One more secret ... - Part 5 - (End) in Marathi Horror Stories by Nikhil Deore books and stories PDF | एक रहस्य आणखी... - भाग 5 - (शेवट )

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

एक रहस्य आणखी... - भाग 5 - (शेवट )

एक रहस्य आणखी..... भाग 5 (शेवट )


भाग 4 वरून पुढे


" माफ कर रोहन पण यापुढे मी तुझी मदत नाही करू शकणार " रुद्रदमण म्हणाला.
"पण का? काय कारण आहे? " रोहनच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह होत
" सध्या तरी मला तुम्हाला काहीही सांगायची मनस्थिती नाही . तुम्ही सर्व जाऊ शकता " रुद्रदमण म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सर्वजण रोहनच्या घरी विचारविनिमय करायला जमतात. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीचे मेघ जमले होते आणि "रुद्रदमणला नक्की झालंय तरी काय? " हा एकच प्रश्न सर्वांच्या तोंडात रेंगाळत होता. रोहन रुद्रदमणला फोन करून शेवटचं भेटायला त्याच्या घरी बोलावतो.रुद्रदमण नुकतीच पूजा करून त्याच्या घरी आला होता. त्यांच्या बॅगेत ठेवलेल पूजेच सामान सगळ्यांच्या नजरेस पडत होत.
"रुद्रदमनजी आपणास नक्की झालंय तरी काय आणि काय आहे माझ्या मागच्या जन्मातल सत्य?" रोहन केविलवाण्या स्वरात विचारू लागतो.
" सांगतो... सर्व सांगतो.... " रुद्रदमण म्हणाला.
सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. मागचा जन्म ही संज्ञा आजपर्यंत फक्त पुस्तकात वाचली होती, चित्रपटात बघितली होती पण आज प्रत्यक्षात मागच्या जन्मातला रोहनचा इतिहास ऐकण्यासाठी त्यांचे कान मोरप्रतीक्षा करीत होते.
" आधी तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते नीटपणे ऐकून घ्या " रुद्रदमन म्हणाला.
" काही गोष्टी मला तुझ्या शरीरात माझी विश्वशक्ती प्रवेश करण्याआधी कळल्याच नव्हत्या.मला सर्वजण तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दया. जेव्हा तुम्ही मंदिर. मस्जिद , चर्च, बौध्द विहार, गिरिजाघर येथे जाता तेव्हा तुम्हाला अतिशय प्रफुल्लित का वाटत? "
" कारण आपण तेथे परमेश्वराच्या सानिगध्यात असतो" रेवती म्हणाली.
" एकदम बरोबर पण सखोल असं उत्तर नाही. मुळात हे जग संपूर्णपणे सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींनी बनलेलं आहे. मंदिर, मस्जिद, विहार, चर्च हे सर्व ऊर्जागृहे आहेत. जेव्हा तुम्ही या सर्व प्रार्थनास्थळी जाता तेव्हा ही ऊर्जागृहे तुमच्याशी निगडित सर्व सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतात आणि तुमचा सकारात्मक आभामंडल मजबूत बनवतात ".
" आभामंडल म्हणजे नक्की काय हो? " अमितने कुतूहलाने विचारले.
" आभामंडल ज्याला इंग्लिश मध्ये औरा (Aura) म्हणतात. या धरातलावर सर्वच गोष्टीच आभामंडल असतं मग ते सजीव असो कि निर्जीव. माणसाच्या आभामंडलाची सकारात्मक आणि नकारात्मक अशी विभागणी झालेली आहे. माणूस जेव्हा सकारात्मक विचार करतो तेव्हा त्याच सकारात्मक आभामंडल मजबूत बनत.

जसे सकारात्मक ऊर्जागृहे आहे तसेच नकारात्मक ऊर्जास्थळेही आहेत.जेव्हा कुठल्याही व्यक्तीचा इतिहास जर काळ्या शक्तीशी निगडित असला तर हे नकारात्मक ऊर्जास्थळे त्या काळ्या शक्तीला परत आकर्षित करतात. माझ्या विश्वशक्तीने जेव्हा तूझ्या शरीरात प्रवेश केला तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. रोहन मी तुला आधी म्हटले होते कि तुझ्यावर त्या दगडाजवळल्या नकारात्मक शक्तीने काहीही प्रभाव केला नाही.... हेही खरे आहे पण त्या नकारात्मक शक्तीने अप्रत्यक्षपणे खूप मोठा परिणाम तुझ्यावर केला होता. या ब्रह्माण्डाचा एक खूप मोठा नियम आहे. सकारात्मक ऊर्जा सकारत्मक उर्जेला आकर्षित करतात तर नकारात्मक ऊर्जा प्रचंड मोठ्या नकारात्मक उर्जेला आकर्षित करतात. इंग्लिशमध्ये एक खूप छान quotes आहे अर्थातच तुमची इंग्लिश एवढी चांगली नसेलच. सर्वांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य खुलत म्हणून मी तुम्हाला मराठीत सांगतो सकारात्मक शक्ती सकारात्मक परिणामाला जन्म देतात तर नकारात्मक शक्ती नकारात्मक परिणामाला जन्म देतात ( positive things gives u positive outcomes while negative things gives u negative outcomes ). रोहन ज्यावेळेस तु तो दगड हलविलास ना त्या वेळेस तिथल्या नकारात्मक शक्तींनी तुझ्या सकारात्मक आभामंडलाचे वर्तुळ नगण्य केले आणि तुझ्याशी निगडित सर्व नकारात्मक शक्तीला आकर्षित केल. इतिहास रचल्या गेला दोन नकारात्मक शक्तीचा टकराव झाला होता. तुझ्या मागच्या जन्मातील आणि या जन्मातील त्यामुळे आव्हान झालं होत आता सर्वोच्च नकारात्मक शक्तीला.... ती नकारात्मक शक्ती होती तुझ्या मागच्या जन्मातील... नकारात्मक शक्ती... छे ! नकारात्मक शक्ती नाही दृष्ट काळी नकारात्मक शक्ती...
सज्ज झाली होती रखमा आपले विध्ववसंक काळे पाऊल तुझ्या आयुष्यात ठेवायला कारण काळी शक्ती कितीही शक्तिशाली असली तरीही मागचा जन्म भेदून या जन्मात प्रवेश करण्यासाठी कुठलं ना कुठलं माध्यम हवं असतं आणि ते माध्यम उपलब्ध करून दिल त्या दगडाजवळ असणाऱ्या नकारात्मक शक्तींनी म्हणजेच दृष्ट काळ्या आत्म्यानी. "
ह्या सर्व गोष्टी त्यांच्या विचारकक्षेच्या आणि समजण्याच्या पल्याड होत्या. सर्वजण एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले होते. प्रत्येकाच्या शरीरावरच केसन केस ताठरल होत. रेवतीच शरीर थंड पडलं होत तिला थंडी वाजत होती. काय सुरु आहे हे तिला कळतंच नव्हतं.
" बर मग ही रखमा कोण आहे? " रोहन कुतूहलाने विचारतो.
"जेव्हा माझी विश्वशक्ती तुझ्या या जन्माला भेदून मागच्या जन्मात गेली तेव्हा तुमचे नाव काय, गाव काय ह्या गोष्टीत मी वेळ न दवडता सरळ त्या काळ्या शक्तीचा वेध घेतला तेव्हा सर्व चित्र स्पष्ट झालं. मागच्या जन्मात तु कुठल्यातरी एका गावात लोहार होतास. लोहार काम करून तुम्ही हातावर आपले पोट भरत होते. मागच्या जन्मात रेवती आणि तुझे नुकतेच लग्न झाले होते आणि तुमच्या संसाररूपाची हिरवळ सर्वत्र पसरली होती..... तुमचे एकमेकांवर अपार असलेले प्रेम म्हणजे त्याला लागलेली कोमल पुष्पे. हे सर्व तोपर्यंतच ठीक होते जोपर्यंत रखमाचे पाऊल त्या गावात पडले नाही...... रखमा.......... गावागावात हिंडून मिळेल ते काम करून आपल्या दोन वेळेसची सोय करणारी 24 वर्षाची तरुणी. रखमाणे त्या गावात आपले पाऊल ठेवले होते. प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन काही काम मिळेल का? अशी विचारणा करून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत होती. गावातल्या लोकांच्या वासनागंध नजरा तिच्यावर पडल्या होत्या. केवळ मानवदया म्हणून रेवतीने तिला तिची पूर्णतः उपजीविकेची सोय होईपर्यंत आपल्या घरी जागा दिली. रखमाही आता तुमच्यात पूर्णपणे मिसळली होती. ती घरातील सर्व कामे आनंदाने करीत होती. कालचक्र फिरले " मनाला आवर घालणे हे सर्वात कठीण काम आहे " असे कुणीतरी म्हटलेच आहे त्याचप्रमाणे रखमाच मनही आता बदलू लागलं होत. रोहनच्या शरीरसृष्टीवर आणि चांगुलपणावर ती भाळली होती. रोहणसोबत लग्न करून सांसारिक जीवन जगण्याचे ती मनोरे मनात रचत होती. काळ समोर सरकत होता तसा रखमाने रोहनचा मानसिक छळ सुरु केला. रोहनने आपल्यासोबत लग्न करून संसाराची नवी सुरवात करावी म्हणून रखमा आता रोहनला मानसिक त्रास देत होती. या मानसिक त्रासातून रोहनच्या मनात काही विकृती निर्माण झाली. त्याने क्रूर पद्धतीने रखमाचा खून घडवून आणला पण मरतांनी रखमाणे प्रण घेतला कि मेल्यावरही ती तुम्हाला एक होऊ देणार नाही आणि फक्त याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात ती तिचा बदला घेण्यासाठी परत येईल. तिच्या वचनाप्रमाणेच तिने ते पूर्णही केल. काही दिवसातच तिने तुझी आणि रेवतीची जीवनरेषा समाप्त केली.

इतिहासाची पुनरावृत्ती झाली... या जन्मातही तुम्ही एकत्र आलात आणि तो दगड हलवून तु तुझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक केली केली आहे कारण तिथल्या दृष्ट आत्म्यांनी रखमाला आकर्षित करून तिला आव्हान केल ज्यामुळे तु आता हे सर्व काही भोगतोय. "
काही काळ त्या खोलीत भयाण शांतता पसरली होती.
" मग तुम्ही आम्हांला मदत का नाही करू शकत? " रेवतीने विचारले.
" मुळात माझे कार्य सत्याची बाजू घेऊन लढणे ही आहे. कुठल्याही क्रूरकर्मी कृत्याला मी मदत करत नाही. मागच्या जन्मात रोहननी अतिशय क्रूरपणे तिच्या शरीराचे तुकडे - तुकडे करून तिची हत्त्या केली होती. अश्या क्रूरकर्मी व्यक्तीला मी मदत करू शकत नाही ".
" मागच्या जन्मात मुळात काय झाले हे तर मला माहित नाही पण एकंदरीत मला असे वाटते कि ती माझी प्रतिक्रिया होती रखमाने मला मानसिक त्रास दिल्याबद्दलची " इतका वेळ शांत असलेला रोहन प्रतिउत्तर देतो.
" ते काहीही असो पण तिने कधीच तुला शारीरिक इजा पोहचविली नाही आणि तु निर्घृणपणे तिची हत्त्या केलीस हे माझ्या मनाला पटत नाही. "मुळात रोहणही तितकाच अपराधी आहे हे पटवून देण रुद्रदमनचा मूळ उद्देश होता".
" पण त्याची शिक्षाही तिने मला मागच्याच जन्मात केली आहे माझे प्राण घेऊन. याही जन्मात तिने माझी जीवनरेखा संपवावी हे कुठले सत्य आहे? " रोहन म्हणाला.
" माझ्या मनाला हे अजूनही न पटण्यासारखा आहे. मी अजूनही असहामताशी सहमत आहे". कुणाची निर्घृणपणे हत्त्या करण पाप आहे हा संदेश त्याला द्यायचा होता आणि तुही असत्याचा (पापाच्या ) बाजूला उभा ठाकला आहे हे त्याला दर्शवायचे होते म्हणून तो आपल्या शब्दावर अडून बसला होता.

रेवतीच्या तोंडातून एक घोगरा आवाज बाहेर पडला "होय यांनीच मला मारलं आहे " आणि अतिशय कर्कश्य आवाजात ओरडण्यास सुरवात केली. ती इतक्या जोरात ओरडते कि सर्वांच्या कानठळ्या बसायला लागतात. तिच्या कर्कश्य आवाजामुळे रोहनच्या घरी लावलेल्या काचा ताडकन फुटतात. रेवती आता ओरडण थांबवते आणि अतिशय भेसूर घोगऱ्या आवाजात रडायला सुरवात करते. तिचा तो रडण्याचा आवाज ऐकून सर्वांच्या हृदयाचा थरकाप उडतो..... काही काळ तरी सर्वांचा देह थरारतो.
रुद्रदमन अतिशय जलदपणे त्यांच्या बॅगमध्ये असलेली अभिमंत्रित राख तिच्यावर फेकतो. शरीरावर कुणीतरी ऍसिड फेकल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना रेवतीला झाल्या ती जोरजोरात ओरडत होती आणि भोवळ येऊन खाली पडली.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी रुद्रदमने सर्वांना त्यांच्या घरी बोलावले. या समस्येतून सुटण्यासाठी काही उपाययोजना तो सांगणार होता. सर्वजण रुद्रदमनच्या घरी जमा झाले. रुद्रदमने सर्वांना प्यायला थंडगार शरबत दिले. शरबत पिल्या पिल्याच रेवतीची शुद्ध हरपली. सर्वांच्या कपाळावर आठ्या जमल्या होत्या.
" मीच तिच्या सरबत मध्ये गुंगीचे औषधं टाकून तिला बेशुद्ध केलंय. मुळात शरीर आणि आत्मा यांचा समन्वय खूप महत्वाचा असतो. ज्यावेळी माणसाचं शरीर कमजोर होत तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या आत्म्यावर देखील होतो ते ही थोडंफार कमजोर होत"रुद्रदमण म्हणाला.
" मग पुढची योजना तरी काय आहे? " रोहन म्हणाला.
" मंत्रविधी.... जेव्हा कुठलीही दृष्ट आत्मा कुणाच्याही शरीरात प्रवेश करते तेव्हा तिला शरीरातून बाहेर काढण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रथमदर्शी उपाय म्हणजे मंत्रविधी. मंत्राचा अचूक मारा तिला शरीर सोडून जाण्यास भाग पाडतो. ही मंत्रविधी तिथेच करू जेथून या सर्वांची सुरवात झाली...... रेवणगढ आरक्षित जंगल तिथेही काही कमजोर दृष्ट काळी शक्ती आहे त्याचाही नायनाट मंत्रशक्ती करेल".

रोहन आपल्या कारमधून सर्वांना रेवणगढ आरक्षित जंगलातील त्या दगडाजवळ घेऊन जातो. सायंकाळचे 7 वाजले होते. सर्वत्र भयाण करणारी शांतता पसरली होती. आपल्या मंत्रांच्या शक्तीने रुद्रदमणने कोणालाही न दिसणार शक्तिवर्धक शक्तिवर्तुळ निर्माण केल ज्यामुळे रेवतीच्या शरीरात असलेली रखमा ते जंगल पार करून कोठेही जाऊ शकणार नाही. अभिमंत्रित राखेने एक वर्तुळ स्वरक्षणासाठी आखलं. ज्यामुळे रखमा त्यांना कोणतीही इजा पोहचवू शकणार नाही. त्या वर्तुळाच्या आत एक यज्ञ तयार केला. आवश्यक असलेली सर्व सामग्री गुलाबी पुष्पे, आठ प्रकारची धान्ये, तूप, हळदी -कुंकू, शेंदूर, पवित्र जल, अभिमंत्रित राख हे सर्व साहित्य रुद्रदमनने बाहेर काढले व्यवस्थितपणे त्याची मांडणी केली. आपल्या बॅगेतून चाकू काढून त्याने निंबू कापली आणि यज्ञाच्या आजूबाजूला ठेवली सर्वजण त्या राखेच्या वर्तुळाच्या आत बसली होती.
रुद्रदमनने काही सूचना देण्यास सुरवात केली.
" मंत्रविधी संपूर्णपणे पार पडायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा या संपूर्ण प्रक्रियेत कोणीही आपले डोळे उघडू नका तसें कराल तर तुम्हाला विचित्र भास होईल सोबतच एक खबरदारी घ्या काहीही झालं तरी हे राखेचे वर्तुळ ओलांडू नका. या राखेच्या वर्तुळात तुम्ही सर्व सुरक्षित आहात पण जर वर्तुळ ओलांडाल तर तुमच्या जीवाचं काय होईल हे मी काही सांगू शकणार नाही . मंत्रविधी पूर्ण करताना मंत्रशक्ती सोबत तुमची स्वशक्तीही एकवटलेली असतें म्हणून जर कुणीही राखेच वर्तुळ ओलांडाल तर मंत्रविधी अपूर्णच राहील.

मंत्रविधीला प्रारंभ होतो. रेवती राखेच्या वर्तुळाच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत होती. जसजसा....... मंत्राचा जोर वाढत जातो तशी रेवती शुद्धीवर येते आणि वेदनेने जोरजोरात ओरडू लागते. मंत्रविधी समोर जात होता. राखेच्या वर्तुळाच्या आत बसलेल्या (रोहन, अमित, आरती ) सर्वांनाच विचित्र भास होत होते . कुणीतरी प्रचंड मोठ झाड उपटून आपल्यावर टाकत आहे असा भास अमितला झाला म्हणून त्याने नकळतपणे डोळे उघडले. पाहतो तर काय तिथे कोणीही नव्हते फक्त मंत्राचा आवाज त्याला येत होता. समोरच रेवती बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक असुरी हास्य होत. तिला पाहताच अमित अतिशय घाबरला. खरं तर त्याला भास झाला होता तिथे कुणीही नसल्याचा आणि या भासामुळे जिवाच्या आकांताने तो पळू लागला..... पळता पळता त्याने अभिमंत्रित राखेच वर्तुळही ओलांडल होत आणि एक धोका आणखी वाढवला होता.....अमित पळून एका भल्यामोठ्या
वृक्षाजवळ थांबला होता. त्याचा श्वास भरून आला होता..... पोटही दुखू लागलं होत. जंगलात रातकिडे किर... किर... आवाज करीत होते. समोर असलेल्या घुबडाचे दोन डोळे त्याच्याकडे कटाक्ष टाकत होते ज्यामुळे तो आणखीनच भयभीत झाला होता. कुणीतरी झाडाला लटकून त्याला बघत आहे असे त्याला वाटले. भीतभीतच त्याने मागे पहिले आणि सुटकेचा श्वास टाकला कारण तिथे कोणीही नव्हते. परत त्याला तसाच भास झाला त्याने पटकन मागे पहिले. त्यांच्या हृदयाची स्पंदने प्रचंड वेगाने धडधडत होती. झाडाला रेवती उलटी लटकली होती तिचा चेहरा अतिशय पांढरा आणि कोरडा झाला होता. तोंडाला सर्वत्र रक्त लागले होते जणू आत्ताच एखाद्या रानटी प्राण्याचे अतिशय क्रूरपणे भक्षण केले.. नखावर मासाचा खच चिकटला होता.... केस कुर्तडल्यासारखे दिसत होते. तिची क्रूर नजर आणि राक्षसी हास्यामुळे अमितच शरीर भीतीमुळे थंडगार पडलं होत. त्यांच्या कपाळावरून घामाचे थेंब टपकू लागले होते. त्याने क्षणार्धांतच समोर पहिले आणि शरीरातील सर्व शक्ती एकवटून धावण्यास सुरवात करणार इतक्यात कुणीतरी पाय धरून अतिशय क्रूरपणे त्याला फरपटण्यास सुरवात केली. एक जोरदार हिसडा देऊन त्याला जमिनीवर आदळले त्यांच्या छातीवर बसून रेवतीने त्याला आपल्या धारदार नखांनी ओरबडण्यास सुरवात केली. त्याचा पूर्ण चेहरा तिने ओरबडून काढला. त्यांच्या केसाला धरून 5 फूट हवेत उचलले आणि समोर बाभळीच्या झाडावर भिरकावून लावले .बाभळीच्या काट्यानि त्यांच्या संपूर्ण शरीराचा वेध घेतला. त्या रुतणाऱ्या काट्यामुळे तो अर्धमेला झाला.

" रोहन मंत्रशक्तीने इथे असलेल्या कमजोर दृष्ट आत्म्याला मी नष्ट केलंय पण अमितने वर्तुळ ओलांडल्यामुळे रखमा अजूनही रेवतीच्या शरीरातच आहे. आता जर तिला नष्ट करायचे असेल तर हा अभिमंत्रित धागा तिच्या हाताला बांधावा लागेल हा अभिमंत्रित धागा तिला सुरक्षा कवच प्रदान करेल ज्यामुळे रखमाला तिचे शरीर सोडणे भाग पडेल. ती तुला प्रचंड त्रास देईल पण हे कार्य तुला करावेच लागेल. रोहनने तो अभिमंत्रित धागा घेऊन रेवतीचा पाठलाग करायला सुरवात केली. ती मोठं मोठाले दगड त्याच्याकडे भिरकावून लावत होती... तर कधी अणकुचीदार काठ्यांनी त्याला इजा पोहचवीत होती. रोहनला तिने अणकुचीदार काठ्यांनी जागोजागी जखमा केल्या होत्या. शेवटी रोहनने तिला घट्ट पकडले आणि तिच्या मनगटावर तो अभिमंत्रित धागा बांधला. रेवती क्षणभर स्तब्ध झाली होती.... तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मंत्रनाद करत असलेला रुद्रदामनही शांत झाला होता.

" आता ईथून रखमाने प्रस्थान केले आहे " रुद्रदमण म्हणाला.
रोहन, रेवती, आरती आनंद साजरा करीत होते. हुर्रे...... हुर्रे म्हणून त्यांनी ओरडण्यास सुरवात केली होती. बाजूलाच असलेल्या सिमेंटच्या बेंचला ते जोरजोरात ठोकून ओरडत होते.

रुद्रदमन अर्धमेला झालेल्या अमितजवळ पोहचला. त्यावर पवित्र जल शिंपडून त्याला जागी केलं. त्याचा त्रासही आता कमी झाला होता. सर्वजण मनात विजयाचे मनोरे रचत होते. रुद्रदमन आणि अमित जवळच असलेल्या वडाच्या ओट्याखाली बसले होते. रुद्रदमनच्या चेहऱ्यावर संतुष्टी होती.

कुठल्यातरी शंकेची पाल त्यांच्या मनात चुणचुणली. वातावरणात अचानक बदल झाला होता. आकाशात काळे पयोधर जमा झाले होते....... सुसाट वारा सुटला होता ..... जंगलातील झाडाच्या फ़ांद्या ऐकमेकाला घासू लागल्या होत्या.... वीजही प्रचंड प्रकाशझोत धरतीवर फेकत होती.
" एवढ्या लवकर तुला सोडणार नाही " रेवतीच्या तोंडून एक भेसूर घोगरा आवाज बाहेर पडला. रुद्रदमनची नजर तिच्या मनगटावरील अभिमंत्रित धाग्यावर गेली. रोहनने अतिशय घाईत तो धागा बांधल्यामुळे आणि आनंदोत्सव साजरा करण्याच्या उत्साहात तो धागा सुटुन खाली पडला होता. अमितनेही एक धोका आणखी वाढवला होता.... तो म्हणजे तिथे असणारा चाकू ज्याने रुद्रदमनने लिंबू कापली होती. अमितने अभिमंत्रित वर्तुळ ओलांडतांना तो चाकूही वर्तुळाच्या बाहेर नकळतपणे भिरकावला होता.
रेवतीने तो चाकू हातात घेतला होता. रुद्रदमन यज्ञाच्या दूर असल्यामुळे त्याच्याजवळ असलेल शक्तिवर्धक पवित्र जल आणि अभिमंत्रित राख यज्ञाजवळच होती. काय करूण रखमाला रोकावे हे रूद्रदमनला समजतच नव्हते .
आता रेवती रक्ताळल्या डोळ्यांनी रोहनच्या समोर येत होती.... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता..... वाऱ्याचा सन... सन आवाजही त्याला स्पष्ट ऐकू येत होता जणू तो ही काही सांगत आहे असेच भासत होते. मृत्यू त्यांच्या काही पावलांवरच येऊन ठेपला आहे हे त्याला कळून चुकले होते. अचानक रेड्याचा कर्कश आवाज त्यांच्या कानी पडला जणू काही यमराज अगदी जवळ आले आहे असे त्याला वाटू लागले. रेवती अगदी दोन पावलांवरच येऊन उभी राहिली होती. विजेसारखा धारदार चाकू त्याला मारण्यासाठी वर उचलला गेला... रोहनने डोळे मिटून " देवा या संकातूनही वाचव रे " म्हणून देवाचा धावा सुरु केला आणि क्षणार्धातच मागील काही महिन्याचा प्रत्येक क्षण त्यांच्या नजरेखालून गेला. रेवतीच्या हातातील चाकूही अगदी शरीराजवळ येऊन पोहचला होता. जणू तो ही रोहनची जीवनरेषा संपवण्यासाठी आसुसला होता.
रुद्रदमनचा चेहरा रागाने लाल झाला होता. विजेच्या प्रकाशझोतात त्याचा चेहरा अधिकच भेदक दिसत होता जणू त्यानेही त्यांच्या नावाप्रमांणे रुद्र रूप धारण केले होते.
" आता माझ्या संयमाचा बांध संपलाय. आता माझ्या शेवटच्या वाराला तयार रहा " ही गर्जना रूद्रदमनच्या तोंडून बाहेर पडली.
ही गर्जना ऐकून रोहनचे डोळे उघडले. दुरून रुद्रदमने त्यांच्या बोटात असलेली त्रिशूल अंगठी रेवतीच्या दिशेने फेकली होती. त्या अंगठीने आता तांबूस रंग धारण करून प्रकाशमय झाली होती. कुठलतरी भव्य दिव्यास्त्र रेवतीकडे येत आहे हा नेत्रदीपक क्षण रोहन बघत होता. इकडे रेवतीच्या हातातील चाकूही विजेच्या वेगाने अंतर कापून अगदी जवळ येऊन पोहचला होता.... 10cm....9cm.....8......7.....6....5
त्या दिव्यास्त्र त्रिशूल अंगठीचा स्पर्श रेवतीच्या हाताला प्रचंडपणे झाला. ती टक्कर एवढी भीषण होती कि रेवती अक्षरक्ष जमिनीवर कोसळली. तिच्या शरीरातील पांढऱ्या आकृतीने कर्कश्य आवाज करून आकाशात जाण्यास प्रारंभ केला. ती पांढरी आकृती निळसर प्रकाशात रूपांतरित होऊन आकाशात कुठेतरी अदृश्य झाली होती.

सर्वजण शांत झाली होती. आधीच आनंद साजरा केल्यामुळे आता त्यांच परत आनंद साजरा करण्यासाठी मन धजावत नव्हतं.
" आता रखमाच अस्तित्व संपलय. इतका वेळ कुठलेही खग इथे दिसत नव्हती पण आता बघा पक्षाचा सुमधुर आवाज कानी पडत आहे " रुद्रदमन म्हणाला.
" मला एक प्रश्न पडलाय? " रोहन म्हणाला.
" कोणता "
"जर ही अंगठी इतकी शक्तिशाली होती तर आधीच याचा वापर आपण का नाही केला? "
रुद्रदमनच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं " अध्यात्मात प्रत्येक शक्तीला काही सीमा असतात. ज्याप्रमाणे कर्णाला इंद्राने दिलेलं विध्वंसक अस्त्र तो एकदाच चालवू शकत होता त्याचप्रमाणे माझ्या शक्तिवर्धक त्रिशूल अंगठीला काही मर्यादा आहे. प्रत्येक परिस्थितीत मी ही अंगठी वापरू नाही शकत" सर्वजण आता आनंदाने घरी जाण्यास निघाले होते. एका दृष्ट काळ्या शक्तीशी सामना करता करता रुद्रदमनही नाकी नऊ आला होता पण शेवटी तो विजयी झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
पण हा आनंद जास्त काळ टिकणार नव्हता कारण त्यांच्या जीवनात काही न सुटलेली कोडी......... त्यांच्या बालपणात गाडलं गेलेलं एक काळ वादळ लवकरच त्याच्या साठीच परतणार होत.

आगामी कथेत त्याच्या बालपणाचा उलगगडा होईल
समाप्त

- निखिल देवरे

आपण जर ही कथा वाचत असाल तर उत्तमच पण ही कथा कशी वाटली याचा अभिप्राय दिल्यास दुधात साखर
🙏 कृपया आपल्याला ही कथा वाटली हे अभिप्रायाने कळवा. 🙏