Tu Hi re majha Mitwa - 14 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू ही रे माझा मितवा - 14

Featured Books
Categories
Share

तू ही रे माझा मितवा - 14

#तू_ही_रे_माझा_मितवा...

#भाग_१४

“#कबीर?”

तिने गोंधळून विचारलं आणि झटक्यात पेपर स्प्रे काढला आणि दुसऱ्या हाताने घाईगडबडीत मोबाईल स्वीचऑन केला.

“Hey Chill..!! Come on..! Wait..! Listen..!!” तो अगदी शांतपणे तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणाला आणि तिच्या हातातील पेपर स्प्रे बघत त्याने सावध पवित्रा घेतला.
तसा तो अजिबात घाबरला नव्हता,त्याला त्या परिस्थितीत तिने घेतलेल्या ह्या सावधानतेचं कौतुकच वाटलं. आत्ता समुद्रातून सचैल न्हाऊन एखादी सुंदर जलपरी समोर उभी आहे असा त्याला भास झाला,दृष्ट लागण्यासारखी ती सुंदर दिसत होती.

“तिथेच थांब...पुढे येऊ नको हा” तिने त्याच्या दिशेने तो स्प्रे पकडला. ती सावध होती पण त्याच्या वागण्यात तिला एक आश्वासकपणा ही जाणवत होता.

“अरे...कमाल आहे, ऐक तर...! see my card at least..”त्याने वालेटमधून कार्ड काढून तिच्यासमोर धरलं.तिने ते खर्रकन ओढलं.

“Kabir S., Project Lead, 5C Datasys Hinjawadi Phase-2.”
स्प्रे धरलेला हात तसाच ठेवत तिने घाई घाईत वाचलं आणि टेबलवर ठेवलं.

“ह्या...असे कार्ड मी घरी दहा प्रिंट करू शकते...Get lost”

खरतरं त्याच्या एकंदर प्रेझेन्सकडे बघून तो खरंच कुणी हाय प्रोफाईल वाटत होता,एखाद्या हॉलीवूड सिनेमातून थेट गोव्याला प्रकट झाल्यासारखा पण ह्या अनोळखी शहरात,आडवाटेवर कुणा अनोळखी माणसावर पटकन विश्वास ठेवणं निव्वळ मूर्खपणा झाला असता म्हणून ती शक्य तेवढी सावधगिरी बाळगून होती.

तिने वेद्चा नंबर पुन्हा लावला.स्वीचऑफ येत होता,तिची चलबिचल वाढली.सौम्याचा लावला ती उचलत नव्हती. “वेद लवकर ये ना, पुढे काही अघटीत तर होणार नाही ना?’ ती मनात धावा करत होती. मनात हजारो प्रश्न येत होते. ती बिथरली.

तो बिअरचा सावकाश एक एक घोट घेत समोर उभा होता, अगदी सहज.

“Please get lost…I will call police…” ती संतापाने म्हणाली.

“मॅडम, एकतर तुम्हाला त्रास द्यायला,छेड काढायला वैगरे मी मुळीच आलेलो नाहीये,त्यामुळे हे जे काही तुम्ही इतका गोंधळ करताय ना तो प्लीज करू नका.शांतपणे ऐका....हे हसण्या खिदळण्याचे आवाज येताय ना..आठ ते दहा टारगट मुलं आहेत, फुल नशेत आहेत.मी तिकडे जरा एकटा बसलो होतो तेव्हा त्याचं बोलणं ऐकल. तुझ्यावर लक्ष होतं त्याचं. ते छेड काढायच्या विचारात होते म्हणून सांगायला आलोय की बी अलर्ट..! मला वाटलं कपल असेल पण इथे बघतोय तर तू एकटी so take care, be alert अजूनही माझ्यावरच स्प्रे ट्राय करायचाय का? मी ‘दि डेटासीस’मध्ये प्रोजेक्ट लीड असेल असं वाटत नाही का माझ्याकडे बघून? छपरी वैगरे वाटतोय का?”
तो जरा स्वतःकडे खालून वर बघत म्हणाला.

“सॉरी पण खूप जुना फंडा आहे हा मुली पटवायचा..…bloody old trick to talk with girls….project lead!! The Datasys? Ohh wait, what is your name Kabir ना?
माझी शाळेतली मैत्रीण आहे तिथे वैदेही सावंत,दोन मिनिटात सोक्षमोक्ष लावते.wait ”

अगोदर त्याची खिल्ली उडवत मग काहीतरी आठवल्यासारखं करत तिने मोबाईलमध्ये लक्ष घातलं,नंबर डायल केला.

“One correction if I am not wrong,वैदेही सावंत नाही, वैदेही सामंत....such a small world...” तो हसत म्हणाला.

तिच्या ह्या वागण्याचं त्याला फार अप्रूप वाटत होतं,तिची धडपड, गोंधळ बघून हसू ही येत होतं.

तिने फोन कानाला लावला...

“ ऋतू मूर्ख फोन बंद करून का बसली होतीस..”Wish me in the morning” हे काय असतं? सगळे ग्रुपवर विचारताय तुला....”

“वैदू वेट...काहीच दुसरा विषय नकोय..टेल मी तू 5C ला आहेस ना ..कबीर एस. असा कुणी प्रोजेक्टलीड आहे तुमच्या ऑफिसला?”

“ओह्ह माय गॉड..कबीर एस? आमचा बॉस आहे हा.तु का विचारतेय? इन्फिनिटी खडूस आहे तो. मुली जीव टाकतात ह्याच्यावर, हॉटी..अजिब्बात भाव देत नाही गं. आणि...”

ती कबीरबद्दल भरभरून बोलत असतांना तिला मधेच थांबवत ऋतू म्हणाली-

“हा ठीक ये... प्रश्न विचारू नको फक्त फोटो सेंड कर त्याचा.मला काहीतरी कन्फर्म करायचंय...”
ऋतूने डोळे बारीक करत एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला.

त्याला हसू अनावर झालं.

“ये ऋतू फोटो काय यार..काय चालूये काहीच कळत नाहीये ....”

“तू यार सांगितलं ते कर...ना”

“माझा स्टेटस बघ तुझ्या फोटोनंतर लगेचच कबीरसरांचा आहे ब्लूड्रेसमध्ये,त्यांचा ही बर्थडे आहे आज आणि हो तुला MANY..”

“ओह्ह..THANKS,बाय बाय उद्या बोलू,मी करते तुला सकाळी..बाय बाय स्वीटी सॉरी’...”

तिने तिच्या शुभेच्छा ऐकायच्या अगोदर फोन ठेवला.वैदेहीचं स्टेटस तिने बघितलं...”हो तो कबीरच होता.”

तिने हलकेच जीभ चावली.स्प्रे पर्समध्ये ठेवला. तिच्या हातांची चुळबुळ वाढली.

“सॉरी मिस्टर कबीर & HAPPY BIRTHDAY ” ती खजील झाली.

“फायनली.. मी छपरी नाहीये ह्यावर विश्वास बसला ना, की अजून काही टेस्ट घ्यायच्या आहेत ?”
त्याची स्वतःला छपरी वैगरे म्हणून घ्यायची पहिलीच वेळ असल्याने त्याला हसू अनावर होतं होतं.

“सॉरी सर” ती सारवासारव करत म्हणाली.

“ सर नको, कबीर ठीक आहे. आणि इट्स ओके..पण आता इथे इतक्या रात्री थांबणं योग्य नाही.तू परत जावं I THINK..”

“No, actually someone special is coming and then we are going to celebrate my birthday..”ती लाजत म्हणाली,नंतर जरा चपापली ‘आता हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार..’

“Ohh its your birthday today!! Good”.

“प्लीज डोंट विश..” ती एवढंस तोंड करत म्हणाली.

“What??”…तो खळखळून हसत म्हणाला.

“Actually,Ved my BF त्याला सर्वांच्या अगोदर मला विश करायचंय you know…so …” ती ब्लश होत म्हणाली.
तिचं ते त्याच्या दृष्टीने बालिश असलेलं उत्तर ऐकून त्याने डोक्याला हात मारला.

“What? Really? I mean come on…!! हे असं ही असतं?” तो तिची खिल्ली उडवत म्हणाला.

ती फक्त हसली.

“मला वाटतं तू त्याला फोन करावा.लगेच. आणि बाय द वे इथे सेलिब्रेट करण्याची बकवास आयडिया कुणाची होती?..इथल्या रिसोर्टवाल्यांना तर माहितीये ही जागा किती रिस्की आहे.तुम्हाला प्रायव्हसी अजिबात मिळाली नसती उलट नशेडी लोकांचा त्रास झाला असता.रात्रभर पेट्रोलिंगची गाडी हॉर्न वाजवत फिरत असते.Very stupid idea. प्रायव्हेट सेलिब्रेशन पलीकडल्या बाजूला छान होतं.अगदी सेफ. त्यामानाने ह्या एरीयामागे कम्प्लीट दाट झाडी आहे. ”

तो जरा नाराजीने म्हणाला.

तिचा चेहरा उतरला,खरतर राग देखील आला काबीरचा पण तो बोलत होता ते खरंही होतं.

“Actually वेद्चा फोन बंद येतोय,मला काळजी वाटतेय..तो अगोदर आला असेल आणि त्याला काही झालं तर नसेल...” तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं,तिने पुन्हा त्याला फोन लावला,ऑफच होता.

“बाकी फ्रेंड्स नाही का? त्यांना विचार...” त्याने आजूबाजूला बघितले शिट्ट्यांचे आवाज जवळ येत होते,लेझरचे फोकस मारले जात होते.

तिने पुन्हा सौम्याला फोन लावला.सौम्याने उचलला -

“सौम्या कुठेय यार तू?” तिने रडवेल्या आवाजात विचारलं.

“ओह्ह्ह हो बर्थडे गर्ल..अरे पोहचतोय रेसोर्टमध्ये पाच मिनिटांत,काय झालं?” स्कूटीवर मागे बसल्याने जरा ओरडून बोलत ती म्हणाली.

“सौम्या लवकर जा आणि वेद तिथे कुठे आहे का बघ ना,प्लीज. मला एका ठिकाणी बोलावून तो आलाच नाहीये अजून” ती जरा रागात,जरा काळजीत म्हणाली.

“ओह्ह..ओके तू शांत हो, दहा मिनिटात सांगते तुला.”सौम्याने तिला अश्वस्थ केलं.

कबीर शांतपणे सिगारेट ओढत खाली रेड कार्पेटवर बसला,त्याचं लक्ष त्या टोळीकडे होतं,आता प्रसंगी एकदोघांना ठोकवं लागणार ह्या विचाराने तो सावध झाला.

“सौम्या माय फ्रेंड...ती पोहोचतेय रिसॉर्टवर..” ती जरा दूर खुर्चीवर बसली.

“सो,ऋतुजा....” तो काही बोलणार तसं संशयाने पुन्हा त्याच्याकडे बघत ती म्हणाली.

“एक मिनिट...How do you know my name? I have not told you right?”

“Madam, Your Ved displayed your name everywhere in this tent.” त्याने वर बोट दाखवत इशारा केला. वर तुळयाना धरून लावलेल्या चंद्राच्या कटआउटवर “Happy Birthday Rutuja” “VED &RUTU” असे वेगवेगळे मेसेजेस होते.तिला हसू आलं.पण क्षणात वेद का आला नसेल ह्या विचाराने पुन्हा डोकं वर काढलं.

“ओह्ह, कबीर सॉरी,मला काय होतंय ना कळत नाहीये...I think we should leave.वेद इतका वेळ लावणार नाही,मला कधीच तो असं ताटकळत ठेवणार नाही, मला वाटतंय वाट बघण्यात खरंच काही अर्थ नाही.” तिला अस्वस्थता जाणवत होती.

“OK,...चल! अदरवाईज ह्या ग्रुपमधल्या चारपाच रोमियोंची जरा धुलाई करावी असा मनात विचार येत होता...तेवढाच व्यायाम झाला असता.” त्याने उठून जरा हातांना आळोखेपिळोखे दिले, त्याची भारदस्त अथलीट बॉडी बघून नक्की चारपाच जण सहज धुतले गेले असते याची तिला खात्री पटली.ती माफक हसली.तिने त्याने दिलेलं कार्ड पर्समध्ये ठेवलं.

“ते बलून घे आणि हो तो केक त्या पेपर बॅगमध्ये घे,बीएफ महाशयांनी प्रेमाने आणलेला आहे आफ्टरऑल,रूमवर साजरा करा बर्थडे.celebration and all haa ” तो पुन्हा उपहासाने हसत म्हणाला.
तिला त्याच्या ह्या sarcasm चा राग येत होता पण त्याचं मनमोकळं खळखळून हसणं त्याच्या स्वच्छ मनाची जाणीव करून देत असल्याने ती गप्प होती.
तिने केक आणि दोन सुंदर मोठे बलून होते ते सोबत घेतले.

“तुम्हाला प्रेम,लव्ह एक्सप्रेशन,सेलिब्रेशन...जीएफ,बीएफ यांचा तिटकारा आहे का?” त्याच्या आवाजातला उपहास जाणून ती म्हणाली.

“१००% ,love and all that…bloody time pass.”तो तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाला.

“काही बोललात का?” तिला तो काय बोलला हे समजलंच नाही.

“नाही,काही नाही...तुमचं चालू द्या,I hate this cliché love game.” तोच उपरोधिक स्वर.

“Whatever….बंदर क्या जे अद्रक का स्वाद ”तिनेही ओठातल्या ओठात पुटपुटत,त्याचं उत्तर धुडकावत म्हटलं.

“ चल...” तो तिला पुढे जायला रस्ता करून देत म्हटला.ते निघाले.

“मग!! आता एक जबरदस्त फाईट सीन बघयला मिळणार..... ”मै तुम्हारी राह देख रही थी और तुम मुझे अकेला छोड के यहा आराम से बैठे हो?” तुझ्या चेहऱ्यावर तीन वेळा कॅमेरा...”वाव,काश मला बघायला मिळाला असता हा सीन.”
त्याचं बोलणं सरळ नव्हतंच.

“मिस्टर कबीर असं काहीही होणार नाहीये,आणि तुम्ही रोज असं वाकड्यातच बोलतात का? वैदेही अगदी बरोबर म्हणत होती..एक नंबर खडूस आहे.” ती बोलून गेली आणि तिने जीभ चावली.

“ओह्ह्ह वैदेही...मला khadus म्हणते का?…ओके,लक्षात ठेवेन असेसमेंट करतांना.” नाटकी स्वरात तो म्हणाला.

“सॉरी सॉरी..,प्लीज फरगेट,मी असंच गमतीत ,उगाच म्हटले..प्लीज” ती अजीजीने म्हणाली.

“Hey रिलाक्स,मला माहितीये सगळं. बालिश आहेत ते सगळे. सतत ब्रेकअप,प्रपोज,लव्ह,पार्टी,हँग आऊट आणि काय काय... bloody Childish and funny” तो हसत म्हणाला.

“प्रेमात असणं तुम्हाला childish and funny वाटतं?” ती तिरसटपणे म्हणाली.

“Sorry तू दुखावली गेली असशील तर but I like practical life, Eat, sleep, work repeat ज्यांच्याकडे खूप वेळ आहे त्यांनी आरामात करावं प्रेमवैगरे.प्रेमाशिवाय आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे.” तो अगदी शांततेत म्हणाला.

“म्हणजे आम्ही रिकामटेकडे..” ती रागाने म्हणाली.

“मी काय बोलू?ज्याची त्याची priority ,माझं प्रेफरन्स कामाला आहे.” तो शक्य तितक्या शांततेत म्हणाला.

“म्हणून काय दुसर्यांच्या प्रेफरन्सला हसायचं,गौण समजायचं नसतं. जेव्हा तुम्हाला प्रेम होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. अक्चुली, नाही.. वेट मी तर म्हणेल की देवाने तुम्हाला प्रेमात पाडावं... love, love, love repeat.” ती खुदकन हसत म्हणाली,काही महिन्यांपूर्वी तनु आपल्यालाही असंच म्हणाली होती हे आठवून तिला हसू आलं.

“चान्सच नाही....!”

“काही दिवसांपूर्वी मी देखील हेच म्हटले होते...” ती जरा थांबली.तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू तरळलं.

“मग?” तो ही थांबला,तिच्याकडे बघत त्याने विचारलं.

“मग,माझ्या आयुष्यात माझा वेद आला....” ती पुन्हा मंद हसली,चेहऱ्यावर येणाऱ्या बटा तिने सावरल्या आणि ती पुढे निघाली.

***************

सौम्या आणि अनुजने रेसोर्टमध्ये पोहचल्यावर जो दिसेल त्याला वेदबद्दल विचारायला सुरुवात केली,जे होते त्यांना माहित नव्हतं.चेतन फुल टाईट होऊन झोपला होता.सौम्याने नाईटशिफ्टला रिसेप्शन सांभाळणाऱ्या मुलाला विचारलं,त्याला वेद माहित नव्हता पण सॅम टेरेसवर आहे हे त्याने सांगितलं.

अनुज टेरेसवर गेला,ते ही झोपलेले दिसले.अनुजने जयला जागं केलं.

“जय वेद कुठेय?”

“काय..” तो बरळला.

“जय वेद कुठेय,प्लीज सांग”त्याच्या डोळ्यांना बाटलीमधून थोडंस पाणी घेऊन ते लावत तो म्हणाला.

“यार तो ऋतुजासोबत असेल मला काय विचारतोय.

आमच्यासोबत थोडावेळ बसून तो लगेच निघाला.” तो नाटकीपणे झोपेत असल्यासारखं म्हणाला.

“नाहीये तो तिच्यासोबत.”

“झोपू दे यार,माहित नाही..” तो पुन्हा बरळला.अनुजला वेदचा मोबाईल तिथेच पडलेला दिसला,त्याने तो घेतला आणि वैतागून खाली आला,सौम्या बाहेर गेलेल्यांपैकी काहींना फोन लावत होती.

“समजलं काही?” अनुजने विचारलं.

“नाही रे ,तुला?”

“नाही,हा मोबाईल होता फक्त”

ते बोलत असतांना मागून रेवा आली.

“सौम्या,ऋतुजा कुठेय काही माहितीय का?” ती अगदी शांतपणे म्हणाली.

“बाहेर आहे कुठेतरी,काय झालं?” सौम्याने विचारलं.

“अगं,वेद...तो माझ्या रूममध्ये झोपलाय,ड्रंक आहे मे बी.ऋतुजाचं नाव घेतलं बऱ्याचदा म्हणून म्हटलं तिला बोलवावं.” ती अगदी साळसूदपणे म्हणाली.

“तुझ्या रूममध्ये? कसं काय?” सौम्या रागात म्हणाली.

“अग तो बाहेर कुठेतरी जात होता पण त्याला शुद्ध नव्हती... लटपटत जात होता.नेमके मी ही रिसोर्टवर परत आले.हा माझ्या रूमसमोर येऊन जवळपास बेशुद्ध झाला.मी आवाज दिला सॅम आणि जयला पण कुणीच रिप्लाय दिला नाही, सो त्याला झोपवलं आणि त्याला त्रास होत नाहीये ना हे बघत बसले.तो ऋतुजाची आठवण काढतोय म्हटल्यावर बाहेर बघायला आले.” तिचं नाटक अगदी उत्तम वठल होतं.

“ओके,मी ऋतूला सांगते.” सौम्या जरा रिलॅक्स झाली आणि तिने ऋतूला फोन लावला.
******************

वॉकवे संपणारच तसं पळतच ,जर दांडगाई करत त्या ग्रुपमधली दोन थोराड मुलं त्यांच्या समांतर थोडं दूर मोठ्याने अश्लिल गाणी म्हणत चालत होती.
कबीरने सवयीने मुठी आवळल्या पण तो अजून शांत होता.
जरा त्यांच्या स्पष्ट नजरेच्या टप्प्यात येत एक मुलगा ओरडला-
“wanna go for ride…baby”

“tell me your rate” दुसरा मोठ्याने ओरडला आणि दोघं खदखदून हसायला लागले.

कबीरचे डोळे आता संतापाने लाल झाले.त्याने जरा हात पसरवत, आळोखेपिळोखे देत हात रिलॅक्स केले आणि संतापात त्यांच्याकडे निघाला.

“कबीर प्लीज लिव्ह देम...लेट्स गो.” त्या दोघांकडे काही चाकू, सूरा असेल तर? ह्या विचाराने तिचे पाय लटपटायला लागले.
आपल्यामुळे कबीरला काही झालं तर? ती प्रचंड घाबरली.

“You stay over there, स्टाच्यु…!!” मागेवळून बघत त्याने तिला सज्जड दम भरला.

तो झपझप त्यांच्या समोर गेला. तो असा धिप्पाड,उंचपुरा त्यांच्या समोर येताच ते जरा बुजले.ते ही जरा थोराड होते पण कबीरचा आवेश पाहून ते जरा चपापले.

“माझा रेट सांगू का?****”

मुठ आवळून एक जोरदार बुक्की त्याने एकाच्या गालावर दिली.तो विव्हळला गाल दोन्ही हातांनी झाकत तो पळत सुटला.कबीरने दुसऱ्यावर हात उगारण्या अगोदरच तो ही पळून गेला.

“**** साले”
जोरदार मुक्क्याने हाताला झिणझिण्या आल्या होत्या. तो हात झटकत तो मागे वळला.ती घाबरून स्तब्ध उभी होती.थरथर कापत होती.

“Move” हसून,दोन बोटांनी गोळी झाडल्याची acting करत तो म्हणाला आणि सहजपणे पुढे गेला.

“तू मूर्ख आहेस का? हे काय होतं? त्यांना मारायची काहीच गरज नव्हती...त्यांच्याकडे काही हत्यारं असती तर? त्यांनी आता तुझा पाठलाग केला तर? ” ती तिथेच थांबली,तो पुढे चालता चालता थांबला.

“तर काय,पुन्हा मारामारी....I just love मारामारी.” तो त्याच्या भारदस्त मसल्सकडे बघत खळखळून हसत म्हणाला.

“सॉफ्टवेअर प्रोफेशनल कमी आणि गुंडा जास्त वाटतोय तू” ती रागात म्हणाली.

“अरे गुंडा काय,हे असं छेडछाड करणाऱ्या मवाली मुलांना असंच ठोकलं पाहिजे,पुन्हा कुणाचं नाव घेणार नाही असं,तू उगाच पॅनिक झालीस, नाहीतर आजू दोन पंच देऊन दात तोडले असते**** चे”

“My God, You are impossible.” ती वैतागून पुढे गेली.

वॉकवे संपलाल्यावर समोर तिच्या रिसोर्टच्या बागेचं गेट होतं.
बाग तीन मोठ्या टप्प्यात असल्याने रिसोर्टचं मेन गेट अजूनही बऱ्यापैकी दूर होतं.अंधाराच्या पार्श्वभूमीवर झाडांची सळसळ जरा घाबरवत होती,पण इथे बाहेर लोकांची तशी तुरळक वर्दळ देखील होती.

“धन्यवाद,मदत केल्याबद्दल.” ती गोड हसून म्हणाली.

“मदत नाही केली,सोबत केली फक्त.” तो ही जरा हलकंस हसत म्हणाला. ती उत्तरादाखल पुन्हा हसली.

“मग,वाढदिवस कुणासोबत साजरा करणार आज? फॅमिली सोबत आहेस की मित्रांसोबत.” ती सहजपणे म्हणाली.

“मी नेहमी गोव्याला एकटा येतो,माझे विचार सहसा कुणाला पटत नाहीत.मी avoid करतो लोकांना ,लोकं फारच स्वप्नांत जगतात, इमोशन,भावनिक गुंतवणूक मग रुसवे फुगवे it sucks..!! so boring आणि Birthday चं काय सेलेब्रेशन असतं,हे असं केक न बलून?...आय मीन यार ...पुन्हा सॉरी..तुला हर्ट करायचा विचार नसतो खरतरं पण हे आहे हे असंय.That is why I prefer to be alone..” तो खजील होत म्हणाला.

“अगदी बरोबर...! तुम्ही एकटेच ठीक आहात. तुमचं म्हणजे कसंय देवाने माणूस बनवायचा म्हणून एखादं सुंदर शिल्प घडवावं आणि त्यात हृदय,भावना असं काहीबाही टाकण्यापूर्वी घाईघाईत आजच्या दिवशी पृथ्वीवर दिलं ढकलून...काय घाई झाली होती देवाला काय माहित? ती खळखळून हसत म्हणाली.

“मला वाटतं देव एखादं दुसरं, सगळ्यात सुंदर प्रोडक्ट् बनवायला निघून गेला असेल जे त्याला काही वर्षांनी ह्याच दिवशी डिप्लोय करायचं असेल..काय बरोबर ना?”

तो ही तिच्याकडे बघत हळूच हसत म्हणाला.ती जरा गोंधळली...हसू की नको? काय उत्तर देऊ?..उत्तरादाखल अगदी थोडं हसू तिच्या ओठांवर होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि उत्तर देण्यातून सुटका झाली.

“बोल सौम्या..”

“ऋतू,वेद रिसोर्टलाच आहे आणि छान पिऊन पडला आहे रेवाच्या रुममध्ये.तू ये परत.”

“काय? डोकं ठिकाणावर आहे का तुझं काय बोलतेय ते?” ती वैतागून म्हणाली.

“ऋतू समोर जे दिसतय ना तेच बोलतेय आणि बाकीची कर्मकथा रेवाच सांगेल तुला. ये तू परत, मी चालले झोपायला.बाय..! डोकं फिरलंय माझं...आम्ही तुझा बर्थडे सेलीब्रेट करणार होतो. ते ही तुम्हा दोघांसाठी कॅन्सल केलं.तू साधं विशसुद्धा करू दिलं नाहीस..जाऊदे,आज मी काही बोलणार नाही तुला,नंतर बघते.” सौम्याने चिडून फोन ठेऊन दिला.

ऋतूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.परक्या व्यक्तीसमोर भावनांचं प्रदर्शन नको म्हणून तिने स्वतःला सावरलं.

“काही प्रॉब्लेम झालाय का?your BF is ok?”तो ही काळजीने म्हणाला.

“हो,ठीक आहे.जरा बरं वाटत नाहीये त्याला,चलो थँक्स,निघते मी ”

ती सारवासारव करत,थोडंस खोटं अवसान आणत म्हणाली.

“ओके,चल मेन गेटपर्यंत सोडतो....” तिची परिस्थिती पाहून तो म्हणाला.

“No thanks ,I will manage.”ती तुसडेपणाने म्हणाली,तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.

“ओके टेक केयर...” तो नाईलाजाने म्हणाला.

“कबीर,उद्या वेद आणि माझ्यासोबत ब्रंच घ्याल का? As a Small token of thanks..”

“आलो असतो,पण मी उद्याच चेकआउट करतोय,दहापर्यंत निघून जाईन.Never mind, भेटू कधीतरी भेट होणार असेल तर.” तो हसून, डोळे मिचकावत म्हणाला.

“OK, Thanks a lot & बाय”

“बाय टेक केयर.” तो ही म्हणाला आणि ती आत जायला वळली

“ऋतुजा...” त्याने मागून आवाज दिला.

ती वळली,डोळ्यानीच मान उंचावून तिने ‘काय’ असं विचारलं.

“Statue..” तो डोळे मिचकावत म्हणाला आणि तिच्यापर्यंत चालत गेला, ती थोडंस आश्चर्याने थोडंस हसून त्याच्याकडे बघत तशीच थांबली.तिच्या हातातल्या दोन बलूनपैकी एक बलून त्याने काढून घेतला.तिच्याकडे पाठ करून पुढे निघतांना म्हणाला-

“Move”

तिला हसू आलं,ती आत निघून गेली.लाटांची धीरगंभीर गाज, दूरवरून येणारा गाण्यांचा हलका आवाज,पानांची सळसळ आणि मनातला कोलाहल..कुठलाच आवाज सुटा नाही,स्वतंत्र नाही... सगळाच गुंता....!!
ती झपझप पावलं टाकत पुढे जात होती. तो वळला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो बघत राहिला,त्याने शांतपणे सिगरेट पेटवली...धुरांच्या वलयात अंधुक अंधुक होत,ती दिसेनासी झाली.

क्रमशः

©हर्षदा

(यार जरा रागावले आहे वाचकांवर, कथेचे कुठले संवाद,कुठला प्रसंग,कुठलं पात्र, ठिकाण आवडलं,नावडलं,जरा ह्याबाबत पण दोन शब्द लिहा की कमेंट्समध्ये, 'नेक्स्ट पार्ट कधी ' ह्या वाक्याच्या पुढे ही लेखक-वाचक संवाद जाऊ द्या...नाहीतर लेखकाला हुरूप कसा येणार लिहण्याचा... आणि पोस्ट करण्याचा?आणि हो इतर वाचकांना देखील पेज रेकमंड करा...ऋतू न वेदला पोहचू द्या लोकांपर्यंत😘😘😘😘)

प्रश्न-नेक्स्ट पार्ट कधी ?
उत्तर- एका तासात,लगेच

बस्स खुश😘😘😘