सौरभ भयाण वातावरणात रात्रभर रेवतीला शोधत फिरतो. तेवढ्यात सकाळ कधी होते हे त्याच त्याला ही समजत नाही. आणि अशातच बेशुद्ध आवस्थेत असलेली रेवती त्याच्या समोर येऊन पडते तीला त्या अवस्थेत बघून सौरभ खूप घाबरतो तो एकदा आपली नजर इकडे तिकडे फिरवतो पण त्याला कुणीच दिसत नाही.
सौरभ रेवतीला उठवायचा खूप प्रयत्न करतो पण रेवती शुद्धीत येत नाही शेवटी कुठे पाणी मिळत का बघावं असा विचार करून रेवतीला तीथेच एका झाडाच्या बाजूला सुरक्षित ठेऊन पाण्याच्या शोधात निघतो.
थोडं दूर गेल्यावर त्याला एक विहीर दिसते तो विहिरीतून पाणी काढतो आणि परत रेवती जवळ येतो पण तोपर्यंत रेवतीला शुद्ध आलेली असते.
तीला सौरभला बघून आश्चर्य वाटत ती सौरभला विचारते. "सौरभ तु इथे? आपण इथे काय करतोय? आपण तर तुझ्या फार्महाऊस वर होतो न." सौरभ काही क्षण तिच्याकडे बघतच राहतो आणि काही वेळाने तीला विचारतो. "तुला काहीच आठवत नाही? तु रात्रभर होतीस कुठे? मी तुला रात्रभर नुसतं शोधतोय. रात्री काय घडलं आपण इथे कसे पोहोचलो तुला काहीच आठवत नाही?" रेवती उभी राहत बोलते. "रात्री? रात्री काय घडल होत? मला तर हे ही आठवत नाही आपण इथे कसे पोहोचलो. आपण तुझ्या फार्महाऊस वर गेम खेळत होतो मला इतकंच आठवतय. सौरभ विचारातच पडतो आणि तिला परत विचारतो. "कमाल आहे रेवती रात्री आपण सगळे इथे पौर्णिमेची कबर बघायला आलो होतो. तेवढ्यात खूप जोरात वार सुटलं आणि तुला कुणी तरी अंधारात खेचून नेलं. आणि आता तू मला अशी बेशुद्ध अवस्थेत सापडली आहेस. बर सोड तु बेशुद्ध कशी झाली होतीस ते तरी तुला आठवतय का?" रेवती थोडीशी वैतागुन सांगते. "नाही... नाही सौरभ मला काहीच आठवत नाहीये खरच." विषय बदलायचा म्हणून शेवटी सौरभच म्हणतो. "बर... जाऊ दे, तु सापडलीस तेच खूप आहे मला. चल आपण रस्ता शोधुत आता." अस म्हणून सौरभ रेवतीला घेऊन निघायला लागतो. आणि दोघ रस्ता शोधू लागतात. दोघ ही गप्पा मारत चालत असतात.
काही वेळा नंतर...
सौरभला बाहेर पडण्याचा रस्ता दिसतो आणि तो आनंदून म्हणतो. "तो बघ रस्ता...चल." दोघ रस्त्याच्या कडेला येतात आणि गाडीची वाट बघू लागतात.
थोड्याच वेळात...
एक गाडी त्या रस्त्यावरून भरदाव वेगाने निघून जाते. सौरभ त्या गाडीला आवाज देतच राहातो पण गाडी थांबत नाही. अश्याच अनेक गाड्या त्या रस्त्यावरून निघून जातात पण कुणालाच दोघांचा आवाज ऐकू येत नाही. सौरभ विचारात पडतो आपला आवाज कुणालाच कसा ऐकू येत नाही. शेवटी दोघ चालत चालतच फार्महाऊसजवळ येतात आणि बघतात तर काय फार्महाऊस वर गर्दी जमलेली असते आणि त्यांचे फ्रेंड्स खूप रडत असतात दोघांना कळतच नाही हे सगळं काय चालू आहे ते.
तेवढ्यात सौरभच जमिनीकडे लक्ष जात आणि तो एकदम शॉकच होतो कारण जमिनीवर रेवती आणि सौरभच शव ठेवलेलं असत एक क्षण सौरभला काहीच समजत नाही तो विचारातच पडतो "माझ्या बाजूला उभी आहे ती खरी रेवती आहे की जिला मी समोर बघतोय ती खरी रेवती आहे. आणि आता तर त्याला त्याच्या अस्तित्वावर देखील शंका येऊ लागते" तो रेवतीकडे एक नजर फिरवतो तशी रेवती मान खाली घालुन कुत्सितपणे स्माईल करते आणि अचानक अदृश्य होते. सौरभ मात्र आपल्याच शवाकडे एकटक पाहात राहातो...
काही वेळानंतर...
सौरभ आपल्या शवाजवळ येतो. आणि त्याला स्पर्श करू लागतो पण शवाला त्याचा स्पर्शच होत नाही तो खूप प्रयत्न करतो तरी त्याचा हात शवाला लागत नाही. शेवटी तो आपल्या फ्रेंड्सशी बोलायचा प्रयत्न करतो प्रत्येकाजवळ जाऊन त्यांना सांगायचा प्रयत्न पण तरी त्याला यश मिळत नाही.
त्याच वेळी त्याला एक आवाज येतो आणि तो मागे वळून बघतो. त्याच्या मागे पोर्णिमा आणि जागृती उभ्या असतात. त्या सौरभशी बोलू लागतात. "काय? झाले सगळे प्रयत्न करून? काय सरप्राइज्ड झालास अचानक दोघींना समोर बघून तुला काय वाटलं तुम्ही लोक कसही वागाल आणि तुम्हाला कुणीच काही बोलणार नाही. पण तू विसारतोएस तुझ्या ही वर कुणी तरी बसलंय(आकाशाकडे बोट दाखवत). तो परमपिता परमेश्वर तो बघतोय सगळं. तुला माहितीये त्या दिवशी फक्त माझ्या एकटीचा जीव गेला नव्हता तर माझ्या जुळ्या बहिणीचा जागृतीचा ही जीव गेला होता. तुम्ही गुन्हेगार आहात फक्त माझ्या एकटीचेच नाही तर माझ्या बहिणीचे सुद्धा आणि आता आम्ही दोघी परत आलो आहोत एकाला ही सोडणार नाही आणि त्याची सुरुवात झाली आहे.
पाहिले तुझे मित्र शंतनू आणि राकेश नंतर विराज आता तू आणि रेवती. आणि पुढे ही बाकीची मुल. एकाला ही सोडणार नाही... एकाला ही सोडणार नाही... एकाला ही सोडणार नाही." दोघी त्याला घाबरवत अदृष्य होतात.
सौरभ मात्र दोघींकडे एकटक बघतच राहतो त्याला दोघींशी काय बोलाव तेच सुचत नाही. आपल्या मित्रांना आपण कस वाचवू शकतो हा विचार करत तो एकदम सुन्न होऊन जातो.
इकडे... मीनल, सुहासिनी, विनम्र, आणि जास्मिन विचारमग्न असतात. त्यांना आपण एकत्र घालवलेले दिवस आठवु लागतात. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत. आणि अशातच अचानक विनम्र उठून घरात जातो आणि फ्रेश होऊ लागतो.
तेवढ्यात त्याला जागृतीचा आत्मा दिसतो. तो एकदा मागे वळून बघतो पण तिथे कुणीच नसत नंतर पुन्हा एकदा आरशात बघतो तेव्हाही त्याला जागृती दिसते.
ते बघून विनम्र पुर्णपणे चक्रावून जातो आणि घाबरून बाथरूम मधून पळून बाहेर जातो.
आणि बघतो तर काय... रेवती आणि सौरभच्या बाजूला मीनल, सुहासिनी, आणि जास्मिन ची शव पडलेली असतात. एका बाजूला सगळ्यांचे आत्मे उभे असतात तर दुसऱ्या बाजूला विनम्रसमोर जागृती आणि पोर्णिमा चे आत्मे असतात. ते सगळ बघून विनम्र पुरता कोलमडून जातो. त्या दोघी त्याच्या जवळ येतात. विनम्र मागे मागे सरकतो. आणि अचानक एका ठिकाणी थांबून जातो त्याचे पाय भीतीने थर थर कापत असतात तो दोघींना बघून दुसऱ्या दिशेला पळून जाणारच असतो तेवढ्यात जागृती आणि पोर्णिमा त्याच्या जवळ येतात आणि त्याचा गळा आवळतात.
काही वेळातच विनम्रचा मृत्यू होतो. दोघींनी सगळ्यांना मारून आपला बदला घेतलेला असतो. एकमेकिंकडे बघून जागृती आणि पोर्णिमा एक कुत्सित हास्य करतात. आणि अदृश्य होतात. त्यांना मुक्ती मिळते.