PREMTARANG - EKA PREMACHI MANRANGI KAHANI - 5 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 5

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 5

वाइ डिड यू ब्रेक माई हार्ट
वाइ डिड वी फॉल इन लव
वाइ डिड यू गो अवे, अवे, अवे, अवे..

दिल मेरा चुराया क्यूँ
जब यह दिल तोड़ना ही था
हमसे दिल लगाया क्यूँ हमसे मुँह मोड़ना ही था

गिटारच्या तारा छेडत, मेघनाच्या आठवणीत गाणं गात राघव एकटाच आपल्या रूमच्या गेलरीत बसला असतो.. गाणं गाताना कंठ अगदी दाटून आला असतो.. युक्ताच गोड अस बोलणं आठवुन त्यातल्या त्यात तो गालातल्या गालात हसत असतो..

श्री मेघनाला घेऊन एका रेस्टोरेंटमध्ये जातो..

"राघव फोन का नाही उचलत आहे??" श्री चिडतच बोलतो..

"तो दुपार नंतर ऑफिसमध्ये दिसलाच नाही मला" मेघना बोलते..

"बसला असेल परत ड्रिंक करत.. तु इथे आल्यापासुन त्याच हे असंच चाललंय.. आज घरी जाऊन बघतोच त्याच्याकडे मी" मोबाईल रागातच बाजूला ठेवत श्री बोलतो..

"मम्मा पिझ्झा" युक्ता गोड आवाजात बोलते..

तिचा तो गोड आवाज ऐकुन श्रीचा राघववरचा राग कुठे तरी दूर निघुन गेला असतो. ती त्या निरागस अश्या चेहऱ्याकडे बघण्यात हरवुन गेला असतो..

मेघना वेटरला सांगुन तिच्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते...

"काय झालंय मेघ?? तु मगाशी अस का बोलली की ही??" श्री मेघनाला विचारतो..

"तुझं पूर्ण नाव सांग बघु काकाला" मेघना युक्ताला गोंजारतच बोलते..

"My Name Is युत्ता माधव दिकछित" युक्ता बोबड्या बोलातच बोलते..

"युक्ता माधव दीक्षित अस तिला बोलायच आहे.. थोडं बोबड बोल बोलते ती.." मेघना श्री कडे बघतच बोलते..

"म्हणजे माधव दादाची मुलगी ही??"

"हम्मम"

"तुला का मम्मी बोलते?? आणि माधव दादा कसा आहे??"

"युक्ता शिवाय माझं कोणीच नाही राहील ह्या जगात" अस बोलत मेघना परत रडु लागते..

श्री खिस्यातून रुमाल काढतच तिच्यासमोर धरतो.. पाण्याने भरलेला ग्लास तिच्या हातात देत तो तिला थोडं शांत करतो..

"मी राघवला नाही फसवल श्री.. आणि मला माहित पण नव्हतं राघव इथे ह्या कंपनीत कामाला आहे.. जिया मला बोलली राघवच लग्न झालय.. उगाच माझी त्याच्या संसारात लुडबुड नको म्हणुन मी हे चार दिवस सुद्धा त्याच्यापासुन लांब राहिली..

"तुला कोण बोललं त्याच लग्न झालंय??"

"जियाss"

"what?? उलट तिने तर राघव आणि मला तुझं लग्न झालंय अस सांगितलं.. आणि जवळपास 5 वर्षांपूर्वी तुच एका रेस्टोरेंटमध्ये तुझ्या फियांस सोबत राघवला दिसली होतीस.. म्हणजे तुच राघवला तो तुझा होणारा नवरा आहे एन्ड ऑल हे सांगितलं होतंस.. आणि त्याच्यासोबतच तु लग्न केलंस हे हि सांगितलं होतंस."

"तो जियाचा कझिन होता.. तो प्लॅन सुद्धा जियाचा होता.. मिच राघवपासून लांब होण्यासाठी ह्या सगळ्यात जियाची मदत घेतली होती"

"पण का??"

"खुप स्वप्न बघितलेली मी आणि राघवने.. आमच्या लग्नाची आणि लग्नानंतरची सुद्धा.. राघवच्या लहान बहिणीच लग्न झालं की आम्ही लगेच लग्न करणार होतो.. माझ्या माधव दादाला तर राघव खुप आवडायचा.. माझ्या घरी कसलाच प्रॉब्लेम नव्हता. पण अचानक दादाची शिफ्टिंग पुण्याला झाली.. दादा पुर्ण फेमिलीसोबत तिथे शिफ्ट व्हायच बोलत होता.. पुणे तस लांब नाही.. पण राघव रोज दिसणार नाही म्हटलं तर मला ते लांबच वाटत होतं.. कस बस दादाला रिक्वेस्ट केली आणि मी माझ्या आत्याकडे राहु लागली.. तुला आणि राघवल माहितीच आहे हे सगळं.. राघव माझ्या आयुष्यात आल्यापासुन माझं सगळंच चांगलं होत गेलं.. IT कंपनीत चांगला जॉब मिळाला.. वर्षभरात माझं प्रमोशन पण झालं.. एका रात्री जियाने मला फोन केला.. तिचा कझिन ज्याच्यासोबत तुम्ही मला बघितलं तो LIC एजंट होता.. मला लाईफ सिक्युअर म्हणुन दोन तीन पॉलिसी काढायची होती.. बट त्या मधील एका पॉलिसीसाठी मेडिकल रिपोर्स्ट हवे होते.. ऑफिसमधुन सुट्टी घेणं माझ्या जीवावर आलेलं.. कारण राघवसाठी वरच्यावर माझी सुट्टी व्हायचीच.. माझ्या ओळखीमध्ये आहे हॉस्पिटल आपण तिथे जाऊयात.. अस बोलत जिया मला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.. सगळ्या टेस्ट झाल्या आणि रिपोर्टसची वाट बघत मी तिथेच उभी होती.. बट काही रिपोर्ट्स उद्या मिळतील अस बोलले.. मी रागातच जियाकडे बघु लागली..

"मी घेऊन येते आणि सुजितला देते.. मग तर झालं??" जिया माझी समजुत काढतच बोलली..

ती अस बोलल्यावर मला काय प्रॉब्लेम असणार..

दुसऱ्यादिवशी जियाने फोन करून मला हॉस्पिटलमध्ये बोलवुन घेतलं.. खुप विचारलं काहीच सांगत नव्हती.. हातात रिपोर्ट्स देत एका केबिनमध्ये जा बोलली..

“गायनोकोलोजीस्ट डॉ. अंकिता राजे" बाहेर बोर्डवर तिच्या नावाची पाटी लावली होती.."

जियाचा तो गंभीर चेहरा बघुन मिच घाबरून गेलेली.. केबिन नॉक करत डॉ अंकिताच्या समोर जाऊन बसली.. खुप वेळ त्या रिपोर्ट्स न्याहाळत बसल्या होत्या.. आणि ब-याच वेळाने म्हणाल्या, “ मिस मेघना, तुमचे रिपोर्ट्स काही तितकेसे बरे नाहीत.”

“नेमकं काय झालंय डॉक्टर?” मी घाबरतच त्यांना विचारलं..

“तुमचे सोनोग्राफी आणि ब्लड रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत. तुम्हाला PCOD आहे. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. इट्स जस्ट हार्मोनल इमबैलेंस. काही ठराविक रूटीन जसं की आहार, व्यायाम नीट केलं की ते कण्ट्रोलमध्ये येईल. खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. सोनोग्राफीच्या रिपोर्ट्स वरुन असं दिसतंय की तुमच्या गर्भाशयाची वाढ अपूर्ण झाली आहे. त्यामुळे ते मूल वाढवण्यास सक्षम नाही.”

“म्हणजे??” घाबरतच मी त्यांना विचारलं

“सॉरी टू से मिस मेघना. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही. जर तसा प्रयत्न केला तर बाळ वाचण्याची शक्यता फारंच कमी. शिवाय तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल तो वेगळाच.”

“यावर काही उपाय नाही का? अस सुद्धा डॉक्टरांना विचारलं..

“सध्या तरी यावर पूर्णपणे उपाय नाही सापडलाय. जर तसंच काही असेल तर तुम्हाला कळवेन. तुम्हाला या काही मेडिसीन मी लिहून देतेय. त्या वेळेवर घ्या. आणि फॉलो अपसाठी येत रहा.”

"राघवला मुलांची खुप आवड होती श्री.. पहिली त्याला मुलगीच हवी होती.. "युक्ता" हे नाव पण ठरलेलं त्याच.. पण मी त्याला ते देऊच शकत नव्हते रे.. तरी एक मन सांगत होत की राघवल हे सगळं सांग.. बट तो खुप टेन्शन घेतो.. मला अस काही आहे म्हटलं तर त्याने खूप म्हणजे खुपच टेन्शन घेतलं असत.. मला नव्हतं कळत काय करू मी. केबिन बाहेर पडताच खुप रडली मी"

"तुझ्यामुळे राघवच आयुष्य नको बरबाद करुस मेघना.. त्याच्या प्रेमाचा तु चुकीचा फायदा घेऊ नये असच मला वाटत.. जे करशील ते विचार करून कर.." दोन दिवस जियाच्या ह्या बोलण्याचा मी विचार करू लागली.. आणि मला पण असच वाटलं की राघवच आयुष्य आणि त्याने बघितलेलं त्याच स्वप्न बरबाद करण्याचा मला काहीही अधिकार नाही.. जियाकडेच मी राघव पासुन वेगळं होण्यासाठी मदत मागितली..

मला राघव पासुन वेगळं करायला एका पायावर तैयार झाली.

राघवचे फोन उचलत नाही म्हणून राघव आधीच माझ्यावर चिडचीड करत होता.. जियाने जाणुन बुजुन राघवला त्या रेस्टोरेंटमध्ये बोलवलं ज्या रेस्टोरेंटमध्ये मी तिच्या कझिन सोबत हातात हात घेऊन बसलेली.. राघवला काही सांगायची गरजच नाही पडली. तो जे समजायचं ते समजुन गेला.. आणि रागात खुप काही बोलला मला. आणि माझ्यावर एक नजर फिरवुन तिथुन निघाला सुद्धा.. मी मात्र तो दिसेनासा होईपर्यंत रडतच त्याच्याकडे बघु लागली.. मी कंपनीकडुन पुण्याला ट्रान्सफर मागुन घेतली.. कारण राघव आज ना उद्या कुणा इतरांसोबत मूव्ह ऑन होईल हे माझ्याने बघवल जाणार नव्हतं.. प्रत्येक क्षण राघवच्या आठवणीत गेला माझा.. माझं काम आणि मी.. घरात तर मी असुन नसल्यासारखी होती.. दिड वर्ष श्री.. दिड वर्ष मी माझ्या राघव शिवाय कशी जगली हे मी तुला नाही सांगू शकत.. अश्यातच दादाला हे पिल्लु झालं.. आत्या झाली मी.. नाव ठेवायचा मान माझा.. "युक्ता" राघवने ठरवलेलं तेच नाव मी हिला दिला.. युक्ता तीन महिन्यांची झाली तस तिला घेऊन माझी सर्व फेमिली आमच्या कुलस्वामिनीची पाया पडायला गेली.. मला घरचे खुप जबरदस्ती करत होते पण मी नाहीच बोलले माझा सगळ्या वरचा विश्वासच उडालेला रे.. देव धर्म पण नको वाटत होतं मला.. आणि माझा तोच निर्णय माझ्या ह्या युक्तासाठी चांगला ठरला.. दादाच्या गाडीच खूप मोठं एक्सिडेंट झालं.. माझ सगळं कुटुंब जागीच ठार झाल.. माझं हे पिल्लु वहिनीच्या कुशीत अगदी सुखरूप वाचलं.. जरा सुद्धा काही खरचटलं नव्हतं हिला.. हसत होती मस्त पैकी.. मी मात्र तिच्याकडे बघत रडतच होते.. कस बस स्वतःला सावरल.. हिच्या साठी तरी मला जगाव लागणार होतं.. हिच्या संगोपणात सगळं आयुष्यच माझं बदलुन गेल रे आणि अचानक एकदा ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडले मी.. ऑफिस मधील कलीगने मला डॉक्टरांकडे नेल..

"कसली औषध चालू आहेत का अस डॉक्टरांनी विचारल्यावर मी डॉ.अश्विनी जे काही बोलल्या आणि त्यांनी जी औषध मला सांगितली ती सगळी माहिती डॉक्टरांना दिली.. त्या डॉक्टरांनी माझे पुन्हा सगळे रिपोर्टस चॅक केले.. तेव्हा कळलं डॉ. अश्विनी जे काही बोलल्या तस मला काहीच नाही.. मे बी त्यांनी दिलेल्या औषधांमुळे माझं आजारपण दूर गेलं होतं.. मी क्षणाचा विलंब न करता राघवला फोन लावला.. पण त्याचा फोन स्विच ऑफ.. मी लगेच जियाला फोन लावला..

"जिया मला राघवचा नंबर दे.. मला डॉ अश्विनी बोलल्या तस काही झालंच नाही.. मला माझ्या राघवपासुन लांब पळायची गरज नाही" मी त्या क्षणाला मला जे सुचत होत ते सगळं जियाला बोलत गेले..

"तुझा राघव आत्ता तुझा राहिलेला नाही.. त्याच लग्न झालय" जिया अस बोलताच माझ्या पाया खालची जमीनच सरकली. उरली सुरली माझी सगळी आशाच माझी संपली रे."

अस बोलत मेघना परत रडु लागते..

"राघवच लग्न नाही झालंय मेघना.. जिया खोट बोललीय तुझ्याशी.. तुझ्याशिवाय तो कसा जगला आहे हे मला माहिती.."

"काय??? जिया अस खोटं बोलली माझ्याशी.??"

"ते तिचं सांगेल आपल्याला.. बट अजुन गैरसमज नको.. तु चल लवकर"

"कुठे??"

"राघवकडे आणि कुठे"

श्री मेघनाला आणि युक्ताला घेऊन राघवच्या घरी जायला निघतो..

राघवचे डॅड दरवाजा उघडतात..

"अंकल राघव" दरवाजा उघडला उघडल्या श्री बोलतो..

"आत या.."

"कसे आहात अंकल??" मेघना अपराधी नजरेने राघवच्या वडिलांकडे बघतच त्यांना विचारते

"तुम्ही दोघ असे वेगळे झाल्यावर कसा असणार मी.. माझ्या राघवसाठी स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असतो मी.. माझं सोड तु कशी आहेस??"

मेघना काहीही न बोलता मान खाली घालुन बसते..

"राघवला बोलवा ना अंकल", श्री बोलतो.

"रूममध्ये झोपलाय तो.. मला अजिबात डिस्टरब करू नकोस असा दम दिलाय त्याने.. त्याने अस काही बोलल्यावर माझी कसली हिंमत होतेय त्याच्या रुममध्ये जायची" डॅड दोघांना पाणी देतच बोलतो..

"मग मी जातो.. माझ्यात तेवढी हिंमत आहेच.. त्याच्या मेघला परत त्याच्याजवळ घेऊन आलोय" श्री खुर्ची वरचा उठतच बोलतो आणि सरळ राघवच्या रुममध्ये जातो."

राघव गेलरीच्या कठड्यावर डोकं टेकुन सगळ्यांकडे पाठ फिरवुन बसला असतो..

"राघsss" मेघना राघवला प्रेमाने आवाज देते..

पण राघव मागे फिरून तिच्याकडे काही बघत नाही..

"राघव नको ना राग करून मेघ चा.. खुप गैरसमज झालाय तुम्हां दोघांत.. जिने गैरसमज तिने अस का केलं हे आपण नंतर तिच्यासोबत बोलुन तिला विचारू.. बट तु एकदा मेघनासोबत बोलून तुमच्यातील गैरसमज दूर करावा अस मला वाटत"

श्री एवढं काही बोलतो तरी राघवची हालचाल नसते..

श्री आणि मेघना एकमेकांकडे बघत परत त्याच्याकडे बघतात..

"राघव.. मित्रा बस कर यार..", श्री राघवजवळ जात त्याच्या खांद्याला धरतच त्याच तोंड आपल्याजवळ करणार तस राघव बसल्या जागीच खाली कोसळतो.."

त्याच्या हातात असलेलं गिटार त्याच्या रक्ताने माखल असत.. डोळे मिटुन तो शांत झाला असतो..

"राघवsss" श्री मोठ्यानेच ओरडतो..

क्रमशः

(राघ त्याच्या मेघला कायमच सोडुन खरच दूर निघून गेला?? का एक वाईट स्वप्न बघतो तस काहीस हे असेल.. पाहुया पुढील आणि शेवटच्या भागात.. हा भाग कसा वाटलं ते नक्की कळवा)