Abhagi - 6 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | अभागी ... भाग 6

Featured Books
Categories
Share

अभागी ... भाग 6

मधू झोपण्यापूर्वी सायली ला मॅसेज करते..

मधू: हॅलो.. सायू..

सायली: बोलो मधू बेबी..

मधू: ये ठीक आहेस ना आता?

सायली : हो एकदम ठीक आहे .. डोन्ट वरी.

मधू : ओ के ..बर आराम कर उद्या कॉलेज मध्ये बोलू.

सायली : ok dear ..पण मी एकदम ठीक आहे काळजी नको करुस..

मधू: हो माझी झाशीची राणी..

सकाळी मधू कॉलेज मध्ये जाते अनु आलेली असते आणि सायली ही एकदम ठीक असते..

मधू : सायली ok ना

अनु : हिला काय झालं होत ?

मग मधू कालचा प्रसंग अनु ला सांगते..

सायली : ये पणं तू का आलू नाहीस काल अनु ?

अनु : अग मी सकाळी उठलेच नाही लवकर मग आई म्हटली राहू दे आज..पणं कोणी केलं हे सर्व ..आणि का ?आणि सायली तू ठीक आहेस ना ?

सायली : अग हो ग माझ्या आयानो मी ठीक आहे .. उलट मलाच हसू येत आहे मी उगाच इतकी घाबरले म्हणून ..

मधू : ये सायली पणं तू क्लास रूम कडे कशाला गेली हो तीस?..मी कालच विचारणार होते पणं वाटलं उद्या विचारावं..

आता सायली तिच्या कडे तिला खाऊ की गिळू नजरेने पाहत होती..मधू ला कळत नाही ही अशी का पाहत आहे ?

मधू : अग अशी का पाहतेस मी काय केलं ?

सायली : अरे वा धन्य तुम्ही मधू देवी ? क्लास रूम कडे मी गेले होते का तू ?

मधू : म्हणजे ?

सायली : तू लायब्ररी मध्ये गेली होतीस म्हणून वाट पाहत उभी होते आणि तू तिथून बाहेर यायचं सोडून ..क्लास रूम कडे पळत जाताना दिसली स..म्हणून तिला काय झालं हे पाहायला मी पाठीमागे आले ..तू दिसेनासं म्हणून क्लास रूम मध्ये पाहत होती की मागून कोणी तरी दरवाजा बंद केला ..आणि त्यात तो आवाज ऐकुन माझी घाबरगुंडी उडाली..

मधू : अग मी बाहेरच येत होते तोपर्यंत तो संपत आला आणि सायली रडत आहे क्लास रूम मध्ये बघ जा म्हणून सांगितलं म्हणून तर मी तिकडे पळत गेले..

सायली : मी तर बाहेर होते? आणि मी का रडू ?

मधू : अग तो त्यांचा प्लॅन होता.

अनु : त्यांचा म्हणजे कोणाचा मधू ?

मधू मग तिला साया नी सांगितलेलं सर्व दोघींना सांगते ...

अनु आणि सायली . ला विराज चा खूप राग येतो ..वाटलं नव्हत तो अस करेल..

सायली : ये पणं हे सर्व तुला कोणी सांगितलं ? आणि तू क्लास रूम मध्ये का गेली नाहीस मग ?

मधू : मी जातच होते की साया चा मॅसेज आला की जावू नकोस ..आणि मी थांबले आणि त्या वेळी तू तिथे जावून फसली..

सायली : हे भगवान .. एैसा अन्याय मेरे साथ ही क्यू ? मुझे भी एक साया दे देता ...फिर मे भी नहीं फसती..

मधू : ये गप ग नौटंकी..पणं सॉरी ग सायली माझ्या मुळे सर्व झालं ना ..अस म्हणून मधूचा चेहरा पडतो..
सायली आणि अनु ला ते पाहवत नाही..

सायली : काही ही काय ह..मधू ? आपण फ्रेण्ड्स आहे ..अस का बोलतेस मग ? आणि तुझा काय दोष ?

अस म्हणून सायली मधू ला मिठी मारते मग मधू ही तिला बिलगते ..
अनु : वां .. राम लखन जोडी ? आणि मी कुठे गेले ? मला ही घ्या की ग..
तस मधू आणि सायली दोघी ही हसतात व अनु ला ही आपल्यात सामील करून घेतात..आणि तिघी ही गुणगुणत असतात.

ये दोस्ती हम नाही तोंडेंगे
तोडेंगे दम मगर .
तेरा साथ ना छोडेंगे..

अनु : ये एक गाणं त्याच्या साठी ही ..

सायली आणि मधू ही एक साथ विचारतात ..कोणा साठी ?

अनु मग मोठ्याने म्हणू लागते ..

साया साया साया हुं
दौडा दौडा आया हुं
तिने कत रा मांगा था
मे दरिया लाया हुं..
मग सायली ही अनु सोबत सोबत ते गाणं म्हणू लागते ..आणि मधू त्यांना मारायला मागे पळते ..थोड्या वेळाने दोघी सापडतात..मग मधू पुन्हा गंभीर होत बोलते की ..विराज ला शिक्षा होयल हवी..सायली जावू दे सोड बोलते पणं मधू नाही म्हणते ..तितक्यात मधू व सायली ला शिपाई काका प्रिनसिपल नी केबिन मध्ये बोलावलं आहे म्हणून सांगतात...
मधू ला शंका येते की बहुतेक सराना कालचा प्रकार कळला असेल..चला बर झाल..म्हणून ती सायली सोबत सरांच्या केबिन मध्ये जाते..

पुढे काय होईल ? पाहू next part मध्ये..