Mitranche Anathashram - 12 in Marathi Drama by Durgesh Borse books and stories PDF | मित्रांचे अनाथाश्रम - भाग १२

Featured Books
Categories
Share

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १२


सुरेश काकांनी सांगायला सुरुवात केली,
पंचवीस वर्षापूर्वी,

मी कामावर होतो, तेव्हा जास्त टीव्ही वैगरे नव्हतं. म्हणून जगात काय घडतं आहे ते कुणाच्यातरी तोंडून तीन चार दिवसांनी समजायचं. मी कामात असताना एक माणूस पळत आला आणि जोरात ओरडला, "बाहेर दंगल झाली आहे." कशामुळे घडलं, काय घडलं, काही माहिती नव्हतं पण जीव वाचवण्यासाठी लपून बसलो. त्या वेळी दंगल मुळे कित्येकांची घर उध्वस्त झाले. रात्री शांतता पसरली तेव्हा कुठूनतरी मार्ग काढत मी कामावरून घरी आलो. दरवाजा वाजवणार तेव्हा समजले की दरवाजा उघडा आहे. मी आत शिरलो तर सगळीकडे रक्त आणि फक्त रक्त होते. त्या रक्त्याचा पाठलाग करत मी पुढे पुढे जात होतो तसे माझ्या हृदयचे ठोके वाढत होते. मी पुढे गेलो तेव्हा दोन मृतदेह पडलेले होते. चेहरे ओळखीचे होते, मी अनाथ झालो होतो. घरात मी आई बाबांना एकटा होतो. ते मला सोडून गेले होते. आई बाबा आता या जगात राहिले नव्हते. घरातून सर्व पैसे गायब होते. त्या वेळी इतकी गरिबी होती की मी कामावरून घरी पैसे घेऊन आलो की मग घरात जेवण तयार करण्यात येत होत. माझ्याकडे जे काही पैसे होते ते सर्व चोरीला गेले. अंत्यसंस्कार कसा करायचा असा प्रश्न माझ्यासमोर होता. शेवटी ह्रदयावर दगड ठेवून मी नगरपालिकेला माहिती दिली की ते मृतदेह बेवारस आहेत आणि अश्या प्रकारे त्यांचा अंत्यविधी पूर्ण केला.
एक दोन दिवस शहर शांत होत. त्यानंतर पुन्हा हळू हळू काम सुरू होत होती. लोक त्यांच्या त्यांच्या कामावर परतत होती. पण पुन्हा काही लोकांनी त्या शांततेचा भंग केला. पुन्हा एकदा शहरात दंगल झाली.
त्या रात्री खुप पाऊस होता. मी आई बाबा गेल्यानंतर एकटा पडलो होतो. माझं असं कुणी नव्हतं, त्यामुळे घरात एकटाच असायचो. पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पाण्याच्या आणि विजांच्या आवाजबरोबर माणसांच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येत होता. निसर्गाबरोबर माणसांनी सुध्दा सर्व बांध तोडून टाकले होते. रक्ताचा पाऊस आणि तलवारीच्या विजा पडत होत्या.
माझा डोळा लागला होता, तितक्यात दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. मी दुर्लक्ष केले आणि पुन्हा डोळे लावून झोपलो. जवळच मी एक चाकू ठेवला होता. पण बाहेरून पुन्हा कुणीतरी दरवाजा वाजवला. मी एका हातात चाकू घेतला आणि दाराजवळ जावून बोललो, "कोण आहे."
बाहेरून आवाज आला, "भाईजान बहोत तकलीफ मे है, मदत कर दो"
मी जरा दरवाजा उघडला तर बाई एकटीच होती, तिच्या एका हातात एक बाळ होत तर दुसऱ्या हातात एक पिशवी होती. मी पटकन दरवाजा उघडून बाईला आत घेतले. ती बाई पळत जाऊन कोपऱ्यात बसली. मी तिच्यापासून लांब दुसऱ्या कोपऱ्यात बसलो. बाई बोलण्याच्या अवस्थेत नव्हती, म्हणून मी काहीच बोललो नाही. एखाद्या तासानंतर बाई बोलली, "कुछ खाने को है"
तिचा तो चेहरा पाहून विसरलो की मीच दोन दिवस झाले पाण्यावर जिवंत आहे.
त्या बाईच्या भाईजान या शब्दात खुप ताकत होती कदाचित त्याचमुळे मी त्या परिस्थितीत सुध्दा अन्नाच्या शोधात बाहेर पडलो. खुप शोधल्यानंतर एका घरात दिवा सुरू दिसला मी तिथे गेलो तर सर्व वस्तू पसरलेल्या होत्या. खाण्यासाठी मी जमेल ते उचलले आणि बाहेर पडलो. मला बाळ रडण्याचा आवाज आला मी वळून पाहिले तर तिथे एक बाळ रेंगाळत माझ्याकडे येत होत. मी त्याला घेतलं आणि बाळ ज्या रस्त्याने येत होत तिकडे गेलो तर एक घोळका जोडप्याला मारहाण करत होता. मी बाळाच्या सुरक्षेसाठी त्याला घेवून घरी आलो. मला येण्यासाठी खुप उशीर झाला होता. ती बाई तिथे नव्हतीच घराचा दरवाजा उघडा होता. मी घरात गेलो आणि आतून दरवाजा लावून घेतला.
थोडा वेळ बसून राहिलो आणि बाळ पण आतापर्यंत झोपले होते. थोड्या वेळाने पुन्हा बाळ रडण्याचा आवाज आला. मी बाळाकडे पाहिले तर ते निवांत झोपले होते. दुसरीकडून कुठूनतरी तो आवाज येत होता. मी आवाजाचा कानोसा घेतला तर डब्यांच्या मागे त्या बाईचं बाळ आणि तिची पिशवी होती. कदाचित दरवाज्यावर आलेले संकट पाहून तिने ते बाळ लपून ठेवले असावे. पण तीच काय झालं असेल याच विचारत सकाळ झाली, ती बाई काही परत आली नाही. मी तिची पिशवी उघडून पाहिली तर त्यात पैसे आणि दागिने होते. मी या बाळांना जर पोलिसात घेऊन गेलो तर त्यांना कुठल्यातरी अनाथाश्रमात देतील. मी सुध्दा आता एकटाच होतो म्हणून त्या दोघ पोरांना मी स्वतः सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि त्या बाईच्या पैशातून या अनाथाश्रमाची सुरुवात केली.
त्या दोन लहान पोरांपैकी त्या बाईच्या मुलाचं नाव अमर आणि दुसऱ्याच नाव आशिष असं ठेवलं.

काकांचं बोलण झाल्यावर आम्या ने काकांना कडाडून मिठी मारली. "बाबा, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात."
काका, "आता सांग तुझा अपघात कसा झाला."
आम्या, "त्या दिवशी तुमचं आणि त्या लोकांचं बोलण ऐकल्यावर मी तुम्हाला भेटलो पण तुम्ही पण काही सांगितले नाही. मी त्याच विचारत बाहेर पडलो काही समजत नव्हतं, एकांत पाहिजे होता. मी रस्त्याने एकटाच चाललो होतो. मी रस्त्याच्या कडेने चालत होतो. मला भान नव्हतं आणि मी कधी रस्त्याच्या मधोमध चालायला लागलो समजलं नाही. वळणावर कुठूनतरी एक ट्रक आला आणि त्याच्या धक्क्याने मी बाजूच्या दरीत पडलो. खुप खोल नसली तरी त्यात काटेरी झाडे होती. मी बेशुध्द झालो आणि जाग आली तेव्हा संजय, विवेक आणि समीर होते."
सर्वांच्या डोळ्यात पाणी होत, कारण हॉस्पिटल मध्ये असताना त्याच्या समोर कुणी दाखवत नव्हतं की त्याला त्या अवस्थेत पाहून किती त्रास होतो आहे. दाबून धरलेले अश्रू अनावर झाले आणि सर्व रडायला लागले. भानावर येऊन मी विचारलं, "तु हॉस्पिटल मध्ये कसा आला."
संजय, "ते नाही माहिती, मला हॉस्पिटल मधून फोन आला तेव्हा मी तिथे गेलो."
आम्या, "मला वाटलं की संजय घेऊन गेला असणार मला."
विवेक, "संजयला कसा फोन केला बरोबर त्यांनी
?"
संजय, "आम्याच्या फोन मध्ये शेवटी मी कॉल केला होता, मलाही माहिती नाही की कोण त्याला घेऊन गेलं असणार"
काका, "कोण होत माहिती नाही, जाऊ द्या मदत करणारा देवासारखा आला आणि तुला वाचवलं, बस हेच खुप आहे."
विवेक आम्या कडे पाहून, "झाले तुझे प्रश्न की अजून बाटली फिरवायची"
आम्या, "मग आशिषच काय झालं, तो कुठे आहे ?"
काका, "त्याला दत्तक घेतलं एका जोडप्याने."
आम्या, "त्याला पण बोलवू ना आपण उद्या"
काका, "तो अनाथ होता हे त्यालासुद्धा माहिती नसणार, त्याला त्रास होईल विनाकारण, त्याची काळजी करणारे असणार कुणीतरी"
संजय, "जशी आम्ही तुझी करतो, आता झोपा नाहीतर सकाळी उशीर होईल"
त्यानंतर सर्व जण झोपले. मी बाहेरच पटांगणात झोपलो होतो. मला झोप येत नव्हती म्हणून मी तारे मोजायला सुरुवात केली.

सकाळी उठून तयारी केली आणि कामाला सुरुवात झाली एक एक करून संजयची आई, काकू, काकूंची दोघं मुलं आणि विवेक ची आई सर्व मदतीला जमायला लागले.
काल रात्रीचं मनात असुन सुद्धा सर्व मित्र काहीच नाही घडलं असा आव आणून काम करत होती.

क्रमशः