मालती साधारण पंचविशीत असेल..... दिसायला गोरीपान, उंच, अंगकाठी अगदीच आकर्षक..... पण, कोण जाणे? तिला अजुन लग्नासाठी कोणीच पूर्णपणे होकार दिला नव्हता.... पाहुणे यायचे, बघून जायचे आणि नंतर कळायचं की, जाता - जाता त्यांच्या गाडीचं एक्सेडेंट झालं..... असेच तीन - चार स्थळ सांगून आले असतील..... नंतर मात्र तिच्या घरच्यांनी लग्नाचा विषय थोडा लांबणीवर टाकून तिला घरीच ठेवले.... लोकं टोमणे मारायची पण, त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही अस तिच्या घरी सांगण्यात आलं होतं..... मालती सगळी कामं आटोपून घरी राहायची आणि नेहमी खिडकीतून बाहेर बघत बसायची...... तिला वाटायचं की, कधी त्या पिंजराबंद घरातून ती बाहेर स्वतंत्र घुमेल...... त्याच सोसायटीमध्ये राम नावाचा एक वॉच मेन होता..... तो नेहमी तिला बघत राहायचा......
अशीच एका दिवशीची घटना...... जेव्हा मालती शाळेत शिकत होती.... शाळेतून परत येताना, तिला कोणी तरी तिचा पाठलाग करतो आहे असा भास झाला..... ती मागे वळून बघणार की, भरधाव बाईक तिच्या दिशेने येताना बघून तिने डोळे बंद केले आणि काही वेळानंतर ती सुखरूप असल्याच्या विश्वासाने डोळे उघडून बघितले तर, रामू तिला पाठमोऱ्या आकृतीने पुढे जाताना दिसला..... तिने आवाज दिला तर त्याने मागे वळून तिला एक वेगळच हसू चेहऱ्यावर आणून हात हवेत भिरकावला..... ती विचार करत घरी आली.... घरी सांगून वाद नको म्हणून ती शांत होती.... आईने विचारले पण, त्यांना सांगायला तिच्यात हिम्मत नव्हती..... जेवण करून सगळे झोपायला गेल्यावर तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर, राम तिच्याचकडे बघत होता.... ती घाबरून एकदम मागे हटली......
ह्या प्रकरणानंतर ती जरा घाबरूनच ये - जा करायची...... एकदा एक मुलगा तिला शाळेत त्रास देत होता..... रामला कोणी खबर दिली देव जाणे...... पळतच तो शाळेत आलेला आणि त्या मुलाला बदडून काढले होते..... मालती त्याला विचारणार की तो इथे कसा आणि त्याने त्या मुलाला का मारलं.... तोच, त्याने तिला हसून परत हवेत हात भिरकावून निघून गेला...... ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली......
या सगळ्या प्रकरणानंतर मालतीने, राम कडे बघणं ही बंद केले..... तो गेट वर उभा असलेला बघून ती खाली मान घालून घरात पळत सुटायची......
वर्ष गेले...... मालतीचं शिक्षण पूर्ण झालं..... आता तिच्या घरी स्थळ शोधायला सुरुवात झाली...... एका मागून एक स्थळ तिच्यासाठी येत होते...... पण, परत जात असता, पाहुणे मंडळींच्या अपघात झाल्याच्या बातम्या नेहमी यायच्या.... ह्या अशा प्रकरणामुळे तिची बदनामी तर झालीच शिवाय तिच्या कुटुंबाला समाज वाळीत टाकल्यागत वागू लागला.....
नेहमीप्रमाणे आजही मालती खिडकीतून त्या गेटकडे बघत बसली असता तिला तोच राम आठवला ज्याने कधीतरी तिला अपघात होण्यापासून वाचवले आणि तिला त्रास देणाऱ्या मुलाला चांगला बदडून काढला होता.... पण, त्याच्या बाबतीत एक बातमी होती की, त्याला कोणीतरी जीवाने संपवला होता..... खरं तर त्या मागचं कारण देखील कोणालाच माहित नव्हते.....
एक दिवस मालती खिडकीतून बाहेर बघत असता, तिला तिची मैत्रीण येताना दिसली...... मालती इतक्या दिवसांतून कोणी तरी तिला भेटायला येतंय हे बघून खूप खुश झाली.....
मालती : "आरती... ये ना किती दिवसांनी भेटतोय अग आपण..... कशी आहेस तू.....☺️☺️"
आरती : "अग मी ठीक मजेत आहे तुझं काय.... आणि किती टेन्शन घेतेस किती बारीक झालीस..... काय झालं अग.....??"
मालतीने तिच्या बाबतीत मागील काही महिन्यांपासून घडत असलेला घटनाक्रम सांगितला......
आरती : "मला खूप वाईट वाटतंय ग.....😒"
मालती : "अग तू सांग तुझं काय.....🙂"
आरती : "हे घे कार्ड लग्नाला येशील......🙂"
मालती : "नक्की ...."
त्यांच्या काही वेळ गप्पा होतात आणि आरती निघून जाते..... मालती विचार करते की, लग्नाच्या निमित्ताने तिला किती तरी दिवसांनी बाहेर जायला मिळणार म्हणून ती खूप खुश असते.....
लग्नाचा दिवस येतो..... ती छान तयारी करून जायला निघते..... मैत्रिणीच लग्न म्हणून ती एकटीच जाते.... बाकी फ्रेंड्स येणार असतात..... लग्नाला जाते लग्न मस्त एन्जॉय करून, ती घरी परत येत असताना बसमध्ये एका टोळीचं संभाषण ऐकू येतं.....
टोळी प्रमुख : "अरे त्या रामचा कसा पत्ता काटला आपण..... साला बहीण म्हणायचा तिला.... वाचलीच ती नाहीतर किती किंमत होती तिची मार्केट गरम केलं असतं तीन..... छ्या..... मायला त्याचा जीव घेऊन ही हाती लागली नाही.....😠"
मालती स्कार्फ बांधून असल्याने, त्यांना ती ओळखू आली नाही..... पण, तिने त्या लोकांना ओळखलं होतं..... एकदा तोच व्यक्ती तिला राम सोबत वाद घालताना दिसला होता..... पण, नेमकी काय भानगड म्हणून ती आता त्यांच्या गोष्टी ऐकू लागली.....
टोळी सदस्य : "बॉस राम तर इथे एकटाच होता आणि तो वॉच मेन मग ती त्याची बहीण कशी झाली....🙄"
टोळी प्रमुख : "अरे गावाकड त्याची फॅमिली होती म्हणे... त्याचे आई - बाबा गेल्यानंतर त्यानं त्याच्या बहिणीला वाढवलं नंतर लग्न लावून दिलं.... पण, नवरा चांगला मिळाला नाही, त्यानं तिचा सौदा केला.... नंतर राम त्याचा मर्डर करून माझ्या संपर्कात आला.... तेव्हा मी त्याला माझ्या टीमचा मेंबर होण्याचं सांगितलं पण, त्याने एक ऐकलं नाही.... आणि बोलला की, त्याला काही काम मिळवून देऊ..... मग आपण त्याला इथल्या सोसायटीमध्ये घेऊन आलो.... सोसायटीमध्ये यासाठी कारण, तिथली ती मुलगी तिच्यावर आपली नजर होती ना.... पण, तो साला तिला बहीण मानून बसेल अस वाटल नव्हतं..... पूर्ण प्लॅन ची आई घातली त्यानं..... मग काय त्याला संपवावा लागला ना..... केला रामनगर स्क्वाड रोड वर गेम त्याचा..... आणि आता काय ती कुठ दिसतच नाय म्हटल्यावर नुसतीच बोंब..... कोणी जर तिला लग्नासाठी होकार दिला तर एक्सिडेंट होतो ऐकायला आलंय कानावर... या भानगडीत नको पडायला म्हणून आपण दूरच राहायचं आता...... चला आपला स्टॉप आला उतरा.....🥴"
ती टोळी उतरताना बघून, मालती सुद्धा त्याच स्टॉप वर उतरते.... ती तोंडाला स्कार्फ बांधून असल्याने त्यांना ती कोण हे समजत नाही......
टोळी सदस्य : "भाई तिकडे बघा नवीन माल येतोय......😁"
टोळी प्रमुख : "चला आपली सोय झाली म्हणायची.....😁"
ते लोकं आपल्याकडेच येताना बघून ती घाबरते...... त्यातला एक तिला हात लावणार की, त्याच्या पाठीत मोठ्याने रॉड मारल्याचा आवाज होतो आणि तो जागीच कोसळतो..... मालती दोन्ही हात तिच्या कानावर ठेऊन, डोळे बंद करते..... थोड्या वेळाने डोळे उघडून बघते..... समोरच दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते..... समोर त्या टोळीचा प्रत्येक जण विव्हळत पडला असतो आणि त्यांच्या पुढे राम बसून हसत असतो..... ती घाबरत पळत सुटते..... काही अंतरावर जाऊन मागे वळते..... राम नेहमीप्राणेच हात हवेत भिरकवत उभा असलेला बघून ती परत वेगाने पळत सुटते......
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून टोळीने सांगितल्या प्रमाणे ज्या पत्त्यावर त्यांनी रामचा जीव घेतला होता तिथल्या सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये जाऊन माहिती काढते पण, तिला काहीच हाती लागत नाही.... शेवटी हार मानून ती परतणार की, तिला एक छोटं क्लिनिक दिसतं.... तिच्या मनात भीती असते पण, हिम्मत करून ती जाते आणि विचारणा केली असता तिला जे काही सत्य माहीत होतं त्याने तिच्या मनात राम विषयी आदर निर्माण होतो पण, तो कायद्याने गुन्हेगार असल्याची खंत ही तिच्या मनात असते.....
त्या क्लिनिकचे जे डॉक्टर असतात ते मालतीला चांगल्याने ओळखत असतात.... कारण, रामने तिचा फोटो त्यांना दाखवला असतो...... ते सांगतात.....
डॉक्टर : "मालती बेटा रामचं जीव तुझ्यात होतं..... त्याने एक बहिण गमावली होती..... आणि इथ आल्या पासून तुझ्यात तो त्याची बहीण शोधायचा..... त्यामुळे तुला विकणाऱ्या लोकांना त्याने प्रतिकार केला आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकला...... तुझं लग्न त्याला होऊ द्यायचं नव्हतं कारण, तो समजायचा की, त्याच्या बहिणीसोबत जे काही घडलं ते तुझ्या बाबतीत घडू नये.... म्हणून तो येणाऱ्या स्थळांच्या मागावर जाऊन, त्यांना अपघात घडवून ताकीद द्यायचा...... त्याने निवडलेला मार्ग हा चुकीचा होता..... म्हणून आता तो भटकतो आहे.... तुझ्यासारख्या आणि त्याच्या सख्ख्या बहिणीसारख्या किती तरी मुलींचं जीवन धोक्यात येण्यापासून वाचवतो आहे.... बेटा यानंतर तो तुझ्या पाठीशी असेल.... तुला कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेईल.... मी त्याला समजावलं आहे यानंतर तो तुझ्या साठी येणाऱ्या स्थळांना त्रास देणार नाही.... उलट माझा एक पुतण्या साठी त्याला सांगितल तो डॉक्टर आहे....... उद्याच घरी घेऊन येतोय....... आणि बाळा मालती कसं असतं कोणी जास्तच प्रेम करणाऱ्या वस्तूला ज्या कारणाने गमावतो नेहमी त्याच्या मनात त्या कारणाची चीड इतकं घर करून बसते की, त्याला काय चूक काय बरोबर हे समजणे अशक्य होऊन बसते आणि नंतर मग असेच काहीसे गुन्हे घडतात.....😣😣"
मालती सगळं ऐकून सुन्न होते..... तिच्या डोळ्यात अश्रू आणि डोक्यात विचार धिंगाणा घालत असतात..... ती डॉक्टरांचा निरोप घेऊन जायला निघते ते सुद्धा तिला थांबवत नाहीत....... मालती रस्त्याने आपल्याच धुंदीत जात असता, तिला रस्त्याच्या कडेला एक हात हवेत भिरकवताना राम दूर उभा दिसतो...... आज ती त्या नजरेला - नजर भिडवत स्वतःचा हात ही हवेत भिरकावते....... आणि तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं.....
मालती : "का???? का केलंस दादा असं...??"
समाप्त....🙏