She __ and __ he - 31 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 31

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

ती__आणि__तो... - 31

भाग__३१


रणजीत आणि राधा मागे बसतात...........रणजीत तिच्यावर खुप चिडला होता म्हणून तो खिडकीबाहेर डोक घालून बसतो...........राधाला गाढ़ झोप लागते.........तस ती रणजीतच्या खांद्यावर डोक ठेवून झोपते........रणजीत घरी सगळ्यांना फोन करून सांगतो तस सगळे निश्चिंत होतात........रणजीत तिच्याकड़े एकटक बघत होता........अगदी लहान मुलासारखी ती झोपली होती........काहीवेलाने दोघा घरी पोहोचतात........राधा गाढ़ झोपली होती रणजीत तिला उठवत होता तरी तिला जाग येत नव्हती......



रणजीत: राधा.....


राधा: (शांतच)


रणजीत: राधाssssssss....


राधा: अम्म्म गप रे..झोपु दे मला...निघ तू भाडया..(झोपेत)


रणजीत: क़ाय ही पोरगी आहे,झोप लागली की कोन बोलवतय भान ही नसत हिला..क़ाय पण बोलते ही....मग तर हिला उठवायला आई आणि काकूला पाठवायलाच नको.....चल रणजीत घे उचलून तिला.....हहहह


रणजीत राधाला उचलून घेतो.......ती लागेच त्याच्या खांद्यावर हात टाकून त्यांला चिपकते....


रणजीत: (मनात).........किती गोड़ दिसतेय ना राधा....भड़कते तेव्हा तर चंद्रमुखीच दिसते😂....😍उफ्फ यार हिचा तीळ ना मला वेड लावतो....अस वाटत माझ्या ओठांनी हिच्या तीळावर किस कराव......ह्म्म्म कंट्रोल रणजीत.....कंट्रोल....


रणजीत तिला बेडवर झोपवतो..........तिचे कपड़े खुप खराब झालेले होते.........घरातील सगळे झोपले होते आता रणजीतला क़ाय कराव सूचत नव्हतं......


रणजीत: आता क़ाय करू....मी हिचे कपड़े चेंज करू शकत नाही,आता हिलाच उठवतो.....


रणजीत जार मधला थोड़ पाणी राधावर टाकतों तस ती पटकन उठते........


राधा: आआआआ त्सुनामी...त्सुनामी.....


रणजीत: अग ए अजुन तरी त्सुनामी नाही आली...😂मी पाणी टाकला...


राधा: का?????वेडा आहेश का तू मूर्ख😠


रणजीत: कपड़े बग तुझे....ते क़ाय मी चेंज करू का....


राधा: अ ब क करते मी...पण ही पद्धत नव्हती उठवायची😒मूर्ख....


रणजीत:😂😂😂


मग राधा फ्रेश होते........त्यानंतर रणजीत फ्रेश व्हायला जातो......


राधा: (मनात).......रणजीत,खरच तुझ्यासारखा मुलगा मी कुठेच नाही पाहिला..माझ्या मनात तुझी क़ाय जागा आहे हे तुला आता लवकरात लवकर मला सांगायचे आहे...आज तू ही कबूल केलासच...आता माझी टर्न आहे...


रणजीत शॉवर ऑन करतो आणि डोळे मिटून उभा असतो........अचानक त्यांला आठवत की तो राधाला मगाशी क़ाय बोला होता........


रणजीत: मगाशी राधाला मी माझ्या मनातल सांगितला....मलाच नाही समजल....राधाने ऐकला असेल का...क़ाय वाटल असेल तिला....असुदे ऐकला तर ऐकला तस ही मला आता लवकरच तिला माझ्या मनातल सांगायला हव....कस सांगू तेच कळत नाही आहे....


रणजीत मस्त फ्रेश होतो.........आणि बाहेर येतो राधा गाढ़ झोपली होती.........रणजीत ही मग झोपी जातो.........


★★★★★★★★★★★★★



सकाळी सगळे नाश्ता करायला जमतात........रेवा आली नव्हती म्हणून रणजीत तिला तिच्या खोलीत बोलवायला गेला होता.....


रणजीत: रेवा.....


रेवा: हा भाई..ये ना...


रणजीत: वा!! छान दिसतेस रेवु..पण इतकी नटुन चालीस कुठे...?


रेवा: क़ाय भाई...तू पण कोणत्या जगात असतोस...आता valentine week सुरु आहे ना....म्हणून आमच्या कॉलेज मध्ये काही स्पर्धा असतात रे....


रणजीत: अरे हो...मग वैलेंटाइन डे झाला का?


रेवा: नाही भाई उद्या आहे...बर चल नाश्ता करू भूक लागले...


रणजीत: ह्म्म्म.....(मनात)....वैलेंटाइनडे...यापेक्षा कोणता चांगला दिवस नसेल माझ्या मनातल राधाला सांगायला....विनयची हेल्प घेतो तो नक्की क़ाय तरी सूचवेल....आणि सोना पण आहेच की....


रेवा: भाई चल...


रणजीत: हा चल...


रेवा: अरे आई...आज रम्या वहिनी आणि राहुल दादा दिसत नाहीत...आणि राधा वहिनी????


माधवी: अग आज दोघ रुताच्या स्कुलला गेलेत मीटिंग आहे ना...आणि राधा हॉस्पिटलमध्ये गेली....


रेवा: अच्छा...


सुमन: जीत चल तू पण नाश्ता कर...


रणजीत: हो...


★★★★★★★★★★★★★★★★★


(ऑफिसमध्ये)



विनय: क़ाय जीत कसला विचार करतोयस..?


रणजीत: उद्या वैलेंटाइनडे आहे ना तर विचार करतोय राधाला माझ्या मनातल सगळ सांगाव आणि नव्याने सुरवात करावी....


विनय: ग्रेट यार!!


रणजीत: ह्म्म्म त्यासाठी तू आणि सिमी काहीतरी आयडिया दया...हेल्प करा मला...


विनय: हो नक्की...


रणजीत: थांब...(कॉल करून).....हैलो..सिमी जरा केबिन में आओ...


सिमरन: जी सर अभी आइ...


विनय: ह्म्म्म आता जरा क़ाय तरी विचार करूया...


सिमरन: (नॉक करून)......May I come in sir....


रणजीत: यस...बैठो न..


सिमरन: जी..बोलिये सर कुछ काम था?


रणजीत: हा वो कल वैलेंटाइन डे है तो राधा को में कुछ सरप्राइज दे ना चाहता हु...सो क्या तुम कुछ सजेस्ट कर सकती हो...


सिमरन: वाव सर आप कितना सोचते हो मैंम क़े बारे में..सो स्वीट...और में जरूर हेल्प करूंगी...


रणजीत: thanks...चलो अब सोचते है कुछ...


विनय: सिमी हमे आज ही सोचना है हा..वक्त बहुत कम है तो टाइमपास मत करना जरा जल्दी सोचना...


सिमरन: हा आपको बताने की जरूरत नही है,खुद जल्दी करो पहले...😒😒


विनय: हा मैं...


रणजीत: अरे अब तुम दोनों झगडा मत करो...सोचो अब...


सिमरन: ह्म्म्म...


विनय: हा...


तिघेही एक साथ: (एका सुरात).......आयडिया...😃😃


★★★★★★★★★★★★★★



रात्री बराच वेळ झाला रणजीत आजुन घरी नव्हता आला.........सगळे जेवून झोपी गेले होते,राधा आजुन जागी होती..........तिला आज रणजीतसोबत डिनर करायचा होता.........पण त्याचा आजुन पत्ता नव्हता......राधा कॉल करत होती तर त्याचा फोन आउट ऑफ कॉवरेंज दाखवत होता.......आता राधाला काळजी ही वाटत होती......रात्री १ वाजता रणजीत आला........राधा टेबलवर डोक ठेवून झोपली होती.......रणजीत आला त्याच्या हातात काहीतरी गिफ्ट होता म्हणून तो रुमकडे जायला निघतो......पण त्याच्या आवाजाने राधा उठते......तस रणजीत गोंधळतो......



राधा: रणजीत....


रणजीत: (गोंधळत)......आ आ ब क क़ाय? अरे तू अजुन जागीच....अरे तू खाली होती दिसली नाहीस....


राधा: हो मी तुझी वाट पाहत होते.....आणि अस का बोलतोयस...I mean...घाबरला आहेस तू, का???


रणजीत: छे छे मी आणि घाबरणार आहा...नाही...


राधा: ओके मग चल सोबत डिनर करू...


रणजीत: हो..मी फ़ फ़ फ्रेश होऊन येतो...


राधा: हो..पण तू लपवतोस क़ाय?? क़ाय झालय? क़ाय आहे मागे? गिफ्ट आहे का? कोनासाठी? आणि का? काही आहे का आज? मला का नाही सांगितलास? आणि क़ाय आनल आहेस ते लपवतोयस क़ाय??


रणजीत: अग...😲लगादार किती प्रश्न विचारलेस...😮ब्रेक मार जरा....आणि मी काही लपवत नाही आहे...ते असच हात मागे केलेत मी....


राधा: अच्छा...मग दाखव क़ाय आहे मागे...


रणजीत: अग ते...


रुता: (मागून येत).....आ काकू..मला वॉटल दे ना...


राधा: हा पिल्लू आले...बाळा वॉटल नाही वॉटर बोलायच.....(तिच्या जवळ जात)



रणजीत चान्स बघून तसाच पळ काढतो आणि खोलीत जातो.........खोलीत जाउन तो तिच्यासाठी आनलेला ड्रेस लपवायला जागा बघतो........पण जागा कुठे भेटतच नाही........तेवढ्यात बाहेरून राधा आवाज देत रूम जवळ येते.......रणजीत घाबरतो आणि पळा पळ करतो......राधा खोलीजवळ येते तस रणजीत ती पिशवी बास्केट मध्ये टाकतो आणि त्यावर बसतो........राधा आतमध्ये येते तर त्यांला अस बसलेला पाहून तिला आश्चर्यच वाटत....



राधा: (अवाक होऊन).......रणजीत😲😮😮हे क़ाय करतोयस....(हसत)....😂अरे बास्केट मध्ये का बसलायस.....


रणजीत: आ ते मी असच,खुप दमलोय तर म्हणून....


राधा: अरे मग बेड आहे,चेअर आहे त्यावर बस....


रणनीत: आ असुदे तुला क़ाय....मला वाटल मी बसलो....आ मस्त वाटतंय मला इकडे बसून....😒


राधा: बर पण आता जेवायला चल आणि बास्केट मधुन उठ तुटेल बास्केट तुझ्या वजनाने...मग मी कपड़े कशात जमा करणार...उठ...


रणजीत: हा तू जा मी,मी उठतो,क़ाय तुटत नाही बास्केट.....


तेवढ्यात जोरात "कडाकककक" असा आवाज येतो........तस रणजीत खाली वाकुन पाहतो बास्केटला चिर पडली होती.........त्याचा चेहरा बघून राधा जोरात हसायला लागली.........रणजीतला तर आता स्वतःची लाज वाटत होती.........😂😂(अरेरे रणजीत क़ाय केलास हे....कस वाटत ते😂😂)


रणजीत: अअअअअ हसू नको तू जा वाढ़ मी येतो....आणि देइन तुला नवीन बास्केट आणून..😒


राधा: हा😂😂😂😂.....(बाहेर जात)


रणजीत राधा गेल्यावर लगेच उठतो.......बास्केटचे काही टुकड़े त्याच्या पैंटला लागले होते ते झटकतो........मग ड्रेस निट आहे का बघतो.......आणि मग सेफ जागी ड्रेस लपवतो.......मग त्यांला मगासचा प्रसंग आठवतो.....



रणजीत: क़ाय रणजीत...दूसरी जागाच नाही भेटली क़ाय तुला....शिई क़ाय वाटल असेल राधाला....वेडा वाटलो असणार मी...😅😅आसो आता क़ाय करणार....प्यार में करना पड़ता है...प्यार में करना पड़ता है....चला रणजीत जेवायला आता क़ाय राधा आपल्यावर हसेल ते सहन कराव लागनार...हहहहहह......😂🙊



क्रमशः
(क़ाय वाटत तुम्हाला,रणजीत राधाला खुश करू शकेल का??? राधासमोर रणजीत व्यक्त होइल का??? बघुया नेक्स्ट पार्टमध्ये.....Stay tuned....आणि प्लीज कमेन्ट्स करा फ्रेंड्स.....☺️)