Research and Reference in Marathi Thriller by Lekhanwala books and stories PDF | शोध आणि धागेदोरे - (रिसर्च अँड रेफ्रेन्सस)

Featured Books
Categories
Share

शोध आणि धागेदोरे - (रिसर्च अँड रेफ्रेन्सस)

प्रस्तावना

शेवटी एकदाची ही कथा हातावेगळी करत तुमच्यापर्यंत पोचवताना अत्यंत आंनद होतोय, आशा आहे की तुम्हाच्या अपेक्षांना पात्र ठरेल.

तुमचाच लेखनवाला.

lekhanwala@gmail.com

http://lekanwala.home.blog

https://www.facebook.com/LekhanwalaPage/

*******

रेल्वेस्टेशनच्या आवारात तुरळक माणसं, शांत पुहडल्यासारखे दिसणारे रेल्वेचे फलाट. सकाळी अकराची वेळ दाखवणारं रेल्वेकडच्या भिंतीला वरच्या टोकाला टागलेलं ते थोराडं दिसणारं एकमेव घड्याळ, फलाट क्रमांक एकवर ट्रेनची वाट बघणारा 'तो' स्वतः आणि समोरच्या फलाट क्रमांक दोनवर..... तिथे कोणीच प्रवासी गाडीची वाट बघत नव्हता.... फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, त्यांच्या बाजूलाच रंगीबेरंगी पिसाच्या खुळखुळ्यासोबत नुसतंच खेळत असलेलं त्याचं ते निरागस एक-दीड वर्षोंच लेकरू ज्याच्यावर लक्ष ठेवायचं सोडून ते दोघं गाढ झोपी गेले होते, ते लहान बाळ खेळण्यात बेफाम गुंतून गेलं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे!! खेळता खेळता त्या लहान लेकराच्या हातातून आता एकाएकी तो खुळखुळा निसटत फलाटावरुन खाली रेल्वेरुळाच्या बाजूला घरगळत पडला आणि ते निष्पाप पोर लगोलग रेल्वे रुळाच्या दिशेने दुडूदुडू ओणवत ढोपरावर चालू लागलं, आणि समोरच्या फलाटावरून हा सारा प्रकार रेल्वेची वाट पाहत असलेला 'तो' स्वतः पाहत होता, इतक्यात खुळखुळा पडलेल्या फलाटाच्या दिशेने ट्रेन येत असताना दिसली, होत असलेला प्रकार आता उपस्थित असलेल्या तिथल्या तुरळक प्रवाशांच्याही लक्षात आला. सर्वजण जोरदार आवाज देत समोरून त्या जोडप्याला उठवू पाहत होते. अगदी 'तो' देखील बेंबीच्या देठापासून ओरडत होता पण पलीकडून परिणाम शून्य, आता ते मूलं एकदम फलाटाच्या कठड्यावर येऊन थांबलं, त्या लहानग्याला खुळखुळा नजरेस पडला आणि त्याचा चेहरा खुलला. इतक्यात त्याच रुळावरून जाणारी ट्रेन आता रेल्वेस्टेशनच्या आवारात येत असताना दिसली, एकच पर्याय समोर दिसत होता, कुणीतरी त्या लहान मुलाला तिथून दूर करणं!... आता त्या खुळखुळ्यासाठी पुढे होतं तो कोवळा जीव खाली पडणार आणि भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेन खाली सापडणार..... इतक्यात....!!!

*******

नजरेसमोरची दृश्य आता टीव्हीवर दाखवली जात होती, अगदी मागे पुढे सरकवत, एका एका क्षणाचं वर्णन वृत्तनिवेदक अगदी जोश्यात करत होता आणि 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं, आता घरात तो खाटीवर बसून होता, त्याच्या एका बाजूला त्याचा मित्र महेश बसला होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची विधवा आई रेवती बसली होती. घर म्हणालं तर विरारच्या सेवा नगर मधली बैठ्या चाळीतलं, दहा बाय दहाच्या मानवी खुराड्यातलं. सदानंदची विचारपूस करायला आलेला त्याचा मित्र आता जाण्यासाठी निघाला होता, "चल सदानंद, मी निघतो....भाऊंचा फोन येतोय.... एरियात रक्तदानाचं महाशिबीर भरवतोय, आपल्या भाऊच्या नावाने......नगरसेवक..... वाढदिवस आहे ना परवा....फुल जय्यत तयारी करायची....तब्येतीची काळजी घे...चला काकी मी निघतो...." , "अरे ते रक्तदानाचं ब्लडबँक वाले बघून घेतील तू भाऊंच्या बॅनरच्या फोटोच्या साईजकडे लक्ष दे" मित्र त्याला आलेला फोन उचलत पलीकडल्या माणसांशी बोलता बोलता निघून जातो. मित्र जाताच झालेल्या शांततेने आधीच दुःखात असलेला सदानंद प्रचंड हिरमुसून गेला होता, त्याने एक नजर त्याच्या प्लास्टर लावलेल्या हातावर फिरवली, आणि मग आईकडे बघितलं. आई त्याच्याकडे रागाने पाहत रडवेल्या स्वरात म्हणाली "काय गरज होती असा स्वतःचा जीव धोक्यात टाकायची, उद्या काही बर वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं याचा तरी विचार करायचा होतास... आता तुझ्याशिवाय मला उरलयं तरी कोण?"

*******

सदानंद. शहराने वाटून दिलेल्या, स्वतःच्या वाटेला आलेल्या परिघातच त्याला त्याच आयुष्य जगायचं नव्हतं, त्याला रोजच्या रहाटगाड्यातून निसटायचं होतं. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या या मायानगरीत सकाळची नऊ पाचची फास्ट लोकल पकडणं, त्याच डब्यातली तीच लोकं.....तीच मजाक मस्ती...तीच गर्दीने भरलेली ट्रेन.... विरार वरून निघायचं आणि चर्चगेटला पोचायचं...... दोन तास यायला आणि दोन तास जायला....रेल्वे स्थानकात ट्रेन आली की होणारी चेंगराचेंगरी... माणसांचा पाठमोरा दबाव....सकाळच्या चांगल्या प्रसन्न मूडची वाट लावून टाकत होता..... तेच ऑफिस.... अंकाऊट असिस्टंटचा जॉब करून घरी येणे....याने सदानंद खूप बोर झाला होता....त्याला एक आशा होती जी त्याला या बजबजपुरीतून बाहेर काढू शकेल, त्याला विश्वास होता, त्या विश्वासाची चमक अजूनही लखलखत होती...पण ती आता दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघाताने विझताना दिसत होती....त्याला लेखक व्हायचं होतं.... असा लेखक ज्यांच्या कथा कांदब-यांची चर्चा होईल, खूप सारा खप होईल..... थोडक्यात त्याला प्रसिद्ध लेखक व्हायचं होतं.....

प्रसिद्ध तर तो मागच्या दोन दिवसापासून झालाच होता, प्रत्येक न्यूज चॅनल वर त्याचंच तर नाव आणि चेहरा दाखवला जात होता पण कारण मात्र वेगळं होतं. आता त्याच्या घरी शेजार-पाजा-यांची, ओळखीच्यांची, नातेवाईकांची आणि मित्रांची उठबस दोन दिवसापासून वाढली होती ती आता काहीशी ओसरत आली होती. रात्रीचे दहा वाजले होते, सदानंद खाटेवर झोपला होता, आईने सदानंदच्या अंगावर असलेली चादर पायाच्या बाजूने नीट सरकवत म्हणाली "येईल सुदेश उद्या, झोप आता", ती ही आता खाली जमिनीवर अंथरलेल्या चटईवर झोपी गेली, सदानंदची एक नजर आता रात्रीच्या शांततेला तोडण्याऱ्या डोक्यावरच्या पंख्याकडे गेली, त्याला झोप अशी लागतच नव्हती, सतत काहीना काही विचार मनात घोघावतच होते. तशीच एक नजर खाली चटईवर झोपलेल्या आईकडे गेली, बहुतेक तिला झोप लागली होती. त्यांच्या डोळ्यात एकाएकी आसवं जमा झाली होती, ती पुसण्यासाठी तो गालावर हात फिरवणार इतक्यात त्याला हाताला प्लॅस्टर लावल्याची जाणीव झाली. झोपेसाठीच्या पुहडलेल्या अवस्थेततच तो जड झालेला हात सावरत होता, त्यांची ती फिरती नजर समोरच्या टेबलावर त्याने परवापर्यत हाताने लिहिलेल्या कागदावर गेली, जी हटायचं नावच घेत नव्हती. त्याला मनातल्या मनात आठवत होती चार महिन्यापूर्वीची ती घटना.....

*******

चार महिन्यापूर्वी,

रोजच्या सारखा फास्ट लोकलच्या डब्यात मजा-मस्करी करत असलेले चेहरे, सदानंदची जी काही दिवसाची सुरवात व्हायची ती या लोकांसोबतच...... राकेशबावा जो एक सेल्समॅन होता.... शंकरकाका जे एका फॅक्टरीत वर्कर होते.... त्यांच्या पुढच्या स्टेशनवर डब्यात येणारे रहीमचाचा, आपल्या डोक्यावरचा चष्मा नीट करत हातातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचणारा सुशांत त्रिवेदी.... आणि अंपग असूनही जनरल डब्यातून प्रवास करणारा दशरथ.... ज्यांची थट्टा मस्करी.... खेचण्यात...सगळ्याच्या तोंडून हसू फुटायचं.... दशरथ माणूसच तसा होता....दशरथलाही या सगळ्याची सवय झाली होती.... आणि ट्रेनच्या दरवाज्यापाशी प्रवास करणारे सदानंदच्याच वयाचे सडाफटिंग तरुण पोरं .... हेच जग होतं त्याच.....खरं म्हणजे त्याला असं दरवाज्याच्या कडेला उभे राहत प्रवास करणे म्हणजे मरणाच्या दारात उभा असल्यासारखं वाटायचं.....पण आता तो या सगळ्या माहौलाशी जुळुन गेला होता.....त्याला आता सवय झाली होती.....तो नेहमी दुःखीच असायचा....सदानंद डब्यातल्या सगळ्या या मजा मस्तीच्या वातावरणामध्ये गप्प राहत सगळ्याचं बोलणं ऐकायचा ....बघायचा आणि अनुभवायचा..... कोणी विचारलं तर हो किंवा नाही यामध्येच उत्तर द्यायचा, डब्यातल्या बाकी लोकांना त्यांच्या या सवयीबद्दल माहिती होतं, जास्तीत जास्त कधीकधी त्याचं रहीमचाच्याबरोबर थोडंफार बोलणं व्हायचं... कारण काय तर ते सुदधा यांच्यासारखे देव न मानणारे होते…. त्याच्या या घुम्या स्वभावामुळे कधीकधी त्याच्यावरही विनोद व्हायचे... तसं बघायला गेलं तर त्याचा कोणताही परिणाम सदानंदवर होत नव्हता, त्याला वाटायचं तो एकटाच आहे, विनाकारण आहे, बाकी लोकांच्या हसण्या-खिदळण्यामध्ये त्याला त्या लोकांच्या जगण्याचं कारण, हेतू, ध्येय सगळं दिसायचं... नाहीतर कधी कधी काही-काही लोक त्याला ठार वेडे वाटायचे... कोणतेही कारण नसताना...विनाकारण...मेलेल्या मुडद्यासारखे जगत असलेले... तो लोकांच्या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐके आणि कानांमध्ये साठवून आपल्या कोणत्यातरी कथेतल्या पात्रात उतरवत असे, आणि त्याच्या मनात चाललेल्या या द्वंद्वामुळेच लोकांना तो शांत वाटायचा.... पात्राच्या शोधाचा प्रवास नुसता ट्रेनच्या डब्यातच नाही तर ऑफीस, घर, गल्ली, रस्ते, जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी.... प्रत्येकवेळी....तो करत असे. तो नोकरी जरूर करत होता पण त्याच्या आतली अंतस्थ प्रेरणा तर काहीतरी वेगळेच सांगत होती त्याला लेखक बनायचं होतं, प्रसिद्ध लेखक… ज्याच्या नावाची.... पुस्तकांची..... दूर दूर पर्यंत चर्चा होईल..... कमीत कमी इतका पैसा यावा की विधवा आईच्या रोजच्या जास्तीच्या पैसे कमावण्याच्या कटकटी पासून सुटका व्हावी.... त्यांने प्रयत्न सुद्धा केले होते एकदा नाही दोनदा....पण त्यांनी लिहिल्या कादंबऱ्या काही विशेष कमाल दाखवू शकल्या नव्हत्या.

आणि आज तो जसा रेल्वेच्या डब्यात शिरला तसा त्याला सुशांतच्या समोरची सीट भेटली, सुशांत नेहमीसारखाच वर्तमानपत्रातल्या बातम्या लोकांना वाचून दाखवण्यात मश्गूल होता की एकाकी सदानंदची नजर वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानाच्या कोपऱ्यात छापलेल्या जाहिरातीकडे गेली. शहरातल्या प्रसिद्ध परमार प्रकाशनाने आपल्या पन्नासाव्या वर्षातल्या पदार्पणाच्या निमित्ताने नवोदित लेखकांसाठी कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती, जी पस्तीस वयाच्या आतील कोणत्याही एक कादंबरी प्रकाशित झालेल्या लेखकांसाठी होती, वयाची तर अट सहजच नियमात बसत होती आणि कादंबऱ्या म्हणाल तर सदानंदच्या दोन-दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. आणि बक्षिसाच्या स्वरूपात वीस लाख रुपये आणि कुटुंबासोबत भारतातल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी. नाव नोंदणीसाठी आठवडयानंतरच्या सोमवारी परमार भवनला जाणं आवश्यक होतं म्हणजे दोन दिवसानंतर, कथेचा प्रकार आणि स्वरूप यासंबंधीची माहिती तिथे गेल्यावरच कळणार होती. सदानंदने हे सगळं एका दमातच वाचून काढलं... आणि .... आणि त्याच्या हृदयाची धडधड अधिकच वाढू लागली. तो कितीतरी दिवसापासून अशाच संधीच्या शोधात होता. त्याच्या डोळ्यासमोर वीस लाख रुपये तरळू लागले. त्याने ते वर्तमानपत्र सुशांतच्या हातातून हिसकावून घेत, त्यातली ती जाहिरात पुन्हा पुन्हा वाचू लागला. वाचून वाचून एकदाच मन भरल्यावर त्याने पेपर परत केला, त्याला आतून आज कितीतरी दिवसानंतर बरं वाटत होतं, पॉझिटिव्ह म्हणतात ना तसलं काहीतरी..... आज त्याला वाटत होत की तो खरचं श्वास घेतोय, तो जगतोय.... आज तो दशरथवर होणाऱ्या प्रत्येक विनोदावर.... त्याच्या टेर खेचण्यावर हसत होता.....

कथालेखनावर फोकस करण्यासाठी सोशल मिडिया आणि मित्र परिवारापासून दूर राहण्याविषयी मनातल्या मनात ठरवुनही टाकलं.... नाही.... त्याने सोशल मिडिया अंकाऊटस डिलीटसुध्दा केली. आदल्या दिवशी त्याला नीटशी झोपही लागलेली नव्हती.... का तर दुसऱ्या दिवशी त्याला परमार भवनला जे जायच होतं. अशी कथा लिहिणं की दुनिया विचार करत राहिलं..... आणि एकदा का जिंकलो की हे रोजच मरत जगणं तर बंद होईल. मागच्या दोन दिवसापासून त्याचं मन असं कश्यात लागतच नव्हतं कधी एकदा परमार भवनला जातो आणि कथेचा विषय माहित पडतोय..... आणि त्यावर लिहायला घेतो.... त्यांच्या आतल्या आत बुलबुल तरंग वाजायला लागला होता... खूपशी उत्सुकता दाटून राहिली होती....

एकदाचा परमार भवनला जायचा दिवस उजाडला....

परमार भवनमध्ये सदानंदच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते, त्यामुळे तो थोडासा दुःखी झाला, काय माहित प्रत्येकजण त्याच्यासारखाच वीस लाखाच्या हव्यासापोटी आला असेल, तिथे आता लेखकांच्या आधी लिहिलेल्या कादंबरीची नोंद करून त्यांना आतल्या पायऱ्या चढून एका छोटेखानी सुंदर हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. सदानंद एकदम मागच्या बाजूला बसला कारण बाकी लोकांना आणि आजूबाजूच्या घडामोडीचा अंदाज घ्यायला बरं पडतं म्हणून. इतक्यात त्याच्या बाजूच्या खुर्चीशेजारी अजून एकजण येऊन बसला, तो ही लेखक असावा बहुतेक, कार्यक्रम सुरू व्हायला अजून वेळ होता. तिथे आजूबाजूला बसलेल्या लोकांमध्ये आता गप्पागोष्टी सुरु झाल्या, त्या बाजूवाल्या माणसाने सदानंदने विचारलं "तुम्हाला वाटतं, की हे वीस लाख देतील". सदानंदच्या मनात पण हाच विचार घोघावत होता. "काही कल्पना नाही" सदानंदने विषय न वाढवण्याच्या हेतूने म्हटलं. त्याला या हॉलमधला प्रत्येक माणूस त्यांचा दुश्मनच वाटत होता, पुन्हा त्या माणसाने बोलणं चालू ठेवण्याच्या हिशोबाने म्हटलं " मी असं ऐकलयं की जिकंणा-या कथेचा वापर सिनेमा बनवण्यासाठी होणार आहे, अर्धी रक्कम ते फिल्म प्रोड्युसर स्पॉनसर करतायत, नाहीतर नुसत्या परमार प्रकाशनची स्वतःची ऐपत कुठे ?", हे चित्रपटाविषयीचं बोलणं ऐकून त्यांच्या मनात अधिकचे लाडू फुटत होते, फ्लिमच्या पोस्टरवर लिहिलेलं असणारं " लेखक सदानंद सोहकर" सदानंदच तुटकतुटक बोलणं समोरच्या माणसाला खायला उठत होतं, त्या माणसाने बोलणं पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने अजून एक प्रश्न विचारलाच "तुम्हाला भीती नाही वाटत की तुम्ही लिहिलेली गोष्ट कोणीतरी चोरेल आणि स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल".

सदानंद आता उत्सुकतेने म्हणा नाहीतर नाईलाजाने काही बोलणार इतक्यात स्टेजवर रणजीत परमार येत असल्याचं सांगितलं गेलं, सगळं वातावरण गंभीर होऊन गेलं. "नमस्कार, गुड आफ्टरनून, सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली रुची प्रकट केली, आम्ही तुम्हाला संधी देत आहोत कथा लिहून वीस लाखाचे हक्कदार होण्याचे, त्यासोबत भारतातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना कुटुंबासोबत भेट देण्याची... मला अविवाहिताबद्दल दुःख वाटतयं....गंमत केली… तुम्ही तुमच्यासोबत कोणाही चार व्यक्तीनां घेऊन जाऊ शकता…”

या बोलण्याने वातावरण हलकफुलक झालं होतं, रणजीत यांच बोलणं चालूच होतं,

“कदाचित तुम्ही लिहिलेल्या कथानकावर सिनेमा ही बनू शकतो, तुम्हाला ठाऊकच असेल परमार पब्लिकेशन एकेकाळी त्यांच्या रहस्य कथांसाठी खूपच लोकप्रिय होतं, म्हणून पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने आम्हाला इथपर्यंत वाटचालीत साथ देणाऱ्या वाचकांना पुन्हा एकदा त्याचं कथाप्रकाराशी जुळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे..... काय असते रहस्य? जे उराशी बाळगून आपण एका वेगळ्या चेहऱ्याने जगत असतो, आणि ते समोर आल्यानंतर प्रत्येकांचा दृष्टिकोन बदलून जातो, भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलतो, माणूस एकदा वरच्या पदावर गेला की त्याच्या छोट्यातल्या छोट्या रहस्यालाही फार मोठी किंमत येते” वयाची पन्नाशी पार केलेला हा माणूस मोठया उत्साहाने बोलत होता.

रणजीत यांच्या धीरगंभीर आवाजाला सगळी आलेली कथालेखक मंडळी कान देऊन ऐकत असताना पाठीमागून कोणीतरी सदानंदला टोकत एक पेपरकार्ड हातात दिलं. सदानंदने पेपरकार्डवर नजर टाकली, पेपरकार्ड वर लिहिलेलं सगळं काही मोठ्या पडद्यावरही दाखवलं जात होतं.

रणजित परमार बोलत होते, आता तुमच्या हातात जे पेपरकार्ड दिलं जातयं तेच मुददे इथे समोरही मांडले आहेत ते पुढीलप्रमाणे, यांतला मराठीत लिहिलेला भाग हा कथानकासांठी महत्तवाचा आहे.

“Retain (Countine to hold)- कथा खिळवून ठेवणारी हवी.

Enroot (on the way)- कथेतील रहस्य भूतकाळातल्या कोणत्यातरी घटनेशी जोडलेलं असायला हवं.

Search ( For solutions)- रहस्याचा शोध कसल्यातरी समस्येच्या समाधानासाठी असायला हवा.

Engima ( something that quite difficult to understand/mystery)-काहीतरी वेगळं, सामान्यतेच्या पलीकडलं.

Articulate (To express something clearly)- योग्यप्रकारे तंतोतंत स्पष्टपणे कथा उपकथानकाशी जोडलेली हवी.

Res gestae (all the facts so connected with the facts in an issue so as to introduce it. Explain its nature, or form connection with it as to form one countional transaction- बंदिस्त असलेल्या कथानकातील एक असा पैलू जिथून कथा रहस्य उलगडायला सुरुवात होईल.

Countigency (Something that is done in view of any possible future incidence) - अशी एखादी गोष्ट भविष्यात होऊ शकते किंवा नाही.

Herald ( Announce the approach of something) शेवटी काहीतरी उद्घोषणा व्हावी जी रिसर्चच्या परिणामातून आली असेल.

आणि तुम्ही लक्षपूर्वक पहाल प्रत्येक इंग्रजी शब्दाच्या पहिल्या अक्षराला जोडलं तर Research हा शब्द तयार होतो, म्हणजेच कथा कोणत्यातरी रिसर्चवर आधारित असायला हवी.

खरं म्हणजे मी माझ्या सहकाऱ्यांना कथानकासाठी थीम बनवण्यासाठी सांगितलं होतं, पण त्यांना ते काही शक्य झालं नाही, म्हणजे त्यांनी प्रयत्न केले पण मला काही ते रुचले नाही, म्हणून मग मी माझ्या मुलाच्या एमबीएच्या पुस्तकातला एक पॅरेग्राफ कथानकाच्या थीमसाठी निवडला जो भाग इंग्रजीत लिहिलेला आहे, आम्हाला तर वेगळे काही सांगायची गरज नाही या दिलेल्या सगळ्या पॉईंटना ध्यानात धरून एक रहस्यकथा लिहायचीय, जी लिहिण्यासाठी केवळ चार महिन्याचीच मुदत आहे, तर लवकरात लवकर तुम्ही लिहलेली कथा आमच्या वेबसाईटवर अपलोड करा, बाकी नियम व अटी तुम्हाला तिथे देखील सापडतील, आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा अडचणी आल्या तर आमच्या ईमेल आणि सोशल मीडिया पेजला संपर्क करू शकता.... आणि…हो सगळ्यात महत्तवाचं…. कथेमध्ये खून होणे गरजेचे आहे... रहस्यासोबत.....”

या शेवटच्या वाक्याने सगळ्या हॉलमध्ये हलकसं का होईना हास्य पसरलं. पेपर कार्ड दिल्यावर ते वाचण्याच्या उत्सुकतेत गंभीर झालेलं वातावरण आता चुळबुळ वाढत जाऊन एकदमच बडबड सुरु झाली, पेपरकार्डवर लिहिलेले पॉईंट वाचल्यानंतर पाहिल्यानंतर सदानंद काहीसा गंभीर झाला होता, आता त्याला वीस लाखाच्या ईनामाची खरी किंमत कळाली होती. पण त्याच्या बाजूला बसलेल्या मघ्याच्याच इसमाच्या चेहऱ्यावर काही एक फरक जाणवत नव्हता, यावेळी मात्र सदानंदने त्याला प्रश्न विचारला, "तुम्हाला वाटत का की तुम्ही लिहू शकाल?" त्याच्या बाजूला बसलेला इसम हसत म्हणाला "काहीएक सांगता येत नाही, प्रयत्न तर नक्की करेन, पण तुम्ही माझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं", सदानंद लगेच म्हणाला "कोणत्या प्रश्नाचं?", "हीच की तुम्ही लिहिलेली कथा कोणी चोरली आणि स्वत:च्या नावाने प्रसिद्ध केली तर" त्यावर त्वरेने सदानंद म्हणाला “अजिबात नाही मी माझ्या कथा आजही हातानेच कागदावर लिहितो”, तो बाजूवाला माणूस आश्चर्याने म्हणाला " वा हाताने, आजच्या इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये, पण का?" सदानंद आत्मविश्वासाने म्हणाला " माझ्या मेंदूतील विचार थेट पेनातून कागदावर उतरतात, कागदावर लिहिण्याची मजाच काही वेगळी असते". त्या माणसाने पुन्हा एकदा कोड घातल्यासारखा प्रश्न विचारत म्हणाला "हा मी पण सुरुवातीला कागदावरच लिहायचो पण आता लॅपटॉपची सवय झालीय, समजा तुम्ही लिहिलेले कागदच कुणी चोरून नेले तर" " हे शक्य नाही, कारण माझं कागदावर लिहिलेलं अक्षर फक्त मलाच कळत" सदानंद हसत खुर्चीतून उठत म्हणाला. हॉलच्या बाहेर येत सदानंदने त्या इसमाशी हस्तांदोलन करत एकमेकांचा निरोप घेतला.

*******

पण आता ती वेळ येऊन ठेपली होती, सदानंदने लिहिलेली कथा अजून कागदावरच समेटून राहिली होती, तिला आता लॅपटॉपवर उतरवणार त्या अगोदरच तो असा अस्वस्थ होत पंलगावर पुहडला होता, स्वतःशीच तुटल्यासारखा ..... आणि आता फक्त चार दिवस राहिले होते कथा ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, कथा सुचून तिला प्रत्यक्ष कागदावर उतरवण्यातच बराच वेळ गेला होता, पण त्याला विश्वास होता की त्याने लिहिलेल्या कथेने त्याचं आयुष्य बदलू शकत, अपघाताने झालेल्या अवस्थेमुळे ना तो स्वतः टाईप करु शकत होता आणि फक्त सदानंदलाच कळणा-या हस्ताक्षरामुळे दुसरा कोणी एक-एकटाच टाईप देखील करु शकत नव्हता. सदानंदला अश्या एका माणसांची गरज होती जो कथा लिहिलेले कागद सदानंदने वाचल्यावर भराभर टाईप करेल आणि प्रूफ रिंडिगसुदधा म्हणजेच व्याकरण, अक्षरजुळवण आणि शुध्दलेखन तपासेल… हा एक व्यक्ती होती त्यांच्या ओळखीतली… त्यांच्या चांगल्या टाईपिग स्पीडच्या जोरावर चार दिवसांच्या आत कथा आनलाईन सबमिट केली जाऊ शकत होती, त्यांच्या मागच्या दोन कांदबरीच्या वेळी प्रूफरिडिंग करणारा इसम…

त्यांच्या आईला रेवतीला माहित नसायचं की सदानंद इतक रात्रीचं काय लिहित असतो, आईला वाटायचं की हा काही ऑफिसचं काम करत असेल, तसा त्यांच्या आईला वेळ तरी कुठे होता हे सगळं बघत बसायला, ती सुदधा कामाला जात होती, सदानंदने मागच्या दोन कांदब-या प्रकाशित झाल्याबदल कधीही आईला सांगितलच नव्हतं, एकतर तिला या जगाबददल काही माहित नव्हतं आणि कळतंदेखील नव्हतं, आणि सदानंदला सागावं अशी गरजही वाटली नव्हती, आणि आताही त्याने आईला काहीएक सांगितलं नव्हतं.

*******

तो हॉस्पिटलवरुन आल्यानंतर खाटेवर तसाच पुहडलेला असताना, मोबाईलवरुन कुणालातरी फोन करण्याचा त्याच झोपलेल्या अवस्थेतत हात जवळ नेत प्रयत्न करत होता, पण त्यांच्याने ते काही केल्या होत नव्हतं, हे सगळं पाहत असलेली त्यांची आई तावातावाने म्हणाली, “हे काय करतोयस, डोक्याला जखम झालीय माहित आहे ना, सांग कुणाला कॉल करायचायं, डॉक्टरने सांगितलयं जास्त शरीराची हालचाल ठीक नाहीय…” मग त्याला अधिकचा त्रास जाणवायला लागला आणि त्याने आईला सांगितलं. “प्लीज हा नंबर ट्राय कर मी दोन-तीनवेळा केला पण उचलत नाहीयं”. “काय सांगायचं?” आई लगेच म्हणाली, “सांग की एकशे वीस पान टाईप आणि प्रूफरिंडिग करायचीय, नेहमीपेक्षा जास्त पैसे घेतले तरी हरकत नाही पण घरी येऊन काम करावं लागेल”, “ठीक आहे, आता ही गोळी घे आणि निंवात झोप, काही एक टेशंन घेऊ नकोस, कसलं आफीसचं काम आहे काय?”

“हा आफीसचचं काम आहे”

“बरं बरं.. आता मी करते ट्राय नंबर… तू झोप…तुला जराही कशी काळजी नाही वाटली की मी तुझ्याशिवाय कशी जगू शकेन…” सदानंदच्या आईचं पालुपदं चालूच होतं.

तिला तिच्या रोजच्या रामरगाडयातून वेळ काढत सदानंदच्या लिखाणाकडे पाहत ‘हे काय आहे हे म्हणणासं’ ही फुरसत नसे, तिचं शिक्षण म्हणाल तर होत दहावी पास, पुढे शिकावसं वाटत होतं पण लग्न आणि बाकी संसार फार लवकरच आयुष्यात आला आणि बाकी गोष्टी मागे पडल्या, आणि आता तिला असं काही असतं यांची कल्पनाही राहिली नव्हती आणि या अश्या कथा-कांदब-याविषयी आपुलकी वाटण्यासाठी एक आतून असावी लागणारी उर्मी ही तशी रेवतीमध्ये नव्हती. ती या सा-या प्रकाराबददलच अनभिज्ञच होती.

सदानंद झोपेचा प्रयत्न करत होता पण झोप अशी काही लागतच नव्हती, त्यांच्या डोळ्यासमोर काही दिवसापूर्वीचा प्रंसग आठवू लागला, त्यातही तो विचारच करत होता.

त्याची आई जमिनीवर पसरलेल्या अंथरुणावर झोपली होती, सदानंदने गौतम बुद्धाच्या आयुष्यावरच "बोधिसत्व" नावाचं पुस्तक संपवलं आणि प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक Dr Micho Kaku यांची The Concept of Impossibility नावाची व्हिडिओ बघत होता, तो विचार करत होता आणि लगोलग विचाराची तंद्री देखील लागत होती, सदानंदच्या मनाचा एक हिस्सा त्यांच्याशी बोलत होता.

ती सदानंदच्या शरीराची काळी आकृती बोलत होती, "का जगत आहे मी असं जीवन, जेव्हा ते एकदाच जगायला मिळत, या विशाल ब्रम्हांडाच्या एका कस्पटासमान असलेल्या या मानवी शरीरासोबत का असाचं शेवट तुला पसंद आहे, जे पाहिजे ते कर, सोड ती नोकरी, रोजचं ते ट्रेनने येणं-जाणं, धक्के खात जगणं, चल बाहेर पड यातून,

हे तू कोणत्या तुरुंगात स्वतःला अडकवून घेतलयस, सडवून घेत चालयास तू, सकाळपासून रात्रीपर्यंत जगण्यासाठीच्या रहाटगाड्याला जुंपण सोडून दे, तू हे सर्व काही करण्यासाठी नाही बनल्यास, तुझ्या आयुष्याची ध्येय इतकी सामान्य आणि तकलादू असूच शकत नाहीत, ते आकाशातले ग्रह- तारे बघ, आणि बघ किती तकलादू आहे तुझं आयुष्य.... तुझ्या पेक्षा तो राजा सिद्धार्थ बरा होता जो गौतम बनून दुःखाचं कारण शोधण्यासाठी राजसंसाराचा त्याग करून निघाला, काय विचार करत बसला आहेस, बघ तो वैज्ञानिक काय सांगतोय जे उघड्या डोळ्याने बघतोयस तेच अंतिम सत्य, नैतिकतेचा आचार-विचार नाहीय, ती केवळ आपण बनवलेली एक व्यवस्था आहे, तोड त्या सगळ्या बंधनांना, जग कोणाचीही पर्वा न केल्याशिवाय चाललयं” विचार करून करून सदानंदच डोकं गरगरायला लागलं. आणि एकदाची त्याची विचार शृंखला तुटली.

त्याची आई अंथरुणावर तशीच पडल्या पडल्या म्हणत होती "लाईटीच बिल आलंय सांगायलाच विसरले, उद्या कामावरून येताना भरून टाक.

*********

सदानंदने आईची मदत घेत जास्तीचे पैसे देण्याची, घरी येत कथा टाईप आणि प्रूफरिडिंग करण्यासाठी त्याला राजी केलाच, सुदेश कानोजिया... प्रूफरिडर आणि टाईपींग मास्टर... वयाची तिशी पार केलेल्या या माणसाला पैशाशिवाय दुसरं काहीच दिसत नसे. स्वतःची नोकरी सांभाळत सतत बाहेरची काम करत राहत पैसे जमवणं सुरू असायचं. सुदेशच्या घरी त्याचं येणं-जाणं असायचं… त्यामुळे सदानंदची आई रेवती त्याला ओळखत होती…

इतका रात्रभर विचार करुन देखील पण सदानंद सकाळी पाच वाजताच उठून तयार झाला होता. सुदेश घरात आला, सदानंदला असा खाटेवर बसलेला पाहून त्याच्या हाताला लावलेल्या प्लॅस्टरकडे पाहत म्हणाला, "ही काय हालत करून घेतलीयस सदानंद?" सुदेश सकाळी सात वाजताच लॅपटॉप घेऊन आला होता. आई त्यावर सदानंदकडे पाहत फणका-याने म्हणाली "जसं काही तुला काही माहितीच नाही? टी.व्ही…..पेपर… नाही बघितला का? दोन दिवसांपासून” पुन्हा सदानंदकडे पाहत सुदेश म्हणाला "हे काय डाव्या हाताला प्लॅस्टर, अक्सिस्टड झालं का? आईचा राग गेलाच नव्हता "मोठी लढाई जिकूंन आलायं ना!, रेल्वे स्टेशवर कोणा भिकाराच्या मुलाला वाचवलं याने, तो पण स्वतःचा जीव धोक्यात टाकून, काय गरज होती असं करायची, कमीत कमी घरी आपली एक विधवा आई आहे यांचा तरी विचार केला असतास, तुझा जीव गेला असता तर माझं एकटीच काय झालं असतं? हे तू पण बघ” तिने टी.व्हीचा रिमोट हातात घेतला होता, आईचा चेहरा रडवेला झाला होता आणि आता तिचे डोळेसुदधा पाणावले होते, आई आता टी.व्ही चालू करणार इतक्यात सदानंदने खूणेने तिला रोखलं.

“अच्छा तो तू होतास होय, ज्याने रेल्वेस्टेशनला भिका-याच्या मुलाला वाचवलं, मी पण ऐकलं लोकांकडून, आजकाल मी काय न्यूज बघत ही नाही आणि वाचतदेखील नाही, टाईमचं कुठे असतो? आणि वरुन हे न्यूज वाचून आपलं पोट थोडी भरणार आहे” सुदेश लॅपटॉप चालू करत म्हणाला.

तितक्यात आई म्हणाली “मला एक कळत नाही की तू गेलाच का होतास रेल्वेस्टेशनला? ते ही सुटटीच्या दिवशी” ती मग तावातावाने आत चहा बनवण्यासाठी गेली.

“मग सदानंद काय टाईप करायचयं, पैशाच्या गोष्टी ऑलरेडी क्लिअर झाल्यात, मी एक पैसा कमी घेणार नाही” सुदेश लॅपटॉपमधली नजर आता सदानंदच्या दिशेने रोखत म्हणाला.

संदानने ठीक आहे म्हणत, समोरच्या टेबलावरचे पेपर दयायला सांगितले. ते कथा लिहून ठेवलेले पेपर होते, सुदेश एका हाताने लॅपटॉप सावरत ते पेपर सदानंदला देत असता एकाएकी ते पेपर खाली जमिनीवर पडले.

“संभाळून” सदानंद जागच्या जागी बसूनच उठायची उत्सुकता दाखवत पण पुन्हा एकदा हाताला लागलेला मार आणि प्लॅस्टर लागल्याची जाणीव होत हतबल होत म्हणाला. मग सुदेशने लॅपटॉप आपल्या मांडीवरुन समोरच्या खाटेवर ठेवला आणि तो ते जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले सगळे पेपर जमा करु लागला, तितक्यात सदानंद काहीसा नाराज होत म्हणाला “अरे यावर नंबरदेखील टाकले नव्हते, आता ते सगळेच पेपर एकमेंकात मिक्स झाले असतील”

“त्याला काय होतेय, टाईप तर करायचं ना! आणि काय बरं लिहिलयं यामध्ये” सगळे पेपर जमा करत ते एकत्र करत एकसमान करण्यासाठी समोर भिंतीवर तो गठठा हाताने ठोकू लागला.

“काही नाही कथा लिहिलीयं, मी वाचतो तू टाईप करत जा, काही प्रूफरिंडिगवाला प्रॉब्लम असेल तर त्याचवेळी सोडवून टाकू, फक्त तीन दिवसात कथा आनलाईन सबमिट करायचीय” सदानंद आता खाटेवर टेकू शोधत मांडी घालून बसत म्हणाला.

“तीन कशाला दोन दिवसात करुन टाकू, मला ही आज-उदयाच सुटटी आहे, शनिवार-रविवार…. लॅपटॉप माझाच यूझ करु, मला यांच्यावरच सवय आहे, ठीक आहे ना!” तितक्यात सुदेशने बोलणं चालू असताना लॅपटॉपवर कथा टाईप करण्यासाठीचं सॉफ्टवेअर उघडलं.

“ही चाय घे सुदेश, नाश्ता-जेवण करुन घ्या…. सदानंद… डाव्या हाताने त्रास होईल थोडा पण सगळं संपव…सुदेश आहेस ना दिवसभर इथे…” जेवढे काही संदेश दयायचे होते ते एका दमात देत सदानंदची आई कामाला निघून गेली. सदानंदची आई रेवती एका खाजगी इस्पितळात रुग्णसेविका म्हणून काम करत होती, ती आता थेट संध्याकाळी घरी येणारं होती.

आता तिथे गठठा करुन ठेवलेल्या कागदामधला सगळ्यात वरचा कागद हातात घेत सदानंद म्हणाला “कथा टाईप करायला सुरवात कर… स्टार्ट”

मर्डर (खून) -

दिनांक. 23 एप्रिल, 2016, वेळ रात्रीचे साडेआठ वाजलेत, सांताक्रूजच्या हिलवाडी वस्तीच्या जवळच्या बसस्टॉपवर बसची वाट बघत रांगेत उभा असलेला सूरज. तिथं तो मोबाईलवर उत्साहित होत बोलत होता, “तुम्हाला आता कोणी पुरावा नाही विचारणार, तुम्ही क्रांतीच्या तटावर उभे आहात…this is fucking Revolutions बाय…” सूरजने प्रोफेसर रॉय नावाने चालू असलेला तो कॉल कट केला सरळ नंबर ब्लॉक केला. त्याने जोराने स्वतःच्या मानेला हिसका दिला, तो खूप जास्तच उत्साहाने सळसळत होता. तिथं आसपास रांगेतले लोक पुटपुटत होते, “कुठे टाईमावर येते बस आजकाल, आता आठला येणारी बस अजून आली नाहीय….” सूरजच्या पाठीमागे लागलेली रांग वाढतच चालली होती. सांताक्रूज रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या बसस्टॉपवर सूरजही मागच्या अर्ध्या तासापासून रांगेत बसची वाट बघत सतत हातातल्या घडयाळाकडे पाहत उभा होता, त्यांच्या मागेच उभ्या असलेल्या दोन इसमापैकी एकाने वैतागून सिगरेट काढली, त्यांच्यासोबतच्या दुस-याने लायटर काढलं, आणि पेटवलेली सिगरेट हातात घेत त्यातल्या एकाने झुरका सोडताच, सूरजला एकाएक जोरात उबळ आली आणि खोकला सुरु झाला, सूरजला आलेला खोकला पाहत त्यातल्या सिगरेट न ओढणा-याने सूरजला म्हटलं, “मित्रा, आम्ही समोर उभे आहोत, लक्षात असू दया”. ते दोघं आता बसस्टॉपला लागून डाव्या अंगाला असलेल्या भिंतीला टेकून उभे राहिले, “अरे खोकतोय तर खोकू दे ना, तसा ही तो आता कुठे जिंवत राहणाराय…”, हातातल्या सिगरेटचा झुरका घेत तो म्हणाला “मला त्यांचा थोबडा एकदा कन्फर्म करायचाय” मग त्या दुस-याने आपल्या खिश्यातून मोबाईल काढत त्यांतल्या फोटोला सूरजसमोर पाहत दुजोरा दिला की हा तोच आहे. फायनली पाच मिनिटानंतर बस आली, एक एक करत सगळे बसमध्ये चढले, सूरज बसला, त्यांच्या दोन सीटमागे ते दोघं बसले, बसचालकाने एका वळणावर ब्रेक दाबताच सूरजच्या बाजूला बसलेल्या माणसाचा खांदा लागताच सूरजने आपल अंग चोरल्यासारखं केलं, त्याला काहीतरी वेगळं वाटत होत. थोडया वेळातच तो बसच्या खिडकीबाहेरचा नजारा बघण्यात गर्क झाला, रात्रीच्या वेळच्या झगमगाटाने उजळून निघणारी मुबंई, घडयाळ्याच्या काटावर चालणारी माणसं… तो हे असं काही बघत होता की जणू पहिल्यादांच हे सगळं अनुभवत आहे की काय… त्याला एक दोन विमानं आकाशात उडताना दिसली, डोळ्याला या सा-या गोष्टी सुख देत होत्या.

एकएक करत मिराज पेट्रोलपंपाचा बसस्टॉप आला, सूरज बसमधून उतरला, बस निघून गेली आणि सूरजला उतरलेलं पाहून ते दोघसुदधा लगोलग उतरले. रस्ता एकदमच सामसूम होता, सूरज चालत होता. त्यांच्या मागावर दोन लोक आहेत यांची त्याला सुतराम कल्पना नव्हती. आता सूरज चालत चालत मिराज पेट्रोलपंप पार करत त्यांच्या समोरच्या त्या पन्नास मजली इमारतीच्या समोर डोक वर करत पाहत होता. त्यानें मान डाव्या बाजूला वळवली. तो असं काही बघत होता जसं काही त्याने इतका मोठा गगनचुंबी टॉवर या अगोदर कधी पहिलाच नव्हता. वरुन बघता बघता त्यांची नजर एक एक मजला बघत खालच्या दिशेने येत होती. इतक्यात पहिल्या मजल्यावरच्या ‘प्रोवर्डको कंपनी’च्या चमकत असलेल्या नावाकडे त्याचं लक्ष गेलं, नकळत एकाएक त्यांच्या मानेच्या बाजूने रक्त यायला लागलं.

त्या मघाच्या त्यांच्या मागावर असलेल्या दोघापैकीं एकाने सोबत आणलेला चॉपर आता पूर्णपणे रक्ताने माखून गेला होता, तो चॉपर त्याने पुन्हा एकदा खिशात टाकला. “कन्फर्म मेला आहे ना… हा चल आता”

******

दशरथची कविता.

परिसर- प्रोवर्डको कंपनीचा भाग

वेळ- शनिवार रात्रीचे साठेआठ वाजलेत

दिनांक- 23 एप्रिल 2016.

शहरातल्या एअरपोर्ट जवळच्या भिंतीच्या पलीकडे चौथ्या बिल्डिगंच्या पहिल्या मजल्यावरल्या प्रोवर्डको कंपनीमध्ये शनिवारी रात्री साडेआठ वाजता प्रत्येक महिन्याप्रमाणे आजही कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी, फन एक्टिव्हीटी (Fun Activity) करता आयोजित कार्यक्रमात पन्नास ते साठ कर्मचाऱ्यांपैकीच काहीजण सादर करत होते.

माईक हातात घेत एक व्यक्ती जोक सांगत होता.

“सांगा बघू आपल्या प्रोफेशनला अनुसरुन ड्रेस-एटीकेटसला कोण सगळ्यात जास्त महत्तव देत असतं?”

आता प्रेक्षक म्हणून बसलेल्या बाकी प्रेक्षकामधून आवाज येत होते, इंजिनीअर, डॉक्टर…

तो म्हणाला “रस्त्यावरचे भिकारी”

लोक हसत होते, तोच सगळा मजामस्तीचा माहौल बनत चालला होता.

आज पुन्हा एकदा कंपनीतला एक कर्मचारी दशरथ माईक हातात घेत कविता ऐकवायला लागतो. चेहरावरुन तरी तो खूप सा-या तडफेने बोलत असल्याचं दिसत होतं.

सुगंध घेत घेत

खुललेल्या गुलाबाला ठेवीन

ब-याच काळ हातामध्ये

एक इच्छा खूप साधी

पण आजही अधूरी

कधी एकेकाळी रिवाजाच्या जवजाळात

खरेदी केला होता एक गुलाब

मी सुरवातही नाही करु शकलो

ना शेवट करु शकलो

मग नुसतचं हाताळताना

टोचणा-या काटयांनी जन्मरेषा मात्र बदलून टाकल्या

सुंगधाच्या एका वासाने

नरकाची आठवण करुन दिली

या डोंळ्याच्या मोहापायी

हाताना सहन करावं लागलं

मग गह-या निराशेची छाया हदयावर पडली

हे आयुष्या

इतक्या नजाकतीने बरबाद केलेस मला

भेटणारा प्रत्येक यशस्वी रस्ता

आता फक्त मरणाची वाट पाहतोय

ती दुवा असूनदेखील

माझ्या नशीबी कधी आली नाही

ती प्रत्येकवेळी नजरेत माझ्या

गुन्हांची मालिका बनत गेली

मी असचं अलटूनपालटून स्वतःला बिलगून

जळत्या दिवाच्या मागावर असाच बुझून जातो

ती बोलणं नाही समजू शकली

ना खोली मोजू शकली प्रेमाची

मला का आता प्रत्येकवेळी

गुलाबाचे काटेच नजरेस पडतात

हे तुम्हाला खोट वाटत असेल तर खरं आहे मित्रानों

नाहीतर शब्दांच्या अवतीभवती आजकाल

कुठे लोक दुखाचे अर्थ शोधतात

एक इच्छा खूप साधी

पण आजही अधूरी

सगळ्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण त्याचा नेहमीचा सोबती समीर मात्र गोधळला होता पण त्यांनेही टाळ्या वाजवल्याच.

ठिकाण प्रोवॉर्डको कंपनीचं कॅटीन

दिनांक- 23 अप्रिल 2016

रात्रीचे नऊ वाजले होते, दुस-या पाळीच्या कामगारांची जेवणाची अर्ध्या तासाची वेळ झाली होती. दशरथसोबत काम करणारा समीर जेवण्याच्या टेबलावर डब्बा ठेवत म्हणाला “आज काहीतरी नवीन होत ना दशरथ, थोडसं डोक्यावरुन गेलं, पहिली कधी ऐकली नव्हती ही कविता”.

दशरथचा यावर कोणताही प्रतिसाद असा नव्हताच.

दशरथ एका पायाने अधू होता त्यामुळे त्याला चालताना-बसताना वेळ लागत असे, त्यांचा डावा पाय उजव्या पायापेक्षा आकाराने कमी होता आणि तो जमिनीला टेकतही नव्हता, त्याला आपल्या एका हाताचा आधार घेत, तो डाव्या पायापाशी नेत चालावं लागे. कंपनीपासून बसस्टॉपपर्यंतचा प्रवास तो असाच हळूहळू चालत करत असे, मागच्या आठ वर्षांपासून मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत तो कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करत होता.

बसस्टॉपवर बस आली, सगळी लोक बसच्या मागच्या बाजूने चढण्यासाठी धावत असताना तो तसाच चालत लगबगीने पुढच्या बाजूने बसमध्ये शिरला बस तशी रिकामीच होती, तो तिथल्या त्या अंपगाच्या सीटवर जाऊन बसला, बस चालत चालत ‘मिराज पेट्रोलपंप’ नावाच्या बसस्टॉपवर थांबली आणि दशरथ उतरला.

त्यांची नेहमीच कामावर सेकंड शिफ्ट असायची, आणि या सगळ्याने तो खुश होता, घराकडून निघाल्यावर दुपारी कोणताही गर्दीवाला माहौल नसायचा की ट्रॅफिकची झंझट नसायची, निव्वळ आठ-दहा स्टॉप नंतर आलाच की ‘मिराज पेट्रोलपंप’चा स्टॉप…साधारण पाच-सहा किलोमीटरचं अंतर.

ऑफिसच्या लोकांमध्ये बोलताना तो नेहमी म्हणे, “आणि काय पाहिजे माझ्यासारख्या पायाने अधू.. अंपग व्यक्तीला कोणत्याही त्रासाशिवाय पोट भरण्याइतकं खायला देतेय मुंबई…. घरातून फक्त अर्धा तास अगोदर निघातो, कामावरुन सुटल्यावर अर्ध्या तासात घरी पोहचतो, ना कोणती गर्दीबिर्दी….ना कोणतं त्रासाचं काम… कॉम्प्युटरवर बसा… रात्रीचे अकरा वाजले… टाईम झाला… झाली डयुटी संपली… यांच्यापेक्षा अजून काय पाहिजे…या शहरामध्ये…”

दशरथ नेहमीच “शहर आणि काम” या विषयावर हे प्रवचन देत बसे.

आता ही जेवणाच्या टेबलावर समीर दशरथला म्हणाला, “अरे डब्बा खोल दशरथ”, सोबत जेवायला बसलेल्या दशरथने डब्बा खोललासुदधा. कदाचित आज त्याचं ध्यान नव्हतं… एकदाचा त्याने डब्बा खोलला.

“ओ… हो… आजपण डिझाईनवाल्या चपात्या, हे काय आहे दशरथ, बायकोने कोणता नवा कुकीग क्लास जॉईन केलाय काय?, पंतगवाल्या चपात्या”

समीरने त्या चपात्या उचलत हातात उंच पकडल्या आणि कॅटीनमधल्या बसलेल्या प्रत्येकाची त्यांच्याकडे नजर जाईल अश्या जोरकस हाताने तो ओरडत होता. “बघा पंतगवाल्या चपात्या”.

अश्याप्रकारे दशरथची खेचण्यामध्ये कोणी ना कोणी नेहमी तयार असे. दशरथने डब्ब्यात असलेल्या चपात्यापैकी अर्ध्या चपात्या खाल्या आणि बाकी चपात्या डब्यात भरत तो वॉशरुमकडे निघाला. आज जेवणही चांगल बनल नव्हतं आणि त्याचं मनही लागत नव्हतं.

वॉशरुम म्हणावं इतकं प्रशस्त होतं, आणि ते कामचोर कर्मचाऱ्यांनी भरुन गेलं होतं, प्रत्येकजण कॉम्प्युटरवर तासनतास बसल्यामुळे वैतागून सुपरवायझरच्या नजरेतून सुटका करत वॉशरुममध्ये येऊन टाईमपास करत होता, दुसरी जागाच नव्हती. तिथल्या त्या वॉशरुमच्या मुतारीच्या दिशेने तोंड केल्यावर खिडक्यानजरेस पडत, त्यातून रस्त्याच्या दिशेचा नजारा नजरेस पडत होता.

23 एप्रिल 2016.

आज शनिवाराचा दिवस रात्रीचे साडेनऊ वाजलेत.

इतक्यात वॉशरुममध्ये दशरथच्या बाजूला योगेश मुतण्यासाठी तिथं आला.. योगेश दशरथचा सुपरवायझर. योगेश तिथं येताच खूप सारी मुलं निघून जाताना दिसली, त्यांचा तिथं दरारा होता… पण त्यातलेही अजून काहीजण बेसिनपाशी आरश्यासमोर घुटमळत होते.

दशरथ काहीसा विचार करत योगेशला म्हणाला, ”अरे योगेश सर, मॅनेजर गेला ना घरी.. अरे मला ना गावला कॉल करायचाय यूपीला.. आता.. तेवढं जरा ते बदलेला एक्सेटशन नंबर तेवढा सांगा ना”

दशरथची ही नेहमीची सवय होती तो गावाला कॉल करण्यासाठी ऑफिसचा लॅण्डलाईन नंबर वापरत असे.

योगेशने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि टेर खेचण्याच्या उददेशाने काहीसं गंभीर होत म्हणाला, ” ही काय जागा आहे का नंबर विचारायची, सांगतो नंतर, गव्हर्नमेन्टचा आऊटसोअर्सचा प्रोजेक्ट नवीन आहे, माहित आहे ना… आता जाऊन काम कर पाचशे फाईल्सच टारगेट आहे माहित आहे ना.. आणि आता जेवणाचा ब्रेक पण संपलाय, स्पीड वाढवा पटापट.. न्युमरीकचा स्पीड खूपच कमी आहे.. एन्टरीज खूपच कमी होतायत हल्ली.. साडेनऊ वाजतच आलेत… टाईमपास कमी करा.. अकरा वाजता जाऊ देणार नाय समजलं.. पाचशे फाईल्स कंपलीट केल्याशिवाय, आणि गावाला काय दुसरी बायको आहे का सारखं फोन लावायला, इथं एकीनं तुझं काही होत नाहीय.. म्हणून दुसरी करतोयस काय? आणि कंपनीच्या नंबरने का फोन करतोस, पगार मिळतो ना महिन्याला”.

दशरथला या अश्या योगेशच्या बोलण्याची सवय होती ते हे सगळं मस्करीत बोलतोय हे कळतं होतं, दशरथ हे सगळं ऐकत होता तरी नजर समारे खिडकीपल्याड काही दिसत का याकडे होती, खिडकीकडून येणा-या गारगार वारा येत होता. त्यांचाच अदमास घेत दशरथ योगेशला म्हणाला “अच्छा सर आज-काल थंडी खूप लागते ना”

तितक्यात पँटीची चैन लावत योगेश जोरात हसत म्हणाला “मग वहिनीला ठोकतोस की नाही..ठोकत जा गरमी लागायला सुरवात होईल”

तिथं बेसीन जवळ उभ्या असलेल्या बाकीजणानां जोराचं हसू फुटलं. पण जशी योगेशची नजर गेली तसे ते वॉशरुममधून बाहेर पडले. योगेश बेसिनमध्ये हात धुवून जाणारच होता इतक्यात… दशरथ खिडकीकडे तोंडकरुन बाहेरच बघत होता, दशरथ एवढं टक लावून बाहेर काय बघतोय हे बघण्यासाठी आता योगेश खिडकीच्या दिशेने वळला. दोघाची नजर समोरच्या रस्त्यावर होती… कोणी मनुष्य…. इथून स्पष्ट दिसणं कठीण होतं, हे काय होतयं?... ते काय करतायत दोघं.. त्या माणसासोबत.. योगेश पुरा घामाने डबडबून गेला होता… पण तो ते दृश्य पूर्णपणे पाहू नाही शकला.

**************

सदानंदचं घर. हे सगळं बोलणं-लिहिणं चालू असताना, तितक्यात घराच्या दिशेने काही ओळखीचे आवाज येत असल्याचं जाणून सदानंदने लॅपटॉप मागे ठेवण्यास सांगितला आणि सुदेश कनोजियाने त्याचं म्हणणं ऐकत मागच्या ड्रॉवरमध्ये लॅपटॉप ठेवून दिला. ही सगळी तिचं लोक होती. त्याचं कुंटूब बनून गेलेली… ट्रेनच्या डब्यातले साथीदार.. सोबत प्रवास करणारे प्रवासी… प्रत्येकजण त्यांची तब्येत विचारत होता, टी.व्हीवर दाखवलेल्या बातम्या पाहूनसुदधा त्या सा-यांना सदानंदकडून त्या अपघाताविषयी जाणून घ्यायचं होतं.

सदानंद नाईलाजाने का होईना पण त्यांना सांगू लागला, “रंगपंचमीचा दिवस असल्याकारणानं पूर्ण रेल्वेस्टेशन रिकामचं होतं… डोक्यावरच्या पंख्याचा आवाजपण कितीतरी दिवसानंतर ऐकायला येत होता. समोरच्या फलाटावर एक भिकारी आपल्या दोन-तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेवून झोपला होता, इतक्यात पटरीवरुन एक मालगाडी जाणार होती, तो लहान मुलगा स्वतःतच गुंग झाला होता. मी आणि बाकी दोघ-तिघं हे सगळं बघत होतो, समोरच्या फलाटावरचा ते लहान मुलं आता एकदमच रेल्वेरुळाच्या जवळ येऊ लागलं. आम्ही सगळे जोरजोरात ओरडू लागले. तो भिकारी कोणत्या गाढ झोपेत होता कोण जाणे, मी तिथल्या रेल्वेचं हॉटेल चालवण्या-या लोकाशीं वाचवण्याबदल सांगितलं तर त्यांनीसुदधा नाही ऐकलं.

उलटा तो रेल्वेच्या इथे हॉटेल चालवणारा म्हणाला, ”अरे या भिका-यानां-गर्दुल्यांना कामचं ही असतात पोर काढण्याची, एक मेला तर दुसरं पैदा करतील”

आता गाडी येण्याचा आवाज जोरात येऊ लागला आणि तो मुलगा तिथचं खेळत खेळत जवळ आलं…. मग मीच रुळावरुन उडी मारुन दुस-या बाजूला धावत जात अगदी थोडक्यात त्या लहान मुलाला वाचवलं.

आणि त्याचवेळी जोराच्या झटक्याने डाव्या हाताला आणि इथं डोक्याला जखम झाली, त्यामुळेच इथं डाव्या हाताला प्लस्टर लागलं.

आता तिथं असलेल्या त्यांच्या रेल्वे प्रवासातल्या सहप्रवासांचे प्रश्न सुरु झाले, “तरी पण आपला जीव धोक्यात घालून हे सगळं नाही करायला पाहिजे होतं.” अजून एक जण म्हणाला, ”पण त्यादिवशी तू कश्यासाठी गेला होतास रेल्वेस्टेशनला रंगपंचमीच्या सुटटीच्या दिवशी”

त्यांच्या या प्रश्नाने सदानंदची बोलतीच बंद झाली, इतक्यात तिथं दशरथ आला. त्याला आकाशबावा घेऊन आला होता.

अरे या दशरथला तुला बघायचचं होत म्हणून जिदद करत आलायं, आम्ही त्याला किती सांगितलं की नको येऊ, थोडा वरचा टेकडीवरचा भाग आहे, चढणीचा रस्ता आहे, चालवं लागेल, पण दशरथ कसला ऐकतोय.

सदानंद त्याच्यांकडे पाहत म्हणाला, ”कशाला त्रास उचलला दशरथ“

सुदेश हे सगळं पाहत होता, सुदेश हे समजून गेला होता की यातल्याच काही लोकांना सदानंदने आपल्या कथानकातली पात्र बनवली आहेत, आणि त्याला आता दशरथला नुसतचं कल्पनेच्या कक्षेत बघत बसण्याची गरज नव्हती.

सुदेश कनोजिया मनातल्या मनात म्हणत होता, ” तर या दशरथला सदानंदने आपल्या कथेत ठेवल आहे तर, हा एका पायाने लगडत चालणारा साधा वाटणारा माणूस”

सदानंद आपली अपघाताची बातमी सांगण्यात गढून गेला होता, आता गोष्टी गंभीरतेकडून हास्याकडे वळाली होती, प्रत्येकाने तब्येत संभाळण्याची काळजी घेण्याविषयी बोलत तिथून निघत होतं, प्रत्येकाला कामावर जायचं होतं, ही सगळी लोक गेल्यावर सदानंदने पुन्हा लॅपटॉप बाहेर काढण्यास सांगितला.

सुदेश लॅपटॉपकडे बोट दाखवत म्हणाला, ”हा दशरथ हाच आहे ना!, ही सगळी लोक का बरं यांची एवढी टेर खेचत असतात”

“टेर नेहमी कमजोर लोकांची खेचली जाते आणि एकदा का हे सगळं ऐकून घ्यायची सवय झाली की मग काही वाईट वाटत नाही, तू आता टाईप करत रहा थोडया वेळात तुझं स्वतःच स्वतःला माहित होईल” सदानंद अगदी शांतपणे सुदेशला सांगत होता. कथा टाईप करणं पुन्हा सुरु झालं.

********

शनिवार संपला, जवळजवळ रात्रीचे साडेबारा वाजले होते, कमलानिवास अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर जेनी ठाकूर आपल्या कुंटूबासोबत राहत होती. त्या रात्रीच्या शांततेला भेदत तिच्या मोबाईल फोनची रिंग वाजू लागली. फोन नंबर बघितला तर तो अनोळखी होता, जेनीने इतक्या रात्री कोणाचा फोन असेल या विचारताच काहीसा घाबरतच फोन उचलला, समोरुन धीरगंभीर आवाजात बोलणं सुरु झालं, ”आपण जेनी ठाकूर बोलताय काय?” तश्याच त्या झोपेचं अवसान थोडसं हटकत ती म्हणाली, ”हो बोलतेय” पलीकडून आवाज आला ”मी अंधेरी ईस्ट साकीनाका पोलीस स्टेशनमधून कॉन्सटेबल दिनेश नागपाल बोलतोय, तुम्ही सूरज कुमारला ओळखता का?” तिने क्षणाचाही अवकाश न करता म्हटलं ”हो ओळखते” “प्लीज तुम्ही आता ताबडतोब पोलीस स्टेशला या, मी आपल्यासोबत एक लेडीज पोलीस कॉन्स्टेबल आणि गाडी पाठवतोय, आणि सोबत कुणा फॅमिली मेंबरला घेवून या” “पण झालयं काय?” जेनीच्या अंगातली झोपेची अवस्था पार निघून गेली होती, पोलीसाने “तुम्ही पोलीस स्टेशनला या, सांगतो सगळं” असं म्हणतच कॉल कट केला.

************

तारीख:- 23 एप्रिल 2016

शानिवारी रात्री वाजता

दशरथ गावी फोन लावण्यासाठी म्हणून आला होता, आणि आता तो स्वतःशीच पुटपुटत होता, ”सूरज इथे बिल्डिंगखाली कसा? तो खरोखर मेला का? अंधारामुळे इथून दिसणंही मुश्कील आहे, त्या दोघांनी त्याला मारुन टाकलं असेल का? की नाही? काहीएक समजत नाहीयं” तो जो अस्पष्ट दिसणारा इसम… सूरज… म्हणजे सूरजला दशरथ ओळखत होता तर? पण कसा?”

योगेश आणि दशरथने जे बघितलं ते कोणतही स्वप्न नव्हतं, कुणाचातरी गळा चिरताना बघितलं होतं दोघांनी... दोघही काहीसे घाबरल्यासारखेच वाटत होते, इतका गारेगार एसी चालू असताना योगेशच्या तर चेह-यावर घामाच्या धारा दिसून येत होत्या. सुरवातीला तर योगेशच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते, त्यांच्या घशाल्या कोरड पडल्यासारखं वाटू लागलं. त्यांचा श्वासोच्छ्श्वास जलदगतीने होऊ लागला, तरी त्याने सावरत नेहमीच्या केबीनच्या टेबलापाशी येत टेकू करत उभं राहत दशरथला बोलवत आजूबाजूला कुणीही नाही यांची खात्री करत अगदी हलक्या आवाजात म्हटलं, ”नीट ऐक, आपल्याला बाहेरच्या कुणालाही ही गोष्ट सांगायची नाहीय की आपण आता कुणालातरी बाहेर मारताना पहिलयं, आपल्याला नाही कोणत्या कायदयाच्या झंझटीत पडायचं, आपल्याला नाय त्या कोर्टकचेरीच्या मॅटरमध्ये अडकवून घ्यायचं, समजल का दशरथ? नाहीतर तू सांगत फिरशील सगळ्या फ्लोअरवर… समजलं ना?”

दशरथच्या चेह-यावर मात्र कसल्याही प्रकारची घबराट दिसून येत नव्हती, ना त्यांला घाम फुटला होता, तो फक्त मुंडी हालवत बाहेर निघाला, पण कामाच्या खुर्चीत बसल्यावरही त्यांच्या डोक्यात तेच विचार चालू होते, “तो खरचं मेला असेल काय?” तो या विचाराच्याच तंद्रीत होता की पुन्हा योगेश दशरथपाशी येऊन मघासपेक्षा अधिक जोरात म्हणाला, “माहित आहे ना?, मी काय सांगितलयं आहे ते, कुणालाही काहीएक सांगायचं नाहीयं.. आणि हा हे घे एक्सेटेंशन नंबर… की विसरुन गेलास?” असं म्हणत योगेश निघून गेला

पण मघाच्या आपल्याच विचारात असलेल्या दशरथ आता मात्र या अश्या सततच्या बोलण्याने का कोण जाणे अचानक त्यांच्या चेह-यावर घाम आलेला दिसत होता, त्याने तो लॅण्डलाईन जवळ केला त्याला कॉल जो लावायचा होता.

तरीसुदधा दशरथचा मनातल्या मनात मात्र एकच चालू होतं, “तो मेला असेल काय?”

***********

दिवस 24 एप्रिल 2016, रविवार रात्रीचे दोन वाजलेत पोलीस स्टेशनच्या आवारात, जेनी आपल्या मोठया भावाला घेऊन पोलीस स्टेशनात खुर्चीवर बसून मोबाईलवरच्या वॉलपेपरवर असलेल्या सूरजच्या फोटोला बघत मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करत होती, तिच्या आतल्या मनातला एक शंकेचा बुडबुडा तिला काही स्वस्थ बसू दिसत नव्हता, तिच्या डोळ्यातून पानी येत होतं.

वायरे नावाचा पोलीस इन्सपेक्टर आपल्या धीरगंभीर आवाजात म्हणाला, ”काय तुम्हीच जेनी ठाकूर आहात का?, सूरज कुमारला तुम्ही कसे काय ओळखता? तुमचा मित्र होता की नातेवाईक”

आता तुम्हाला सुभाष वायरे बदल सांगतो, अश्या गुन्हेगारी घटनांच्यावेळी वायरेच दिमाग खूप तेजीने काम करत, वयाची चाळीशी पार केलेल्या या इसमाकडे असणारा उत्साह लाजबाब होता, त्यांना वाटायचं गुन्हा घडल्यावर जितक्या लवकर तो समजण्याचा प्रयत्न करु तितक्या लवकर पुरावे गोळा होतात. करप्शन या प्रकाराचा प्रंचड तिटकारा, त्यामुळे आजूबाजूला वावरणारे जरा दचकूनच असतं, सततच्या बदलीनंतर आता या पोलीस ठाण्यात बदली झाली होती. सध्या बायको-मुलं उन्हाळ्याच्या सुटटीमुळे गावाला होती त्यामुळे सध्या चोवीस तास मुक्काम पोलीस स्टेशनच होऊन बसला होता, मुंबई पोलीसांची जी काही चांगली इमेज आहे त्याला कारण असणा-यांपैकी हे एक अधिकारी.

आजूबाजूच्या हया गुन्हांच्या अश्या घटना पोलीसस्टेशनाला नेहमीच्याचं होत्या, तिथं असलेल्या कुण्या इसमाला वायरे सांगत होते त्याचं काही गोष्टी कानावर पडत होत्या, “ब-याच स्टाफ सुटटीवर गेलाय, बायको आणि मुलं गेली गावाला, मग मीच असतो चोवीस तास इथचं पोलीस स्टेशनला, आता पुढे काही विचारु नका, बीएमसीचं इलेक्शन आहेत तीन महिन्यानंतर…”

जेनी घाबरत म्हणाली, ”हो तो माझाचं मित्र होता, पण झालं काय?”

जेनीच्या भावाकडे बोट करत विचारलं “तुम्ही ओळखता का याला?”

त्याने नकारार्थी मान केली आणि जेनीनेही म्हटलं की तो नाही ओळखत सूरजला

“स्वतःला सावरा, सूरज कुमार इज नो मोर… कुणीतरी अंधेरी-कुर्ला रोडवरच्या ‘मिराज पेट्रोलपंपा’शी गळा चिरून हत्या केली, आमचा पोलीसतपास चालू आहे…”

जेनी सुन्न पडली, तिला आजूबाजूचं काहीच ऐकू येत नव्हतं इतकी ती दाट तणावाखाली आली, परिस्थितीचा रोख समजून वायरे यांनी तिथं टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास तिच्या पुढे केला, आता तिचे हात-पाय थरथरु लागले, ती एकाएकी खाली कोसळणार… नाही…. ती बेशुदधच झाली.

वायरे आणि जेनीच्या भावाने तिला सावरत बाहेरच्या मोकळ्या खोलीत आणलं, त्यानंतर जेनीला स्थिरस्थावर व्हायला पाऊण-एक तास गेला. प्रत्येकावर संशय असला तरी थोडीशी सहानभूती दाखवत पोलीस प्रशासनाला वागावं लागतं. इतक्या वर्षाच्या पोलीसी अनुभवातून समोरच्या माणसाने गुन्हा केला की नाही हे कळण्यास काही क्षणाचा अवधी पुरतो पण काहीवेळा एखादा सराईत पण साळसूदपणाचा आव आणणारा व्यक्ती बेमालूमपणे सुटका करुन घेतो.

“तुम्ही आता ठीक आहात का?” जेनीने होकारार्थी मान हलवली, “सूरज कुमारची डेडबॉडी पोस्टमार्टंमसाठी पाठवलीय, त्यांच्या मोबाईल फोनवरुन कळालं की तुमचा नंबर त्यांच्या कॉन्टॅकट लिस्टमध्ये होम नावाने सेव्ह करुन ठेवलाय, हा नोकिया फींचर फोनमधून…म्हणून मग तुम्हाला कॉल केलाय, जर तुम्हाला बॉडी बघायची असेल तर तुम्ही सायन हॉस्पीटलला आमच्या कॉन्सटेबलसोबत जाऊ शकता”.

या इतक्या रात्री, आता सुभाष वायरेने आपल्या सहकारी पोलीस कॉन्सटेबला जेनी जे काही सांगत होती ते लिहण्यासाठी हाताने इशारा केला आणि जेनीच्या भावाला बाहेर बसण्यासाठी बोललं गेलं,

“तुम्ही किती वर्षांपासून ओळखता?, काय करायचा सूरज? त्यांची फॅमिली? कुणावर संशय, कुणाशी पर्सनल दुश्मनी”.

इतकी मोठी भयानक बातमी ऐकल्यानंतर जेनी नीटशी बोलूसुदधा शकत नव्हती, मोठया धीराने ती बोलू लागली ”मागच्या एका वर्षांपासून आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो, काही दिवसापूर्वीं आमचं दोघचं ब्रेक-अप झालं होतं”, तो एक पेंटीग आर्टीस्ट… चित्रकार होता, कॅनव्हास पेंटीग त्यांची खासियत होती, हल्लीच एक त्यांच्या चित्राचं प्रदर्शनही झालं होतं, जहांगीर आर्टस गॅलरीत, तो होता शिमल्याचां, तो अनाथ होता त्याला कुणीतरी दत्तक घेतलं होतं, डॅडी..बोलायाचा त्यांना… आता त्याचं पण वय झालयं, चालणं-फिरणं कठीण होऊन बसलयं, यामुळे ते कधी मुंबईला येऊच नाही शकले, सूरज ओशिवराला राहायचा, कुणी खास मित्र नव्हते मुंबईमध्ये.

जेनी हे सगळं पोलीसांच्या विचारण्यावर बोलत होती, वायरेचे प्रश्न काही थांबत नव्हते.

“कुणाशी व्यावसायिक दुश्मनी”

जेनी आसवं रोखत म्हणाली “नाही, मला जितकं माहित आहे त्यावरुन तर मी हेच सांगू शकेन की त्यांच कुणाशी भांडण नव्हतं”

वायरेने थांबत विचारलं, ”जर तो ओशिवराला राहत होता तर इथे अंधेरी-कुर्ला रोडवर, इथे रस्त्याच्या मधोमध उतरण्याची काय गरज पडली, कारण आम्हाला सीसीटीव्हीवरुन असं कळालं की तो स्वतः त्या बसस्टॉपवर उतरुन समोरच्या बिल्डींगपाशी उभा होता की एकाएकी मागून येत दोन माणसांनी त्यांचा गळा चिरला, त्यांचा हेतू फक्त त्याला मारणं हाच होता कारण त्यांच्या गळ्यातली चैन, पैसे, मोबाईल काहीच चोरलं नाही. त्या रस्त्यावर रात्रीच्यावेळी जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे कोणी प्रत्यक्ष साक्षीदार पण नाहीय, आणि आजकाल कोणी समोरुन साक्ष दयायला तयारही होत नाही ”

वायरेने पुन्हा त्या पुराव्याच्या पॅकबंद पिशवीकडे नजर वळवत विचारलं ”नोकीया चा इतका साधा हॅडसॅट, फींचर फोन वापरण्याच काही खास कारण”

जेनी म्हणाली, ”असं विशेष कारण मला नाही ठाऊक, पण जेव्हा केव्हा तो कॅन्वहासवर पेंटीगचा विचार करे किंवा मग पेंटीग बनवयाला सुरवात करे, तेव्हा मग बाकी गोष्टीपांसून मन हटवण्यासाठी तो साधा फींचर फोन वापरत असे, मला खरचं यांच खरं कारण माहित नाही की तो असा इथं का आला होता, त्याला असचं कुठेही भटकण्याची सवय होती, बोलायचा कलाकाराने नेहमी शोधात असायला हवं” हे म्हणता म्हणता तिचा बांध तुटला ती ओक्काशी-बोक्काशी होऊन रडू लागली.

तिथं असलेल्या महिला कॉन्सटेबलने रुमाल पुढं केला आणि लगेचच पुढचा प्रश्न विचारला

“आणि तुम्ही काय करता जेनी?”

“मी केमलिन कंपनीत अकांऊट डिपार्टमेंटला कामाला आहे?”

वायरेने एकवार समोरच्या घडयाळ्याकडे बघितलं, आणि बोलले “रात्र खूप झालीय, जेनी तुम्ही आता घरी जा, उदया पुन्हा एकदा सकाळी तुम्हाला यावं लागेल, अजून खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, आणि आता जाताना तिथं कॉन्सटेबलला सूरज कुमारच्या घरचा पत्ता देऊन जा”.

जेनीचे घरची लोक ही गोष्ट ऐकून दंग होते की, जेनी ज्याला आपला मित्र म्हणून सांगायची त्यांच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती जे याअगोदर कोणालाच माहित नव्हतं.

आता पोलीस स्टेशनमध्ये सुभाष वायरे त्यांच्या स्टाफला सूचना दयायला सुरवात करतात.

सुरज कुमारच्या फॅमिलीला इन्फॉर्म करा शिमल्याला, तो पर्यंत पोस्टमार्टंम रिपोर्टंसुदधा येऊन जातील, आणि सकाळी त्या जहागीर आर्ट गॅलरीमधून पण काही माहिती मिळते का ते बघा आणि ते सीसीटीव्हीत दिसत असलेल्या खूनाचे चेहरे बघा आणि काही हिस्टरी सापडते का बघा, या सूरज कुमारचं सोशल नेटवर्किंग साईटवरुन प्रोफाईल इनफॉरमेशन उचला, उदया सकाळी त्यांच्या ओशिवराच्या घराची झडती घ्या, त्यांचा फ्रेंड सर्कल चेक करा, त्या जेनी ठाकूरवरही नजर ठेवा, सूरजच्या कॉल हिस्टरी सीडीआर मागवून घ्या, आणि सगळ्यात शेवटी कुणाशी बोलणं झालं ते चेक करा, आणि जमलं तर त्याला इथं चौकीत बोलवा.

**************************

मध्येच दुसरं पेज टाईप करायला घेतलं.

**************************

ठिकाण- रस्त्यावर विरोधी पक्षनेते आणि प्रेस-मिडियाची मंडळी

वेळ- रविवारी सकाळी आठची वेळ

दिनांक- 24 एप्रिल 2016

मिराज पेट्रोलपंपावर कुणाची तरी हत्या झाल्यांची बातमी सगळ्या मिडियात पसरली, शहरासाठी हे नवं नव्हतं, कुणाचा तरी खून होणं हे आता रोजच्या बातम्याचा हिस्सा बनून गेला होता, विरोधी पक्षासाठी सुदधा, सकाळी आठच्या सुमारास नेहमीची घिसीपीटी विरोधी आलोचना करणारे विरोधीपक्षनेता गजानन क्षीरसागर यांनी संधीचा फायदा घेत आपलं मत मांडताना म्हटलं, ”मला वाटतं की या शहरात कायदा-सुव्यवस्था नावाची कोणती गोष्टच अस्तित्वात राहिली नाहीयं, सरकार फक्त येणा-या दिवशी सुरक्षाव्यवस्थेच्या पोकळ वार्ता करतेय आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जिथे ना खूनी नीट दिसतोय ना जो बळी गेलेला, मला तर यांत कॅमेराच्या खरेदीत सरळ-सरळ घोटाळा नजरेस पडतो, आमचा पक्ष या विषयावर जरुर आवाज उठवेल”

मिडियांची माणसं गुळाच्या ढेपाला मुंगळ्या डसाव्या तश्या विरोधी पक्षनेत्याला प्रश्न विचारतच होते, ”सरकारच्या आऊटसोर्सिग पॉलिसीवर तुमच्या पक्षाचं काय मत आहे”

क्षीरसागर आता तिथून निघण्याच्या घाईत होते, मिडीयाचे माईक गाडीच्या खिडकीतून बाहेर करत ते म्हणाले, “हे बघा या विषयावर जरुर विधानसभेत आवाज ऊठवू, आता प्लीज वाट मोकळी करा”

गाडी पुढे सरकत होती पण प्रश्न काही बंद होत नव्हते.

“सरकारमधील अंतर्गत मंत्र्यांमध्ये धूसफूसीच्या बातम्या कानावर येतात, त्यावर आपला काय विचार आहे?”

गजानन क्षीरसागर यांनी आता आपल्या ड्राइव्हरला गाडीचा वेग वाढवण्याचा इशारा करत बोलत सुटले, ”मला वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांना विचारलं तर बरं होईल….. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाला भांडणातून फुरसत मिळेल तर ते जनतेच्या विषयी विचार करतील, मला नाही वाटतं हे सरकार जास्त दिवस टिकू शकेल”

गाडीच्या काचा आता वरती जात गेल्या, मिडियाचे माईक गाडीच्या काचेतून पटापट बाहेर पडले, आणि आवाजही बंद झाले, एक नाटकी वातावरण त्या वाहत येणा-या धुळीसकट.

सदानंद टाईप करत असलेल्या सुदेशला म्हणत होता, “उडून गेलं”.

****************

ठिकाण- सदानंदचं घर

दरवाज्याच्या बाजूने कुणाचा तरी चपला काढत असल्यांचा आवाज आला, कुणी बाईमाणूस होतं बहुतेक, कदाचित सदानंदची आई रेवती असेल, पण नाही ही कोणीतरी दुसरी बाई होती, ती फोनवर बोलता बोलता आत येत होती, सदानंदने जसं तिला बघितलं तसं त्याने डोळ्यानेच लॅपटॉप समोरच्या ड्राव्हरमध्ये ठेवण्याचा इशाराने सांगितलं आणि पुढयात असलेले कागद पण त्यानें खाली ठेवले, सदानंदला हे अजिबात आवडत नव्हतं की कोणी त्यांच्या लेखन करण्याविषयी जाणून घ्यावं जोपर्यंत तो प्रसिदध होत नाही आणि त्या लोकांशी काही वाकड न व्हावं ज्यांना त्याने त्यांच्या कथानकात पात्र बनवलयं.

“जेनी डिसुजा… जेनी तू.. सुदेश ते स्टूल काढ ना” सदानंद जागच्या जागी जितकं स्वतःला आवरुन घेता येईल तेवढं आवरत सुदेशला सांगत होता. त्या तेवढया क्षणात सुदेशन विचारलं कोण आहे? आणि तितकाचं हलक्या समजणा-या न समजणा-या आवाजात म्हटलं, ”ऑफिस कलिग”.

“काय दिसते ही” सुदेश स्वतःशीच म्हणत नुसताच तिच्याकडे पाहत राहिला “अशी मुलगी सदानंदच्या ऑफिसमध्ये! वा!.... तर हीच ही नाव लिहिलयं कथेमध्ये…शेवटी आता हिचचं येणं बाकी होत तर स्टोरीत…”

जेनी आपला कानाला लावलेला फोन ठेवत म्हणाली, ”हे सगळं कसं झालं?” सदानंद हसत हसत म्हणाला, “टीव्हीवर नाही बघितला का ऍक्शन रिप्ले”

जेनीचा काळजीचा स्वर आता जास्तच खोल होत म्हणाली, ”म्हणजे जेव्हा तू माझ्याशी फोनवर बोलत होता तेव्हा….., मी दुपारपर्यंत वाट बघितली, मोबाईल फोनवर ट्राय केला तो पण स्वीच ऑफ होत होता.”

आता पुढे यांच खाजगी बोलणं चालू होणार यांची चाहूल लागताच सुदेश सदानंदला आलोच मी असं म्हणत दरवाज्याबाहेर येऊन थांबला.

जेनी रडवा चेहरा करत म्हणाला, ”मला वाटलं तू काही सांगत नाहीयेस, मला काल माहित पडलं की तू वाचवलसं त्या मुलाला… मी नाही म्हणत तू चुकीचं केलसं… की बरोबर केलसं… थोडातरी विचार करायचा ना आपला स्वतःचा… आईचा… आणि मा…” ते पुढचं तिच्याने उच्चारलचं जाईना… तिला म्हणायचं होत माझा पण विचार करायचा होतास, पण पुढे बोलणं चालू ठेवायच्या तंद्रीत ती बोलत सुटली, ”माझं तरं ते सगळं बघून काळीजचं धस्स झालं.. आणि आता ऐक माझं… ”

सुदेश समोरच्या दुकानावर सिगरेट आणण्यासाठी गेला.

जेनी आता बोलतच सुटली.

“तर तू काय ठरवलयसं… कधी कधी वाटत की मी का तुझ्या प्रेमात पडली, कशी या शांत राहणा-या, वागणा-या मुलांच्या प्रेमात कोण पडू शकत…पण पडले प्रेमात तुझ्या… इतकं प्रॅक्टिकल नाही होऊन चालतं आयुष्यात…ऐक माझं म्हणणं….”

सदानंद थोडासा गंभीर होत म्हणाला, ”मला अजून थोडा वेळ हवा आहे, मी प्रेम करतो तुझ्यावर ते मान्यही केलयं… पण जगणं तर असं चालत नाही, तुला तर माहित आहे ना इथं जगणं तुझ्यासाठी किती कठीण होईल… आणि मी तुला नाही गमवू पाहत..प्लीज मला थोडा अजून वेळ दे… प्लीज.. तू एका अपर मिडल क्लास घरात वाढलेली मुलगी… आणि मी इथं झोपडपटटीत चाळीत राहणारा.. मला वाटतं नाही तू इथं एडजस्ट करु शकशील…”

जेनी यावर म्हणाली, “मला तुझ्यासोबत राहायचं, परिस्थिती कशीसुदधा असू देत.. चाळीत असू किंवा दुस-या कुठल्या ठिकाणी”

सुदेश घराबाहेर उभा राहत सिगरेट फुकत होता आणि तो जाणूनबुझून तिथे उभा नव्हता पण त्यांच्या कानावर गोष्टी येतच होत्या.

सदानंद काहीसा विषय आपल्या बाजूने करण्याच्या उददेशाने म्हणाला, “आज तू पहिल्यांदा घरी आलीस तर तुला कळालचं असेल की मी का तयार नाही आहे ते, बघितलसं दहा बाय दहाचं घर कसं असतं? मला वाटत जर लग्न करुन नव्या आयुष्याची सुरवात करायची असेल तर ती इथं नको कुठेतरी चांगल्या जागेत व्हावी, मला वाटत तू समजू शकशील?”

जेनी नाराज होती, तिची नजर सुदेशकडे गेली, सुदेशकडे पाहत ती सदानंदला विचारु लागली, ”हा कोण आहे?” सदानंद थोडासा थांबत थांबत काहीसा आठवत म्हणाला, “तो शेजारी आहे”

“आणि आई?”,

”ती कामावर गेली”

थोडावेळ असाच गेला

“मग आता ऑफिस कधी पासून जाईन करतोयस”

“सोमवारपासून” सदानंद काहीसा तुटक तुटकच बोलत होता. “येत्या काही दिवसात मी तुला सांगून टाकेन, मला तुला अजून जास्त अडचणीत आणायचं नाही, आणि माझा फैसला काही असू देत आपल्या दोस्तीत काही फरक पडणार.. बरोबर ना… प्रॉमिस…”

जेनी आतून खूप कळवळल्यासारखं होत होत ती म्हणाली “असं म्हणू नकोस”.

जेनीने डोळ्यापाशी आलेली आसवं रुमालाने काहीशी थांबवण्याच्या उददेशाने पुसत ती तिथून निघून गेली, आता ती गेल्यानंतर सुदेश आत आला. सुदेश मनातल्या मनात म्हणत होता, ”तर आता कळालं कहानीमध्ये जेनी कुठून आली आहे… फक्त नाव सेम आहे की अख्खा माणूसच स्वभावासकट सेम आहे….? काय माहित?”

आता सुदेश आणि सदानंदमध्ये इतकं अन्डरस्टिंग होत की सुदेश कनोजियाने प्रश्न टाकलाच, “गर्लफ्रेंड आहे का? मग करुन टाकना लग्न….”

सदानंद काहीसा बावचळत म्हणाला, ”सगळं ऐकलं त्या भिंतीपलीकडून”

सुदेशने त्यांच्या या उत्तराकडे लक्ष न देता म्हटलं ”करुन टाक लग्न… चांगली मुलगी आहे… पैशेवाली असेल ना”

“लग्न काय मस्करी वाटते काय? इथं स्वतःच्या पायावर उभं राहणं होत नाही,…कमीत कमी आताची हालत तर बघ, हाताला पण प्लॅस्टर लागलयं…चला महाराज तुम्ही टाईप करा… कदाचित ही स्टोरी काहीतरी कमाल करेल”

कथा टाईप करणं सुरु झालं.

****************

पोलीस स्टेशनला जेनी आता सकाळीच आली होती.

वेळ- रविवार सकाळी आठ वाजलेत

तारीख- 24 एप्रिल 2016

सकाळी साडेआठ वाजता पुलिस स्थानकात सुभाष वायरेच्या समोर जेनी डोक्यावर मधोमध मंदिरात गेल्यावर लावतात तसला टिका लावून आली होती, आता तिच्यासोबत पुन्हा प्रश्नाचा सिलसिला सुरु झाला.

वायरेने प्रश्न केला, ”तुम्हाला सूरजच्या स्वभावात काही बदल नजरेस पडला होता का?”

जेनी आता आठवू लागली आणि बोलली ”मागच्या सहा महिन्यापासून तो खूप बदलला, काहीसा वेगळा वागायचा, असा तो या अगोदर कधी वागला सुदधा नव्हता”

तिला त्या दिवशी तो वेगळा वागला त्यांचा प्रंसग आठवला.

आम्ही त्या दिवशी आमच्या इथल्याच एका पार्कमध्ये बसलो होतो, तेवढयात तिथे एक ओळखीची गरोदर बाई तिथून जात होती तर तिला त्याने बोलवलं, मला म्हणाला आता मजा बघ, त्याने तिचे दोन्ही हात पकडले, आणि दुस-या का तिस-या क्षणाला त्या बाईच्या पोटातून लाथा मारल्यासारखं तिला जाणवू लागलं, मला वाटल हे त्यानं मला इंप्रेस करण्यासाठी तो करत असावा, पण नाही, दिवसेंदिवस अश्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार वाढतच चालले होते.

कधी कधी तो नुसता डोळे बंद करुन सांगू शकत होता की वेळ किती झालाय…. डोळे बंद करुन?

एकदा काही सेंकदात माझ्या जीभेला पाणी आणून दाखवलं, फक्त बोलण्याने… प्रत्येक चव वेगळी होती.. मी तीन-चार वेळा खोदून-खोदून विचारलं तर त्याचं काहीच उत्तर नव्हतं.

या असल्या वाढत्या प्रकारामुळे मला कधी कधी वाटयचं की तो सामान्य…. नॉर्मल… माणूस नाहीयं…

टेबलावर ठेवलेले पेपरकडे नुसत्याच पाहत असलेल्या वायरेने या कुठल्याच बोलण्यात इंटरेस्ट न दाखवता म्हणाले, ”कदाचित हिपनोटिझम… संमोहन असेल, तुम्हाला वाटतं जेनी तुम्ही आम्हाला खरं सांगताय, हे कॉल रेकार्ड काहीतरी वेगळचं सांगतायत… तुमच्याशी तर मागच्या दोन महिन्यापासून काही कॉन्टेकच नाहीय.. त्यानंतर हा अगदी काही दिवसापूर्वीं त्याने तुम्हाला कॉल केला होता”

“हा हे खरं आहे, लगबग तीन-चार महिन्यापर्यंत सगळं ठीक होतं, त्यानंतर सूरजने माझ्याशी कॉन्टॅक्टच तोडलं, जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये वर्षातली सगळ्यात मोठी फ्रेशरसाठी होणारी कॉमपिटिशन त्याला जिकांयची होती, तर त्यासाठी कोणताही डिर्स्टबनस नको होता, ही त्यांची सवय होती, मला माहित होतं या बददल, तो कलेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर होता, तरी मी त्याला कॉल करायचा प्रयत्न केला तर त्यांने माझा नंबरच ब्लॉक केला. नंतर मोठया मुश्कीलीने एके दिवशी भेट झाली तर त्यानें पाठ फिरवली, म्हणायला लागला जे तुझ्या माझ्यात होत ते सगळं संपल, असचं विनाकारण… ही त्यांची सवय होती मला माहित होतं, त्यांचा कोणतातरी आर्ट-प्रोजेक्ट चालू होता, “शोध मानवी शरीर आणि मनरहस्य” नावाचा… त्याला ती कॉम्पिटशन कोणत्याही परिस्थितीत जिंकायची होती, तर मला वाटल प्रोजेक्टवर लक्ष क्रेदिंत करण्यासाठी त्याने हे सगळं म्हटलं असावं. मी त्याला किती तरी वेळा कारण विचारालं पण त्याने माझं काहीएक ऐकलं आणि सांगितलंही नाही आणि त्यानें मला त्यांच्या आर्ट एक्झबिझशनलाही बोलवलं नव्हतं, पण आता तो दोन आठवडयापूर्वी मला माझ्या वाढदिवशी विश करायला आला. खूप मोठं सिलेब्रशन झालं पण त्यानं साधं मला अलिंगन पण नाही दिलं.

हे बोलणं चालू होतं की तितक्यात तिथचं असलेल्या पोलीस कॉन्सटेबलने रिसीवर वायरे यांच्या काना जवळ सरकवत म्हणाला “सीएम साहेबाच्या ऑफिसमधून फोन आहे”

वायरे पलीकडचं बोलण ऐकून म्हणाले, ”सर हे कसं पॉसीबल आहे?.. ठीक आहे सर… पण त्यांना स्वतः साईन करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल”

वायरेने फोन ठेवत म्हणाला, ”पोस्टमार्टम नाही होणार आहे”

वायरेना मोठया नाराजीने पोलीस स्टेशनला आलेल्या सीएम ऑफिस मधल्या कॉलमुळे अर्जट सायन हॉस्पीटलच्या शवागार विभागात जाण्याच बोलत होते. तेव्हा जेनीनेसुदधा सूरजची बॉडी बघण्यासाठी वायरेसोबत जायची इच्छा व्यक्त केली, परिस्थितीला समजत वायरेने जेनीलासुदधा सोबत येऊ दिलं. एका नॉर्मल मर्डर केसमध्ये आपली राजकीय चाल खेळण्याची सीएम प्रकाशची सवय वायरे जाणून होते. वायरे आणि जेनीच्या मनात राहूनराहून प्रश्न येत होता की सीएमचा या केसशी काय संबध. जेनी विचारात पडली.

वायरेने मोबाईलवर “डाँ. निर्मल रॉय” गुगल केलं. जेनीने आपल्या घरच्याशी ती हॉस्पीटलला जात असल्याचं सांगितलं. गुगलचा रिर्झ्ल्ट: डाँ. निर्मल रॉय - भारतीय वंशाचे अमेरिकन प्रसिदध वैज्ञानिक.

वय - सत्तर, अविवाहित.

****************

“सगळ्यांना सगळं माहित असतं…. राजकारणात स्वतःचा स्वतः वर देखील विश्वास ठेवू नये”

ट्रेनच्या डब्ब्यात रोजच्याप्रमाणे लोकाचं बोलण-चालणं चालू होतं. सदानंद ते सगळं ऐकत होता. लोक बोलत होती,

“अरे ती समोरची सगळी दुकान नाल्यावरचं तर बनलीयत, अरे सगळ्याना हप्ता दयावा लागतो, वरपर्यंत पैसा वाटला जातो.”

“अरे एवढीशी मुंबई, त्यात प्रत्येकासाठी जागा कशी वाचेल, अरे गरीब काय करेल?”

“तर काय नाल्यावर रुम बनवायची काय?”

“नाल्याचं सोड… मुंबई शहर सात छोटया छोटया बेटांना जोडून बनलेलं आहे. आता बोल! आणि ही सगळी झोपडपटटी… हे सगळं पॉलिटिकल गिमीक आहे… आणि पॉलिटिक्ससाठी नेते लोक काही करु शकतात… काही… ही… वोटबॅकेपायी पूर्ण शहर दिलयं बलात्कार करण्यासाठी सोडून…”

“पॉलिटिक्सचा फक्त एकच ऐम असतो टिकून रहा.. कोणत्याही टोकाला का ना जावं लागेल… राजकारणाचा एकच रुल असतो… कुणावरही विश्वास ठेवू नका… कोणी कोणाचा मित्र नाही की दुश्मन नाही… वेळे-वेळेची गोष्ट आहे… प्रत्येक छोटा छोटा बदल एका मोठया बदलाचा हिस्सा असतो.. पब्लिकला सगळं माहित असतं.”

सुंशातची सवय होती एकदा न्यूजपेपर वाचला की राजकारणाच्या अनुषगांने बोलू लागतो, तो अश्या क्षणाची वाटच बघत होता, आताही तो बोला, “सगळ्याची जात एक सारखीच, पैश्यापासून राजकारण… राजकारणापासून पैसा… खूप घाणेरडं असतं पॉलिटिक्स… जितकं मोठया लेवलवर पॉलिटिक्स तितकें हात खराब करुन घ्यावे लागतात… सगळे राजकारणी सामान्य माणसाला चुतिया बनवत असतात… आणि पॉलिटिक्समध्ये कोणतीच गोष्ट मोफत केली जात नाही, ज्यांची जी किंमत आहे ती दयावीच लागते”

हे सगळं सदानंद मोठया सतर्कतेने ऐकत असे. असचं एकदा ऐकताना सदानंद स्वतःशीच हसत म्हणाला, ”एक पाईट मिळाला”.

****************

मुख्यमंत्र्याच्या मर्डरची योजना

ठिकाण- वाळकेश्वर, राजभवन

वेळ- रविवार एक वाजता

दिनांक – 28 मार्च 2016.

वाळेकश्वरच्या त्या उंचावरच्या उच्चभ्रू वस्तीतल्या बंगल्यापैकी “प्रकाशगड” बंगल्यावर सीएम प्रकाश आणि त्यांच्या मंत्रीमंडळातले वरिष्ठ मंत्री सुनील मांडके यांच्यासोबत टी.व्ही पाहत बसले होते. रम आणि व्हिस्की यांनी त्यांच्या समोरच टेबल सजून गेल होत. सीएम मांडके यांच्याशी बोलत होते, “हा क्षीरसागर विरोधी पक्षात असून पण खूप डिमांड करतो, टक्का वाढवायची गोष्टी करतो, वरुन हा रावत बिल्डर आम्हाला नजरअंदाज करतो, हदद केली त्याने.. अरे तुम्ही स्वतः मेहनत करा… जनतेमध्ये निवडून आलो आम्ही!.. तरी आमच्या हाती काहीच नाही…आमचा हक्क आहे.. जनतेने निवडून दिलयं… हक्काने मागा…प्रिया बिस्कीट…नाही व्हिस्की… हा..हा…हा”

सुनीलने सोबत असलेल्या सीएम प्रकाशने दिलेला ग्लास उठवत म्हणाले, ”त्या व्रजेश्वरीच्या रावत बिल्डरसोबत भांडण चालू आहेत क्षीरसागरची… आजकाल खूप न्यूजमध्ये आहे”

सीएम प्रकाश घोट रिचवत बोलले, ”साला हा क्षीरसागर नाटक पण असं करतो की हा एकच राजा हरिश्चंद्राची औलाद आहे, अरे त्या रावत डेव्हलपर्ससाठी मी एफएसआय एरिया वाढवून दिला आणि आता पार्टी फडाच्यावेळी टाळाटाळ करतो, यांचा प्रत्येकवेळी बिझनेस लॉसमध्ये कसा असतो… आता सांगतो मंदी सुरु आहे, वाटत यांचे दिवस भरत आलेत… तसंही आता रावतकडे राहील तरी काय आहे”

यावर सुनील म्हणाला, ”आता रावतही काही कामाचा नाही आणि या क्षीरसागरच पण तोंड बंद कराव लागेल, माझ्याकडे एक प्रोपजल आहे जर तुम्ही मंजूर करणार असाल तर, तुम्ही दोन शार्पशूटरना जेलमधून बाहेर काढण्याची परमिशन दयाल तर… त्याचं शार्पशूटरकडून रावत बिल्डरचा काटा काढू आणि त्यांच्याकडून कबूल करुन घेऊ की हे सगळं क्षीरसागरच्या सांगण्यावरुन केलं गेलं.”

काहीसा विचार करत मुख्यमंत्री प्रकाश म्हणाले, ”चांगली गोष्ट आहे, एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील, खोटी केस बनवून दयायची मग काय तोंड ही बंद होईल आणि टक्केवारीसुदधा”

****************

क्षीरसागर यांनी फोन उचला, आणि ठीक आहे म्हणत गाडीत बसून सुनीलकडे भेटण्यासाठी गेले.

सुनिलची अंतिम योजना

ठिकाण- सुनीलच घर

वेळ- शुक्रवार रात्री बारा वाजता

दिनांक – 21 मार्च 2016

सुनील यांनी क्षीरसागर यांना भेटताच कडकडून मिठी मारली, “नमस्कार क्षीरसागरजी, बोला, कसे आहात? आज आमच्या सारख्या सज्जन माणसांची आठवण कशी आली म्हणायची”

सुनील एक आतला कावेबाज धूर्तपणा चेह-यावर आणत म्हणाले, ”तुम्हाला नाही वाटत का की माझ्या सारखा तळागाळातून आलेला सामान्य कार्यकर्ता या शहराचा लोकप्रतिनिधी, राज्याचा मुख्यमंत्री बनावा, मला त्यासाठी तुमची मदत लागेल, जर मी मुख्यमंत्री झालो तर तुमच्या सुखा-समाधानाचा निश्चित विचार आणि काळजी घेतली जाईल.. तुम्ही तर हुशार आहात अश्या खेळामध्ये… फक्त काही दिवसांसाठी मीडीयामध्ये बातमी बनू दे, वातावरण बनू दे, कदाचित आपले चांगले दिवस सुरु होतील, तुम्हाला तर रावत डेव्हलपर्स माहित असेल… त्यांच्याविरुदध बोला… हे प्रकाश..आपले मुख्यमंत्री… त्यांच्याच हाताने.. नही त्यांच्या मंजूरीच्या सहीने… त्यांचच मरण लिहतो बघा…”

****************

मुख्यमंत्र्यांचं विषयापासून वेगळं होणं

ठिकाण- पार्टी ऑफिस

वेळ- रविवार सकाळी नऊ

दिनांक – 24 एप्रिल 2016

टी.व्हीवर बातम्या सुरु होत्या आणि मुख्यमंत्री प्रकाश जास्त रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नव्हते.

सीएम प्रकाश सुनीलला म्हणाले ”कोणत्यातरी चुकीच्या माणसांचा खून केलाय, अजून बिल्डरचा काटा काढणं बाकी आहे, कोणते शार्पशूटर आहेत हे”

सीएम प्रकाश आता स्वतःशीच बोलत होते, ”काय सांगून टाकू या दोन्ही शार्पशूटरांचा पत्ता पोलीसांना, का त्या बिल्डरच्या मरण्याची वाट बघू?”

सीएम प्रकाश यांच अस्वस्थ होणं वाढतच चाललं होतं. ते आता सुनीलला म्हणाले, ”ही चुकीची माहिती दिली कुणी यांना, नाही आता त्यांच्यापासून दूर राहण्यातच भलं आहे… वातावरण थंड होऊ दे… त्या शार्पशूटरनां आता अजिबात कॉन्टॅक्ट करु नका, पुलिसांना शोधू देत, त्या क्षीरसागरला मी नंतर बघून घेईन.”

“नको सुनील, आता जास्त रिस्क घेण्याची काही एक गरज नाहीय, जनता ऑलरेडी खूप वैतागलेली आहे, अजून एक खून नको.. प्लॅन कन्सॅल… नको पाठवू कोणता फोटो आता.. सोडून दे त्या शार्पशूटरना आहे तिथे…असचं… मुंबई पोलीसांना शोधू देत काय ते त्यांना… आता लागोलाग निवडणुका पण आहे डोक्यावर”

सुनीलने वातावरणाचा अंदाज घेत आता कोणताही फोटो न पाठवण्याचा म्हणजेच सीएम प्रकाश यांचा फोटो न पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकला.

सीएम प्रकाश जुकाते यांना विरोधी पार्टीनेता क्षीरसागर यांचा या गोष्टीचा खूप राग आला की सीसीटीव्ही कॅमेराच्या खरेदीच्या टेंडरमध्ये लाचेचा आपला हिस्सा घेऊन सुदधा फक्त मिडियामध्ये चमकोगिरी करण्यासाठी त्यांने आपले मतप्रदर्शन मुददाम केलं होतं आणि आता वरुन संपूर्ण प्लॅनच उलटा पडला होता, कुणा चुकीच्या माणसांचा खुन केला गेला होता शार्पशूटर लोकांकडून, तो म्हणजेच सूरज, आणि हयाच सगळ्या गोष्टीवर विचार करत असताना आलेल्या एका प्रप्रोजलला त्यांनी हो म्हटलं, कोणताही मागचा पुढचा विचार न करता… सूरजची बॉडी त्यांनी वैज्ञानिक रॉय यांना शवागरामधून घेवून जाण्यास मंजूरी दिली, आता त्यांच्यावर कोणतही पोस्टमार्टम होणार नव्हतं, मुख्यमंत्री यांची सक्त ताकीद होती की मिडिया आणि अन्य कोणत्याही पत्रकाराला या बदल कोणतीही माहिती मिळता कामा नये.

या सगळ्या गोष्टी सीएम आपल्या पीएच्या दवारे करत होते. त्यांने सगळ्या गोष्टी ठावठिकाण्याला लावत म्हटलं ”काळजी करु नका साहेब, असंही आता सगळे मिडिया हाऊससेस इंडस्ट्रीअयलिस्टच चालवतात, पुढच्या महिन्यात टॅक्स बिल येतयं, मंजूर होईपर्यंत कॉरपरेटवाले गॅसवरच आहेत.. निश्चित राहा… बातमी अजिबात बाहेर जाणार नाही”

****************

ठिकाण- शवगृह

वेळ- रविवारी, सकाळी 9.45 वाजता

दिनांक – 24 एप्रिल 2016

सूरजच्या बॉडी सोबत कोणत्याही प्रकारचं विच्छेदन करण्यात आलं नव्हतं. जेनीसोबत आलेला तिचा भाऊ आणि वडील यांना आत येण्याची परवानगी नव्हती. सायन हॉस्पिटलच्या त्या शवागार विभागातल्या एक-एक करत असलेल्या प्रेताच्या रकान्यातून शेवटी ते सूरजचं प्रेत पाहून जेनी रडायला लागली. गळ्याकडच्या बाजूने दोन हिस्यात विभागलेलं शरीर पाहताना जेनी स्वतःला रोखू शकली नाही. इतक्यात तिथे वायरे आले.

“स्वतःला सावर जेनी, सूरजच्या हत्येमागे कोण आहे हे नक्की शोधू.. आमचे प्रयत्न चालू आहेत”

जेव्हापासून सूरजच्या मेलेल्या शरीराला पाहिलं तेव्हापासून जेनी काहीतरी वेगळं अनुभवत होती, हे तिने या अगोदर कधीच अनुभवलं नव्हतं.

जसं की कोणती तरी वस्तू हरवली आहे पण त्याचं दुख नाही आहे कारण आपल्याला माहित असतं की ती कुठेतरी ती सुरक्षित असेल, त्यांच्या असण्याची, अस्तित्वाची जाणीव असते… जास्त कुठे दूर गेल्या नसण्याची… इथेच असल्याची…आसपास…..

ती आता सतत भगवानदास बाबाचं नाव घेत होती.

जेनी सावरत वायरे यांना म्हटलं, ”इन्सपेकटर मला वाटत की आपल्याला लवकरात लवकर सूरजवर अंतिम संस्कार करावे लागतील, मला वाटत की त्यांचा आत्मा इथचं कुठेतरी फिरतोय”

जेनीच्या बोलण्यावर वायरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पण त्याचवेळी वायरे यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरु होतं. सूरजच शव हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर करण्यात आलेल्या काही टेस्टचे रिपोर्ट देण्यासाठी एक माणूस दरवाज्यापाशी आला ते घेण्यासाठी वायरे गेले असता, आसपास कोणी बघत नसल्याचं बारकाईने ईकडेतिकडे पाहत सूरजच्या डाव्या अंगठयाचा ठसा घेण्यात जेनी सफल झाली, रिपोर्ट हातात घेत वायरे पुन्हा जेनीपाशी येऊन थांबला आणि म्हणाले, ”आता ही केस राजकारणाच्या पेचात सापडलीय, जेनी मला वाटतयं की आता इतक्यात तरी अंतिम संस्कार होतील की नाही या बदल शंका आहे.. काहीतरी मोठं कारस्थान असणार इतकं मात्र नक्की”

आता ते मघाशी आलेले रिपोर्ट पाहिल्यानंतर वायरे दंग झाले, त्या रिपोर्टनुसार सूरजच्या डोक्याकडच्या भागात एक छोटीशी किल्पच्या आकाराचं डिव्हाईस बसवण्यात आलं होतं…. हया सगळ्या एकामागोमागच्या घटनांमुळे त्याचं डोकं काम करेनासं झालं, तरी अजून सूरजच्या शरीरासोबत कोणत्याही प्रकारची छेडखानी केली गेली नव्हती.

इतक्यात एक म्हातारा इसम ज्याचं वय सत्तरीच्या आसपास होत तो सूटाबूटात आपल्या असिस्टटंसोबत तिथं आला. सीएम ऑफिसवरुन आलेल्या फोन कॉलमुळे वायरेला राग आवरता घेत नम्रतापूर्वक बोलावं लागत होतं. वायरे जेनीला त्या म्हाता-या इसमाकडे रोखकरुन म्हणाला, “जेनी तू यांना ओळखतेस ना! हे वैज्ञानिक डाँ. निर्मल रॉय”

सुभाषने जेनीच्या दिशेने हात दाखवत रॉयशी हातमिळवणी केली. जेनीने आपली आसवं रुमालाने टिपत तसाच निव्वळ नकार दर्शवला. वायरेने सूरजच्या प्रेताला नेण्यासाठी रॉय यांच्या अस्टिस्टला खूणावलं त्यांच्या सोबत असलेल्या अजून दोन मदतनीसाच्या मदतीने ते प्रेत नेण्याच्या तयारीला लागले. सुभाष वायरे जेनीला कुत्सित होत म्हणाले, ” खरं म्हणजे रॉय (Human Body Expert) मनुष्य शरीरचिकीत्सक तज्ञ आणि (Mind Expert) मनवैज्ञानिक तज्ञसुदधा आहेत, खूप मोठी आसामी आहेत.. आणि इतकंच नाही.. देश-विदेशात खूप फेमस आहेत.. खूप सारे पेटटं यांच्या नावावर आहेत… ज्यांच्याशी सूरज शेवटचा फोनवर बोलला ती व्यक्ती रॉय होते, त्यांच्याशी काल रात्री जुजबी बोलणं झालयं अजून त्यांची जबानी घेणं बाकी आहे” वायरेने राग आवरत चेह-यावर खोटं हसत म्हणाला, ”खूप मोठया लोकांची ओळख आहे यांची… खूप पोचलेले वैज्ञानिक आहेत”

रॉय सोबत असलेल्या अंसिस्टटने वातावरण निव्वळण्याच्या उददेशाने म्हटलं ”रॉय यांनासुदधा सूरजच्या निधनाचं दुख आहे कारण तो त्यांच्या एका महत्तवकांक्षी प्रोजेक्टचा मुख्य हिस्सा होता आणि ही बॉडी आता रॉय यांच्याच ताब्यात जाणार आहे”

रॉय यांनी एका हाताने मोबाईल कानाजवळ पकडत दुसरा हात हस्तांदोलनासाठी जेनीकडे नेत म्हटलं ”तुमच्याबददल वायरेकडून आम्हाला कळालं, खूप वाईट वाटलं, सूरजला आम्ही केवळ दीड वर्षापासून ओळखतो, तुमचा तर जवळचा मित्र गेला पण माझी तर आयुष्यभराची मेहनत, सगळ्या आशा-आंकाक्षा त्यांच्यावरच टिकून होत्या त्या आता सा-या नष्ट झाल्यात”

हे बोलणं पुढे चालू राहिलं इतक्यात रॉय फोनवर बोलू लागले,

“धन्यवाद, सीएमसाहेब, जर सगळं काही शक्य झाल तरं परिणाम चमत्कार म्हणण्याच्या लायकीचे असू शकतात… अदभूत… असंभवनीय… तुम्ही तर मंजूरी दिलीय, पण अजून आमची जबानी घेणं बाकी आहे…काय वायरेजी…बरोबर ना!”

मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या आदेशामुळे आपल्या हातातला मेडिकल रिपोर्ट सुभाष वायरेने रॉयला सोपवला.

वायरेने विषय बदलवण्याच्या हेतूने म्हटलं, ”रॉय तुम्ही मराठी छान बोलता इतकी वर्ष अमेरिकेत राहूनसुदधा”

“तुम्हाला कुणी सांगितल अमेरिकेत भारतीय भाषा बोलल्या जात नाही म्हणून, आता मी वेगळं काय सांगू भारताच्या फ्री एक्सपोर्टच्या विषयी… यूएस रिर्ट्नला तर आरतीने ओवाळलं जात या देशात” काहीसे कुत्सित हसत वायरे म्हणाले.

मग वायरे काहीश्या रागेने म्हणाला, ”हे बघा, तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयाची मदत जरुर घेतली…. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर मला जराही संशय आला की सूरजच्या हत्येमध्ये तुमचा हात आहे तर मी तुम्हालादेखील सोडणार नाही”

हे बोलणं पुढे चालू राहिलं इतक्यात वायरेला पोलिस स्टेशनमधून आलेल्या फोन कॉलमुळे बाहेर यावं लागलं, त्यांनी रॉय आणि जेनीला सुदधा बाहेर यायला सांगितलं. वायरे काहीशे गंभीर दिसत होते, काही बातमी होती जी त्यांना आश्चर्यचकित करुन गेली होती, सूरजच्या घरुन काही वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.

“ठीक आहे मी येतो पोलीस स्टेशनला, सूरजच्या घरुन जे काही मिळालं ते खूप बारकाईने तपासून घ्या” वायरेने फोन ठेवला. त्यांनी हे सगळं जेनी आणि रॉय यांच्या समोर बोलणं ठीक नाही वाटलं.

जेनी आणि रॉय यांची जबानी आणि पोलीस प्रोसेससाठी आपल्या गाडीमधून पोलीस स्टेशन येण्यासाठी सांगितलं आणि त्या दोघांनीही ते मान्य केलं.

पण जेनी आपल्या मनामधून सूरजला काढून टाकू शकत नव्हती, आणि याव्यक्तिरिक्त रॉय सूरजच्या बॉडीसोबत काय करणार आहेत याविषयी तिला हूरहूर वाटत होतीच. जेनी मनातल्या मनात म्हणत होती, ”काय त्यांचा आत्मा असाच भटकत राहिल, मला भगवानबाबानां भेटावं लागेल… हे देवा…तेच कायतरी रस्ता दाखवतील”

जेनीने वडील आणि भावाला घरी जाण्यास सांगितली, पण सुरवातीला तयार नव्हते पण वायरे यांनी त्यांना विश्वासात घेतलं त्यानंतर ते मान्य झालं. जेनीला या सूरजच्या बाबतीत घरातल्याना पडू दयायचं नव्हतं.

****************

गाडीमध्ये वायरे, रॉय, जेनी आणि दोन कॉन्सटेबल बसले होते, केसची गुंतागुंत पाहता गाडीमध्येच वायरेने सूरजबदल रॉयला सांगितलं, सत्तर वय झालेल्या त्या वैज्ञानिकाने एकाएकी आपला चष्मा हटवला, डोळ्यातून आलेली आसवं पुसत ते सांगू लागले.

********RESEARCH********

ठिकाण- रस्ता

वेळ- रविवार दहा वाजून तीस मिनिट

दिनांक- 24 एप्रिल 2016.
अमेरिकामध्ये-

माझ्या Mind Networking (मन जुळवीकरण)च्या संबधित माझ्या अजून एका पेटंटला अमेरिकेत मान्यता मिळाली होती पण त्या विषयावरची पुढील परीक्षण आणि प्रयोग तिथे करणं कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठीण होऊन बसलं होतं. परीक्षणा दरम्यान कुणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो. तुम्हाला तर चांगलच माहित असेलच इथली कायदाव्यवस्था.

भारतात दाखल 25 मे 2014

तर मी पुन्हा पंचवीस वर्षानंतर भारतात येऊन माझ्या प्रोजेक्टवर काम सुरु केलय.

****************

ठिकाण- प्रयोगशाळा

मनुष्य शरीराच्या मन आणि त्यांच्या सोबत असणा-या जीवात्मा… ज्यांच्या जाण्याने येणारा मृत्यू… च्या संबधित माझे प्रयोग चालू होते. मी माझ्या यूएसएमधल्या पेटंटचा भाग असलेले डिव्हाईस डोक्याच्या जिथे आपली मज्जासंस्था (Nervous System) काम करते….

इतक्यात रॉय सोबतच्या मदतनीसाने लॅपटॉपवर त्याच प्रारुप दाखवायला सुरवात केली.

तिथे एक माक्ररोचीप जोडली. जिचा संबंध सरळ मनाशी जोडला गेलाय, मला एक अशी एक सिस्टम बनवायची होती जी आम्हाला…

रॉय त्यांच्या मुंबईत आल्यानंतर सुरु झालेल्या नव्या सफरीबदल सांगू लागले.

ते आल्या आल्याच नेहरु सायन्स हॉलमध्ये दिलेल्या भाषणाने तिथला माहौल पूर्णपणे बदलून गेला होता.

“मला या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटत की आपण विज्ञान-विज्ञान असं मोठमोठयाने ओरडत असतो, पण आपण अजून तरी दहा टक्केसुदधा नीटपणे मनुष्य शरीर आणि मन याविषयी संशोधन करु शकलेलो नाही, सरकार इथं नवीन उपग्रह आणि क्षेपणास्त्र मोहिमांवर पाण्यासारखा पैसा खर्च करते, पण मी त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी हया ग्रह-ता-यांशी जोडल्या जाण्याच्या एकूण हास्यास्पद प्रकारामधून काढता पाय घेईल, संपूर्ण ब्रम्हांडाला मनाच्या शक्तीने बघू शकतो… हो हे शक्य आहे, ना आपण मानवीय मनांच्या संबधित संशोधनाला महत्तव देत आणि ना इथली सरकारं त्याला गरजेचं समजत, मनाच्या शक्तीला जाणलं, तर हे चंद्र आणि बाकी ग्रहावर प्रत्यक्ष जाण्याची गरज राहणार नाही, तर जर आपण योग्य दिशेने, न थांबता आपलं संशोधन चालू ठेवलं तर आपण निर्सगाचा एक नवा अविष्कार शोधू शकू, मला वाटतं आपण ज्या गोष्टीपासून बनलो, विकसित झालो… मग तो डार्विनच्या सिंद्धांतानुसार अमीबा असू देत… किंवा कोणी अंतिम विधाता… ज्यांचा आपण मूळतः स्वतः हा बनवलेला ढाचा, कोणती ना कोणती चूक होऊनच जाते.. बनवण्यामध्ये… काही तरी पुरावा सोडलाच जातो.. फक्त तो शोधण्याची जिदद पाहिजे, जेवढी दुनिया सोपी दिसते तितकी ती नाहीयं आणि इतकी ही गूढ नाहीय जितकी आपण समजतो… न्यूटनचं सफरचंद असू देत किंवा रॉबेट बंधूच विमान, शतकापासून नजरअंदाज आणि आपण एका मोठया अविष्कारापासून वंचित राहतो, इतकी हजारो वर्ष आपल्या लोकांना झोपून काढली… पण आता आपल्याला सतर्क राहावं लागेल, मला खात्री आहे की तो दिवस आता दूर नाहीय जेव्हा आम्ही त्या प्रत्येकाला मृत्यूच्या कबरेतून जिवंत बाहेर काढू ज्याला तुम्ही मृत समजून दफन केलतं. सगळं शक्य आहे विज्ञानात….कसलीही बंधन नाहीत.. परीकल्पनेच्याही पलीकडे… पहिला विश्वास ठेवा मग ते होईल, First you belive then it happened… जय हिंद…” नेहरु सायन्स हॉलच्या प्रेक्षकामध्ये या भाषणाने खळबळ माजवून दिली होती.

भाषण संपताच टाळ्याच्या आवाजाने सगळं वातावरण रॉयमय झालं होतं, मिडीयाच्या कॅमेरामनपासून सामान्य श्रोता, प्रत्येकजण त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी उत्सुक होता, ब-याच वेळाने गर्दी ओसरली, काही तुरळक लोक अजूनही थांबली होती, त्यापैकीच एक तरुण आवाज पुढे होत हस्तांदोलन करत म्हणाला, ”सर तुमचं भाषण खूपच चांगल झालं, मला तुमचा किंमती वेळ मिळू शकतो का?, मला तुम्हाला प्रत्यक्ष खाजगीत भेटणं झालं असतं तर बरं झालं असतं”. “का नाही निश्चितपणे, भेटण्याचं काही खास कारण”. हाच सूरज होता. “सर माझं नाव सूरज, मी एक चित्रकार आहे, मी तुमचे विचार कॅनव्हासवर चितारु इच्छितो”

सूरजला असचं खुशखुशीत बोलायची सवय होती.

रॉयसुदधा तितक्याच तडफदारपणे म्हणाले, ”वा, मग परवा या, तसा मी व्यस्त आहे पण वेळ काढेन, माझ्या प्रयोगशाळेत…या.. जरुर”

मी माझ्या काही व्यक्तिगत फायदयासाठी त्याला हो म्हटलं होत, नाहीतर मी असं कुणालाही सहजासहजी हो म्हणत नाही.

रॉय-सूरज बोलणं.

शहरापासून काही अंतरावर मोठया विस्तीर्ण पन्नास एकरच्या परिसरात असलेली प्रयोगशाळा आधुनिक सोयीसुविधा आणि इतर सामुग्रीने भरलेली होती. रॉयसोबत काम करणा-या टीममध्ये जवळजवळ शंभरच्या आसपास लोक होती. इतकी सारी लोक आणि एवढया मोठया जागेचा सूरजला अंदाज नव्हता, तो हे सगळं बघून चकित होता. तो दिलेल्या वेळेच्या हिशोबाने दहा वाजता पोचला होता, साधारण दहा-पंधरा मिनिटांनी रॉयच्या केबिनमध्ये सूरज गेला. त्या दोघांमध्ये बोलण्याचा सिलसिला सुरु झाला.

“कॅनव्हासवर उतरवण्याची काही खास कारण?”

“यावर्षीच्या प्रसिदध जहागीर आर्ट कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय, पूर्ण देशभरातून पाचशे नवोदित कलाकारांमधून बाराची निवड झालीय, जर ही स्पर्धा जिंकलो तर नाव होईल आणि पुढे काम मिळणं सोप होतं.”

“पण त्याला तर वेळ आहे ना अजून?”

“हो, विषय आणि नोंदणी एक वर्ष अगोदरच होते”

“मग आमच्याकडून काय माहित करुन घ्यायचयं?”

“तेच सर अकचुली, मला माझ्या विषयाच्या संबधी पेंटीग बनवायची आहेत आणि कोंइनसीडन्टशली तुम्ही तर या दोन्ही विषयांतले ज्येष्ठ अभ्यासक, तुमचं “मनुष्य शरीर आणि मन” या विषयावर इतक्या वर्षाचं रिर्स्च आहे, तुम्ही तर चांगले लेखक सुदधा आहात, सायन्स सारख्या गुंतागुंतीच्या कनसेप्ट अगदी सोप्या भाषेत लिहता, मी सुदधा तुमची पुस्तक वाचलीयत खूप सारी, तीच तुमची ओळख, त्यातूनच प्रत्यक्ष भेटावसं वाटलं, सर तुम्हाला काय वाटत? शरीर आणि मन दोन्हीबदल.”

“याबदल खूपवेळा बोललोय, लिहलंसदुधा… बरीच थीसीस डेवल्प झालीय. पण जगाला पैरकटिकल पुरावा लागतो. ही जी लोक दिवसभर फिरतात अवकाशाभोवती आणि काहीच त्यांना त्यांची जाणीवच होत नाही हे सत्य आहे. आपण वेदनाला पाहू शकत नाही पण अनभवू शकतो, पण ख-या अर्थाने बघायला गेल तर ती आपल्या शरीराची कमजोरी आहे की त्यांच जिवंतपण आपल्या डोळ्याला दिसत नाही, तीच गोष्ट आहे शरीर आणि मनाची, ये मी तुला प्रोजेक्ट दाखवतो, कदाचित तुला कॅन्वहासवर उतरवायला मदत होईल, पण हा सगळे पेंटीगचा शौक कधी पासून, आणि या स्पर्धेमध्ये उतरण्याचं काही खास कारण की फक्त पैसा.”

“आता करिअर यामध्ये निवडलयं तर पैसा तर महत्तवाचा आहे, पण तुमच्या कलेमध्ये दमखम असेल तर ऐकलयं की हे शहर कदर करत, उतरवत असतो इमोशनना….भावनानां… कोणीना कोणी तर किंमत लावेल पैश्यामध्ये, पण लहानपणापासूनच पेंटीगचा शौक होता… गॉड गिफ्ट…”

“गॉड.. अच्छा देवाला मानतोस?”

“हा थोडफार, सर पण तुम्ही तर नास्तिक आहात ना, मी वाचलयं तुमच्याबदल”

“खूप रिर्स्च करुन आलेला दिसतोयस”

“ही मान अशी का मोडतोस बरं”

“असचं, सवय आहे लहानपणापासून”

“सायंटिस्ट असण्यासोबत नास्तिक असण्याने अवकाशात यान सोडल्यावर मंदिरात नारळ फोडण्याची गरज राहत नाही… जोक होता… बर ते जाऊ देत तू मुंबईत कधीपासून?”

इतकं बोलून रॉयने आपल्या केबिनमध्ये चालू असलेल्या डेक्सटॉपवर सुरु असलेल्या प्रेजेटेशन व्हिडिओच्या दिशेने ध्यान वळवलं, दरवाजा मागे करत सूरज खुर्चीला पकडत बोलला.

“बस हे आता एक वर्ष झालं आहे.. शिमल्यात गेलं बालपण”

“शिमल्यात कुठे?”

“सुंदरनगर लेक”

“ते तर तिथून खूप दूर आहे, जवळजवळ तीन तासाच्या अंतरावर आहे शिमल्यापासून, शिमला खास जागा होती एकेकाळी माझ्यासाठी, जीवनातील दहा अयशस्वी वर्ष शिमल्यात काढली होती, अमानवीय मानव… अनहुमन हुमन… आणि तिथूनच अमेरिकेला निघून गेलो… सोड जाऊ देत त्या पच्चीस वर्ष जुन्या गोष्टी”

“सहा अर्भकावर प्रयोग…एक्सपीरीमेंट.. त्याचे मृतदेह.. मी वाचलयं ते सगळं आणि नंतर तुमची सुटका पण झाली होती त्या प्रकरणातून”

“हा आभारी आहे न्यायलयाचा, पण शिमला वेगळं आहे मुंबईपेक्षा….”

“हा इथं राहायला शिकतोय आता, शिमला खूपच शांत आहे, इथे तर प्रत्येकवेळी गर्दी असते, झोपडपटटीत राहणं थोडं जड जातयं, शिमलामध्ये पण वडिलांना पैसे पाठवावे लागतात, लोकांची सतत चोवीस तास धावपळ सुरु असते, हे शहर झोपतच नाही. शांतपणे काम करणं कठीण होऊन बसत, पण करतो, कदाचित ही वेळ ही कामी येईल पेंटीग उतरवण्यासाठी, शेवटी काय तर तुम्ही जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत आतमधून येत नाही… आणि कॅन्वहासवरदेखील उतरत नाही.”

****************

ठिकाण- हायवे रोड

वेळ- रविवारी सकाळी अकरा वाजता

दिनांक – 24 एप्रिल 2016

गाडी अजूनही ट्रैफिकमध्येच अडकली होती.

रॉय सांगत होते,

आणि इथे भारतात माझ्या प्रोजेक्टची रुपरेषा बनली होती, पण अजूनही खूप काम बाकी होतं, शेवटी हा काही साधारण प्रयोग नव्हता, हा माणसावर होणारा प्रयोग होता, माझ्या मागच्या चाळीस वर्षाचा अनुभव जोडून बनणा-या या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसमधून थोडं का होईना जर एखादी अनोळखी साखळी.. शाखा… विज्ञानासाठी खुलली तर मानवी समाजाच्या जगण्याचा अंदाजच बदलून जाईल. मला खात्री आहे की आपण त्या प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतो जी अशक्यप्राय वाटते. थोडीशी अजून मेहनत आणि कोड सुटेल… मी सूरजच्या समोर एक प्रप्रोजल ठेवलं होतं.

****************

ठिकाण- रॉय यांची प्रयोगशाळा

वेळ- रविवारी रात्री 10.40

दिनांक – 23 एप्रिल 2015

रॉय म्हणाले, काय विचार करतोस, मुंबईतल्या पॉश एरियात रेन्टेट फ्लॅट… भाडं आम्ही देऊ, शहरात आहे काही जागा, जिथे शांतता पैशाने विकत घेता येतात, वरुन तूचं म्हटलं होतस ना, आत्माशी… आत्मप्रेरणेशी जोडायला मिळेल, तर अशी संधी सारखी सारखी येत नाही, जो पर्यंत आतून अनुभवत नाहीस, चित्र तोपर्यंत चांगली येणार नाही, त्यांच्यासाठी शांतता गरजेची आहे, विचार कर…. काय चित्र चितारशील, आणि एक छोटसं ऑपेरेशन तर करायचयं, माहितही नाही पडणार… कधी झालं…. नाही झालं…., लेपरोस्कोपिक सर्जरी, बाकी तुला चोवीस तास खुले आहेत पेंटीग करायला, फक्त दर पाच दिवसांनी संपूर्ण दिवस तुला एका छोटया रिपोटींगसाठी लॅबमध्ये यावं लागेल, सूरज विचारात होता त्याला खरचं एका शांतता असणा-या जागेची गरज होती, त्याला कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा जिंकायची होती.

सूरजने होकार दिला.

मला माझ्या प्रयोगासाठी एका अश्याच मुलांची अगदी तातडीने गरज होती, ज्याला शोधण्यात अजून वेळ वाया घालवायचा नव्हता, मी सूरजच्या शरीराला खरेदी केलं. एक तर या शहरात त्याचं कोणी नातेवाईक नव्हतं आणि तो कुंटूबासोबतदेखील इथे राहत नव्हता, आणि तो फ्री-लॉन्सर असल्याकारणाने आमच्यासाठी तो हवा तेव्हा अव्हेलेबल होता, पण त्यानं दिला होकार हा निव्वळ त्यांच्या चित्रकला…पेटींगसाठी… होता.

तो गुंतून गेला होता पेंटीग बनवण्यामध्ये, त्याला सुख भेटायचं, तो प्रत्येक पाच दिवसानंतर यायचा, सगळं काही व्यवस्थित सुरु होतं.

प्रयोगशाळेत पहिल्या दोन महिन्यामध्ये सगळी परीक्षणं साधारण येत होती, पण हळूहळू मी आणि माझ्या टीमने त्यांच्या मनासोबत प्रयोग करायला सुरवात केले, आणि त्यानंतर फक्त वीस दिवसानंतर आम्ही मन तरंगाना दुस-याच्या शरीरासोबत जोडण्यात यशस्वी झालो… ही अशक्य गोष्ट होती… विश्वास ठेवण्यापलीकडली.. पण ते सत्य होतं… सूरज कोणात्याही माणसांशी केवळ आपल्या मेंदूतील तंरगानी समोरच्याच्या मनाला उदपीत करु शकत होता, तेसुदधा समोरच्या व्यक्तीला आपल्या वशमध्ये न करता, त्यांच्या मनासमीप जाऊ शकत होता, ही संमोहनाच्या पुढची पायरी होती, कदाचित आम्ही क्रांतीच्या जवळ होतो, आम्ही सूरजला समजावलं की हे सगळं रोजच्या जगण्यामध्ये आतापासून अंमलात आणू नकोस जो पर्यंत आम्ही त्याचा सुरक्षित मार्ग शोधत नाही किंवा सफलतापूर्वक परीक्षण करत नाही, कारण यांमुळे काही उलटसुलट झालं तर जीवाला धोका होऊ शकतो, मला माहित नाही की तो हे सगळं बाहेरच्या रोजच्या जगण्यात आजमवत होता की नाही, आम्हाला तो बाहेर काय करत होता याच्याशी काही घेणं देण नव्हतं, चिंता नव्हती, आम्हाला आमच्या प्रयोगावर लक्ष दयायचं होतं, आम्ही आमचे प्रयोग चालू ठेवले होते, त्या सहा महिन्याच्या काळात आम्ही खूप काही आजमावून बघितलं होतं.

****************

सहा महिन्याच्या प्रयोगानंतर (17 ऑक्टोबर 2015)

ठिकाण- रॉयच्या प्रयोगशाळेत

वेळ – रविवारी दुपारी वाजता

तारीख – 17 ऑक्टोबर 2015

रॉय सूरजला प्रशिक्षण हेतू सांगत होते, ते त्याला खूप सा-या सूचना करत होते, सूरज आपले डोळे बंद करुन आजमवत असे.

रॉय वायरेला हेच सगळं सांगत होते.

शरीराची निर्विकार अवस्था, ज्याने आपण आपल्या जीवात्माला कुठूनही कसंही अनभवू शकतो, एक अशी अवस्था जिचा उत्साह डोक्यात थैमान घालत असेल, श्वासचं नियंत्रण असूनदेखील त्या हव्या त्या स्थितीत नाही पोचू शकत, मरणाच्या दाराजवळ जाणारे क्षण, जिथून परत येण्याची मजाच वेगळी असते, आपल आपल्या श्वासावर नियंत्रण करत शरीराशी जोडलेल्या प्रत्येक अंगाला मोकळ करत, शरीरातल्या प्रत्येक त्या नसेला रोखून धरायचं ज्याने शरीरात रक्तप्रवाह पुढे जातो, त्याला वेगळं करत जीवात्माला जिंवत ठेवत शरीराला एका क्षणाला का होईना मृत करणं, खूपच अचंबित करणारी अवस्था, पण यात जीव जाण्याचा ही धोका होता, हा त्यांचा प्रयोग होता, त्यांना विश्वास होता की शरीराची अशी कोणतीतरी अवस्था असणार आहे जिथे शरीराची अवस्था मृत होत त्यांच्यातला जीवात्मा तसाच निपचित राहिलं. समाधी अवस्था, मनुष्य इथल्याच वातावरणात बनलाय, तो विजयी नाही होऊ शकत का त्या मृत्यूवर.. त्यांला हरवत… जी केवळ एक आपली रासायनिक प्रक्रिया बंद करत.. आपल्या शरीराची त्वचा… हदयाच्या धडधडीला थांबवून आपण मनाला खोलवर रुतवत आपल्या स्वतःला जिंवत ठेवू शकतो. सगळं शक्य आहे…विज्ञान परिकल्पनेपेक्षाही अदभूत.. अशक्यप्राय… अविश्वसनीय… पहिल्यांदा विश्वास ठेवा मग ते होईल, First you Belive then it’s Happend

सूरज श्वास असा घेत होता की जसं खोल पाण्यात डुबकी मारल्यावर बाहेर किना-यावर येऊन श्वास घेण्यासाठी तडफडत धापा टाकाव्या.

सूरज विचारत होता, काय खरचं शक्य आहे?

रॉय म्हणाले, हे सगळं तुला करुन बघायचयं, या अवस्थेला जितक्या वेळा होईल तितक्यादां दिवसभर करत रहा. आपण प्रयोग करत राहू, जरुर काही ना काही नवीन अविष्कार निघेल, तू प्रयत्न चालू ठेव.

ठिकाण- रोडवरची ट्रफिक

वेळ- रविवार सकाळी 11.35

दिनांक – 24 एप्रिल 2016

रॉय म्हणाले, ”माझी सक्त ताकीद होती”

रॉय पुढे काही बोलणार इतक्यात थांबले, त्यांच्यासोबत असलेल्या मदतनीसाने मोबाईलवर आलेला मॅसेज त्यांना दाखवला आणि क्षणार्धात ते भडकले, ”हे काय आहे वायरे? तुम्ही माझ्या लॅबवर पोलीस का पाठवलेत? हे बघा यांचा परिणाम ठीक नाही होणार, मी इथे तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायला आलो आहे, तुम्हाला माझ्यावरतीच संशय आहे का? तिथं अश्याप्रकारे शोधाशोध करणं आमच्यासाठी नुकसानदायक गोष्ट आहे, माझे खूप सारे पेटंट प्रोसेसमध्ये आहेत, लॅबमध्ये खूपसारख्या महत्तवाच्या वस्तू आहेत”

सुभाष वायरेने यांची जास्त दखल न घेता स्वतःजवळ असलेल्या माहितेकडे पाहत म्हणाले, ” पण रॉय तुमच्या कॉल लिस्टमधला शेवटचा कॉल काही वेगळचं सांगतोय, तुम्ही त्याला धमकी दिली होती बघून घेण्याची, काही तरी भांडण झालं होतं, काहीतरी फिस्कटलं होतं”

जेनी हे सगळं निमूटपणे ऐकत होती, रॉय संबधी सूरजने कधीच सांगितल नव्हतं, हे सगळं ऐकून ती आतून अस्वस्थ झाली होती तिला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता, तीची नजर काहीशी शांत अनोळखी आणि धोक्याच्या भावनेने भरलेली होती, कोणाच्यातरी येण्याची वाट बघत असलेली.

रॉय रागाने बोलत म्हणाले, ”माझ्यात आणि त्यांच्यात वाद होते, मी ही गोष्ट मान्य करतो, त्याच्या त्या बकवास आर्ट प्रोजेक्टबदल मला राग येत होता, तो त्या आर्टीस्टवाल्या अवतारात कोण जाणे काय काय शोधत बसायचा, तो पूर्णपणे बदलत चालला होता, त्याचं रिर्स्चच काम भलतचं वाढलं होत, नुसते धर्मग्रंथ आणि धर्म या विषयाला वाहिलेली पुस्तक त्यांची तो पारायण करत बसे, वैज्ञानिक या नात्याने माझं नास्तिक असणं स्वाभाविक होतं पण जेव्हा तो माझ्या या प्रयोगाबदल हसायला लागला, तो पूर्णपणे धार्मिक गोष्टींच्या प्रभावाखाली आला होता, मी ही त्याला थोडं वाईट-साईट बोललो, यांच कारणामुळे मी त्यांच्या जहांगीर आर्टमध्ये लागलेल्या प्रदर्शनालाही गेलो नव्हतो”

****************

ठिकाण- सदानंदच घर आता

सुदेश टाईप करण्यात व्यग्र होता, सदानंदला कहानी लिहण्याच्या वेळच्या आठवणी दाटून आल्या.

त्यावेळी रेवती आणि सदानंद दोघही घरी होते, जेवण बनत होतं. रेवती म्हणाली, “ही एवढी वेलची साफ कर, खीर बनवते पटापट, अंगारकी संकष्टी आहे, मोदक बनवणं अजून बाकी आहे”. सदानंद कागदावर ठेवलेली वेलची साफ करत करत तो कागद वाचत होता, तो कागद म्हणजे एक जुन्या वर्तमानपत्र्याचा तुकडा होता… त्यावर नाडी ज्योतिष्य… असं लिहिलं होतं, सदानंदने इंटरनेट सुरु केलं मोबाईलवर… आणि टाकलं, नाडीज्योतिष्य… हे इन्टरेस्टिगं आहे… मस्त पाँईट बनेल सदानंद स्वतःशीच म्हणाला.

खीर बनली, घरातल्या त्या छोटेखानी देव्हा-यात मोदकाचं ताट गणपतीच्या तसबिरीसमोर ठेवलं. आईने सांगताच निमूटपणे नाईलाजाने सदानंदला हात जोडत समोर ठेवलेले मोदक देवाला वाहिले.

सदानंद आईला म्हणाला, “अगं एक उंदीर गणपतीचं वाहन कसं असू शकेल, आई तुला नाही वाटत का की हया सगळ्या रचलेल्या कहाण्या आहेत?”

त्याची देवभोळी आई रेवती त्यावर लगोलग म्हणाली, ”असं देवाबदल बोलू नये, भरल्या ताटावर नेहमी चांगल बोलावं, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, मला वाटलं होतं शिकून सवरुन तू हुशार होशील, पण तू तर अडाण्यासारखं बोलतोस, कमीतकमी संध्याकाळच्या वेळेला कामावरुन आल्यावर तर देव्हा-यात दिवा-बत्ती लावत जा, देवाला मानत नाहीस म्हणून काय झालं? लहानपणाचे सगळे संस्कार विसरत चाललायस तू, जा आता हे नैवदयाचं ताट बाहेर ठेव”

केळीच्या पानावर जेवण्याचे सगळे थोडे-थोडे पदार्थ एकएक करत वाढून ते केळीचं पान घराच्या कौलावर ठेवण्यासाठी रेवतीने सदानंदला बोलावलं, सदानंदला हे काहीएक पसंत नव्हतं, तो नाखुशीनेच हे सगळं करत होता, ”हे जेवणं कावळ्याना ठेवण्याची काही खरचं गरज आहे का?”

आई त्याला समजवण्याच्या स्वरात म्हणाली, ”सगळ्यानां आशा असते, प्रत्येक प्राणीमात्राला, जमीन, आकाश, वारा, पाणी सगळ्याला, हा जग चालवणा-याचं आपण आभारी असायला हवं, त्या रखवालदाराच्या कारणाने आपण इथे आहोत, ही जी जमीन जिच्यावर तू पाय ठेवलेस ती सुदधा फिरतेच आहे की, तीच्यात पण जीव आहेच ना!”

सदानंद विचारात होता, आईचं बोलणं चालूच होतं, ”आणि मला नको रोखूस उपावसाचं जेवणं कावळ्यानां वाढण्यापासून, तुझी उदया बायको येईल ना तिला रोख, हे सगळे रीतीरिवाज आहेत, तू नाही चालवणार तर कोण चालवणार, आपल्या पूर्वजांना आठवण ठेवायला पाहिजे, ग्रह-तारे ठीक तर आपण ठीक”

आईचं हे सगळं बोलणं नेहमीचचं होतं, सदानंद असाच मोबाईलवर पाहत होता, त्याचं लक्ष इमेज बॉक्स कडे गेलं, जेनीच्या फोटोकडे गेली आणि तो थांबला, त्याला मनोमन जेनी आठवत होती, जेवता जेवता सदानंदने आईला विचारलं, ”भगवदगीता कुठे ठेवलीयस”, “अरे वा! माझ्या बोलण्याचा इतका लवकर परिणाम झाला की काय?” आई लगेच म्हणाली.

जेनीने त्याला बायबल गिफ्ट केलं होत ते त्यानं कपाटातून बाहेर काढलं, रात्री टेबलावर तो भगवतगीता आणि बायबल घेऊन त्यांची पान चाळत होता, त्याला रहीमचाचाचं बोलणं आठवत होत.

****************

ठिकाण- प्रयोगशाळेत

दिनांक- 23 डिसेंबर 2015

रॉय यांच्या प्रयोगशाळेत सूरज हातात धर्मचिकित्सेला वाहिलेली पुस्तक घेवून हजर होता. “रॉय आपण विनाकारण इथं नाही आहोत, आपण सगळे कारण आहोत, त्या ईश्वराची देणं आहोत, त्याचे आपण नेहमी आभारी असायला हवं, आपल्याला सगळ्यानां…. मानवजातीला…., संपूर्ण विश्वाला ईश्वराने बनवलयं, तुम्ही ही जे प्रयोग करताय, हे देवाच्या नियोजनाचा भाग आहे, आणि आज ना उदया तुम्ही प्रयत्न चालू ठेवून एखादा नवा शोध लावाल तो ही या परमात्माच्या इच्छेचाच भाग असेल, मी आतापर्यंत जितके मोठे ग्रंथ वाचलेत, ते सगळे हेच सांगतायत, माझं मन आता पहिल्यापेक्षा अधिक हलकं वाटतयं, जो मार्ग तुम्ही निवडलाय, त्यात ईश्वर तुमची जरुर सहायता करो”

रॉयचा राग सातव्या टोकाला होता, तरी देखील त्यांनी स्वतःला रोखत रागाला नियंत्रित करत म्हटलं, ”तू माझ्या प्रोजेक्टला त्या कल्पेनच्या विश्वात रमणा-या बाजारु फुटकळ विचाराशीं जोडतोयस, मी इथे दिवस-रात्र एक करुन काहीतरी नवीन शोधतोय आणि तू फक्त त्याला परमेश्वरी इच्छा सांगून माझ्या मेहनतीचा मजाक उडवतोस, तू ठार वेडा झालायस”.

रॉयच्या प्रत्येक अरे ला सूरज कारे करत होता.

सूरज अजून रागाने बोलू लागला, ”अरेरे काय दुर्दैव, तुम्ही या गोष्टींना समजू शकला असता, माझ्या सारख्या माणसांच्या मेंदूमध्ये सुरवातीपासूनच कलात्मक दृष्टिकोन टाकणारा कोण आहे?, बाकी जणांना चित्रकला शिकायला खूप सारी वर्ष जावी लागतात आणि माझ्या सारख्या माणसाला हे सगळं जन्मजात कसं कळतं?”

रॉयला आता हे सगळं बाष्कळ वाटतं होत आणि सहनही होत नव्हतं, तो सूरजला म्हणाला ”बस कर सूरज, तुला काय वाटत एडिसनला इलेक्टरीक बल्बचा अविष्कार देवाने सांगितला, रॉबर्ट बंधूना विमान बनवायच्या संकल्पनेला ईश्वराने मदत केली, वॅटला इंजिन बनवायला लावणारा मेंदू देवाचा आहे?”

सूरज समोर ठेवलेले धर्मगंथ उचलले आणि तो रॉयना बोलू लागला, ” हे वाचा गीतेच्या दुस-या अध्यायतल्या सत्तावीसाव्या श्लोकात म्हटलयं, प्रत्येक जन्म घेणा-या प्राण्यामध्ये मृत्यू अटळ आहे, आपलं शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे, तो आत्मा आपलं हे भौतिक जग सोडून निघून जातो, नवव्या अध्यायतला चौथा श्लोक, तो सर्व प्राणिमात्रांत आहे, या पूर्ण चराचरात आहे… सगळं काही माझ्यामध्ये सामावलेलं आहे….All Beings Exits in Me…. आणि बायबल काय म्हणतं, येशू मध्येच जगाचा प्रकाश आहे, जो माझ्याजवळ येईल तो अंधाराकडे जाणारं नाहीतर त्यांच्या आयुष्यात प्रकाश येईल, काय आहे या सगळ्यांचा अर्थ, कुराणातली सहावी सूरहा, अल-अनमानने म्हटलयं, ज्याने आकाश आणि धरती बनवली,तसाच काळोख आणि उजेड बनवला, त्याचं अस्तित्व नाकारणारे लोक दुस-यांना त्या अंतिम शक्तीसारखं मानतात, तोच आहे त्यांने तुम्हाला मातीपासून बनवलं”

रॉयचा राग त्यांच्या चेह-यावर साफ दिसत होता, सूरजचं बोलणं चालूच होतं,

कुराणात लिहिलयं,आम्ही मानवाला खणखणणा-या मातीच्या सडलेल्या चिखलापासून निर्माण केले आहे. बायबलमध्ये लिहिलयं, “I have made the earth, and created man on it. It was-My hands-Stretched Out the heavens, and all their host I have commanded”

रॉय म्हणाले, “तू खरोखरच वाहत चाललायसं, गीता असो की कुराण की बायबल, ही सगळी मनुष्याने कल्पित आहेत, तू नाही समजून घेत आहेस की जे आजपर्यंत चारी दिशांना मनुष्यजीवाने मिळवलयं, ते फक्त आणि फक्त विज्ञानाने, ज्यांनी आपलं डोकं, मेंदू या कपोकल्पितं बनवण्यासाठी खर्ची घातलं ते हरले होते किंवा मग त्यांना विज्ञानाच अनुभव नव्हता, असंभवनीय संभावनाचा, ही तीच लोक आहेत जी म्हणत होती की आकाशाला स्पर्श करु शकत नाही, पृथ्वी शेषनागावर टिकून आहे… भूकंप…हा हा.. सायन्स… सायन्स…”

सूरज शांतपणे म्हणाला, “सायन्स...ते.. ते तुम्हाला गुंतवेल… तो पतितपावन परमेश्वर ज्यांच्या आपल्याला अधिन असायला हवं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळून पानी बनवलं आणि आपण विचार करत बसलो की दोन भिन्न विशेषणावाली, दोघांमधून विरोधी गुणधर्मवालं पानी कसं बनवलं, त्याला शोधणं इतकं सोपं नाहीय, तुम्ही त्याला कधी मिळवूही शकत नाही, मला वाटतं की हे धर्मग्रंथ हया मानवजातीच्या मूळतेचं प्रतिक आहेत आणि म्हणून त्यांचा स्वीकार व्हायला हवा”.

***********************

ठिकाण- ट्राफिकने गजबजलेला रोड

वेळ- रविवार दुपार बारा वाजता

दिनांक 24 एप्रिल 2016

रॉय यांच्या डोळ्यात पाणी होतं, ते सांगत होते,

तो आता पूर्णपणे बदलला होता, मला भीती होती की यांच्या बदलत्या मनामुळे माझ्या प्रोजेक्टवर काही परिणाम होतोय का… तो अचानक प्रोजेक्ट सोडून गेला तर…. पण तसं काही झालं नाही.

वायरे यांनी रॉय यांच बोलणं मघासपासून शांतपणे ऐकत होते आणि त्यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केला, बहुतेक त्यांच्या टीमने त्यांना हयाबदलची सगळी माहिती पुरवत असावेत ”अचेतन मनाची अवस्था आणि मरणानंतरच मन हे तुमचे चालू प्रयोग काहीतरी वेगळचं सांगू पाहतायत”

रॉय आता त्यांच्याबदलच स्पष्टीकरण देऊ लागले होते,

“आता सहा माहिन्याच्या प्रयोगानंतर आम्ही या आता तुम्ही सांगितलेल्या प्रोजेक्टवर काम सुरु केलं होतं, आमचं काम सुरुच होतं की सूरज मरण पावला, पण अजून प्रयोग संपलेला नाही, जर तुम्ही आम्हाला साध्या त-हेने परवानगी देत असाल तर या प्रोजेक्टला गती मिळेल आणि कदाचित नवा अविष्कार दुनिया पाहू शकेल”.

वायरेच्या मनात घुटमळत असलेली गोष्ट ते बोललेच शेवटी, ”तर हा पण अंदाज असू शकतो की सूरजला मारणं हा देखील तुमच्या प्रयोगाचा भाग असेल, माझं म्हणणं आहे की त्याचा खून हा तुमच्या प्रयोगाचाचं हिस्सा असेल”

पुढे काही बोलणं सुरु होईल इतक्यात पोलीसांची गाडी थांबली होती, जेनी, रॉय आणि वायरे तिघेही पोलीस स्टेशनच्या दिशेने जात होते, रॉय तिथून जातानाच वायरे यांना समजावण्याच्या सुरात म्हणाले, ”तर तुम्हाला वाटतयं की सूरजला सुनसान रस्तावर मारणं हा माझ्या प्रयोगाचा भाग होता, माझ्या बददल चांगल्या रीतीने जाणून घेतलं असतं तर तुमच्या मनात हा प्रश्नच आला नसता, जाऊन माझी भाषण, युटयूब विडीओ बघ, चाळीस वर्षांपासून हेच सांगत आलोय, हेच माझं संशोधन आहे”

ठिकाण- पोलीस स्टेशन

वेळ- रविवार दुपार 12.10 मिनिट

दिनांक – 24 एप्रिल 2016

सगळे पोलीस स्टेशनला आले होते, वायरेनी जेनीला बाहेरच थांबायला सांगून रॉयना आत बोलावलं,

वायरे सोबत असलेल्या पोलीस सहका-यांला म्हणाले, “जेनीला आता कुठेही जाऊ देऊ नका… पाणी पिण्यासाठी मागितलं तरी सध्या देऊ नका… आणि ते ब्लड टेस्ट करणारे आले की सांग…”

वायरे रॉयच्या काही व्हिडिओ बघत होता, त्याचं डोक चक्रावून गेलं.

ते सध्या पाहत असलेला व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा होता.

“माझं म्हणणं आहे की अकस्मात मरणानंतर आपल्या शरीराची एक रासायनिक अभिक्रिया बंद होते, ज्याला आपण सोप्या भाषेत मरण, मृत्यू म्हणतो, पण आपली काही नर्व्हस सिस्टिम बंद होते संपुष्टात येत नाही, तर जर आपण योग्य रितीने न थांबता शोध घेत राहिलो तर आपण निसर्गाचा एक नवा पैलू शोधूनच काढू”

ठिकाण- टेड टॉक्स (तीन महिन्यापूर्वीं)

“अचेतन मनाची अवस्था आणि मरणानंतरच मन” यांमध्ये जर माणूस मरणं पावला तर एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याला जिंवत करु शकतो, शंभर टक्के… तसं बघितल तर अजून सगळे प्रयोग होणं बाकी आहे, पण यामध्ये आपण मनुष्य शरीरातले कोणतेही अलग झालेले भाग, हिस्सा पुन्हा जोडू शकतो, हे येत्या काळात शक्य होणार आहे, हा संपूर्णपणे रक्तवाहिन्या, हाडामांसासकट शरीराचे भाग पुन्हा पूर्ववत काम करण्यालायक होऊ शकतो आणि यांना जोडण्यासाठी वेळही लागणार नाही… आम्हाला अजून प्रयोग करायचे आहेत… आम्हाला आजमवायचं आहे की मनुष्य पुन्हा जिंवत होऊ शकतो की नाही, आणि हे सगळे प्रयोग आम्ही फक्त सध्या मनुष्यावरचं करत आहोत कारण त्यांच्यावर होणारे प्रयोगाचे परिणाम समजणं तो आपल्याल्या कळणा-या भाषेत सांगू शकतो, आमचं इतक्या वर्षाचं संशोधन सांगतय की जिंवतपणाचा आपल्या मनाशी संबध आहे आणि अकस्मात मरणं मन जिवंत ठेवू शकत, हा हे शक्य आहे पण आम्हाला अजून पारखून बघायचं आहे.. यावेळी प्रयोगशाळेतले उंदीर वाचले…”

ऐकत असलेली लोक हसली.

वायरेने समोर धरलेल्या लॅपटॉपवर तो मागच्या काही मिनिटापासून हेच सगळे व्हिडिओ बघत होता, पण आता अजून एक व्हिडिओ बघितल्यावर मात्र त्यांना हसू येत होतं.

ठिकाण- पोलीस स्थानकात

ठिकाण- लॅपटॉपवरची पीपीटी

‘टारसमिट स्क्रानटाचर’ हे शरीराच्या त्वचेला आपल्या आपणच जोडून त्या प्रत्येक हिस्साला जोडून पूर्णपणे रक्तवाहिन्या आणि बाकी सगळ्या घटकांना जोडू शकतो जास्त वेळ न घालवता, हे सगळं वापरणे आता शक्य आहे….. जे एकेकाळी असंभव वाटत होतं.

शॉक्स मॅकनिझम, इटस ट्रिटमैन फॉर परसन व्हू हॅड लॉस्ट हीझ प्रेझेट फॉम बॉडी टू गेट बॅक और इटस व्हेरी हारस प्रोसेस… यांने जीवाला धोका पोहचू शकतो, यानें शरीराच्या शेवटच्या नस्सेला शॉक देत पुन्हा एकदा अचेतन अवस्थेतून चेतन अवस्थेत आणलं जातं.

वायरेने रॉयकडे पाहत हसत हसत म्हटलं, ” रॉय तुम्ही वेडे झाला आहात का? तर तुमचं म्हणणं आहे की मेलेल्या शरीराला तुम्ही पुन्हा जिवंत करु शकता, हेच सांगताय ना तुम्ही… टारसमिट स्क्रानटाचर आणि काय… मायक्रो सेलस इलुजन शॉक मैकनीझम, हे सगळं काय आहे रॉय.. हे सगळं तुमच्या प्रयोगशाळेतून जमवून इथं आणलयं, पुढे येऊ घातलेल्या प्रयोगाचं व्हिडीओ मॅन्युअल”

रॉय समाजावण्याच्या स्वरात म्हणाले, ”the Concept of Impossibility… तुम्ही माझं म्हणणं समजता का मिस्टर वायरे, इटस सायन्स डॅमिट… काय तुम्ही…..? दोनशे-तीनशे वर्षापूर्वी कुणी म्हटलं असतं की हवेत मोठया मोठया टनाच्या वस्तू उडू शकतात, तर कोणी खात्री ठेवू शकलं असतं का?, दूर कुठेतरी होतं असलेली घटना प्रत्यक्ष डोळ्याने त्याचवेळी त्याचं चित्रण पाहू शकाल, कश्यामुळे शक्य आहे.. विज्ञानामुळे… आपला आवाज आपल्या गोष्टी पुन्हा पाहू शकतो, कोणी विश्वास ठेवू शकला असता का? हे सगळं दोन शतकापूर्वी, नाही ना!, ही टी.व्ही, मोबाईल हे सगळया संकल्पनाचाच भाग आहे जी एकेकाळी फक्त कल्पना होती जे आज वास्तव आहे”

रॉय यांना इतक्या बोलण्यात समजून आलं होतं की वायरेला समजवून काही फायदा नव्हता, पण ते हतबल होत समजवण्याचा प्रयत्न करतच होते.

रॉय म्हणाले, “यासाठी मी माझं आयुष्य दिलयं, याला तुम्ही चेष्टाचा विषय बनवू नका, राजकारणातल्या फायदासाठी का होईना सीएमसाहेबांनी केलेल्या मदतीसाठी आभारी आहे, आता तुम्ही या कागदावर सहया घेवून टाका म्हणचे मी या बॉडीसोबत प्रयोग करेन”.

वायरेने आपल्या टेबलावर कॉन्सटेबलने आणून ठेवलेल्या लॅपटॉपवर अजून एक ऑडिओ सुरु केली

ठिकाण- पोलीस स्टेशन

ठिकाण- रॉय यांची लॅब

ठिकाण- सूरज बस स्टॉपवर

वेळ- 23 एप्रिल 2016

ठिकाण- शनिवार रात्री आठ वाजून पंचवीस मिनिट

वायरे रॉयला उददेशून म्हणाले, “हा सूरजने केलेल शेवटचा कॉल, जो त्याने तुम्हाला केला होता, त्यांची ही रेकॉडिगं”

सूरज म्हणत होता, ”तुमचे सर्व प्रयोग योग्य होते रॉय, तुमचे ते अनुमान घेणारी सिस्टम थोडी अपग्रेड केलं असतं तर चागलं झालं असतं, मी काय सांगू तुम्ही काय शोधलयं आणि तसंही फोनवर समजावणं मुश्कील आहे, पण मला थोडी अजून मजा करु देत…”

“याचे परिणाम चांगले नाही होणार सूरज कुमार, तूला नाही माहित मी जीवनातली किती वर्ष घालवलीयत या प्रोजेक्टसाठी आणि तू अश्या त-हेने बोलून मला रोखू शकत नाहीस”

“इतकी वर्ष दिलीत या गोष्टीकडे बघूनच दया दाखवत सांगतोय की तुम्ही काहीतरी क्रांतीकारी शोधलयं, पण मला सध्या हे सगळं आजमावायला मजा येतेयं ”सूरज अगदी तावातावाने म्हणाला.

“तूला पैसे हवेत का? घर हवयं का? मला सांग” रॉय काकुळतीच्या स्वरात म्हणाले.

“यांची काही गरज नाही मला, मला वाटत तुम्ही त्या एक्झिबिशनच्या विजेत्याचं नाव नाही ऐकलतं बहुतेक”

“तू हे चागलं नाही करत आहेस सूरज, तुला यांची किंमत चुकवावी लागेल”

“तुम्हाला आता कोणी पुरावा नाही विचारणार, तुम्ही क्रांतीच्या तटावर उभे आहात…this is fucking Revolutions बाय”

ठिकाण- रविवार दुपारी एक वाजता

दिनांक – 24 एप्रिल 2016

रॉय आर्जवी स्वरात म्हणाले, ”की यांचा अर्थ हा नाही की मी त्यांचा जीव घेईन”

रॉय स्वतःला निर्दोष सिदध करण्यात गुंतून गेले.

वायरे आता या सगळ्या माहौलाचा अंदाज घेत म्हणाले, ”मी माझ्या अखात्यारित बॉडीसोबत प्रयोग करायला परवानगी नाही देऊ शकत, या मंत्री लोकाच्या आपआपसातल्या राजकारण्यात उदया आमच्यावर प्रश्न उभे राहतात, सॉरी, मी परवानगी नाही देत, तुम्ही असं करा की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून त्यांच्या अधिकारातून वेगळी परवानगी घेवून या”

रॉय यांनी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क करुन पहिला पण रविवार असल्याकारणं मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकारपत्र मिळणं कठीण होऊन बसलं होतं. रॉय पुन्हा एकदा वायरे यांच्या टेबलापाशी आले.

”ठीक आहे, उदया यांचवेळी सूरजच्या हत्या-याला पकडू शकलात तर पकडा, नाहीतरी मी अधिकारपत्र घेवून येईनच… मुंबई पोलीस.. खूप मजबूत नेटवर्क आहे ना तुम्हा लोकांच, शोधा किती शोधायचं ते… अजून जोर लावा” रॉय इतकं बोलून निघून गेले.

वायरे या सगळ्या संवाद-विसंवादामुळे नाराज जरुर झाले होते, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत त्यांनी आता जेनीला आत बोलावलं.

****************

ठिकाण- सदानंदच घर

मागचा काळ

रात्रीच्या निरव शांततेत टेबललॅम्पच्या प्रकाशात स्वतःच्या मनातल्या विचारांशी सदानंद झुंजत होता, त्यांच्या डोक्यात प्रश्न होते, त्यांला त्यांची उत्तर हवी होती, तो स्वत:शीच बोलत होता. तो पार निराश झाला होता,

कल्पनेच्या बाजारात थोडया-फार खरेपणाची चादर चढवून कथा सजवतो, ज्यांला पाहिजे त्याला खूनी बनवू शकतो…कोण तर… लेखक आहे…. लेखक… कुणालाही… बस फक्त योग्य लॉजिक दयाची खोटी… तो तोच खरा मास्टर माइंड असणार…

सदानंद आता अधाश्यासारखा कागदावर तुटून पडला, डोक्यातले विचार भराभर मेंदूतून बोटाच्या हालचालीवरुन त्या कागदावर उतरत होते.

****************

सदानंद ट्रेनमध्ये नेहमी त्या व्यक्तीचा उडत असलेला मजाक पाहत होता, तो विचार करी जर या माणसाला कुणाचा खून करायचा असेल तर तो कसा करेल? तो पुन्हा पुन्हा विचार करी…

****************

सदानंद सांगत होता आणि सुदेश लिहित होता.

****************

दोन पोलीस हवालदार स्वतः जवळची माहिती वायरेना देत होते.

सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर लास्ट लॉगइन सहामहिन्यांपूर्वीचं दाखवतयं, फक्त काही दिवसापूर्वी पुन्हा अकांऊट सुरु केलं होतं, टीवटरवर भांडण झालं होतं… कुणी झारिया खान नावाची अक्टीवीस्ट आहे, त्यांना उदया बोलवलयं.

एक महिन्यापूर्वी एका एक्झीबिशनच्या इथल्या स्पर्धेत अंतिम विजेता ठरल्या कारणामुळे प्रिंट मिडिया आणि बाकी ठिकाणी नाव आलं होतं, बाकी कुणाशी हाडवैर वैगेरे काही नाही.

बाकी आपल्या नेटवर्कमधून अजूनतरी काही खास माहिती मिळू शकली नाहीय.

वायरेनी थोडं विचार करत म्हणाले, “या दोन्ही हत्या-यांचे स्केच बनवा, जितके चहरे दिसतायत सीसीटीव्हीच्या फुटजेच्या मदतीने तितकं करा……”

त्यांचं कुणाशी हाडवैर अस नव्हतचं, जेनी बरोबर बोलत होती की त्यांचा फ्रेंड सर्कल असा नव्हता, थोडे फार ओळखीचे होते ते सगळे प्रोफेशनल कॉन्टॅक्टस.

चारी बाजूने येत असलेल्या माहितीमुळे वायरे काहीसे सुन्न पडले होते.

अश्यावेळी त्यांचा हक्काचा सहकारी सूर्यकांत शिंदे कामाला यायचा, एखादी महत्तवाची गोम तो अचूक पकडत केस निकाली काढायला मदत करायचा, वायरे मनातल्या मनात म्हणत होते, ”अरे हा सूर्यकांत शिंदे कधी येणार आहे?”

सूरजच्या घरमालकाचं म्हणणं आहे की भाडं टाईमावर देत होता, पण आम्ही जेव्हा घराची तपासणी केली तेव्हा आम्हाला काहीसा गंभीर करुन टाकणारं सापडलं, हे मेडिल रिपोर्ट आहेत… खूपच धक्कादायक.. सूरज एच.आय.व्ही पॉस्टिटव्ह होता.. तीन आठवडयापूर्वीची गोष्ट आहे ही…

वायरेने हवालदारला आदेश दिला, “जेनीला आत बोलवा, तिची बल्ड टेस्ट करायची आहे”

जेनी आत आली होती.

वायरे काहीसे तयारीत बसल्यासारखे वाटत होते, त्यांनी एका माहिला पोलीस हवालदाराला आत बोलवून घेतलं, त्यांनी जेनीसमोर पाण्याचा ग्लास अगोदर आणून ठेवला होता, ते आता जेनीशी बोलू लागले, “जेनी माझ्या प्रश्नांची खरी-खरी उत्तर दे, तूझं आणि सूरज यांच नात निव्वळ बोलण्या भेटण्यापुरतं होतं की त्या पलीकडे गेलं होतं, म्हणजे तू फिजिकली इन्व्होल होतीस का सूरज सोबत, मला माहित आहे की हे प्रश्न काहीसे अनअम्फरटेबल करतील तूला, पण हा आमच्या चौकशीचा भाग आहे, आणि ते गरजेचं आहे ”

जेनी काहीश्या आखडयात्या स्वरात “नाही” असं म्हटलं, ज्याला वायरे यांनी काहीसा आवाज वाढवत म्हटलं, ”जेनी खोटं नको बोलूस”

जेनीचे डोळेचं सार काही बोलून जात होते,

“तुला नाही वाटत की आपण आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहचावं” वायरे काहीसे काकुळतीला येऊन म्हणाले.

यात तिथं उपस्थित असलेल्या महिला कॉन्स्टेबलकडे पाहत वायरे म्हणाले, ”तुला जर माझ्याशी बोलताना अनकम्फटेबल होत असले तर मी बाहेर जातो, तू यांना सगळं काही सांगू शकतेस”

जेनीने त्याला होकार दिलला, आत होणार सार संभाषण वायरे बाहेर हेडफोनवर काचेपलीकडच्या भिंतीमधून हावभावासकट पाहत होता, त्या महिला पोलीसाच्या असण्यामुळे शेवटी जेनी बोलू लागली.

महिला पोलीस अधिका-यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला, “सूरज प्रोटेक्श्न यूझ करायचा का इंटरकोर्स करताना?”

जेनी काहीशी शब्दाची जुळवाजुळव करत बोलू लागली, मागच्या एक वर्षांपासून अफेअर होतं, सेक्स तर कॉमन गोष्ट होती.

आकंठ बुडून गेली होती त्यांच्या प्रेमात, प्रत्येकवेळी सर्वसामान्य प्रेमी जोडप्यासारखाच सेक्स होत होता, पण मागच्यावेळी… ही ते शेवटच्या त्यांच्या प्रणयप्रंसगाबदल सांगत होती, तिच्या डोळ्यासमोर तो सर्व प्रंसग आठवू लागला.

****************

ठिकाण- सदानंदच घर चालू काळात

सुदेश कनोजिया विचारत होता की हे डाग कसले पेपरावर. सदानंद काहीसा विचार करत म्हटला की त्याला माहित नाही, काही खायची वस्तू सांडली असेल कागदावर. त्या इतक्याश्या संभाषणात त्याला भूतकाळातल्या आठवणीत रममाण केलं, त्याला काही आठवू लागलं, सदानंदच मन दोन हिस्स्यात विभागलं गेलं, एक मन काही सांगत तर दुसरं अगदी त्यांच्या विपरीत, थोडक्यात त्यांच्या द्विधा मनस्थितीच्या आठवणी आता पुन्हा एकदा दृष्टीपटलावर येऊ घातल्या होत्या.

ठिकाण- सदानंदच घर भूतकाळात

सदानंदच्या मनाची दोन रुप झाली होती, एक काळं आणि एक सफेद, आणि त्या दोन्ही मनात सवांद सुरु झाला.

सदानंदचं काळं मन – काय दिसते रे जेनी, बोलून टाकू का हिला, ते मुलायम ओठ त्यांच्यावरचा तो एकमेव तीळ, घोटीव आकारातली स्तनं, तिच्या त्या मोहवणा-या शरीराला अजून खुलवणारं तिच ते चेह-यावरचं हसणं… जेनीसोबत सेक्स करायला किती मजा येईल….

सदानंद मोबाईलमध्ये असलेल्या जेनीच्या फोटोकडे पाहत ऑफिसमधल्या गोष्टी आठवू पाहतो.

त्याला लिहायचं होतं कोण्या स्त्रीच्या यौवनाबदल

ठिकाण- सदानंदचं घर (भूतकाळात)

परिस्थिती- हस्तमैथुनाची

सदानंदने आपला डावा हात पॅन्टीच्या आत खोलवर नेला आणि तो उजव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करत होता, त्याने जेनीचा फोटो असलेला मोबाईल समोरचं ठेवला होता.

सदानंदच काळं मन त्याला सांगत होतं ”नैतिक-अनैतिक असं काही नसतं, हे सगळं आपण तयार केलयं कारण हा समाज सभ्य आणि योग्य नागरी त-हेने चालावा”

सदानंद अवयव हातात घेत जोराजोराने मागे पुढे करत होता.

सदानंदच्या आतला लेखकाचा आवाज त्याला सांगत होता, ”तोडून टाकू का सगळे नियम… जेनी… मला तुला अनुभवायचयं, एकदा तुला बाहुपाशात गच्च पकडायचं”

सदानंदच सफेद मन त्याला म्हणत होत, ”तुला माहित आहे ना ती कुठे राहते ते”

सदानंदच काळं मन म्हणालं, ”तोडून टाक सगळी बंधन ज्यांच्या आड दफन करुन ठेवलीयत कितीतरी वर्ष चालत आलेली, बनवलेली नैतिकच्या वाचाळ गप्पागोष्टी करणारी संस्कृती, तोडून टाक या सा-याला, कुणी ईश्वर वैगेरे नाहीय, कोणताही योग्य असा कायदा नाहीयं, आई-वडीलाकडून चालत आलेल्या फुसक्या संस्काराच्या गोष्टी, पाप-पुण्य असं काही नाहीयं, कमीतकमी तिच्या ओठाला तुझे ओठ तरी टेकवशील, चुंबन….कीस तरी करशील”

सदानंदच सफेद मन म्हणत होत, “हे सगळं चुकीचं आहे, निव्वळ आकर्षण आहे आणि बाकी सोडं… तू कश्याच्या गर्तेस आहेस माहित आहे ना!, तर हात लावायचा प्रयत्नदेखील करु नकोस”

सदानंदच काळं मन त्यावर प्रत्युतरादाखलं म्हणालं, “बाळा, प्रपोज तिने केलयं तू नाही, तसंही तू दोन दिवसापासून काही लिहू शकला नाहीयसं सेक्स या विषयावर, नाही वाटतयं चुंबन घ्यावसं तर नको घेवूस कोणी सांगितलयं, पण कमीत कमी अनुभव तर घे एका मिठीचा, बघून तर घे.. काय असतं यौवन ”

सदानंदच सफेद मन त्याला सावरण्याच्या हिशोबाने म्हणालं, ”तू जर इतका जवळ गेलास, तर गोष्ट लग्न करण्यापर्यंत जाईल”

या सगळ्या मनाच्या द्वंद्वात तो फारच गुंतून गेला होता, इतक्यात उंदीर सापळ्यात अडकल्याचा आवाज झाला, आणि त्या आवाजाने गडबडून त्यांची आई जागी झाली आणि या गडबडीत सदानंदने पॅन्टतून हात काढला आणि ते वीर्य लिहिल्या कागदावर सांडलं. सदानंदचे हात हस्तमैथूनामुळे काहीसे चिकट झाले होते, तो मोरीच्या हाता धुण्यासाठी दिशेने वळला, त्या सगळ्या आवाजाने जागी झालेली रेवती म्हणाली, “गॅस चालू कर, बटण खालून बंद असेल, पाणी गरम कर आणि त्या पिंज-यावर टाक.. मरुन जाईल… सकाळी कचरापेटीत टाकून देईन कामावर जाताना”

विश्वास नाही वाटतं की काही दिवसांपूर्वी रेवती अंगारकीचा उपवास ठेवला होता तेव्हा काहीतरी वेगळं सांगत होती.

*************

जेनी आता पोलीस स्टेशनात होती. ती सूरज सोबतचा तो प्रंसग आठवू लागली.

ठिकाण- सूरजचं घर

दिनाक- 14 नोव्हेंबर 2015

सोफयावर झोपलेल्या जेनीचं सगळं शरीर उघडं होत, अंगावर एकही कपडा नव्हता, त्या शरीरावर सूरज तुटून पडला होता…

हेच प्रेम होत, पण हे काय?

सोफाच्या अगदी समोर त्याने आपला कॅन्वहास ठेवला होता, आपला ब्रश आणि बाकी रंग त्याने सोफ्यापाशी एका कोप-यात ठेवले होते, जवानीच्या तो प्रत्येक चढता रंग त्याला समाधानाच्या शिडयावरुन पुन्हा एकदा नेहमीच्या पण प्रत्येकवेळी नव्या वाटणा-या ठिकाणी जाण्याअगोदर… तो मागे हटला, समागमाच्या एका परमोच्चबिंदुवर जाऊन सूरजने सगळं काही सोडून दिलं….

त्याने लिपटलेल्या त्या क्षणापासून बाहेर पडत आपल्या शरीराला जेनीपासून वेगळं केलं.

हे असं करणं साधी गोष्ट नाहीयं, इंद्रियावर इतकं नियंत्रण… आणि एका क्षणात डोळ्याने अनभवू शकू अश्या भावना कॅनव्हासवर उतरवायला लागला.

सूरज आपल्या नग्न शरीराची पर्वा न करता, किंवा त्यातला तसा कोणत्याही मागमूस त्याला राहिला नव्हता, तो कसल्यातरी प्रंचड घाईत होता.

नाराज जेनीकडे पाहायलाही त्याकडे वेळ नव्हता, जेनी कुणीतरी आंगडोबाला पाण्याने विझवावी तशी पार निस्तेज होऊन तिथंच आजूबाजूला विखुरलेले कपडे सावरु लागली.

जेनीने आपल्या आत धुसमुसत असलेल्या आगीला बाहेर काढण्याच्या हेतूने म्हटलं, ”असं काय काय उतरवणारं आहेस कॅन्हव्हासवर”

जेनीच्या या बोलण्याचा त्यांच्यावर काहीएक परिणाम होत नव्हता, आता तो सोफ्यावरुन उठून कॅन्वहासच्या दिशेने वळला, आणि पेन्टिंग बनवू लागला, त्याच त्या नग्नअवस्थेत.

सूरज जेनीला म्हणत होता, “सोपं वाटत का तूला, एका झटक्यात भरलेल्या मैफलीतून उठून सरळ सुनसान रस्त्यावर यायचं, इतकं सोप नाहीय ते, खूप वेळ लागतो दुनियेच्या मोहमायेपासून अलग होणं, कोणीही ऊठ-सूठ सर्वसंगपरित्याग करत नाही साधू-संन्याशी बनत, सॉरी, मी तुझा मूड बिघडवला, पण ही पेंटीग महत्तवाची होती, नाहीतर त्या संन्यासी लोकाच्या ईश्वर निष्ठेशीं तल्लीन असण्याचा, शरीरसंभोगापासून दूर असण्यासारख्या गोष्टी मी कश्या अनुभवू शकतो, जर आपल्याला निसर्गाने बनवलयं तर त्याला का ठोकर मारायची, का निसर्ग आपल्याला त्यांच्यात आकृष्ट पाडून काही लपवू पाहतोय, का तर आपण त्यांच्यापर्यंत पोहचू नये म्हणून”

सूरजने स्वतःला ब्रशच्या स्वाधीन करत धर्मग्रंथाच्या पानापासून ते संन्याशाच्या ध्यानस्त बसलेली पेंन्टिग काढलीसुदधा फक्त पंधरा मिनिटात….

“तू वेडा झालायसं सूरज, या पेंटीगसच्या पाठीमागे” जेनी आपली बॅग उचलत जाणार होतीच इतक्यात सूरजने तिला कसकसून पकडलं, आणि आता सूरजचा अजिबात कंट्रोल नाही राहायला, त्याने कॅन्वहास रंगवण्यासाठी हातात घेतलेला ब्रश जमीनीवर टाकला.. जेनीला झोंबू लागला, पण जेनीचा मूड खराब झाला होता ती तिथून निघाली.

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

वेळ – रविवार दुपारी दोन वाजता

दिनांक – 24 एप्रिल 2016

जेनी सांगत होती, ”सेक्स करतेवेळी तो अचानक थांबला, मी विचारलं, तर तो कोणत्यातरी साधू-संन्याशी लोकांच्या अध्यात्मिक गोष्टी ज्यांच्या तो पेंटीग्स बनवत होता त्यांच्याबदल सांगत होता, मला वाटत हे सगळं साधं नाहीयं, काहीतरी होत जे सूरज माझ्यापासून लपवत होता”

काचेपलीकडून हे संभाषण ऐकणा-या वायरेला काही एक पुरावा मिळत नव्हता, उलट आता त्याला जेनीबददल संशय येत होता, आता ते आत आले.

वायरे अगदी थेटपणे म्हणाले, ”जेनी आम्हाला माहित नाही की तू खरं बोलत आहेस की नुसतचं घुमवतेयस, आणि मला माहित नाही की मी जे आता तूला सांगणार आहे ते तूला माहित आहे की नाही”

वायरेने आपल्या हातातले पेपर जेनीला देत म्हणाले, ”सूरज हा एडस या आजाराचा शिकार झाला होता, हे रिपोर्ट तीन आठवडयापूर्वीचे आहेत”.

हे ऐकायला नंतर जेनी स्वतःला सावरु नाही शकली, तिने तिथं ठेवलेला पाण्याचा ग्लास सूपूर्ण संपवला, तिला काहीएक समजत नव्हतं. काहीशी भानावर येत ती गहिवरल्या स्वरात म्हणाली, ”सूरज, आणि या आजाराचा शिकारी, कदाचित त्याला माहित होतं, म्हणून कदाचित या कारणामुळे त्याने माझ्याशी बोलणं बंद केलं असेल काय?”

तिच्या मनात नुसत्याच विचाराच्या एका मागोमाग फे-या सुरु झाल्या.

“ओ हो नो, मला या विषयाबददल अजिबातच माहित नव्हतं”

जेनीच्या आसवाचा बांध आता फुटला, तिच्या रडण्यानं आता तिथल्या पोलीस स्टेशनच्या कडक शिस्तीच्या वातावरणाला पाझर फुटायला भाग पाडलं, तिथं असलेल्या लेडीज कॉन्टसटेबलने जेनीचा हात हातात घेत म्हटलं, ”सगळं काही ठीक होईल, मला वाटत तुम्हाला आरामाची गरज आहे, तुमची बल्ड टेस्ट पण करायचीय, चिंता नका करु, देवावर विश्वास ठेवा”

वायरेने त्या तसल्या वातावरणात आपला पोलीसी खाक्या दाखवणं चालूच ठेवलं, ”आता तू आमच्या संमतीशिवाय हे शहर सोडून जावू शकत नाहीस”

जेनीची बल्ड टेस्ट घेतली गेली.

वायरे आता काहीसे आडाखे बांधत होता, त्यांच्या मनात येत होतं, “जर जेनीचे रिझल्ट पॉजिटिव्ह आले तर, आणि कदाचित जेनीला माहित झालं असेल की सूरज एच.आय.व्ही सक्रमित होता, आणि या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तिने खून करवून आणला असेल तर… कदाचित?... आणि जे तिने काही वेळापूर्वी सांगितलं ती निव्वळ कहानी असेल तर किंवा ते खरचं घडलं असेल तर… सूरज असा सेक्स करताना मध्येच का थांबला असेल, रिपोर्टं तीन आठवडयापूर्वीचे आहेत आणि सूरजला एचआयव्ही होण्याचं कारण काय असेल, का कोण्या दुस-या बाईसोबत, किंवा एचआयव्ही होण्याचं काही दुसरं कारण असू शकतं… सूरज जेनीसोबत मागच्या तीन महिन्यापासून बोलत नव्हता त्याला कारण हा रिपोर्टं तर नसेल ना! पण रिपोर्टं तर तीन आठवडयापूर्वीचा आहे, किंवा जेनी सगळ्यांशीच खोटं बोलत असेल?”

वायरेने हवालदार दिनेशला बोलवत म्हटलं, ”मेडिकल सेंटरशी बोलून घ्या ज्यांनी सूरजची एचआयव्ही टेस्ट केली”

दिनेशही काही माहिती जमा करुन आणली होती, तो ती सांगू लागला, ”जहागीरवाल्याशी बोलणं झालयं, सूरजने खूपच वरच्या दर्जाची पेंटीग्स सादर केली होती, त्यांच्या इतक्या मेहनतीनंतर तो ती कॉपिटिशन जिंकला होता, तिथलीच सगळी सीसीटीव्ही फुटेज आम्ही जमा करुन आणलीय, तिथं त्यांची त्यावेळी खूपच प्रंशसा झाली होती, त्यांची सगळी पेंटीग्स जवळ-जवळ पंचवीस लाखाच्या आसपास खरेदी केली गेली होती, आणि ती सगळी पेंटीग्स एकाच माणसाने खरेदी केली होती, शहरातल्या सगळ्यात मोठया प्रसिदध व्यक्तीपैकी एक.. सिंगल लारजेस्ट शेअर मार्केट इनव्हेस्टर रमेश पटाकेवाला.. वय पन्नास”

समोर चालू असलेल्या डेस्कटॉपकडे पाहत तिथं खुणेने दिनेशला बसायला सांगत अजून माहिती काढायला सांगितली.

पंधराएक मिनिटानंतर कॉम्प्युटरवर चेक केल्यानंतर वायरेचे सहकारी पोलीस कॉन्सेटेबल दिनेश वायरेने त्यांना सांगितलं, ”मागच्या दोन महिन्यापासून घसरत असलेल्या शेअर मार्केटमुळे कमीत कमी तीनशे करोडच्या आसपास नुकसान झालयं रमेश पटाकेवाले याला, अफवा आहे की, पूर्ण शंभर वर्ष जगण्याच्या इरादयापायी चपातीला तेलही लावत नाही, मिडियामध्ये बोलतो खूप कमी, कामचं बोलतं, त्यांच्या एका इन्वहेस्टने मार्केट रिस्पोनड करतं, खूप मोठं नाव आहे शेअर मार्केटमधलं, शेअरशिवाय नव्या आर्टीस्टचे कॅन्वहास खरेदी करतो, नंतर भाव वाढल्यावर विकणं हा त्यांचा स्वभाव आहे… नाही बिझनेस आहे… प्रत्येक गोष्टीत पैसा दिसतो त्याला”

वायरे म्हणतो, “बहुतेक आपल्याला स्वतःच जावं लागेल, सतीशला बोल पूर्ण एक्झीबीशनचं सीसीटीव्ही फुटेज चेक कर”

****************

ठिकाण- सदानंदचं घर चालू काळात

सदानंद नजरेच्या समोरच्या इंटलेजिनट इनवेस्टमेंट, अंकाऊटस, इकॉनिमिकस यांच्या पुस्तकावर गेली होती, तो आपल्या मोबाईलवर आलेल्या सेन्सेक्सच्या बातम्या पाहत होता.

****************

ठिकाण- रमेश पटाकेवाला इंटरप्राइज ऑफिस

वेळ – रविवार रात्री आठ वाजता

दिनांक – 24 एप्रिल 2016

समुद्राच्या लाटाचा नजारा सत्तावीसव्या-अठठाविसाव्या मजल्यावरुन बघण्याची मजाच काही वेगळी होती, रमेशच्या त्या भल्या मोठया ऑफिसमध्ये मागच्या पंधरा मिनिटापासून वायरे आणि त्यांचा सहकारी कॉन्सटेबल सोफ्यावर बसून रमेशमध्ये आतमध्ये बोलवण्याची वाट बघत होते. त्यांच्या त्या सहका-यासोबत गप्पा चालू होत्या.

वायरे म्हणत होते, “हीच काही मोजकी मंडळी राहिलीयत जी आजपण खरेपणा सोबत टॉपवर आहेत, तसंही करप्शनच्या दलदलीत दोन-तीन साफसुधरी कमळ खुलणं आवश्यक आहे… आणि जिथं कमळ तिथं लक्ष्मी”

“मला तर वाटतयं की तुम्ही या रमेशला त्या संशयित आरोपीच्या लिस्टमधून काढूनच टाकलेलं दिसतयं” दिनेश म्हणाला.

“आपण आपल्या अंदाजावरुन एक मत बनवू शकतो, पण सांगू शकत नाही की कुणाची नियत केव्हा बदलेल, कलयुग आहे”, वायरेने आपलं मत प्रदर्शित केलं होतं.

तिथं भितीवर लिहिलं होतं,’If you don’t belive the markets are supreme, you will never admit that it was your mistake. If you don’t admit that it is your mistake, you will never learn’

हे सगळं भितींवर लिहिलेलं वाचत असताना आणि त्यांचा अर्थ समजून घेणारं इतक्यात रमेश यांनी आत बोलवलं.

“वेलकम मिस्टर वायरे, प्लीज सीट, सॉरी तुम्हाला वाट बघावी लागली, दोन कॉफी सांगा. खूपच वाईट वाटलं ऐकून, त्यांच्यात क्षमता होती की तो खूप मोठा आर्टिस्ट बनण्याची, त्यांने बनवलेल्या पेंटीग्स ही गोष्ट सांगत होतेच, एखादया माणसातली कलाकारी पहिल्या नजरेतच ओळखू शकतो आपण… तेवढी पारख तर ठेवावीच लागते बिझनेस करताना…. शेअर मार्केटमधल्या स्टॉकसारखी, लाजबाब पेंटीग्स केली होती.. कलर पोस्टर अप्रतिम… एक त्यातली अब्स्ट्रॅकमध्ये एक संन्याशी साधूची पेंटीग्स निव्वळ डोळ्याचं प्रारण फेडणारी… कलर मिक्सचर म्हणू नका… आणि लाईटस जो उठून दिसत होता रंगाच्या निवडीनमुळे त्याला तोड नाही… खूप काळानंतर मी अश्या पदधतीची हाय क्लास आर्ट पाहिली होती, सत्याच्या जवळ नेणारी… आणि त्यात एका बाईचं व्यक्तिचित्र होतं.. ते तर कहरच… काय बोलावं… आपलं दुर्दैव की असा माणूस काळ हिरावून घेतो… मुळात मी या माझ्या मार्केटच्या व्यापातून थोडासा रिलॅक्स होण्यासाठी एक्झीबिशनला जातो, तिथं गेल्यावर पेंटीग्स खरेदी करणं ही माझी आता सवयच बनून गेली आहे, माझ्यासाठी पैसा कमवणं हा टेन्शनचा भाग नसतो तर तो इनवेस्ट करणं हा टेन्शनचा भाग असतो”.

वायरे यांनी विचारलं ”तुमची आणि सूरज यांची ओळख कशी झाली?”

“माझी पहिली भेट त्याचं एक्झीबिशनमध्ये ज्यांचा तो विनर झाला तिथचं, बॅडली तिचं शेवटची भेट झाली” रमेश काहीश्या हलक्या आवाज म्हणाले. रमेश वायरे यांना त्या सूरजच्या भेटीविषयी सांगू लागले.

****************

ठिकाण – जंहागीर आर्ट कॉपिटिशन हॉल

वेळ – रविवारी रात्री नऊ वाजता

दिनांक – 23 मार्च 2016

शहरातल्या ब-याच मोठया मोठया हस्तीच्या उपस्थितेने जहांगीर हॉलची रात्र झगमटून गेली होती, शेवटी ती निकालाची रात्र आली, निकाल लागला होता, सूरज कॉपिटिशन जिंकला होता.

त्यांची मेहनत ख-या अर्थाने रंगून आली होती, त्यांच्या पेंटीग्सच्या होत असलेल्या तारीफीपुढे त्यांच्या विजेता होण्याच्या गोष्टींचाच त्याला कधीचाच विसर पडला होता, प्रत्येकजण कॅन्वहासच्या रंगामध्ये डुबून गेले होते, इंथपर्यंत की त्याचें कॉपिटिटरही त्यात सामील झाले.

काहीजण तिथं एकाच चित्रापाशी कितीतरी वेळ खिळवून राहिले होते, त्यातले खूप सारेजण कलासमीक्षक होते. आणि तिथं असलेल्या अन्य लोकांपैकी एक होते रमेश पटकावाले… त्यांची नजर ज्या पेंटीग्सकडे येऊन थांबली होती.

“कदाचित अश्या पदधतीचं पेटीग्स त्यांनी खूप काळानंतर बघितलं होतं, एका मनमोहक स्त्रीची तसबीर… चेह-यापासून फक्त कंबरेकडच्या भागापुरती सिमित अश्या त्या स्त्रीच्या नजाकतीने भरलेल्या देहामध्ये ते डुबून गेले होते… आपल्या केसामध्यें फुल खोवण्यामध्ये व्यस्त ती ची नजर डाव्या बाजूला वळली आहे.. तिच्या शरीरातली सहजता… तरीदेखील काहीशी अपूर्ण.. ते समजण्याचा प्रयत्न करत होते… अनावृत दोन्ही वक्षस्थळांची प्रमाणबदधता पुरुषांच्या आतली आग उत्पन्न करण्यासाठी पुरेशी होती… दोन्ही हातामध्ये मनगटापांशी सोन्याच्या रंगाचे दिसणा-या बांगडया.. गळ्यामध्ये आभूषणासाठी म्हणून असलेला सफेद पाकळ्यांचा हार… ही तसबीर एखादया बडया प्राचीन भारतीय राज्याच्या दरबारतल्या गणिकाचा आभास करुन देणारी होती… आजच्या आधुनिक दुनियतल्या रंगरगोटीच्या साधनाचा वापर करत चेह-यावर दिसणा-या अकृत्रिम शालीनतेपेक्षा हे कितीतरी अधिकचं… पुढचं… अगदी बेमालूमपणे लक्ष वेधणारं काहीतरी अदभूत वाटतं होतं… फक्त काहीश्या नजरेने स्वर्गातल्या प-यांची कसर भरुन निघेल, कितीही प्रयत्न केला तरी चेह-यावर आलेली लाज दोन्ही हाताने लपवू पाहणारी, एकाच पेंटीगमध्ये अगणित भावना, रमेश इतके तल्लीन झाले की विचारता सोय नाही, त्यांना काही वेळासाठी आसपासच्या वातावरणाचा विसर पडला, बाकी जग थांबलयं, ती सुंदरता पाहण्यात ते तल्लीन झाले, आणि शेवटी त्यांच मौन तुटलं… त्यांच्या डोक्यात एक विचार तरळून गेला की ही जी स्त्री रेखाटलीय ती खरचं या कलाकाराची कला आहे का खरचं कोणी अशी स्त्री अस्तित्वात आहे… ते आता पेंटीगच्या कॅन्वहासवर शेवटी कोप-यात लिहिलेल्या अक्षरावर गेली.

“हा एस के कोन आहे” रमेश यांनी तिथल्या एका हॉलटेकरला विचारलं.

“सर, सूरज कुमार” हॉलटेकरने लागलीच उत्तर दिलं.

हॉलटेकरने सूरज कुमारची रमेश यांचाशी गाठभेट करुन दिली.

“नाइस टू मीट यू, ही पेंटीग्स खूपच अनोखी आहेत, मनुष्य शरीर.. खूपच चांगल काम…” रमेशनी सूरजचा हात मिळवत त्या स्त्रीच्या चित्राकडे पाहत पुढे म्हटलं ”ही खरचं तुझी कल्पना आहे का?”

सूरज म्हणाला, ”यासाठी शोधमोहिमेवर जावं लागत, हात खराब करावे लागतात, तुम्ही फक्त फुलाचा सुगंध घ्या… आस्वाद घ्या… बेधुंदीत धुंद व्हा… मनात गुंतावा… फक्त त्यांचा प्रत्यक्ष पाठलाग करु नका” सूरजनेही तितक्याच सफाईने उत्तर दिलं. रमेश यांना ही राहावलं नाही, त्यांनी उत्सुकतेने म्हटलं ”खूपच हुशार दिसतोयस, कमीत कमी इतकं तर सांगा, की हे खरचं कुणी प्रतिभा आहे की तुझी प्रतिभाशक्ती”

सूरज म्हणाला, ”लोकाचं जगणं टिपून घेतो, कुणाला मजबूरीने, कुणाला गरजेपोटी, कुणाच्या नशीबीपोटी कराव्या लागण्या-या कसरतीपायी… वाटयाला आल्याला जगण्यातली अंतप्रेरणा जेवढी समजेल तेवढी टिपून घेतो… कलाकार काळीजं आहे… तेवढया संवेदना तर जाग्या ठेवाव्याच लागतात… त्याचं हेरत असतो… टिपत असतो… मांडत असतो”

काहीतरी सूरज सांगू पाहत होता, त्यांचा गळा भरुन आला होता, त्यांन कसतरी करत का होईना स्वतःला सावरलं. रमेशने ही जास्तीची जिदद न करता हात पुढे करत म्हणाला, ”तुझ्यात ती काबिलियत आहे पुढे जाण्याची, मोठं बनण्याची, असचं काम करत रहा, खरेदी करतोय मी..हे पेंटीगस”

सूरजने हात मिळवत त्या डबलेल्या डोळ्याने चेह-यावर हसू दाखवत म्हटलं ”अट आहे पाचही कॅन्वहास घ्यावे लागतील”

रमेशने काही न बोलता, आपल्या स्टाफला बोलवून बाकी पैशाचे व्हवहार आटपण्यास सांगितले. व्यवहार झाल्यावर सूरज रमेशला म्हणाला, ”आज तुमच्यासारखे कलेची कदर करणारे लोक आहेत म्हणून आम्हाला आमचं सर्वस्व झोकून काम करायला प्रेरणा मिळते, नाहीतर बाजारात प्रत्येक नग्न तसबीरीला अश्लील म्हणून हिणवल जातं.”

****************

ठिकाण- रमेश पटाकेवाला इंटरप्राइज ऑफिस

वेळ – रविवार आठ वाजून तीस मिनिट

दिनांक – 24 एप्रिल 2016

रमेश यांनी काहीश्या बारीक आवाजात वायरे यांना म्हटलं, ”बाकी पेटीग्स खूपच चांगल्या होत्या, पण मला तीच जास्त आवडली होती, पंचवीस लाखात सगळा व्हवहार झाला होता”

“तिथे कोणी व्यक्ती होता का जो त्यांच्याशी चुकीच्या पदधतीने वागत होता” वायरेचा साथीदार दिनेशने विचारलं.

“माझ्या तरी पाहण्यात तसा कोणी आढळला नाही” रमेश शांतपणे म्हणाले.

वायरे अजून काही विचारावं या विचारात होते, त्यांनी रमेश यांच्याकडे पाहत वायरे यांना म्हटलं, ”आम्हाला त्या पेंटीग्स मिळू शकतील का?”

रमेश आश्चर्यचकीत होत म्हटलं, ”कश्यासाठी?”

दिनेशने म्हटलं, ”काही पुरावा मिळतो का पाहण्यासाठी”

रमेश काहीशे विचार करत म्हणाले, ”हा जरुर जरुर, पण हया अश्या पेंटीग्समधून काय पुरावे मिळणार, पण तुम्हाला हवे असेल तर मी माझ्या माणसांला सांगून इथें पेंटीग्स घेऊन येतो, पाच मिनिट थांबा, ईथेच ऑफिसमध्येच ठेवलीयतं, पण फक्त माझी एक रिकवेस्ट आहे की हे फोटो मिडिया आणि सोशल नेटवर्किंग साईटसपर्यंत नका पोचू देऊ, मोबाईल आणि बाकी कॅमेराने फोटो वैगेरे नका काढू, पाहिजे तर तुम्ही सगळे कॅन्वहास स्वतः सोबत घेऊन जा, नंतर परत करा, जर सूरजचा खूनी शोधायला यांमुळे मदत होणार असेल तर चांगलच आहे, आजकाल खूप घाणेरडी फ़ॅशन होऊ गेलीय, कदर नाही होत नॅचरल टॅलेटचं, मला वाटतं नाही की हया स्त्रीचं चित्र ही नुसतीच कल्पना होती, कदाचित ती जिंवत महिला असावी, पण यांच्याबदल मला खात्री नाही.” रमेशने आपल्या मनातलं बोलणं सांगितल.

रमेशने आलेला लॅडलाईन घेतला, “हा घेऊन ये, कॅन्व्हास”

काही मिनिटातचं कॅनव्हास आले, त्या सहा पेंटीग्स एक एक करत रमेश यांनी त्यांच्या स्टाफच्या मदतीने वायरे यांना दाखवत होते.

“मला नाही वाटत यांतून काही खास पुरावा हाती लागेल, ही मी ज्यांचा उल्लेख केला त्या स्त्री बदलची आणि बाकीची पाच पण घ्यावी लागली ती सगळी ऍबस्ट्रॅक्ट पदधतीची… धर्मग्रंथाची पानं आणि संन्यासी साधू”.

दोघेही खूपच ध्यानपूर्वक ते सगळी चित्र बघत हेते, तसं काही त्यांना त्यात तिथल्या तिथं विशेष काही गवसलं नाही पण एकूणात समाधान झाल्यावर त्यांनी रमेश यांचा निरोप घेतला, तसंही त्या दोघांना कला या प्रकाराबदलची माहिती, जाणीव आणि उत्सुकता देखील नव्हती, मग रमेश यांनी आपल्या स्टाफला तिथेंच सगळें कॅनव्हास पॅक करण्यास सांगितली. वायरे आणि दिनेशने ते पॅक कॅन्वहास घेत तिथून रमेश यांचा निरोप घेत म्हणाले, “धन्यवाद रमेश, कदाचित तुमचे कॅन्वहास आमच्या कामाला येतील”.

****************

ठिकाण – बिल्डिंगची लिफ्ट

वेळ – रविवार नऊ वाजता

दिनांक 24 एप्रिल 2016

बिल्डीगच्या लिफ्टमधून ते दोघे खाली उतरले, सुभाष वायरे यांनी त्या बिल्डिगंच्या बाहेरच्या आवारातच ते पॅक केलेले कॅन्वहास दिनेशला काढायला सांगितले. वायरे म्हणाले की या सगळ्या पेंटीग्सचें मोबाईलवर फोटो काढा रमेश यांच म्हणणं जास्त सिरियसली घेण्याची काही गरज नाही.

“त्या साधूबददलची पेंटीग्स ती हीच आहे जिच्याबददलचा उल्लेख जेनीने केला होता, आणि आता दाखवलेली कॅन्हवसवर दाखवलेली बाई… काय बाई आहे… जर ही खरचं प्रत्यक्षात अशी कोणी असेल तर काटा किरर..पण या पेंटीग्समध्ये काय खास आहे… जे एवढे पैसे दिलेत” दिनेश बोलत होता.

वायरे म्हणाले, “दिनेश, बाईला असं बनवलयं की विचारु नकोस, प्रत्येक बाई बिनकपडयाचीं सुंदरच दिसते… आता आपल्याकडे ती नजर नाही जी रमेश आणि बाकी या बडया कलेची कदर करण्या-या लोकांकडे असते…यांची नजर हया लेव्हलची मग त्या चित्र काढण्या-या आर्टीस्टची नजर काय असेल”

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार सकाळी आठ वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

सतीश म्हणाला, यात काही गडबड वाटणारं नाहीयं.

वायरे म्हणाले पुन्हा एकदा चेक कर

पोलीस स्टेशनमध्ये वायरेने पुन्हा रिपोर्टीग करायला सुरवात केली.

वायरे म्हणाले, टीवटरवर भांडण झालेल्या बाईला बोलवून घ्या आज आणि स्केच पेंटीग आर्टीस्टला बोलवून घ्या.

त्या कॅनव्हासवरच्या बाईची पुन्हा कॉम्प्युटरवर इमेज बनवा, कदाचित काही पुरावा मिळेल

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार दुपारी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी

दिनांक – 25 एप्रिल 2016

झारिया खान पोलीस स्टेशनात आली होती आणि ती सूरजबददलची माहिती वायरे यांना सांगत होती.

“माझी आणि त्या सूरजची मुलाखत त्या दिवशी झाली ज्या दिवशी त्याने जहागीरची स्पर्धा जिंकली होती, खूपच चांगला मुलगा होता.”

ठिकाण – सूरजचं भाडयाचं घर

दिनांक – 10 एप्रिल 2016

माझी स्वतःची चित्र काढण्याच्याबाबतीत मी एकदा त्यांच्या घरी गेले होते, दरवाजा खुलाच होता, त्यांच्या गळ्याभोवती कसलं तरी डिव्हाइस होतं, त्यात लाल लाईट दाखवत होती, त्या संपूर्ण घरात अंधार होता, माहित नाही तो कोणता योगा करत होता पण त्यांचे दोन्ही डोळे बंद होते, तो स्वतःच स्वतःशीच झुंजत असल्यासारखा वाटत होता, त्यांच्या सगळ्या शरीरातून घाम येत होता, तो त्याचा श्वासोच्छश्वास पूर्णपणे रोखून बसल्यासारखा वाटत होता, समोरच्या भिंतीवर एक पोपटाचा पिंजरा पोपटासकट टांगला होता, मी आवाज दिला सूरज, त्याबरोबर तो पोपट बोलू लागला, “हॅलो”, मला वाटत त्या पोपटाला शिकवलं गेल होत हॅलो बोलायला, तो पोपट त्यांच्या समोर ठेवलेल्या पेरुवर काहीतरी चोचीने कुरतडत होता.

वायरे हे सगळं काही ऐकून जांभई दयायला लागला होता, त्याला हे सगळं पारच बोरीगं वाटत होतं.

झारिया खान मात्र हे सर्व कमालीच्या उत्सुकतेने सांगत होती, “मी सूरजला उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गळ्याभोवती असलेलं डिव्हाईस मी काढलं, मला वाटलं तो मरुन तर नाही ना पडलाय, श्वासोच्छश्वास होत असल्याचं काही दिसत नव्हतं, जमिनीवर पडलेल्या त्यांच्या शरीराकडे पाहताना मला भिती वाटत होती, मी त्याला जोरात पाठीमागून धक्का दिला, साधारण तीन-चार मिनिटापर्यंत मी अशी करत होते, समोरच्या पिंज-यातला पोपट आता जोरजोरात ओरडत होता, हॅलो हॅलो म्हणत होता, मी जवळ जात त्या पिंज-याकडे पाहिलं तर तो पोपट माझं चित्र रेखाटत होता पेरुवर चोचीच्या साहाय्याने, माझ्या हातातून ते डिव्हाईस खाली पडलं आणि सिग्नल चेंज झाला, लाईट हिरवी झाली, पण तो पोपट रेखाटत असलेली माझी छबी पूर्ण पाहायच्या अगोदरच सूरजने डोळे उघडले, काय माहित? काय झालं? कोणत्या ध्यानधारणेच्या प्रोसेसमध्ये तो गेला होता, आणि अचानक जोरजोरात श्वास घेऊ लागला, जसं काही कुठल्या तरी धावण्याच्या रेसमध्ये भाग घेतला असेल, माहित नाही कोणती तपस्या भंग झाली होती त्यांची. त्याने रागाने माझी बनवायला घेतलेली अर्धवट अवस्थतेतील पेंटीग रस्त्यावर फेकून दिली, मी दिलेल्या ऍडव्हान्स बददल बोलले तर त्यांने मी दिलेल सगळे पैसे रस्त्यावर फेकून दिले. समोर रस्त्यावर उभे असलेल लोक नुसता तमाशा बघत होत, इतकं इनसल्ट आजपर्यंत कुणीच केल नव्हतं, तर हो मी त्याला जरुर बघून घेण्याची धमकी दिली होती आणि मी सगळं हे टिवीटरवर देखील लिहिलं होतं, पण यांचा अर्थ हा नव्हे की मी त्यांचा जीव घेईन….”

झारिया खान यांच बोलणं संपतच नव्हतं, आणि तिचं रटाळ पुराण वायरे यांना अजिबात आवडत नव्हतं, वायरे तिला म्हणाले, ”ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता”

****************

“तुम्ही जाऊ शकता” सदानंद बोलत होता आणि सुदेश टाईप करत होता

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार दुपारी अकरा चाळीस

दिनांक – 25 एप्रिल 2016

वायरेनी झारियाच्या बोलण्याला नापसंती दर्शवली, “अरे ती झारिया खान नुसती स्टोरी बनवत होती, खूप बोर केलं, धनजंय सांग रिपोर्ट काय आहे?”

धनजंय म्हणाला, “सूरजने मेडिकल टेस्टिग सेंटरमध्ये एचआयव्ही होण्याचं कारण सांगितल नव्हतं, जेनीची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आलीयं, तिच्यावर नजर ठेवयाला सांगितलेल्याकडून काहीही वेगळी नवीन माहिती मिळाली नाही, फक्त ती एका ज्योतिष्याशीं भेटतेयं सतत”

दिनेश बोलला, ”मला वाटत की तिच्या डोक्यातून अजून सूरजच्या आत्माचा विषय गेलेला दिसत नाही, म्हणूनच त्या ज्योतिष्यवाल्या बाबाला भेटत असते”

“शिकले-सवरलेले लोक अश्या जाळ्यात सापडतात” नाराजीने वायरे म्हणाला

सतीशने तिथं पोलीस स्टेशनला आलेला फोन उचलला, बोलण सपलं, तो फोन ठेवत सांगू लागला “सूरजचे वडील येणार आहेत.” त्यांच्या शेजा-यांने सांगितलं की त्यांना पॅरेलीसचा आजार असल्याकारणाने इथं येणं जिकरीचं होणार आहे पण ते निघाले आहेत, डॉक्टरांनी त्यांना परमिशन दिलेली नाही पण तरीसुदधा मुंबईमध्ये येण्यासाठी रवाना झालेत, संध्याकाळपर्यंत पोहचतील.

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार दुपारी अकरा पन्नास

दिनांक – 25 एप्रिल 2016

आणखी एक रिपोर्टीग होत होती.

दिनेश बोलला, ”त्या दोन्ही हत्याराचं सीसीटीव्ही वरच्या ब्लर फुटेजच्या आधारावर बनवलेली स्केच रेडी झालीयतं”

“सगळ्या शहरातल्या पोलीस स्टेशनमध्ये फॉरवर्ड करा आणि तसचं काही असेल तर ताबडतोब रिप्लाय देण्यासाठी सांगा” वायरे लागलीच बोलले.

धनजंय बोलला, आपल्या खबरीलोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामाठीपु-यातल्या एरियात त्याचं येणं-जाणं होतं, कॅन्वहास घेऊन तो दोन-तीनदा गेला होता, तिथं प्रत्यक्ष जाऊन तपास करणं योग्य राहीलं.

****************

ठिकाण – ऑफिसचा भाग

वेळ – शनिवार रात्रीचे अकरा वाजता

दिनांक 23 एप्रिल 2016

दशरथ समाधानी मनाने काही विचार करुन योगेशला म्हणाला, ”अरे मी सोमवारी कदाचित उशिरा येणार आहे, हॉस्पिटलला जायचं आहे…. बायकोला घेवून”

योगेशने त्यांची खेचण्यासाठीचा मौका आताही अजिबात सोडला नाही, बाकी मुलंही तिथंच समोर होती.

योगेश म्हणाला, ”अरे दशरथ निशाना लागतोय की नाही, की आम्ही काही मदत करु”

“भोसडीच्या झाटू” दशरथ रागारागाने बडत बडत होता. त्याचं टयुनिंग जुळत असल्यामुळे त्यांच्या अश्या शिव्या देण्याचं योगेशला काही वाटत नव्हतं, तो अजून जोरात हसत होता.

ठिकाण- बसस्टॉप

वेळ- शनिवार रात्री अकरा वाजून दहा मिनिट

दिवस- 23 एप्रिल 2016

शेवटी अकरा वाजत आले, बसस्टॉप पाशी असलेलं ते प्रेत आता घेवूनही गेले होते, बसस्टॉपपाशी येताच आता त्याला लगेचच बस भेटली होती. बसच्या आत बसल्या बसल्या त्याला बरं वाटत होत, कदाचित आज त्याला एकदम शांततेची झोप लागणार होती….. बसच्या त्या पुढच्या विडोंज सीटपाशी जो-याच्या वाराची रपेट एकाएकी लागलेल्या ट्राफिकमुळे थांबली, हे रोजचं नाटक आहे, कच-याच्या गाडया इथे रात्री नेहमी अश्या रस्त्यावर लावतात त्यामुळे संपूर्ण रस्ता पॅक होऊन जातो, एक तर एअरपोर्टच्या बाजूचा रस्ता. त्या तसल्या माहौलात ही दशरथ स्वतःमध्येच गुंतून गेला, त्याला आपले जुने दिवस आठवू लागले. पार लग्नाच्या वेळेचे.

****************

ठिकाण- लग्नाचा मंडप

वेळ – तीन वर्षांपूर्वी

लहानपणापासून एका पायाने अधू असलेला दशरथ. त्यांच्या आंनदाला पारावार उरला नव्हता, त्यांच्या डोक्यावर नव-यामुलाचा फेटा होता, शेवटी एकदाची त्याला पत्नी मिळणार होती. त्याने एक-दोनवेळाच नवरीमुलीचा चेहरा पहिला होता, पण डोळे भरुन पाहणं अजून झालं नव्हतं, वडीलमाणसांच्या, मोठया माणसांच्या पुढयात असं टक लावून पाहणं चांगल नव्हतं.

पण मंडपात काही वेगळ्याच गोष्टी ऐकू येत होत्या, थोडया फार त्यांच्याही कानावर आल्या होत्या.

“अरे नव-यामुलांचा मुंबईमध्ये स्वतःचा रुम आहे म्हणून काय झालं, एका पायाने अधू मुलाला एवढी सुंदर बाई बायको म्हणून, कुणी जुळवलं नातं, काहीतरी प्रॉब्लेम आहे मुलीमध्ये, नाही मुलगी गरीब आहे, शिकलेली नाही आणि मुलगी असल्याकारणानं तिचं ओझं कोण उठवेल, आणि वरुन बिनाहुंडयाच लग्न होतेयं, मुलीच्या बापाचं तर टेंशनचं मिटलं”.

“आणि असाही बाप काय आयुष्यभर घरी बसवून ठेवेल तर लोक त-हे-त-हेने प्रश्न उभे करतील, यांच्यापेक्षा लग्न करुन दया, शहर बदलेल, लोक बोलणं विसरुन जातील”.

****************

ठिकाण- दशरथचं घर

वेळ- रात्रीचे बारा वाजलेत, रविवार सुरु झाला

दिनांक- 24 एप्रिल, 2016

दशरथ घरी आला, घरच्या डायनिंग टेबलपासून सगळ्या गोष्टीची जागा बदलली होती, काही दिवसापासून हे सारं होत होतं, खिडकीचे पडदे बदले जात होते, जेवण्याची भांडी पुन्हा एका वेगळ्या त-हेने ठेवलेली होती, पंलगाच्या पलीकडे एक काहीतरी वेगळ्या प्रकारचं इलेक्टरीकल डिव्हाईस पडलं होतं, दशरथने आल्या आल्या टीव्हीला जोडलेली केबलची वायर मागच्या बाजूने काढून टाकली.

कंपनीत तो नीटसं जेवला नव्हता, त्याला भूक लागली होती, घरात आल्या आल्या कपडे बदलून जेवण जेवण्यासाठी बसल्या बसल्या दशरथ बायकोला म्हणाला, ”परवा हॉस्पीटलला जायचं आहे लक्षात आहे ना…गोळ्या घेतेयस ना!!... हे आज तू पुन्हा चपात्या वेगळ्या आकाराच्या का बनवल्या, आजकाल तुझं जेवणात लक्ष नसतं, काय चालयं आजकाल, मन कुठं दुसरीकडे हरवलयं काय?”

तो जेवण्यासाठी बैठक घालून जमिनीवर बसला, त्याने चपातीचा एक तुकडा तोंडात घालत स्वतःशीच बोलत होता, “आता या पुढे नाही भटकत फिरणार मन गीता, जेवणं सगळं योग्य होतं तरी चवीला वेगळं का लागतयं… शीट मला तो फोन नाही करायला पाहिजे होता… जर काही गडबड झाली तर… जाऊ देत…. तरी बरं झालं कन्फर्म केलं”

त्यांची बायको गीता हिचं लक्ष कुठे दुसरीकडे लागलं होतं, तिला कुण्याच्यातरी येण्याची आस लागून राहिली होती, त्याला इतक्यात यायला हवं होतं, पण तो आला नव्हता, किंवा ती कुण्याच्या तरी आठवणीत रममाण झाली होती, थबकली… थांबली… तिला त्या समोरच्या खिडकीतून चंद्र दिसत होता… पण तो कैद झाल्यासारखा वाटत होता… कुणाच्या तरी बंद घरामध्ये…..

लाईट बंद झाल्या, जेवण खाऊन ते दोघ झोपू गेले, तिने गोळया घेणं मागच्या कित्येक दिवसापासून बंद केलं होतं, खोकला वाढत चालला होता, परिस्थिती पहिल्यासारखी कुठे होती, आता शरीर बाहेरुन चागलं दिसत होतं, पण आतून परिस्थिती फारच गंभीर होत चालली होती.

****************

ठिकाण- दशरथच्या गावचं घर

दिनांक- तीन वर्षांपूर्वी (मधूचंद्राची रात्र)

शेवटी ती रात्र आलीच, डोक्यावर पदर ओढून नवरी लग्नाच्या रीतीरिवाजानंतर पहिल्यांदा एकमेंकाला एकांतात भेटणार होते, मधूचंद्राची रात्र…! ती ईश्वराची अजब पेशकश होती यात काही शंका नाही… डोक्यावरचा पडदा हटला होता… एकदा दशरथचं लक्ष कपाटाच्या दिशेने गेलं, पण नाही… नीलकमळासारख्या डोळ्यांची ही स्त्री आपली बायको आहे, या गोष्टीने दशरथ जरा जास्तच उत्सुक होता… त्याने आपला शर्ट काढला, तिच्या त्या गो-या अंगावर चूर होत चाललेली लाज, त्यात तिची ती यौवनानं भरलेली काया.. अहा…हा… आयुष्यात स्वर्ग म्हणतात तो हाच का? त्यांने तीची साडी उतरवायाचा प्रयत्न केला… आपला पाय सावरत… दशरथच्या हातून पदर सरकला.. तिच्या गालावर आलेले अश्रू तिच्या चेह-यावर अजूनच कहर उठवत होते, त्याने तिचे केस खोलले, ती आतापर्यंत गुपचूप होती, तिची कोणतीही स्वाभाविक प्रतिक्रिया नव्हती, दशरथसाठी हे सगळं एखादया खाण्यासाठी पंचपक्कवानांनी भरुन ठेवलेल्या थाळीप्रमाणे भासत होती… तो तिला गळ्याच्या दिशेने तिला झोंबू लागला… आणि त्यांने पुन्हा एकदा तिला स्पर्श केला पण त्यांच्या बायकोच्या डोळ्यातून आसवं टपकतच होती, तिच्या डोक्यावर घाम जमा झाला होता, गीता नाव होतं तिचं.

दशरथ मनातल्या मनात पुटपुटत होता, ”तुझ्याशिवाय जगण्याच्या मैफलीत जालीम गडे आतापर्यंतच आयुष्य अपूर्ण होतं, आता नको ठेवूस लाजेच्या सीमेवर…आम्हाला आता वाट बघायला नको लावूस…” तो मध्येच काहीतरी कवितेतल्या ओळी बडबडत होता.

त्याने शेवटी ओठ खुलले, दशरथ स्वतःला रोखू शकला नाही, लाल ओठ… तो अजून पुढे सरकला.. तो तिला स्पर्श करु लागला, तिच्या अंगावर चुंबनाचा वर्षाव करण्याच्या इरादयाने तो अजून धीर एकटवू लागला… त्यांच्या हदयातली धडधड अजूनच वाढू लागली… काहीतरी आतमध्ये होणारी घुसमटीसकट गीताने स्वतःला रोखलं होतं… तिच्या मनाच्या आत खूप काहीतरी ढवळून निघत होतं, ती काही बोलण्याच्या अगोदरचं दशरथने त्याचें ओठ तिच्या ओठावर ठेवले… गीताने हिमंत दाखवली… तोंडाजवळ आलेली गोष्ट थांबली… उफाळून आलेल्या प्रत्येक हेलकाव्यासकट दशरथ थांबला.. गीतेच्या कंबरेच्या दिशेने गेलेला त्यांचा हात ढिला पडला, गीता बोलू लागली.

“कदाचित या रीतीरिवाजाच्या जाळ्यात अडकल्यामुळे माझं तुमच्याशी बोलणचं झालं नव्हतं, आणि मी काही तुम्हाला सांगण्याअगोदरच आपलं लग्न झालं, पण आता सागणं खूप गरजेचं आहे, आणि जे मी काही सांगणार आहे हे सगळं खरं आहे, एखादेवेळी तुम्ही हे पहिलचं पकडू शकला असता, आताही थोडे सावधपणे ऐकलं असाल तर ती खाजगीतली बोलणी तुमच्या नक्कीच कानावर पडली असतीलही”

“तुमच्यासोबत धोका झालायं, तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, वडीलावर ओझ बनलेली मुलगी आपल्या घरात कायमची ठेवल्यामुळे आणि दुनियाभरच्या प्रश्नापासून वाचण्यासाठी लग्न लावून देतात, तुम्हाला काही संशय आला नाही लोकांच्या बोलण्याचा..? अंपग असूनही सुंदर बायको…? थोडीशी हतबलता असल्यामुळे हिंमत नाही दाखवू शकले मी… कदाचित हे शहर सोडून निघून गेले असते तर चांगल झालं असतं, पण चार पैसे कमवायची अक्कलही नाही… शिकून-सवरुन अडाणी…”

दशरथला हे बोलणं काही समजत नव्हतं, त्यांच्यातला तो तामसी नर जागाच होता, आत भडका पेटला होता, कसतरी त्याने तो रोखला होता.

दशरथ सावरायच्या तयारीने आडाखे बांधत म्हणाला, ”कुणाशी प्रेम होत का? विसरुन जा”

गीताने आपले डोळ्यांची आसवं पुसण्याचा प्रयत्न करत हलक्या आवाजात म्हणाली, ”नाही, मला एचआयव्ही आहे, एडस… इथे एरियात खूप कमी लोकांना माहित आहे, सात वर्षांपूर्वी एका चुकीच्या इंजेक्शनमुळे” गीता काहीशी बावरली होती, तरी ती पुढे बोलू लागली, “लोकांच्या रोजच्या, मुलीचं लग्न कधी करताय या तगादयाला कंटाळून लग्न लावून दिलं”, “एडस” दशरथ गंभीर होत पुटपुटला, पायाखालची जमीन सरकन काय असतं हे त्याला आता पूर्णपणे कळालं होतं, ”तू मला हे पहिलं का नाही सांगितलसं?, माझं तर आयुष्यचं खराब करुन टाकलसं” घामाने निथळून गेलेला दशरथ स्वतःला नीटसा सावरु देखील शकत नव्हता, त्याचं डोक काम करण्याच्या पार पलीकडे निघून गेलं होतं.

दशरथ म्हणत होता “हे मी काय करुन घेतलं, शीट… शीट…. माझ्यासोबत त्या मंडपात घेतलेल्या फे-याचं काय?... साथ निभावण्याच्या वचनाचं काय… सगळं खोटं होत सारं”

त्यांच्या मनात विचाराची माळा चालत होती. तो दिढमूड होत स्वतःशीच म्हणत होता, ”जर एका क्षणासाठी मला मागे फिरण्याची संधी मिळाली आणि लग्नाबदलचा निर्णय बदलू शकलो तर”

त्याचं लक्ष पुन्हा त्या समोरच्या कपाटाकडे गेलं, त्यांच्या डोक्यातून मधूचंद्राची रात्र अजून गेली नव्हती.

त्याने कपाट उघडून पुन्हा बंद केलं, हातात कंडोम होता… सोप्या भाषेत निरोधक…., त्यांच्या डोक्यात त्या आदिम प्रेरणतल्या मैथुनाने ताबा घेतला होता… यालाच हवस म्हणतात का? हाच तो क्षण असतो जिथं माणसातला पशू जागा होतो… यातूनच बलात्कार जन्माला येतो काय?

त्याने त्या एका क्षणाला डोळे मिटले.

तो एका उंच पर्वतावर उभा आहे, जिथून खाली उडी मारण्याची काहीतरी वेगळीच मजा आहे…त्याचं अलगच संगीत आहे…तो आजपर्यंत हे विविध राग फक्त ऐकतच आलायं, आज तो प्रत्यक्ष पहिल्यादा गाणार आहे… अनुभवणारं आहे… कहानीचा हिरो बनून त्या पर्वतावरुन खाली उडी मारणारं आहे… पण आता… मातम आला होता… सगळं बदल होतं… एक वेगळीच धून होती… ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते… प्रत्येक कोसळणारी उडी त्याला मरण्याच्या दारात डुबवू शकत होती… काय पुन्हा सुरवात करु… त्या धडकत्या श्वासाना कसं काबूत ठेवू… हीच तर जवानी आहे… हया क्षणानांनाच तर अनुभवायचयं, पण त्याला जगायचं पण होतं, का उडण्यासाठी पैरेशूट वापरु का? ज्या क्षणाची मी इतकी वर्ष वाट पाहिली, ज्यांच्याशी मी माझ्या भावना जोडल्या, त्यांच परिणाम स्वरुप काय तर….काय होईल… जर माझी चाल चुकीची पडली…मी दगडांना जाऊन धडकलो तर…मरण…कपाळमोक्ष…

नाही जर कडोंम फाटला तर नाही नाही… त्याने आतापर्यंत स्वतःला रोखलं, पण यापुढे कधीपर्यंत रोखणारं… सोप नाहीयं, लढाईला निघालेल्या त्या बलदंड कायेच्या शूरवीराला आता लढाईमधून होणा-या मरणाची भीती दाखवून शांतीदूत बनवायचं, तसं बघायला गेल तर ढाल होती पण त्याने जीव वाचेल की नाही यांची कोणतीही विश्वासाहर्ता नव्हती, राज्य वाढवण्यासाठी वीरमरण.. नाही.. नुसत्या लढाईच्या मजेसाठी वीरमरण नको… आता त्याला भीती होती की गीताचं शरीर त्याला मरण्याच्या खाईत नाही ना टाकणार… बस तो एक दिवस आणि ही आतापर्यंतची तीन वर्ष…. या आताच्या क्षणापर्यंत, दशरथने तिला स्पर्श देखील केला नव्हता.

****************

ठिकाण- दशरथचं मुबंईतलं घर

तो जगत जरुर होता, पण आतून एक वेगळीच घुसमट चालू होती, दुनियेसाठी गीता जरुर त्यांची पत्नी होती पण पती-पत्नीवाली दिशासमरसता त्यांच्यात अजिबात नव्हती, आणि ती येणारंही नव्हती, गीताला तो संभाळत जरुर होता… दुनियेसाठी.. पण तो घाबरत होता दुनियेच्या प्रश्नांपासून… जर हिला सोडलं तर दुनिया काय म्हणेल? आणि दुसरं लग्न केलं तर काय गैरटीं की सगळं काही व्यवस्थित होईल, माझ्या अंपग असण्याकारणामुळे पुन्हा काहीतरी नवीन संकट उभं राहिलं, जे हयांच्यापेक्षा मोठं असेल! त्याला मरणापासून दुनियेच्या प्रश्नांपर्यंत सगळ्याबददल भीती वाटत होती… आणि गीता या तीन वर्षांत…

गीता मुंबईच्या लक्ष्मी नगरच्या त्या मेन रस्त्यापासून हाकेच्या अंतरावरच्या डाव्या बाजूच्या इमारतीमधल्या पहिल्या मजल्यावर राहत होती, तरीदेखील तिची कोणाशीही जास्त ओळखपाळख नव्हती, तशीही ती बिल्डिगं खूप सालापासून रिकामीच होती कारण मागच्या ब-याच काळापासून बिल्डीग मोडकळीस आल्याच्या कारणावरुन खूप सा-या लोकांनी घर खाली निघून गेली होती, गीताच्या माहेरच्या लोकांनी तिच्याशी आता बोलणचं टाळलं होतं, त्यांच्यासाठी ती ब्याद होती आणि तिच्याशी संपर्क ठेवून उगाच आजूबाजूच्या लोकांच्या नसत्या चौकश्या त्यांना नको होत्या. दशरथ-गीता अशे दोघचं या घरात मागच्या तीन वर्षांपासून राहत होते.

आणि मुबंईत असाही वेळ कुणाजवळ असतो, बोलण्यासाठी, वावरण्यासाठी. कुणाचं कुणाला घेणं-देणं नव्हतं की त्या बंद दरवाजाच्या आतमध्ये काय चाललयं, तिच्या या मुंबईतल्या वास्तव्यात तिने मुंबई अशी कधी पाहिलीच कुठे होती, तीन वर्षांत तिनं केवळ एखादा रस्ता क्रॉस केला होता, आणि रिक्षाने हॉस्पिटलला गेली असेल, त्याशिवाय बाकी काही नाही, रात्रीच्यावेळी मुंबई मोठी झगमगाटाने सजून निघायाची, तिला पाहायचं होतं मुंबईचं ते रुप.. तिची इच्छा होती.. पण ती कुणाला सांगेल.. हॉस्पिटल, लाईट बिल, जेवण या व्यतिरिक्त दशरथशी तिचं बोलणचं व्हायचं नाही.

पण गीताची जवानी काही कमी नव्हती, दिवसेंदिवस ती अधिकाअधिक सुंदर दिसत होती, गो-या अंगापासून, तिच्या राहण्या-सवरण्यापासून सगळं काही… डोळ्यातली चमकेपासून बोलण्याच्या अदबीपर्यंत.. सारं काही मनाला मोहून टाकणारं.. ती भांगेमध्ये शेदूंर घालायची, या सगळ्या साजशृंगारानंतर तर विचारुच नका..उरोजाची प्रमाणबदधता असो की कंबरेचं मूरडणं..बसायच्या ढंगापासून.. प्रत्येक गोष्ट तिच्यावर शोभून दिसायची, पण दशरथाच्या मेरु पर्वताच्या उंची एवढया निश्चयापुढे काहीच नव्हतं. तिचं शरीर आतून मात्र पूर्णपणे यांच्या विपरीत होतं. तिच्याशी संग करण्यापासून दशरथला एकनाअनेक कारणांनी जखडून ठेवलं होतं, त्याला तर ती विषकन्या वाटायची, त्याला गीतामध्ये मरण दिसायचं, दोघही एकमेंकाच्या मनामधून साफ उतरले होते, फक्त गरजेपुरता त्यांच बोलणं व्हायचं, दोघंही एकत्र राहत असूनदेखील अनोळखी होते, मनातून ते परके होते, हा गीतेचं जगणं कोण्या शापित गंधर्वकन्येसारखं झालं होतं….

****************

ठिकाण- दशरथचं घर

दिनांक – 23 नाव्हेबर, 2015 दुपारी एक वाजता

आपल्या शारिरिक गरजाचा भला मोठा साठा ती दशरथ कामावर गेल्यावर निश्चित होऊन सगळे अंगावरचे कपडे उतरवून अशीच स्वत:ला आरश्यात पाहत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करी, सगळ्या अंगाला रोमांचित करण्यासाठी आपली बोट अजून आतल्या अवयवाच्या दिशेने टाकत होती, मनातल्या मनात आपल्या एचआयव्ही बाधित शरीराची गोष्ट ती विसरुन जाई, ती कोणासोबत तरी समागम करत असल्याचं चित्र डोळ्यासमोर आणी.

कोणाचीही कल्पना करी मनातल्या मनात, कुणीही टीव्ही सिरियलमधला बघितलेला अभिनेता, सिनेमातला नट… कोणीही… ती अशीच स्वतःच्या नग्न शरीरासोबत खेळत असे… अजून…अजून…नाही…आ…आ…आ…ती सुखाने कण्हत होती…पाण्याचे फवारे उडू लागले…आणि पुढच्याच काही क्षणानंतर शरीराच्या आध्या अधु-या मिटलेल्या भूकेसोबत आणि तृप्तीचा आवेश ओसरला की मनातल्या मनात म्हणे की बरं झालं प्रत्यक्षात हे सगळं झालं नाही… नाहीतर कुणीतरी शिकार झाला असता. ती मनाला सावरत असे, हे प्रत्येकी दोन-तीन दिवसानंतर होत असे… ती करु तरी काय शकत होती….

****************

दरवाजाची बेल वाजली, ट्रिंग ट्रिंग… दशरथ या वेळी नसेल मग कोण? ती तशीच विनाकपडयाच्या स्थितीत आपल्या शरीराशी खेळण्यात दंग होती, शरीराला स्वतःच स्वतःला स्पर्श करत होती, स्तन दाबत होती, ती तशीच बाहेर आली…नग्न अंगासकट…तीने दरवाजाच्या त्या काचेतून बघितली… कोणीतरी तेवीस-चोवीसाचा मुलगा घामाने लालेलाल झालेला दिसत होता, त्याला बघितल्यावर आपल्या-आपल्या श्वासोच्छसवासात घुटमळत बसलेली गीता स्वतःला रोखू नाही शकली, तिने आपली बोट आपल्या जननअंगात खोलवर रुतवली, तिला कल्पना करायची गरज नव्हती, काचेपलीकडे का असेना कोणीतरी प्रत्यक्ष होतं… ती बोट अजून खोलवर घुसवू पाहत होती… आणि दरवाजाची बेल अजून जोरात वाजू लागली… आणि केवळ दोन मिनिटानंतर दरवाजा खुलला.

****************

सदानंदच्या जगात

ठिकाण-ग्रॅटरोड रेल्वेस्टेशनचा परिसर भूतकाळ

रेल्वेस्टेशनपाशी ग्रँटरोडला गाडी थांबली, डब्यात बसलेल्या एका माणसाने छदम पदधतीने हसत म्हणाला, ”माहित आहे ना हे स्टेशन काय म्हणून ओळखलं जातं”

दुस-या माणसाने आपल्या नाकाला बोट ठेवताच बाकीची लोक हसू लागली, त्याचं हसणं वाढत चाललेलं पाहून एक जण मोठया रागात बोलला, ”कारण, यासाठी की तुझ्या-माझ्या आई-बहीणी सुखासुखी फिरु शकतील”

सदानंद तिथं उपस्थित होता, त्यानें हे मनात टिपलेलं कथेसाठी वापरता येईल का नाही यांचा विचार करु लागला.

****************

ठिकाण- वेश्यावस्तीचं प्रवेशद्वार

वेळ – सोमवार दुपारी एक वाजता

दिनांक – 25 एप्रिल, 2016

कामाठीपुराच्या त्या रेडलाईट एरियामध्ये पोलीसांची गाडी येऊन थांबली, वायेरेने सूरजचा फोटो त्या वेश्याव्यवसाय चालवण्या-या मालकीण झोहेनबाईला दाखवला. मालकीण झोहेनबाई म्हणाली, “हा आला होता, त्याला एकदम रफटफ मुलगी पाहिजे होती, उफडया अंगाची… आहे इंथ एक मुलगी…कमळी नावाची..तीचाच कस्टमर आहे तो…हा आला होता ना….इथं…” कमळीच्या दिशेने हात करत म्हणाली, ”हा तो डाव्या बाजूची खोलीत उभी आहे बघा ती कमळी, तिलाच विचारा, तिचाच गि-हाईक आहे…हल्ली येत नाय तो, ” तिला वाटत होत पोलीस आले म्हणजे कोणीतरी चोरी-लुटारा असेल त्यामुळे झोहेनबाई बोलत होती.

वायरेला विश्वास होता की रमेशने खरेदी केलेली पेटीग्सवाली बाई हीच असेल.. त्यानें आपल्या मोबाईलमधून इमेजच्या फोल्डरमधून तो फोटो व्हू केला.

“बिचारीला आज असं ही कोणी कस्टमर नाही भेटला”, झोहेनबाईचं तुणतुण चालूचं होतं.

वायरे आणि बाकी साथीदार आत गेले, वायरे यांचा अंदाज चुकला होता. ”शीट…नाही..ही कोणी तरी दुसरी बाई आहे…ती ही नाही जी त्या पेंटीगमध्ये आहे” तरी एकदा विचार केला पण नाही “हीचा चेहरा पूर्णपणे वेगळा आहे” वायरे मनातल्या मनात म्हणाला.

वायरेने नाराजीने टेबलावर आपल्या हात मारला, मोबाईल पुन्हा खिश्यात ठेवला, सोबत असलेल्या हवालदाराला इशारा करत म्हणाला, ”हीची पण एचआयव्ही टेस्ट घ्या”

“साहेब गरज नाही त्यांची, माझ्या सगळ्या कस्टमरला मी कंडोम स्वतःच देते, ते एनजीओवाले येतात दयायला… आणि कंडोम शिवाय मी काय करुच देत नाय” कमळी अजिबात न घाबरता सहजतेने बोलत होती. वायरे अगोदरच वैतागलेला होता. वायरे रागारागाने म्हणाला, ”जास्त बोलू नकोस जितकं विचारतोय, त्यांची सरळ सरळ उत्तर दे, हा पोरगा येत होता इथं”

“हा गोरा चिकना होय,पेन्टर..ते लांबड लांबड काय तरी घेऊन यायचा” कमळी मुददाम मजाक करण्याच्या मूडमध्ये होती, ती बिनधास्त होत बोलत होती.

दिनेश म्हणाला, ”कॅन्वहास का?”

कमळी तोडांतलं असलेलं पान थुंकत म्हणाली, ”हा कॅन्वहासच बोलायचा…, ब्रशं, पेस्ट… लाकडी बोर्ड.. सगळं घेऊन येई…पहिल्यादां आला तेव्हा म्हणाला कपडे काढ आणि बस सरळ.. त्यानं त्याचं एक पेंटीग पेंट करायला आणलं होतं…तर मी बसली होती…चेहरा पहिल्यापासून बनवून आणला होता… चेह-यापर्यंतच पेंटीग तयार होतं पुढचं बाकी होतं, अर्धवटचं पेंटीग होतं ते…”

वायरेने पटकन खिश्यातला मोबाईल् काढत ती इमेज कमळीला दाखवत म्हणाले, ” अर्धवट पेंटीग…काय ही पेंटीग होती…”

”हा हीच पेंटीग” कमळी एखादी खुशी व्हावी तशी चेकाळतं म्हणाली, पण तरीदेखील तिला हे नेमकं काय चाललयं यांची सुतराम कल्पना नव्हती. तिच्यासाठी हे एकूण प्रकरणं समजण्याच्या पलीकडचं होतं.

दिनेश रमेशशी झालेलं बोलणं आठवून हळूच वायरे यांच्या पुढयात जाऊन कानापाशी हसत म्हणाला, ”पंचवीस लाख आणि अपूर्णता”

कमळी आता थोडी बावरली तिने सहजपणे विचारलं ”पण झालं काय आहे”

पण वायरे अजिबात एकूण हसण्याच्या मूडमध्ये नव्हता, वायरेना समजत नव्हत की ही कोण बाई होती जिची पेंटीग सूरजने बनवली होती आणि ती खरचं अस्तित्वात होती का नाही?

*******Retain*********

ठिकाण – रॉय यांची लॅब

वेळ- सोमवार रात्री आठ वाजता

दिनांक – 25 एप्रिल, 2016

काचेच्या त्या भिंतीपल्याड सूरज झोपला होता, तर या बाजूला इथे वायरे खुर्चीत बसले होते, सूरज आपल्या आतून अशक्त बनत चाललेल्या शरीरासंबधी वायरे यांना सांगत होता, सूरजच्या कानाला मायक्रोफोन लावले होते, वायरे सूरजचं बोलणं स्पष्टपणे ऐकू शकत होते, पण त्याला बाहेरचं केवळ त्या मायक्रोफोनने ऐकू येत होतं तेवढचं, सूरज खूपच कमजोर आणि थकल्यासारखा वाटत होता, वायरेच्या कानाला हेडफोन लावले होते.

ठिकाण – रॉय यांची लॅब

वेळ- सोमवार रात्री आठ वाजून पाच मिनिटं

दिनांक – 25 एप्रिल, 2016

वायरे काहीश्या गंभीर स्वरात म्हणाले, ”तुला एचआयव्ही कसा झाला?”

वेळ- तीन आठवडयापूर्वी साधारण तीस एप्रिल 2016

माझी एचआयव्ही टेस्ट पॉसिटीव्ह आली होती, दशरथ बरोबर म्हणाला होता की माझ्या कर्माची फळ म्हणून मला ही सजा झाली, मी प्रंचड अश्या दुखात होतो, जीवनाबददलची आशा, मरणाबदलची भीती सगळं असं नजरेसमोर येतं होतं, नाही हा रिपोर्ट चुकीचा पण असू शकतो, कुणा दुस-या पेशंटचा पण असू शकतो, मी पुन्हा एकदा दुस-या मेडिकल डायग्नोसिटक सेंटरला टेस्ट केली, टेस्ट रिझल्ट पहिल्यासारखाच होता, मला एडस झाला होता, त्यांनी मला खूप काही सांगितलं, सल्ले दिले, समुपदेशन केलं, नात्याबददल विचारलं, मला सकारात्मक विचार करण्याविषयी, राहण्याविषयी सांगू लागले, पण मी खूप चिंताग्रस्त होतो, पण मी हे कुणालाही सांगितलं नव्हतं.

जगणं संपण्याच्या वाटेवर होतं, मी पुन्हा एकदा जेनीला कॉल केला आणि तिचा वाढदिवस साजरा केला.

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार दुपारी अडीज वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

खबरी सांगत होता, की त्या दोघांना पेरोलवरती बाहेर काढलं गेलं होत, सुरेश कदम आणि अविनाश थोरात, खूपच शातिर शार्पंशूटर होते, पैश्यासाठी खून करणारे, सुपारीबहाददर… आतली खबर ही आहे की कुण्या मंत्र्याच्या शिफारशीवरुन बाहेर काढलं गेलं, कुणाच्यातरी खूनाची सुपारी मिळाली होती, पण सूरजच्या कनेक्शनविषयी काही माहिती नाही.

****************

ठिकाण- सदानंदचं घर (वर्तमानकाळात)

सदानंदने लिहिलेली स्टोरीमध्ये आता सुदेशला इंटरेस्ट येत होता, उत्सुकता वाढत चालली होती, त्याने टाईप करणं थांबवून त्याला विचारलं, ”कोणी ना कोणी तरी खोटं बोलतचं असेल ना!”

सदानंदला आठवत होतं,

ठिकाण- सदानंदचं घर (भूतकाळ)

रेवती सदानंदची आई बोलत होती, ”अरे तो नितीन आला होता म्हणत होता की अकांऊटला वरकमाईचा चान्स असतो म्हणून, खरं आहे का?”

“करतात काही लोक” सदानंदने आईने विषय टाळण्याच्या हिशोबाने तुटक बोलत होता, पण आई बोलतचं सुटली, ”तू बघतच आहेस ना!, कशी तुझ्या आणि माझ्या महिन्याभराच्या कमाईत टिकावं धरणं मुश्कील होतं, बाजारात जाऊन बघ शंभर रुपयात काय काय येतं, दोन वस्तू नाय विकत घेतल्या की नोट गायब, तिथं बाहेर भिंतीचं सिमेंट पूर्णच निघालयं, किती महिन्यापासून विचार करतेय, डागडुजी करुन घेईन, वाटल होतं तू कामाला लागलास की थोडया दिवसात आरामात घरी बसेन, पण हे देवा, पांडुरंगा! माझ्या नशीबी चांगले दिवस कधी सुरु होणार, तुलाच ठाऊक”

सदानंद खिडकीतून दिसणा-या त्या चौकटीतल्या आकाशाकडे नुसताच पाहत होता, त्याला वाटत होतं की जोरदार आतल्या बेंबीच्या देठापासून ओरडावं, आपलं दुख, आपलं आयुष्यासोबतचं प्रतिकार करणं, आईला वाटलेल्या अपेक्षानां पुरं न उरणं यासा-याचं सगळं सोशिकपणं व्यक्त करावं…. पण तो नाही करु शकत होता… त्याला आलेला एक मोठा हुंदका त्याने आतल्या आत गिळला…..तो विचाराच्या खाईत लोटला…आपण लेखक आहोत हे फक्त आपल्यालाच वाटत का? का हा निव्वळ भम्र आहे?.. आपण खरचं नाव कमावण्याइतपतच लिखाण करु का आयुष्यात… खरचं लेखकाला किंमत आहे का आजच्या जगात… ज्याला ख-या अर्थाने चेहरा नसतो लोक त्याचं फक्त नाव लक्षात ठेवणं पंसत करतात…तोच आहे जो सगळं जग तयार करतो…मांडतो…कल्पना करतो..सत्यात उतरवतो…आभास घडवून आणतो…प्रत्येकाला त्याने दिलेल्या ठोकताळ्याप्रमाणे अंदाज बांधायला भाग पाडतो…शेवटही अगदी त्यांला पाहिजे तसाच करतो…विधाता…लेखक…

आईच्या या टोमण्याने म्हणा किंवा बोलण्यामुळे म्हणा सदानंद प्रंचड वैतागला होता, त्याला खोटेपणाविषयी खूपच तिटकारा होता, त्याला कधी कधी विश्वास वाटायचा नाही की ही तीच आई आहे जी सकाळी सकाळी देवाला हार घातल्याशिवाय पाया पडल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हती, तो स्वतःशीच ठरवायचा की त्याला या रोजच्या बोलण्यातून, टोमणी खाण्यातून बाहेर यायचं, त्याला त्याने लिहिलेलं लिखाणचं, कथाचं यातून बाहेर पडण्याचा मार्ग वाटत होता. पण…

सदानंद आता भानावर आला, त्याचं मन आता चालू काळात आलं होतं तो आता सुदेशला सांगू लागला, ”काय खरचं कोणती किंमत असते का खरेपणाची, मी विचार केला की माझं प्रत्येक पात्र खरचं बोलणारं.. मी ठरवलं की कोणीच खोटं नाही बोलणार”

“म्हणजे यांत कोणीही खोटं बोलत नाहीयं” सुदेशने उत्सुकतेने विचारलं.

“हा पण मी नंतर माझा विचार बदलला, प्रत्येकजण त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खरं देणारं… पण कोणीतरी काहीतरी लपवतयं एवढं मात्र नक्की” सदानंदचा आवाज काहीसा कमी कमी होत गेला.

****************

ठिकाण – रॉय यांची लॅब

वेळ – सोमवार रात्री आठ वाजून दहा मिनिट

दिनांक – 25 एप्रिल 2016

वायेरेच्या मनात पडलेला सगळ्यात पहिला प्रश्न त्यांनी सूरजला विचारला, ”ती मुलगी कोण होती जी ची तू पेंटीग्स बनवली होती”

सूरज काचेच्या पलीकडून झोपलेल्या अवस्थेत बोलत होता, “थोडं सविस्तर सांगतो, म्हणजे तुम्हाला काही कन्फूजन राहणार नाही, मी रॉय यांची ऑफर स्विकारली, ऑपेरेशन तर झालंच होतं, डोक्यावरचे केस काढावे लागले होते, त्यामुळे टक्कल असल्याकारणाने टोपी घालून फिरवावं लागत होतं, राहण्याची व्यवस्था झाली होती, पण पैश्याची कमतरता अजूनही होतीच, पण ऑपेरेशन करुनही असं वाटत नव्हतं की डोक्याच्या आतमध्ये कुठली क्लिप बसवलीयं वैगेरे…”

सूरज आता रॉयच्या प्रयोगाना होकार दिल्यानंतर त्यांच्या रोजच्या घडामोडीबददल सांगू लागला. पाच महिने उलटून गेले होते, तो सांगत होता त्या दिवसाबददल, ”मला माझ्या पेंटीगच्या प्रोजेक्टवर फोकस करायचा होता, चार पेंटीग्स ऑलरेडी बनवून झालेली होती. मी शहरातल्या गल्ली, रस्ते, बागा सगळं काही पिंजून काढत होतो, मला ही कॉम्पिटशन जिंकायचीची होती, मला अश्या एका नुकत्याच तारुण्यात आलेल्या बाईचं चित्र काढायचं होतं, जी दिसायला कहर असेल जिचा ताजेपणा… कोवळं यौवन.. प्रत्येक मनाला बाधित करेल, तिच्याकडे आकृष्ट करेल, जी या नेहमीच्या भौतिक जगाच्याही वरती काहीतरी असेल, मला ज्यांच्या शोध होता ती अजून तरी सापडली नव्हती, जिला पाहिल्यावर वाटेल की हिला बनवणारा ईश्वरच असेल, ते शरीर.. जिच्या दिसण्याने लोकांची मन सहजच पाघळतील, खूप सा-या लेडिज मॉडेलसपासून एस्कॉर्टच्या सर्विस देण्या-या भेटलो, फोटो पाहिले पण ज्या चेह-याच्या मी शोधात होता तो सापडतच नव्हता.

ठिकाण – जवळची इमारत

वेळ – सोमवार दुपारी एक वाजता

दिनांक – 23 नोव्हेबर 2015

सूरज एका मोडकळीस आलेल्या बिल्डींगपाशी आला होता, ऐन हिवाळ्यातही दुपारचं रखरखीत उनं पडलं होत, भोवळ येईल का काय अशी अवस्था झाली होती, डोक था-यावर नसल्यासारखीच अवस्था होती, त्याला यशवंतच्या घरी जायचं होतं, त्यांच्याकडून काही पुस्तक घ्यायची होती आणि काही दयायची होती.

यशवंतचं घर म्हणजे घर कमी आणि लायब्ररी जास्त.. प्रचंड व्यासंग असलेला माणूस.. पौराणिक कथेपासून अध्यात्मिक विषयावरची त्यांच्याकडे खूप सारी पुस्तके होती. यशवंतच्या घरी जाण्यासाठी खिश्यात पैसे नसल्यामुळे त्याला जवळ जवळ दीड तास चालत जावं लागणार होतं, आणि तो चालत ही होता, तो घामाने डबडबून निघाला, मुंबईतलं ऊन म्हणजे विचारता सोय नाही, त्यात हयाने स्वतःजवळ पाण्याची बॉटलही सोबत ठेवली नव्हती, तसा हा रस्ता ही काहीसा सामसूम… सूरज वायरे यांना या सा-या बददल सांगत होता.

“मला प्रोजेक्टसाठी ही पुस्तक गरजेची होती, पण त्यांच्या घरी पायी जायला निघालो आणि रखरखीत उन्हात शेवटी एकाएकी थकून गेलो, दुपारचा एक वाजला होता, पण जाणं गरजेचं होतं.”

तो रस्ता पार करुन त्या यशवंत राहत असलेल्या बिल्डींगपाशी तो आला, त्याला चक्कर आल्यासारखं वाटत होतं, तो दुस-या मजल्यावर पोहचला, आता त्या पाय-या चढून डोळ्यावर आलेला थकवा मिटवता मिटवता तो एकदाचा पोचला, त्यांने दरवाज्यावरची बेल वाजवली, काहीश्या उशीराने तीन-चार मिनिटांनी दरवाजा उघडला, सूरजचे डोळे लकत आले होते, जसा दरवाजा उघडला तसा सूरज थकलेल्या अवस्थेत समोर यशवंतच उभा असेल असं पाहून म्हणाला, “ही घे तुझी पुस्तकं, आधी पाणी दे पियाला”

आणि त्याने जरासा जोर लावत मान वर करुन उघडया डोळ्यानं पाहिलं, दिवसा तारे दिसण्यातला प्रकार, कोणीतरी सुंदर चेहरासकट दारावर होतं, त्यात तो किती लोभसवाणा… ज्यांच्या तो इतक्या दिवसापासून शोधमोहिमेवर होता तो चेहरा आज प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभा होता… पण त्यांचे डोळे मिटले… कदाचित त्याला चक्कर आली असावी… तो बेशुदध झाला असावा… त्याचं ख-या अर्थाने भान हरपून गेलं होतं.

“मी कोसळलो, माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि मला चक्कर आली” सूरज वायरेना सांगत होता.

आणि त्याचें डोळे उघडले तर समोरच्या घडयाळात दीड वाजला होता, तो सोफ्यावर होता, तो खरं म्हणजे दुस-या मजल्यावर नव्हता तर पहिल्या मजल्यावर होता, त्या दुपारच्या एकूण शरीरअवस्थेत तो बावरल्यामुळे त्याने यशवंतऐवजी कुण्या दुस-याच्या घराची बेल वाजवली होती. आता तो तिच्याशी बोलत होता, त्यांची प्रश्न-उत्तर चालली होती, त्याला येत असलेला यशवंतचा कॉल बघून मोबाईलचं स्वीच ऑफ केला, त्याने इतकी सुंदर बाई या अगोदर पाहिली नव्हती, पण तो या अगोदरच कुणासोबत तरी पहिल्यापासून नात्यात होता, जेनी… पण तो रोखू नाही शकला..बहुतेक तो पाघळला त्या शरीरासमोर… त्यांचा निश्चय झाला होता.. त्याला त्याचं बाईचं चित्र काढायचं होतं… पण ती इतकी वेगळी आणि मोहक का आहे… काय कारणाने तिची मोहकता का दिसून येते.. तिचं यौवन का बरं असं चेकळवतयं…

त्या दोघाचं बोलणं तिथल्या तिथं खूपचं पुढे गेलं होतं, ‘तिचे पती, त्याचं कामावर जायची सेंकड शिफ्ट, ओव्हरटाईम, मुलं नसणं‘ इतकं सारं…

इतक्या वर्षांनंतर त्या घरात कोणी त्या दोघाव्यतिरिक्त आला होता, तो अनोळखी होता, एकदमच नकळत त्याने आत प्रवेश केला होता, का कोण जाणे ती अश्याच संधीत होती? का कोण जाणे की तिला त्या माणसांवर विश्वास बसला, तिने त्याला आत घेतलं, तिने कोणताही आतायातीपणा दाखवला नाही की किंचाळली नाही की बावरली नाही, बेशुदध पडलेल्या त्यांच्यावर पाणी शिपडलं, काही क्षणात तो भानावर आल्यावर त्याला तिनं लिबूं-पाणी दिलं. बोलणं वाढत गेलं… सूरजने कसं इथं चुकून आलो इथंपासून सुरवात केली.. बोलता बोलता.. एका क्षणाला सूरजचा ताबा सुटला आणि.. त्याने गीताचं चुंबन घेतलं ओठावर…पाहिल्यांदा आयुष्यात गीताला कोण्या पुरुषानं असा स्पर्श केला.. तिच्या गालापासून गळ्यापर्यंत ओठाने झोंबत होता.. आणि एका क्षणाला त्याला भान झालं की तो काय करतोय तर तो दरवाजा ओढत बाहेर वरच्या मजल्याच्या दिशेने गेला.. पण काहीचं मिनिटांनी तो पुन्हा गीताच्या घरी आला. त्याचं बोलणं-चालणं वाढत गेलं.. आता तर रोजचं भेटणं होऊ लागलं.. दशरथ कामावर गेल्यानंतर सूरज आता रोज येऊ लागला, या रोजच्या भेटण्यामध्ये गीताने आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टींविषयी सांगितलं, तिनं सगळं काही त्यांच्या ओजळींत टाकलं.

त्या दोन-तीन भेटीनंतर, त्या दिवशी दुपारचे तीन वाजले होते, त्यांच्या हातात पवित्र भगवतगीतेपासून कुराणापर्यंतच्या अर्थानीं सजलेल्या पुस्तकांची पिशवी होती, पण त्याचें विचार मात्र फारच वेगळे सुरु होते, “जी तारुण्याची सीमेच्या परिपूर्णतेचं स्वरुप आहे आणि आता ही जिचं कौमार्य अजूनही भंग झालेलं नाही.. थोडक्यात ती अजूनही वर्जिन आहे…काय हे कसं शक्य आहे… इतक्या सुंदर दिसणा-या गीताला तिच्या नव-याने अजून स्पर्श केलेला नाही…मी तिला आतापर्यंत फक्त स्पर्श केला आहे अजून सेक्स नाही केला..आणि उदया मलासुदधा एचआयव्ही झाला तर…. अरे पण कंडोम आहे ना!”

एक एक गोष्टी बाहेर पडत होत्या सूरजच्या डोक्यातून.. घरापर्यंतचा रस्ता संपला होता पण गीताबददलचा विचार काही केला जात नव्हता.

सूरज वायरेना सांगत होता ”आता प्रत्येक एक-दोन दिवसाआड माझं तिच्याकडे जाणं होतं”

यशवंतने दिलेली पुस्तक जरुर त्यांच्यासोबत होती पण पहिल्या तीन-चार तास तो गीताच्या घरासाठीच देई, ही अशी तारुण्याच्या बहरातला एक जीव, दुसरा त्या सुखासाठी आसुलेलं.. त्या भागातली भीषण शांतता, सगळ्यात महत्तवाची गोष्ट कंडोम… हा गीता खरचं सांगत होती ती वर्जिन आहे ते.

तो स्वतःला सावरु नाही शकला तिच्या त्या अप्सरावाल्या अदासमोर, तो मजा घेत राहिला मिलनाचा, समागमाचा, शारिरिक सुखाचा.. सेक्सचा.. पण त्याला आतून भीती होती…

आज तो कॅनव्हास घेवूनच आला होता, त्याला त्या कम्पोटिशनसाठी एक नायाब शरीर उतरवायचं होतं, आणि तो मनातल्या मनात गीतेबददल विचार करत होता, तिचाच चेहरा समोर येत होता, तर त्यासाठीच तो गीतेच्या घरी आला पेंटीग्सच्या सामानासकट.

****************

आदल्या रात्री जेवणाअगोदर

ठिकाण – सदानंदच घर भूतकाळात

सदानंद लिहिण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही केल्या विशेष काही सापडत नव्हतं, तो ऑफिसातल्या गोष्टीं आठवू पाहत होता, जेनीने त्याला ऑफिसमधल्या एका कोप-यात असलेल्या सर्वर रुममध्ये त्याला ओढत नेत कीस केलं होतं, सदानंदने मोबाईलवर सेक्स करत असलेला एक व्हिडिओ लावला.

सदानंदचं काळ मन त्यांच्याशी म्हणत होतं, ”हा म्हणू का हिला, हे असं लिखाण सेक्ससंबधीच लिखाण नुसतचं व्हिडिओ बघून नाही होणार, त्या भावना कल्पनेने नाही मांडता येणार.. अनुभव महत्तवाचा… मौका पण आहे.. करायची का सुरवात…बोलू का तिला हो”

सदानंदच सफेद मन म्हणालं, ”एकदा का या प्रेम-प्रकरणाच्या झमेल्यात पडलास, तर बेटा.. लग्न करावं लागेल”

“पण त्याने सेक्सबदल लिहिणं सोप होऊन जाईल” सदानंदच काळं मन तत्परतेनं म्हणालं.

“स्वतःला लेखक म्हणवतोस ना, मग का नाही प्रतिभेची चमक दाखवून देत, कल्पनेने एवढं जग उभं केलयसं, मग या सेक्सची भावना पण उतरवं ना तशीच” त्याचं सफेद मन त्याला काहीश्या ताठर स्वरात मनात म्हणालं.

मोबाईल वाजू लागला. घरात इतक्या रात्री फोन ऐकून आई म्हणाली “कोण आहे या वेळी फोन करायला”, आणि नकळत सदानंदच्या तोंडातून निघालं, “जेनी” आणि लागलीच चूक सुधारत म्हणाला ”कामावरुन फोन आहे.. जेनी नावाची मुलगी”

“वाटतयं आजकाल काम खूपच वाढत चाललयं”, आई कोणत्या अभिर्भावात म्हणाली कोण जाणे, सदानंदला वाटलं आईला काही कळालं का?

सदानंदने जेनीचा फोन उचलला, ती तिल्या पलीकडून म्हणत होती, “एकदा आय लव्ह यू म्हण”

सदानंदच काळं मन म्हणत होतं, ”म्हण, आय लव्ह यू”

सदानंदच सफेद मन म्हणे, “नको”

****************

ठिकाण – दशरथ-गीता राहत असलेली इमारत

वेळ – सोमवार दुपारी एक वाजता

दिनांक – 20 जानेवारी 2016

सूरज गीताला म्हणाला, “आज पहिल्यादा चित्र नंतर प्रेम”. त्याने आल्या आल्या असं म्हटलं आणि तो पेंटिंग्स बनवू लागला, गीता समोरच्या टेबलावर अर्ध्या तासापासून गप्प बसली होती.. पण अजून तिला बसवत नव्हतं… सूरजच्या मनात काय आलं कोण जाणे ती पेंटीग्स एका वेगळ्याच लेव्हलवर नायची होती, सूरजने मान डाव्या बाजूला वळवली आणि जोराचा हिसका बसला आणि एक छोटासा हाडाचा कट असा आवाज आला त्याला असं करण्याची सवय होती. सूरजने इतक्या वेळात रंगासकट चेहरा पूर्ण केला. “मला ही न्यूड पेंटीग बनावयचीय, हा बिना कपडयाची”

गीताने कपडे काढले.

सूरजचा ब्रश त्या क्षणापर्यंत कॅन्वहासवर होता, तो ते चित्र पूर्ण करण्याच्या तयारीतच होता, पण त्यांच नियंत्रण नाही राहिलं… मनाचा ताबा सुटला… तो रोखू नाही शकला स्वतःला…. तिच्या शरीराला झोंबू लागला…. त्या प्रत्येक मोहक अंगाला आत-आत रुतून पाहत समाधानाचा नवं परिमाण शोधणं सुरु झालं.

“तो रोखू नाही शकला स्वतःला…. तिच्या शरीराला झोंबू लागला…. त्या प्रत्येक मोहक अंगाला आत-आत रुतून पाहत समाधानाचा नवं परिमाण शोधणं सुरु झालं” सदानंद बोलत होता आणि सुदेश टाईप करत होता.

“मी स्वतःला रोखू नाही शकलो” सूरज वायरेला सांगत होता.

“आणि शरीर अनुभवत असलेली आग तो साठवून ठेवायच्या प्रयत्नात असायच्या दर क्षणा-क्षणाला आत्मसंतुष्टीने शरीराची गरज भरुन जायची आणि अंथरुणातली सगळी ती अवस्था नष्ट होऊन जायची” सदानंद बोलत होता.

“सगळी ती अवस्था नष्ट होऊन जायची” सुदेश बोलत बोलत टाईप करत होता.

पण ते चित्र अजूनही अपूर्णच होतं, पण काय करणार, तिच्या शरीर आणि मन यांच्या दोघाच्याही मी जवळ जात होतो, मला आता तिच्या शरीराची सवय झाली होती, तरी मी दोन-तीनवेळा अजून प्रयत्न केला की तिच्या पूर्ण शरीराला कॅन्वहासवर चितारेन पण नाही करु शकलो.

असाच काळ चालला होता, ना मी कंडोम आणायला विसरत होता ना मी प्रेम करायला विसरत होतो, मला तीची आता लत लागली होती, पण एक दिवशी मी तिच्या घरी पुस्तक विसरलो, आणि त्यादिवसापासून तिच्या पतीला संशय यायला सुरवात झाली, आणि मला ही एका गोष्टींचा संशय येवू लागला की मागच्या वेळी मी सेक्स केला तेव्हा कंडोम खरोखर फाटला होता का? नाही? मी पुन्हा पुन्हा विचार करत होतो, काय मला हे थांबवल पाहिजे… हे करुन मी जेनीचा विश्वासघात केलाय? माझा माझ्यावरचाच संशय वाढत गेला आणि मग मी मनावरची जळमटं दूर करायला वैतागून स्वतःच एचआयव्हीची टेस्ट करुन घेतली. माझ्या मनातल्या आतला एक खूप खोलवरचा कोपरा या गोष्टींची खात्री देत होता की दोन-तीनवेळा कंडोम फाटला होता.. आणि कदाचित मला त्याने…एचआयव्हीने त्यांच्या गर्तेत घेतलयं. मी टेस्टच्या रिझल्टची वाट बघत होतो.

पण तरीदेखील गीताच्या घरी सेक्स करतच होतो.

मला आता कळून चुकलं होत की हे नुसतचं शारिरिक आकर्षण नाहीयं, खरं खरं प्रेम आहे.. आम्ही आता दररोज भेटत होतो. तेव्हाच मी गीताला रॉय यांच्या प्रोजेक्ट आणि जेनीबददल पण सांगून टाकलं, माझ्या डोक्यात छोटी मशीन बसवलीयं… मी इथं या शहरात कसा आलो… माझे शिमल्याला असलेलले वडील.. सगळ्याबददल.

मी रॉय यांच्या प्रोजेक्टच्या कारणांमुळे मनाविषयी होणा-या प्रत्येक पैलूबददल जाणू लागलो होतो, संमोहनापासून आत्ममग्नता… मी दररोज आरश्यासमोरच्या एका ठिंबक्यावर लक्ष केंद्रित करुन मन शरीरापासून वेगळं करण्यासारख्या अशक्य हास्यास्पद करामती केवळ रॉय यांच्या सांगण्यावरुन करत होतो, मी माझ्याच शरीराशी बोलत असे, ज्या गोष्टी ज्यांच्यापासून माझं मन शरीराशी जोडलं जात तोच तोडून टाकायचा.. प्रयत्न करायचा होता… घराच्या बंद खिडक्याच्या आत शरीरासोबत न जाणो अगणितवेळा प्रयत्न करत होतो… कधी कधी निराश होई… मला हे सगळं सहजतेने घ्यायचं म्हणून स्वतःला सावरत असे, समजावत असे… संमोहनाचे ही सर्व प्रयोग झाले होते. पण रॉय यांना अपेक्षित असलेल्या अवस्थेत पोचतच नव्हतो. रॉय यांना वेड लागलं होत बहुतेक.. ते मला या फालतू गोष्टीं करायला सांगत होते. तर या गोष्टी पासून मन हटवण्यासाठी मी चित्र काढण्यात स्वतःला डुंबवत असे, कधी कधी माझं डोक दुखायला लागायचं, पण पैश्यासाठी सगळं काही चाललं होतं… मला शांत जागा हवी होती मुंबई शहरात पेंटीग करण्यासाठी जी खूप कठीण होती आणि जहागीरच्या कॉपेटिशनच्या विषयासंबधी माझ्यावरच होत असलेल्या प्रयोगाच्या अनुभवामुळें ते कॅनव्हासवर उतरवणं सोप जाईल, या सगळ्या प्रयोगानंतर मला हल्लीच एक गोष्ट नव्याने कळली होती, की मी कोणत्याही चेतन मनुष्याच्या मनाशी जोडू शकतो… मी जेनीसोबत असताना बागेत त्या गरोदर बाईच्या पोटतल्या त्या बाळाने दिलेला प्रतिसाद… तो मी केलेला प्रयोग होता… आणि तो यशस्वी ठरला होता…

मी रॉय यांना हे सांगितलं, रॉय माझ्याविषयी खूश होते, त्यांच्या सांगण्यानंतर देखील मी जेनीवर इम्परेशन जमवण्यासाठी बाहेरील दुनियेत हे प्रयोग आजमवायला लागलो, तिला मी ते ठरवून वैगेरे करतोय असं वाटलं, पण रॉय यांची महत्तवकांक्षा काही वेगळीच होती चेतन मनाची अवस्था छेदणे… आणि या प्रयोगात खरं म्हणजे प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं व्हायचं, तसं बघायला गेलं तर यांची माहिती रॉय यांना होती.

आणि त्यावेळी मी गीताच्या घरी होतो, त्याच सकाळीच माझं रॉय यांच्याशी थोडं भाडणं झालं होतं, मी धर्मग्रंथाचे अर्थ जाणून घेतल्यानंतर, मला मानवी वंशाच्याबदल विज्ञानाच्या असलेल्या विचारात बदल झाला होता, मला वाटत होत की ईश्वर एक विश्वात्मा आहे ज्यांची आपण देणं आहोत आणि त्यांच्याशिवाय आपण कोणीच काही करु शकत नाही.

हा मी दैववादी बनत चाललो होतो, मी त्यांना म्हटलं, ”तुमचा प्रोजेक्ट गेला खडयात” मी रागात होतो.

मी गीतेत डुबलो होतो, शेवटी मला प्रेम झालं होतं तिच्याशी, तिच्या त्या विसफारलेल्या केसामध्ये मी दिवस-दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टीं तिला सांगत असे, मग तो चित्राचा विषय असो की रॉयच्या प्रयोगशाळेत घडलेले प्रंसग… मी तिच्यात गुंतून जात असे…

आता रॉयने मला एक नवीन डिव्हाईस दिलं होतं ठेवायला माझ्यासोबत, काही सिग्नल दाखवणारं डिव्हाईस… ते खिश्यात ठेवण्याइतकं ते होतं. ते संभाळावं लागत होतं, अजूनही त्यांच्या चेतन मनाच्या प्रयोगाला यश मिळालं नव्हतं.

मी स्वतःला या दुनियेपासून विसरण्यासाठी गीताचा आधार घेत होतो आणि स्वतःला हरवून देत असे, असचं एकदा बोलणं सुरु होतं.

”काय बोलतेस तू अजून गेटवे ऑफ इंडिया नाही बघितलसं, ओ नो…सी लिकं…. तो पण नाही.. आपण दोघं जाऊ…”

आणि एके दिवशी आम्ही जाण्यासाठी तयार झालो सी-लिकं बघण्यासाठी, बिल्डींगच्या बाहेर सूरज उभा होता, तो खालून वरती खिडकीकडे बघत होता. गीता खिडकीजवळ येत खूणेने इशारा केला की दशरथ आज घरी आहे.

त्या दिवशी नेमकी दशरथची तब्येत बिघडली आणि गीता-सूरजचा प्लॅन चौपट झाला, दोघांची मन विरझून गेली, आणि नंतर कधीतरी जायचं ठरलं.

****************

ठिकाण- रॉय यांची प्रयोगशाळा

वेळ – सोमवारी रात्री आठ वाजून पंचवीस मिनीट

दिनांक – 25 एप्रिल 2016

वायरेनी सूरजला विचारलं, “कमळीशी का भेटला होतास?”

सूरज म्हणाला, ”माझे जहांगीरचे कॉम्पिटशनचे दिवस जवळ येत चालले होते, पण अजून ते पेंटीग पूर्ण झालं नव्हतं, तर मी त्यावेळी बाजारात विक्री ठेवलेल्या शरीरापैकी एक खरेदी करत पेंटीग पूर्ण केलं, न जाणो काय झालं? पण मी गीताचं यौवन तीची काया या सा-याला दुनियासमोर आणणं चागलं वाटतं नव्हतं… माहित नाही का?... मनात येत होतं की मला गीतासोबत असं काही करायला नाही पाहिजे, मी तिची वक्षस्थळापासून पुढचं शरीराचं स्केच जाणूनबुझून नाही बनवलं, मला खरचं प्रेम झालं होतं तिच्याशी, तर त्या एका पेंटीगसाठी मी दुनियेतल्या दोन विनाआधाराच्या शरीरानां मिळवायचा प्रयत्न करत जे उत्कृष्ट होईल ते पाहिलं आणि ज्यांची मला चांगली किंमत देखील मिळाली, मी विजेता देखील ठरलो.”

****************

ठिकाण – रॉयची लॅब

वेळ – सोमवार रात्री आठ वाजून वीस मिनिट

दिनांक 25 एप्रिल 2016

वायरेनी आता सगळ्यात महत्तवाचा प्रश्न विचारला, ”तर तू रॉयपासून अशी कोणती गोष्ट लपवली होतीस, ज्यांच्याविषयी तू फोनवर बोलून दाखवलसं…”

सूरज मायक्रोफोनवरुन बोलत होता, ”त्या दिवशी रॉयने मला सोळा तास थांबून ठेवल होतं लॅबमध्ये, मागच्या काही दिवसापासून मी पेंटीगमध्ये बिझी असल्याकारणाने गीताला देखील भेटू शकलो नव्हतो”

ठिकाण – रॉयची लॅब

मला खुर्चीत बसवून माझ्या डोक्याला लावलेल्या क्लिपला काही कनेक्ट करण्याचा प्रयत्न चालला होता, मला यांच्यात काडीचाही रस नव्हता, ते न जाणे किती अगणित प्रयत्न करत होते, रॉय कितीतरी वेळा मॉनिटरवर बघत होते, पण प्रत्येकवेळी फेल, मशीन कनेक्ट करत होते, थोडीशी वेगळी अवस्था होती मनाची, मला समोरच्या कोणत्याही चेतन मनाला भेदता येत होतं, पण त्यांच्या पुढे काय? काही सिग्नल त्यांना अपेक्षित होते, मी बेजार झालो होतो, प्रयोगाला पण लिमिटस असतात, एकदा पुन्हा… रॉय त्यांच्या सहका-या सोबत कामात गुंतून गेले. ते रॉयना विचारत होते, ”आपल्याला कुण्या दुस-यावरसुदधा हे प्रयोग करायला हवेत?” रॉय म्हणाले, “ही वेळ योग्य नाही” त्याचं आपआपसात बोलणं चालू होतं.

दहा तास उलटत आले होते,

पण रॉयच्या चेह-यावर कोणतचं टेंशन नव्हतं, ते फक्त कोणत्यातरी शोधात असल्यासारखे वावरत होते, त्यांनी ते डिव्हाईस एक्टीव्ह केलं, माझी नर्वस सिस्टीम पूर्णपणे हालवून टाकली, जसं की काही न होता मी अंपग झालोय, माझं संपूर्ण शरीर असून नसल्यासारखं झालयं, मी आता हलका वाटत होतो स्वतःला, समोरच्या डिव्हाईसवर काहीएक दाखवत नव्हतं पण पुन्हा अगदी होत तसं नॉर्मेल होत होतं, समोरच्या स्क्रीनवर डोक्याच्या आतल्या भागातली अवस्था दिसत होती, त्यांना वाटत होतं की आता यांच्या पुढे काहीतरी दिसेल, पण अयशस्वी प्रयोगांचा सिलसिला चालूच राहिला, एक अवस्था होती पण त्यांच्यापुढे काही नाही, शेवटी मी थकलो.

मी बाहेर आलो होतो, माझ्यावर रॉय रागावले होते, त्यांनी मला जाण्यापासून रोखलं नाही पण जबरदस्ती माझ्या शरीरावर दोन डिव्हाईस सतत चोवीस तास माझ्यासोबत ठेवायला सांगितली.

डिव्हाईस काय तर दोन छोटे मोबाईलएवढी दिसतील अश्या स्क्रीन मशीन होत्या, त्यात मेंदूतली संरचना दिसत होती, आता त्यात लाल सिग्नल दाखवला गेला होता, जे की दाखवत होतं की अजून हवी तसा परिणाम आला नाहीय.

****************

ठिकाण- गीता-दशरथचं घर

दिनांक – 21 मार्च 2016

मी थकून गेलो होतो त्यादिवशी, मी सरळ गीताच्या घरी आलो, मी आल्या आल्या गीताच्या ओठावर ओठ टेकवले, फक्त आठवडयाभरानंतर भेटत होतो पण रोखू नाही शकलो, मी त्या रॉयच्या मशीन स्वतः सोबत ठेवल्या होत्या, एकाएकी आम्ही दोघांनी बोलता बोलता कपडे काढले, त्या समागमाच्या अंतिम क्षणाला आम्ही दोघं एकमेंकात पार घुसमटून गेलो होतो, आणि त्या एका क्षणात मी मी राहिलोच नाही, मी त्याच गडबडीत माझी लहानपणापासून सवयीनुसार मानेचा हिसका दिला, ही सवय मला मोडायची होती पण नाही जमत, तर खरोखर मशीन काम करत होत्या, काही सिग्नल त्या मशीनने पकडले होते, स्क्रीनवर सिग्नल एक्सेज झालेले दाखवत होते, हिरवा लाईट दाखवला जात होता… खरचं… दोन मिनिटापर्यंत डोकं कामाचं करत नव्हतं, माझं शरीर पहिल्यापेक्षा थोडं अधिक जड वाटू लागलं होतं, अहो माय गॉड.. तर या गोष्टीच्या शोधात होते, सांइन्टीस रॉय… हे खरं वाटत नव्हतं… गोष्टी डोक्यात चालल्या होत्या पण मन कुठे तरी वेगळी कडे होतं… खरोखर कुठेतरी वेगळीकडे होतं….

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार दुपारी तीन वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

इथे एकही पुरावा केस पुढे जाण्यासाठी मदत करत नव्हता, आणि वरुन वायरे यांना रॉय यांनी अल्टमेटम दिलं होतं. वायरे आपल्या खुर्चीत बसून पुन्हा एकदा विचार करु लागले.

वायरेनी दिनेशला विचारलं, ”हा शिदें कधी येणार आहे?”

“बडोदयाला गेला होता, त्याला काहीतरी मूतखडयाचा त्रास होतेय त्यासाठी कोणत्यातरी बाबा आहे तिकडे, त्यांच्याकडे उपाय आहे, फोन केला होता, निघालायं, थोडयावेळात येतोय बोलला”

वायरे म्हणाले, “मी जेवून येतो”

****************

ठिकाण- सदानंदच घर (वतर्मानकाळात)

सुदेश टाईप करत होता, सदानंदला ऑफिसमधल्या शिपाई शिंदेची आठवण आली.

ठिकाण- सदानंदच ऑफिस (भूतकाळात)

सदानंद येताना दिसत होता, त्यांची नजर समोरुन जाणा-या एका मुलीवर होती, तितक्यात शिपाई शिंदे म्हणाला, ”वाटत हीच कुठेतरी अफेअर असणार” सदानंदला बघत म्हणाला, “कसा आहेस सदानंद”, सदानंदने हसत म्हटलं, ”मी ठीक शिंदे, आणि काय? दिसला नाहीत चार-पाच दिवस झाले” शिंदे उत्साहाने सांगण्यासाठी तोंडात तंबाखू टाकून म्हणाला, ”अरे ते बडोदयाला गेलो होतो, मूतखडयाचा त्रास होता.. अरे खूप लाईन होती तिथे”

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार तीन वाजून तीस मिनिटं

दिनांक – 25 एप्रिल 2016

शिंदे पोलीस स्टेशनला आला होता, दिनेशने शिदेंशी बोलत होता. सूर्यकांत शिदे हवालदार जरुर होता पण मोठया मोठया केसेसच्या एखादा महत्तवाचा पण इतरांना न गसवणारा पॉईंट तो शोधून देई आणि केस निकालात निघे, आतापर्यंत इतक्या केस हाताळल्या होत्या, तो समजून जाई, कोण खरं बोलतयं आणि कोण खोटं बोलतयं. त्यांची संशय घ्यायची सवय अफाट होती, पण तो पण शेवटी माणूसच, चुका त्यांच्याकडूनही होणं शक्य होतं, वायरेने आपलं पूर्ण नेटवर्क कामाला लावलं होतं, पण काहीच काम होत नव्हतं.

सुदेश बोलता-बोलता टाईप करत होता, ”तर वायरेचा हुकमी एक्का ’सूर्यकांत शिंदे’च्या येण्याची तो वाट बघत होता, कदाचित तो हे कोडं उलगडवेल”

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार तीन वाजून तीस मिनिटं

दिनांक – 25 एप्रिल 2016

शिदें सांगत होता बडोदयाची कहाणी, ”अरे एवढी लाईन होती ना मूतखडयासाठी, मी आणि सुधीर, आम्ही दोघचं गेलो, सुधीर माझा शेजारी, बायकोपण येणार होती पण तिची अचानक तब्येत बिघडली, बायकोचाचं काकाचा मुलगा बोलला, बडोदा चांगल आहे, तर म्हणून मी गेलो, बायकोने खूप फोर्स केला मग मी राजी झालो, किती गर्दी तिकडे बाबापाशी, पण आपल्या इच्छेने पैसे दयायचे, किती वाटेल तेवढे, पन्नास, शंभर, दोनशे, जितके वाटतील तेवढे, अरे मी किती वेतागलेलो या मूतखडयामुळे खरं सांगू… तिथं गेलो आणि बाबानीं जसा हात ठेवला खाली ताटात सगळे खडडे जमा, आणि आता काही दुखतपण नाही, आणि इथं प्राव्हेट हॉस्पीटललला विचारलं पंधरा हजार बोलला, आणि इथं ना टाका ना दुसरं काही, आणि येण्या-जाण्याचे मिळून पाचशे रुपयात काम झालं”

शिदें सगळं सांगत सुटला आपल्या आजारपणाविषयी…

दिनेश काही विचार करुन म्हणाला, “पुन्हा सोनोग्राफी केली का?”

शिंदे आता समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला, ”नाही रे, आता दुखत नाही, तर कशाला करु, आणि असा पण वायरेसाहेबांचा फोन आला म्हणून डायरेक्ट बडोदयावरुन पोलीस स्टेशनला आलो”

दिनेशचे प्रश्न वाढतचं चालले होते आणि शिंदेची उत्तरही समाधानकारक नव्हती तर त्याने कॉप्युटरवर बसल्या बसल्या गुगल करत आश्चर्याने म्हणाला “असं कसं असू शकत, थांब गुगल करतो, समोर नेट चालू असताना प्रश्न नाही राहिले पाहिजे मनात, गुगल डॉट कॉम, पथरीवाले बाबा.. अरे हा बाबा लोकांना फसवतोय, नेटवर दाखवतयं की याला फेस्बलो इफेक्ट म्हणतात”

थोडया वेळाने,

“गुगलचा हाच वैताग येतो आता पुन्हा फेस्बलो इफेक्ट म्हणजे काय ते शोधावं लागेल”

शिदें आजारापासून सुटका झाल्याच्या आंनदात खूश होता, त्याला मूतखडयाविषयी बोलायचं नव्हतं,

“मग आता नको शोधूस, तसंही आता सगळं काही ठीक आहे, आणि मला ही काही त्रास होत नाहीयं”

दिनेश आता एकटाच वाचत होता. एकदाचं वाचून झाल्यावर शिंदेला म्हणाला, ” फेस्बलो इफेक्ट म्हणजे सोप्या भाषेत आपल्या मनाला खोटं सांगून शरीराची अवस्था बदलणे किंवा सुधरवणे… पण हे सगळं काय आहे”

****************

ठिकाण- सदानंदच घर चालू काळात

सुदेश कनोजिया म्हणाला, ”अजून चाळीस पानं बाकी आहेत”

“उदया लवकर ये, ठीक आहे” सदानंद म्हणाला.

रेवती आली, संध्याकाळचे साडेसहा वाजले होते, “अरे.. ही बघ.. तुझी आई पण आली” सुदेश म्हणाले.

आईने घरात आल्या आल्या विचारलं “कशी आहे तब्येत”

सुदेश म्हणाला, ”ठीक आहे, मी गोळ्या दिल्या वेळेवर”

“कोणी आलं होत का आज मी गेल्यावर” रेवती विचारत होती.

“हा ती रेल्वेत यांच्या सोबत प्रवास करणारी फलटण आणि ती जेनी” सुदेश बोलण्याच्या ओघात म्हणाला.

“जेनी आली होती” रेवती म्हणाली.

सुदेशला आपली चूक लक्षात आल्यावर तो तिथून काढता पाय घेत सदानंदला म्हणाला, ”प्रूफ रिडींगसोबत परवापर्यंत संपवून टाकू, इतकं टेशन घ्यायची गरज नाहीयं”

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार संध्याकाळी चार वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

इतक्यात वायरेची पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या भागात एन्टरी झाली, थोडेसे ते नाराज होते, चेहरा साफ सांगत होता… रॉयशी त्यांच काही वेळापूर्वी फोनवर भांडण झाल होतं, रॉय यांना आतापर्यंत शव प्रयोगासाठी मिळालं नव्हतं त्यांची मंजुरी वायरे यांच्या हातात होती ती त्यांनी दिली नव्हती.

वायरे सूर्यंकांतला पाहत म्हणालें, ”आलात का शिंदे साहेब, मोठी मेहरबानी केलीत आपण, इथं पूर्ण डिपार्टमेंट आपली वाट बघतयं, सगळं काही चूकीचं होतयं, कळतं नाही कोण खरं बोलतयं, आणि कोण खोटं”

इतक्यात तिथे रॉय वकीलासोबत तिथें पोलीस स्टेशनला हजर झाले,

“हे बघा मिस्टर वायरे तुम्ही कायदयाचे रक्षक आहात, जनतेचे रखवालदार आहात, पण आम्ही ही काही लेचेपेचे नाही आहोत, विकत घेतलं तुमच्या कायदयाला, अशी कोणती किंमत नाहीय जी हा रॉय विकत नाही घेवू शकत, हे घ्या आथेरिटी लेटर आणि बॉडी आमच्या हवाली करा” रॉय बोलत होते, पण तिथे उपस्थित असलेल्या शिंदेना काही भाग डोकयावरुन जात होता. माझा तुझ्यावर राग नाही वायरे, थोडाफार प्रामाणिकपणा टिकून आहे तो तुमच्यासारख्या ऑफिसरसमुळे…. पण या बॉडीमध्ये माझी आयुष्यभराची मेहनत आहे.

वायरेनी शांतपणे लेटर बघितलं आणि म्हणाले, “बाजारात अजून अशी ही काही लोक आहेत ज्यांची अजून बोली नाही लागलीय, आणि तू ती कधी खरेदी ही नाही करु शकणार”

रॉय चेह-यावर एक खोटं हसू म्हणाले, ”इतकी घमेडं ठीक नाही वायरे, मला माहित नाही तुला इतका राग कोणत्या गोष्टींचा आलायं, विकल्या गेलेल्या सिस्टीमचा की या फेल गेलेल्या पोलीस एनविस्टिगेशनचा”

“ठीक आहे, मी तुम्हाला परमिशन तर देतो, पण जे काही एक्सपीरीमेंट बॉडी सोबत होतील ते पोलीसाच्या उपस्थित होतील” वायरेने लेटर आपल्याजवळ जमा करुन घेत म्हणाले.

पोलीसाच्या उपस्थित म्हटल्यावर रॉय यांचा चेहरा पडला होता पण त्यांचाही नाईलाज होता, त्यांना आता अजून भांडण वाढवणं ठीक वाटत नव्हतं, तरीदेखील त्यांनी वायरे यांना टोमणा मारलाच “हिमंत असेल तर खून्याला शोधून दाखवा, नाहीतर सगळं काही व्यवस्थित झालं तर कदाचित तुम्हाला खूनी शोधण्याचे प्रयत्न बंद करावे लागतील, मुडदा बोलायला लागेल…. कदाचित कायदयाची कलम बदलावी लागतील, काहीतरी परिक्लपनेच्या दुनियेपेक्षाही वेगवान तुमच्यासमोर असेल”

रॉय मनात आलेली गोष्ट बोलून निघून गेले.

*******Res Gestae*********

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार संध्याकाळी चार तीस ते पाच वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

सूर्यकांत आणि दिनेश बघत होते, दिनेश सूर्यंकातच्या कानात हलक्या आवाजात म्हणाला, ”हा म्हातारा, स्वतःला देव समजतो काय? मुडदा बोलायला लागेल… आम्ही काय चुतिया आहोत काय?”

शिंदे बावरलेल्या स्वरात दिनेशला म्हणाला, ”पण हे काय होऊन राहिलयं, मुडदा बोलायला लागेल म्हणजे”

वायरे आता अजूनच संतप्त झाले, त्यांनी पूर्ण कहानी पुन्हा सूरजच्या मर्डरच्या दिवसापासून सांगायला सुरवात केली, कहानी ऐकली जात होती, सगळं काही सांगितलं जात होतं, जेनी, रॉय, दोन हत्यारे, सगळं काही, कहानी ऐकली आणि सांगितली जात होती, या सगळ्या काळात शिदें खूपच शांततेने सगळं ऐकत होते. या काळात त्याला आजूबाजूला कोणत्याही प्रकाराचा आवाज सहन होत नसे, त्याचा फोन वाजत होता, तो घरुन आला होता, त्याने फोन साईलेन्ट केला.

सूर्यंकांत आपलं डोक वापरायचा प्रयत्न करत होता, तो प्रश्न उपस्थित करत होता आणि बाकी लोक आपआपल्या अनुमानाप्रमाणे उत्तर देत होते.

“यांचा अर्थं सिपंल आहे खून पैश्यासाठी केला गेला नव्हता” सूर्यंकांत शिंदे म्हणाला.

“बरोबर, ते तर आम्हाला पण माहित आहे, एक्झीबिशन हॉलच्या सीसीटीव्हीमध्ये काहीचं संशयास्पद सापडलं नाही” वायरे म्हणाले.

“मला वाटत त्या पेंटीगवाल्या बाईचं चित्र नॉमेल स्केच केल तर” सूर्यंकांत म्हणाला.

दिनेश पटकन म्हणाला, ”त्यांचा काही रिझल्ट आला नाही, अजून”

सूर्यंकांत अजून एक-एक करत आपले अनुमान मांडत बोलला, ”जेनी कदाचित सूरजला पूर्णपणे नाही ओळखत”, “कदाचित रॉयच्या प्रयोगाचा एक भाग म्हणून सूरजचा खून”.

वायरे म्हणाले, ”पण तो शेवटचा कॉल, माहित नाही तो काय सांगणार होता”

सूर्यंकांतने प्रश्न केला, ”सूरजचं येणं-जाणं होत का मिराज पेट्रोलपंपाशी”

दिनेश म्हणाला, ”नाही, आम्ही टीमला पूर्णं सहा महिन्याचं सीसीटीव्ही चेक करायला लावलं, नाही सापडला त्यामध्ये”

वायरे म्हणाले, ”जेनीवर अजूनही आमची लोक पाळत ठेवून आहेत, ती अजूनही त्या ज्योतिष्यवाल्या बांबाशी बोलणं ठेवून असते.. पागल झालीयं बहुतेक…”

दिनेश प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला, ”तरीदेखील एक गोष्ट समजत नाही की तो मिराज पेट्रोलपंपाशी काय करत होता”

सूर्यंकांत शिदें म्हणाला, “मिराज पेट्रोलपंपाजवळच्या मोबाईल टॉवरपासचे सगळी कॉल लिस्ट चेक करावी लागेल”

तितक्यात पोलीस स्टेशनात फोन वाजला, दिनेशने तो उचलला, ”खबरीकडे आलेल्या बातमीनुसार, ते दोन्ही खून करणारे मरोळच्या शांतीप्रसाद इंडीयस्टरयल एरियाच्या गोडाऊनमध्ये आहेत”

सूर्यंकांत शिंदे म्हणाला, “या पेरॉलवर सुटणा-या दोघाचे रेसिडेशनल ऍड्रेस चेक केले का? आणि त्यांचे मोबाईल नंबर जे आपल्या सिस्टीममध्ये आहेत ते चेक केलेत का?”

सूर्यंकांत स्वतः कॉम्प्युटरच्या बाजूला वळाला.

दिनेश म्हणाला, “मी तर सिस्टीममधले नंबर चेक केले, लावून बघितले, दोन्ही नंबर डेड सांगताताय दोन वर्षांपासून… वाटल्यास पुन्हा चेक करुन घे…”

शिंदेने कॉम्प्युटरवरच्या ऑनलाईन सिस्टीमवरच्या दोन्ही फोटोकडे बघत त्यांच्या मोबाईल नंबरच्या कॉलमवरच्या कॉल बटणावर नकळत टॅबवर माऊस क्लिक झालं. सूर्यंकांत शिंदे बोलले, ”नंबर तर नॉट रिचेबल दाखवतायतं, तुम्ही तर बोलत होता नंबर डेड सांगतायत म्हणून”

वायरे म्हणाले या नंबरची सगळी हिस्टरी काढा.

दिनेश म्हणाला, ”हे आताचे नंबर सिस्टिममध्ये दोन-तीन दिवसापूर्वीं या आपल्या पोलीसाच्या सिस्टिममध्ये अपडेट झालेत”

वायरे सूर्यकांतकडे बघत बोलले, “हवालदार किरण आणि विनोदला घेऊन जा!, इथे साकीनाक्यामध्येच लपून बसलेत”

****************

ठिकाण – पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार संध्याकाळी सहा वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

दिनेश वायरे यांना बोलला, ”जेनीला घरी सोडून वापस पुन्हा सतिशला यायला दोन तास तरी लागतील”.

त्या दोघां हत्यारांना एका तासात पकडलं गेलं, त्यांना काही जास्त मारावं लागलं नाही त्यांनी त्यांच्याजवळ असलेलं सारं काही उलगडून टाकलं, वायरे दोन्ही गुन्हेगारांना पाहत होता, सूर्यंकात आणि त्यांच्यासोबतच्या अन्य साथीदारांना पकडण्याच्या झटापटीत जखमा झाल्या होत्या.

वेळ - संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिट

सुरेश कदम आणि अविनाथ थोरात बोलत होते, ”आम्हाला सिग्नल मिळण्याच्या वेटींगमध्ये होतो, आम्हाला सुपारी मिळाली होती मारण्यासाठी, फोटो आणि पत्ता दोन्ही माहिती मॅसेजेने पाठवली होती, कुणाचा खून करायचायं, कुठून फॉलो करायचयं सगळं काही… आम्हाला मॅसेज मिळताच आम्ही दुपारी त्यांच्या ओशिवरातल्या घरापासून फॉलो केलं, शेवटी रात्री आम्हाला मौका भेटला त्याला मारायचा, आम्ही पण जास्त विचार न करता आमचं काम तमाम करुन टाकलं” आम्हाला जेलमध्ये असताना मॅसेज देण्यात आला होता की या खूनाच्या बदल्यात आमच्या सुटकेचा वेळ कमी करण्यात येणारं होता, आणि आमच्या घरवाल्यांना पैसे भेटणार होते, आम्ही खून झाल्यावर चॉपर आणि मोबाईल दोन्ही नाल्यात फेकून दिले, खून झाल्यावर दोन तासांनी…”.

टीव्हीवर न्यूज होती…

“आम्ही चुकीच्या माणसांला मारलं होती, कुणी तरी चुकीची माहिती आम्हाला सेन्ड केली होती, मंत्री आमच्यावर रागावले होते, आमच्यासाठी आता सगळेच रस्ते आता बंद झाले होते, पण खून झाल्यावर आम्हाला कॉल आला होता, पुरुषांचा आवाज होता.

वायरेनी विचारलं, ”सूरज कुठे थांबला होता का?”

“आम्ही त्यांच्या घरापासून पाठलाग करत होतो, हो तो थांबला होता दोन-तीन जागेवर, आम्हाला त्यांला कोणताही संशय येऊ दयायचा नव्हता त्यामुळे काही ठिकाणं मिस ही झाली असतील.” अविनाश थोरात बोलला.

शिंदेपासून बाकी सगळी मंडळी विचारात पडली होती, कॉम्प्युटरवर बघत सूर्यंकांत म्हणाला, ”एकूण दोन कॉल यांना दिलेल्या मोबाईलवर नंबर आले, त्यातला एक नंबर आता डेड लागतोय आणि दुसरा नंबर लॅण्डलाईन आहे, म्हणजे शक्यता आहे की ते दोन्ही कॉल एकाच व्यक्तीने केले असतील?”

वायरेने आदेश दिला, ” नेटवर्क कंपनीशी कॉन्टेकट करा”

माहिती मिळताच शिदें म्हणाला, ”हा लॅण्डलाईनचा कॉल, पहिल्या मजल्यावरच्या एका कंपनीतून आला होता”

“माहिती काढा की दहा वाजता कुणी कॉल केला होता” वायरे म्हणाले.

शिंदे म्हणाले, ”कदाचित आपण खुन्याच्या जवळ पोहचलोय”

शिंदे यांच्या चेह-यावर हसू होतं, वायरेचा आत्मविश्वास वापस येताना दिसत होता, पण त्यांना रॉयच्या लॅबमध्ये जायचं होतं, त्या सूरजच्या शवासोबत होणा-या प्रयोगावर देखरेख करण्यासाठी.

****************

ठिकाण- प्रोवर्डको कंपनीचा रिसिपशन कांऊटर

वेळ – सोमवारी संध्याकाळी सात वाजता

दिनांक – 25 एप्रिल, 2016

योगेशसहित तिथे काम करणारा प्रत्येकजणाला धक्का बसला होता, दशरथला पोलीस येऊन घेऊन गेले होत.

दशरथला त्याला अटक केल्याचं काही वाटत नव्हतं, तो काहीतरी वेगळाच विचार करत होता. तो स्वतःशीच म्हणत होता, “गीता कुठे आहे, नाही माझी गीता या जगात नाही राहिली, जिला मी प्रेम करायचो, की मीच तिला मारुन टाकलं” हे फारच विचित्र होतं…

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

वेळ – सोमवारी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिट

दिनांक – 25 एप्रिल, 2016

सूर्यंकांत आणि दिनेश आळीपाळीने प्रश्न विचारण्यासाठी सज्ज झाले, “सांग, तुला या शार्पशूटराचां नंबर कसा मिळाला”

दशरथ एकदमच शांत पण दुखात होता, त्यांची कणवच वेगळी होती, तो बोलण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हता पण त्याला बोलल्याशिवाय पर्याय नव्हता, पोलीस आपली थर्ड डिग्री वापरायच्या तयारीतच होते.

दशरथ सांगू लागला, “कंपनीत नवा प्रोजेक्ट आला होता, सरकारी दस्तावेजाचं ऑनलाईन एन्टरी अपडेट करायचा, तर यांच्यात काही नवीन माहिती ऍड करायची होती, खरं म्हणजे या प्रोजेक्टमध्ये काही गुंड, शार्पशूटर, किलर लोकांचे नवीन पत्ते आणि मोबाईल नंबर भरणा करणे तसेच काढून टाकणे या प्रोसेसचं काम होतं, पूर्णपणे डेटा इंन्ट्ररीचं काम, मी अंपग असल्याकारणाने खून करणं कठीण होत तर मी पेपरात बातमी बघितली या दोघां शार्पशूटराच्या सुटण्याची आणि योगायोग म्हणजे या दोघांचे नंबर डेटा एन्टरी साठी मला मिळाले.”

सूर्यंकांतने अनुमान लावलं, ”तर यामुळे ते जुने नंबर डेड सांगत होते आणि जे नवे नंबर आले होते ते सगळे डेटा इंन्ट्ररी केल्यानंतरचे”

दशरथ सांगत होता, “मी मनात विचार केला की खून करुन टाकू सूरजचा, मी त्यांच्या घरचा पत्ता देखील शोधून काढला, मी एका खोटया कागदपत्रावर भेटणा-या सीमकार्डचं पण जुगाड केलं होतं, मला तरीदेखील भिती वाटतं होती की पैश्याविषयी विचारणा होईल, कारण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, की ते शार्पशूटर बोलतील तो आकडा त्यांना देईन, तरी मी दोन लाखाचा बंदोबस्त करुन ठेवला होता, मी इथून दूर मालाडला गेलो का तर कोणी मोबाईल नेटवर्कवरुन जवळच्या एरियातून पकडलं जाऊ नये, पण मला कॉल करायला भीती वाटत होती, मग मी त्यांना एमएमएस पाठवला, जागा आणि फोटो सेंड केलं, मला कोणत्याही परिस्थितीत सूरजचं नामोनिशाण या दुनियेतून मिटवायचं होतं, मी त्यांना खून चॉपरनेच व्हायला हवा असं ही त्या मॅसेजमध्ये लिहिलं होतं, तरी मी वाट बघत होतो की कोणी रिप्लाई करेल पण नाही आला, मी फोन नंबर डायल केले, पण यावेळी नंबर नॉट रिचेबल सांगत होते, मला वाटलं काही होणार नाही, मी पुन्हा नंबर डायल करणं सोडून दिलं.”

पण दोन गोष्टी माझ्या समजण्याच्या पलीकडे होत्या की खून माझ्या डोळ्यांसमोर झाला, तो कसा काय? हा निव्वळ योगायोग का? कारण ओशिवारा ते मी काम करत असलेली कंपनी, ते सुदधा बिल्डींगच्या खाली.. सूरज कसा काय?....मी हैराण होतो…आणि समोरच्या रस्त्यावर काय होतेयं हे मी वॉशरुमच्या त्या खिडकीतून साफ नसलंतरी ब-यापैकी बघत होतो, मी त्यांच्या मानेच्या बाजूला केलेला वार बघितला आणि माझं मन बैचेन झालं, मला त्या अंधारात तो सूरजच आहे की नुसता भास झाला असं वाटू लागलं आणि म्हणून ते कन्फर्म केल्यावाचून मला राहवत नव्हतं, आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली, मी त्यांना पुन्हा कॉल केला.

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

पण तो अजून मेला नाहीय…

तो पोलीसाचा मार खात होता, पोलीस त्यांला कारण विचार होते, सूरजला मारण्याचं, पण दशरथ सांगायला तयार नव्हता, प्रत्येक दुस-या क्षणाला त्याला मार बसत होता, त्यांच्या अंपग असल्याकारणाने त्याच्या डाव्या बाजूच्या पायावर पाळीपाळीने मोठयावाल्या रॉडने जोरजोरात मारत होते, खरोखरचं त्याला त्रास होत होता, त्यांच्या नजरे समोर सूरजचा चेहरा येत होता, ज्याने त्याला उसकवलं होतं, हतबल केलं होतं. त्याचें ते अनैतिक चाळे नाही… त्याला पूर्णपणे नाही मारु शकलो… इतकं मारल्यानंतर आणि रक्त निघाल्यानंतर दशरथ जोरजोरात ओरडत होता. त्यांच्या समोर फळयावर गीताचा स्केच केलेला फोटो लावला होता, तो त्यांने बघून न बघितल्यासारखा केला.

दशरथ म्हणत होता, नाही मारु शकलो, त्याला मी पूर्णपणे…पण मीच शिकार झालो त्यांची…

न जाणो कोणती ताकद आली होती त्यांच्या अंगात की तो मार सहन करत होता, पोलीसाच्या समोर पुरावे होते पण दशरथ ती गोष्ट सांगायला कबूल नव्हता जी सूर्यकांत आणि त्यांचे साथीदार ऐकू पाहत होते.

शेवटी ते मारणारे थकले, शिदें आपल्या वाया गेलेल्या प्रयत्नावंर अजून रागावले, आरोपी सगळ्यासमोर होता, पुराव्या सकट पण तो गुन्हा करण्याचं कारण सांगायला तयार नव्हता.

दशरथच्या रक्ताने माखलेल्या चेह-यामधून निघणारे शब्द ऐकायला सूर्यंकात आसुसला होता.

दशरथच्या जिवंत असण्याचा म्हणण्याचा अर्थ वेगळा होता, पण तो यांना कळेल, दशरथ म्हणत होता ”तो अजून जिंवत आहे”

****************

ठिकाण- सदानंदचं घर (वर्तमानकाळात)

“तो अजून जिवंत आहे” सुदेश बोलत-बोलत टाईप करण्यात बिझी होता.

ठिकाण- सदानंदचं घर (भूतकाळात)

त्याला कहानीचा आत्माच सापडत नव्हता, तो नुसताचं ते प्रकाशकांनी दिलेलं पेपरकार्ड बघत बसे, पण त्याला काही केल्या पांईट सुचतच नव्हते.

ठिकाण- सदानंदचं घर (वर्तमानकाळात)

सुदेश विचारतो सदानंदला, ”कश्या आयडिया सुचतात तुला, कसा विचार करतोयस हे सर्व”

सदानंद सुदेशला म्हणाला, ”या कहानीच्यावेळी गोष्टी बिघडत चालल्या होत्या, मला अजूनही असं काही मिळत नव्हत ज्यांच्या मी शोधात होतो, कोणतीतरी गोष्ट जी या कहानीला पुढे घेवून जाईल”

ठिकाण- सदानंदचं घर (भूतकाळात)

काही विषारी बोलण्यांनी कधीही न थांबणा-या या शहराला बंद ठेवण्यात कामयाब झालं होतं, विश्वास वाटत नव्हता पण ते खरं होतं, जसं कुणी या शहराचा गळा घोटला असेल त्याचं श्वासोच्छश्वास चालणं कठीण होऊन जाईल, पूर्ण तीन दिवस शहारात कर्फ्यू लावला होता, तुम्हाला तर माहित असेलच, त्या तीन दिवसात माहित नाही किती दिवसांनी मी आणि आई दोघं एकत्र असू, जेव्हापासून कामावर जायला लागलोय वयाच्या वीसाव्या वर्षांपासून, तेव्हापासून रात्री झोपण्याअगोदर काही वेळ सोडला तर, आईसोबत जास्त बोलणं नाही, वेळच मिळत नाही, रविवारी पण आई कामावर जाते, जगण्याची आपली त-हा चाललीय आणि मी इतके पैसेही कमवत नाहीयं की तिला बोलेन की तू आता घरी बस, कधी तिला सुटटी भेटली तरी त्या दिवशी मी कामावर असायचो, पण या हिदूं-मुस्लीमच्या दंगाने न जाणो किती दिवसांनंतर आम्ही एकत्र होतो खूप वेळासाठी, मी इथं राहतो त्या इलाख्यात आसपास कोणताही खतरा दिसत नव्हता, पण उडत उडत येणा-या बातम्या न जाणो काळीज धडकवणा-या होत्या, टीव्हीपासून मोबाईल सगळं बंद होतं, तरी अफवांचा बाजार मोठया जोश्यात चालला होता, राहतो त्या एरीयात काही वाईट बातमी नव्हती पण खरचं या दंग्यानी कितीतरी निरपराध लोकांची घर उजाड केली होती, बातम्यांनी परिस्थितीचा अंदाज येत होता, वाईट वाटत होतं, पण वेळही मिळाला कथेवर विचार करण्यासाठी, त्या तीन दिवसात मी न जाणो किती दिवसानीं आईशीं आरामात बोलत होतो, आणि मनातल्या मनात माझ्या कथानकातल्या टिवस्ट शोधत होतो, मला काहीसं नवीन तरीदेखील लॉजिकल पाहिजे होतं, संध्याकाळ होत आली होती, सकाळपासून माझं मन काहीसं उदास वाटत होतं ते माझ्या आईला मला पाहताच कळालं, दुस-या दिवशी केबल सेवा सुरु झाली पण अजून मोबाईल सेवा बंदच होती.

मिडियातून येत असलेल्या बातम्या हदयद्रावक होत्या, शहरातल्या बडया इलाक्यातून करोडो रुपायाचं नुकसानच नाहीतर खूप सा-या लोकांच्या कत्तली झाल्याची खबर होती, आपआपसातला भाईचारा संपला होता, प्रत्येक हिंदूच्या मनात विरोध करायला लावणारी आणि मुस्लीमाचं रक्त सळसळवणारी काळे कारनामे राजकारण्यांनी सोयीस्कर रित्या डावपेच आखत आखत रंगवले होते, ती सगळी परिस्थिती ऐकून डोक्यावर घाम जमा झाला होता, घाम पुसण्यासाठी नॅपकिन शोधत असताना तो आईने पुढे करत टीव्ही बंद करायला सांगितला, मला आतल्या आत राग यायला लागला की आईला कसं कळत काय हवं काय नकोते, आताही मी कथेबददलच विचार करत होतो, बाहेर होत असलेल्या दंग्याबददल विचार न करण्याचा सल्ला देत तिने माझ्या डोकेदुखीला ओळखून वरच्या फडताळातून डोकेदुखीची गोळी काढली, मी टेबलावरच्या कागदांकडे पाहत होतो की मला माझा पॉईन्ट गवसला, इतकी सोपी गोष्ट… ती माझ्यासाठी युरेका मेव्हुमेंट होती…

सुदेश कनोजिया उत्सुकतेने विचारतो, ”पण काय मिळालं होतं तुला”

सदानंद म्हणाला, ”तुला तुझ्या आईबददल माहितीच असेल, प्रत्येकांची आई अशीच असते, तू विचार करुन सांग, पण त्या अगोदर ही पान टाईप करुन घेवू, थोडं तुला पण सस्पेनस.. हा.. हा..हा…”

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

दशरथच्या आतली आग अजूनच भडकली होती, पण त्याला आपला स्वतःवरतीच राग येतं होता, तो ओरडत होता, शीट..शीट..शीट..

शिंदेने आपला पटटा काढला आणि एखादया मुक्या जनावराला चाबकाचे फटकारे दयावेत तसा मारु लागला ”सांग, का मारलसं त्याला…”

****************

ठिकाण- रस्ता

वेळ – सोमवार दुपारी एक वाजता

दिंनाक – अकरा एप्रिल 2016

दशरथ कामावर जाण्यासाठी बिल्डिंगबाहेरच्या मुख्य रस्त्यावर बाहेर आला, शेवटी ते दोघं… दशरथ आणि सूरज एकमेंकासमोर आले, तो विसरलेला पुस्तकाचा गठठा दशरथने सूरजला दिला त्यांच्या डोळ्यात राग दिसत होता, पण त्यांच्यापेक्षा त्यांचा त्याला तिटकारा येत होता.

ती पुस्तक देत दशरथ म्हणाला, ” काय लिहिलंय, या पुस्तकात आणि काय केलसं तू, कुण्या लग्न झालेल्या माणसांच्या आयुष्य उधळवून लावलसं तू”

आपल्या पुस्तकांना हातात पकडून चेह-यावर लाजेचे कोणतेचं भाव न आणत म्हणाला, ”तू कायर आहेस, कायर, ना तूला प्रेम करता येतात.. फक्त नावाला बायको हे ती तुझी…समाज काय म्हणेल म्हणून घाबरतोस ना… की हीने सोडून दिलं तर माहित नाही दुसरी कशी मिळेल? तुझ्यासारख्या लंगडयाला.. जो स्वतःला सावरु नाही शकत तो बायकोला काय सावरेल?”

दशरथला अश्या उत्तराची अपेक्षा नव्हती, तो रागाने म्हणाले, ”भडका बघायला बरा वाटतो, त्याला हाताळ्याची चूक करु नकोस, सवय होईल पण अनुभवायासाठी जिंवत नाही राहणार.. जळून राख होऊन जाशील, तुला नाही माहित तू कश्याशी खेळतोयस… माझ्या अंपग.. लंगडेपणावर जाऊ नकोस… ”

सूरज हे घाणेरडं हसणं आणत म्हणाल, ”काय करु शकतोस तू, ज्या माणसाला चालयला नीट येत नाही, तो मला काय मारणारं, आणि आता तर तूला माहित पडलचं असेल तुझ्या घरी कोण येतं, गीता का खूश असते, हिंमत असेल तर रोखून दाखवं… काय खून करणारं माझा…”

समोरुन बस येत होती, सूरजने त्यांचा वाईट रीतीने मजाक उडवला होता, “जा जाऊन धावत जात बस पकड… अरे मी विसरलो, तुला धावायची गरज नाही लागत तू तर पुढच्या बाजूने चढतोस ना!”

दशरथ म्हणाला, “कुणाच्यातरी कमजोरीवर आपण आपला स्वार्थ साधणं हयासारखी वाईट सवय नाही, दुनिया कर्मावर चालते, तुझा न्याय पण तो वरचा करेल”

बस आता थांबली. दशरथ बसमध्ये चढला, दशरथ बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येक स्टेशनासोबत दशरथच्या कंपनीचा स्टॉप जवळ येतात होता, आणि त्यांच्या मनातली आग अधिकच वाढत चालली होती, त्यांच्या डोळ्यात घाम जमा झाला होता, त्याला स्वतःचीच लाज वाटत होती.

दशरथ स्वतःला म्हणून लागला, ”काय मी इतका कायर आहे? काय माझी आकौत एवढीच आहे…?, का मी अपंग असणं गुन्हा आहे… नाही मी या सूरजला तर दाखवून देईन.. साल्याचा खूनच करेन…” आणि दुस-याचं क्षणी विचार आला, ”जो स्वतः प्रत्येकवेळी आधाराशिवाय चालू शकत नाही, तो खाक कोणाचा खून करेल?”

बसस्टॉप जवळ आला, तो उतरला, आपल्या रोजच्या कॉम्प्युटरच्या समोरच्या सीटवर जाऊन बसे, पण त्यांच्या मनात प्रतिशोधाचा ध्वनी सतत आक्रोश करीत असे, आता यावेळी आपल्या घरात आता काय होत असेल यांच चित्र डोळ्यासमोर आणे आणि त्याचं मन आक्रंदून येई, मोठयाने ओरडत स्वतःची हार, पराभव, मानहानी मान्य करावी, राग व्यक्त करावा असं त्याला वाटत होतं. त्याचं एक मन सागें आता असं घरी तडक निघून जावं आणि त्याला कापून काढावं…असं नाही… असं नाही.. तर कसं…??

****************

ठिकाण- दशरथचं घर

वेळ – रविवारी रात्री साडेबारा वाजता

दिनांक – 24 एप्रिल, 2016

घराच्या भिंती काहीश्या हलू लागल्या, आता बिल्डींगची अवस्था पार डागाळत आली होती, गीताची तब्येत बिघडत चालली होती, तिचं मन बुचकळ्यात होत… कुणाच्या तरी येण्याची तिला आशा होती, पण आता ती पूर्ण होऊ शकत नव्हती, रात्र खूपच झाली होती.. मन कुठेतरी ऐकीकडे… आणि शरीर कुणी ऐकीकडे… त्याला वाटून सुदधा झोप लागत नव्हती, ती अंथरुणावर नुसतंच बाजू बदलत होती, एका बाजूवरुन दुस-या बाजूला, कदाचित तो येईल का नाही येणार… काहीतरी तूटल्सासारखं वाटत होतं… खिडकीमधून येणारी हवा काही सांगू पाहत होती… माहित नाही पण काहीतरी दुखदायक होतं.. तिचं हदय धडकत होतं… तिच्या बाजूला झोपेलेल्या… नाही नुसतचं झोपेचं नाटक करण्या-याला… त्याला शांतेत झोप लागायला पाहिजे होती, आज कितीतरी दिवसानंतर त्यांच्या मनासारखं झालं होतं….

दशरथ मनातल्या मनात म्हणत होता, “पण हा सूरज माझ्या कंपनीच्या खाली काय करत होता, मी त्या दोघ्या हत्यारांना कंपनीच्या लॅण्डलाईनवरुन कॉल नाही करायला पाहिजे होता… शीट…शीट…”

एकाएकी गीताचा खोकला वाढत होता… तिला चक्कर येत होती… तिने तिथचं ढाकून ठेवलेला पिण्याचा ग्लास तोंडाला लावला…

झोपेचं सोंग घेतलेला दशरथ तशाच झोपच्या अवस्थेत म्हणाला, ”खोकल्याची बॉटल डाव्या बाजूला आहे… ती घे… सोमवारी जाऊ हॉस्पिटलमध्ये”

हालणा-या भिंतीकडे पाहत तो मनातल्या मनात म्हणाला, ”या इमारतीच्या भिंतीना काय होतयं हालायला आता”

… तर गीताच्या मनात आता उदया सूरजशी भेटता येणारं नाही, त्यामुळे तिला आतापासूनच निराश झाल्यासारखं वाटत असेल काय? पण तिला काय माहितं?

****************

सदानंद रेल्वेच्या डब्यात समोर जे काही संभाषण चाललं होतं ते तो नेहमीप्रमाणे ऐकत होता, त्याला त्यांच्या कथानकासाठी उपयोगी पडेल असं काहीतरी भेटत का या शोधात तो होता.

एक माणूस: सेक्शन 377 काय प्रकरण आहे? असं कुठे असतं काय? हे सगळं वेस्टन कल्चरमुळे होतयं, अरे पॅन्ट घेतली ठीक आहे, शर्ट घेतला ठीक आहे…सगळचं कसं घेवून चालेल…..फॅड आहे सगळं… भारतीय संस्कार नावाची काही गोष्ट उरली आहे का नाही? काहीतरी शरम वाटू दया…

दुसरा माणूस: पण हे सगळं…शी..शी.. विकृत आहे हे सगळं…

तिसरा माणूस: बरं झालं, सरकारने बॅन केलं.

चौथा माणूसः तुम्हाला LGBT माहित आहे का?

एक माणूस: हा, ते सगळं गे लोकांबददल आहे.

इतक्यात समोरच्या बाजूने दोन हिजडे भीख मागत मागत या गप्पा मारत बसलेल्या लोकांपर्यंत पोहचले.

****************

ठिकाण- दशरथचं घर/ पोलीस स्टेशन

वेळ – सोमवारी साडेअकरा वाजता

दिनांक – 25 एप्रिल, 2016

दशरथ सांगत होता, ”रविवार तर चांगला गेला, खोकला कमी होत नव्हता, मी जाणूनबुझून टीव्ही बंद ठेवला होता, आम्हाला सोमवारपर्यंत वाट बघण्याशिवाय गंत्यतर नव्हतं”

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता खाजगी दवाखान्याच्या दुस-या मजल्यावर गीता आणि दशरथ दोघंही वेंटीगमध्ये होते, समोर टीव्ही चालू होता, गीताच्या आत काहीतरी साचून राहिलं होतं, ती वाट बघत होती, तिला काहीतरी सांगायचं होतं, तिला काहीतरी वेगळचं वाटतं होतं… आणि तिथे सुरु असलेल्या टीव्हीवर एक हेडलाईन्सने तिला चक्रावून टाकलं… सूरज कुमारची शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कुणीतरी दोन अज्ञात इसमांनी गळे चिरुन हत्या केली, दोन सेंकद तिला विश्वास होत नव्हता की तिने पुढच्याच क्षणास तिने स्वतःला सावरलं, हे खरं आहे का? सूरज या जगात नाही राहिला….

ती टीव्हीवरची बातमी आताच लागायला पाहिजे होती का? दशरथ गीतेच्या चेह-यावरचे हावभाव पाहून जे समजायचे ते समजून गेला पण त्याने तिथं काहीच जाणवू दिलं नाही… त्यानें तिच्या डोळ्यातून गळत असलेल्या आसवांना देखील नजरअंदाज केलं, गीता दशरथ सरोज… नंबर आला होता.. दोघही आतमध्ये चालले हेते, गीतासाठी हे आज थोडसं नवीन वाटत होतं का माहित?, तिला का असं होतं होतं? …. डॉक्टरने नेहमीप्रमाणे रुटीन चेकअप केलं, गीताला बाहेरच्या रुममध्ये बसण्यास सांगितलं आणि दशरथ तिथेच आत थांबला होता, बहुतेक डॉक्टरांना त्यांच्याशी बोलायचं होतं, थोडयावेळाने तो बाहेर आला, आता त्यांच्या चेह-यावरचे भाव बदलले होते, त्याला काही सत्य अत्यंत निडरपणे स्वीकारणं भाग होतं, ‘कुणाची तरी साथ जी फक्त नावापुरता का असेना होती ती आता कायमची सुटणार होती’, हा आता गीता फार कमी दिवसाची सोबती असल्याचं डॉक्टरांच म्हणणं होतं, डॉक्टरांनी आता आपले हात वरती केले होते, आता तिच्या जगण्याची कोणतीही खात्री नव्हती, आणि हीच गोष्ट आता दशरथला गीताला सांगायची होती, एकदा त्याला वाटू लागलं आपण उगाच सूरजला मारलं, पण दुस-याचं क्षणाला त्याला त्यानें उडवलेल्या चेष्टेविषयी आठवलं आणि जे केलं ते योग्यच असल्याचं वाटू लागलं.

पण आता गीता म्हणत होती की तिला काही दशरथला सांगायचयं. ते दोघं आता दवाखान्यातून बाहेर पडत हमरस्त्यावर आले.

****************

वेळ – सोमवारी साडेबारा वाजता

दिनांक – 25 एप्रिल, 2016

दशरथ तिचं कोणतही बोलणं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. दशरथ तिला म्हणाला, ”मलादेखील तुला काही सांगायचयं”

इतक्यात समोरुन येत असलेली टॅक्सी दशरथने रोखली, टॅक्सी थांबली, टॅक्सीड्राइव्हरने चेह-याच्या हावभाव आणि हाताने इशारे करत विचारलं, ”कुठे जायचं?”

“मिराज पेट्रोलपंप व्हाया सांताक्रूझ”

गाडी सुरु झाली, दोघं मागच्या सीटवर बसून बोलू लागले, समोर गाडी चालवत असलेला ड्राइव्हर त्याचं बोलणं ऐकत होता.

गीता म्हणाली, ”कदाचित तुम्हाला खात्री होणार नाही पण मी जे आता काही तुम्हाला सांगणार आहे ते खूप गरजेचं आहे, माझं सूरज नावाच्या मुलासोबत प्रेमप्रकरण चालू होतं, आम्ही काही दिवसापासून भेटत होतो.”

दशरथने मध्येच तिला थांबवत म्हणाला, ”तू त्यांच्याविषयी नाही सांगितलस तर बरं होईल, मला माहित पडलं काही दिवसापूर्वी, सूरज कुमारची स्टोरी संपुष्टात आलीय, तो मरण पावलायं, आणि तुझ्यापाशी ही फार कमी वेळ उरलाय..”

दशरथच्या तोंडातून बाहेरचं पडलं, त्याला हे बोलायचं नव्हतं, पण निघालं, त्याला चुकचुकल्यासारखं वाटत होतं, त्याला वाटत होत की गीताला तिच्या स्वतःच्या तब्येतीविषयी अश्याप्रकारे कळावं.

गीताने आपल्या चेह-यावरची नाराजी हटवत मोठया नीडरतेने सांगितल, “तर तुमच्यासाठी देखील एक वाईट बातमी आहे”

गीताची तब्येत बिघडत चालली होती, तरीदेखील गीताच्या तोंडून ही वाक्य ऐकून दशरथ हैराण होता.

गीता बोलत होती, “तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर परिणामांची वाट बघत बसा…” ती आपल्या आणि सूरजसोबतच्या नाजूक शरीरसंबधाविषयी सांगू लागली

*******Contingency*********

ठिकाण- रॉयची लॅब

वेळ – सोमवार रात्री साडेआठ वाजता

दिनांक – 25 एप्रिल, 2016

वायरेपासून रॉयपर्यंत प्रत्येकजण दंग होता, प्रत्येकजण जाणू इच्छित होता की असं कोणतं संशोधन रॉय यांनी केलं होत जे त्यांना माहित नव्हतं, ज्यानें जग बदलणारं होतं.

****************

शेवटी ते दोघ एकमेकांत मिसळले गेले होते, गीता आणि सूरज दोघही कोणताही कपडा अंगावर न ठेवता एकमेकांत घुसळत होते, एका परमोच्च बिंदूला जिथे सगळ्या दुनियाला आपण विसरुन जातो.. जिथं तुमचं मन तुमचं नसतं… तुमचं शरीर तुमचं नसतं.. तो अत्यानंदाचा क्षण… आणि सूरजच्या जवळ एक गोष्ट होती जी जादू किंवा परीकल्पनेपेक्षा काही कमी नव्हती, त्याने ते डिव्हाईस गीताच्या हातात ठेवले आणि एकाएक त्याने तिला थोडस शांत राहण्यास सांगत थोडयाशी आसपासच्या दुनियापासून स्वतःच भान हरपण्यास सांगत.. मनाला निर्विकार बनवण्यास सांगितलं, ही संमोहनाची पुढची अवस्था होती… आणि अशेच क्षण निघून चालले होते…आणि तो क्षण आला…

सूरज त्या अवस्थेबदल सांगत होता, ”मी कुठल्यातरी मोठया समुद्राच्या विशालतेचा भाग होतो पण त्यात पाणी नव्हतं, मी कुठल्याही फळासारखचं पण विना रसाशिवाय आणि आणि काय….मी कुणा दुस-यात होतो… आता मी थोडं ठीक अनुभवतो आहे…मी परिपूर्ण आहे… तरीदेखील अपूर्ण आहे, माझं मन… नाही.. हे खरं आहे का?...माझी दाढी…सूरज..हा…हा…हा…गीता..गीता..आय लव्ह यू…”

गीता म्हणत होती, ”काय काय करु शकतो नाही आपण..मजा येईल”

सूरज म्हणाला, ”का नाही? खूप मजा येईल”

****************

टॅक्सी थांबली होती.

वेळ – सोमवार दुपारी दीड वाजता

दिंनाक – 25 एप्रिल 2016

गीता-दशरथला सांगत होती, ”हा शोध खूपच नवा होता, त्याच्या सगळ्या नियमांशी आम्हा दोघांनाही ओळख नव्हती”

सूरज हेच सगळं लॅबमध्ये ही वायरे आणि रॉय आणि तिथे जमलेल्या सगळ्यांना सांगत होता,

“पण थोंड फार जरुर माहित पडल होतं”

“जसं की आम्ही आमची मन बदलली आहेत, शरीर नाहीत, तर आमच्या स्मृतीपटलावर आणि मेंदूच्या विचार करण्याच्या प्रक्रिया तशीच्या तशीच काम करते, आपली आवड, चव यांवर मात्र परिणाम होतो, आमची शरीर विपरीत रिअक्ट करत होती, आपण समोरच्या मनुष्याच्या मनाची अवस्था पूर्णपणे बदलू शकतो आपल्या मनाच्या अवस्थेसोबत”, “आपला परस्थितीला सामोरे जाण्यासंबधीचा स्वभाव बदलून जातो, पण आपल्या मनातल्या सुप्त भावना मात्र तश्याच्या तश्याच होत्या”

गीता दशरथला सांगत होती, ”ना आवाजात बदल होतो, ना रुप रंग फक्त विरुदध सेक्सकडे बघताना व्यक्त होणारे हावभाव, मानवीय प्रतिक्रियाविषयीची प्रकिया बदलत होती.”

सूरज सांगत होता, ”मन कुणाचाही शरीराचा वापर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी करु शकत होतं, आपल्या बदलेल्या मनाने त्या शरीरातल्या डोळ्याने मिळणा-या कोणत्याही सुखाशीं आपण दुस-या हस्तातंरण झालेल्या मनाशी संतुष्ट करु शकतो”

“मनहस्तातंरण तेव्हाच शक्य होऊ शकत जेव्हा दोन व्यक्ती आपली स्वतःची चालू शरीराची अवस्था विसरुन शकतील आणि त्यापैकी एकाला दुस-याच्या मनअवस्थेच्या आतमध्ये” ”प्रवेश करण्याची पदधत माहित असावी, आणि हे फक्त सूरजला माहित होतं, म्हणजे यांचा अर्थ ज्याचं मन आहे आणि ज्याला तुम्ही मारुन टाकलं तो ”,गीता दशरथला सांगत होती, “कोणतीही अतृप्त इच्छा आपण दुस-यांच्या शरीराकडून पूर्ण करु शकतो, तृप्त मन आपल्या मूळ शरीरात जाऊन तिथंच आत्मसंतुष्टाचा अनुभव घेऊ शकतो”.

सूरज सांगत होता, ”जसं कुणाची पेरु खाण्याची इच्छा होत असेल आणि त्यांच्या समोर पेरु खात असलेल्या व्यक्तीसोबत केवळ मन हस्तातरंण करुन तो आपल्या पेरु खाण्याच्या इच्छेला आत्मसंतुष्ट करु शकतो आणि मूळ शरीरात पुन्हा जोडल्यानंतर त्याला पेरु खाण्याची इच्छा होणार नाही, भूक लागलेली असतानासुदधा” हे तो रॉय आणि वायरे यांना सांगत होता.

****************

ठिकाण- रस्त्यावर

वेळ – सोमवारी रात्री साडेआठ वाजता

दिनांक – 25 मार्च 2016 ते 22 एप्रिल 2016

गीता म्हणाली, ”तू जादूगर आहेस”

सूरज म्हणाला, ”मी नाही प्रोफेसर… सांइन्टिस रॉय.. त्यांचा शोध यशस्वी झाला… मनहस्तातंरण झालेलं होतं”

आम्ही रॉय यांना अजूनतरी यांच्याबददल सांगितलं नव्हतं, मी जरुर सांगणार होतो… फक्त मला अजून या शोधासोबत राहण्यात मजा येत होती… कारण या शोधामुळे दुनिया बदलून जाणार होती.

आता गीता माझ्या डोळ्याने तिच्या मनातली इच्छा पूर्ण करु शकत होती.. आणि तीची खुशी ती माझी खुशी.. मी खूश होतो.. तिला मी गेटवे ऑफ इंडिया दाखवला, सी लिंक दाखवला, माझ्या डोळ्याने ती पहिल्यांदा सगळं काही अनुभवत होती, मुंबईच्या लोकलमधली गर्दी… घडयाळाच्या काटयावर चालण्या-या या रहाटगाडयाला ती पहिल्यांदा पाहत होती.. शरीर माझं जरुर होतं…तिला प्रत्येक पुरुषांचा स्पर्श वेगळा वाटत होता पण स्त्रीयांच्या स्पर्शाबद्दल त्या शरीराला काही वाटत नव्हतं.

गीता म्हणजे सूरजचं मन दशरथला सांगत होतं, ”हे सगळं आमच्यासाठी सवय बनून गेलं होतं, कधी कधी यांमध्ये मला तुम्हाच्या घरात जेवण बनवावं लागत होतं, थोडयाफार चूका होत होत्या, पण गीता खुश होती.. हे असं सगळं आम्ही पाच-सहा वेळा तरी करुन बघितलं होतं.”

सूरज काचेपल्याड असलेल्या वायरेना सांगत होता, ”आता तिला मुंबई”, ”बघायची होती” दशरथ शिंदेना सांगत होता.

सूरज बेडयामध्ये बंद दशरथकडे बघून बोलत होता.

ठिकाण- दशरथचं घर

गीता सूरजला म्हणाली, बघितली तर आहे आणि अजून काय बघायचं बाकी आहे,

सूरज म्हणाला, ”रात्रीची मुंबई”

गीता म्हणाली, “मी खूप ऐकलं आहे, रात्रीच्या मुंबईबदल”

“तसंही माझं रॉयशी बोलण्यामुळे मूड खराब झाला होता आणि आता मला पैश्याची अजिबात चिंता नव्हती, गीताला तिचा नवरा कुठे काम करतो, ते बघायचं होतं… माझ्यासाठी ते खूप अनाकलनीय होतं.. आणि तिच्या त्या उत्सुकतेपोटी मी मिराज पेट्रोलपंपाशी पोचलो होतो”

****************

ठिकाण- रस्त्यावर

वेळ – सोमवारी दुपारी अडीज वाजता

दिनांक – 25 एप्रिल 2016

गीता म्हणाली, जो मी आता बोलत आहे, किंवा जी बोलतेय, तो सूरज आहे… फक्त मन असलेला सूरज..जिची शिकार तुम्ही केली ती गीता… आध्या अधु-या.. तुम्ही सूरजच्या शरीरासोबत गीताचं मनही मारुन टाकलं, गीताच्या मनाचा ही नाश झाला आणि तेच सूरजचं शरीर म्हणजेच डोकं होतं जे जाणतं होत की आपण कसे पुन्हा मूळ पदावर मन आणू शकतो, जे आता अशक्यप्राय आहे, कदाचित असचं मरणं लिहिलं असेल आणि प्रत्येक माणसाचं मन दुस-या माणसासारखं मुळीच नसतं, मी इथे तुमच्या इथे पूर्ण असून देखील मनापासून अधुरी आहे.

दशरथ पार हडबडून गेला होता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती, काही गोष्टींचे अर्थ त्यांच्यासाठी आता बदलत चालले होते, आता त्याला टीफिनमध्ये वेगळ्या आकाराच्या चपात्या बदल कळलं, घराचं फर्निचर का बदल जातं होतं. का जेवण दररोज एक सारखं असून देखील वेगळं वाटत होतं.. ते सगळं सगळं आठवून तो हैराण झाला.

गीता तिथून निघाली, दशरथला वाटलं गीता घरी निघून जाईल,

दशरथ विचार करत होता की विश्वास करु की नको

त्याचं मन पहिलचं कोडयात पडलं होतं.

अरे गीता कुठे आहे?

ती निघून गेली होती नाही सूरज, ओ शीट…मी हे काय केलं?

पण तोपर्यंत गीता टॅक्सीमधून निघून गेली होती.

आणि दशरथ पुन्हा कामावर जाण्यासाठी निघाला, त्यांच्याजवळ याशिवाय काही पर्याय नव्हता.

सदानंद वाचत होता.

****************

त्या तीन दिवसाच्या त्या बंद नंतर ट्रेनच्या डब्ब्यात दोन मिनिटापर्यंत मी आणि रहीमचाचा एक दुस-याला नुसते बघतच होतो, एकमेंकाच्या नजरेला नजर मिळताना आतलं ते साचून राहिलेलं चेह-यावर दिसत होतं, ट्रेन सफर तर होत होता पण प्रत्येकांची नजर आता धर्म शोधण्यात लागली होती.

सुदेश लॅपटॉप टाईप करणं बंद करताना उत्सुकतेने म्हणाला, ”नाही माहित आता तुला कोणता पांईट मिळाला?”

सदानंद म्हणाला, “अरे प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या मनातली गोष्ट पहिलीच ओळखून घेते, इतकी सोपी गोष्ट.. माहित नाही पण माझ्यासोबत होत होतं….माझी आई माझ्या मनातली गोष्ट पहिलचं ओळखते”

“तुझी काय सगळयाचीच आई आपल्या मुलाच्या मनातली गोष्ट पहिलीच पकडते” सदानंद म्हणते.

“गोष्ट एवढी सोपी होती, पण समजायला वेळ लागला, कदाचित तेव्हा… त्याचवेळी मी माझ्या आईबददल विचार करत होतो की माझ्या मनातल्या भावना समजू शकते… पण मी नाही समजू शकत…का?... माझ्याकडे यांच उत्तर नाहीयं, जर ती खरोखरच माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर, आणि मनहस्तातरणंची आयडिया तिथूनचं निघाली”

****************

साधारण रात्री आठ दहाच्या सुमारास दशरथला गाडीमध्ये बसवून रॉय याच्या लॅबच्या दिशेने जात होते, दशरथ विचारात होता गीताबददल विचार करत होता.

ठिकाण- दशरथचं घर

वेळ- मार्च-एप्रिल 2016

त्याला काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे जात होत्या, कदाचित हे खरं होतं की खोटं… दशरथला खरंच कळत नव्हतं की असं काय झालं? गीता आता पहिल्यासारखी दुखी वाटत नव्हती, ती आता खळखळून हसायची, पण तिच्या आतलं शरीर ते पूर्णपणे कमजोर झालं होतं, आता तिचं खोकल्याचं प्रकरण वाढत चाललं होतं, हल्लीच तिला उलटी झाली होती, दशरथला तिच्यावर प्रेम होतं पण कधी जाणवू दिलं नाही, सांगितलं नाही, दशरथचा राग तिच्या शरीरावर जरुर होता पण तो तिच्या कधी अंतकरणावर ताबा मिळवू शकला नाही, तो प्रत्येकवेळी तिला हॉस्पिटलमध्ये घेवून जाई, तिच्या तब्येतीबदल तो कमालीचा जागरुक होता. डॉक्टरने तिला आता सकारात्मकता वाढवायला सांगितली.

पण त्याने हल्लीच दोन-चार रंगाचे डाग फरशीवर बघितले होते, त्यानें गीताला याबददल विचारलं, तसं बघितलं तर ते खूप कमी बोलायचे, पण तिने दिलेल्या उत्तराने मनाची समाधानी होत नव्हती.

मग पुन्हा एका दिवशी ती धार्मिक पुस्तके गीताच्या घरी होती, “तू आणलीस का? तू कधीपासून वाचायला सुरवात केली”, दशरथने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, यांच कोणतही उत्तर गीताजवळ नव्हतं, दशरथला वाटलं गीताने ही पुस्तकं बाजारात जाऊन घेतलीयतं, त्याला बरं वाटलं की गीता अश्या पुस्तकांचा आधार घेतेय, पण एक दिवशी कामावरुन तो लवकर आला आणि त्याने त्या दोघाना पाहिलं.

त्यांच्या घरातून कोणी त-हेवाईक माणूस बाहेर पडत होता, काही पुस्तक होती त्यांच्या हातात.. धार्मिक विषयांवरची…आणि एका हातात कॅन्वहास होता मोठाला… त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली… पण गीताचं मन भरलं होतं.. बहुतेक तिच्यात आता आई बनल्याची लक्षणं दिसत होती, ती ने का कोण जाणे एचआयव्हीच्या उपचारावरच्या गोळ्या घेणं बंद केलं होतं, तिला जाणीव झाली होती, तिच्या एकूण जगण्याच्या आंकाक्षा संपल्या होत्या का? तिला या एकूण जगण्याचा कंटाळा आला होता का? का बंद बॉटलमध्ये ठेवलेलं आर्कषण आता संपल होतं का? का त्याने तिची घोर निराशा केली होती?… पण एकूण या गोळ्या बंद करण्यानं तिचं शरीर मात्र आतून प्रंचड कमजोर होत होतं.

सदानंद वाचत बसला होता, त्याने सुदेशला विचारलं, “इथलं पान उलट-सुलट झालीयं का?”

“हा एक पान झालयं, काही नाही… सगळी पानं पुन्हा टाईप झाल्यावर लॅपटॉपवर रिअरेंज करु”

********Search********

ठिकाण- रॉयची प्रयोगशाळा

वेळ- सोमवार, संध्याकाळी पाच वाजता

दिंनाक- 25 एप्रिल, 2016

रॉयजवळ खूप सा-या हुशार आणि अनुभवी वैज्ञानिकाची फौज होती, त्याने त्यांचा अनुभव तिथे कामाला लावला, रॉयने या आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी ‘टारसमिट स्क्रानटाचर’ नावाचं द्रव्य बनवलं होतं, ज्याला तो आज पाहिल्यांदा ख-या अर्थाने आजमणार होता, या अगोदर खूप वेळा शरीराचं मांस जोडण्यासाठीच्या प्रयोगासाठी यांचा प्रयोग करायचं आहे हे माहितं होतं पण त्याला हाताळणं झालचं नव्हतं, त्यांच्याजवळ वेळचं कुठे होता…यांच्याबदल कुणालाही अनुमान नव्हता, हा द्रवपदार्ध मामूली नव्हतं… शरीराच्या कोणत्याही दोन भागांना रक्तवाहिन्या, इतर नसांना जोडण्याचा दावा रॉय या कारणामुळेच करत होते, त्यांनी या द्रव्यांच्या मदतीने सूरजचा गळा एका बाजूने पूर्णपणे जोडला, त्यांने बाकी शरीराला गळ्याच्या त्या भागाशी जोडलं… कॉम्प्युटरच्या भल्या मोठया स्क्रीनवर हे सगळं दाखवलं जात होतं.

ठिकाण- रॉयची प्रयोगशाळा

वेळ- सोमवार, संध्याकाळी साडेसहा वाजता

दिंनाक- 25 एप्रिल, 2016

वायरेने सगळ्यानां त्या स्केचवाल्या बाईच्या विषयी डिटेल्स मिळाल्यावर माहिती करण्यासाठी फोनवर कळवलं.

त्या विशाल लॅबमध्ये येऊन वायरेने सूरजच्या शरीरासोबत होणा-या प्रयोगानां बघू लागले.

एकापेक्षा एक मशीनी सूरजच्या शरीराचं परीक्षण करत होत्या, त्यांच्या शरीरावर खूप सा-या पोषकद्रव्याने भरलेल्या बॉटल्स ठेवण्यासाठीची रसद तयार होती, वायरे या सा-या गोष्टींकडे मोठया बारकाईने बघत होता, ते आता एकदम भलामोठया शॉक देण्या-या मशीनी आता अजमावणं अजून बाकी होतं, रॉय यांचा अजून एक प्रयोग आजमावणं बाकी होतं, मायक्रो सेलस इलुजन शॉक मैकनीझम, याविषयी त्यांनी या अगोदर कधीच वाचता केली नव्हती, ते कदाचित ही सगळी परीक्षण पहिल्यांदाच करत होती, काहीही होऊ शकत होतं, हे शरीराला शॉक देणं त्यांच्या त्या शरीराच्या शेवटच्या नसापर्यंत पोहचण्याचा रॉय यांचा दावा होता, पण या सगळ्या शॉक देणा-या मशीनी निकामी होऊ शकत होत्या, आणि कदाचित सगळ्या शरीराची राख बनवू शकत होत्या, आजवरच्या अनुभवाला पणाला लावूनच हे सगळं ते करु पाहत होते, त्याचं मन आताही या क्षणाला घाबरत होतं, आणि त्यांना विश्वास होता की यांचा काहीतरी नक्की परिणाम होईल या मृत शरीरावर, त्यांनी हे सगळं या आधी कधी आजमवलं नसल्यामुळे त्यांच्या होणा-या एकूण परिणामाबददल ते अनभिज्ञ होते, हे पाहिल्यांदा होतं होतं, सोप्या भाषेत सांगायचं तर हे पाहिल्यांदा मारिओचा गेम खेळत असण्या-याला शेवटची स्टेज जिकूंन दाखववं असं काहीसं… त्यांच्या डोक्याच्या भागात मशीनस लावल्या होत्या.. ज्या क्षणाला शरीर जिवंत होईल त्यांचा सिग्नल हिरवा होणार होता, पण सध्या तरी त्या सगळ्या लाल दिसत हात्या आणि काही संदेश लिहिले दिसत होते, आणि त्यांनी अजून तीन मशीनस तिथे लावल्या, पण त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद कुठूनही मिळत नव्हता.

रॉय आपल्या खुर्चीत बसून सा-या परिस्थितीकडे बघत आपल्या अयशस्वी प्रयत्नांना मोठया शांततेने अनुभवत होते, तीनही मशीन त्यांच्या शरीराच्या त्या डोक्यातल्या आतल्या किल्पशी कनेक्ट केलं… परिणाम चक्रावून टाकणारे होते…

रॉयचे सहकारी म्हणाले, ”हे कसं होऊ शकत?”, त्यांचा अजून एक सहकारी म्हणाला, ”हे शरीर साधारण आहे पण मेंदूकडची संरचना बदलली आहे, काहीतरी वेगळं दाखवतयं”, ”हे कुणा वेगळ्याचं मन असू शकतं का?, यांचा अर्थ आपण शोध लावलाच होता लगभग…डिवांईससोबत मेंदूची संरचना केवळ सामान्य रुपात बदलत.. पूर्ण अवस्था बदलली आहे मनाची”

रॉय म्हणाले, “तर सूरज हेच सांगू पाहत होता तर.. आपली अनुमान दाखवणारी मशीनस त्याचं क्षणी नाही पकडू शकली, यांच्या मनाची संरचना कशी बदलली… ओ वो… नो..” रॉय यांचा राग निंयत्रणात नव्हता, त्यांनी आपला जोरात समोरच्या डेक्सवर ठेवला.

रॉयचा साथीदार म्हणाला, ”आणि हे शेवटी खरचं झालं तर…”

रॉय आणि एका सहका-यामध्ये बोलणं सुरु झालं, ”आपण उंदरावर नाही माणसांवर प्रयोग करत होतो, तुम्हाला समजायला पाहिजे होतं… आम्ही सांगितलं होतं की नुसतं सूरजवर एकटयासोबत प्रयोग करत राहणं जोखीम भरं असू शकतो… आपल्याला कोण्या दुस-यावरही हे प्रयोग करायला हवे होते.”

रॉय म्हणाले, “ही वेळ आणि जागा नव्हे, हे सगळं बोलण्यासाठी…मी अजूनही नाही समजू शकलो की अशी कोणती गोष्ट त्यांने शोधून काढलीय… जी सूरजला माहित पडली.. तो आपल्याला खेळवत बसला”

तिथे आता सूरज, त्यांला आता आत असणा-या नस जाणवू लागल्या होत्या, मनतरंगापर्यंत पोहचला, इतक्या मोठया प्रमाणात शॉक दिला जात होता, हे सगळं रॉय यांनी आपल्या इतक्या वर्षाच्या मेहनतीने बनवलं होतं, बॉडी-शॉक मूव्हेंमेंट इक्यूमेंट… या सगळ्याच्या वरती अजून परीक्षण होणं बाकी होतं….पण ते आज मोठी रिस्क घेण्याच्या तयारीत हे सगळं आजमवणारं होते.

रॉय यांचा एक अगदी तरुण प्रशिक्षणार्थी म्हणाला, “तो आता जिंवत होऊ शकतो”.

“जर सगळं काही सुरळीत झालं तर” रॉय यांचे बाकी सहकारी म्हणाले.

रॉय म्हणाले, “अजून संधी आहे, आता मी अश्याप्रकारे हार नाही मानणार”

रॉय आणि त्यांच्या बाकीच्या टीम मेंबरच्या बदलत्या प्रतिक्रियांना वायरे काहीही समजू शकत नव्हते, शेवटी त्यांनी न राहवून हातानेच इशारा करत “हे सगळं काय चाललयं” विचारताच, रॉय यांच्या एका सहकाराने त्यांना समोरच्या निर्देशक बोर्डकडे बघायचा इशारा केला.

वायरे काहीसे हिरमुसत आणि आवाज वाढवत म्हणाले, “या सा-यांचा अर्थ काय ते तरी सांगा”

रॉय जागेवरुन उठत म्हणाले, “अर्थ हा की सूरजवर सहा महिन्यापासून करत असलेले प्रयोग यशस्वी होत होते, त्या डिव्हाईसची लाईट हिरवी झाली होती, म्हणजे त्यांच्या मनाच्या अवस्थेसोबत काहीतरी जरुर बदल झाला होता, माहित नाही…जेव्हा शेवटी दोनदा प्रयोगशाळेत आला तेव्हा त्यांला याबददल माहित होतं पण त्याने आम्हाला काही एक सांगितल नाही, हा जरी आम्हाला समजायला उशीर लागला तरी अजूनही वेळ गेलेली नाही.”

त्यांचा साथीदार उतावीळपणे वायरेना म्हणाला, “जर सगळं काही योग्य त-हेने झालं तर तुमच्या-माझ्या सगळ्याच्याचं प्रश्नांची उत्तरं सूरज देऊ शकतो“

वायरे काहीसे हसतच म्हणाले, ”ते कसे?”

वायरे यांना हे सगळचं विश्वसनीयतेच्या पलीकडे होतं, पण त्यांना विश्वास करावा लागत होता.

त्या समोरच्या मोठयाल्या मॉनिटरच्या स्क्रीनवर दाखवलं जात होतं, थोडया वेळाने आपल्या डाव्या बाजूला बघितलं पण त्यांना काहीच समजत नव्हतं.

थोडया वेळात

रॉय यांच्या डोळ्यात आसवं दाटली होती, आंवढा गिळत होती, त्यांचे कड थांबत नव्हते, “कदाचित, नाही… आता तो शंभर टक्के जिंवत होईल, आपण यशस्वी झालो, यस… त्या शॉकवाल्या मशीनी काम करतायतं, रॉय यांच्या चेह-यावर हसू होतं…”

रॉय यांचे सहकारी म्हणत होते, “यस….या शरीरात पुन्हा श्वास भरला गेलायं, म्हणजे रॉय बरोबर म्हणत होते की अपघाती शरीराची केवळ रासायनिक प्रक्रिया बंद होते, माणसाला पुन्हा जिंवत केलं जाऊ शकत”

रॉय आत्मविश्वासाने म्हणत होते, ”मी म्हटलं होतं, की हा जो कोणी विधाता आहे हा…. काही ना काही चूक जरुर करणार”

वेळ- रविवार संध्याकाळी सात वाजता

दिंनाक – 25 एप्रिल 2016

दोन क्षणापूर्वीं निपचित पडलेल्या सूरजच्या शरीरात आता श्वास देणं-घेणं करण्याचे सिग्नल समोरच्या मॉनिटरवर दाखवले जात होते, आता तो कोणत्याही क्षणी आपले डोळे खोलू शकत होता.

शेवटी रॉय आणि त्यांची टीम समजून गली.. त्याचं मिशन सफल झालं होतं…

वायरे म्हणाले, “हे तुम्ही काय बोलत आहात?”

हे झालेलं सारं काही वायरेच्या समजण्याच्या पलीकडे होतं, कदाचित ही कल्पनाही असू शकते पण ते सत्य होतं, सूरज जिवंत होणार होता, वायरेच्या डोळ्यादेखत जे काही होत होतं त्याने आज कोण जाणे त्यांना भीती वाटत होती, गळा सूकला होता, शरीरभर घाम जमा झाला होता, वायरे यांनी जीवनात पहिल्यांदा एवढी भीती अनुभवली होती, त्यांला ते रिपोर्टच्या दिवसांची आठवण झाली, त्या संध्याकाळी जेनीची ज्योतिष्यबाबाच्या संबधी केली गेलेली बोलणी आठवू लागली.

वायरे आपली हताशा लपवत अभिनंदनासाठी हात पुढे करत रॉयना म्हणाले, ”तुम्ही जिंकलात रॉय, आम्ही हरलो, फक्त तीन तासात तुम्ही मुडदा जिंवत करुन दाखवला”

रॉय अधिकच्या आत्मविश्वासाने हसत हसत म्हणाले, ”आता तुम्हाला खून्याला शोधावं लागणार नाही, आता केससुदधा ‘हत्येचा प्रयत्न’ अशी करावी लागेल, आता कायदयाची कलमही बदलावी लागतील”

वायरे आपल्या दिमागाला ताण देण्याचा प्रयत्न करत होते.

रॉय यांना आता जाणून घ्यायचं होतं की त्यानीं असा कोणता शोध लावला होता ज्यांचा अनुमान मशीनस नाही लावू शकल्या, आणि हे झालं कसं?....रॉय उत्सुक होते.

रॉय हे आपल्या साथी सहका-यांना म्हणाले, ”मला माहित आहे की प्रत्येक जण चूक करतो, तो कोणी असो… कोणीही अचूक नसतो… तो विधाता..करताकरवितासुदधा…मला माहित होतं…मी म्हटलं होतं की त्या प्रत्येक मुडदयाला मी जिंवत करीन, तुम्ही ज्याला देव… ईश्वर मानता त्यांनेसुदधा चुका केल्यात….हा..हा…Perfection is myth”

वेळ- रविवार संध्याकाळी पावणेआठ वाजता

दिंनाक – 25 एप्रिल 2016

काचेच्या त्या बंद पेटीत, अंधारात काही समजत नव्हतं, दोनवेळा त्याने डोळे उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, पाठच्या बाजूला सलाईनाचा हलकासा आवाज येत होता, थोडासा प्रकाशदेखील त्यांच्या डोळ्यावर येत होता. तो आता थोडासा हलण्याचा प्रयत्न करत होता तर त्याला त्रास होत होता, तो प्रयत्न करत होता.. शेवटी त्याला त्यांच्या समोर काही ओळखीचे चेहरे दिसत होते… प्रोफेसर रॉय.. आणि त्यांचे टीम मेंबर…सूरज आता जिंवत झाला होता…गळ्याच्या भोवतीच्या जखमेचा नामोनिशाण राहिलं नव्हतं, त्याला एकूण वास्तवाची जाणीव व्हायला थोडासा वेळ गेला आणि तो संपूर्णपणे हादरुन गेला, त्यांचे डोळे उघडले होते, त्यांच्यासाठी हे सारं पुर्नेजन्म या प्रकरणात मोडणारं होतं… सूरज परिस्थिती समजून घ्यायाचा प्रयत्न करत होता… त्याला सगळं काही हळू हळू आठवत होतं… त्याला सावरण्यासाठी रॉय यांची टीम पुढे सरसावली.

सूरजला आता काचेत ठेवण्यात आलं, त्याला मोठया प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला, आता प्रत्येकजण उत्सुक होता की त्याने असा कोणता शोध लावला होता, सूरजला तश्या अवस्थेतच प्रश्न विचारने वायरेने योग्य समजलं कारण बाकी सगळं स्थिर होतं आणि सूरज न अडखळता बोलू शकत होता. वायरेने सूरज जिंवत झाल्याचं पोलीस स्टेशनच्या आपल्या बाकी कॉन्सेटेबलला कळवलं, दशरथ आणि सूरजच्या वडीलांना इकडे लॅबमध्ये येण्यास सांगितलं, सूरज बाहेरचा कोणताही आवाज ऐकू शकत नव्हता, त्याला मायक्रोफोनने जोडलं गेलं होतं, ज्याने तो बाहेरचे आवाज ऐकू शकत होता.

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

वेळ – सोमवार संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटं

दिंनाक – 25 एप्रिल 2016

इथं आता त्या पेंटीगच्या मदतीने एक साधारण स्केच बनून तयार होतं, ज्याला शहरातल्या प्रत्येक पोलीस स्थानकात पाठवणं चालू होतं, पूर्ण पोलीस स्टेशन गंभीरतापूर्वक या कामामध्ये गर्क होतं, आणि अचानक जेनी पोलीस स्टेशनला आली, ती घाबरली होती, ती वायरेनां शोधत होती, तिनं वायरे यांना तिथं उपस्थित बघून तिला बरं वाटलं, तिचे केस विखरले, चेह-यावरुन काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं… वायरे खरं म्हणजे रॉय यांच्या प्रयोगशाळेत जाण्याच्या लगबगीत होते पण आता त्यांना थांबव लागत होतं.

वायरे म्हणाले, ”पण झालं काय? तू इतकी घाबरली का आहेस?”

शेवटी ती बोलू लागली.

“मी रस्त्यावरुन घराच्या दिशेने जातच होते की रस्त्यावरच्या त्या शेवटच्या कोप-यावर मी वळले, एका बाईनी मला स्पर्श करायचा प्रयत्न केला…माझ्या ओठाला..ओठ टेकवू पाहत होती…मला वाटतं कोणी वेडी बाई असावी…आणि ती अधिक काही करणारं त्या अगोदर मी मोठयाने ओरडायला सुरवात केली, लोकांनी तिला पकडायचा प्रयत्न केला पण ती तिथून पळून गेली… ती सारखं सारखं सूरज सूरज असं काहीतरी बोलत होती.. मला संरक्षणाची गरज आहे.. माझ्यावर पुन्हा असा प्रसंग येऊ शकतो.. मला भीती वाटतेयं”

तिच्यासाठी हे सगळं काहीसं आगळंवेगळ असून देखील आतलं एक मन आश्वसत करत होतं पण नाही ती घाबरतचं होती… आता ही तिचं घाबरणं बंद झालं नव्हतं… तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू काही केल्या कमी होतच नव्हते.

जेनीची सध्याची हालत बघत तिला आता कोणताही जास्तीचा प्रश्न न विचारणं वायरेने ठीक समजलं, वायरेने विनयभंगाच्या जवळ जाणारी सगळी कलम लावण्यास हवालदारास सांगत पाण्याने भरलेला ग्लास तिच्या पुढे केला, त्यांच्या डोक्यात आता हे एक नवीन कोडं येऊन बसलं होतं.

जेनी बोलणं थांबवत आपल्या नजरेने समोर बघत पाण्याचा ग्लास उचलला, आणि तिच्या हातून ग्लास कोसळला, ती समोरच्या त्या स्केचकडे बघत थरथर कापत म्हणाली, ”ही तीच होती…हा तीच…”

वायरेपासून सगळा पोलीस स्टाफ चकित झाला, प्रत्येकजण काहीसं वेगळं फील करत होता.

म्हणजे वायरे बरोबर बोलत होत तर

वायरे म्हणाले, ”’शेवटी माझा अंदाजा खरा निघाला”

वायरेने आपल्या टेबलावर ठेवलेलं ते स्केचला पुन्हा नीट बघत म्हटलं, ”ही कल्पना नाही, कोणाचं तरी खरचं चित्र काढलं गेलं होतं…लवकरात लवकर माहिती काढा ही कोण बाई आहे?”

काहीसा डोक्याला ताण देत वायरे विचारु लागले, ”तू या बाई बदल कधी ऐकलसं किंवा कधी पाहिलं आहेस का अधुकसं तरी?”

जेनीने नकारार्थी मान हालवली,

जेनीने अश्या कोणत्याही बाईबदलचं बोलणं सूरजला बोलताना ऐकलं नव्हतं.

दिनेशने स्थिरस्थावर झालेल्या जेनीला विचारलं, ”तू त्या ज्योतिष्यबाबाकडे का जातेस?”

****************

कथा लिहून झाली होती, त्याने कागद टेबलावर ठेवलें होते, त्यांच्या मनात दोन विचार त्याला गोंधळून टाकत होते, त्याला त्या टेबलावर बसल्या-बसल्या जेनीबदल विचार करण्याबदल मजबूर केलं, पुन्हा त्याला मनाचे दोन भाग दिसले.

सदानंदच काळं मन:- आज तिन स्वतः प्रपोज केलयं, शेवटी तीनेच अप्रोच केलं, तू बसून रहा असाच…अजून हा नाही म्हटलसं…

सदानंदच गोरं मन:- यार ही स्टोरी काहीतरी करेल तर.. कमाल होऊन जाईल…काय सांगू जेनीला

सदानंदच काळं मन:- नाही सांगून टाक तिला, इथं स्वतःच्या आईला नाही संभाळू शकत, लग्नानंतर तिला कसं संभाळू शकशील…

सदानंदच गोरं मन:- काही चिंता नाही, एडजेस्ट करेल ती…

सदानंदच काळं मन (काहीसं कुर्निसात होऊन विचिछन्न हसत):- सांग तिला तूझी काही अजून स्वप्न आहेत, ती पूर्ण झाल्यावरच तू लग्नाचा विचार करु शकतोस.. खोटारडा कुठला… तुला प्रसिदध यशस्वी लेखक बनायचयं… न बोलणारा. घुम्या.. परसनॉलटीचा…

सदानंद त्या दोन्ही मनाचं ऐकत काय करायचं हे ठरवत फोन लावत स्वतःशी बोलत होता, ”यार, मला तिला सांगाव लागेल, फोनवर बोलणं योग्य होणारं नाही”

जेनी फोनवर दुस-या बाजूने फोनवर बोलत होती, ”तर तुला हे नातं पुढे घेवुन जायचं की नाही, लग्न करणार आहेस ना?”

सदानंद स्वतःला सावरत तिला म्हणाला, ”ठीक आहे, हे फोनवर बोलण्यासारखा विषय नाहीय आहे, उदया मरीन ड्राइव्हला भेटू”

“उदया तर रंगपंचमी आहे ना” जेनी म्हणाली.

सदानंद म्हणाला, “मग काय झालं, मी रंगपंचमी नाही खेळत, तू ये दुपारी बारा वाजता”

****************

जेनी दिनेश आणि वायरेला सांगत होता, “मी आणि सूरज एकदा एका नाडी-भविष्य सांगणा-याकडे गेलो होतो, त्याचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण माझा होता.”

त्यावेळी त्या ज्योतिष्यबाबाने मला सूरजच्या भविष्याविषयी सांगताना म्हटलं, “तो येत्या काळात कोणत्यातरी गंभीर शारिरिक विंवचनेचा शिकार होईल.”

“पण आता हे काय झालं, त्यांची हत्या.. मरण.. फक्त वयाच्या पंचवीशीत, सूरजबदल कळल्यानंतरच्या सकाळी मी त्या ज्योतिष्य सांगणा-या ज्योतिष्यबांबाना भेटायला गेली होती, जेनीच्या डोळ्यात आता पोलीस स्टेशनात वायरे आणि दिनेशला सांगताना आसवं होती.

ज्योतिष्यबाबाने तिला आत्मविश्वासाने सांगितलं, “पण मरण, अजून तरी संभव नाही, शास्त्र कधी चूकीच होऊ शकत नाही, संपूर्ण ब्रम्हांडाला ध्यानात ठेवून ते बनवलं गेललं आहे.. तरी जर तूला वाटत असेल तर तू त्यांच्या डाव्या अंगठयाचा ठसा घेवून ये”

जेनी म्हणाली, ”आणि त्यांनी ते बघिलल्यावर सांगितलं की”

ज्योतिष्यबाबा म्हणाले, ”यांच्या अगोदर अश्या ठश्याचं परीक्षण करण्याचा योग आला नव्हता, पण आभार आहे नाडीशास्त्रात अश्याही मनुष्याविषयी उल्लेख आहेत”

दिनेशने विचारलं “अश्या म्हणजे कश्या?”

जेनी म्हणाली, ”ते त्यांनाही ठाऊक नाहीय, काही गोष्टी ज्या मानवाने स्वतः बनवल्या आहेत.. असाच काहीसा वरवरचा अर्थ होतो, त्यांनी म्हटलं की ते तामिळनाडूला याबदल काही लोकांशी बोलणारं आहेत.. तिथेच या विषयासंबधीचे जुने ग्रंथ आहेत”

मी त्या दिवशी पोस्ट मार्टम रिपोर्टच्या दिवशी सूरजच्या डाव्या अंगठाचे ठसे हॉस्पिटलमध्ये घेतले होते.

सूरजविषयी ज्योतिष्यबाबाचं अनुमान बदल नव्हतं, त्यांच्या शास्त्रानुसार सूरजचं मरणं आता तरी संभव नाही होऊ शकत. त्यांनी मला संयम पाळायला सांगितला होता.

वायरेना या गोष्टीत काहीच तथ्य वाटत नव्हतं, जेनीच्या या बेफूजल बोलण्याला उडवून लावत, तिला सतीश नावाच्या एका पोलीस कॉन्सटेबलच्यासोबत घरी पाठवलं जात होतं.

****************

ठिकाण-पोलीस स्टेशन

वेळ- सोमवार, संध्याकाळी सात वाजून पच्चावन्न मिनिटं

दिनांक – 25 एप्रिल, 2016

दिनेशने वायरेना म्हणाला, सूरजचे वडील आलेत.

“त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवा” वायरे म्हणाले

दिनेश म्हणाला, ”त्यांना काही रॉय यांना सांगायचयं”

वायरे काहीशे विचार करत म्हणाले, ”ठीक आहे मग सूरजच्या वडीलांना आणि त्या दशरथला पण घेऊन ये”

तर वायरेने दशरथ आणि सूरजच्या वडीलांना येऊ दिलं.

****************

ठिकाण-पोलीस स्टेशन

वेळ- सोमवार, संध्याकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटं

दिनांक – 25 एप्रिल, 2016

दशरथला मारणं बंद करत त्याला रॉय यांच्या लॅबमध्ये आणलं गेलं, तिथं त्यानं बघितलं तर सूरज जिंवत होता, त्याला काही तरी वेगळं वाटत होतं, दशरथला सूरजला स्पर्श करावं असं वाटत होतं, सोबत सूरजचे वडीलही होते, कदाचित आता कोडं सुटणार होतं, इथे वायरेच्या टीमने गीताला शोधण्यासाठी आपले प्रयत्न अजून जोरदार केले, संपूर्ण टीम तयारीला लागली, दशरथने त्यांच्या घरचा पत्ता विचारला, इथें सूरज आता सांगतच चालला होता.

गीताच्या घरी रॉय यांनी आपली माणसं आणि वायरे यांनी आपली पोलीस कुमूक पाठवली.

****************

ठिकाण- जेनीच्या घरापाशी

वेळ- सोमवार आठ वाजून दहा मिनिट

दिनांक – 25 एप्रिल, 2016

जेनी आता या केसमुळे पोलीस प्रोटेक्शनमध्ये आपल्या घराच्या दिशेने जात होती, ती अजूनही त्या धक्कयातच होती, ती स्वतःच्या घराकडे वळत होती, सतीश तिच्या पाठीमागून चालत होता, इतक्यात त्यांचा कॉल वाजला, त्याला बातमी मिळाली की… जेनी वेडयासारखी नाचू लागली, तिने आभाळ्याकडे पाहिलं. देव असल्याचा तिला साक्षात्कार झाला. जेनी मनातल्या मनात म्हणाली, “मला माहित होतं की सूरज जिवंत आहे”

तिच्या ज्योतिष्यबाबाच्या शास्त्राबददलच्या श्रध्देला आता पुष्टी लागली होती, तिचा या प्राचीन शास्त्रांवरचा विश्वास अजूनच वाढला होता.

आता तिला सुदधा रॉय यांच्या लॅबमध्ये बोलवलं गेलं.

****************

ठिकाण- पोलीस स्टेशन

वेळ- सोमवार आठ वाजून चाळीस मिनिट

दिनांक – 25 एप्रिल, 2016

अजूनही सूरज आपली कहानी सांगण्यात व्यस्त होता, तो नुसता सूरज शरीराने होता मन मात्र गीताचं होतं, त्यांचा मेंदू सूरजचा असल्या कारणानं त्याला हे सगळं माहित होतं.

काचेत ठेवलेल्या सूरजची प्रत्येक गोष्ट एकूण वायरे दंग राहिला.

सूरजने सगळं सांगितलं…नाही ते गीताच्या मनाने सांगितलं होतं…

****************

ठिकाण- दशरथ-गीताच्या घराजवळ

वेळ- सोमवार रात्री नऊ वाजता

रॉय यांची टीम आणि वायरे यांचे साथीदार दशरथच्या घरातून गीताला नेण्यासाठी पाठवलं गेलं होतं, दशरथचं घर वीस मिनिटांच्या अंतरावर होतं, जवळजवळ नऊ वाजता ते पोहचले, सगळ्या मिडियाच्या गाडयांनी रोड भरुन गेला होता. रॉयच्या एका सहका-याने तिथं असलेल्या एका इसमाला विचारलं, ”इथे काय झालयं, मिडियाच्या गाडया का आल्या आहेत?”, तो इसम चेह-यावर काहीच न झाल्यासारखं म्हणाला, ”काही नाही एक जुनी इमारत होती… पडली… कमीत कमी वीस लोक मेली.. तरी बरं जवळ जवळ ऐंशी टक्के बिल्डींग खाली होती.. जास्त कोणी राहत नव्हतं…”

ते धावत धावत बिल्डींगच्या जवळ पोहचले, कोणीही जिवंत नव्हतं.. गीतासुदधा….!!!!

रॉयला फोनवर कळवण्यात आलं की गीता या जगात आता राहिली नसल्याचं.

रॉयची नाराजी आरपार गेली होती, त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती की असं काही होईल, ते काहीसे सावरत म्हणाले, “जर गीता मरणं पावली यांचा अर्थ सूरजचं मनदेखील मरणं पावलं”.

साधारण नऊच्या सुमारास, गीताचं शव तिथून नेलं गेलं.

वायरेलासुदधा त्यांच्या माणसांनी गीताच्या मरणाची बातमी सांगितली, आणि तिथं असलेल्या दशरथने ती ऐकली.

आता दशरथला धक्का बसला, ऐकून तो देखील दंग झाला, दशरथसाठी हे जास्त दुखदायक होत कारण त्यांच्यासाठी आता काहीच उरलं नव्हतं, त्यानं काय गमावलं होतं ते तोच जाणत होता, त्या स्त्रीचं मन जिच्यावर तो अव्यक्त जीवापाड प्रेम करत होता, तो आता कुणा दुस-याच्या शरीराचा हिस्सा होता… त्याला आता आशा लागून राहिली होती की शरीरासकट मनाने गीताला पुन्हा मिळेल…. तो धाय मोकलून रडत होता.

सूरजला काचेच्या कपाटात ठेवलं होतं, त्याचं शरीर कमजोर पडत होतं, त्याला सगळ्या प्रकारची शारिरिक ताकद पुरवणारी द्रव्य दिली जात होती, त्याला सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सेवाचा रतीब पोचवला जात होता.

गीताच्या मरणाच्या बातमीने रॉयसाठी सगळं काही हातात येऊन देखील अधुरपण आलं होतं, पण तो तरीदेखील ते ब-यापैकी खूश होते, त्यांच्याकडे आता दोन महत्तवपूर्ण संशोधन पुराव्यानीशी तयार होते… त्यांनी खरचं एका माणसाला जिंवत केलं होतं. त्यांच्या चेह-यावर आनंद झळकत होता, त्यांना बाकी कुण्याच्या असण्या-नसण्याचं कोणतचं सोयरसुतक उरलं नव्हतं, गीताच्या मरणाचं ही त्यांना दुख नव्हतं… ना सूरजच्या असं असण्याबददल… त्यांना तर त्यांनी लावलेल्या अंदाजावर विश्वास होता.. मनहस्तातंरण सारखी अदभूत गोष्ट त्यांच्या हाती लागली होती, टारसमिट स्क्रानटाचर आणि मायक्रो सेलस इलुशन शॉक मैकनीझम या दोन्ही गोष्टी यशस्वी झाल्या होत्या. त्याला आज बरं वाटत होतं इतक्यात तिथं सूरजचे वडील आले, त्यांना काहीतरी रॉय यांना सांगायचं होतं.

*******Enroot*******

पण अजूनही वायरे यांच्या मेंदूतून ही गोष्ट मानायला तयारच नव्हते, ते मनातल्या मनात म्हणाले, ”कोणी मेलेला माणूस, ज्याला गळ्याकडून चिरलं गेलयं, तो जिंवत कसा काय होऊ शकतो, विज्ञान कितीही पुढे जाऊ देत पण मरणाला आपल्या वशमध्ये कसं काय करु शकतो” त्यांनी समोर भिंतीवर चालत असलेल्या एका मुंगीला मारलं आणि आता हिला पुन्हा जिंवत कसं करु शकतो यांचा विचार करु लागले आणि आपले केविलवाणे प्रयत्न संपल्यावर, शेवटी न राहवून वायरे यांनी रॉयना मनातली शंका विचारलीच, ”तुम्ही या अगोदर शरीर जोडण्याचा प्रयोग कुणावर केला होता का?”

रॉय म्हणाले, ” नाही सूरजच पहिला होता, टारसमिट स्क्रानटाचरचा डायरेक्ट सूरजवरचं प्रयोग केला”

वायरे आताही विचारात पडले होते.

डॉक्टरानी न येण्याचा सल्ला झुगारत सूरजचे वडील मुंबईत दाखल झाले होते, त्यांना बोलताना त्रास होत होता, त्यांना चालता बोलताना त्रास होत होता, पण त्यांना काही खरं सांगायचं होतं. ते बोलण्यासाठी पुढे सरसावले.

रॉय त्याचं खुशीत कुणाला तरी सांगत होते, ”मी म्हटलं होत ना चूक सगळ्याकडून होते”

इतका वेळ चूपचाप बसलेले सूरजचे वडील आता उभे राहिले, आणि रॉय यांच्या दिशेने तोंड करुन बोलू लागले, ”मला ओळखलं का रॉय”

“नाही” रॉयने म्हटलं.

“पण मी तुम्हाला ओळखतो, पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तुम्ही थकला होतात, त्या दहा वर्ष सुरु असलेल्या बेकार संशोधनाने, तुमच्या त्या महत्तवाकांक्षी प्रोजेक्टवर पानी पडलं होतं, त्या नंतर तुम्ही शिमला सोडलतं, तिथं तुम्ही सगळं काही सोडून निघून गेलात अमेरिकेला.. तुमचा प्रोजेक्ट फेल झाला होता, तुम्ही कृत्रिम मानव बनवण्याचा प्रयत्न केला होता”

पाहिल्यादा तर रॉय हे ऐकून काहीसे बावरले, पण त्यांनी यावर कोणताही प्रश्न उभा केला नाही, उलट त्यामुळे त्यांच्या शिमल्याकडच्या आठवणी सुरु झाल्या, ”लगभग दहा-अकरा वर्षांची मेहनत होती आणि मलाही ते सहन झालं नव्हतं, मी आपला स्वतःला त्या कायदयाच्या कचाटयातून वाचवण्यासाठी शिमलाचं नाही तर भारत सोडून गेलो, सतत प्रयत्न करुन देखील मी कृत्रिम मनुष्य बनवण्यात अयशस्वी झालो, सहा लहान मुलांची शरीर बनली होती.. कृत्रिमरीत्या”

त्यांच्या बोलण्याने या विषयाविषयी माहित असलेल्याच्या त्या प्रकरणाबदलच्या आठवणी ताज्या झाल्या, काहीना शिमल्यात गेल्यासारखं वाटत होतं….

सूरजचे वडील वायरे यांच्या आठवणीवर बोलले, “त्या अयशस्वी संशोधनात बनलेल्या त्या अर्भकांना दफन करणं माझं काम होतं, मी सुरवातीची पाच दफन केली, पण शेवटच्या त्या मुलाचं रुप..काय होतं… माझ्या हाताने ते दफन होईना… खरं सांगतो त्या कोवळ्या निपचित जीवाकडे मी पाहत राहिलो…का कोण जाणे मी ते दफन न करता.. त्याला घरी घेवून आलो… ते मुरदाड होतं.. मुडदा होता.. थोडा वेळयाने दफन करेन… असा विचार केला… पण असं करत करत पाच दिवस गेले.. पण त्यांला कोणताही वास येत नव्हता.. माझ्याच्याने हिमंतच नाही झाली…किती सुंदर…बाळ होतं ते… निसर्गाने नव्हतं बनवलं ते.. पण तरीदेखील ईश्वराचा अंश असल्यासारखं वाटत होतं…शेवटी त्याने श्वास घेतलाचं… त्याने डोळे उघडले… तो जिंवत होता…हा तो जिंवत होता… तुमच्या त्या प्रत्येक मृत शवात जीव होता, तुमच्या हातून काहीतरी सुटलं होतं… तर सूरज हा साधारण असूनदेखील साधारण नव्हता.. मी जवळ जवळ पंचवीस वर्षांपासून विचार करतोय की यांच्यामध्ये बाकी गोष्टी इतर माणसांसारख्या सामान्य आहेत तरीदखील हा इतरांपेक्षा वेगळा आहे तर यांच वेगळपण काय असेल, मला नेहमी वाटायचं की हा कधी आजारी पडला तर यांचा औषधापचार होईल ना… जर काही वेगळ्या त-हेचं रक्त लागलं तर… मी नेहमी यांच चिंतेत असायचो… मी त्याचं असाधारणपण शोधत होतं… त्याचं उत्तर आज भेटलं.. ज्यांचा जन्म निर्सगतः नाही झाला तर त्यांच मरणं निर्सगतः कसं असू शकतं? यांच्या शरीराचा कोणताही भाग हा कितीही दिवसानंतर जोडला तर तो जिंवतपणाने जोडला जाऊ शकतो, पण आता त्यांच्या आतून एका आजाराने प्रवेश केलायं, जे त्याला आतून पोखरुन काढेल”

वायरेपासून बाकी इतर सारी माणसं दंग झाली हे ऐकून, रॉयच्या तर चेह-यावर घाम आलेला दिसत होता, “टारसमिट स्क्रानटाचर” नावाच्या द्रव्याला ते बघत बसले, त्याचं मन आता पूर्णपणे आंकाक्षा विरहित झालं होतं, त्यांनी रागाने आपल्या बोटाजवळ चाकू चालवत त्यावर ‘टारसमिट स्क्रानटाचर’ चा प्रयोग करु लागले, बाकी लोकांना काय झालयं समजायच्या अगोदर, ते बोट ते जोडण्याचा प्रयत्न करत होते.. ते नुसतचं जोडलं गेलं… पण त्यात जिवंतपणा नव्हताच थोडक्यात ते अयशस्वी होत होते…. ते टारसमिट स्क्रानटाचर नावाचं द्रव्य त्यांच्यावर परिणाम करत नव्हतं, आणि सूरजचे वडील बोलत होते, ”तसं बघितलं तर मी सूरजचा पिता नसून, एका प्रकारे म्हटलं तर तुम्ही त्याचें वडील आहात, हा तुमचा मुलगा आहे”

सूरजला त्या काचापलीकडे काय म्हटलं जातयं ते ऐकू येत नव्हतं, तो फक्त आपल्या वडीलांना बघून खूश होता.

वायरेनी स्वतःला सावरत रॉयला म्हणाले, “तो तेव्हा ही साधारण नव्हता जेव्हा या दुनियेचा भाग होता…तर तुम्ही आजही अडकलेले आहात रॉय त्या विधात्याने बनवलेल्या दुनियामध्ये, ‘टारसमिट स्क्रानटाचर आणि मायक्रो सेलस इलुजन शॉक मैकनीझम’ दोन्ही चा वापर तुम्ही फक्त सूरजवरच केलात आणि तो फक्त सूरजवरच होऊ शकतो कारण तो आर्टफिशिल माणूस आहे”

यावेळी वायरे बोलत होते, पण अजूनही ते विचार करत होते की सूरज जिंवत कसा, यावेळी सूरजच्या वडीलाचं हसणं थांबल नव्हतं.

******Engima******

ठिकाण – रॉयची लॅब

वेळ- रात्रीचे साडेनऊ

जेनी पोहचली होती, सूरजला समोरच्या काचेच्या आत झोपलेल्या अवस्थेत ठेवला होता, ती सूरजला काचेच्या आत स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती, त्याला मिठी मारु इच्छित होती, पण त्या पुढच्याच क्षणाला ती वेगळी झाली त्या काचेकडून… कारण काय बरं होत… सूरज आता एचआयव्हीचा शिकार होता..हे काय…तिला या सगळ्या प्रकार प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ज्योतिष्यबाबाच्या बोलण्यावर विश्वास बसला इतकचं.

इथे वायरेचा सहकारी दिनेश, गीता आणि सूरजच्या मध्ये झालेल्या मनहस्तातंरणाला प्लेसबो इफेक्ट समजत होते.

केस आता ब-यापैकी सुटली होती. प्रत्येकजण आपआपल्या उत्तराने प्रश्नांना दफवून टाकत होता.

गीताच्या मरणानंतरच्या मेडिकल पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिचं मरणं इमारत कोसळण्याच्या काही मिनिटं आधी झाल्याचं नमूद केलं होतं, यामागचं कारण काय असू शकेल?.

मिडियामध्ये बातमी होती, चूकीच्या रिपोर्टीगचा परिणाम, एका जिंवत माणसाला ठरवलं मृत, मुख्यमंत्र्यांनी त्याला गंभीरतेने घेत, मिडियाने यापुढे अश्या चुका करु नये यासाठी ताकीद देत, त्या अनुषगांने विधानसभेत मिडीया गाइडलाईनस बिल आण्याचा प्रस्ताव असल्याचं बोललं जातयं, मंत्रीमंडळाने पारित केललं स्टेट टॅक्स बिल…. इंडस्ट्रिअलस्टिनां मिळणारा मोठया प्रमाणावर सवलत…. बातम्या संपल्या…

पण बाहेरच्या दुनियेत एक माणूस होता ज्याला सूरज गीता आणि दशरथच्या विषयी सगळं काही माहित झाल होतं…तो तर टॅक्सी डाइव्हर…त्यांतही मुका…त्याचं बोलणं समजणार कुणाला आणि समजलं तरी त्यावर विश्वास कोण ठेवणार त्यांच्या बोलण्यावर…

******************

ठिकाण – सदानंदचं घर

कथानक टाईप करणं अंतिम टप्प्यात आलं होतं, सुदेश सदानंदला म्हणाला, ”पूर्ण तीन तास लागले, प्रफुरिडिंग करायला, शेवटी एकदाचं झालं”

सदानंद काळजीच्या स्वरात म्हणाला, ”जी काही पानं वरती-खालती झाली होती ती ठीक केलीस ना!”

सुदेशने होकार मानेने कळवला, आता सदानंद म्हणाला, “आता रिप्लेसच्या ऑपशनमध्ये जा आणि काही पात्राची नाव बदलायचीत, दशरथचं ‘लक्ष्मण’ कर आणि जेनीचं ‘सीमा’ कर… बदलून टाक, शिदेंच ‘रायकर’ कर”, “लोक आता प्रश्न नाही विचारणार, पात्र ख-या आयुष्यातून घेतलीयत का नाही? आणि त्या लोकांना माहितदेखील पडणार नाही ज्यांच्या आयुष्यावरुन ही पात्र लिहिली गेलीत”.

सुदेश हसत म्हणाला, ”ते ठीक आहे पण या पानाच्या सरमिसळीमुळे कहानी काही वेगळीच वाटते”

सदानंद म्हणतो, ”जेव्हा आपल्याला काही गोष्टी पहिल्यापासून माहित असतात तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो”

सदानंद तिथं लॅपटॉप आणि लिहून ठेवलेली पान मोजत होता, सगळं काही पुन्हा एकदा निरखून पाहत, बरोबर आहे ना यांची खातरजमा करत होता. एकदाचं त्यांच्या मनासारखं झालं आणि ते बघून सुदेश म्हणाला, ”नव्वद पान, बरोबर, करु सबमिट”

सगळे सोपस्कार पूर्ण झाले होते, कहानी संपली होती, सुदेश निघाला होता. तितक्यात रेवतीने सुदेशचे आभार मानत पैसे पुढे केले, ते बघताच सुदेश म्हणाला, “पैसे नकोत, प्लीज, मागच्या सात वर्षांपासून प्रूफ रिडिंग करतोय, पण इतका इन्वॉल नव्हतो झालो कामात, आशा करतो की सदानंदला अपेक्षित रिझल्ट मिळेल”

******************

ठिकाण – सिनेमाहॉल

लोक खूपच गंभीर होऊन सिनेमा पाहत होते, आता पुढे काय होणार यांची सा-यांना उत्सुकता होती. सदानंद आणि जेनीसुदधा सिनेमा बघायला आले होते.

********Herald**********

ठिकाण – विज्ञानावरील विडियो सोशल मिडियावरचा

रॉय यांनी शेवटी आपलं नवीन थीसीस लोकांपुढे मांडल, ”हे जग परफेक्शनने बनलेलं आहे, आणि ते आपल्याकडूनही परफेक्शन मागते, यासांठीच आपण सारेजण सुंदरतेच्या अनुभूतीच्या आधिन असतो, माझ्या मनहस्तातरणाच्या संशोधनामुळे आज दुनियेभरातली अंध माणसं, आपल्या मनाला कोणत्याही अन्य सामान्य माणसाच्या शरीराच्या मदतीने या दुनियेतली दृश्यरूपाशीं जोडलो जाऊ शकतो, आपल्या त्या मनाला सहानभूती देऊ शकतो, हेच आधुनिक विज्ञान आहे परिकल्पनाच्याही पलीकडलं, the concept of impossibility, मला वाटतं की मनहस्तांतरण हा खरोखरच एक क्रांतीकारक शोध आहे, हा पण या शोधानंतर जग पूर्णपणे बदलून जाईल, मला नाही माहित….आपण मुलांना अणू-रेणूच्या गोष्टी सांगतो, त्यांच्याकडून ते पाठ करुन घेतो, पण तेच अंतिम सत्य नाहीय, एके दिवशी आपल्याला सांगितलं जात की डार्क पार्ट नावाचा प्रकार आहे, जिथं अणू-रेणूचं नामोनिशाण नाहीयं, म्हणजेच आपल्याला आजपर्यंत सांगितलेली, ऐकलेली सत्याबदलच्या गोष्टी या पूर्णपणे सत्य नव्हेत, तर ते ही नाही होऊ शकत जे एका सीमेपर्यंत आपण सत्य मानून चालत आहोत, ज्याने भविष्य पाहिलं तो ईश्वर का?, ना अंतिम सत्य आतापर्यंत कोणाला कळलंय?, पण काही रहस्य कधीच आपल्याला कळणार नाही, आपल्या मनुष्यजमातीच्या पतनानंतरही ते असचं राहिल का? नाही त्याला आपल्याला शोधावं लागेल, हा आज जरुर मी मरणावरती विजय मिळवला नसला तरी काय तरी मार्ग जरुर असणारं, आपल्याला प्रयत्न चालू ठेवायचेत…. कित्येक काळापासून नजरअंदाज आणि आपण एका मोठया अविष्कारापासून पाठ फिरवतो……मी नाही तर कोणी दुसरा तरी नक्की शोधेल”

********Articulate **********

थोडया दिवसानंतर,

सूरज पुन्हा एकदा कॅनव्हासवर ब्रश घेवून पेंटीग बनवण्यासाठी उभा राहिला, तो प्रयत्न करत होता, त्यांच्या डोक्यात विचार असूनही तो कॅनव्हासवर काही एक उतरवू शकत नव्हता…..तो धाय मोकलून रडत होता, त्याचं ते खाक झालेलं खरं मन कधीच मिळणारं नव्हतं….

पण त्याने काहीतरी लपवलं होतं जगापासून, तो स्वतःच्या शरीराला मृत असल्याचं भासवून शरीराच्या सगळ्या नसा तो थांबवू शकत होता.

त्याने ते नुसतचं स्वतःवरती नाही तर गीतावरदेखील हे प्रयोग आजमावले होते.

तो तीच गोष्ट त्या दिवशी त्या शेवटच्या फोन कॉलवर सांगत होता, “”आता दुनिया तुम्हांला आणि पुरावा नाही मागणार, तुम्ही क्रांतीच्या तटावर उभे आहात..बाय”… ही योजना खरोखर कोणत्याही सामान्य मनुष्याला मृत्यूवर विजय देऊ शकते पण आता हे रॉयला कधीच कळणारं नव्हतं, का तो केवळ फेलस्बो इफेक्टचा अजून एक सुधारित आवृत्ती होती, काय गुंतागुत अजूनही कायम होती, पण सूरज आता हे सगळं रॉयला का बरं सांगत नाहीयं, कारण मरणासारखं सुख नाही… जिथून तुम्हाला आला आहात तिथे परत जायचं…

वर्षानुवर्षे नजरअंदाज आणि आम्ही एका मोठया अविष्कारापासून पाठ फिरवतो… इतक्या वर्षापर्यंत आपण निद्रावस्थेत राहिलो… पण आपला आता सतर्क असणं गरजेचं आहे, मला विश्वास आहे की तो दिवस आता दूर नाही जेव्हा त्या प्रत्येक कबरीमध्ये गाडल्या गेलेल्याला जिंवत करु शकू ज्याला आपण मेला आहे असं समजून दफन केलयं, सगळं काही शक्य आहे विज्ञानामध्ये, कोणतीही मर्यादा नाही… परिकल्पनेच्याही पलीकडे…

******************

सदानंद आणि जेनी सिनेमाहॉलमध्ये एकदम खुशीत एकमेंकाचा हात हातात घेऊन सिनेमाचा शेवट पाहत होते.

सिनेमा संपला आणि त्या प्रमियिर शोच्या नंतर मिडियाच्या प्रश्नउत्तराचा कार्यक्रम सुरु झाला.

मिडीयामधल्या एकाने सदानंदने प्रश्न केला, ”तुमच्या डोक्यात काय सुरु होतं जेव्हा तुम्ही ही कथा लिहायला घेतली होती… म्हणजे तुमची प्रेरणा काय होती….?”

सदानंदला या प्रश्नाने कथेच्या सुरवातीला स्वतःशीच केलेल्या खूप सा-या गुजगोष्टी आठवू लागल्या. त्याने ठरवलं होतं की त्यांच्या त्या कथेतल्या प्रत्येक घटनेला लॉजिक दयावं लागले.

तो मिडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, ”मी सुरवातीलाच ठरवून ठेवलं होतं की, मी प्रत्येकवेळी पेपरकार्डवर दिलेल्या कथानकाच्या पांईट स्वतःसोबतच ठेवत होतो”

बाकी मिडिया, चित्रपटातल्या स्टार मंडळीचे फोटो घेण्यात व्यस्त होती, लेखकाचा फोटो घेण्यात कुणालाही रस नव्हता.

मिडीयाचा अजून एक प्रश्न आला, ”आम्हाला माहित पडलयं की हया कहानीतल्या खूप सारी पात्र रोजच्या आयुष्यतल्या प्रसंगातून घेतले आहेत”

“थोडेफार घेतलेत, पण बाकी गोष्टी या निव्वळ कल्पनेवर आधारित आहेत”

“तुम्ही कधी लक्ष्मणच्या बायकोला भेटला आहात का?” मीडियाचा अजून एक प्रश्न.

सदानंद हसत म्हणाला, ”नाही”

मिडियाने ओझरता एक शेवटचा प्रश्न केला, ”आम्ही ऐकलयं की तुमच्या आधीच्या दोन कांदब-यावरही चित्रपट बनणार आहेत”

सिनेमाचा प्रिमीअर संपत आला होता, जेनीचा चेहरा दुखी होता, ती म्हणाली, ”कमीतकमी माझ्या लग्नाला तरी नक्की ये”

******************

पाच वर्षानंतर

प्रसिदध लेखक सदानंद सोहकर यांची आज सकाळी वयाच्या तेहतीसाव्या वर्षी निधन झालं, ते अविवाहित होते, त्यांनी लिहिलेल्या बहुतेक सगळ्या कांदब-यावर आधारित चित्रपट मोठया पडदयावर यशस्वी झाले होते, मात्र आता त्यांच्या निधनानंतर गंभीर बाब ही आढळून आली आहे की सदानंद सोहकर हे एच.आय.व्ही पॉसिटीव्ह होते आणि ही गोष्ट आतापर्यंत त्याचं कुंटूब, जवळची माणसं आणि मित्रपरिवार यांपैकी कुणालाही माहित नव्हतं, आमच्या एनमिडिया चॅनेलच्या हाती काही एक्स्ल्युसिव्ह कागदपत्र हाती लागली आहेत जी पुष्टी देतात, हे दहा वर्षांपासूनचे जुने मेडिकल रिपोर्ट…

कदाचित तुम्ही अगोदरच पकडायला पाहिजे होतं, थोडसं सावध होत आसपासचे आवाज ऐकले असते तर बरं झालं असतं.

सदानंदचा आत्मा बोलतोय, ”त्या दिवशी मी घरातून बाहेर पडलो, मला जेनीला सांगायचं होतं की मी तिच्याशी लग्न नाही करु शकत, आता मला मरणाची कोणतीही पर्वा नव्हती, भीती नव्हती… मी रेल्वेस्टेशनपाशी आलो… त्या लहान मुलापांशी सुदंर असं आयुष्य बाकी होतं आणि तसंही माझं मरण आता खात्रीने होणार होतं… त्यामुळेच मी हिंमत जमवू शकलो”

काय असते रहस्य? जे उराशी बाळगून आपण एका वेगळ्या चेहऱ्याने जगत असतो, आणि ते समोर आल्यानंतर प्रत्येकांचा दृष्टिकोन बदलून जातो, भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलतो, माणूस एकदा वरच्या पदावर गेला की त्याच्या छोट्यातल्या छोट्या रहस्यालाही फार मोठी किंमत येते.

******************

समाप्त

******************

******************

तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

तुमचाच लेखनवाला.

lekhanwala@gmail.com

http://lekanwala.home.blog

https://www.facebook.com/LekhanwalaPage/