Tu Hi re majha Mitwa - 12 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू ही रे माझा मितवा - 12

Featured Books
Categories
Share

तू ही रे माझा मितवा - 12

#तू_ही_रे_माझा_मितवा 💖💖💖💖

#भाग_12

#VidaMar रिसॉर्ट ”

ह्या प्रायव्हेट बिच प्रॉपर्टी समोर गाडी थांबली. एकच गलका करत सगळे बाहेर आहे.दोघे तिघे तर पहिल्यांदाच गोव्याला आल्याने अगदीच हरखून गेले होते.खुश होते. बागा आणि कलंगुटच्या मध्ये कुठेतरी असणारी प्रशस्त प्रॉपर्टी.समोर तीनचार टप्प्यात असलेली विस्तीर्ण बाग, पुढे लांबच लांब पसरलेला पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा,शाळकरी पोरांच्या शिस्तीने ओळीत मांडलेल्या shack, थोडं बाजूला पाच ते सहा वेताचे अँटिक टेबल आणि सोफा आणि निळाशार अथांग सागर..शांतता असल्याने समुद्राची गाज हलकीशी का असेना पण ऐकू येत होती.

प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याने अगदी तुरळक लोक तिथे होते.

“वेलकम टू VidaMar”
गोरा रंग,बरगंडी कलर केलेल्या केसांचा छोटा बन,उजव्या भुवईवर असलेल पिअरसिंग,छोट्या चणीच्या एका मुलाने हसत सगळ्याचं स्वागत केलं.जयने जाऊन त्याला करकचून मिठीच मारली.

“साल्या साक्षात फिरंगी दिसतोय सॅम”

“You have also changed a lot chamko” सॅम ने त्याचे गाल ओढले.

“महाराजा,अस चमको म्हणू नको,सुंदर पोरी आहे सोबत.” तो त्याच्या कानात पुटपुटला.

“ओके..” सॅम खळखळून हसत म्हणाला.

जयने अगोदर सॅमची आणि वेदची ओळख करून दिली.
१२ जणाच्या ह्या ग्रुपशी ओळख करून घेतांना सॅमच्या नाकी नऊ आले खरे.तो हसून फक्त हेल्लो म्हणत होता.सगळ्यांशी ओळख झाली फक्त ऋतुजा समोर एकटीच उभी राहून समुद्राची गाज ऐकण्याचा प्रयत्न करत होती.
रॉयल ब्लू फ्लावर प्रिंट स्पेगटी टॉप आणि थ्रीफोर्थ, वाऱ्यावर उडणारे तिचे हलके कर्ल्स सावरत ती उभी होती.सगळ्यांची ओळख झाल्यावर दूर उभ्या असलेल्या ऋतूकडे बघत सॅम म्हणाला.

“..and that beautiful lady is the birthday girl…right?”

तो तिच्याकडे एकटक बघत होता पण लगेच भानावर येत त्याने वेदकडे बघितलं.

“Right…she is the one ” डाव्या बाजूला हातांनी हार्टशेप बनवत,गोड हसत वेद म्हणाला.

“ohh yes, I know,जयने सांगितलंय मला.” त्याच्या बोलण्याचा योग्य तो अर्थ कळून सॅम म्हणाला.

“Bro…planning should be awesome as you promised.” वेदने त्याला पुन्हा आठवण करून दिली.

“Yup, you don’t worry, it will be memorable birthday for her.” जयकडे बघून हलकेच डोळा मारत तो म्हणाला.

ग्रुपमधल्या मुलांनी सॅमला लिकर,पब आणि काय काय ,थोड्याच वेळात सगळ्याच बाबतीत भंडावून सोडलं.

“चलो गाईज लवकर फ्रेश होऊया,तुमचे रूम नंबर ग्रुपवर सेंड केलेय.come on fast.” जय सर्वांना रिक्वेस्ट करत म्हणाला.

दूर उभ्या असलेल्या ऋतूला वेदने हात करून बोलावलं.तिने मानेनेच नकार दिला.

“वेद आता हिचं काय नवीन? घेऊन ये तिला,उशीर होईल” वैतागत जय म्हटला.

“ये साक्षात,जा तू आत. मी तिला घेऊन येतो,इतका काय वैतागतोय.”

“वैताग येतो ना यार १० तास travel करून,पहाटे पाचपासून बसलो होतो ह्या पुष्पक विमानात” तो नाराजीने म्हणाला.

“ओके,जा तू फ्रेश हो मी आलोच,आपण रूम शेयर करतोय ना?”

“ हो..2B,दुसऱ्या मजल्यावर...”

“अच्छा आणि ऋतू?”

“खाली सौम्यासोबत 1D”

“ठीक आहे, हो पुढे आलोच.”

बागेच्या आतल्या बाजूच्या कंपाउंडला टेकून ती उभी होती. शेजारच्या रेसोर्टमधल्या भल्या मोठ्या कारंजाच्या पाण्याचे तुषार वाऱ्याच्या तीव्र झोताने तिच्या चेहऱ्यावर उडाले.त्या थंड स्पर्शाने ती अधिकच सुखावली.त्या कारंजाकडे तोंड करून,दोन्ही हात मस्त पसरवून मनसोक्त ती अजून ते पाणी चेहऱ्यावर घेत होती.वेदला हसू आलं.

“ये वेडाबाई हे काय लहान मुलीसारखं? चल फ्रेश होऊन,थोडं खाऊन बिच वरच जायचंय.चल सगळे चिडतील.”

“ठीक आहे.” नाईलाजाने ती जायला निघाली.

***********

बीचवर मनसोक्त खेळून, माश्यांच्या वेगवेगळ्या चविष्ट डिशवर ताव मारून सगळे आता पबला जायच्या तयारीत होते.डान्स-लिकर सर्वांना खुणावत होतं. वेद आणि ऋतू जाणार नव्हते. बऱ्याच वेळापासून रेवा दिसली नाही म्हणून जय तिला शोधत होता.त्याने फोन केला,ती बागेत एकटीच बसली होती.

“रेवा एकटी का बसलीय,चल ना सगळे पबला जाताय,तयार हो.” तिच्या शेजारी बसत तो म्हणाला.

“नको इथे छान वाटतंय आणि ग्रुपने ट्रीपला आलोय ना,मग सगळ्यांनी मिळून मजा करायची ना? ती तर घेऊन गेलीय वेदला बिचवर.”

“यार रेवा वेद म्हणजेच सगळं काही आहे का? माझ्यासाठी नाही येऊ शकत का तू पबला?”

“जय?”

‘अगं,म्हणजे यार आम्ही पण आहोत ना,काय सारखं वेद वेद आणि उद्याचा दिवस फक्त नंतर शुअरशॉट त्याचं वाजणार आहे, ते ही कायमचं ! बसू दे काहीवेळ.आपण करूया की सेलीब्रेट कारण मग रडारड,भांडण यात अख्या ट्रीपची वाट लागणार आहे.कदाचित आपल्या चौघांना तरी ट्रीप कॅन्सल करून जावं लागेल.ती अप्सरा किती नौटंकी करेल याचा विचार कर, म्हणून म्हणतोय आजची रात्र,उद्याचा दिवस फुल एन्जॉय करू,मग उद्या रात्री आपला परफॉर्मन्स आहेच.” तो तिला मनवायचा प्रयत्न करत होता.

“ठीक आहे,सॉरी.खरंच कधीकधी सारखं वेद-वेद करून तू अवतीभवती आहे याचा विसरच पडतो.तुला खूप गृहीत धरते का रे मी?

“साक्षात्कार झाला? प्रवचन झालं? चलायचं?”

“हो आलेच तयार होऊन.” ती हसत म्हणाली.

******

किनाऱ्यावर तुरळक लोक होते.अगदी दूरवर बागा बीचच्या गोंगाटाचा अगदी अस्पष्ट आवाज तेवढा येत होता. लाईट टीमटीमायला लागले होते. उन्हं समर्पित होऊन आताश्या सावलीच्या अधीन झाली होती. मादक संध्याकाळच्या धुंदीत असल्यासारखं सुंदर वातावरण आणि त्यात भरीला स्वतःच्याच नादात हरवलेला समुद्र.
किनार्यालगत थोडं दूर छान वेताच टेबल आणि लांब सोफा होता.टेबलवर काचेच्या नक्षीदार बशीत LED दिवा ठेवलेला होता.अजून त्याची तशी गरज नव्हतीच,बाहेरचा काजळी धरलेला सोनेरी प्रकाश आपलं क्षणभंगुर अस्तित्व दाखवत मिरवत होता.
ती वेद्च्या खांद्यावर डोकं टेकवून बसली होती. अंगात बेबी पिंक शोर्ट रॉम्पर,गळ्यात बोहो स्टाईल नेकपीस,लांब टसल कानातलं,नाकात छोटीशी सिल्वर नोजपीन,डाव्या पायात काळ्या anklet मध्ये डकवलेलं चांदणीच्या आकारातलं सिल्वरचार्म. डोळ्यात गडद काजळ,अगदी माफक मेकअप.ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिच्या स्टनिंग गव्हाळ रंगावर शोभून दिसणारं हे अटायर पाहून बऱ्याच जणांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या होत्या.वेद ही बारीक फ्लोरलप्रिंट हाफशर्ट आणि शॉर्टसमध्ये कमाल दिसत होता.

एकाच रंगाच्या असंख्य छटा पसरवत सूर्यास्त झाला.समुद्राच्या फेसाळ लाटा किनाऱ्याशी लगट करून परतून जात होत्या आणि पुन्हा तेच ते.पाठशिवणीचा हा खेळ न कंटाळता बघत ते फक्त बसून होते.

“वेद काय विचार करतोयस?बोल ना काहीतरी.” त्याच्या दंडाभोवती हाताची मिठी घट्ट करत ती म्हणाली.

“माझ्या आयुष्यातल्या दोन सुंदर गोष्टी एकाचवेळी माझ्या जवळ आहे यावर अजूनही विश्वास बसत नाहीये माझा. समोर डोळ्यात न मावणारं प्रेम आणि शेजारी हृदयात न मावणारं! कुणावर जास्त प्रेम करू समजत नाहीये.”

“फक्त माझ्यावर..”त्याच्या बोटात बोटं गुंफत ती लाडिकपणे म्हणाली.तो गोड हसला,पुन्हा त्याच्या खोल खळ्या चमकल्या.
ती अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत राहिली....

"वेद मला आत्ता एक कॉपीराईट घ्यायचाय ...."

"आत्ता? कॉपीराईट?" तो आश्चर्याने हसून म्हणाला.

" तू माझ्या डोळ्यांना नेहमी दोष देतोस ना ....हे तुझे दोन डिंपल पण तेवढेच चोर आहे ,सारखा त्रास देतात, आज नावावरच करून घेते त्यांना"
"व्हॉट" तो जरासा ब्लश होत हसला.

तिने पुढे होऊन त्याच्या दोन्ही खळ्यांवर ओठांनी हलकी लिपस्टीक उमटवली.
"This deadly, sugary dimples belongs to rutuja only "
ती जरा ओरडून म्हणाली.

तो बराच वेळ हसत राहिला,तिने दोन्ही हातांनी तिचं तोंड लपवलं.

आत्ताच सूर्यास्त होऊन कोवळासा अंधार पसरला होता.तिचा हात हळूच सोडवत त्याने तो दिवा चालू केला.मिणमिणता,हलका उजेड पसरला.त्या उजेडात तिचे काजळ भरलेले डोळे आणि वाऱ्याने चेहऱ्यावर येणारे केस अजूनच मोहक वाटत होते.

“असं बघू नको!” ती केस सावरून एका खांद्यावर घेत लाजून म्हणाली.

“हवेला पण आवडतं बघ तुझ्या केसांशी भांडायला. नको सोडवू त्याचं भांडण.मला आत्ता काय वाटतंय सांगू?”

“ह्म्म्म...” तिच्या हृदयाची धडधड वाढली.

“I just wanted to make cafune ” तिच्या डोळ्यांना नजरकैद करत म्हणाला.

“कफुनेय...?” ती गोंधळली.तिच्या डोळ्यातले प्रश्न त्याला अपेक्षित होतेच.

“त्या समोर फेसाळणाऱ्या लाटा दिसताय ना? अगदी धावत पळत मनात हजार प्रश्न घेऊन किनाऱ्याकडे येतात,जसं कुणी थांबलंय समोर त्यांना कवेत घ्यायला.पण किनारा त्यांना हलकेच थोपवतो. ह्या तुझ्या हलक्या कर्ल केलेल्या केसांच्या बटांसारख्यासारख्या लाटा, अगदी मुजोर. किनारा हळुवारपणे त्या केसांतून हात फिरवतो....it just make a cafune!! Cafune to its loved one..!! अगदी असंच, पहिल्यांदा तुला पाहिलं होतं ते ट्रेनिंगहॉलच्या दरवाज्यात..तुझ्या डोळ्याहून अधिक जास्त प्रेमात मी ह्या केसांच्या पडलो,त्या दिवशी डायरीत पहिली नोंद केली....कफुनेय? हा शब्द फक्त माझ्यासाठी असणाऱ्या कोणासाठी तरी बनवला गेलाय असं नेहमी वाटायचं,तुला पाहिलं त्या पूर्वी ही कुणासाठी इतकी चलबिचल झाली नव्हती. आज ह्या लाटा,ही समुद्राची गाज आणि जवळ तू,मला खरतर विश्वास होत नाहीये.बघ ना आपण आपल्या अतीव आनंदाला खरं मानत नाही...हा आनंद लवकर निसटून जाईल अशी सारखी भीती मनात असते,आनंदाच्या क्षणांवर विश्वासच नसतो आपला,चिमटा काढावा लागतो.पण असं दुःखाच्या बाबतीत होतं का? दुःखी असतांना निसंशय दुःखी असतो..तेव्हा चिमटा काढवा लागत नाही. हे तुझं असं माझ्या इतक्या जवळ असणं,हा क्षण हे सगळं निसटून जायला नको...!” त्याला असं हळवं कातर झालेलं बघून ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली-

“वेद हे क्षण आणि असे कित्येक क्षण फक्त आपले असतील...”

त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले,तिने डोळे मिटले आणि त्याचे हात तिच्या घनदाट केसांमधून हळुवार फिरत राहिले.....Cafune!!

अंधाराच्या पार्श्वभूमीवर चंदेरी लाटा किनाऱ्याकडे धाव घेत होत्या,किनाऱ्याच्या कानात हळूच सांगत होत्या..

“Just make a cafune…all the night…till sunshine, till sunset. again and again and again !!”

क्रमशः

©हर्षदा

स्टे ट्यून गाईज....