक देणार वाटलं नव्हतं.... ती एक हाऊस वाइफ आहे... आणि हे सांगायला ती लाजत सुद्धा नाही... तिच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतंय ते इथे बसलेल्या करोडोंच्या मालकांच्या सुद्धा चेहऱ्यावर नसेल.... तिला त्याचा मोबदला मिळत नसला तरीही ती सर्व्हिस मात्र प्रेमाने रोज न चुकता देते.... अरे एक एम. बी. ए. स्टूडेंट एखाद्या कंपनीत जाऊन आखून दिले जाईल तितकंच काम करतो पण, ही रोज नव - नवीन प्रयोग करून बघते.... खरी प्रोफेशनल तर ही आहे नाही का....😏 मी तरी कुठल्या माणसांच्या नादी लागतोय..... चल स्वर्णा....."

माझा हात पकडुन आजही तोच रेहान मी अनुभवत होते ज्याने एकदा माझ्या साठी हाणामारी केली होती.... बाहेर एका बाकावर आणून त्याने मला बसवले... स्वतः माझ्या समोर उभा राहून बोलू लागला....

रेहान : "का ग.... तुला कोणीही - काहीही बोलतो आणि तू निमूटपणे ऐकून घेतेस.... नेहमी मी असेल का तुझ्या प्रोटेक्शन साठी....??🤨"

मी : "रेहान तू विसरतो आहेस.... आता मी कोणाची तरी बायको आहे.... आणि हो त्यांना बोलू देत ना काहीही मला माहितीये मी जिथे कुठे आहे समाधानी आहे... अरे तिथे बसलेला प्रत्येक जण काही ना कही टेन्शनमध्ये सतत असतो.... मला तर अभिमान आहे मी एक गृहिणी आहे..... माझ्या नवऱ्याची मी सगळ्यात लाडाची आहे.... हे समाधान एक प्रोफेशनल असून सुद्धा आपण मिळवू शकत नाही.... त्यांना उत्तर देऊन किंवा न देऊन माझं काही होऊ शकतं का.....! मग उगाच वाद करून, आपला अशिक्षितपणा का दाखवून द्यायचा नाही का!"

रेहान : ".. चल मला वाटतं मी जास्तच इंटर फेअर केला..... निघतो मी....."

तो निघाला मात्र माझ्या डोक्यात अजूनही प्रश्न होतेच...... कोण समाधानी...?? मी, जिने घरच्यांच्या इच्छेमुळे कॉम्प्रमाईज करून लग्न केले आणि आता सांगत फिरत आहे की, मी सुखी आहे!... खरंच सुखी आहे की, सुखी असण्याचं नाटक करतेय?🥺?

निशा, जिने लग्न फक्त पैशासाठी केलं आणि आता त्या सुखापासून ती मुकली म्हणून, इतरांच्या इज्जतीचा चिंध्या करत फिरते आहे???

रेहान, ज्याने लग्नच केलं नाही आणि स्वतःला आयुष्यभराची शिक्षा करून घेतोय??

कोण आहे सुखी - समाधानी..... उत्तर मिळालं..... कोणीच नाही.....😟

याच कारण असं आहे की, माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याच्यात प्रत्येक हाव - भाव इनबिल्ट आहेत... ज्यात स्वार्थ, ईर्ष्या, हेवा, जळवणुक, राग इत्यादी दुर्गुण जन्मतः असतातच..... कुठे कमी - कुठे जास्त असू शकतात.... जिथे ते दुर्गुण कमी करण्यावर भर असला तिथं माणूस समाधानी झाला... आणि जिथे दुर्गुण दिवसेंदिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत गेले तिथे समाधान कमी.... नाहीतर आज सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरच्या आणि मोठं - मोठ्या सेलिब्रिटंविषयी आत्महत्येच्या बातम्या वाचायला मिळाल्या नसत्या....😓

म्हणून, जो स्व:सुखी तोच समाधानी.....🙏❣️

सहज विषय..... डोक्याला तान न करून घेता वाचाल ही अपेक्षा.....☺️