lahan pn dega deva - 17 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | लहान पण देगा देवा - 17

Featured Books
Categories
Share

लहान पण देगा देवा - 17

भाग १७

आणि शेवटी तेच झालं अथर्व च्या आई बाबांचा मोर्चा हा आजी आजोबांकडे वळला. त्यांनी त्याचं एकहि ऐकलं नाही, आणि खूप काही बोलू लागले, ते विसरून गेले कि, ते त्यांच्या आई वडिलांसोबत बोलत आहेत. त्यांचे शब्द इतके टोकाचे होते कि, आजी आजोबाना होणारा त्रास त्यांना दिसत नव्हता. आणि त्यांना त्या गोष्टीचा फरक देखील पडत नव्हता. इतक टोकच बोलत होते कि, आजोबांना त्रास होण्यासाठी सुरुवात झाली होती.

तितक्यात अथर्व तिथे पोहोचला, आणि आजोबांची अवस्था पाहून त्याने लगेच साक्षीला फोन केला.

तो पर्यंत अथर्व आजोबाना रूम मध्ये घेऊन गेला, आणि इकडे वडिलांची हि अवस्था पाहून अथर्व च्या आई वडिलांचा थरकाप सुरु झाला. आणि त्यांना काही सुचेनास झालं.

तितक्यात साक्षी आली आणि शंभू काकांना विचारून रूम मध्ये निघून गेली. आणि थोड्यावेळात अथर्व साक्षी बाहेर आले, अथर्व चा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याचा राग त्याच्या आई वडिलांना समजला तसे ते त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. अथर्व चा र्राग काही केल्या शांत होण्याच नाव घेत नव्हता, आता मात्र साक्षीला हि समजत नव्हत काय केल पाहिजे, तितक्यात तिथे आजी आली आणि त्याने प्रेमाने अथर्व च्या डोक्यावरून हाथ फिरवला, बाळ सगळ ठीक होईल इतका विचार नको करूस, प्रेमाने सगळे जिंकता येते, एकदा समजावून बघ त्यांना, तुझ्या प्रत्यक निर्णय मध्ये आम्ही दोघे देखील सोबत आहोत.

अथर्व काहीही न बोलता त्याच्या रूम मध्ये निघून जातो, साक्षी आजीनां पाणी देऊन, अथर्व कडे जाते. तोपर्यंत त्याच्या रूम मधील एकहि गोष्ट जागेवर नसते, आता मात्र साक्षीला देखील काही सुचत नव्हत, कारण अथर्वला इतका रागामध्ये तिने कधीच पाहिलं नव्हत. तिने अथर्वला जवळ घेऊन खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या अवस्थेत नव्हता, म्हणून तो शांत झोपे पर्यंत साक्षी तिथेच थांबली आणि तो झोपल्यावर रूम मधून बाहेर आली आणि आजोबांकडे गेली त्यांचा चेकअप करून त्यांना जेवायला देऊन घरी जाऊ लागली तर, रात्र झाली असल्याने आजीने तिला तिथेच थांबून घेतल.

थोड्यावेळाने अथर्वला जाग आली आणि पहिला तो आजोबांच्या रूम कडे धावला, त्यांना शांत झोपलेले पाहून त्याचा जीव भांड्यात पडला, मागून साक्षी आली आणि, जास्त टेन्शन घेऊ नकोस औषधे दिली आहेत उद्या जाग आली कि चेकअप करू आणि पुढचे उपचार काय करायचे ते ठरवू. तू जेवण करून घे, टेबल वर ताट जाकून ठेवले आहे.

अथर्व- तू जेवलीस???

साक्षी – हो, नाही म्हणता म्हणता आजीने जेवायला लावल, त्या तुझ्याकडे पण येणार होत्या, पण तो झोपला आहेस म्हणून, मी त्यांना औषध देऊन आताच झोपवून आले, आता तू हि जेवून घे जास्त विचार नको करूस.

अथर्व- कसा विचार नको करूस, यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो आहे, पण त्यांना हे समजत नाहीये कि आजी परत त्यांच्या त्याच चुकीमुळे अजून एकाचा जीव जाऊ शकतो, आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे स्वतःचे वडील आहेत. इतके स्वार्थी कसे असू शकतात. उद्या जर मी देखील त्यांच्याशी असाच वागलो तर, आणि वागण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांना समजेल तरी कि ते चुकीच वागत आहेत, पण त्यांना स्वतः पुढे कोणीच दिसत नाहीये, या पेक्षा जास्त वाईट वागण मला नाहीग जमणार, पण त्यांना का समजत नाहीये. आणि तितक्यात त्याचं हे बोलणं ऐकून शंभू काका तिथे येतात.

शंभू काका- बाळ, ज्यावेळेस सरळ वागून काही साध्य होत नसेल तेव्हा, चांगल्या गोष्टी साठी वाईट वागण गरजेच असत. आज जर तू मागे फिरलास तर, तेच सगळ होणार जे सहा वर्षांपूर्वी झालं होत. आणि ते तुला होऊन नाही द्यायाच. तुझ्या प्रत्यक गोष्टी मध्ये मी तुझ्या सोबत आहे. लग्नाच्या तयारीला लागूया. तुझ लग्न हाच योग्य उपाय आहे. आणि ते होण फार महत्वाच आहे. आणि आता मागे हटायचं नाही. उद्या पासून तयारी सुरु. साक्षी बाळ तू आजोबांची काळजी घे त्यांचे योग्य ते उपचार सुरु कर आणि आम्ही लग्नाच्या तयारीला लागतो.

साक्षी- काका तुम्ही काय बोलताय, कस शक्य आहे? आजोबांना बर वाटत नाहीये आणि लग्न ?????

अथर्व- साक्षी काका बरोबर बोलत आहेत,जब घी सीधी उंगली से ना निकले तोह उंगली टेठी करनी पडती है

आणि आता तर ठरल आहे जे होईल ते होईल मला किती जरी कठोर वागाव लागल तरी चालेल पण आता माघार नाही..................