Mitranche Anathashram - 10 in Marathi Drama by Durgesh Borse books and stories PDF | मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०

Featured Books
  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

  • My Devil Hubby Rebirth Love - 50

    अब आगे रुद्र तुम यह क्या कर रही हो क्या तुम पागल हो गई हों छ...

Categories
Share

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०

मी, "मग कुणी सांगितले ?"
संजय, "निशा, संध्याची मैत्रीण"
मी, "कधी ?"
संजय ने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली,
त्या दिवशी आपण चौघेही आश्रमात गेलो होतो. तेव्हा संध्याला सुरेशकाकांनी तिच्या बाबांबद्दल विचारले. त्यानंतर संध्या रडायला लागली. तेव्हाच तिला बोलता येत नाही हे कळाले. संध्याला पुन्हा त्रास नको म्हणून तो विषय पुन्हा कुणी घेतला नाही. त्या रात्री उशीर झाला होता आणि विवेक पण काहीतरी काम होत म्हणून लवकर निघून गेला. संध्याला हॉस्टेल ला सोडायला मी आणि आम्या दोघं गेलो. नेहमीप्रमाणे आम्या ने संध्याकडून गाडीची चावी मागून घेतली आणि मी संध्याला माझ्याबरोबर घेतले. रस्त्यात एका बाजूला एक छोटीशी दरी होती आणि त्यात खुप काटे होते म्हणून हळुवार गाडी चालवत आम्ही मागे आणि आम्या पुढे होता. अचानक आम्या रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून दरीच्या दिशेने पळाला. मी पण गाडी थांबवली तर तिथे कुणीतरी स्त्री दरीत पडत होती आणि आम्या ने तिला बाहेर ओढून काढले. मी आणि संध्या धावत गेलो पाहिले तर ती बाई कुणालातरी शिव्या घालत होती. मी आम्या कडे पाहिले तर बोलला की मी काही नाही केलं, कुणीतरी आत्ताच या बाईला धक्का देऊन पळून गेलं. मला कुणीतरी पडताना दिसलं म्हणून मी पटकन वाचवायला आलो. नीट निरखून पाहिले तेव्हा कळले की ती एक तृतीयपंथी आहे. खुप लागलं असल्यामुळे आम्ही तिला आधी दवाखान्यात गेलो आणि आम्याला तिथेच सोडून संध्याला उशीर होईल म्हणून हॉस्टेलला घेऊन गेलो. निशा बाहेर उभी राहून संध्याची वाट बघत होती. मी घाईत होतो म्हणून निशाला माझा फोन नंबर देऊन त्यांची रजा घेतली.
पुन्हा दवाखान्यात आलो तोपर्यंत त्या बाईची मलमपट्टी झाली होती, डॉक्टरची फी आणि तिच्या हातात काही पैसे देऊन आम्ही घरी निघणार होतो, तितक्यात ती बोलली, "हे पैसे नको मला, आधीच खूप मदत केली आहे तुम्ही." असे म्हणत तिने ते पैसे आम्या च्या हातात ठेऊन दिले आणि दोघांच्या डोक्यावर हात फिरवून कडकड बोट मोडले. तिच्या साडीचा पदर एका हातात घेऊन टाळ्या वाजवत तिच्या रस्त्याला लागली. जाताना मागे न फिरता म्हणाली, "काही काम असलं तर सांगा मी पण माणूस आहे आणि मदत पण करते"
ते ऐकून मी गाडी चालू केली, पुढे थेट आश्रमात थांबवली आम्याचा निरोप घेतला आणि माझ्या घरी आलो. जेवण वैगरे करून झोपायच्या तयारीत होतो तेव्हा फोन वाजला. मी फोन घेतला, समोरून मुलगी बोलत होती, "हॅलो"
मी, "हॅलो, कोण ?"
समोरून, "निशा"
मी, "अरे बोल, कसं काय फोन केला, काही काम आहे आहे?"
निशा, "खुप महत्वाचं काम नाही संध्या ने सांगितले कॉल करायला"
मी, "का काय झालं"
निशा, "thank you बोलायचं आहे तिला"
मी, "हो, मग ती काय करते"
निशा, "अरे तिने आधीच करायला सांगितला होता पण मी माझ्या कामात विसरले आत्ता आठवले तर केला, जास्त उशीर नाही केला ना."
मी, "नाही, मी झोपलो असतो तर फोन उचलला नसता. संध्या झोपली पण ?"
निशा, "हो, आज काही न वाचताच झोपली, नाहीतर काहीतरी वाचत वाचत झोपते ती"
मी, "हो, आज आश्रमात खुप खेळली ती मुलांमध्ये, रडली पण खुप"
निशा, "का रडली ती ?"
मी तिला घडलेली घटना सांगितली,
निशा, "आली तेव्हा खुप आनंदात होती पण ती"
मी, "हो, ती दुपारी रडली आणि त्यानंतर मुलांमध्ये खेळली ना म्हणून आनंदात असेल, तिला नक्की काय झालं आहे हे मला सांगणार का तु?"
निशा, "पण तुम्हाला काय करायचं आहे त्याच ?"
मी, "माझ्यासाठी ते गरजेचं आहे"
निशा, "का ?"
मी, "कारण मला ती आवडते, प्रेम आहे तिच्यावर तिच्याबद्दल अजून ऐकून घेण्याची इच्छा आहे."
निशा, "म्हणजे तिच्या भूतकाळावरून ठरवणार पुढे काय करायचं ते"
मी, "मला ते म्हणायचं नाही ये, पण आज जसं तिच्या बाबाबद्दल विचारलं तर ती रडली तस तिला पुढे अजून काही त्रास होऊ नये हा माझा हेतू आहे म्हणून मला ऐकायचं आहे की काय झालं आहे तिच्याबरोबर"
निशा, "तुमच्या आत्तापर्यंत च्या वागणुकीमुळे सांगते मी काय झालं आहे तिला ते"
तिने संध्या बरोबर काय झालं ते पूर्ण मला त्या रात्री सांगितलं.

आत्तापर्यंत सर्वजण संजय सांगत असलेल्या गोष्टीकडे लक्ष देऊन ऐकत होते. मध्येच कधीतरी सूरेशकाका येऊन बसले आम्हाला पण समजलं नाही.
संजय माझ्याकडे पाहून, "बरं का समीर, अश्या प्रकारे मला समजले"
मी, "मग तरी प्रपोज करणार तु"
संजय, "हो"
विवेक, "तु ग्रेट आहे यार, मला माहिती पडले तेव्हा एकदा मनात शंका आली."
सुरेशकाका, "कधी विचारतो मग तिला"
संजय, "कधी विचारू तेच समजत नाही"
काका, "उद्या विचार मग, उद्या आपल्या आश्रमाला पंचवीस वर्ष होतात तर एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे"
संजय, "तिला पण बोलवतो मग, पण ती येईल का"
विवेक, "तु नको बोलावू वेगळं वाटेल तिला मी निशाला सांगतो ती घेऊन येईल बरोबर"
मी, "काही काम असतील तर सांगा आम्ही करतो"
काका, "हो आहेत तर म्हणून मी इथे आलो आहे"
काकांनी सर्वांना काम वाटून दिले. मदत पेक्षा आम्या च्या उपकरापोटी संजय ची आई, काकू आणि रजनी मदतीसाठी आल्या होत्या. विवेकचा आई सुध्दा होती.
सर्वांनी ज्याच्या त्याच्या वाटेचे काम चोख पार पाडले. मला बाहेरून विकत काही आणायचं असलं की गाडीवरून घेऊन यायचं हे काम होत. सजावटीसाठी रजनी ने एक यादी दिली. मला त्यातलं काही समजलं नाही मग तीच बोलली मी येते सोबत आपण घेऊन येऊ, खुप फिरल्यावर त्या वस्तू मिळाल्या. कुणी काही काम सांगत नव्हतं म्हणून मी दिवसभर रजनी बरोबरच सजवतीच काम करत होतो.
सर्व काम उरकून संजयची आई, काकू आणि विवेकची आई घरी गेल्या. पण रजणीची सजावट काही संपेना संध्याकाळी कशीबशी संपली आणि मी तिला तिच्या घरी पोहचवून आलो.
जरा काही काम बाकी होती म्हणून आश्रमातच मुक्काम करायचा असा निर्णय आम्हा तीघांचा आधीच झाला होता तसं आम्ही आम्याला सांगून ठेवले होते. जसं वाटलं अगदी तसच रात्री उशिरापर्यंत काम चालली. जेवण झाली होती पण झोप येत नव्हती म्हणून मंडपात सर्व गप्पा मारत बसलो होतो.
तितक्यात विवेक एक प्लॅस्टिकची बाटली घेऊन आला आणि म्हणाला की आपण एक खेळ खेळू, Truth & Dare.
आम्याने आणि संजयने काकांना सुध्दा खेळ खेळायला बोलावले. सर्वांनी एक वर्तुळ तयार केला.
विवेक ने बाटली फिरवली.

क्रमशः