Being a girl is not easy - 8 in English Fiction Stories by Vrushali Gaikwad books and stories PDF | मुलगी होणं सोपं नाही - 8 - आयुष्याला वळण....

Featured Books
Categories
Share

मुलगी होणं सोपं नाही - 8 - आयुष्याला वळण....

डॉक्टरांच्या तोंडुन आजीचं असं झाल्याचं ऐकुन माईला धक्का बसला होता, तीला बोलताही येत नव्हतं, ताई मला मिठी मारुन रडत होती. ताईने स्वतःला सावरण्याचा खुप प्रयत्न केला. कारण आजी गेल्याचं सांगितल्यानंतर मामा इकडे येईल याची काहीच कल्पना नव्हती. पण आमच्यासोबत ते ड्रायव्हर काका थांबले होते. त्यांनी तरीही मामाला फोन केला आणि फोन मामीने उचलला.. काकांनी आजीबद्दल मामीला सांगितले, मामीने हो बोलुन फोन ठेवुन दिला. आम्ही बराच वेळ मामाची दवाखान्यात वाट बघितली पण मामा काही आला नाही. आत्ता ह्या लहान मुली काय करतील??? आजीचं अंत्यसंस्कार कोण करणार?? हे प्रश्न काकांना पडले होता. त्यांनी आमच्या शेजारच्या काकुंना फोन करुन आजीबद्दल सांगितले.
"तुम्ही लगेच आजींना आणि पोरींना घेऊन आपल्या घरी या आपण ठरवु या काय करायचं.."
काकुंचे बोलणं ऐकून काकांनी लगेचच आम्हाला तिघीनां आजीसोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसवले. आजीच्या बाजुला मागे आम्ही तिघी आजीला अशी बघुन खुप रडत होतो. माई मात्र शांत बसली होती.. ताई ने माईला समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण माई काही बोललीच नाही. आम्ही अर्ध्या तासातच घरी पोहोचलो. शेजारची आजीला ओळखणारी सर्व लोकं आमच्या भोवती गोळा झाली..चार पाच जणांनी पुढे येऊन आजीला बाहेर काढले.. आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी करायला घेतली हे बघितल्यानंतर ताई लगेचच घरात गेली आणि काही पैसे आणुन तिने शेजारच्या काकुंकडे दिले.
त्या नको म्हणत असतानाही..
"काकु, राहु द्या आमच्या आजीसाठी आम्ही इतकं तर करु शकतो.."
असं बोलुन ताई काकुंना मिठी मारुन रडु लागली....
"जिच्यामुळे आम्ही आहोत आता तीच आमच्यासोबत नाही काकु..."
"अगं, ताई आत्ता आम्ही आहोत ना.. आपण सर्व एकत्रच आहोत, तु नको काळजी करु बाळा.. होईल सर्व निट."
काकु ताईला धिर देत होत्या, आजुबाजुला जमलेली लोकं आता आजीला स्मशानभूमीत नेण्याची तयारी करत होते. आता मात्र आम्हांला आजीला जाऊन द्यायची इच्छा होत नव्हती.. आजीच्या अंगावर झोपुन आम्ही रडत होतो... माई टक लावुन आजीच्या देहाकडे बघत होती..
"माई, ये माई असं नको गं करु आहोत आम्ही सोबत तुमच्या, ताई पण आहे बघ.."
काकु माईला जवळ घेऊन बोलायला लावत होत्या...
"माई, रड बाळा अशी नको शांत राहु बोल काही तरी.. चिऊकडे बघ ती पण लहान आहे ना,?? तु आता शाळेत जाते तु काहीतरी कर.. आणि तुम्ही तिघी मोठ्या व्हा."
असं करुन कसं चालेल बाळा...
माई... जोरात ओरडली...
"आजीऽऽऽऽऽऽ ...ये ना गं. परत... नको ना जाऊ तुझ्या पोरींना सोडुन... आम्ही वाट बघतोय तुझ्या उठण्याची आजी...."
ताईने मला आणि माईला जवळ घेतले आणि घट्ट मिठी मारली.. माई शांत हो आपण तिघी मिळुन राहु आता..
माईला ताईने समजावले, तेव्हा ती शांत झाली.. आता मात्र आजी आमच्या नजरेसमोर काही क्षणासाठीच होती... तेवढ्यात काकांनी आजीला आमच्यासमोरुन नेली... आमच्याकडुन कोणितरी आमची खुप जवळची वस्तु दुर नेल्यासारखं वाटत होते..
आमची आजी आता आमच्यामधुन कायमची निघुन गेली होती. आता फक्त आम्ही तिघी होतो. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेले लोकं हळु हळु जात होते. शेजारच्या काकु आमच्यासोबत थांबल्या होत्या.
"ताई, ऐक ना.. मी चहा आणते बनवुन.. तुम्ही तिघी चहा पिऊन घ्या..
आणि थोडं काहीतरी खायला पण आणते."
"काकु, नका आणु आता भुक नाही आम्हांला..."
"ताई, माई अगं असं करु नका... त्या चिऊकडे बघा, ती तर तुमच्यापेक्षा छोटी आहे. तिला लागली असेल भुक. आणि तुम्ही काय.. इतक्या मोठ्या नाहीत की तुम्ही जेवलात तर तुम्हांला लोकं हसतील.. मी आणते थोडं खाऊन घ्या.."
काकुंनी घरी जाऊन चहा आणि चपाती आणली.
"मुलींनो घ्या.. थोडी थोडी खा.. मला पण काही बनवता नाही आलं.. आजीचं समजलं तर मी काही बनवलं नाही.."
"माई, तु आणि चिऊ खा...मी खाईल नंतर.. मला आता भुक नाही."
"काकु मला पण नको, आम्ही नंतर खाऊ.."
"अगं, चिऊ तु खा.. तु लहान आहेस.."
असं म्हणुन काकु आणि ताईनी मला चपाती आणि चहा जबरदस्तीने खायला लावले.. काकु थोडा वेळ आमच्यासोबत थांबल्या आणि त्यांच्या घरी गेल्या. त्या तरी आमच्यासोबत किती वेळ बसणार.. काकु घरी गेल्यानंतर आम्ही तिघी शांत बसलेलो.. ताईच्या मांडीवर मी डोकं ठेवुन झोपलेली. प्रत्येक मिनीटाला घराच्या प्रत्येक कोप-यात आम्हांला आजीचे भास होत होते. तेवढ्यात माईच्या वर्गशिक्षिका घरी आल्या.
"मुलींनो, काय गं अशा शांत बसु नका.."
"आता तुम्हांलाच तुमची काळजी घ्यावी लागणार आहे."
बाई बोलत होत्या पण ते ऐकुन ताई आणखी रडत होती..
"ताई, अगं बाळा तुच मोठी आहेस असं नको करु तु..."
"तुलाच आता सर्व करायला लागणार आहे..."
बाई ताईच्या पाठीवर हात फिरवत ताईला समजावत होत्या. ताई स्वतःला सावरत डोळे पुसत होती.
"माई, ये एकडे बस माझ्या जवळ तु अशी एकटी नको बसु.."
बाई माईकडे बघुन थोडावेळ विचार करुन... ताई मी काय बोलते.
"माईला, आजीच्या जाण्याचा जास्तच धक्का बसला आहे. मी तिला काही दिवस माझ्या घरी नेऊ का???"
बाईंचा हा वाक्य ऐकुन का माहीत ताईच्या तोंडातुन न्या हा शब्दच निघत नव्हता, कदाचित तिला माई पुन्हा घरी येईल याची खात्री नसावी.
"ताई, अगं बघ मी तुमच्यासाठीच बोलते.. तु तर काही शिकली नाही, आता माई शाळेत येते तर आजीचं असं झालं आहे.. मला तरी वाटतंय, आजीच्या जाण्याचा माईच्या शिक्षणावर परिणाम नको व्हायला."
बाईंचे शब्द ताईच्या मनावर घाव करत होते, तिच्या मनाला लागत होते. तिला माईला आमच्यापासुन दुर नव्हती करायची पण आता तिला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी दुसरा मार्गच नव्हता.
"हो.. बाई न्या तुम्ही...माईला तुमच्यासोबत आणि तीला जेव्हा बरं वाटेल तेव्हा नक्की घेऊन या घरी..."
"हो चालेल.."
असं बोलुन बाईंनी माईचा हात धरला आणि तिला घेऊन गेल्या.
पण तिला अशी जातावेळी मनात धडधड होत होती.. असं वाटत होतं, माई तर दुर नाही ना जाणार?? माई पुन्हा येईल ना घरी???
बर्‍याच प्रश्नांनी मनात थैमान मांडले होते. ताईने एकदा जोरात आवाज दिला...
माई.... एकदा मिठीत ये ना.. तुम्हांला दोघींना मला मिठीत घ्यायचं आहे. मग तु जा.... ताईने मला आणि माईला मिठी मारली आणि ताई खुप रडली.. मला माईच्या जाण्याचा त्रास होत नव्हता पण ताईच्या रडण्याने मला माईला थांबवावं वाटत होतं. आता खरी आम्हांला एकमेकींची गरज होती पण यावेळीच माई आमच्यामधुन जात होती..
"ताई, नको गं रडु.. माई येणार आहे ना परत..येईल ती दोन तीन दिवसांनी, नाही आली तर आपण जाऊ आणायला तिला."
"हो चिऊ...माझं बाळ ते, तुला नाही जाऊन देणार मी कुठे मला सोडुन.."
"ताई... मी पण कुठेच नाही जाणार.."
आजीच्या जाण्याने आमचे एक दोन दिवस खुपच शांतेत गेले, ताईने रात्री शेजारच्या काकुंना आमच्याकडे लक्ष द्यायला सांगितले होते म्हणुन त्या रात्री मध्येमध्ये आवाज द्ययला यायचे पण त्यांना तरी आपण किती त्रास द्यायचा म्हणुन ताईने त्यांना सांगितले,
"काकु, तुम्ही रात्री मध्ये नका ऊठत जाऊ, आम्ही व्यवस्थित झोपु तुम्ही नका काळजी करु."
आज माईला बाईंकडे जाऊन तीन दिवस झाले होते, म्हणुन ताईंनी बाईना फोन केला...
"हॅलो, बाई, मी ताई बोलते..."
"हो.. बोल गं.."
"बाई, माईला घरी घेऊन या ना ..आता आम्हांला पण करमत नाही, आठवण येते तिची."
"हो, येते हा आज दुपारीच..."
आम्ही खुप खुश होतो माई येणार म्हणुन.. घरतील शांतता आता बोलकी होणार होती...ताईने माईसाठी मस्त वरण भात बनवलं होतं, अगदी तिला आवडतं तसं...
ताई येऊ का????
या ना बाई.....
"माई.....ऽऽऽऽऽऽ" .. मी माईला मिठी मारुन नाचत होती.
बाई बसा ना.. हो बसते..
ताई ऐक ना.. थोडं बोलायचं होतं..
मी माईला फक्त तुम्हांला भेटण्यासाठी आणली आहे..
मी तिला कायमची माझ्याघरी ठेवण्याचा विचार करतेय......
(हे ऐकल्यानंतर ताईच्या हातातुन पाण्याने भरलेला ग्लास खाली पडतो)